आध्यात्मिक प्रवचनांची ३६५ दिवसांची दैनंदीनी

अखिल मानवजातीने नित्य-निरन्तर दुःखसम्बधरहित आनंदाची अनुभूती घेत जीवनयापन करीत देहपातानंतर अखण्ड एकरस आनंदस्वरूपात एकरूप होऊन विदेहकैवल्यामध्ये समरस होऊन जाव्ो आणि आदेहान्त जीवन्मुक्तीच्या विलक्षण निर्विषय-निरुपाधिक-निर्विशेष सुखभोगाचे वतनदार व्हाव्ो असेच मानवमात्रांच्या हितासाठी रात्रंदिवस तळमळणाऱ्या सर्व सन्तांचे मनोगत असल्याचे तसेच सृष्टीकर्त्या ईश्वराच्या चरणी सादर-सविनय-सप्रेम प्रार्थना करणाऱ्या सहृदय-सर्वसुहृद असणाऱ्या त्यांच्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक असणाऱ्या जीवनचरित्राचे आणि संतप्रणीत वाङ्मयाचे मथित आहे.

आपल्या जीवनात शाश्वत अशा वास्तव आनंदाची झलक प्राप्त व्हावी; प्रत्येक जिज्ञासूसाठी प्रतिदिनी ‌‘स्वाध्यायोऽध्येतव्यः।‌’ अथवा ‌‘स्वाध्याय प्रवचने च।‌’ अशा व्ोदोक्त आज्ञेचे पालन करीत असतांना व्ोदानुमोदित अशा उदात्त-गंभीर-पवित्र तसेच अन्तःकरणाची शुद्धी करणाऱ्या आणि सत्कृत्य-सद्भावना आणि सद्विचारांच्या प्रेरक अशा महानुभाव व्यक्तींच्या मुखातून निःसृत झालेल्या सुखदायी अशा अमृतवाणीचे श्रवण-पठण केले असता त्याच्या जीवनातील सन्तापकारी असे रजोगुण आणि तमोगुण झडून जाऊन सत्त्वगुणाच्या आनंद आणि ज्ञान ह्या उभयधर्मांची वृद्धी होऊन त्याच्या जीवनात ज्ञान आणि आनंद उत्तरोत्तर वृद्धी पावतात आणि पुढे जाऊन त्याला निरामय आनंदाची नःसंदेह स्वात्मानुभूती प्राप्त होते.

आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनात व कराळ-विक्राळ कळिकाळात तसेच पाश्चिमात्य संस्कृतीच्या जाळ्यात सापडलेल्या उदरनिर्वाहासाठी अर्थप्राप्ती हेच परमसाध्य मानणाऱ्या विशेषतः आपल्या सनातन वैदिक परम्परेच्या रीतिरिवाजांना विसरत चाललेल्या व समयाच्या अभावाचे कारण उपस्थित करणाऱ्या तथाकथित तरुण आणि सुशिक्षित साधकांसाठी जीवनभर अनंतश्री अखण्डानन्द सरस्वतींच्या वाङ्मयातील प्रत्येक शब्दार्थ आणि वाक्यार्थाचे आलोडन करून त्यांच्या संपूर्ण वाङ्मयाचे अहर्निश विचार मंथन-आलोडन-अनुसंधान करून त्या वाङ्मयाचे सारसर्वस्व वर्षभर दररोज केवळ दहा मिनिटात पदरी पडाव्ो, यासाठी ‌‘आनंद रस-रत्नाकर‌’ नामक लघुकाय चिंतनिकेच्या द्वारा प्रस्तुत ग्रंथाकृतीचे निर्माण करण्यात अनंतश्री ‌‘गोविन्दानन्दजी सरस्वती‌’ स्वामीजी पूर्णतया सफल झाले आहेत, असे मनोमन वाटते.

महाराष्ट्रातील सर्व मराठी भाषिकांनी प्रस्तुत ग्रंथाचे प्रत्यहि चिंतन करून लाभान्वित व्हावे, अशी समाजपुरुषाच्या चरणी विनम्र याचना करीत आहे. –

आपला चरणरज.
डॉ नारायण महाराज जाधव
आळंदी देवाची

(गुरुवर्य बाबांच्या द्वारा ही ३६६ दिवसाची दैनंदीनी आपल्या संग्रही ठेवून दररोज यातील एक पान वाचन करावे हा देखील एक नित्य नियमच आहे. याचाही ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्या नित्यनेमात अंतर्भाव करावा. अशी प्रार्थना. ज्यांना ग्रंथ हवा त्यांना पोस्टाने पाठविण्याची सेवा उपलब्ध आहे.

आनंद-रस-रत्नाकर

आनंद-रस-रत्नाकर

170

आनंद-रस-रत्नाकर (३६५ प्रवचने – दररोज एक प्रवचन  )

Category:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top