दिवस – ३६. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

धूमेनाव्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च । यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् ॥३८॥
जैसी चंदनाची मुळी । गिंवसोनि घेपे व्याळीं । नातरी उल्बाची खोळी । गर्भस्थासी ॥२६०॥
कां, प्रभावीण भानु । धूमेवीण हुताशनु । जैसा दर्पण मलहीनु । कहींच नसे ॥२६१॥
तैसे, इहींवीण एकलें । आम्हीं ज्ञान नाहीं देखिलें । जैसें कोंडेनि पांगुंतलें । बीज निपजे ॥२६२॥
आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा । कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च ॥३९॥
तैसे, ज्ञान तरी शुद्ध । परी इहीं असे प्ररुद्ध । म्हणौनि तें अगाध । होऊनि ठेलें ॥२६३॥
आधीं यांतें जिणावें । मग, तें ज्ञान पावावें । तंव पराभवो न संभवे । रागद्वेषां ॥२६४॥
यांतें साधावयालागी । जे बळ आणिजे आंगीं । तें, इंधने जैसीं आगी । सावावो होय ॥२६५॥
इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते । एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् ॥४०॥
तैसे, उपाय किजती जे जे । ते यांसीच होती विरजे । म्हणौनि हटियांतें जिणिजे । इहींचि जगीं ॥२६६॥
ऐसीयांही सांकडां बोला । एक उपायो आहे भला । तो करितां जरी आंगवला । तरी सांगेन तुज ॥२६७॥
तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ । पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम् ॥४१॥
यांचा पहिला कुरुठा इंद्रियें । एथूनि प्रवृत्ति कर्मातें विये । आधीं निर्दळूनि घाली तियें । सर्वथैव ॥२६८॥
इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः । मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः ॥४२॥
मग, मनाची धांव पारुशेल । आणि बुद्धीची सोडवण होईल । इतुकेन थारा मोडेल । या पापियांचा ॥२६९॥
एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना । जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् ॥४३॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः ॥३॥
हे अंतरिहूनि जरी फिटले । तरी निभ्रांत जाण, निवटले । जैसें रश्मीवीण उरलें । मृगजळ नाहीं ॥२७०॥
तैसे, रागद्वेष जरी निमालें । तरी ब्रह्मींचें स्वराज्य आलें । मग तो भोगी सुख आपुलें । आपणचि ॥२७१॥
ते गुरुशिष्यांची गोठी । “पद-पिंडाची’ गांठी । तेथ स्थिर राहोनि नुठी । कवणे काळीं ॥२७२॥
ऐसें, सकळ सिद्धांचारावो । देवी लक्ष्मीयेचा नाहो । “राया ऐकें’ देवदेवो । बोलता जाहला ॥२७३॥
आतां पुनरपि तो अनंतु । आद्य एकी मातु । सांगैल; तेथ पांडुसुतु । प्रश्नु करील ॥२७४॥
तया बोलाचा हन पाडु । कीं रसवृत्तीचा निवाडु । येणें श्रोतयांस होईल सुरवाडु । श्रवणसुखाचा ॥२७५॥
ज्ञानदेवो म्हणे निवृत्तीचा । चांग उठावा करूनि उन्मेषाचा । मग संवादु श्रीहरि-पार्थाचा । भोगावा बापा ॥२७६॥
इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां तृतीयोऽध्यायः ।
श्लोक-४३, ओव्या-२७६.

कृष्णार्पण-ब्रह्मार्पण-ध्यान ठसल्याने सर्व क्रिया (५५३ ते ५६६)

ऐसें ठसावतां ध्यान । भक्तांची सबाह्य क्रिया पूर्ण । ते ते होय कृष्णार्पण । स्त्रीपुत्रादि जाण सर्वस्वें ॥५३॥
इष्टं दत्तं तपो जप्तं वृत्तं यच्चात्मनः प्रियम् । दारान्सुतान्गृहान्प्राणान्यत्परस्मै निवेदनम् ॥२८॥
(भगवंताच्या अद्भुत लीलांचे, त्याचप्रमाणे त्याचे अवतार, त्या अवतारांतील कार्ये आणि गुण यांचे श्रवण, प्रेमाने गायन आणि चिंतन करणे ; ह्याच्याकरिताच सर्व क्रिया करणे ; यज्ञादिक वैदिक धर्म, दान, तपश्चर्या, जप, सद्वर्तन, आपल्याला प्रिय असणाऱ्या वस्तू , त्याचप्रमाणे स्त्री, पुत्र, गृह, प्राण त्या परमात्म्याला अर्पण करणे. ॥२७-२८॥)
अग्निहोत्रादि ‘याग’ होम । ग्रहणादि ‘दान’ अनुत्तम । ‘तप’ म्हणिजे स्वधर्म । जो वर्णाश्रम यथोचित ॥५४॥
आगमोक्त यथाशास्त्र । आवरणविधि-विधानतंत्र । गुरुदीक्षा शुद्ध मंत्र । अथवा नाममात्र जो ‘जपु’ कीजे ॥५५॥
तें यज्ञ दान क्रिया तप । दीक्षामंत्र का नामजप । तेथें न घालितां संकल्प । करी निर्विकल्प कृष्णार्पण ॥५६॥
हरीशी जाहले जे अनन्य शरण । ते हरीचे लडिवाळ पूर्ण । त्यांचे हरि करी प्रतिपाळण । जेवीं जननी जाण तानुलेया ॥५७॥
यालागीं जें जें जीविकावर्तन । तेंही करावें कृष्णार्पण । ‘हे माझें’ म्हणोनि अभिमान । भक्त सज्ञान न धरिती कदा ॥५८॥
ज्याची आवडी अतिशयें चित्तीं । ज्याची आपणिया अतिप्रीति । तें तें कृष्णार्पण करिती । गुरुवाक्यस्थिती विश्वासें ॥५९॥
यालागी आठही प्रहर । सेवेसी वेंचिती निजशरीर । निमिषार्धही व्यापार । विषयाकार करिती ना ॥५६०॥
अन्नालागी होऊनि वेडें । सधनांच्या पायां न पडे । आयुष्याचे तीन कवडे । विषयाचे चाडे कदा न करी ॥६१॥
आयुष्याची अर्ध घडी । वेंचितां न मिळे लक्ष कोडी । तेणें आयुष्ये परमार्थ जोडी । विषयांच्या कोडी थुंकोनि सांडी ॥६२॥
त्यागोनियां राज्यसंपत्ती । राजे जाऊनि वनाप्रती । स्वयें परमार्थ साधिती । विषयासक्ति थुंकोनि ॥६३॥
कैशी भक्तीची गोडी संपूर्ण । रिता जावों नेदी अर्ध क्षण । अवघे जीवितचि जाण । करी कृष्णार्पण सर्वस्वे ॥६४॥
आणि पुत्रदारादिक जें जें घरीं । तें तें भगवत्सेवेवारीं । स्वयें कृष्णार्पण करी । माझी म्हणोनि न धरी ममता जीवीं ॥६५॥
दारा पुत्र देह गेह प्राण । यांसी आत्मा सबाह्य पूर्ण । तेथें संकल्पेंवीण जाण । ब्रह्मार्पण सहजचि ॥६६॥

पूज्यस्थाने (५६७ ते ५८२)

एवं कृष्णात्मनाथेषु मनुष्येषु च सौहृदम् । परिचर्यां चोभयत्र महत्सु नृषु साधुषु ॥२९॥
एवं दारा गेह देह संपदा । आत्मार्पणे शुद्ध श्रद्धा । भजले सर्वकाळी सर्वदा । ते भक्त गोविंदा पढियंते ॥६७॥
जो सर्व भूतीं हृदयस्थु । परमात्मा श्रीकृष्णनाथु । त्याचे ठायीं जो भक्तु । साधावया निजस्वार्थु सर्वस्वें भजे ॥६८॥
त्या हृदयस्थाचे ठायीं । दृढ दृष्टी जंव बसली नाहीं । तंव सगुणमूर्ती हृदयीं । भजावी पाहीं सर्वात्मभावें ॥६९॥
सगुणमूर्ती नातुडे ध्यानीं । तरी भजावें प्रतिमेच्या स्थानीं । तेथेही चलाचल दोनी । भजाव्या गुरुवचनी समसाम्यभावें ॥५७०॥
ज्या उपासक पूजिती । त्या जाणाव्या ‘चला’ मूर्ति । ज्या पांडुरंगादि द्वारावती । त्या ‘स्थावरा’ मूर्ति पुराणोक्त ॥७१॥
त्या मूर्तीहूनि श्रेष्ठ स्थान । पूर्ण पूज्यत्वें ब्राह्मण । तेथें करावें गा भजन । सर्वस्वे जाण सर्वदा ॥७२॥
त्या ब्राह्मणामाजीं अतिश्रेष्ठ । श्रोत्रिय सदाचारनिष्ठ । त्यांतही वेदशास्त्रार्थीं प्रविष्ट । ते अतिवरिष्ठ पूज्यत्वें ॥७३॥
त्यांहीमाजी जे भागवत । भागवतधर्मी नित्य निरत । जे निष्कर्मेसी भगवद्भक्त । ज्यांचा भावार्थ श्रीकृष्णीं ॥७४॥
ज्यांसी आत्मा श्रीकृष्ण हृदयस्थ । ज्यांचा अनन्य स्वामी श्रीकृष्ण-नाथ । ऐसे जे भगवद्भक्त । ते पूज्य निश्चित निजभक्तां ॥७५॥
अतिमहत्त्वे पूज्य गहन । ज्याचे सुर नर वेद बंदीजन । तो सद्गुरु श्रेष्ठ पूज्य स्थान । शिष्यासी जाण सर्वस्वें ॥७६॥
गुरु ब्रह्म दोनी समान । हेही वचन दिसे गौण । गुरुवाक्यें ब्रह्मा ब्रह्मपण । तेथें व्हावया समान भिन्नत्व नुरे ॥७७॥
जैसा देवाचे ठायीं भावो । तैसाचि गुरुचरणीं सद्भावो । गुरुदेवांमाजी पहा हो । भिन्नत्वभावो असेना ॥७८॥
देवो पूजिल्या गुरु तोषे । गुरु पूजिल्या देवो संतोषे । दों नांवांचेनि हरुषे । स्वरूपें एके वर्तती ॥७९॥
सुवर्ण आणि कांकण । दों नांवीं एक सुवर्ण । तेवीं गुरु ब्रह्मांमाजी जाण । भिन्नपण असेना ॥५८०॥
त्या सद्गुरूचें निजभजन । चित्तवित्तें अवंचन । गुरुचरणीं आत्मार्पण । करावें आपण सर्वस्वेंसीं ॥८१॥
तैसेंचि साधु श्रोते सज्ञान । तेही मानावे सद्गुरूसमान । त्यांचेनि संवादें आपण । श्रवण कथन करावें ॥८२॥

भक्तांच्या परमानंदाची लक्षणे (परिणाम) (५८३ ते ६०६)

परस्परानुकथनं पावनं भगवद्यशः । मिथो रतिर्मिथस्तुष्टिर्निवृत्तिर्मिथ आत्मनः॥३०॥
(त्याचप्रमाणे कृष्णपरमात्म्यालाच आपला स्वामी मानणाऱ्या पुरुषांचे ठिकाणी स्नेह, सर्व स्थावर-जंगम प्राण्यांची सेवा, विशेषत: मनुष्ये, त्यातून संत आणि महंत यांचे अगत्यपूर्वक पूजन, परस्परांनी मिळून भगवंताच्या अघनाशन करणाऱ्या पवित्र यशाचे गायन करून अन्योन्य प्रेम, समाधान, तसेच परस्परदुःखनिवृत्ती संपादन करावी.॥२९-३०॥)
तेथ करितां कथानुवादु । परस्परें निजात्मबोधु । करितां गुह्यज्ञानसंवादु । परमानंदु वोसंडे ॥८३॥
एवं हरिकथेच्या आवडीं । परस्परें श्रद्धा गाढी । सुखसंवादपरवडी । निजसुखगोडी चाखिती ॥८४॥
चाखतां निजसुखगोडी । हारपती दुःखकोडी । उभवूनि भक्तिसाम्राज्यगुढी । स्वानंदजोडी जोडावी ॥८५॥
भावें करितां अभेदभजन । भक्त पावती स्वानंद पूर्ण । त्या स्वानंदाचें निजचिन्ह । ऐक सांगेन नृपनाथा ॥८६॥
स्मरन्तः स्मारयन्तश्च मिथोऽघौघहरं हरिम् । भक्त्या सञ्जातया भक्त्या बिभ्रत्युत्पुलकां तनुम् ॥३१॥
(प्रचंड पापांचा डोंगर नाहीसा करणाऱ्या परमेशाचे आपण स्मरण करून दुसऱ्यालाही करून देणाऱ्या महान भगवद्गक्ताच्या अंगावर प्रेमातिशयाने व तद्विषयक भक्तीने रोमांच उभे राहतात. ॥३१॥)
क्वचिद्रुदन्त्यच्युतचिन्तया क्वचिद्धसन्ति नन्दन्ति वदन्त्यलौकिकाः । नृत्यन्ति गायन्त्यनुशीलयन्त्यजं, भवन्ति तूष्णीं परमेत्य निर्वृताः ॥३२॥
(असे लोकविलक्षण एकांतिक भक्त भगवंताच्या चिंतनाने तन्मय होऊन कधी कधी रडतात, हसतात, आनंदाने बेहोष होतात, बोलत राहतात, केव्हा केव्हा नाचतात, अनादी परमात्म्याचे गुणगान करतात, त्याच्या लीलांचे गायन करतात व भगवंताच्या स्वरूपाशी तन्मय होऊन आनंदाने शांत राहतात. ॥३२॥)
हरिकथेची महिमा कैसी । आदरें पुसत्या सांगत्यासी । होती पुण्याचिया राशी । पाप वोखदासी मिळेना ॥८७॥
ज्याचिया नामस्मरणकरी । सकळ पातकातें हरि हरी । तो स्वयें प्रगटला अंतरीं । पातकां उरी उरे कैंची ॥८८॥
साधनरूपभक्तीच्या युक्तीं । पूर्ण सप्रेम उपजे भक्ती । ते भक्तीची निजस्थिती । ऐक चक्रवर्ती सज्ञाना ॥८९॥
सद्भावें निजभजनकरीं । हृदयीं प्रगटतां श्रीहरी । तंव देहींची चिन्हें बाहेरी । क्षणामाझारी पालटती ॥५९०॥
परस्परें निजसंवादु । करितां जाहला स्वरूपावबोधु । नेत्री जळ अंगी स्वेदु । प्राणस्पंदु पांगुळे ॥९१॥
चित्तचैतन्यां होतां भेटी । हर्षे बाष्प दाटे कंठीं । पुलकांकित रोमांच उठी । उन्मीलित दृष्टी पुंजाळे ॥९२॥
करितां अच्युतचिंतन । सप्रेम गहिवरे मन । अट्टाहासें करी रूदन । अनिवार स्फुंदन ऊर्ध्वश्वासें ॥९३॥
त्या रुदनासवेंचि हर्ष प्रगटे । त्या हर्षाचेनि नेटेपाटें । हांसों लागे कडकडाटें । सुखोद्भटें गदगदौनी ॥९४॥
मीपणाचेनि अनुरोधे । गिळिलो होतो मोहमदें । तो सुटलों गुरुकृपावबोधे । तेणें परमानंदें डुल्लत ॥९५॥
मी माझेनि भवभाने । मज मी चुकलों मीपणें । मज मी भेटलों सद्गुरुवचनें । आनंदें तेणें उल्हासें ॥९६॥
कैसे सद्गुरुवचन अलोलिक । म्यांचि माझें भोगिजे निजसुख । येणें आश्चर्य देख । स्वानंदोन्मुख उल्हासे ॥९७॥
संसारबागुलाचें । भय लागले नेणों कैंचें । तें गुरुवाक्यें दवडिलें साचें । म्हणोनि नाचे निर्लज्ज ॥९८॥
जेवीं माउली देखोनि डोळां । बालक नाचे नानाकळा । तेवीं गुरुवाक्याचा सोहळा । देखोनि स्वलीळा निजभक्त नाचे ॥९९॥
तेणें निजनृत्यविनोदें । फावलेनि निजबोधे । नानापरीची भगवत्पदें । सुखानुवादें स्वयें गातु ॥६००॥
तेणें कीर्तनकीर्तिगजरें । त्रैलोक्य सुखें सुभरे । परमानंदुही हुंबरे । सुखोद्गारे तुष्टोनी ॥१॥
तेंही सांडोनियां गाणे । गर्जो लागे अतिसत्राणें । दुजें नाहीं नाही म्हणे । गाणे ऐकणें म्यां माझें ॥२॥
मीचि गाता मीचि श्रोता । माझें गाणे मीचि तत्त्वतां । जगीं मीचि एकुलता । द्वैताची कथा असोनि नाहीं ॥३॥
सद्भावें भगवत्परिचर्या । करितां पारुषे कर्मक्रिया । अहं सोऽहं निरसोनियां । वृत्तिही लया जाय तेथें ॥४॥
एवं सप्रेम भक्तिसंभ्रमु । तेणें निरसे साधनश्रमु । फिटे निःशेष भवभ्रमु । वाचांसी उपरमु इंद्रियां होय ॥५॥
जेथें एक ना दुसरें । सन्मुख ना पाठिमोरें । जेथ सुखही निजसुखामाजी विरे । तें स्वरूप निर्धारें निजशिष्य होती ॥६॥

५५८.काय उणें झाले तुज समर्थासी । ऐसा मजपाशीं कोण दोष? ॥१॥
जो तूं माझा न करिसी अंगीकार । सांगेन वेव्हार संतांमधीं ॥ध्रु॥
तुजविण रत आणिकांचे ठायीं । ऐसें कोण ग्वाही दावीं मज? ॥३॥
तुका म्हणे काय धरूनि गुमान? । सांग उगवून पांडुरंगा! ॥४॥
५५९.काय करूं आन दैवतें । एकाविण पंढरीनाथें ॥१॥
सरिता मिळाली सागरीं । आणिकां नांवा कैंची उरी? ॥ध्रु॥
अनेक दीपिका प्रकाश । सूर्य उगवतां नाश ॥३॥
तुका म्हणे नेणें दुजें । एकाविण पंढरीराजें ॥४॥
५६०.काय करूं कर्माकर्म । बरें सांपडलें वर्म ॥१॥
होसी नामाच सारिखा । समजाविली नाहीं लेखा ॥ध्रु॥
नाहीं वेचावेंच झाला । उरला आहेसी संचला ॥३॥
तुका म्हणे माझें । काय होईल तुम्हां ओझें? ॥४॥
५६१.एकी केली हातोफळी । ठाया बळी पावलें ॥१॥
आम्ही देवा शक्तिहीनें । भाकूं तेणें करुणा ॥ध्रु॥
पावटणी केला काळ । जया बळ होतें तें ॥३॥
तुका म्हणे वीर्यावीर । संत धीर समुद्र ॥४॥
५६२.पुढिलांचे इच्छी फळ । नाहीं बळ तें अंगीं ॥१॥
संत गेले तया ठाया। देवराया पाववीं ॥ध्रु॥
जेष्ठांची कां आम्हां जोडी । परवडी न लभों? ॥३॥
तुका म्हणे करी कोड । पुरवी लाड आमुचा ॥४॥
५६३.कैवल्याच्या तुम्हां घरीं । राशी हरी उदंडा ॥१॥
मजसाठी कां जी वाणी? । नव्हे धणी विभागा? ॥ध्रु॥
सर्वांगुणीं सपुरता । ऐसा पिता असोनि ॥३॥
तुका म्हणे पांडुरंगा! । झालों सांगा सन्मुख ॥४॥
५६४.आपुलाल्या तुम्ही रूपासी समजा । कासया वरजा आरसिया?॥१॥
हे तो नव्हे देहबुद्धीचे कारण। होईल नारायणें दान केलें ॥ध्रु॥
अब्रूचिया बाणे वर्मासि स्पर्शावें । हें तो नाही ठावें मोकलित्या ॥३॥
तुका म्हणे बहु मुख या वचना । ‘सत्याविण जाणा चाली नाहीं’ ॥४॥
५६५.न मनावी चिंता तुम्हीं संतजनीं । हिरा स्फटिक-मणी केंवि होय? ॥१॥
पडिला प्रसंग स्थळा त्या सारिखा । देखिला पारिखा भाव कांहीं ॥ध्रु॥
‘बहुतांसी भय एकाचिया दंडें’ । बहुत या तोंडें वचनासी ॥३॥
तुका म्हणे नाहीं वैखरी बासर । करावया चार वेडे वेडे ॥४॥
५६६.यथाविधि पूजा करी । सामोग्री तों वरी हे नाहीं ॥१॥
आतां माझा सर्व भार । तूं दातार चालविता ॥ध्रु॥
मंगळ तें तुम्ही जाणा । नारायणा काय तें ॥३॥
तुका म्हणे समर्पिला । तुज विठ्ठला देहभाव ॥४॥
५६७.भवसिंधूचे हेचि तारूं । मज विचारू पाहतां ॥१॥
चित्तीं तुझे धरीन पाय । सुख काय तें तेथें? ॥ध्रु॥
माझ्या खुणा मनापाशीं । तें या रसी बुडालें ॥३॥
तुका म्हणे वर्म आलें । हातां भले हें माझ्या ॥४॥
५६८.पाहतां श्रीमुख सुखावलें सुख । डोळियांची भूक न वजे माझ्या ॥१॥
जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस । अमृत जयास फिकें पुढें ॥ध्रु॥
श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध । गेले भेदाभेद निवारोनी॥३॥
महा-मळे मन होतें जें गादलें । शुद्ध चोखाळलें स्फटिक जैसें ॥४॥
तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन । विठ्ठल निधान सांपडलें ॥५॥
५६९.हाचि परमानंद आळंगीन बाहीं । क्षेम देतां ठायीं द्वैत तुटे॥१॥
बोलायासि मात मन निवे हर्षे चित्त । दुणी वाढे प्रीत प्रेमसुख ॥ध्रु॥
जनांत भूषण वैकुंठी सरतां। फावले स्वहिता सर्वभावें ॥३॥
तुटला वेव्हार माया लोकाचार । समूळ संसार पारुषला ॥४॥
तुका म्हणे तो हा विठ्ठलचि व्हावा । आणिक या जीवा चाड नाहीं ॥५॥
५७०.आमुची कृपाळू तूं होसी माउली । विठ्ठले साउली शरणागता ॥१॥
प्रेमपान्हा स्तनीं सदा सर्वकाळ । दृष्टि हे निर्मळ अमृताची ॥ध्रु॥
भूक तहान दु:ख वाटों नेदी शीण । अंतरींचा गुण जाणोनियां ॥३॥
आशा तृष्णा माया चिंता दवडी दुरी । ठाव आम्हां करी खेळावया ॥४॥
तुका म्हणे लावी संतांचा सांगात। तेथें न पवे हात कळिकाळाचा ॥५॥
५७१.जेथे जावें तेथें कपाळ सरिसें । लाभ तो विशेष संतसंगें ॥१॥
पूर्वपुण्यें जरी होतीं सानुकूळ। अंतराय मूळ नुपजे तेथे ॥ध्रु॥
भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा । निकट वास बरा संतांपायीं ॥३॥
तुका म्हणे हेचि करावी मिरासी । बळी संतांपाशी द्यावा जीव ॥४॥
५७२.आतां कांहीं सोस न करी आणीक । धरीन तें एक हेचि दृढ॥१॥
जेणें भवसिंधु उतरिजे पार । तुटे हा दुस्तर गर्भवास ॥ध्रु॥
जोडीन ते आतां देवाचे चरण । अविनाश धन परमार्थ ॥३॥
तुका म्हणे बरा जोडला हा देह । मनुष्यपणे इहलोकां आलों ॥४॥
५७३.जतन करीन जीवें । शुद्ध भावे करूनि ॥१॥
‘विठ्ठल विठ्ठल’ हे धन । जीवन अंतकाळींचें ॥ध्रु॥
वर्दळ हे संचित सारूं । बरवा करूं उदिम हा ॥३॥
तुका म्हणे हृदयपेटीं । ये संपुटीं सांठवूं ॥४॥
५७४.एवढा प्रभू भावें । तेणें संपुष्टी रहावें ॥१॥
होय भक्ती केला तैसा । पुरवी धरावी ते इच्छा ॥ध्रु॥
एवढा जगदानी । मागे तुळसीदळ पाणी ॥३॥
आला नांवारूपा । तुका म्हणे झाला सोपा ॥४॥
५७५.भाग्यें ऐसी झाली जोडी । आतां घडी न विसंबें ॥१॥
विटेवरी समचरण । संतीं खूण सांगितली ॥ध्रु॥
अवघे आतां काम सारूं । हाचि करूं कैवाड ॥३॥
तुका म्हणे खंडू खेपा । पुढे पापापुण्याच्या ॥४॥
५७६.पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण । आम्हां नारायण तैशापरी ॥१॥
सर्वभावें लोभ्या आवडे हे धन । आम्हां नारायण तैशापरी ॥२॥
तुका म्हणे एकविध झाले मन । विठ्ठलावांचून नेणे दुजे ॥३॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top