दिवस – ८६. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् ।
यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ॥५॥
जे आतांचि सांगितलें होतें । अगा ‘अधियज्ञ’ म्हणितला जयातें । जें
१. (मामेव)
आदींचि तया मातें । जाणोनि; अंतीं
२. तया मातें आदींचि जाणून; अंतीं = मूळापासून कडेपर्यंत मीच आहे असें जाणून
॥५९॥
ते देह झोळ
१. (अन्तकाले च) बाहेरचा अंगरखा अथवा वस्त्र, मिथ्या
ऐसें मानुनी । ठेले आपणपें आपण होउनी
२. (स्मरण) आपण आत्मस्वरूप होऊन
। जैसा मठ
३. देऊळ, घर
, गगना भरुनी । गगनींचि असे ॥६०॥
ये प्रतीतीचिया
१. अनुभवाच्या
माजघरीं । तया निश्चयाची ओवरी
२. कोठडी
। आली म्हणौनि बाहेरी । नव्हेचि से
३. स्मरण
॥६१॥
ऐसें सबाह्य
१. आंतबाहेर
ऐक्य संचलें। मीचि होऊनि असतां रचिलें । बाहेरि भूतांचीं पांचही खवलें
२. (मुक्त्वा कलेवरं) कवचे (शरीर)
। नेणताचि; पडिलीं ! ॥६२॥
आतां
१. (यः प्रयाति)
उभेयां
२. उभे असलेल्यांस
उभेपण नाहीं जयाचें । मा पडिलिया-गहन
३. संकट, कठिण
कवण तयाचें ?। म्हणौनि, प्रतीतीचिये पोटीचें । पाणी न हाले ॥६३॥
ते ऐक्याची आहे वोतिली
१. मूर्ति
। कीं नित्यतेचिया हृदयीं घातली । जैसी समरस समुद्रीं
२. पूर्णानंदसमुद्रांत
धुतली । रुळेचिना
३. मळेना, मलीन होत नाही
॥६४॥
पैं अथावीं
१. खोल पाण्यांत
घट बुडाला । तो आंतबाहेरी उदकें भरला । पाठीं दैवगत्या जरी फुटला । तरी उदक काय फुटे ? ॥६५॥
नातरी, सर्पे कवच
१. कांत
सांडिलें । कां उबारेनें
२. उष्णतेमुळें
वस्त्र फेडिलें । तरी, सांग पां, काय मोडलें । अवेवामाजीं
३. अवयवामध्यें
? ॥६६॥
तैसा
१. (स मद्भावं याति)
, आकारु हा आहाच
२. वरवरचा, मिथ्या
भ्रंशे । वांचूनी, वस्तु ते सांचलीचि असे। तेचि बुद्धि जालिया; विसकुसे
३. सर्वत्र भरलेली, सर्वांमध्ये व्याप्त
। कैसेनि आतां ? ॥६७॥
म्हणौनि, यापरी मातें । अंतकाळीं जाणतसाते
१. जाणत असतां
। जे मोकलिती
२. सोडितात
देहातें । ते मीचि होती ॥६८॥
एहवीं तरी साधारण । उरीं आदळलिया मरण
१. मरण उरावर येऊन आदळलें असतां
। जो आठवु धरी अंतःकरण । तेंचि होइजे ॥६९॥
जैसा कवणु एकु काकुळती
१. दीनतेनें
-। पळतां, पवनगती
२. वायुगतीनें
दुपाउलीं
३. दोन्हीही पाय घसरून
अवचितीं । कुहामाजीं
४. विहिरींत
पडियेला ॥७०॥
आतां तया पडणयाआरौतें
१. पडण्याच्या अगोदर
पडण चुकवावया परौतें
२. पडणे चुकविण्याकरिता दुसरा (उपाय)
। नाहीं; म्हणौनि तेथें । पडावेंचि पडे
३. लागते
॥७१॥
तेविं मृत्यूचेनि अवसरें एकें । जें येऊनि जीवासमोर ठाके । ‘तें होणें’ मग न चुके । भलतयापरी
१. कोणत्याही तन्हेनें
॥७२॥
आणि
१. (नास्त्यत्र संशयः)
जागता जंव असिजे । तंव जेणें ध्यानें भावना
२. कल्पना
भाविजे । डोळां लागतखेंवो
३. लागतांच
देखिजे । तेंचि स्वप्नीं ॥७३॥
यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् ।
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः ॥६॥
तेविं
१. (यं यमिति)
जितेनि अवसरें
२. जिवंत असतेसमयीं
। जें आवडोनि जीवी
३. हृदयांत
ं उरे । तेंचि मरणाचिये मेरे
४. वेळी
फार
५. वृद्धिंगत
हों लागे ॥७४॥
आणि
१. (तं तमिति)
मरणीं
२. मरणकाळी 'अंते मतिः सा गतिः' असा सिद्धांतच आहे
जया जें आठवे । तो तेंचि गतीतें
३. मरणकाळी 'अंते मतिः सा गतिः' असा सिद्धांतच आहे
पावे । म्हणौनि सदा स्मरावें । मातेंचि, तुवां ॥७५॥
तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च।
मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम् ॥७॥
डोळां जे देखावें । कां कानीं हन ऐकावें । मनीं जें भावावें । बोलावें वाचें ॥७६॥
तें आंत-बाहेरी आघवें । ‘मी’ चि करूनि घालावें । मग, सर्वी काळीं स्वभावें । ‘मी’ चि आहें ॥७७॥
अर्जुना
१. (युध्य च)
, ऐसें जाहालिया । मग, ‘न मरिजे’ देह गेलिया
२. देह गेला तरी अविनाशी आत्मा मरत नाहीं
“। मा संग्रामु केलिया । भय काय तुज ? ॥७८॥
तूं
१. (मय्यर्पितमनोबुद्धिः)
मन बुद्धि सांचेंसीं
२. खरेपणानें
। जरी माझिया स्वरूपीं अर्पिसी । तरी मातेचि गा पावसी । हे माझी भाक
३. (मामेवैष्यस्यसंशयम्) प्रतिज्ञा
॥७९॥
हेंचि
१. (चूर्णिका)
कायिसयावरी
२. कशानें
‘ होये ? । ऐसा जरी संदेहो वर्ततु आहे । तरी अभ्यासूनि आदीं पाहें । मग, नव्हे; तरी कोपें ! ॥८०॥

तुटला आशेचा जिव्हाळा
१. ओलावा, आधार, तंतू

सुकले वोठ वाळला गळा । कळा
२. कांती, टवटवी
उतरली मुखकमळा । खेदु
३. अधिक, विशेष
आगळा चिंतेचा ॥२०१॥
वित्त
१. पैसा
न येचि हाता ।
तेणे ते झाली दीनचित्ता
२. मनाने दुःखी, हताश
। वैराग्यें परम
३. श्रेष्ठ
वाटली चिंता
४. परमात्मप्राप्तिविषयी
। सुखस्वार्था ते
५. (वैराग्य)
हेतु ॥२०२॥
तस्या निर्विण्णचित्ताया, गीतं श्रुणु यथा मम ।
निर्वेद आशापाशानां, पुरुषस्य यथा ह्यसिः॥२८॥
न ह्यङ्गाजातनिर्वेदो देहबन्धं जिहासति ।
यथा विज्ञानरहितो मनुजो ममतां नृप ॥२९॥
श्लोकार्थ – याप्रमाणे तिला वैराग्य येऊन तिने जी कथा गायिली तीच तुला मी सांगतो, ऐक. आशारूप पाशांनी दृढ जखडलेल्या पुरुषाला, ते पाश तोडण्यास वैराग्य हीच खरी तलवार आहे. हे राजा, ज्याला वैराग्य उत्पन्न झाले नाही त्याचा देहबंध किंवा संसारबंध कधी सुटणार नाही. ॥२८-२९॥
कैसें वैराग्य उपजलें तिसी ।
जे चिंतीत होती विषयासी । त्या विटली
१. कंटाळणे, नकोसे होणे
विषयसुखासी । छेदक
२. नाश करणारे
आशेसी वैराग्य ॥२०३॥
तेणें वैराग्य विवेकयुक्त ।
पिंगलेने गाइलें गीत । तें आइक राया समस्त । चित्तीं सुचित्त
१. सावध
होऊनि ॥२०४॥
ऐक राया विवेकनिधी
१. विचाराचा साठा

वैराग्य नाहीं ज्याचे बुद्धीं । त्यासी जन्ममरणाची आधिव्याधी
२. चिंता व शारिरीक रोग
प्रतिपदी
३. पावलापावलाला
बाधकु
४. पीडा
॥२०५॥
अनुतापु
१. पश्चात्ताप
नाहीं ज्यासी ।
विवेक नुपजे
२. उत्पन्न होत नाही
मानसीं । तो संसाराची आंदणी
३. बक्षिस दिलेली
दासी । आशापाशी बांधिजे ॥२०६॥
त्यासी मोहममतेची गाढी
१. मजबूत, अवजड

घालिजे देहबुद्धीची बेडी । अहोरात्र विषय भरडी
२. दळण
। अर्ध घडी न राहे ॥२०७॥
जराजर्जरित वाकळे- ।
माजी पडले अखंड लोळे । फुटले विवेकाचे डोळे । मार्गु न कळे विध्युक्त ॥२०८॥
त्यासी अव्हासव्हा
१. स्वैर, हवेतसे
जातां ।
अंधकूपीं
२. नरकरूपी अंधारी विहीर
पडे दुश्चिता
३. असावधपणाने
। तेथूनि निघावया मागुता । उपावो सर्वथा नेणती ॥२०९॥
तेथ काया-मनें-वाचें ।
निघणें नाहीं जी साचें । तंव फणकाविला
१. नांगी मारणे
लोभविंचें
२. लोभरूपी विंचवाने
चढणे
३. व्यापणे, वाढणे
त्याचे अनिवार
४. अमर्याद
॥२१०॥
तेथ निंदेचिया तिडका
१. कळ

आंत बाहेर निघती देखा । वित्तहानीचा थोर भडका । जळजळ देखा द्वेषाची ॥२११॥
अभिमानाचे आळेपिळे
१. आळुखे-पिळुखे

मोहउमासे
२. मोहाचे श्वासोच्छ्वास
येती बळें
३. जोराने
। तरी विषयदळणे आगळे
४. अधिक
। दुःखें लोळे गेहसेजे
५. घरातील अथरूणावर
॥२१२॥
ऐशी अवैराग्ये बापुडीं
१. बिचारी

पडली देहाचे बांदवडीं
२. कैदखान्यात टाकणे
। भोगितां दुःखकोडी । सबुडबुडी
३. डोक्यासहित तळाशी
बुडालीं ॥२१३॥
पहा पां नीच सर्व वर्णांसी ।
निंद्य कर्मे निंदिती
१. निंदा करणारी
कैशीं । वैराग्य उपजलें
२. उत्पन्न झाले
वेश्येसी । देहबंधासी छेदिलें ॥२१४॥
देहबंध छेदी त्या उक्ती
१. वाक्ये

वेश्या बोलिली नाना युक्ती । झाली पिंगलेसी विरक्ती । चक्रवर्ती परीस पां ॥२१५॥
पिंगलोवाच- अहो मे मोहविततिं पश्यताविजितात्मनः ।
या कान्तादसतः कामं कामये येन बालिशा ॥३०॥
श्लोकार्थ – पिंगला म्हणाली- मला किती मोठा मोह झाला! मी इंद्रियांच्या खोट्या मोहाला बळी पडले; (शाश्वत सुख देणारा रमापती सोडून) ज्याच्याकडून सुखाची कल्पनासुद्धा करणे वेडेपणाचे अशा रमणाकडून सुखाची अपेक्षा केली. किती मी मूर्ख आहे ? ॥३०॥
मिथ्या मोहाचा विस्तार ।
म्यां वाढविला साचार । माझ्या मूर्खपणाचा पार
१. विस्तार
। पाहतां विचार पांगुळे
२. कुठीत होणे
॥२१६॥
नाहीं अंतःकरणासी नेम
१. निग्रह

अपार
२. अमर्याद
वाढविला भ्रम । असंतपुरुषांचा
३. दुर्गुणी-दुराचारी पुरूष
काम । मनोरम
४. मनाला सुख देणारा
मानितां ॥२१७॥
जरी स्त्रीसी पुरुष पाहिजे ।
तरी जवळील पुरुष
१. परमात्मा
लाहिजे
२. प्राप्त
। हेंचि मूर्खपण माझें । सदा भुंजे
३. भोगला
असंतां ॥२१८॥
सन्तं समीपे रमणं रतिप्रदं, वित्तप्रदं नित्यमिमं विहाय ।
अकामदं दुःखभयादिशोकमोहप्रदं तुच्छमहं भजेऽज्ञा ॥३१॥
श्लोकार्थ – सदासर्वदा अत्यंत नजीक असणारा, शाश्वत सुख देणारा, किंचित काळ नव्हे तर नित्य द्रव्य देणारा, अशा रमणाला सोडून, महामूर्ख अशी मी इच्छापूर्ती न करणारा, दुःख, भय, शोक आणि मोह इत्यादी देणारा, अशा क्षुद्र पुरुषाची इच्छा करिते. ॥३१॥
संतपुरुषाची
१. अबाधीत सद्रूप परमात्म्याची
प्राप्ती ।
जवळी असतां, नेणें आसक्ती । ज्यासी केलिया रती
२. रममाण
। कामनिवृत्ति तत्काळ ॥२१९॥
काम निवर्तवूनि देख ।
अनिवार
१. अपार
पुरवी नित्यसुख । वित्तदाता
२. (पा.भे. चित्तदाता)
तोचि एक । अलोलिक पैं देणें ॥२२०॥
सकळ ऐश्वर्य निजपदेसीं
१. स्वस्वरूपासह

संतोषोनि दे रतीसी
२. सुख
। रमवूं जाणे नरनारींसीं । रमणु सर्वांसी तो एकु ॥२२१॥
सांडोनि ऐशिया कांतासी
१. पतीला

माझी मूढता पहा कैशी?। नित्य अकामदा
२. इच्छेची पूर्ती न करणाऱ्या
पुरुषासी । कामप्राप्तीसी भजिन्नलें
३. सेवा केली
॥२२२॥
आपुला पूर्ण न करवे काम ।
ते मज केवीं करिती निष्काम?। त्यांचेनि संगें मोहभ्रम । दुःख परम पावलें ॥२२३॥
त्यांचेनि सुख नेदवेच मातें
१. मला

परी झाले दुःखाचेचि दाते । भय-शोक-आधि
२. काळजी
-व्याधीते । त्यांचेनि सांगातें
३. संगाने
पावलें ॥२२४॥
अहो मयाऽऽत्मा परितापितो वृथा, साङ्केत्यवृत्त्याऽतिविगर्ह्यवार्तया ।
स्त्रैणान्नराद्यार्थतृषोऽनुशोच्यात्, क्रीतेन वित्तं रतिमात्मनेच्छती ॥३२॥
श्लोकार्थ – खरोखरीच मी आपल्या मनाला व्यर्थ त्रास दिला, संकेताने द्रव्य ठरवावयाचे आणि त्यावर जीविका चालवावयाची. स्त्रीलंपट, द्रव्याचा लोभ धरणारा, सर्वकाळ निंद्यकर्मे करून पर्यवसानी शोकच देणारा, अशा माणसाला द्रव्याकरिता व क्षुद्र कामसुखाकरिता देह विकायला तयार झाले ! ॥३२॥
जारपुरुषापासोनि सुख ।
इच्छितें, ते मी केवळ मूर्ख । वृथा
१. निष्कारण
परितापु
२. पीडा
केला देख । मज असुख
३. दुःख
म्यां दीधलें ॥२२५॥
स्त्रैण
१. स्त्रीलंपट
पुरुष ते नराधम
२. मनुष्यात नीच

वेश्यागामी त्याहूनि अधम । त्यांत कृपणु
३. कंजुस
तो अधमाधम । तयांचा संगम मी वांच्छी
४. इच्छिते (पा.भे. वांछिती)
॥२२६॥
जितुक्या अतिनिंदका वृत्ती ।
मज आतळतां
१. स्पर्श करण्यास
त्या भीती । योनिद्वारे जीविकास्थिती
२. उपजीविका
। नीच याती व्यभिचारु ॥२२७॥
अल्प द्रव्य जेणे देणें ।
त्याची जाती कोण हें नाहीं पाहणें । याहोनि काय लाजिरवाणें । निंदित जिणें पैं माझें ॥२२८॥
जया पुरुषासी देह विकणें ।
तें अत्यंत हीनदीनपणें । काय सांगों त्याची लक्षणे । सर्वगुणें अपूर्ण ॥२२९॥
वित्त नेदवे कृपणता ।
काम न पुरवे पुरता
१. पूर्ण
। प्रीति न करवे तत्त्वतां
२. मनापासून
। भेटी मागुता तो नेदी ॥२३०॥
ऐशियापासाव सुख ।
वांछितां वाढे परम दुःख । जळो त्याचे न पाहें मुख । वोकारी देख येतसे ॥२३१॥
एवं जारपुरुषाची
१. परस्त्रीशी संबंध करणारा
स्थिती ।
आठवितां चिळसी येती । पुरे पुरे ते संगती । चित्तवृत्ति वीटली ॥२३२॥
यदस्थिभिर्निर्मितवंशवंश्यस्थूणं त्वचारोमनखैः पिनद्धम् ।
क्षरन्नवद्वारमगारमेतद्विण्मूत्रपूर्णं मदुपैति काऽन्या ॥३३॥
श्लोकार्थ – जे हाडांचे बनवलेले आहे ; कणा, बरगड्या व हातपाय यांची हाडे ज्याचे आढे, वासे आणि खांब आहेत; ज्याला कातडे, केस, नखे यांनी घट्ट बांधून टाकले आहे; ज्याच्या नऊ द्वारांतून घाणेरडा मळ सारखा वाहात आहे; जे विष्ठा आणि मूत्र यांनी भरलेले आहे. असे मूर्तिमंत घाणीचे घर असलेले जे हे (पुरुष-) शरीर त्याच्याकडे माझ्याशिवाय दुसरी कोण जाण्यास तयार होईल ? ॥३३॥
नरशरीरगृह सांकडें ।
आढी
१. घराच्या दोन पाख्यामधील लांब लाकूड
पाखाड्या
२. तुळी
नुसधी हाडें । अस्थींच्या मेढी
३. खांब
दोंहीकडे । वोलेनि
४. ओल्या
कातडे मढियेलें
५. आच्छादणे, लपेटणे
॥२३३॥
त्यासी सर्वांगी सगळे ।
दिधले रोमावळिचे
१. केसांचे
खिळे । घालूनि नखाचे खोबळे
२. गुडद्या, टोपणे, अस्तर, बुजवण
। अग्री, आंगवळे
३. आंगोळ्या, फटी, बोटे, टोके
बूजिले ॥२३४॥
अस्थि-मांस-चर्मबांधा
१. हाडे, मांस व कातडी यांची आकृती

सर्वांगी आवळूनि दिधला सांदा
२. जोड
। रंगीत चर्मरसना
३. कातड्याची जीभ
स्वादा । पुढिले
४. (तोंडाच्या)
बांधा
५. आकृती
बांधिली ॥२३५॥
वायुप्रसरणपरिचारें
१. वारा आत-बाहेर जाण्याकरिता

केली प्राणापानरंध्रे
२. प्राणरंध्र-नाक व अपानरंध्र-गुद
। वरिले डळमळीत शिखरें
३. (डोके)
बालांकुरे
४. केसांची रोपे
लाविलीं ॥२३६॥
बुजूनि भीतरील सवडी
१. पोकळी, फटी

बांधाटिलें नवनाडीं । विष्ठामूत्रांची गाढी । नित्य परवडी सांठवण ॥२३७॥
भीतरिले
१. पोटातील
अवकाशी ।
दुर्गंधि ऊठली कैशीं । तेचि प्रवाह अहर्निशीं । नवद्वारांसी वाहताति ॥२३८॥
अखंड पऱ्हवे
१. चर, मोऱ्या
वाहती मळे ।
देखूनि ज्याचें तो कांटाळे । अहर्निशीं धुतां जळें
२. पाण्याने
। कदा निर्मळे ते नव्हती ॥२३९॥
सांगतांचि हे गोष्टी ।
ओकारी येतसे पोटीं । ऐशियास
१. (देहाला)
मी भुलल्ये करंटी
२. दुर्दैवी
। विवेक दृष्टी न पाहें ॥२४०॥
अस्थिमांसाचा कोथळा
१. पोटातील कोठ्याभोवतालचे मांसाचे आवरण

विष्ठामूत्राचा गोळा । म्यां आलिंगिला वेळोवेळां । जळो कंटाळा न येचि ॥२४१॥
विदेहानां पुरे ह्यस्मिन्नहमेकैव मूढधीः ।
याऽन्यमिच्छन्त्यसत्यस्मादात्मदात्काममच्युतात् ॥३४॥
श्लोकार्थ – या विदेहनगरीमध्ये खरोखरी मीच काय ती एकटी मूर्ख ! खोट्याला खरे मानणारी मीच आहे. आत्मस्वरूपाप्रत नेणाऱ्या आणि ज्याच्या स्वरूपाला व सुखाला कधी नाश नाही अशा ईश्वराला सोडून दुसऱ्याच तुच्छ भोगाची मी वेडगळपणाने इच्छा करते. ॥३४॥
ये विदेहाचे नगरीं ।
मूर्ख मीचि एक देहधारी । हृदयस्थ सांडूनि श्रीहरी । असंतां
१. दुर्गुणी, वाईट, मर्त्य
नरी व्यभिचारु ॥२४२॥
असंत पुरुष नेणों किती ।
म्यां भोगिले अहोरातीं । सुख न पवेंचि निश्चितीं । रति भगवंती जंव नाहीं ॥२४३॥
जो निकटवर्ती
१. आपल्या जवळ राहणारा
हृदयस्थु ।
पुरुषी पुरुषोत्तम अच्युतु । वीर्यच्युतीवीण रमवितु । संतोषें देतु निजात्मना
२. (पा.भे. निजात्मता)
॥२४४॥
अच्युतें ज्यासि निजसुख दिधलें ।
तें सुख च्यवेना
१. नष्ट होत नाही
कांहीं केलें । ऐशिया हृदयस्था विसरलें । आणिक
२. (पा.भे. आणिका)
भुललें अकामदा
३. इच्छा पूर्ण न करणाऱ्यावर
॥२४५॥
अकामद ते नाशवंत ।
त्यांसी संग केलिया दुःखचि देत । कैसें माझें मूर्ख चित्त । त्यासी आसक्त पैं होतें ॥२४६॥
त्या आसक्तीची झाली तडातोडी
१. ताटातूट

लागली अच्युतसुखाची गोडी । ज्याचें सुख भोगितां चढोवढी
२. अधिकाधिक, उत्तरोत्तर, वाढत्या प्रमाणाने
घडियाघडी
३. क्षणाक्षणाला
वाढतें ॥२४७॥
सुहृत्प्रेष्ठतमो नाथ, आत्मा चायं शरीरिणाम् ।
तं विक्रीयात्मनैवाहं, रमेऽनेन यथा रमा ॥३५॥
श्लोकार्थ – देहधारी प्राण्यांचा जिवलग प्रियतम मित्र, त्यांचा स्वामी आणि आत्मा, अशा अच्युताला मी आपले सर्वस्व देऊन विकत घेईन आणि त्याची अर्धांगिनी जी लक्ष्मी तिच्या प्रमाणे त्याच्याशी सर्वकाळ रममाण होईन. ॥३५॥
जो सोयरा माझा हृदयस्थु ।
सुख प्रीति प्रिय अच्युतु । तोचि अंतरात्मा सर्वगतु । कांतु
१. पती
तो माझा ॥२४८॥
त्यासीच आपुले संवसाटी
१. मोबदल्याने

विकत घेईन उठाउठी
२. तत्काळ
। परमानंदें देईन मिठी । गोठी चावटी
३. बाष्कळ बडबड
सांडोनी ॥२४९॥
रमा
१. लक्ष्मी
झाली पायांची दासी ।
मी भोगीन अनारिसी
२. अनायासे, निराळ्या तऱ्हेने
। सर्वकाळ सर्वदेशीं । सर्वरूपेसी सर्वस्वे ॥२५०॥

१३६२. आतां देह अवसान
१. कष्टावाचून
हे
२. निराकरण
जतन तोंवरी
३. जीवत्व, अहंपदवाच्य
॥१॥ गाऊं नाचूं गदारोळे
४. आपले पारमार्थिक लक्ष्य स्वरूप
। जिंकों बळें संसार ॥ध्रु॥ याचि जीऊं
५. समान
अभिमानें । सेवाधनें बळकट ॥३॥ तुका म्हणे न सरें मागेंे
६. अज्ञानपटल
। होईन लागें
७. च्युत न होणे, न ढळणे
आगळा
८. अंतःकरणात
॥४॥
१३६३. कुळींची हे कुळदेवी । केली ठावी
१. तृप्ती होईपर्यंत, पोटभर
संतांनीं ॥१॥ बरवें झालें शरण गेलों । उगविलों
२. एकनिष्ठ
संकटीं ॥ध्रु॥ आणिलाही रूपा बळें। करूनि खळें
३. भावहीनता
हरिदासीं ॥३॥ तुका म्हणे समागमें
४. (वा.) स्वाधीन झाले, सवय पडणे
। नाचों प्रेमें लागलों ॥४॥
१३६४. ज्याने आड यावें कांहीं । त्याचे नाही बळ आतां ॥१॥ मन येथें साह्य झालें । हरीच्या धालें गुणवादीं ॥ध्रु॥ चुकुर तो गेला काळ । झाले बळ संगाचें ॥३॥ तुका म्हणे धरूं सत्ता । होईल आतां करूं तें ॥४॥
१३६५. देवासी तो पुरे एकभाव गांठीं। तोचि त्याचे मिठी देईल पायीं ॥१॥ पाहोनि राहीन कवतुके निराळा । मी मज-वेगळा होऊनियां ॥ध्रु॥ कांहीं नेघें शिरी निमित्ताचा भार । नलगे उत्तर वेचावेंचि ॥३॥ तुका म्हणे जीवें पडिलिया गांठी । मग नाहीं मिठी सुटों येत ॥४॥
१३६६. लौकिकासाठी या पसाऱ्याचा गोवा । कांहीं नाहीं देवा लागो येत ॥१॥ ठेवावा माथा तो नुचलावा पायीं । ठायींचिये ठायीं हालों नये ॥ध्रु॥ डहुळिल्या मनें वितुळेल रूप । नांव ऐसें ‘पाप’ उपाधी तें ॥३॥ तुका म्हणे देव प्रीतीने कवळीं । ठेविल जवळी उठवूनि ॥४॥
१३६७. नाहीं होत भार घातल्या उदास । पुरवावी आस सकळही ॥१॥ ऐसा नाहीं मज एकाचा अनुभव । धरीला तो भाव उद्धरिले ॥ध्रु॥ उतावीळ असे शरणागत काजें । धांवा केशीराजें आइकतां ॥३॥ तुका म्हणे हितचिंतनी भरंवसा । नेदी गर्भवासा येऊं देऊं ॥४॥
१३६८. उपजों मरों हे तो आमुची मिरासी। हे तूं निवारिसी तरी थोर ॥१॥ उभा राहें, करीं खराखोटा वाद । आम्ही झालों निंद्य लंडपणे ॥ध्रु॥ उभयतां आहे करणे समान । तुम्हां ऐसा म्हणे मीहि देवा! ॥३॥ तुका म्हणे हातीं सांपडलें वर्म । अवघाचि भ्रम फेडिन आतां ॥४॥
१३६९. मेलियांच्या रांडा इच्छिती लेकरूं । लाज नाहीं धरू प्रीत कैशी? ॥१॥ मागिलां पुढिला एक सरोबरी। काळाची पेटारी खांदा वाहे ॥ध्रु॥ आन दिसे परि मरणचि खरें । सांपळां उंदिरें सामाविलीं ॥३॥ तुका म्हणे झाली मनाची परती । निवळली ज्योती दिसों आली ॥४॥
१३७०. निष्ठुर मी झालों अतिवादागुणें । हें कां नारायणें नेणिजेल? ॥१॥ सांडियेली तुम्ही गोत परि सोय। फोडविली डोय कर्माहाती ॥ध्रु॥ सांपडूनि संदि केली जीवेंसाटीं । घ्यावयासी तुटी कारण हें ॥३॥ तुका म्हणे तुज काय म्हूण उणें । नाहीं अभिमाने चाड देवा ॥४॥
१३७१. माझें माझ्या हातां आलें । आतां भलें सकळ ॥१॥ काशासाठी विषम थारा? । तो अंतरा विटाळ ॥ध्रु॥ झाली तया दु:खें तुटी । मागिल पोटीं नसावें ॥३॥ तुका म्हणे शुद्ध कुळ । तेथें मळ काशाचा? ॥४॥
१३७२. समर्थपणे हे करा संपादणी । नसतेंचि मनीं धरिल्याची ॥१॥ दुसऱ्याचे येथें नाहीं चालों येत । तरी मी निवांत पाय पाहे ॥ध्रु॥ खोटियाचे खरे खरियाचे खोटें । मानले गोमटें तुम्हांसी तें ॥३॥ तुका म्हणे तुम्हांसवें करीतां वाद । होईजे तें निंद्य जनीं देवा! ॥४॥
१३७३. तुम्हां आम्हांसवें न पडावी गांठी । आलेति जगजेठी कळों आतां ॥१॥ किती म्हणों आतां वाईटा वाईट । शिवों नये वीट आल्यावरी ॥ध्रु॥ बोलिल्याची आतां हेचि परचित । भीड भार थीत उडविली ॥३॥ तुका म्हणे आली रोकडी प्रचिती । झांकणे ते किती कोठे देवा! ॥४॥
१३७४. सकळ सत्ताधारी । व्हावें ऐसें काय हरी! ॥१॥ परि या कृपेच्या वोरसें । कुढावयाचेंचि पिसें ॥ध्रु॥ अंगें सर्वोत्तम । अवघाचि पूर्णकाम ॥३॥ तुका म्हणे दाता । तरि हा जीवदान देता ॥४॥
१३७५. कोणापाशीं द्यावें माप? । आपेआप राहिले ॥१॥ कासयाची भरोवरी । काय दुरी जवळी? ॥ध्रु॥ एके दाखविले दाहा । फांटा पाहा पुसून ॥३॥ तुका म्हणे सरलें वोझें । आतां माझें सकळ ॥४॥
१३७६. नभोमय झालें जळ। एकीं सकळ हारपलें ॥१॥ आतां काय सारासारी? । त्याच्या लहरी तयांत ॥ध्रु॥ कैंचा तेथ यावा सांडी? । आप कोंडी आपणां ॥३॥ तुका म्हणे कल्प झाला । अस्त गेला उदय ॥४॥
१३७७. राजा करी तैसे दाम। चाम तेही चालती ॥१॥ कारण ते सत्ता शिरीं । कोण करी अव्हेर? ॥ध्रु॥ वाहिलें तें सुनें खांदीं । चाले पदी बैसविलें ॥३॥ तुका म्हणे विश्वंभरें । करुणाकरें रक्षिलें ॥४॥
१३७८. आम्ही देव तुम्ही देव । मध्ये भेव अधिक ॥१॥ कैवाडाच्या धांवा लागें । मागें मागें ‘विठ्ठलें’ ॥ध्रु॥ भेड-साविलें हाकें नादें । वोळखी भेदें मोडिली ॥३॥ तुका म्हणे उभा राहे । मागे पाहे परतोनि ॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

1 thought on “दिवस – ८६. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top