५१) जीवाचा साधना हा धर्म आहे आणि भगवंताचा धर्म आहे कृपा.
५२) जेवढे जेवढे ज्ञेय आहे ते सर्व परीच्छिन्न आहे.
५३) विष एकदाच मारते परंतु विषय पदोपदी आत्मघातकरत असतात म्हणून विषयांचा दुरूनच त्याग करावा.
५४) सर्व परमार्थ मनाचाच आहे.
५५) जीवन एकदम सरळ आहे ते फक्त समजून उमजून घ्यायला हवे.
५६) पुनर्जन्म का होतो ? आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे होतो.
आणि जोपर्यंत वासना असतात तोपर्यंत स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानाची अनुभूती येत नाही.
५७) सद्भावना सद्विचार आणि सत्कर्म यांमुळे अंतःकरणाची शुद्धता होते.
५८) मनुष्याचे व्यक्तिमत्त्व बाहेरील देह यावर नसून अंतरंगावर म्हणजे मनाच्या स्थितीवर असते.
५९) कालपरिच्छेद असणारा कोणताही लोक नित्य होऊ शकत नाही.
६०) जोपर्यंत यथार्थ अनुभूती येत नाही.
तोपर्यंत दीर्घकाळ,सतत, निरंतर, नित्य, अखंड चिंतन करावे.