गीतासार – श्रीमद्भगवद्गीता अध्याय – १८

100

  • No-Risk Money Back Guarantee!
  • No Hassle Refunds
  • Secure Payments

Description

Gitasar Gita Adhyay-18 अठरावा अध्यावो नोहे । हे ‘एकाध्यायी गीताचि’ आहे ।

जैं वत्सचि धेनु दुहें । तैं वेळु कायसा?॥८४॥

असे ज्या ‘मोक्षसंन्यासयोग’ नामक गीतोक्त अष्टादशाध्यायाचे संतसम्राट भगवान्‌ ज्ञानोबारायांनी आपल्या धर्मकीर्तनस्वरूप भावार्थदीपिकेत तोफ्लड भरून प्रतिपादन केले आहे; त्या प्रस्तुत अध्यायावरील श्रीमत्‌ परमहंस प्ररिव्राजकाचार्य श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ अनन्तश्री विभूषित ब्रह्मलीन स्वामी महेशानंद गिरीजी स्वामीजींच्या प्रवचनरूप ‘श्रीकृष्ण संदेश’ नामक ग्रंथाचा मराठी अनुवाद करताना आम्हाला निरतिशय आनंद होत आहे. प्रवचन-कीर्तनकार आणि जिज्ञासु साधकांना गीताप्रोक्त कर्म-उपासना आणि ज्ञान ह्याचा सम्यक्‌-सुमधुर-समतोल समन्वय आपल्या वारकरी संतवाङ्मयात किती अपूर्व रीतीने साधला आहे, ह्याचे रसास्वादन व्हावे आणि शास्त्रार्थाच्या अविरोधी सिद्धांताला आपल्या हृदयात चिरस्थायी करून मराठी भाषिकांच्या हृदयात ते संक्रमित करण्याची शैली आत्मसात व्हावी, या उद्देशाने यथाशक्ती यथामती हा अनुवाद आपल्यासमोर प्रस्तुत केला आहे.

मानवी जीवन धन्यतेच्या दिशेने पथगामी व्हावे आणि समाजपुरुषाला निरामय-कृतार्थ-शांतिदांतिपूर्ण-ईश्‍वरनिर्भर आणि ब्रह्मानंदाच्या अनुभूतीची झलक प्राप्त व्हावी, ह्या पवित्र उद्देशाने निरहंकारी भावनेने केलेला हा अनुवाद संपूर्ण गीतेच्या कांडत्रयाचे संक्षेपाने; परंतु पूर्णतया सुलभरीतीने विशद स्पष्टीकरण-विवरण असल्याने आम्ही प्रस्तुत अनुवादाला ‘गीतासार’ असे नामाभिधान दिले आहे. प्रस्तुत अठराव्या अध्यायाच्या चिंतनाद्वारा ‘असतो मा सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्योर्माऽमृतं गमय॥ – ही वेदांच्या मंत्रद्रष्ट्या ऋषींनी केलेली प्रार्थना संपूर्ण मानवजातीला निरंकुशा तृप्तीच्या उद्गारापर्यंत जीविताचे साफल्य प्राप्त करुन देवो, अशी पांडुरंगरायाच्या सत्तेतून त्यांच्याच चरणी प्र्रार्थना करीत आहे.

हा अध्याय उपसंहारात्मक असल्यामुळे जे काही गीताशास्त्रात सांगितले आहे; त्याचे सर्व संकेत या अध्यायात मिळतात. जे काही सांगावयाचे आहे, त्याचा विषयनिर्देश उपक्रमामध्ये (प्रारंभी) केला जातो आणि जे काही सांगितले गेले आहे, ते उपसंहारात सांगतात. त्यामुळे उपक्रम आणि उपसंहार यांची एकवाक्यता असणे आवश्यक आहे. दुसऱ्या अध्यायात उपक्रम असल्यामुळे तो अध्याय बराच मोठा आहे आणि अठरावा अध्याय हा उपसंहाररूप असल्याने तोही त्या मानाने मोठा आहे. गीता सर्वतोपरी वेदाचेच तात्पर्य सांगते, म्हणून ‘वेदार्थ’ कथन करणे हाच गीतेमधील सर्व शास्त्रचिंतन सांगण्याचा अभिप्राय आहे; म्हणूनच हा अध्याय सुद्धा द्वितीय अध्यायाप्रमाणे विशेष महत्त्वाचा आहे.

अठराव्या अध्यायाला सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नाने होते. तशीच दुसऱ्या अध्यायाची सुरुवातही अर्जुनाच्याच प्रश्नाने झाली आहे. अर्जुनाने म्हटले की, ‘जो श्रेयस्कर मार्ग असेल तो तुम्ही मला सांगा, मी आपल्याकडे शिष्य-भावाने आलो आहे.’ तेंव्हा भगवंताने त्याला सांगण्यास सुरुवात केली. तिथे विचारलेल्या प्रश्नाचे तात्पर्य हेच होते की, ‘मी मा‍झ्या क्षात्रधर्माचे पालन करावे की न करावे? अशाच थोड्या भेदाने पुन्हा इथे अर्जुनाने ‘क्षात्रधर्माचे अनुसरण करावे की न करावे?’ हाच प्रश्न विचारला आहे. फरक एवढाच आहे की, ‘संन्यास’ व ‘त्याग’ या दोहोतील भेद काय आहे, हे जाणण्याची इच्छा येथे अर्जुन व्यक्त करतो –

Additional information

Weight390 g

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गीतासार – श्रीमद्भगवद्गीता अध्याय – १८”

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
गीतासार - श्रीमद्भगवद्गीता अध्याय - १८गीतासार – श्रीमद्भगवद्गीता अध्याय – १८
100
Scroll to Top
0