७१) बाधितानुवृत्तीने राहिले पाहिजे
७२) अज्ञानाचे कार्य अज्ञानाला विषय करू शकत नाही तर सर्वांचे अधिष्ठान असणारा परमात्मा बुद्धीने कसा जाणला जाईल?
७३) चिंतारहित कसे होता येईल या विचाराने चिंता वाढत जाते, परंतु जोपर्यंत परमात्मा हृदयात प्रविष्ट होत नाही तोपर्यंत नित्य चिंतेने जळतच राहणार.
७४) चिंता कशाची करायची? – परमात्मा कधी भेटेल याची
७५) परमात्म्याशिवाय कोणाचाही आश्रय करू नये.
७६) अनाथांचे मायपोट फक्त तत्वच आहे.
७७ अनन्यतेशिवाय फलप्राप्ती होत नाही.
७८) भ्रम कळला तर भ्रम जातच असतो. फक्त भ्रम कळायला हवा
७९) आत्मा अनात्मस्वरूपाला कधीच प्राप्त झालेला नाही. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्या विषयाची, उपाधीची सिद्धीच होत नाही. आत्मा निर्विकार स्वतःसिद्ध आहे आत्म्याच्या ठिकाणी उपाधीच नसल्यामुळे आत्मा स्वतःसिद्धच आहे.
८०) जीवनमुक्त जवळ-जवळ ईश्वरच आहे. जवळ-जवळ का म्हणायचे? – तर उत्पत्ती – प्रलय त्याच्याकडे नाही म्हणून.