८१) अधिष्ठान सोडून काहीच नाही सर्व अधिष्ठान मात्रआहे.
८२) जीवनमुक्ती हे आपले परम ध्येय असायला हवे.
८३) आपण परिपूर्ण आहोतच.
आपल्या ठिकाणी कल्पित जगत भासत असले तरीही आपण परीपूर्णच आहोत.
आपल्याला परिपूर्णतेचे ज्ञान होऊ किंवा न होऊ तरीही आपण परिपूर्णच आहोत.
८४) आपण परिपूर्ण आहोतच हे विसरता कामा नये.
८५) दिवसभरातून आपण फक्त एक क्षण परिपूर्ण सुखाची अनुभूती घेतली तर आईची कुस धन्य झाली, कुळाचाउद्धार झाला.
८६) ज्यावेळेस दुःखाचा कडेलोट जीवनात येतो, त्यावेळेसच परमात्मविचारास मनुष्य प्रवृत्त होत असतो आणि सकळ दुःखाची अत्यंतिक निवृत्तीचे उपाय करीत असतो.
८७) विचारात् जायते बोधः ॥
८८) वादे वादे जायते तत्वबोधः ॥
८९) आपल्या अंतःकरणाचे सुद्धा साक्षी व्हावे. वास्तविक तर आपण बाधित असणाऱ्या अंतःकरणाचे प्रकाशन करत असतो.
९०) स्वरूपाशिवाय अनुकूल या जगतात दुसरे काहीच नाही.