दिवस – ८३. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

ऐसें वरचिलीचि बरवा१
१. बाह्य सौंदर्यानें
। सुख जावों लागलें फावा२
२. आनंद वाढू लागला
। तंव रसस्वादाचिया हांवा३
३. इच्छा
। लाहो४
४. अति त्वरा
केला ॥१९१॥
झडकरी अनुमानाचेनि करतळें । घेऊनि तियें वाक्य फळें । प्रतीतिमुखीं एके वेळे । घालूं पाहे ॥१९२॥
तंव विचाराचिया रसना न दाटती१
१. दडपत नाहींत
। परी हेतूच्या दशनीं२
२. दातांनीं
न फुटती । ऐसें जाणौनि, सुभद्रापती । चुंबिचिना३
३. ओंठास लावीना
! ॥१९३॥
मग, चमत्कारला, म्हणे । “इयें जळींचीं मां तारांगणें । कैसा झकविलों१
१. फसलों
असलगपणें२
२. सुगमपणानें
। अक्षरांचेनि ॥१९४॥
इयें पर्दे नव्हती; फुडिया१
१. खरोखर, स्पष्ट
। गगनाचिया घडिया ! । येथ आमुची मति बुडालिया२
२. बुडाली
। थावो३
३. अंत, थांग
न निघे ॥१९५॥
वांचूनि, जाणावयाची कें१
१. कोठें
गोठी?”। ऐसें जीवीं कल्पूनि किरीटी । तिया पुनरपि केली दृष्टी । यादवेंद्रा ॥१९६॥
मग विनविलें सुभटें । “हां हो जी, ये एकवाटे१
१. एकत्र
। सातही पदें अनुच्छिष्टें२
२. एकसारखी कधीही न ऐकलेली
। नवलें आहाती ॥१९७॥
एहवीं, अवधानाचेनि वहिलेपणें१
१. दूर राहण्याने, अभावाने, लक्ष्य न दिल्याने
। नाना प्रमेयांचें उगाणें२
२. अनुभव, हिशेब
। काय श्रवणाचेनि आंगवणें३
३. बळानें
। बोलों लाहाती४
४. बोलतां येणार नाहींत
? ॥१९८॥
परी तैसें हैं नोहेचि देवा । देखिला अक्षरांचा मेळावा१
१. जमाव
। आणि विस्मयाचिया जीवा । विस्मयो जाला ॥१९९॥
कानाचेनि गवाक्षद्वारें१
१. झरोक्यांतून
। बोलाचे रश्मी२
२. किरण
अभ्यंतरें -। पाहेना, तंव चमत्कारें । अवधान ठकलें३
३. कुंठित झाले, चकित झाले
॥२००॥
तेवींचि अर्थाची चाड मज आहे । तें सांगतांही वेळु न साहे । म्हणौनि, निरूपण लवलाहें । कीजो; देवा!” ॥२०१॥
ऐसा मागील पडताळा१
१. प्रत्यंतर
घेउनी । पुढां अभिप्राय दृष्टी सूनी२
२. शिरवून, घालून
। तेवींचि माजीं शिरऊनी । आर्ती आपुली ॥२०२॥
कैसी पुसती पाहें पां, जाणिव । भिडेचि तरी लंघो नेदीं शिंव१
१. सीमा, मर्यादा
। एहवीं श्रीकृष्ण हृदयासि खेंव२
२. आलिंगन देण्यास
। देवों सरला३
३. प्रवृत्त झाला
॥२०३॥
अहो श्रीगुरुतें जैं पुसावें । तैं येणें मानें१
१. याप्रमाणें
सावध होआवें । हैं, एकचि जाणें, आघवें । सव्यसाची ॥२०४॥
आतां तयाचें तें प्रश्न करणें । वरी सर्वज्ञ श्रीहरीचें बोलणें । हें संजयो आवडलेपणें१
१. प्रेमानें, आवडीनें
। सांगैल कैसें ! ॥२०५॥
तिये अवधान द्यावें गोठी । बोलिजेल नीट महऱ्हाठी । जैसी कानाचे आधीं दिठी । उपेगा जाये ॥२०६॥
बुद्धीचिया जिभा । बोलाचा न चाखतां गाभा१
१. सार
। अक्षरांचिया भांबा२
२. शोभेनें
। इंद्रियें जिती३
३. जगतात, नवजीवन मिळते
॥२०७॥
पाहा पां, मालतीचे१
१. मोगरीचे
कळे । घ्राणासि२
२. नाकाला
कीर वाटले परिमळें । परि वरचिया३
३. बाहेरच्या
बरवा४
४. सुरेखपणानें
काइ डोळे । सुखिये नव्हती ? ॥२०८॥
तैसें देशियेचिया१
१. मराठी भाषेच्या
हवावा२
२. शोभेनें
। इंद्रियें करिती राणिवा३
३. राज्य
। मग प्रमेयाचिया गांवा । लेसां४
४. अनायासे
जाइजे ॥२०९॥
ऐसेनि नागरपणें१
१. चांगुलपणानें, रसालंकारात्मक सुंदर रीतीने
। बोलु निमे तें बोलणें२
२. जेथें वाचा पोहोचत नाहीं तें शब्दांत ऐकून घ्या
-। ऐका; ज्ञानदेवो म्हणे । निवृत्तीचा ॥२१०॥
इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां सप्तमोऽध्यायः ॥७॥

समुद्राची गुरुलक्षणे (४१ ते ६८)
मुनिः प्रसन्नगम्भीरो, दुर्विगाह्यो दुरत्ययः ।
अनन्तपारो ह्यक्षोभ्यः स्तिमितोद इवार्णवः ॥५॥
श्लोकार्थ – मुनीने बाहेर शांत असून अंतःकरणात प्रसन्न असावे. त्याचे मनोगत अनाकलनीय असावे. त्याचा अपमान कोणीही करणार नाही अशी तेजस्विता त्याचे ठायी असावी. तरून जाण्यास कठीण अशा समुद्राप्रमाणे अफाट, निर्विकार आणि शांत वृत्ती मुनीने धारण करावी. ॥५॥
‘समुद्र’ जो गुरु करणें । त्याची परिस पां लक्षणें ।
गंभीरत्व पूर्णपणें । निर्मळ असणे इत्यादि ॥४१॥
समुद्र सदा सुप्रसन्न । योगी सदा प्रसन्नवदन ।
केव्हाही धुसमुशिलेपण१
१. अस्वस्थता
। नव्हे जाण निजबोधे ॥४२॥
मीनल्या सरितांचे समळ जळ । समुद्र डहुळेना अतिनिर्मळ ।
तैसीं नाना कर्में करितां सकळ । सदा अविकळ योगिया ॥४३॥
जळें गंभीर सागर । योगिया स्वानुभवें गंभीर ।
वेळा१
१. भरतीची मर्यादा, किनारा
नुल्लंघी सागर । नुल्लंघी योगीश्वर गुरुआज्ञा ॥४४॥
समुद्रीं न रिघवे भलत्यासी । तो बुडवी जळकल्लोळेंसीं ।
योगिया बुडवी संसारासी । भावें त्यापासीं गेलिया ॥४५॥
जो रिघणे निघणे१
१. (पा.भे. रिगती मार्गी)
जाणे जळीं । तो समुद्रीं करी आंघोळी ।
येरांसी लाटांच्या कल्लोळीं । कासाकुळी२
२. कासाविस
करीतसे ॥४६॥
तैसीचि योगियासी । सलगी न करवे भलतियासी ।
आपभये भीती आपैसी । तो भाविकांसी सुसेव्य ॥४७॥
जाहल्या धनवंतु वेव्हारा । उपायीं नुल्लंघवे सागरा ।
तैसें नुल्लंघवे योगीश्वरा । नृपां सुरनरां किन्नरां ॥४८॥
मळु न राहे सागरीं । लाटांसरिसा टाकी दुरी ।
तैसाचि मळु योगियाभीतरीं । ध्याने निर्धारी न राहे ॥४९॥
समुद्री मीनली ताम्रपर्णी१
१. नदीचे नांव
। तेथ जाहली मुक्ताफळांची खाणी ।
योगिया मिनली श्रद्धा येऊनी । तेथ मुक्तखाणी मुमुक्षां ॥५०॥
जो समुद्रामाजी रिघोनि राहे । तो नानापरीची रत्ने लाहे ।
योगियांमाजीं जो सामाये । त्याचे वंदिती पाये चिद्रत्नें ॥५१॥
जैशी समुद्राची मर्यादा । कोणासी न करवे कदा ।
तैशी योगियांची मर्यादा । शास्त्रां वेदां न करवे ॥५२॥
प्रवाहेंवीण जळ । समुद्री जेवीं निश्चळ ।
मृत्युभयेंवीण अचंचळ । असे केवळ योगिया ॥५३॥
समुद्री प्रवाहो नव्हे काहीं । सदा पूर्ण ठायींच्या ठायीं ।
तैसें योगिया जन्ममरण नाहीं । परिपूर्ण पाहीं सर्वदा ॥५४॥
समुद्रलक्षणें साधितां । अधिक दशा आली हातां ।
ते योगियाची योग्यता । परिस तत्त्वतां सांगेन ॥५५॥
समुद्रामाजीं जळ । लाटांखालीं अतिचंचळ ।
योगिया अंतरीं अतिनिश्चळ । नाहीं तळमळ कल्पना ॥५६॥
समुद्र क्षोभे वेळोवेळे । योगिया क्षोभेना कवणें काळे ।
सर्वथा योगी नुचंबळे । योगबळे सावधु ॥५७॥
समुद्री भरतें पर्वसंबंधे । योगिया परिपूर्ण सदानंदें ।
समुद्रीं चढूवोहटू चांदें । योगिया निजबोधे सदा सम ॥५८॥
समुद्र सर्वांप्रति क्षार । तैसा नव्हे योगीश्वर ।
तो सर्वां जीवांसी मधुर । बोधु साचार पैं त्याचा ॥५९॥
जयासी बोधु नाहीं पुरता । अनुभव नेणे निजात्मता ।
त्यासी कैंची मधुरता । जेवीं अपक्कता सेंदेची१
१. सेंदाडाची
॥६०॥
सागरी वरुषल्या घन । वृथा जाये तें जीवन ।
तैसा योगिया नव्हे जाण । सेविल्या व्यर्थपण येवों नेदी ॥६१॥
अल्पही योगिया होये१
१. सेवा
घेता । तेणे निवारी भवव्यथा ।
यालागीं मुमुक्षी सर्वथा । भगवद्भक्तां भजावें ॥६२॥
समृद्धकामो हीनो वा, नारायणपरो मुनिः ।
नोत्सर्पेत न शुष्येत, सरिद्भिरिव सागरः ॥६॥
श्लोकार्थ – पावसाळ्यात नद्यांनी विपुल पाणी आणले अगर उन्हाळ्यात अल्प पाणी आणले तरी समुद्रात वाढ अगर घट दिसत नाही. त्याप्रमाणेच नारायणाचा एकनिष्ठ भक्त जो मुनी त्यानेही आपल्या इच्छा पूर्ण झाल्या म्हणून आनंदित होऊ नये अगर त्या शेवटास गेल्या नाहीत म्हणून खिन्न होऊ नये. ॥६॥
वर्षाकाळी सरिता सकळ । घेऊनि आल्या अमूप जळ ।
तेणें हरुषेजेना प्रबळ । न चढे जळ जळाब्धीं ॥६३॥
ग्रीष्मकाळाचिये प्राप्ती । सरितांचे यावे१
१. प्रवाह
राहती ।
ते मानूनियां खंती । अपांपती वोहटेना ॥६४॥
तैसेंचि योगियांच्या ठायीं । नाना समृद्धि आलिया पाहीं ।
अहंता न धरी देहीं । गर्व कांहीं चढेना ॥६५॥
समृद्धि वेंचिलिया पाठीं । खंती नाहीं योगिया पोटीं ।
तो नारायणपर-दृष्टीं । सुखसंतुष्टी वर्ततु ॥६६॥
संपत्तीमाजी असतां । मी संपन्नु हे नाठवे चित्ता ।
दरिद्र आलिया दरिद्रता । नेणे सर्वथा योगिया ॥६७॥
दरिद्र आणि संपन्नता । दोन्ही समान त्याचिया चित्ता ।
नाहीं प्रपंचाची आसक्तता । नारायणपर तत्त्वतां निजबोधे ॥६८॥
पतंगाची गुरुलक्षणे (६९ ते ९०)
या प्रपंचाचा कठिण लागु१
१. संबंध
। नाशासी मूळ स्त्रीसंगु ।
येचिविषयीं गुरु पतंगु । केला चांगु परियेसीं ॥६९॥
दृष्ट्वा स्त्रियं देवमायां, तद्भावैरजितेन्द्रियः ।
प्रलोभितः पतत्यन्धे, तमस्यग्नौ पतङ्गवत् ॥७॥
श्लोकार्थ – ईश्वराची मूर्तिमंत मायाच असणाऱ्या स्त्रियेला पाहून आणि तिच्या शृंगारिक हावभावाने मोह पावून, इंद्रियाधीन पुरुष अग्नीच्या ज्वालांनी आकर्षिलेल्या पतंगाप्रमाणे फसतो. ॥७॥
दैवी१
१. देवाची
गुणमयी२
२. त्रिगुणात्मक
जे माया । तिचे सगुणस्वरूप त्या स्त्रिया ।
तेथ प्रलोभ उपजला प्राणियां । भोग भोगावया स्त्रीसुखें ॥७०॥
हावभावविलासगुणीं । व्यंकट१
१. वाकड्या
कटाक्षांच्या बाणीं ।
पुरुषधैर्य कवच भेदोनी । हृदयभुवनीं संचरती ॥७१॥
दारुण१
१. कठोर
कटाक्षांच्या घायीं । पुरुषधैर्य पाडिलें ठायीं ।
योषिताबंदीं२
२. स्त्रीपाशांनी
पाडिले पाहीं । भोग-कारागृहीं घातले ॥७२॥
स्त्रीभोगाचें जें सुख । तें जाण पां केवळ दुःख ।
तोंडी घालितां मधुर विख । परिपाकी१
१. परिणामी
देख प्राणांतु ॥७३॥
दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा? ।
बळें आलिंगू जातां पैं गा । मरणमार्गा लागले ॥७४॥
पुढिला पतंग निमाला१
१. मेलेला
देखती । तरी मागिल्यां दीपी अतिआसक्ती ।
तेवीं स्त्रीकामें एक ठकती२
२. फसतात
। एकां अतिप्रीती पतंगन्यायें३
३. पतंग दृष्टांताप्रमाणे
॥७५॥
तेवीं विवेकहीन मूर्खा । लोलुप्य१
१. अभिलाषा (पा.भे. लालुप्य)
उपजे स्त्रीसुखा ।
तत्संसर्गे मरण लोकां । न चुके देखा सर्वथा ॥७६॥
दीप-रूपाचेनि कोडें१
१. आसक्तीने
। पतंग जळोनि स्नेही बुडे ।
तेवीं स्त्रीसंगें अवश्य घडे । पतन रोकडे अंधतमीं२
२. अंधतमनामक नरक
॥७७॥
योषिद्धिरण्याभरणाम्बरादिद्रव्येषु मायारचितेषु मूढः ।
प्रलोभितात्मा ह्युपभोगबुद्ध्या पतङ्गवन्नश्यति नष्टदृष्टिः ॥८॥
श्लोकार्थ – भगवंताच्या इच्छेने निर्माण केलेल्या स्त्री, सोन्याचे दागिने, सुंदर वस्त्रे इत्यादी पदार्थांचे ठिकाणी उपभोगाची लालसा वाढल्यामुळे लोभाने जो वेडा झाला आहे तो विवेकशून्य होऊन पतंगाप्रमाणे नाश पावतो. (म्हणून सुंदरतेला भुलू नये.)॥८॥
पहा पां कांता आणि सोनें । वस्त्रे आभरणे१
१. अलंकार
रत्ने ।
मायेनें रचिली पडणें२
२. विकार, प्रकार, पदार्थ
। पतनाकारणें जनांच्या ॥७८॥
एकली योषिता नरकी घाली । सुवर्णलोभे नरकु बळी ।
रत्ने भूषणें तत्काळीं । नरकमेळी घालिती ॥७९॥
ते अवघेचि अनर्थकारी । मीनले योषिताशरीरीं ।
ते देखतांचि पुरंध्री१
१. सुंदर स्त्री
। जनांसी उरी मग कैंचेनि ?॥८०॥
अंगी वेताळसंचारा१
१. भूताचा प्रवेश
। त्यावरी पाजिलिया मदिरा ।
मग डुल्लत नाचतां त्या नरा । वोढावारा२
२. आवर, धरबंध
पैं नाहीं ॥८१॥
कां भांडाचे१
१. भांडखोर, बडबडून भिकेवर निर्वाह करणारा
तोंडी भंडपुराण२
२. बडबड, विसंगत बोलणे
। त्यावरी आला शिमग्याचा सण ।
मग करितां वाग्विटंबन । आवरी कोण तयासी?॥८२॥
हो कां मोहक मदिरा सर्वांसी । त्यांतु घातले उन्मादद्रव्यासी ।
सेवन करितां त्या रसासी । पारु१
१. मर्यादा
भ्रमासी पैं नाहीं ॥८३॥
तैसें सोलीव१
१. निव्वळ
मोहाचे रूप । तें जाण योषितास्वरूप ।
त्याहीवरी खटाटोप । वस्त्रे पडप२
२. प्रावरणे
भूषणें ॥८४॥
काजळ कुंकू अलंकार । लेऊनि विचित्र पाटांबर१
१. उंची वस्त्रे, शालू-पैठणी इ.
।
वनिता शोभत सुंदर । मायेचे विकार विकारले२
२. साकारले
॥८५॥
माया अजितेंद्रिया बाधी । दासांसंमुख नव्हे त्रिशुद्धी१
१. कालत्रयीही
।
ज्याची अतिप्रीती गोविंदीं । त्यासी कृपानिधि रक्षिता ॥८६॥
कैसा१
१. (पा.भे. कैशा)
रीतीं रक्षी भक्त । मूळी आत्मा आत्मी नाही तेथ ।
स्त्रीरूपें भासे भगवंत । भक्त रक्षित निजबोधे ॥८७॥
वनिता देखोनि गोमटी । विवेकाची होय नष्ट दृष्टी ।
प्रलोभे उपभोगा देती मिठी । ते दुःखकोटी भोगिती ॥८८॥
देखोनि दीपरूपीं झगमगी । उपभोगबुद्धि पतंगीं ।
उडी घालितां वेगीं । जळोनि आगीं नासती ॥८९॥
एवं योषितारूपें माया । उपभोगबुद्धी१
१. इच्छेने
भुलवी प्राणियां ।
जे विमुख हरीच्या पायां । त्यांसीच माया भुलवितु ॥९०॥
मधुमक्षिकेची गुरुलक्षणे (९१ ते ११७)
मधुकरीचेनि विंदाणे१
१. कौशल्याने, चातुर्याने
। ‘मधुकर’ म्यां गुरु करणे ।
दुःख नेदितां कार्य साधणे । तीहि लक्षणे परिस पां ॥९१॥
स्तोकं स्तोकं ग्रसेद्ग्रासं, देहो वर्तेत यावता ।
गृहानहिंसन्नातिष्ठेद्वृत्तिं माधुकरीं मुनिः ॥९॥
श्लोकार्थ – जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कोणत्याही गृहाला (गृहस्थाला) पीडा न करता, मधुकरी (भ्रमराची) वृत्ती स्वीकारून थोडे थोडे अन्न ग्रहण करून मुनीने उपजीविका चालवावी. ॥९॥
भ्रमरु रिघोनि पुष्पामधीं । फूल तरी कुचुंबों नेदी ।
आपुली करी अर्थसिद्धी१
१. पराग सेवनाचे कार्य
। चोखट२
२. चांगली
बुद्धि भ्रमराची ॥९२॥
तैसीच योगियाची परी । ग्रासमात्र घरोघरीं ।
भिक्षा करूनि उदर भरी । पीडा न करी गृहस्थां ॥९३॥
प्राणधारणेपुरतें१
१. जगण्यापुरती
। योगी मागे भिक्षेतें ।
समर्थ२
२. श्रीमंत
दुर्बळ३
३. गरीब
विभागातें । न मनूनि चित्तें सर्वथा ॥९४॥
रिघोनि कमळिणीपाशीं । भ्रमरु लोभला आमोदासीं१
१. सुगंधाला
।
पद्म संकोचे अस्तासी । तेंचि भ्रमरासी बंधन ॥९५॥
जो कोरडे काष्ठ भेदोनि जाये । तो कमळदळी गुंतला ठाये ।
प्रिया१
१. (कमलिनी)
दुखवेल म्हणौनि राहे । निर्गमु२
२. बाहेर जाणे
न पाहे आपुला ॥९६॥
तैसाचि जाण संन्यासी । एके ठायीं राहिल्या१
१. (पा.भे. राहे)
लोलुप्येसीं ।
तेंचि बंधन होये त्यासी । विषयलोभासी गुंतला ॥९७॥

१३१७. चित्ता ऐसी नको देऊ आठवण । जेणे देवाचे चरण अंतरे१
१. दुरावणे
ते ॥१॥ आलिया वचन रामनाम ध्वनि । ऐकावी कानीं ऐसी गोडी ॥ध्रु॥ मत्सराचा२
२. असूया, दोष, हेवा
ठाव३
३. थांगपत्ता, मागमूस, भाव
शरीरी नसावा । लाभेविण जीवा दु:ख देतो ॥३॥ तुका म्हणे राहे अंतरीं४
४. अंतःकरणात
शीतळ । शांतीचें तें बळ क्षमा अंगीं ॥४॥
१३१८. कोण पुण्य कोणा गांठी१
१. पदरी
। ज्यासी ऐसियांची भेटी ॥१॥ जिहीं हरी धरिला मनीं । दिले संसारासी पाणी२
२. निवृत्ती
॥ध्रु॥ कोण हा भाग्याचा । ऐसियासी बोले वाचा ॥३॥ तुका म्हणे त्याचे भेटी । होय संसारासी तुटी३
३. निवृत्ती
॥४॥
१३१९. तरीच हा जीव संसारी उदास१
१. अनासक्त
। धरीला विश्वास तुम्हां सोई२
२. संबंधाने
॥१॥ एके जातीविण३
३. समान जाती, स्वभावावाचून
नाही कळवळा४
४. सहानुभूती, माया
। ओढिली गोपाळा सूत्रदोरी५
५. प्रेमदोरी
॥ध्रु॥ फुटतसे प्राण६
६. (वा.) अतिशय उत्कंठा, व्याकुळता असणे; मरणप्राय वेदना होणे
क्षणाच्या विसरें । हे तों परस्परें सारिखेंचि ॥३॥ तुका म्हणे चित्तीं राखिला अनुभव । तेणे हा संदेह निवारला ॥४॥
१३२०. किती विवंचना१
१. काळजी, विचार
करीतसे जीवीं२
२. मनात
। मन धावंडवी३
३. धावायला लावणे, हिंडविणे
दाही दिशा ॥१॥ कोणा एका भावें४
४. निमित्ताने
तुम्ही अंगीकार । करावा, विचार याचसाठी ॥ध्रु॥ इतर ते आतां लाभ तुच्छ झाले । अनुभवा आले गुणागुण५
५. गुणदोष, केवळ दोषरूपत्व
॥३॥ तुका म्हणे लागो अखंड समाधि । जावें प्रेमबोधी६
६. प्रेमात व ज्ञानात
बुडोनियां ॥४॥
१३२१. दिकचि१
१. मर्यादा
या नाहीं संसारसंबंधा । तुटेना या बाधा२
२. त्रास, दुःख
भवरोगाची३
३. जन्ममरणरूप रोगाची
॥१॥ तांतडी४
४. घाई
ते करी म्हणऊनि तांतडी । साधिली५
५. संपादन केली
ते घडी६
६. घटका
सोनियाची७
७. (ल) उत्तम
॥ध्रु॥ संकल्पाच्या बीजें इंद्रियांची चाली८
८. प्रवृत्ती
। प्रारब्ध तें घाली गर्भवासी ॥३॥ तुका म्हणे बीजें जाळुनी सकळ । करावें गोपाळें आपुले भाट९
९. स्तुतिपाठक
॥४॥
१३२२. आतां होईन धरणेकरी१
१. हट्ट धरून बसणारा
। भीतरीच कोंडीन ॥१॥ नाहीं केली जीवेंसाटीं२
२. जीव अर्पण करणे
। तो३
३. तर
कां गोष्टी रुचे४
४. आवडणे, गोड लागणे
ते? ॥ध्रु॥ आधी निर्धार५
५. निश्चय
तो सार६
६. मुख्य
। मग भार सोसेना ॥३॥ तुका म्हणे खाऊं जेऊं । नेदूं होऊं वेगळा ॥४॥
१३२३. होईल तरी पुसापुसी१
१. विचारपुस
। उत्तर२
२. प्रतिउत्तर
त्यासी योजावें३
३. व्यवस्था करणे
॥१॥ तोंवरी मी पुढे कांहीं । आपुलें नाहीं घालीत ॥ध्रु॥ जाणोनियां अंतर४
४. मन
देव । जेव्हां, भेव५
५. भीती
फेडिल ॥३॥ तुका म्हणे धरिल हातीं । करील खंती६
६. (वा.) सांभाळ करील
वेगळें ॥४॥
१३२४. हा तो नव्हे काही निराशेचा१
१. आशाभंग होणे, हताश
ठाव२
२. ठिकाण
। भलें पोटीं३
३. मनात
वाव४
४. अवकाश, धीर
राखिलिया ॥१॥ विश्वंभरें विश्व सामाविलें५
५. अंतर्भूत होणे, एकीभूत होणे
पोटीं । तेथेंचि शेवटी आम्ही असों ॥ध्रु॥ नेणतां चिंतन करितों अंतरीं । तेथें अभ्यंतरी६
६. देवाच्या
उमटेल७
७. अंतःकरणात
॥३॥ तुका म्हणे माझा स्वामी अबोलणा८
८. अबोलका
। पुरवूं खुणे खुणा जाणतसों ॥४॥
१३२५. निष्ठुर१
१. कठोर
तो दिसे निराकारपणें । कोवळा२
२. कोमल, दयाळू
सगुणें प्रतिपाळी३
३. पालन, संगोपन करतो
॥१॥ केलाच करावा केला कइवाड४
४. निश्चय, एका पक्षाचे समर्थन (सगुण अथवा निर्गुण)
। होईल तें गोड५
५. गोड
, न परतें६
६. परतणे
॥ध्रु॥ मथिलिया लागे नवनीत हातां । नासे वितुळतां७
७. वितळणे
आहाच८
८. वरवरचे
तें ॥३॥ तुका म्हणे आतां मनाशी विचार । करावा तो सार एकचित्तें९
९. एकाग्र मनाने
॥४॥
१३२६. बहु देवा बरे झालें । नसतें गेलें सोंवळें१
१. सोंवळे
॥१॥ धोवटाशी२
२. धोतराची
पडली गांठी । जगजेठी३
३. जगाचा राजा
प्रसादें ॥ध्रु॥ गादल्याचा४
४. गढूळ पाण्याचा
झाला झाडा५
५. निवाडा
। गेली पीडा विकल्प६
६. संशय
॥३॥ तुका म्हणे वरावरी७
७. तात्काळ
। निर्मळ करी निर्मळा ॥४॥
१३२७. स्वामित्वाचीं१
१. मालकपणाचे
वर्में२
२. मर्म
असोनि जवळी । वाहों जावें मोळी३
३. मोळी
गुणासवें४
४. गुणांसह
॥१॥ काबाडापासूनि५
५. कष्टापासून
सोडवा दातारा! । कांहीं नका भारा पात्र६
६. पात्र
करूं ॥ध्रु॥ धनवंत्र्या-चिये७
७. धन्वंतरीच्या
अंगीं सत्ताबळ । व्याधी८
८. रोग
ते सकळ तोडावया ॥३॥ तुका म्हणे आले मोड्यासी९
९. मोडकळीला
कोंपट१०
१०. झोपडी
। सांडोव्याची११
११. त्यागाची
वाट विसरावी ॥४॥
१३२८. ऋणाच्या परिहारा१
१. निराकरणासाठी
झालों वोळगणा२
२. सेवक
। द्यावी नारायणा वासलाती३
३. हिशोब
॥१॥ झालों उतरायी शरीरसंकल्पें४
४. शरीराच्या संकल्पाने
। चुकों५
५. चुकणे
द्यावीं पापें सकळही ॥ध्रु॥ आजिवरी होतों धरूनि जीवासी । व्याजें६
६. व्याजाने
कासाविसी७
७. व्याकुळ
बहु केलें ॥३॥ तुका म्हणे मना आणिला म्यां भाव८
८. भाव
। तुमचा तेथे ठाव९
९. ठिकाण
आहे देवा ॥४॥
१३२९. येणें पांगें१
१. पांग
पायांपाशीं । निश्चयेंसी राहेन ॥१॥ सांगितली करीन सेवा । सकळ देवा दासत्व ॥ध्रु॥ बंधनाची तुटली बेडी । हेचि जोडी२
२. प्राप्ती
मग आम्हां ॥३॥ तुका म्हणे नव्हे क्षण । पायांविण वेगळा ॥४॥
१३३०. आपुल्या आपण उगवा१
१. सुटणे
लिगाड२
२. गुंता
। काय माझें जड३
३. जड
करून घ्याल? ॥१॥ उद्धारासी काय उधाराचे४
४. उधाराचे
काम? । वाढवूचि श्रम नये देवा! ॥ध्रु॥ करा आतां मजसाठी वाड५
५. मोठे
पोट६
६. पोट
। ठावें७
७. माहित
नाहीं? तंट८
८. तंटा
झालें लोकी ॥३॥ तुका म्हणे बाकी झडलियावरी९
९. झडल्यावर
। न पडे व्यवहारी संचिताचे ॥४॥
१३३१. सर्वसंगी१
१. सर्व संगाचा
वीट२
२. कंटाळा
आला । तूं एकला आवडसी ॥१॥ दिली आतां पायीं मिठी । जगजेठी न सोडीं ॥ध्रु॥ बहु झालों खेदक्षीण३
३. दुःखाने क्षीण
। येणे शीण तो नासे ॥३॥ तुका म्हणे गंगें वास४
४. प्रतीक्षा
। बहु त्या आस५
५. इच्छा
स्थळाची ॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

1 thought on “दिवस – ८३. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top