२१) परमात्म्याची शरणागती पत्करली असती तर इच्छेचा निरास झाला असता आणि अविनाशी फळास प्राप्त झाला असता; परंतु इतर देवतांना शरण जातात आणि परिच्छिन्न फळास प्राप्त होतात (सकाम उपासक) म्हणुन त्याला रम्य समाधान प्राप्त होत नाही.
२२) उपासकाने नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त, सच्चिदानंदघन, निर्विकार, निरतिशय व्यापक, स्वयंप्रकाश स्वरूप,अविनाशी, स्वगत, सजातीय, विजातीय भेदरहित- देशकालवस्तु भेदरहित अशाच देवतेची उपासना करावी.
२३) जोपर्यंत योगमायेचे आवरण आहे तोपर्यंत आत्म-स्वरूपाची यथार्थ अनुभूती येत नाही, योगमायेने आच्छादित झाल्यामुळे भगवंताचे यथार्थज्ञान म्हणजे जसे आहेत तसे ज्ञान होत नाही.
२४) ज्या ठिकाणी सुख नाही, त्या ठिकाणी आपण सुख शोधतो; म्हणून आपणांस शाश्वत सुख प्राप्त होत नाही.
२५) शास्त्राशिवाय ब्रह्माचे यथार्थ ज्ञान होत नाही.
२६) भगवंतावर निष्काम भाव असेल तर भगवंतच आपले सर्व योगक्षेम वाहतो.
२७) स्वस्वरूपाविषयी, आत्मस्वरूपाविषयी, ब्रम्हस्वरूपा-विषयी यथार्थ चिंतन करणे त्यास अध्यात्म असे म्हणतात.
२८) अज्ञात ज्ञापकत्वम् शास्त्रस्य शास्त्रत्वम् ॥
२९) अध्यात्म चिंतन म्हणजे ब्रह्म सत्य आहे तद् व्यतिरिक्त सर्व मिथ्या आहे, जीव ब्रह्मस्वरूपच आहे.
३०) मिथ्या (खोटा) पदार्थ अधिष्ठानात मिसळून भासतो, अधिष्ठानाएवढा भासतो, अधिष्ठानावर भासतो, परंतु जिथे भासला तिथेच त्याचा त्रैकालिक अत्यंताभावअसतो.