दिवस – ८६. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् ।
यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ॥५॥
जे आतांचि सांगितलें होतें । अगा ‘अधियज्ञ’ म्हणितला जयातें । जें१
१. (मामेव)
आदींचि तया मातें । जाणोनि; अंतीं२
२. तया मातें आदींचि जाणून; अंतीं = मूळापासून कडेपर्यंत मीच आहे असें जाणून
॥५९॥
ते देह झोळ१
१. (अन्तकाले च) बाहेरचा अंगरखा अथवा वस्त्र, मिथ्या
ऐसें मानुनी । ठेले आपणपें आपण होउनी२
२. (स्मरण) आपण आत्मस्वरूप होऊन
। जैसा मठ३
३. देऊळ, घर
, गगना भरुनी । गगनींचि असे ॥६०॥
ये प्रतीतीचिया१
१. अनुभवाच्या
माजघरीं । तया निश्चयाची ओवरी२
२. कोठडी
। आली म्हणौनि बाहेरी । नव्हेचि से३
३. स्मरण
॥६१॥
ऐसें सबाह्य१
१. आंतबाहेर
ऐक्य संचलें। मीचि होऊनि असतां रचिलें । बाहेरि भूतांचीं पांचही खवलें२
२. (मुक्त्वा कलेवरं) कवचे (शरीर)
। नेणताचि; पडिलीं ! ॥६२॥
आतां१
१. (यः प्रयाति)
उभेयां२
२. उभे असलेल्यांस
उभेपण नाहीं जयाचें । मा पडिलिया-गहन३
३. संकट, कठिण
कवण तयाचें ?। म्हणौनि, प्रतीतीचिये पोटीचें । पाणी न हाले ॥६३॥
ते ऐक्याची आहे वोतिली१
१. मूर्ति
। कीं नित्यतेचिया हृदयीं घातली । जैसी समरस समुद्रीं२
२. पूर्णानंदसमुद्रांत
धुतली । रुळेचिना३
३. मळेना, मलीन होत नाही
॥६४॥
पैं अथावीं१
१. खोल पाण्यांत
घट बुडाला । तो आंतबाहेरी उदकें भरला । पाठीं दैवगत्या जरी फुटला । तरी उदक काय फुटे ? ॥६५॥
नातरी, सर्पे कवच१
१. कांत
सांडिलें । कां उबारेनें२
२. उष्णतेमुळें
वस्त्र फेडिलें । तरी, सांग पां, काय मोडलें । अवेवामाजीं३
३. अवयवामध्यें
? ॥६६॥
तैसा१
१. (स मद्भावं याति)
, आकारु हा आहाच२
२. वरवरचा, मिथ्या
भ्रंशे । वांचूनी, वस्तु ते सांचलीचि असे। तेचि बुद्धि जालिया; विसकुसे३
३. सर्वत्र भरलेली, सर्वांमध्ये व्याप्त
। कैसेनि आतां ? ॥६७॥
म्हणौनि, यापरी मातें । अंतकाळीं जाणतसाते१
१. जाणत असतां
। जे मोकलिती२
२. सोडितात
देहातें । ते मीचि होती ॥६८॥
एहवीं तरी साधारण । उरीं आदळलिया मरण१
१. मरण उरावर येऊन आदळलें असतां
। जो आठवु धरी अंतःकरण । तेंचि होइजे ॥६९॥
जैसा कवणु एकु काकुळती१
१. दीनतेनें
-। पळतां, पवनगती२
२. वायुगतीनें
। दुपाउलीं३
३. दोन्हीही पाय घसरून
अवचितीं । कुहामाजीं४
४. विहिरींत
पडियेला ॥७०॥
आतां तया पडणयाआरौतें१
१. पडण्याच्या अगोदर
। पडण चुकवावया परौतें२
२. पडणे चुकविण्याकरिता दुसरा (उपाय)
। नाहीं; म्हणौनि तेथें । पडावेंचि पडे३
३. लागते
॥७१॥
तेविं मृत्यूचेनि अवसरें एकें । जें येऊनि जीवासमोर ठाके । ‘तें होणें’ मग न चुके । भलतयापरी१
१. कोणत्याही तन्हेनें
॥७२॥
आणि१
१. (नास्त्यत्र संशयः)
जागता जंव असिजे । तंव जेणें ध्यानें भावना२
२. कल्पना
भाविजे । डोळां लागतखेंवो३
३. लागतांच
देखिजे । तेंचि स्वप्नीं ॥७३॥
यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् ।
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः ॥६॥
तेविं१
१. (यं यमिति)
जितेनि अवसरें२
२. जिवंत असतेसमयीं
। जें आवडोनि जीवी३
३. हृदयांत
ं उरे । तेंचि मरणाचिये मेरे४
४. वेळी
। फार५
५. वृद्धिंगत
हों लागे ॥७४॥
आणि१
१. (तं तमिति)
मरणीं२
२. मरणकाळी 'अंते मतिः सा गतिः' असा सिद्धांतच आहे
जया जें आठवे । तो तेंचि गतीतें३
३. मरणकाळी 'अंते मतिः सा गतिः' असा सिद्धांतच आहे
पावे । म्हणौनि सदा स्मरावें । मातेंचि, तुवां ॥७५॥
तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च।
मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम् ॥७॥
डोळां जे देखावें । कां कानीं हन ऐकावें । मनीं जें भावावें । बोलावें वाचें ॥७६॥
तें आंत-बाहेरी आघवें । ‘मी’ चि करूनि घालावें । मग, सर्वी काळीं स्वभावें । ‘मी’ चि आहें ॥७७॥
अर्जुना१
१. (युध्य च)
, ऐसें जाहालिया । मग, ‘न मरिजे’ देह गेलिया२
२. देह गेला तरी अविनाशी आत्मा मरत नाहीं
“। मा संग्रामु केलिया । भय काय तुज ? ॥७८॥
तूं१
१. (मय्यर्पितमनोबुद्धिः)
मन बुद्धि सांचेंसीं२
२. खरेपणानें
। जरी माझिया स्वरूपीं अर्पिसी । तरी मातेचि गा पावसी । हे माझी भाक३
३. (मामेवैष्यस्यसंशयम्) प्रतिज्ञा
॥७९॥
हेंचि१
१. (चूर्णिका)
कायिसयावरी२
२. कशानें
‘ होये ? । ऐसा जरी संदेहो वर्ततु आहे । तरी अभ्यासूनि आदीं पाहें । मग, नव्हे; तरी कोपें ! ॥८०॥

तुटला आशेचा जिव्हाळा१
१. ओलावा, आधार, तंतू
।
सुकले वोठ वाळला गळा । कळा२
२. कांती, टवटवी
उतरली मुखकमळा । खेदु३
३. अधिक, विशेष
आगळा चिंतेचा ॥२०१॥
वित्त१
१. पैसा
न येचि हाता ।
तेणे ते झाली दीनचित्ता२
२. मनाने दुःखी, हताश
। वैराग्यें परम३
३. श्रेष्ठ
वाटली चिंता४
४. परमात्मप्राप्तिविषयी
। सुखस्वार्था ते५
५. (वैराग्य)
हेतु ॥२०२॥
तस्या निर्विण्णचित्ताया, गीतं श्रुणु यथा मम ।
निर्वेद आशापाशानां, पुरुषस्य यथा ह्यसिः॥२८॥
न ह्यङ्गाजातनिर्वेदो देहबन्धं जिहासति ।
यथा विज्ञानरहितो मनुजो ममतां नृप ॥२९॥
श्लोकार्थ – याप्रमाणे तिला वैराग्य येऊन तिने जी कथा गायिली तीच तुला मी सांगतो, ऐक. आशारूप पाशांनी दृढ जखडलेल्या पुरुषाला, ते पाश तोडण्यास वैराग्य हीच खरी तलवार आहे. हे राजा, ज्याला वैराग्य उत्पन्न झाले नाही त्याचा देहबंध किंवा संसारबंध कधी सुटणार नाही. ॥२८-२९॥
कैसें वैराग्य उपजलें तिसी ।
जे चिंतीत होती विषयासी । त्या विटली१
१. कंटाळणे, नकोसे होणे
विषयसुखासी । छेदक२
२. नाश करणारे
आशेसी वैराग्य ॥२०३॥
तेणें वैराग्य विवेकयुक्त ।
पिंगलेने गाइलें गीत । तें आइक राया समस्त । चित्तीं सुचित्त१
१. सावध
होऊनि ॥२०४॥
ऐक राया विवेकनिधी१
१. विचाराचा साठा
।
वैराग्य नाहीं ज्याचे बुद्धीं । त्यासी जन्ममरणाची आधिव्याधी२
२. चिंता व शारिरीक रोग
। प्रतिपदी३
३. पावलापावलाला
बाधकु४
४. पीडा
॥२०५॥
अनुतापु१
१. पश्चात्ताप
नाहीं ज्यासी ।
विवेक नुपजे२
२. उत्पन्न होत नाही
मानसीं । तो संसाराची आंदणी३
३. बक्षिस दिलेली
दासी । आशापाशी बांधिजे ॥२०६॥
त्यासी मोहममतेची गाढी१
१. मजबूत, अवजड
।
घालिजे देहबुद्धीची बेडी । अहोरात्र विषय भरडी२
२. दळण
। अर्ध घडी न राहे ॥२०७॥
जराजर्जरित वाकळे- ।
माजी पडले अखंड लोळे । फुटले विवेकाचे डोळे । मार्गु न कळे विध्युक्त ॥२०८॥
त्यासी अव्हासव्हा१
१. स्वैर, हवेतसे
जातां ।
अंधकूपीं२
२. नरकरूपी अंधारी विहीर
पडे दुश्चिता३
३. असावधपणाने
। तेथूनि निघावया मागुता । उपावो सर्वथा नेणती ॥२०९॥
तेथ काया-मनें-वाचें ।
निघणें नाहीं जी साचें । तंव फणकाविला१
१. नांगी मारणे
लोभविंचें२
२. लोभरूपी विंचवाने
। चढणे३
३. व्यापणे, वाढणे
त्याचे अनिवार४
४. अमर्याद
॥२१०॥
तेथ निंदेचिया तिडका१
१. कळ
।
आंत बाहेर निघती देखा । वित्तहानीचा थोर भडका । जळजळ देखा द्वेषाची ॥२११॥
अभिमानाचे आळेपिळे१
१. आळुखे-पिळुखे
।
मोहउमासे२
२. मोहाचे श्वासोच्छ्वास
येती बळें३
३. जोराने
। तरी विषयदळणे आगळे४
४. अधिक
। दुःखें लोळे गेहसेजे५
५. घरातील अथरूणावर
॥२१२॥
ऐशी अवैराग्ये बापुडीं१
१. बिचारी
।
पडली देहाचे बांदवडीं२
२. कैदखान्यात टाकणे
। भोगितां दुःखकोडी । सबुडबुडी३
३. डोक्यासहित तळाशी
बुडालीं ॥२१३॥
पहा पां नीच सर्व वर्णांसी ।
निंद्य कर्मे निंदिती१
१. निंदा करणारी
कैशीं । वैराग्य उपजलें२
२. उत्पन्न झाले
वेश्येसी । देहबंधासी छेदिलें ॥२१४॥
देहबंध छेदी त्या उक्ती१
१. वाक्ये
।
वेश्या बोलिली नाना युक्ती । झाली पिंगलेसी विरक्ती । चक्रवर्ती परीस पां ॥२१५॥
पिंगलोवाच- अहो मे मोहविततिं पश्यताविजितात्मनः ।
या कान्तादसतः कामं कामये येन बालिशा ॥३०॥
श्लोकार्थ – पिंगला म्हणाली- मला किती मोठा मोह झाला! मी इंद्रियांच्या खोट्या मोहाला बळी पडले; (शाश्वत सुख देणारा रमापती सोडून) ज्याच्याकडून सुखाची कल्पनासुद्धा करणे वेडेपणाचे अशा रमणाकडून सुखाची अपेक्षा केली. किती मी मूर्ख आहे ? ॥३०॥
मिथ्या मोहाचा विस्तार ।
म्यां वाढविला साचार । माझ्या मूर्खपणाचा पार१
१. विस्तार
। पाहतां विचार पांगुळे२
२. कुठीत होणे
॥२१६॥
नाहीं अंतःकरणासी नेम१
१. निग्रह
।
अपार२
२. अमर्याद
वाढविला भ्रम । असंतपुरुषांचा३
३. दुर्गुणी-दुराचारी पुरूष
काम । मनोरम४
४. मनाला सुख देणारा
मानितां ॥२१७॥
जरी स्त्रीसी पुरुष पाहिजे ।
तरी जवळील पुरुष१
१. परमात्मा
न लाहिजे२
२. प्राप्त
। हेंचि मूर्खपण माझें । सदा भुंजे३
३. भोगला
असंतां ॥२१८॥
सन्तं समीपे रमणं रतिप्रदं, वित्तप्रदं नित्यमिमं विहाय ।
अकामदं दुःखभयादिशोकमोहप्रदं तुच्छमहं भजेऽज्ञा ॥३१॥
श्लोकार्थ – सदासर्वदा अत्यंत नजीक असणारा, शाश्वत सुख देणारा, किंचित काळ नव्हे तर नित्य द्रव्य देणारा, अशा रमणाला सोडून, महामूर्ख अशी मी इच्छापूर्ती न करणारा, दुःख, भय, शोक आणि मोह इत्यादी देणारा, अशा क्षुद्र पुरुषाची इच्छा करिते. ॥३१॥
संतपुरुषाची१
१. अबाधीत सद्रूप परमात्म्याची
प्राप्ती ।
जवळी असतां, नेणें आसक्ती । ज्यासी केलिया रती२
२. रममाण
। कामनिवृत्ति तत्काळ ॥२१९॥
काम निवर्तवूनि देख ।
अनिवार१
१. अपार
पुरवी नित्यसुख । वित्तदाता२
२. (पा.भे. चित्तदाता)
तोचि एक । अलोलिक पैं देणें ॥२२०॥
सकळ ऐश्वर्य निजपदेसीं१
१. स्वस्वरूपासह
।
संतोषोनि दे रतीसी२
२. सुख
। रमवूं जाणे नरनारींसीं । रमणु सर्वांसी तो एकु ॥२२१॥
सांडोनि ऐशिया कांतासी१
१. पतीला
।
माझी मूढता पहा कैशी?। नित्य अकामदा२
२. इच्छेची पूर्ती न करणाऱ्या
पुरुषासी । कामप्राप्तीसी भजिन्नलें३
३. सेवा केली
॥२२२॥
आपुला पूर्ण न करवे काम ।
ते मज केवीं करिती निष्काम?। त्यांचेनि संगें मोहभ्रम । दुःख परम पावलें ॥२२३॥
त्यांचेनि सुख नेदवेच मातें१
१. मला
।
परी झाले दुःखाचेचि दाते । भय-शोक-आधि२
२. काळजी
-व्याधीते । त्यांचेनि सांगातें३
३. संगाने
पावलें ॥२२४॥
अहो मयाऽऽत्मा परितापितो वृथा, साङ्केत्यवृत्त्याऽतिविगर्ह्यवार्तया ।
स्त्रैणान्नराद्यार्थतृषोऽनुशोच्यात्, क्रीतेन वित्तं रतिमात्मनेच्छती ॥३२॥
श्लोकार्थ – खरोखरीच मी आपल्या मनाला व्यर्थ त्रास दिला, संकेताने द्रव्य ठरवावयाचे आणि त्यावर जीविका चालवावयाची. स्त्रीलंपट, द्रव्याचा लोभ धरणारा, सर्वकाळ निंद्यकर्मे करून पर्यवसानी शोकच देणारा, अशा माणसाला द्रव्याकरिता व क्षुद्र कामसुखाकरिता देह विकायला तयार झाले ! ॥३२॥
जारपुरुषापासोनि सुख ।
इच्छितें, ते मी केवळ मूर्ख । वृथा१
१. निष्कारण
परितापु२
२. पीडा
केला देख । मज असुख३
३. दुःख
म्यां दीधलें ॥२२५॥
स्त्रैण१
१. स्त्रीलंपट
पुरुष ते नराधम२
२. मनुष्यात नीच
।
वेश्यागामी त्याहूनि अधम । त्यांत कृपणु३
३. कंजुस
तो अधमाधम । तयांचा संगम मी वांच्छी४
४. इच्छिते (पा.भे. वांछिती)
॥२२६॥
जितुक्या अतिनिंदका वृत्ती ।
मज आतळतां१
१. स्पर्श करण्यास
त्या भीती । योनिद्वारे जीविकास्थिती२
२. उपजीविका
। नीच याती व्यभिचारु ॥२२७॥
अल्प द्रव्य जेणे देणें ।
त्याची जाती कोण हें नाहीं पाहणें । याहोनि काय लाजिरवाणें । निंदित जिणें पैं माझें ॥२२८॥
जया पुरुषासी देह विकणें ।
तें अत्यंत हीनदीनपणें । काय सांगों त्याची लक्षणे । सर्वगुणें अपूर्ण ॥२२९॥
वित्त नेदवे कृपणता ।
काम न पुरवे पुरता१
१. पूर्ण
। प्रीति न करवे तत्त्वतां२
२. मनापासून
। भेटी मागुता तो नेदी ॥२३०॥
ऐशियापासाव सुख ।
वांछितां वाढे परम दुःख । जळो त्याचे न पाहें मुख । वोकारी देख येतसे ॥२३१॥
एवं जारपुरुषाची१
१. परस्त्रीशी संबंध करणारा
स्थिती ।
आठवितां चिळसी येती । पुरे पुरे ते संगती । चित्तवृत्ति वीटली ॥२३२॥
यदस्थिभिर्निर्मितवंशवंश्यस्थूणं त्वचारोमनखैः पिनद्धम् ।
क्षरन्नवद्वारमगारमेतद्विण्मूत्रपूर्णं मदुपैति काऽन्या ॥३३॥
श्लोकार्थ – जे हाडांचे बनवलेले आहे ; कणा, बरगड्या व हातपाय यांची हाडे ज्याचे आढे, वासे आणि खांब आहेत; ज्याला कातडे, केस, नखे यांनी घट्ट बांधून टाकले आहे; ज्याच्या नऊ द्वारांतून घाणेरडा मळ सारखा वाहात आहे; जे विष्ठा आणि मूत्र यांनी भरलेले आहे. असे मूर्तिमंत घाणीचे घर असलेले जे हे (पुरुष-) शरीर त्याच्याकडे माझ्याशिवाय दुसरी कोण जाण्यास तयार होईल ? ॥३३॥
नरशरीरगृह सांकडें ।
आढी१
१. घराच्या दोन पाख्यामधील लांब लाकूड
पाखाड्या२
२. तुळी
नुसधी हाडें । अस्थींच्या मेढी३
३. खांब
दोंहीकडे । वोलेनि४
४. ओल्या
कातडे मढियेलें५
५. आच्छादणे, लपेटणे
॥२३३॥
त्यासी सर्वांगी सगळे ।
दिधले रोमावळिचे१
१. केसांचे
खिळे । घालूनि नखाचे खोबळे२
२. गुडद्या, टोपणे, अस्तर, बुजवण
। अग्री, आंगवळे३
३. आंगोळ्या, फटी, बोटे, टोके
बूजिले ॥२३४॥
अस्थि-मांस-चर्मबांधा१
१. हाडे, मांस व कातडी यांची आकृती
।
सर्वांगी आवळूनि दिधला सांदा२
२. जोड
। रंगीत चर्मरसना३
३. कातड्याची जीभ
स्वादा । पुढिले४
४. (तोंडाच्या)
बांधा५
५. आकृती
बांधिली ॥२३५॥
वायुप्रसरणपरिचारें१
१. वारा आत-बाहेर जाण्याकरिता
।
केली प्राणापानरंध्रे२
२. प्राणरंध्र-नाक व अपानरंध्र-गुद
। वरिले डळमळीत शिखरें३
३. (डोके)
। बालांकुरे४
४. केसांची रोपे
लाविलीं ॥२३६॥
बुजूनि भीतरील सवडी१
१. पोकळी, फटी
।
बांधाटिलें नवनाडीं । विष्ठामूत्रांची गाढी । नित्य परवडी सांठवण ॥२३७॥
भीतरिले१
१. पोटातील
अवकाशी ।
दुर्गंधि ऊठली कैशीं । तेचि प्रवाह अहर्निशीं । नवद्वारांसी वाहताति ॥२३८॥
अखंड पऱ्हवे१
१. चर, मोऱ्या
वाहती मळे ।
देखूनि ज्याचें तो कांटाळे । अहर्निशीं धुतां जळें२
२. पाण्याने
। कदा निर्मळे ते नव्हती ॥२३९॥
सांगतांचि हे गोष्टी ।
ओकारी येतसे पोटीं । ऐशियास१
१. (देहाला)
मी भुलल्ये करंटी२
२. दुर्दैवी
। विवेक दृष्टी न पाहें ॥२४०॥
अस्थिमांसाचा कोथळा१
१. पोटातील कोठ्याभोवतालचे मांसाचे आवरण
।
विष्ठामूत्राचा गोळा । म्यां आलिंगिला वेळोवेळां । जळो कंटाळा न येचि ॥२४१॥
विदेहानां पुरे ह्यस्मिन्नहमेकैव मूढधीः ।
याऽन्यमिच्छन्त्यसत्यस्मादात्मदात्काममच्युतात् ॥३४॥
श्लोकार्थ – या विदेहनगरीमध्ये खरोखरी मीच काय ती एकटी मूर्ख ! खोट्याला खरे मानणारी मीच आहे. आत्मस्वरूपाप्रत नेणाऱ्या आणि ज्याच्या स्वरूपाला व सुखाला कधी नाश नाही अशा ईश्वराला सोडून दुसऱ्याच तुच्छ भोगाची मी वेडगळपणाने इच्छा करते. ॥३४॥
ये विदेहाचे नगरीं ।
मूर्ख मीचि एक देहधारी । हृदयस्थ सांडूनि श्रीहरी । असंतां१
१. दुर्गुणी, वाईट, मर्त्य
नरी व्यभिचारु ॥२४२॥
असंत पुरुष नेणों किती ।
म्यां भोगिले अहोरातीं । सुख न पवेंचि निश्चितीं । रति भगवंती जंव नाहीं ॥२४३॥
जो निकटवर्ती१
१. आपल्या जवळ राहणारा
हृदयस्थु ।
पुरुषी पुरुषोत्तम अच्युतु । वीर्यच्युतीवीण रमवितु । संतोषें देतु निजात्मना२
२. (पा.भे. निजात्मता)
॥२४४॥
अच्युतें ज्यासि निजसुख दिधलें ।
तें सुख च्यवेना१
१. नष्ट होत नाही
कांहीं केलें । ऐशिया हृदयस्था विसरलें । आणिक२
२. (पा.भे. आणिका)
भुललें अकामदा३
३. इच्छा पूर्ण न करणाऱ्यावर
॥२४५॥
अकामद ते नाशवंत ।
त्यांसी संग केलिया दुःखचि देत । कैसें माझें मूर्ख चित्त । त्यासी आसक्त पैं होतें ॥२४६॥
त्या आसक्तीची झाली तडातोडी१
१. ताटातूट
।
लागली अच्युतसुखाची गोडी । ज्याचें सुख भोगितां चढोवढी२
२. अधिकाधिक, उत्तरोत्तर, वाढत्या प्रमाणाने
। घडियाघडी३
३. क्षणाक्षणाला
वाढतें ॥२४७॥
सुहृत्प्रेष्ठतमो नाथ, आत्मा चायं शरीरिणाम् ।
तं विक्रीयात्मनैवाहं, रमेऽनेन यथा रमा ॥३५॥
श्लोकार्थ – देहधारी प्राण्यांचा जिवलग प्रियतम मित्र, त्यांचा स्वामी आणि आत्मा, अशा अच्युताला मी आपले सर्वस्व देऊन विकत घेईन आणि त्याची अर्धांगिनी जी लक्ष्मी तिच्या प्रमाणे त्याच्याशी सर्वकाळ रममाण होईन. ॥३५॥
जो सोयरा माझा हृदयस्थु ।
सुख प्रीति प्रिय अच्युतु । तोचि अंतरात्मा सर्वगतु । कांतु१
१. पती
तो माझा ॥२४८॥
त्यासीच आपुले संवसाटी१
१. मोबदल्याने
।
विकत घेईन उठाउठी२
२. तत्काळ
। परमानंदें देईन मिठी । गोठी चावटी३
३. बाष्कळ बडबड
सांडोनी ॥२४९॥
रमा१
१. लक्ष्मी
झाली पायांची दासी ।
मी भोगीन अनारिसी२
२. अनायासे, निराळ्या तऱ्हेने
। सर्वकाळ सर्वदेशीं । सर्वरूपेसी सर्वस्वे ॥२५०॥

१३६२. आतां देह अवसान१
१. कष्टावाचून
। हे२
२. निराकरण
जतन तोंवरी३
३. जीवत्व, अहंपदवाच्य
॥१॥ गाऊं नाचूं गदारोळे४
४. आपले पारमार्थिक लक्ष्य स्वरूप
। जिंकों बळें संसार ॥ध्रु॥ याचि जीऊं५
५. समान
अभिमानें । सेवाधनें बळकट ॥३॥ तुका म्हणे न सरें मागेंे६
६. अज्ञानपटल
। होईन लागें७
७. च्युत न होणे, न ढळणे
आगळा८
८. अंतःकरणात
॥४॥
१३६३. कुळींची हे कुळदेवी । केली ठावी१
१. तृप्ती होईपर्यंत, पोटभर
संतांनीं ॥१॥ बरवें झालें शरण गेलों । उगविलों२
२. एकनिष्ठ
संकटीं ॥ध्रु॥ आणिलाही रूपा बळें। करूनि खळें३
३. भावहीनता
हरिदासीं ॥३॥ तुका म्हणे समागमें४
४. (वा.) स्वाधीन झाले, सवय पडणे
। नाचों प्रेमें लागलों ॥४॥
१३६४. ज्याने आड यावें कांहीं । त्याचे नाही बळ आतां ॥१॥ मन येथें साह्य झालें । हरीच्या धालें गुणवादीं ॥ध्रु॥ चुकुर तो गेला काळ । झाले बळ संगाचें ॥३॥ तुका म्हणे धरूं सत्ता । होईल आतां करूं तें ॥४॥
१३६५. देवासी तो पुरे एकभाव गांठीं। तोचि त्याचे मिठी देईल पायीं ॥१॥ पाहोनि राहीन कवतुके निराळा । मी मज-वेगळा होऊनियां ॥ध्रु॥ कांहीं नेघें शिरी निमित्ताचा भार । नलगे उत्तर वेचावेंचि ॥३॥ तुका म्हणे जीवें पडिलिया गांठी । मग नाहीं मिठी सुटों येत ॥४॥
१३६६. लौकिकासाठी या पसाऱ्याचा गोवा । कांहीं नाहीं देवा लागो येत ॥१॥ ठेवावा माथा तो नुचलावा पायीं । ठायींचिये ठायीं हालों नये ॥ध्रु॥ डहुळिल्या मनें वितुळेल रूप । नांव ऐसें ‘पाप’ उपाधी तें ॥३॥ तुका म्हणे देव प्रीतीने कवळीं । ठेविल जवळी उठवूनि ॥४॥
१३६७. नाहीं होत भार घातल्या उदास । पुरवावी आस सकळही ॥१॥ ऐसा नाहीं मज एकाचा अनुभव । धरीला तो भाव उद्धरिले ॥ध्रु॥ उतावीळ असे शरणागत काजें । धांवा केशीराजें आइकतां ॥३॥ तुका म्हणे हितचिंतनी भरंवसा । नेदी गर्भवासा येऊं देऊं ॥४॥
१३६८. उपजों मरों हे तो आमुची मिरासी। हे तूं निवारिसी तरी थोर ॥१॥ उभा राहें, करीं खराखोटा वाद । आम्ही झालों निंद्य लंडपणे ॥ध्रु॥ उभयतां आहे करणे समान । तुम्हां ऐसा म्हणे मीहि देवा! ॥३॥ तुका म्हणे हातीं सांपडलें वर्म । अवघाचि भ्रम फेडिन आतां ॥४॥
१३६९. मेलियांच्या रांडा इच्छिती लेकरूं । लाज नाहीं धरू प्रीत कैशी? ॥१॥ मागिलां पुढिला एक सरोबरी। काळाची पेटारी खांदा वाहे ॥ध्रु॥ आन दिसे परि मरणचि खरें । सांपळां उंदिरें सामाविलीं ॥३॥ तुका म्हणे झाली मनाची परती । निवळली ज्योती दिसों आली ॥४॥
१३७०. निष्ठुर मी झालों अतिवादागुणें । हें कां नारायणें नेणिजेल? ॥१॥ सांडियेली तुम्ही गोत परि सोय। फोडविली डोय कर्माहाती ॥ध्रु॥ सांपडूनि संदि केली जीवेंसाटीं । घ्यावयासी तुटी कारण हें ॥३॥ तुका म्हणे तुज काय म्हूण उणें । नाहीं अभिमाने चाड देवा ॥४॥
१३७१. माझें माझ्या हातां आलें । आतां भलें सकळ ॥१॥ काशासाठी विषम थारा? । तो अंतरा विटाळ ॥ध्रु॥ झाली तया दु:खें तुटी । मागिल पोटीं नसावें ॥३॥ तुका म्हणे शुद्ध कुळ । तेथें मळ काशाचा? ॥४॥
१३७२. समर्थपणे हे करा संपादणी । नसतेंचि मनीं धरिल्याची ॥१॥ दुसऱ्याचे येथें नाहीं चालों येत । तरी मी निवांत पाय पाहे ॥ध्रु॥ खोटियाचे खरे खरियाचे खोटें । मानले गोमटें तुम्हांसी तें ॥३॥ तुका म्हणे तुम्हांसवें करीतां वाद । होईजे तें निंद्य जनीं देवा! ॥४॥
१३७३. तुम्हां आम्हांसवें न पडावी गांठी । आलेति जगजेठी कळों आतां ॥१॥ किती म्हणों आतां वाईटा वाईट । शिवों नये वीट आल्यावरी ॥ध्रु॥ बोलिल्याची आतां हेचि परचित । भीड भार थीत उडविली ॥३॥ तुका म्हणे आली रोकडी प्रचिती । झांकणे ते किती कोठे देवा! ॥४॥
१३७४. सकळ सत्ताधारी । व्हावें ऐसें काय हरी! ॥१॥ परि या कृपेच्या वोरसें । कुढावयाचेंचि पिसें ॥ध्रु॥ अंगें सर्वोत्तम । अवघाचि पूर्णकाम ॥३॥ तुका म्हणे दाता । तरि हा जीवदान देता ॥४॥
१३७५. कोणापाशीं द्यावें माप? । आपेआप राहिले ॥१॥ कासयाची भरोवरी । काय दुरी जवळी? ॥ध्रु॥ एके दाखविले दाहा । फांटा पाहा पुसून ॥३॥ तुका म्हणे सरलें वोझें । आतां माझें सकळ ॥४॥
१३७६. नभोमय झालें जळ। एकीं सकळ हारपलें ॥१॥ आतां काय सारासारी? । त्याच्या लहरी तयांत ॥ध्रु॥ कैंचा तेथ यावा सांडी? । आप कोंडी आपणां ॥३॥ तुका म्हणे कल्प झाला । अस्त गेला उदय ॥४॥
१३७७. राजा करी तैसे दाम। चाम तेही चालती ॥१॥ कारण ते सत्ता शिरीं । कोण करी अव्हेर? ॥ध्रु॥ वाहिलें तें सुनें खांदीं । चाले पदी बैसविलें ॥३॥ तुका म्हणे विश्वंभरें । करुणाकरें रक्षिलें ॥४॥
१३७८. आम्ही देव तुम्ही देव । मध्ये भेव अधिक ॥१॥ कैवाडाच्या धांवा लागें । मागें मागें ‘विठ्ठलें’ ॥ध्रु॥ भेड-साविलें हाकें नादें । वोळखी भेदें मोडिली ॥३॥ तुका म्हणे उभा राहे । मागे पाहे परतोनि ॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

1 thought on “दिवस – ८६. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top