११) वास्तविक सुखही मिळवायचे नाही, तसेच दुःख देखील निवृत्त करायचे नाही, कारण सुख नित्य प्राप्तच आहे आणि दुःख नित्य निवृत्तच आहे, आता फक्त भगवंतामध्ये रममाण रहायचे. काळ ब्रह्मानंदी सरे
१२) जीवन भगवत् चिंतनात, साधेपणाने आणि कलंकरहित व्यतीत करावे.
१३) शुद्ध भावना, शुद्ध क्रिया आणि शुद्ध विचाराने देव आकळला जातो.
१४) कोणत्याही गोष्टीचा आग्रह सुटावा, हे ज्ञानाचे लक्षण आहे. बुद्धे: फलं अनाग्रह:
१५) ब्रह्मज्ञानाशिवाय दुःखाची आत्यन्तिक निवृत्ती कशानेही होत नाही.
१६) अध्यस्त पदार्थ अधिष्ठानाची कोणतीही लाभहानी करत नाही.
१७) आत्म्याचा अनात्म्यावर, अनात्म्याचा आत्म्यावर झालेल्या अन्योन्याध्यासामुळे जीव बंधनास प्राप्त होतो.
१८) कितीही बुद्धिमान असला तरीही आशेमुळे त्याची बुद्धी घसरण पावते,नको ते विचार करु लागते. – आशा ते करविते बुद्धिचा तो लोप ।
१९) आपल्या जीवनात एक इष्ट ग्रंथ, एक इष्ट मंत्र, एक इष्ट गुरु असेल तर निश्चितच आपले जीवन पैलतीरी पोहचते.
२०) ज्ञान वस्तुतंत्र आहे ते एकदा प्रमाणच्या द्वारा झाले तर पुन्हा त्याची आवृत्ती करावी लागत नाही.