१) परमार्थातील काहीच वाया जात नाही आणि संसारातील काहीच उपयोगाला येत नाही.
२) देहं वा पातयामि । कार्यं वा साधयामि ।।
३) उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत ।
क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया ।
दुर्गं पथस्तत्कवयो वदन्ति ॥ कठोपनिषद्
४) कर्मामध्ये कर्मभ्रष्टता नसावी, भक्तीमध्ये भावनेचा व्यभिचार नसावा, ज्ञानामध्ये विपर्यास संशय नसावा.
५) चिता मनुष्याला एकदा जाळते, चिंता पदोपदी जाळते.
६) सर्वांचा आत्मा एकच आहे नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त, आनंदस्वरूप त्रिकालातीत आहे.
७) भ्रांतीमुळे दुःख होते.
८) सिद्धांची जी लक्षणे असतात तीच साधकांची साधने असतात. (सिद्धस्य लक्षणानि साधकस्य साधनानि भवन्ति ।)
९) विषयाच्या प्राप्तीची ईच्छा करणे म्हणजे नित्य मृत्युकडे धांव घेणे होय.
१०) साधने फळ देत नाही, त्यावरील निष्ठा फळ देते.
राम कृष्ण हरी