दिवस – ८४. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

अर्जुन उवाच
किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम ।
अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते ॥१॥
मग
१. (अर्जुन उवाच-)
, अर्जुने म्हणितलें । हां हों, जी, अवधारिलें ? । जें म्यां पुसिलें । तें निरूपिजो ॥१॥
सांगा, “कवण तें ब्रह्म । कायसया
१. (किं तद्ब्रह्मेति) कशाला
नाम कर्म ? । अथवा अध्यात्म । काय म्हणिपे? ॥२॥
अधिभूत
१. (अधिभूतमिति)
तें कैसें ? । एथ अधिदैव तें कवण असे ? । हें, उघड, मी परियेसें । ऐसें बोला ॥३॥
अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन्मधुसूदन ।
प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः ॥२॥
देवा
१. (अधियज्ञ इति)
, अधियज्ञ तो काई ? । कवण पां इये देहीं? । हें अनुमानासि कांहीं । दिठीं न भरे
२. डोळ्यात भरत नाहीं, लक्ष्यांत येत नाही
॥४॥
आणि
१. (प्रयाणकाले इति)
नियता
२. नियमित
अंतःकरणीं । तूं जाणिजसी
३. समजला जाशील
देह-प्रयाणीं
४. अंतकाळीं
। तें कैसेनि हे शार्ङ्गपाणी । परिसवा मातें” ॥५॥
देखा
१. (चूर्णिका)
, धवळारीं चिंतामणीचा
२. इच्छिलेलें देणाऱ्या चिंतामण्याच्या मंदिरांत
। जरी पहुडला
३. निजला
होय दैवाचा । तरी वोसणतांही
४. झोंपेंत बरळतां
बोलु तयाचा । सोपु न वचे
५. व्यर्थ जात नाही
॥६॥
तैसें अर्जुनाचिया बोलासवें । आलें तेंचि म्हणितलें देवें । “तें परियेसें गा बरवें । जे पुसिलें तुवां” ॥७॥
किरीटी कामधेनुचा पाडा
१. खोंड, गोऱ्हा
। वरी कल्पतरूचा आहे मांदोडा
२. मंडप
। म्हणौनि मनोरथसिद्धीचिया चाडा । तो नवल नोहे ॥८॥
श्रीकृष्ण कोपोनि ज्यासी मारी । तो पावे परब्रह्मसाक्षात्कारीं । मा कृपेनें उपदेशु करी । तो कैशापरी न पवेल ? ॥९॥
जैं कृष्णाचिया होइजे आपण । तैं कृष्ण होय आपुलें अंतःकरण । तेधवा संकल्पाचें आंगण । वोळगती
१. राबतात, सेवा करतात
सिद्धी ॥१०॥
परि ऐसें जें प्रेम । तें अर्जुनींचि आथि निस्सीम । म्हणौनि तयाचें काम
१. इच्छा
। सदा सफळ ॥११॥
या कारणें श्रीअनंतें । तें मनोगत तयाचें पुसतें -। होईल; जाणोनि, आइतें
१. वाढून
। वोगरूनि ठेविलें ॥१२॥
जें अपत्य थानीहुनि निगे
१. जें बालक स्तनपान करीत असतें; ते जर दूर झाले
। तयाची भूक ते मायेसीचि लागे । एहवीं तें शब्दें काय सांगे । मग स्तन्य
२. दूध
दे येरी
३. ती-आई
? ॥१३॥
म्हणौनि कृपाळुवा गुरुचिया ठायीं । हें नवल नोहे कांहीं । परि तें असो; आइका, काई । जें देव बोलते जाहले ॥१४॥
श्रीभगवानुवाच
अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते ।
भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः ॥३॥
मग
१. (श्रीभगवानुवाच-अक्षरं)
म्हणितलें सर्वेश्वरें । ‘जें आकारीं इयें खोंकरें
२. मोडकें=भोकांचे शरीर = छिद्रांनी युक्त
कोंदलें
३. दाट भरलेलें
असत; न खिरे
४. गळत नाहीं, नष्ट होत नाही
। कवणे काळीं ॥१५॥
एहवीं
१. (ब्रह्म परमं)
, सपूरपण
२. बारीकपण, सूक्ष्मता
तयाचें पहावें । तरी शून्यचि नव्हे स्वभावें । वरि गगनाचेनि पालवें
३. पदरानें
। गाळूनि घेतलें ॥१६॥
जें ऐसेंही
१. अशा रीतीनें
, परि विरुळें
२. विरळ, सूक्ष्म
। इये विज्ञानाचिये
३. प्रपंचाच्या, बुद्धीच्या
खोळे
४. झोळींत
-। हालवलेंहि; न गळे
५. जाणण्याचा प्रयत्न केला असता विषय होत नाही
। तें परब्रह्म ॥१७॥
आणि
१. (स्वभावोऽध्यात्ममुच्यते)
आकाराचेनि जालेपणें
२. जन्मलेपणें, आकाराची उत्पत्ति झाली असता
। जन्मधर्मातें नेणें । आकारलोपीं
३. आकाराच्या नाशानंतर
निमणे
४. नाश पावणें, मरणें
। नाहीं कहीं ॥१८॥
ऐशिया आपुलियाचि सहज स्थिती । जया ब्रह्माची नित्यता
१. असणारी
असती। तया नाम सुभद्रापती
२. अर्जुना
। अध्यात्म गा ॥१९॥
मग
१. (भूतभावोद्भवकरो)
गगनीं जेवीं निर्मळें
२. निरभ्र
। नेणों, कैचीं, एके वेळे । उठती घनपटळें
३. गडद ढगांचा पडदा
। नानावर्णं ॥२०॥
तैसें अमूर्तीं
१. निराकार शुद्ध ब्रह्मांत
तिये विशुद्धं । महदादि
२. प्रकृति अहंकारादिकांच्या
भूतभेदें । ब्रह्मांडाचे बाधे
३. आकार
। होंचि लागती ॥२१॥
पैं निर्विकल्पाचिये
१. कल्पनातीत शुद्ध ब्रह्माच्या
बरडीं
२. माळरान जमिनींत
। फुटे आदिसंकल्पाची विरूढी
३. अंकुर, वाढ
। आणि तें सवेंचि मोडोनि
४. भरून लवतात, बहरून येतात
ये ढोंढी
५. धोंडे (आकार)
। ब्रह्मगोळकांच्या ॥२२॥
तया एकैकाचे भीततरीं
१. आंत पाहावें तो
पाहिजे । तंव बीजाचाची भरिला
२. भरलेला
देखिजे । माजीं होतिया जातिया, नेणिजे । लेख
३. गणना
जीवा
४. जीवाच्याने स्वतः
॥२३॥
मग
१. (विसर्गः)
तया ब्रह्मगोळकांचें अंशांश । प्रसवती आदिसंकल्प असमसहास
२. असंख्यात
। हें असो; ऐसी बहुवस । सृष्टी वाढे ॥२४॥
परि दुजेनविण एकला । परब्रह्मचि, संचला । अनेकत्वाचा आला । पूर जैसा ॥२५॥
तैसें समविषमत्व नेणों, कैचें । वायांचि चराचर रचे । पाहतां प्रसवतिया योनीचे । लक्ष
१. उत्पन्न होणाऱ्या लाखो जाती दिसतात
दिसती ! ॥२६॥
येरी
१. (कर्मसंज्ञितः)
जीवभावाचिये पालविये
२. अंकुर
। कांहीं मर्यादा करूं नये । पाहिजे-कवण हें आघवें विये ? । तंव मूळ तें शून्य
३. अव्यक्त, माया
! ॥२७॥
म्हणौनि, कर्ता मुदल न दिसे । आणि सेखीं
१. शेवटीं
कारणही कांहीं नसे । माजीं कार्यचि आपैसें । वाढों लागे ॥२८॥
ऐसा करितेनविण
१. करणारावांचून
गोचरु । अव्यक्तीं हा आकारु -। निपजे जो व्यापारु । तया नाम ‘कर्म’ ॥२९॥

अणुभ्यश्च महद्भ्यश्च, शास्त्रेभ्यः कुशलो नरः ।
सर्वतः सारमादद्यात्पुष्पेभ्य इव षट्पदः ॥१०॥
श्लोकार्थ – निरनिराळ्या पुष्पांतून भ्रमर ज्याप्रमाणे मध काढून घेतो, त्याप्रमाणे चतुर पुरुषाने लहान किंवा मोठ्या सर्व शास्त्रांतून सर्व प्रकाराने सार ग्रहण करावे. ॥१०॥
अतिलहान सुमन जें कांहीं । भ्रमरा तेथ उपेक्षा नाहीं ।
रिघोनि त्याच्याही ठायीं । आमोद पाहीं सेवितु ॥९८॥
थोराथोरा
१. (पा.भे. थोरथोरा)
ज्या कमळिणी । विकासल्या समर्थपणीं ।
त्यांच्याही ठायीं रिघोनी । सारांश
२. सारभूत भाग
सेवुनी जातसे ॥९९॥
तैसाचि योगिया नेटकु
१. सुव्यवस्थित
। शास्त्रदृष्टी अतिविवेकु ।
न करी लहान थोर तर्कु । सारग्राहकु होतसे ॥१००॥
वेदांती ब्रह्मस्थिती । बोलिली मानी यथानिगुतीं
१. यथार्थपणे, जसे आहे तसे

इतर स्तोत्री ब्रह्मव्युत्पत्ती
२. परमात्म्यासंबंधी प्रक्रिया
। तेही अतिप्रीती मानितु ॥१०१॥
पंडितांचे वचन मानी । साधारणु बोलिला हितवचनीं ।
तेंही अतिआदरें मानूनी । सार निवडूनि घेतसे ॥१०२॥
प्रीति होआवी पतीच्या मानसीं । कुळवधू मानी सासुसासऱ्यांसी ।
मान देतसे त्यांच्या दासासी । तेचि प्रीतीसी लक्षूनि ॥१०३॥
भेसळल्या क्षीरनीरासी । निवडुनि घेइजे राजहंसीं ।
तैसा विवेकयुक्त मानसीं । सारभागासी घेतसे ॥१०४॥
सर्वभूती भगवद्भावो । हा सारभागु मुख्य पहा हो ।
हे निष्ठा ज्यासि महाबाहो
१. यदुराजा!
। त्यासी अपावो
२. प्रतिबंध, बाधा
स्वप्नीं नाहीं ॥१०५॥
भरलेया जगाआंतु । सारभागी तो योगयुक्तु ।
यदूसि अवधूत सांगतु । गुरुवृत्तांतु
१. गुरुंचा इतिहास
लक्षणें ॥१०६॥
गुरुत्वें म्यां मानिली ‘माशी’ । ऐक राया दो प्रकारेंसी ।
एक ते मोहळमासी
१. मधमाशी
। ग्रामवासी दूसरी ॥१०७॥
सायन्तनं श्वस्तनं वा, न सङ्गृह्णीत भिक्षितम् ।
पाणिपात्रोदरामत्रो, मक्षिकेव न सङ्ग्रही ॥११॥
श्लोकार्थ – भिक्षा मागून आणलेले धान्य वा अन्न संध्याकाळकरिता अथवा दुसऱ्या दिवसाकरिता संग्रह करून ठेवू नये. मधुमक्षिकेप्रमाणे संग्रह करू नये. पोटापुरतीच भिक्षा ग्रहण करावी. ॥११॥
पहा पां घरींची माशी । बैसल्या साखरेचे राशीं ।
हाती धरोनि घाली मुखाशी । संग्रहो तिसी पैं नाहीं ॥१०८॥
हे होईल सायंकाळा । हे भक्षीन प्रातःकाळां ।
ऐसा संग्रहो वेगळा । नाहीं केला मक्षिका
१. माशीने
॥१०९॥
तैशी योगसंन्यासगती । प्राप्तभिक्षा घेऊनि हातीं ।
तिसी निक्षेपु
१. घालतो
मुखाप्रती । संग्रहस्थिति त्या नाहीं ॥११०॥
भिक्षेलागी पाणिपात्र
१. हाताचे पात्र
। सांठवण उदरमात्र
२. केवळ पोट

या वेगळे स्वतंत्र । नाहीं घरपात्र
३. घर किंवा भांडे
सांठवणें ॥१११॥
सायन्तनं श्वस्तनं वा, न सङ्गृह्णीत भिक्षुकः ।
मक्षिका इव सङ्गृह्णन्, सह तेन विनश्यति ॥१२॥
श्लोकार्थ – मुनीने संध्याकाळकरिता किंवा दुसऱ्या दिवसाकरिता अन्नाचा संग्रह करू नये. संग्रह केला असता मधमाशीप्रमाणे त्या संग्रहासकट त्याचा नाश होतो. ॥१२॥
सायंकाळ-प्रातःकाळासी । भक्ष्यसंग्रहो नसावा भिक्षूसी ।
संग्रहें पावती नाशासी । येविषीं ‘मधुमाशी’ गुरु केली ॥११२॥
रिघोनि नाना संकटस्थानांसी । मधुसंग्रहो करी मधुमाशी ।
तो संग्रहोचि करी घातासी । मधु न्यावयासी जैं येती ॥११३॥
संग्रहो यत्नाचिया
१. मोठ्या कष्टाने
चाडा । मोहळ
२. पोळे
बांधिती अवघडां
३. अवघड ठिकाणी
कडां ।
ते दुर्गमी
४. प्रवेश
रिगू करिती गाढा
५. कष्टाने
। अर्थ-चाडा मधुहर्ते
६. मध हरण करणारे लोक
॥११४॥
कां झाडितां मोहळासी । नाशु होतसे मासियांसी ।
संग्रहाची जाती ऐशी । जीवघातासी करवितु ॥११५॥
ऐसें देखोनिया जनीं । भक्त-भिक्षु
१. (पा.भे. भक्त-भिक्षुक)
-योगी-सज्जनीं ।
संग्रहो न करावा भरंवसेनी । नाशु निदानी
२. परिणामी
दिसतुसे ॥११६॥
आचरावें सत्कर्म । संग्रहावा शुद्ध धर्म ।
हेचि नेणोनियां वर्म । धनकामें अधम
१. नीच
नाशती ॥११७॥
मदगजाची गुरुलक्षणे (११८ ते १४३)
अर्थ विनाशाचें फळ । दुसरें एक नाशाचें मूळ ।
विशेष नाशाचें आहळबाहळ
१. संपूर्ण, पुरेपूर
। स्त्री केवळ वोळख पां ॥११८॥
मूळ नाशासि जीविता । कनक आणि योषिता ।
जंव जंव यांची आसक्तता । तंव तंव चढता भवरोगु ॥११९॥
कनक
१. सुवर्ण
आणि कामिनी
२. स्त्री
। ज्यासी नावडे मनींहुनी ।
तोचि जनार्दनु
३. (पा.भे. जनार्दनी, जनार्दूनी)
जनीं । भरंवसेंनी
४. निश्चित
ओळख पां ॥१२०॥
जो सुख इच्छील आपणासी । तेणें नातळावें
१. स्पर्श करू नये
स्त्रियेसी ।
येचिविषयीं ‘मदगजासी
२. मदोन्मत्त हत्तीला
’ । गुरु विशेषीं म्यां केला ॥१२१॥
पदाऽपि युवतीं भिक्षुर्न स्पृशेद्दारवीमपि ।
स्पृशन्करीव बद्ध्येत, करिण्या अङ्गसङ्गतः ॥१३॥
श्लोकार्थ – भिक्षूने स्त्रीला, मग ती लाकडात कोरलेली बाहुली असली तरी, पायानेसुद्धा स्पर्श करू नये. स्पर्श केला असता ज्याप्रमाणे हत्तिणीशी अंगसंग करून हत्ती वेडा होतो आणि खड्डयात पडतो त्याप्रमाणे त्याची स्थिती होते. ॥१३॥
पहा पां षष्टिहायन
१. वयाच्या साठ वर्षाच्या
भद्रजाती
२. हत्तीला
। त्यांपुढे मनुष्य ते किती? ।
ते हस्तिणीचे अंगसंगतीं । बंधन पावती मनुजांचें
३. मनुष्याच्या
॥१२२॥
जो दृष्टी नाणी मनुष्यांसी । तो स्त्रियां वश केला मानवांसी ।
त्यांचेनि बोलें उठी बैसी
१. (पा.भे. बैशी)
। माथा अंकुशी मारिजे ॥१२३॥
एवं जिणावया संसारासी । जे स्वधर्मनिष्ठ संन्यासी ।
तिहीं देखोनि योषितांसी । लागवेगेंसी
१. तातडीने
पळावें ॥१२४॥
नको स्त्रियांची भेटी । नको स्त्रियांसी गोष्टी ।
स्त्री देखतांचि दिठीं । उठाउठी
१. सत्वर, त्वरित
पळावें ॥१२५॥
पळता पळतां पायांतळीं । आल्या काष्ठाची पुतळी ।
तेही नातळावी कुशळीं
१. शहाण्या माणसाने
। निर्जीव स्त्री छळी पुरुषातें ॥१२६॥
अनिरुद्धे
१. कुष्णपुत्राने
स्वप्नीं देखिली उखा
२. बाणासुराची कन्या
। तो धरूनि नेला चित्ररेखा
३. चित्रे काढण्यास हुशार असलेली दासी

बाणासुरें बांधिला देखा । कृष्ण सखा जयाचा ॥१२७॥
त्यासी सोडवणेलागी हरी । धांवतां आडवा आला कामारी
१. मदनाचा शत्रू भगवान शंकर

युद्ध जाहलें परस्परीं । शस्त्रास्त्री दारुण
२. घनघोर
॥१२८॥
एवं हरिहरां भिडतां । जो बांधला स्वप्नींचिया कांता ।
तो सहसा न सुटेची सोडवितां
१. (पा.भे. शोचिता)
। इतरांची कथा कायसी?॥१२९॥
पहा पां स्वप्नींचिया कांता । अनिरुद्धासी केली निरुद्धता
१. बंधन

मा साचचि स्त्री हाती धरितां । निर्गमता
२. सुटका
त्या कैंची?॥१३०॥
‘पुरुष’ आपणया म्हणविती । सेखी स्त्रियांचे पाय धरिती ।
त्यांसी कैसेनि होईल मुक्ती?। स्त्रीसंगतीं अधःपात ॥१३१॥
नाऽधिगच्छेत्स्त्रियं प्राज्ञः, कर्हिचिन्मृत्युमात्मनः ।
बलाधिकैः स हन्येत, गजैरन्यैर्गजो यथा ॥१४॥
श्लोकार्थ – बुद्धिवान साधकाने कधीही स्त्रीशी संबंध ठेवू नये. स्त्रीसंग म्हणजे साक्षात् मृत्यूच समजावा. हत्तिणींबरोबर क्रीडा करण्याविषयी युद्ध होऊन बलवान हत्तीलाही इतर हत्ती जमावाने ठार मारतात. (तात्पर्य स्त्रीसंगती नाशाला कारण होते.) ॥१४॥
क्रीडतां गजीमाजी गजपती । त्यावरी सबळ
१. बलवान्
भद्रजाती ।
येऊनियां युद्ध करिती । निजबळे मारिती तयातें ॥१३२॥
तो मारोनियां हस्ती । त्या हस्तिणी समस्ती ।
सबळ भोगी भद्रजाती । नाशाप्रती स्त्री मूळ ॥१३३॥
अहल्येचिया संगतीं । गौतमें विटंबिला अमरपती
१. इंद्र

भस्मासुरासी नाशप्राप्ती । स्त्रीसंगतीस्तव जाली ॥१३४॥
देखोनि तिलोत्तमा उत्तम वधू
१. स्त्री
। सुंद उपसुंद सखे बंधु ।
स्त्रीअभिलाषे चालिला क्रोधु । सुहृदसंबंधू विसरले ॥१३५॥
मग स्त्रीविरहें युद्धाचे ठायीं । दोघे निमाले येरयेरांचे घायीं ।
शेखीं स्त्रीभोगुही नाहीं । मरणमूळ पाहीं योषिता ॥१३६॥
ऐसीच पूर्वकल्पींची
१. द्वापार युगातील
कथा । अवतारी श्रीकृष्ण नांदतां ।
तेणें शिशुपाळ गांजोनि
२. पराभूत करून
सर्वथा । हिरोनि कांता पैं नेली ॥१३७॥
एवं सुरनरपशुंप्रती । नाशासी मूळ स्त्रीसंगती ।
तिचेनि संगें गृहासक्ती । कलहप्राप्ती स्त्रीमूळ ॥१३८॥
ग्राम्य स्त्रियांचे संगतीं जाणे । तो बैसला मरणाधरणे ।
मरण आल्याही न करणें । जीवेंप्राणे स्त्रीसंगु ॥१३९॥
वेश्येचे संगतीं जातां । बळाधिक्य
१. अधिक बळ
करी घाता ।
निरंतर स्वपत्नी भोगितां । नाहीं बाधकता हे न म्हण ॥१४०॥
अविश्रम स्त्री सेवितां । कामु पावे उन्मत्तता ।
उन्मत्त कामें सर्वथा । अधःपाता नेइजे ॥१४१॥
एवं हा ठावोवरी
१. शेवटपर्यंत
। स्त्रीसंग कठिण भारी ।
क्वचित्संगु जाहल्यावरी । नरकद्वारी घालील ॥१४२॥
नरकी घालील हे वार्ता । उद्धाराची कायसी कथा?।
नरकरूप ग्राम्य योषिता । पाहें सर्वथा निर्धारें ॥१४३॥
अर्थसंग्रहाची बाधकता (१४४ ते १५७)
स्त्री आणि दुसरा अर्थु । हाचि ये लोकी घोर अनर्थु ।
येणें अंतरला निजस्वार्थु । शेखी करी घातु प्राणाचा ॥१४४॥
न देयं नोपभोग्यं च, लुब्धैर्यद्दुःखसञ्चितम् ।
भुङ्क्ते तदपि तच्चान्यो, मधुहेवार्थविन्मधु ॥१५॥
श्लोकार्थ – कष्ट करून संग्रह केलेले धन लोभी माणूस कोणाला देत नाही किंवा तो त्याचा स्वत: उपभोगही घेत नाही, तर ज्याप्रमाणे मधमाश्यांनी जमविलेला मध कोणीतरी चाणाक्ष माणूस हरण करतो त्याप्रमाणे ते धन दुसराच कोणीतरी उपभोगतो.॥१५॥
स्वयें खाये ना धर्मु न करी । घरच्यांसी खाऊं नेदी दरिद्री ।
मधुमक्षिकेच्या परी । संग्रहो करी कष्टोनि ॥१४५॥
माशा मोहळ बांधिती बळें
१. सामर्थ्याने
। माजीं सांचले मधाचे गोळे ।
तें देखोनि जगाचे डोळे । उपायबळे घेवों पाहाती ॥१४६॥
मग झाडींखोडी अरडींदरडीं । जेथिंच्या तेथ जगु झोडी ।
भरती मधाचिया कावडी । ते सेविती गोडी श्रीमंत ॥१४७॥
माशा मधु न खाती काकुळतीं
१. बिचाऱ्या
। झाडित्याचे हात माखती ।
स्वादु श्रीमंत सेविती । ज्यांसी लक्ष्मीपती प्रसन्न ॥१४८॥
तैसेंचि कृपणाचें यक्षधन
१. संचित द्रव्य
। नाहीं दान धर्मसंरक्षण ।
त्यातें तस्कर
२. चोर
नेती मारून । त्यांसही दंडून राजा ने ॥१४९॥
जे शिणोनि संग्रह करिती । त्यांसी नव्हे भोगप्राप्ती ।
ते द्रव्ये अपरिग्रही सेविती । दैवगती विचित्र ॥१५०॥
प्रयासें गृहस्थ करवी अन्न । तें संन्यासी न शिणतां जाण ।
करूनि जाय भोजन । अदृष्ट
१. पूर्वकर्म
प्रमाण ये अर्थी ॥१५१॥
यालागीं दैवाधीन जो राहे । तो संग्रहाची चाड न वाहे ।
तें अदृष्टचि साह्य आहे । कृपणता वायें
१. उगाच, व्यर्थ
करिताति ॥१५२॥

१३३२. शीतळ तें शीतळाहुनी । पायवणी
१. चरणतीर्थ
चरणींचें ॥१॥ सेवन हे शिरसा धरीं । अंतरी ही वरदळा
२. घालविणे, नाहीसे करणे
॥ध्रु॥ अवघेचि नासी पाप । तीर्थ बाप
३. माझ्या बापाचे-हरीचे
माझ्याचे ॥३॥ बैसोनिया तुका तळीं
४. चरणतीर्थरूपी गंगेचा तळ-बूड
। त्या कल्लोळी
५. लाटांनी
डौरला
६. शोभणे, सजणे
॥४॥
१३३३. गोदेकाठी होता आड
१. लहान विहिर
। करूनि कोड कवतुकें
२. स्तुती, प्रशंसा
॥१॥ देखण्यांनी
३. शहाण्या डोळस मनुष्यांनी (पा.भे. देखण्यानें)
एक केलें । आइत्या
४. प्रयत्नावाचून पूर्वीच उपलब्ध, सिद्ध असलेले
नेलें जीवनापें
५. पाण्याजवळ (गोदावरीच्या)
॥ध्रु॥ राखोनियां
६. रक्षण करून (संसाराचे)
होतो ठाव । अल्प
७. परिच्छिन्न (वैषयिक सुख)
जीव लावूनि ॥३॥ तुका म्हणे फिटे धणी
८. इच्छापूर्ती होणे, तृप्ती होणे
। हे सज्जनीं विश्रांति ॥४॥
१३३४. न पाहें माघारें आतां परतोनि । संसारापासूनि विटला
१. उबगला, कंटाळा आला
जीव ॥१॥ सामोरा येऊनि कवळी
२. आलिंगन दे
दातारा! । काळाचा हाकारा
३. दरारा, भयंकर हाक
न साहावे ॥ध्रु॥ सावधान चित्त होईल आधारें
४. (तुझ्या) आश्रयाने
। खेळतांही बरे वाटईल ॥३॥ तुका म्हणे कंठ दाटला
५. गहिवरून येणे
या सोसें
६. ध्यास
। न पवेचि कैसे जवळी हे? ॥४॥
१३३५. मथनीचे
१. घुसळण करून काढलेले
नवनीत
२. लोणी
। सर्व हितकारक ॥१॥ दंड-वत
३. साष्टांग नमस्कार
दंडापरी
४. काठीप्रमाणे
। मागे उरी
५. शेष
नुरावी ॥ध्रु॥ वचनाचा
६. बोलणे
तो पसरु काई । तांतडी
७. त्वरा, घाई
डोई पाशीच
८. डोके पायावर ठेवण्याचीच
॥३॥ तुका म्हणे जगजेठी । लावी कंठी
९. (वा.) गळ्याशी लाव, आलिंगन दे
उचलूनि ॥४॥
१३३६. अवचिताचि
१. अचानक, अकस्मात्
हाती
२. स्वाधीन करणे
ठेवा । दिला, सेवा न करितां ॥१॥ भाग्य फळले
३. सफल होणे
झाली भेटी । नेघे तुटी
४. वियोग, अंतर, दुरावा
यावरी ॥ध्रु॥ दैन्य
५. दारिद्र्य
गेलें हरली चिंता । सदैव
६. भाग्यवान्
आतां यावरी ॥३॥ तुका म्हणे वांटा
७. हिस्सा
झाला । बोलों बोला
८. शब्दांनी (गोड)
देवासी ॥४॥
१३३७. समर्थाची धरिली कास
१. (वा.) आधार घेतला
। आतां नाश काशाचा? ॥१॥ ‘धांवे पावें’ करीन लाहो
२. हट्ट
। तुमचा अहो विठ्ठला! ॥ध्रु॥ न लगे मज पाहाणे दिशा । हाकेसरिसा ओढसी ॥३॥ तुका म्हणे नव्हे धीर
३. (वा.) दम न निघणे, अतिशय आतुर होणे
। तुम्हां स्थिर
४. शांत
दयेनें ॥४॥
१३३८. करूं तैसें पाठांतर
१. मुखोद्गत
करुणाकर
२. कृपा, दया उत्पन्न करणारे (असे)
भाषण ॥१॥ जिहीं केला मूर्तिमंत
३. प्रत्यक्ष, साक्षात्
। ऐसा संतप्रसाद ॥ध्रु॥ सोज्वळ
४. स्वच्छ, निर्मळ
केल्या वाटा । आइत्या
५. सिद्ध असलेल्या
नीटा
६. सरळ, चांगल्या
मागीलां
७. पूर्वीच्या
॥३॥ तुका म्हणे घेऊं धांवा । करूं हावां
८. तीव्र लालसा, हव्यास
तें जोडी
९. लाभ
॥४॥
१३३९. अचळ
१. स्थिर
चळे
२. च्युत न होणे, न ढळणे
ऐसें झालें मन । धरूनि निज-खूण राहिलों तें ॥१॥ आवडी बैसली गुणांची अंतरीं
३. अंतःकरणात
। करूं धणीवरी
४. तृप्ती होईपर्यंत, पोटभर
सेवन तें ॥ध्रु॥ एकविध
५. एकनिष्ठ
भाव नव्हे अभावना
६. भावहीनता
। आणिक या गुणां न मिळवे ॥३॥ तुका म्हणे माझें पडिलें आहारी
७. (वा.) स्वाधीन झाले, सवय पडणे
। ध्यान विटेवरी ठाकलें
८. उभे राहिले
तें ॥४॥
१३४०. वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा
१. चित्ताला
। आणीक मी देवा कांहीं नेणें ॥१॥ गायें नाचे उडे
२. उड्या मारतो
आपुलियां छंदें
३. नादात
। मनाच्या आनंदें आवडीने ॥ध्रु॥ लाज भय शंका दुराविला मान । न कळे साधन यापरतें ॥३॥ तुका म्हणे आतां आपुल्या सायासें
४. प्रयत्नाने
। आम्हा जगदिशें सांभाळावें ॥४॥
१३४१. शरण शरण वाणी । शरण त्रिवाचा
१. त्रिवार, तीन वेळा उच्चारलेले निश्चित-ठाम वचन.
विनवणी ॥१॥ स्तुति न पुरे
२. पूर्ण होत नाही
हे वाचा । सत्य दास मी दासांचा ॥ध्रु॥ देह न सांभाळून
३. पर्वा
। पायांवरी लोटांगण ॥३॥ विनवी तुका संतां दीन । नोहें गौरवीं उत्तीर्ण ॥४॥
१३४२. लेकरा लेववी
१. परिधान करते, घालते
माता अळंकार । नाहीं अंत पार आवडीसी ॥१॥ कृपेचें पोसणे
२. सांभाळणे, आश्रय देणे
तुमचे मी दीन । आजि संतजन मायबाप ॥ध्रु॥ आरुषा
३. वेडेवाकडे, बोबडे, असंबद्ध
उत्तरीं संतोषे माउली । कवळूनि
४. आलिंगन देऊन
घाली हृदयांत
५. (वा.) अपराध पोटात घालते, माफ करते
॥३॥ पोटा आले त्याचे नेणे गुणदोष । कल्याणचि आस असावी हे ॥४॥ मनाची ते चाली
६. धाव, प्रवृत्ती
मोहाचिये सोई
७. आश्रयाने
ओघ
८. प्रवाह
गंगा काई परतों जाणे? ॥५॥ तुका म्हणे कोठे उदार मेघां शक्ति । माझी तृषा किती चातकाची? ॥६॥
१३४३. युक्ति
१. चातुर्य
तंव झाल्या कुंठित सकळा । उरली हे कळा
२. भाग
जीवनाची ॥१॥ संतचरणीं भावें ठेविलें मस्तक । जोडोनि हस्तक राहिलोंसें ॥ध्रु॥ जाणपणे नेणें कांहींच प्रकार । साक्षी तें अंतर अंतरासी
३. मनाला
॥३॥ तुका म्हणे तुम्हीं केलें अभयदान
४. सुरक्षितपणाबद्दल दिलेले वचन
। तेणें समाधाने
५. (पा.भे. समाधान)
राहिलोसे ॥४॥
१३४४. हा
१. हा बघ!
गे आलों’ कोणी म्हणे बुडतिया । तेणें किती तया बळ चढे
२. (वा.) धीर येतो, दम धरणे, शक्ति मिळते, यत्न करण्यास तयार होतो
॥१॥ तुम्हीं तंव भार घेतला सकळ । आश्वासिलों
३. धीर दिला
बाळ अभयकरें
४. ‘भीऊ नको’ अशा हस्त चिन्हाने
॥ध्रु॥ भुकेलिया आस दावितां, निर्धार
५. खात्री, निश्चय
। किती होय धीर समाधान ॥३॥ तुका म्हणे दिली चिंतामणीसाठीं । उचित कांचवटी
६. काचेचा तुकडा
दंडवत ॥४॥
१३४५. कैसा तूं देखिला होसील गोपाळीं
१. गोप-बालकांनी
। पुण्यवंतां डोळी, नारायणा! ॥१॥ तेणें लोभें जीव झालासे बराडी
२. वेडापिसा, हावरा
। आम्ही ऐसी जोडी
३. लाभ
कई लाभों? ॥ध्रु॥ असेल तें कैसें दर्शनाचे सुख । अनुभवें श्रीमुख अनुभवितां
४. अनुभव घेणारे
॥३॥ तुका म्हणे वाटे देसी आळिंगन । अवस्था
५. स्थिती, उत्कंठा
ते क्षणक्षणा होते ॥४॥
१३४६. कासया या लोभें केलें आर्तभूत
१. उत्कंठित, आतुर
? । सांगा माझें चित्त नारायणा! ॥१॥ चातकाचे परी एकचि निर्धार
२. निश्चय
लक्षभेदी
३. लक्ष्याचे भेदन करणारा
तीर
४. बाण
फिरों नेणें ॥ध्रु॥ सांवळे रूपडें
५. गोजिरवाणे, सुंदर रूप
चतुर्भुज मूर्ति । कृष्णनाम चित्तीं संकल्प
६. इच्छा
हा ॥३॥ तुका म्हणे करीं आवडीसी ठाव
७. आश्रय
। नको माझा भाव
८. श्रद्धा
भंगों देऊं ॥४॥
१३४७. काय माझा पण
१. प्रतिज्ञा
होईल लटिका
२. खोटा
? । ब्रिदावळी
३. ‘पतित-पावन’ इ. विशेषणांची मालिका
लोकां दाविली ते ॥१॥ खरी करूनियां देईं माझी आळी
४. हट्ट
। येऊनि कुरवाळी
५. प्रेमाने शरीरावरून हात फिरव
पांडुरंगें ॥ध्रु॥ आणीक म्यां कोणा म्हणवावें हातीं
६. स्वाधीन, आश्रित
? । नये काकुलती
७. दया
दुजियासी ॥३॥ तुका म्हणे मज येथेंचि ओळखी । होईन तो सुखी पायांनीच ॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

1 thought on “दिवस – ८४. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top