६१) आपले वास्तव स्वरूप सत्, चित्, आनंद, शुद्ध, बुद्ध,नित्य, मुक्त, असंग, निर्विषय, निर्विकार आहे.
६२) दोन परस्पर विरुद्ध धर्म एका अधिकरणांत राहू शकत नाहीत.
राहत असतील तर ते मिथ्या ठरतात.
(उदा-निराकार आकार ६३) ब्रह्म या नांवाने जे अनुलक्षीत आहे.
त्यास मोक्ष असे म्हणतात.
६४) अधिष्ठानाशिवाय क्रिया होत नाही.
त्याच्याशिवाय काहीही होत नाही.
सर्व क्रिया त्याच्यात मिसळून भासतात.
परंतु अधिष्ठान काहीच करत नाही.
६५) विषय चित्तात जातात कि चित्त विषयात जाते? चित्त जड आहे विषयही जड आहेत. मग हे विषय जातात कोणामध्ये? या सर्वाचे ज्ञान ज्याला नाही त्याच्या चित्तात जातात.
६६) ज्ञाननिवर्त्य पदार्थ मिथ्या असतो.
६७) मोक्ष सत्य का? बंध सत्य? दोन्हीही मिथ्या आहेत. कारण दोन्ही सापेक्ष भावाने आहेत.
६८) जीवन्मुक्ती हाच पुरुषार्थ आहे.
६९) ज्ञानी आणि अज्ञानी या दोघांमध्ये एवढाच फरक आहे. एक ज्ञानी दुसरा अज्ञानी आहे. फक्त दोघांच्या समजुतीमध्ये फरक आहे. तत्वतः दोघेही एकच आहेत.
७०) साधू बनना यानि बेवखूब बनना नही. (रामकृष्णपरमहंस)