पाहा! जर आपल्या मनात धन कमविण्याची किंवा भोग भोगण्याची तृष्णा असेल तर ढोंग करण्याची आवश्यकता नाही. धन मिळविणे पाप नाही. भोग भोगणे सुद्धा पाप नाही. हां! पण केवळ इतके करा की, प्रामाणिकपणाने धन कमवा आणि धर्मानुसार भोग भोगा. केवळ एवढे केले तरी देखील आपण योगाची अवस्था प्राप्त करून घ्याल. आपण संसारातून उपरामता प्राप्त करून घ्याल.
वृंदावनात श्रीबिहारींजीवर एका सज्जनाचे खूप प्रेम होते. ठाकूरजींच्या कृपेने त्याचा कारखाना चालू होता. त्याचा एक भागीदार होता. तो वर-वर तर त्या सज्जनावर खूप प्रेम दाखवीत होता; पण मनात असा विचार करीत असे की, ‘जर हा मेला तर सम्पूर्ण कारखाना माझा होईल.’ एक दिवस त्या सज्जन व्यक्तीने कोणत्या तरी धातूला स्वच्छ करण्यासाठी ॲसिड मागविले व तसेच खाण्यासाठी पान देखील मागविले. भागीदाराने दोन्ही वस्तू आणल्या. जेव्हा तो सज्जन ते पान घेऊ लागला तेव्हा भागीदार म्हणाला- “आपण हात धुतल्याशिवाय पान घेऊ नका. या! मीच आपल्या मुखात पान घालतो, आपण तोंड उघडा.” त्याने आपल्या भागीदाराच्या प्रेम प्रदर्शनाला हसत-हसत तोंड उघडून पान घेतले. त्याच वेळेला अचानक ॲसिडच्या बाटलीचे बुच (झाकन) उडाले आणि ते पान घेत असलेल्या मोकळ्या तोंडात जाऊन पडले. लगेचच त्याने अँसिडसह ते पान थुंकून टाकले. थुंकल्याबरोबर त्याने पानात पारा पडलेला पाहिले. त्याला त्या भागीदाराने कदाचित् अगोदरही थोडा पारा खाण्यास दिला असावा. कारण तो दररोज त्या सज्जनाला विचारीत असे की, “तुम्ही असे सुस्त का वाटत आहात? आपले स्वास्थ्य तर ठिक आहे ना? आपला कान कसा आहे? आपल्याला व्यवस्थित ऐकायला येते ना? डोळ्यांनी व्यवस्थित दिसते ना?” इत्यादी इत्यादी.
नारायण! हे आहे संसाराचे रूप! आता मला सांगा, की जेव्हा जानकीनाथ प्रभू सहाय्य करतात; तेव्हा हे मनुष्या! तुझे कोण काय बिघडविणार आहे? हे तर आपण ऐकलेच असेल – जाको राखे साईंयाँ मार सके ना कोय । बाल न बाँका कर सके, जो जग बैरी होय ॥ बिहारीजींनी आपल्या प्रिय भक्ताला कारखाना काढून दिला, धन-संपदा प्रदान केली, विषापासून वाचविले, गुप्त शत्रूची ओळख करून दिली, संसाराच्या दुःखदायी बनावटी प्रेमाचा अनुभव सुद्धा करून दिला. हे माझ्या बंधो! संसाराचा संबंध सर्वथा स्वार्थपरायण आहे. आपण आपल्या इष्ट देवावर अढळ विश्वास ठेवून अत्यंत धैर्यपूर्वक व श्रद्धेने साधनेच्या मार्गावर चला. आपण बेईमानीने-अप्रामाणिकपणाने धन एकत्र करण्याचा प्रयत्न करू नका. जितका न्यायोचित भोग आहे; तितकाच भोगा. ज्या वस्तूच्या खाण्या-पिण्याने आपल्या बुद्धीचे संतुलन बिघडते; त्याचे सेवन करू नका, हळूहळू संसारातून उपराम होण्याचा प्रयत्न करा आणि भगवंताबरोबर संलग्न होण्याचा प्रयत्न करा. संसाराविषयी सहिष्णु बना. भगवंताविषयी-श्रद्धा-विश्वास-प्रेम ठेवा