८) काय आम्ही एवढे सुद्धा करू शकत नाही ?

भगवंताची लीला मोठी रहस्यमयी आहे. आपल्या लीलेच्या रूपात ते स्वत: आपल्याला प्रकट करतात. भगवान आणि भगवंताची लीला हे दोन्ही भिन्न नाहीत, तर एकच आहेत. एकप्रकारे हा संपूर्ण संसार भगवंताची लीलाच आहे. हे सर्व नाम-रूप यांचेच आहे, तेच आहेत; परंतु ते इतकेच नाहीत तर याच्याहून पर सुद्धा आहेत. त्यांची सत्ता, त्यांचे स्वरूप आणि त्यांची लीला अनिर्वचनीय आहे. 

जेंव्हा जीव प्रमादवश भगवंताच्या स्वरूपाला आणि लीलेला विसरून त्यांच्याहून भिन्न प्राकृत पदार्थापासून सुख मिळविण्याची आशा तसेच अभिलाषा करतो आणि बहिर्मुख होऊन त्यांच्या पाठीमागे भटकू लागतो; तेंव्हा तो उद्वेग, अशांती आणि दुःखाने घेरला जातो. भगवंत अशा स्थितीमध्ये सुद्धा त्याला पुन्हा-पुन्हा चेतावणी देत राहतात आणि प्रतीक्षा करतात की, ‘त्याने अभिमान तसेच भौतिक पदार्थांचा भरवसा सोडून खऱ्या हृदयाने बोलाविले तर आता जाऊन मी त्याला अालिंगन देईन, त्याच्यावर आपले अनन्त प्रेम प्रकट करीन, तसेच कायमस्वरूपी सुख शांतीच्या साम्राज्यामध्ये निवास देईन.’ ते स्वत: त्यासाठी त्याला अनेकदा संधी देतात, त्याच्या हृदयात प्रेरणा करतात, संतांना पाठवतात आणि स्वत:ही येतात. 

परंतु जीवाची ही मोहनिद्रा तुटेल तर हे आयोजन सफल होईल! भगवंताच्या दयेचे तर काय वर्णन करावयाचे? त्यांनी तर सर्व जीवांना दयेच्या समुद्रात ठेवलेले आहे. त्यांचे अनन्त उपकार, अपार कृपा आणि अपरिमित प्रेमाने सर्वच्या सर्व दबलेले आहेत. 

जेव्हा अभिमान, कामना आणि भीतीच्या चापटीने (माराने) व्याकूळ होऊन रजोगुणांच्या अनेक व्यापारांचा उबग येऊन (कंटाळून) नरक, स्वर्ग इत्यादी ठिकाणी फिरून-फिरून कंटाळून (त्रासून) सुद्धा लोक सात्त्विकता, दैवी संपत्ती, भगवंताची शरणांगती ग्रहण करीत नाहीत, उलट तमोगुणाच्या प्रगाढ निद्रेमध्ये झोपी जातात. जेव्हा चराचराचा प्रलय होतो; तेव्हा जर भगवंतांनी प्रकृतीला क्षुब्ध करून ह्यांना जागे केले नसते, तर त्यांची त्या मोहनिद्रेतून सुटका कशी झाली असती? त्यांनी झोपेतून जागे केले, ज्ञानाचा संचार केला, तमोगुणातून रजोगुणात आणून सत्वगुणाकडे अग्रेसर केले. आता जीवनदान करणाऱ्या प्रभूला शरण जाणेच आमचे कर्तव्य नाही काय? काय आम्ही एवढेही करू शकत नाही? 

केवळ कृतज्ञतेची दृष्टी असून चालू शकत नाही? आम्ही वाटेल तेवढा प्रयत्न केला, कितीही हात-पाय आपटले, भगवंताशिवाय आपली सुख-शांती इत्यादी स्थायी रूपाने तर कधीच राहू शकत नाहीत. दोन-चार दिवसांसाठी काही गुणांची सावली भलेही पडो; पण भगवंताशिवाय ती टिकणे असंभवनीय आहे. ही आजची गोष्ट नाही, तर नेहमी असेच चालत आलेले आहे.

तुजविण कोणा । शरण जाऊ नारायणा ॥१॥

ऐसा न देखे मी कोणी । दुजा तिही त्रिभुवनी ॥२॥

पाहिली पुराणे । धांडोळली दरुशने ॥३॥

तुका म्हणे ठायी । जडून ठेलो तुझ्या पायी ॥४॥

(श्रीतुकोबाराय)


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top