दिवस – ८५. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् ।
अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर ॥४॥
आतां, अधिभूत जें म्हणिपे । तेही सांगो संक्षेपें । तरी, होय आणि हारपे
१. (क्षरो भावः) लटकें
। अभ्र जैसें ॥३०॥
तैसें, असतेपण आहाच
१. पंचमहाभूतें परस्परांत आपापला अष्टमांश मिळाल्यानें (पंचीकरण होऊन) पंचात्मक झालेलीं
। ‘नाहीं होइजे हैं साच’ । जयातें रूपा आणिती पांच-पांच । मिळोनियां ॥३१॥
भूतांतें
१. (अधिभूतं)
अधिकरणूनि
२. आश्रय करून
असे । आणि भूतसंयोगें तरी दिसे । जें वियोगवेळे भ्रंशें
३. नाश पावतें
। नामरूपादिक ॥३२॥
तयांतें ‘अधिभूत’ म्हणिजे । मग ‘अधिदैव पुरुष
१. (पुरुषश्चाधिदैवतं)
‘ जाणिजे । जेणें प्रकृतीचें भोगिजे । उपार्जिलें
२. उत्पन्न केलेलें, मिळविलेले
॥३३॥
जो चेतनेचा चक्षु
१. बुद्धीचा द्रष्टा
। जो इंद्रियदेशींचा अध्यक्षु
२. मुख्य अधिपति
। जो देहास्तमानीं
३. शरीराच्या अंतीं
वृक्षु । संकल्प विहंगमाचा
४. मनोरथरूप पक्षाचा
॥३४॥
जो परमात्माचि परी
१. परंतु
दुसरा । जे अहंकारनिद्रा
२. कारण
निदसुरा
३. निजलेला
। म्हणौनि स्वप्नीचिया वोरबारा
४. खटपटींत
। संतोषें ! शिणे! ॥३५॥
जीव येणें नांवें । जयातें आळविजे
१. हाक मारावी, म्हणावें
स्वभावें । तें ‘अधिदैवत’ जाणावें । पंचायतनींचें
२. ब्रह्म, अध्यात्म, कर्म अधिभूत व अधिदैव
॥३६॥
आतां, इयेचि शरीरग्रामीं। जो शरीरभावातें उपशमीं
१. (अत्र देहे) लयातें पाववी
। तो ‘अधियजु
२. (अधियज्ञोऽहं)
‘ एथ गा, मी । पंडुकुमरा ॥३७॥
येर अधिदैवाधिभूत । तेहि मीचि, कीर, समस्त । परि पंधरें
१. पंधरा दराचें सोनें
किडाळा
२. हिणकटाला
मिळत । तें काय सांके
३. कमी प्रतीचें
नोहे ? ॥३८॥
तरि तें पंधरेपण न मैळे । आणि किडाळाचियाही अंशा न मिळे । परि, जंव असे तयाचेनि मेळें । तंव सांकेचि
१. हिणकस, निकृष्ट
म्हणिजे ॥३९॥
तैसें, अधिभूतादि आघवें । हें अविद्येचेनि पालवें
१. पदरानें
। झांकलें, तंव मानावें । वेगळें ऐसें ॥४०॥
तेचि अविद्येची जवनिका
१. पडदा
फिटे । आणि भेदभावाची अवधी
२. अंतर, मर्यादा
तुटे । मग म्हणों एक होऊनि जरी आटे । तरी काय दोनी होती ? ॥४१॥
पै केशांचा गुंडाळा । वरि ठेविली स्फटिक-शिळा । ते वरि पाहिजे डोळां । तंव भेदली गमती
१. फुटलीशी दिसते
॥४२॥
पाठीं केश परौते
१. एके बाजूस
नेले । आणि भेदलेपण, काय, नेणों, जाहलें ! । तरी डांक देऊनि सांदिलें । शिळेतें काई ? ॥४३॥
ना
१. नाहीं तर
ते अखंडचि आयती
२. स्वाभाविक, मुळची
। परि संगे भिन्न गमली होती । ते सारिलिया, मागौती । जैसी कां तैसी ॥४४॥
तेवींचि अहंभावो जाये । तरी ऐक्य
१. ऐक्य
तें आधींचि आहे । हेंचि साचें जेथ होये । तो अधियजु मी ॥४५॥
पैं गा आम्हीं तुज । सकळ यज्ञ कर्मज । सांगितलें, कां जें काज
१. 'कर्मजान्विद्धि तान्सर्वान्' इत्यादि चतुर्थाध्यायांत जो हेतु मनांत धरून कर्मज यज्ञ सांगितले तो हेतु हा
। मनीं धरूनि ॥४६॥
तो हां सकळ जीवांचा विसांवा । नैष्कर्म्य सुखाचा ठेवा । परि उघड करूनि, पांडवा । दाविजत असे ॥४७॥
पहिलिया वैराग्यइंधन परिपूर्ती
१. वैराग्य हेच कोणी जळण त्याची भर घालून
इंद्रियानळीं प्रदीप्तीं
२. पेटलेल्या इंद्रियरूपी अग्नींत
विषयद्रव्यांचिया
३. शब्दस्पर्शादिकांच्या
आहुती । देऊनियां ॥४८॥
मग वज्रासन
१. आधारबंध
तेचि उर्वी
२. भूमी, पृथ्वीं
– । शोधूनि आधारमुद्रा
३. मूळबंधमुद्रा
बरवी । वेदिका
४. यज्ञकुंडातील ओटा
रचे मांडवीं । शरीराच्या ॥४९॥
तेथ संयमाग्नीचीं
१. इंद्रियनिग्रहरूप अग्नींची
कुंडें । इंद्रियद्रव्याचेनि पवाडें
२. विस्तारानें, महत्वानें
। यजिजती उदंडें । युक्तिघोषे
३. योगमंत्रानें
॥५०॥
मग मनप्राणसंयमु
१. मन व प्राण यांचा निग्रह
। हाचि हवनसंपदेचा संभ्रमु
२. समारंभ, तयारी
। येणें संतोषविजे निर्धमु
३. दोषविरहित
ज्ञानानळु
४. ज्ञानाग्नि
॥५१॥
ऐसेनि हैं सकळ ज्ञानीं सर्पे
१. अर्पण होतें
। मग ज्ञान तें ज्ञेयीं
२. जाणावयाचें जे ब्रह्म त्यामध्यें
हारपे । पाठीं ज्ञेयचि, ‘स्व-रूपें’ । निखिल उरे ॥५२॥
तया नांव गा अधियजु । ऐसें बोलिला जंव सर्वजु । तंव अर्जुन अतिप्राजु
१. महाबुद्धीमान्
। तया पातलें
२. समजलें, पटलें
तें ॥५३॥
हें जाणोनि म्हणितलें देवें । “पार्था, परिसतु आहासि बरवें!” । या कृष्णाचिया बोलासवें । येरु
१. तो अर्जुन
सुखाचा जाहला ॥५४॥
देखा, बालकाचिया धणीं धाईजे
१. तृप्तीनें तृप्त व्हावें
। कां, शिष्याचेनि जाहलेपणें
२. कृतार्थपणानें
होइजे । हें सद्गुरूचि एकलेनि जाणिजे । कां प्रसवतिया
३. मातेनें
॥५५॥
म्हणौनि, सात्विक भावांची मांदी
१. समुदाय
। कृष्णाआंगीं अर्जुनाआधीं । न समातसे
२. मावत नाहीं
, परी बुद्धी । सांवरूनि देवें ॥५६॥
मग पिकलिया सुखाचा परिमळु
१. सुगंध
। कीं, निवालिया अमृताचा कल्लोळु
२. लाट
। तैसा कोंवळा आणि रसाळु । बोलु बोलिला ॥५७॥
म्हणे
१. (देहभृतां वर)
परिसणेयांचिया राया
२. श्रोत्यांमध्ये श्रेष्ठ
। आइकें बापा, धनंजया । ऐसी जळो सरलिया माया । तेथ जाळितें
३. जाळणारें (वृत्तिज्ञान)
तेंही जळे” ॥५८॥

दुःखें
१. मोठ्या कष्टाने
उपार्जूनि
२. मिळवून
वित्त ।
गृहसामग्री नाना पदार्थ । त्याचे पाक करवी गृहस्थ । निजभोगार्थ आवडीं ॥१५३॥
तेथ समयीं आला अतिथ ।
संन्यासी ब्रह्मचारी अन्नार्थ । गृहस्थाआधी तो सेवित । तोंड पाहत गृहमेधी
१. गृहस्थाश्रमी
॥१५४॥
जैसें दवडून मोहळमाशियांसी ।
मधुहर्ता मधु प्राशी । तैसें होय गृहस्थासी । नेती संन्यासी सिद्धपाकु
१. आयते अन्न
॥१५५॥
समयीं पराङ्मुख झालिया यती
१. संन्यासी

सकळ पुण्ये क्षया जाती । यथाकाळी आलिया अतिथी । स्वधर्मु रक्षिती सर्वथा ॥१५६॥
अर्थसंग्रहाची बाधकता ।
तुज म्यां सांगितली तत्त्वतां । ‘मृग’
१. हरीण
गुरु केला सर्वथा । तेही कथा परियेसीं ॥१५७॥
मृगाची गुरुलक्षणे (१५८ ते १६९)
ग्राम्यगीतं न श्रुणुयाद्यतिर्वनचरः क्वचित् ।
शिक्षेत हरिणाद्बद्धान्मृगयोर्गीतमोहितात् ॥१७॥
श्लोकार्थ – वनामध्ये राहणाऱ्या यतीने शृंगारविषयक गाणे कधीही ऐकू नये. पारध्याच्या गाण्याने मोहित होऊन बद्ध झालेल्या हरणापासून हे शिकावे. ॥१७॥
ग्राम्यजनवार्ता
१. दुर्व्यसनी

कां ग्राम्य स्त्रियांच्या गीता । ऐके जो कां तत्त्वतां । बंधन सर्वथा तो पावे ॥१५८॥
अखंड पाहतां दीपाकडे ।
घंटानादें झालें वेडें । मृग पाहों विसरला पुढे । फांसीं पडे सर्वथा ॥१५९॥
ग्राम्य योषितांचे गीत ।
ऐकतां कोणाचे भुलेना चित्त?। मृगाच्या ऐसा मोहित । होय निश्चित निजस्वार्था ॥१६०॥
जो बोलिजे तापसांचा मुकुटी
१. श्रेष्ठ

ज्यासी स्त्रियांसी नाहीं भेट गोष्टी । तो ऋष्यशृंग उठाउठी
२. तत्काळ
। स्त्रीगीतासाठी भुलला ॥१६१॥
नृत्यवादित्रगीतानि, जुषन् ग्राम्याणि योषिताम् ।
आसां क्रीडनको वश्य, ऋष्यश्रृङ्गो मृगीसुतः ॥१८॥
श्लोकार्थ – स्त्रियांचे कामोद्दीपक नाचणे, वाद्यवादन व गाणे लक्ष लावून ऐकल्यामुळेच हरिणीपुत्र ऋष्यशृंग ऋषी हा त्यांच्या पूर्णपणे आहारी जाऊन त्यांचे खेळणे बनला. ॥१८॥
मधुर वीणागुणक्वणित
१. विण्याच्या ध्वनीने झणत्कारलेले

ग्राम्य स्त्रियांचे गीत नृत्य । देखतां पुरुष वश्य होत । जैसें गळबंधस्थ
२. गळ्याला बांधलेले
वानर ॥१६२॥
जो तापसांमाजी जगजेठी
१. श्रेष्ठ

जो जन्मला मृगीच्या पोटीं । जो नेणे स्त्रियांची भेटीगोठी । न पाहे दृष्टी योषिता ॥१६३॥
तो ऋष्यश्रृंग स्त्रीदृष्टीं ।
वश्य जाहला उठाउठी । धांवे योषितांचे पाठोवाठीं
१. पाठीमागे
। त्यांचे गोष्टीमाजी वर्ते ॥१६४॥
गारुड्याचें वानर जैसें ।
स्त्रियांसंगें नाचे तैसें । प्रमदादृष्टी
१. स्त्रीच्या नेत्रकटाक्षाने
जाहला पिसें
२. वेडे
। विवेकु मानसें विसरला ॥१६५॥
विसरला तपाचा खटाटोपु
१. प्रयत्न

विसरला विभांडक बापु । विसरला ब्रह्मचर्यकृत
२. ब्रह्मचारी राहण्याविषयी केलेला
संकल्पु । स्त्रियानुरूपु नाचतु ॥१६६॥
स्त्रीबाधेएवढा बाधु ।
संसारी आणिक नाहीं गा सुबुद्धु
१. (पा.भे. सुबद्धु)
। नको नको स्त्रियांचा विनोदु
२. चेष्टा-मस्करी
। दुःखसंबंधु सर्वांसी ॥१६७॥
वारिलें
१. त्याज्य, निषिद्ध
नाइकावें ग्राम्य गीता ।
हे सत्य सत्य गा सर्वथा । तेथ हरिकीर्तन कथा । जाहल्या परमार्थतां ऐकावें ॥१६८॥
रामनामें विवर्जित ।
ग्रामणी
१. असंस्कृत लोकांनी
बोलिजे तें ‘ग्राम्यगीत’ । तें नाइकावे निश्चित । कवतुकें तेथ न वचावें ॥१६९॥
मीनाची गुरुलक्षणे (१७० ते १८७)
‘मीन’ गुरु करणें ।
तेंही अवधारा लक्षणे । रसनेचेनि लोलुप्यपणें । जीवेंप्राणे जातसे ॥१७०॥
जिह्वयाऽतिप्रमाथिन्या, जनो रसविमोहितः ।
मृत्युमृच्छत्यसद्बुद्धिर्मीनस्तु बडिशैर्यथा ॥१९॥
श्लोकार्थ – गळाच्या आमिषाला भुलून मासा मृत्यूच्याच दारात जातो, त्याप्रमाणे विषयी जीव जिव्हेच्या फाजील चोचल्यामुळे पदार्थाच्या रसाला चटावतो आणि शेवटी नाश पावतो. ॥१९॥
अर्थ-संग्रहें जीवघातु ।
स्त्रिया-आसक्ती अधःपातु । रसनालोलुप्ये पावे मृत्यु । विविध
१. नाना प्रकारचा
घातु जीवासी ॥१७१॥
ज्यासी रसनालोलुप्यता
१. जिव्हेला खादाडपणा आवडतो
गाढी
२. अत्यंत

त्यासी अनर्थुचि जोडे
३. मिळते, प्राप्त होते
जोडी
४. संपत्ती
। दुःखाच्या भोगवी कोडी
५. कोट्यवधी
। रसनागोडी बाधक ॥१७२॥
रसना आमिषाची
१. मांस
गोडी ।
लोलुप्ये मीनु गिळी उंडी
२. गोळी
सवेंचि
३. त्याबरोबरच
गळु
४. मासे धरण्याचा लोखंडी आकडा
टाळू फोडी । मग चरफडी
५. धडपडतो
अडकलिया ॥१७३॥
पाहतां रस उत्तम दिसत ।
भीतरी रोगांचे गळ गुप्त । रस आसक्ती जे सेवित । ते चडफडित भवरोगें ॥१७४॥
गळी अडकला जो मासा ।
तो जिता ना मरे चरफडी जैसा । तेवीं रोगु लागल्या माणसा । दुःखदुर्दशा भोगित ॥१७५॥
जो रसनालोलुप्ये
१. (पा.भे. रसनालोलुप्य)
प्रमादी
२. चूक करतो

त्यासी कैंची सुबुद्धी?। जन्ममरणें निरवधी
३. अनंतकाळ, असंख्य
। भोगी त्रिशुद्धी
४. त्रिकाळ सत्य
रसदोषे ॥१७६॥
रस सेविलियासाठीं ।
भोगवी जन्मांचिया कोटी । ‘हें न घडे’ म्हणसी पोटीं
१. मनात
। राया ते गोठी परियेसीं ॥१७७॥
इंद्रियांची सजीवता ।
ते रसनेआधीन सर्वथा । रसनाद्वारे रस घेतां । उन्मत्तता इंद्रियां ॥१७८॥
मातली जे इंद्रियसत्ता ।
ते नेऊन घाली अधःपाता । रसना न जिणतां सर्वथा । भवव्यथा चुकेना ॥१७९॥
आहारेंवीण देह न चले ।
सेविल्या इंद्रियवर्गु
१. इन्द्रिय समुदाय
खवळे
२. क्षुब्धता, चवताळणे
। रसनाजयाचें मूळ कळे । तैं दुःखें सकळे मावळतीं
३. (पा.भे. मावळली)
॥१८०॥
इंद्रियाणि जयन्त्याशु, निराहारा मनीषिणः ।
वर्जयित्वा तु रसनं, तन्निरन्नस्य वर्धते ॥२०॥
श्लोकार्थ – आहार सोडणारे व मनावर ताबा मिळविणारे मुनी रसनेंद्रिय वगळून इतर इंद्रिये स्वाधीन करून घेतात. आग्रहाने आहार बंद केला असता जिभेची त्या पदार्थाबद्दलची इच्छा वाढतच जाते. ॥२०॥
आहार वर्जूनि साधक ।
इतर इंद्रियें जिंतिलीं देख । तंव तंव रसना वाढे अधिक । ते अजिंक्य
१. (पा.भे. अजिंक)
न जिंकवे ॥१८१॥
इंद्रियांसी आहाराचे बळ ।
ती निराहारें झाली विकळ
१. अशक्त
। तंव तंव रसना वाढे प्रबळ । रसनेचे बळ निरन्ने
२. अन्न न खाल्याने
॥१८२॥
तावज्जितेन्द्रियो न स्याद्विजितान्येन्द्रियः पुमान् ।
न जयेद्रसनं यावज्जितं सर्वं जिते रसे ॥२१॥
श्लोकार्थ – डोळे, कान ही इतर इंद्रिये जिंकली तरी जोपर्यंत जीभ जिंकली नाही तोपर्यंत संपूर्ण इंद्रियनिग्रह झाला असे होत नाही. जीभ जिंकली म्हणजे सर्व जिंकले असे समजावे. ॥२१॥
निरन्ने इंद्रियें जिंतिलीं ।
ती जिंतिली हे मिथ्या बोली । अन्न घेतांचि सरसावलीं
१. उद्युक्त होणे, पुढे होणे
। सावध जाहलीं निजकर्मी
२. आपापली कर्मे करण्याकरिता
॥१८३॥
जंव रसना नाही जिंकिली ।
तंव ‘जितेंद्रिय’ मिथ्या बोली । जैं साचार
१. खरोखर
रसना जिंकिली । तैं वाट मोडिली विषयांची ॥१८४॥
विषयाआंतील गोडपण ।
रसनेआंतील जाणपण । दोंहीसी ऐक्य केल्या जाण । रसना संपूर्ण जिंतिली ॥१८५॥
सर्वां गोडियांचे गोड आहे ।
ते गोडीस जो लागला राहे
१. (पा.भे. आहे)
। त्यासीचि रसना वश्य होये । रस-अपाये न बाधिती ॥१८६॥
रसनाजिताचें वाधावणें
१. वाद्य वाजविणे, पुढे जाऊन सूचना देणे, जयघोष करणे

तेणें ब्रह्मसायुज्यीं पडे ठाणे । सोहळा परमानंदें भोगणें । रसना जेणें जिंतिली ॥१८७॥
वेश्येची गुरुलक्षणे (१८८ ते ३०६)
अवधूत म्हणे नृपनंदना ।
‘वेश्या’ गुरु म्यां केली जाणा । तिच्या शिकलों ज्या लक्षणां । विचक्षणा
१. बुद्धिमान
अवधारीं ॥१८८॥
पिङ्गला नाम वेश्याऽऽसीद्विदेहनगरे पुरा ।
तस्या मे शिक्षितं किञ्चिन्निबोध नृपनन्दन ॥२२॥
श्लोकार्थ – मिथिलानगरीत पूर्वी पिंगला नावाची एक वेश्या होती, तिच्यापासून मी थोडेसे शिकलो. हे राजा, ते मी तुला सांगतो, ऐक. ॥२२॥
पूर्वी विदेहाचे
१. जनकाच्या
नगरीं ।
‘पिंगला’ नामें वेश्या वासु करी । तिसी आसनिरासेंवरी
२. आशा निवृत्त होईपर्यंत
भारी
३. अतिशय
उपजलें ॥१८९॥
सा स्वैरिण्येकदा कान्तं, सङ्केत उपनेष्यती ।
अभूतकाले बहिर्द्वारी, बिभ्रती रूपमुत्तमम् ॥२३॥
श्लोकार्थ – ती स्वैरिणी वेश्या, कोणातरी सुंदर तरुणाला घरात नेण्याच्या इच्छेने अंगावर सुंदर अलंकार घालून दाराबाहेर नेहमीप्रमाणे योग्य वेळी उभी राहिली. ॥२३॥
ते स्वैरिणी स्वेच्छाचारी ।
सायंकाळी उभी द्वारीं । नाना अळंकार-अंबरी
१. वस्त्रांनी
। शृंगारकुसरी शोभत ॥१९०॥
आधींच रूप उत्तम ।
वरी
१. शिवाय
शृंगारिली मनोरम
२. मनाला सुख देणारा
। करावया ग्राम्यधर्म । पुरुष उत्तम पहातसे ॥१९१॥
मार्ग आगच्छतो वीक्ष्य, पुरुषान्पुरुषर्षभ ।
ताञ्छुल्कदान्वित्तवतः, कान्तान्मेनेऽर्थकामुका ॥२४॥
श्लोकार्थ – हे राजा, मार्गावरून अनेक पुरुष जाताना ती पाहात होती व प्रत्येक जण मोठा श्रीमंत, खूप पैसा देणारा आणि सुंदर आहे असे मनात मानीत होती, कारण तिला पैसाच पाहिजे होता. ॥२४॥
सगुण
१. गुणवान
सुरूप
२. रूपवान
धनवंत ।
कामकौशल्ये पुरवी आर्त
३. इच्छा
। अर्थ देऊनि करी समर्थ
४. श्रीमंत
। ऐसा कांत
५. पुरूष
पहातसे ॥१९२॥
ऐक गा पुरुषश्रेष्ठा! ।
पुरुष येतां येतां देखे वाटा । त्यासी खुणावी नेत्रव्यंकटा । कामचेष्टा दावूनि ॥१९३॥
आगतेष्वपयातेषु, सा सङ्केतोपजीविनी ।
अप्यन्यो वित्तवान्कोऽपि, मामुपैष्यति भूरिदः ॥२५॥
श्लोकार्थ – पैशाकरिता देहविक्रय करणाऱ्या त्या वेश्येने वाटेने येणारे जाणारे अनेक पुरुष पाहिले. माझ्याकडे ह्यांच्यापेक्षाही अधिक पैसा देणारा कोणीतरी निश्चित् येईल अशी आशा ती करीत राहिली. ॥२५॥
येत्या पुरुषास हाणी खडा ।
एकासी म्हणे घ्या जी विडा । डोळा घाली जात्याकडा
१. जाणाऱ्याकडे
। एकापुढां भंवरी दे ॥१९४॥
ठेवूनि संकेतीं जीवित ।
ऐसे नाना संकेत
१. खुणा
दावित । पुरुष तिकडे न पाहात । येत जात कार्यार्थी ॥१९५॥
गेल्या पुरुषातें निंदित ।
द्रव्यहीन हे अशक्त । रूपें विरूप अत्यंत । उपेक्षित धिक्कारें ॥१९६॥
आतां येईल वित्तवंत ।
अर्थदानी अतिसमर्थ । माझा धरोनियां हात । कामआर्त पुरवील ॥१९७॥
एवं दुराशया ध्वस्तनिद्रा द्वार्यवलम्बती ।
निर्गच्छन्ती प्रविशती निशीथं समपद्यत ॥२६॥
श्लोकार्थ – अशा प्रकारे, आत जा, बाहेर ये, पुन्हा दाराजवळ उभी राहा असे करता करता निराशेने तिची झोप उडून गेली; (तोपर्यंत) मध्यरात्र उलटून गेली. ॥२६॥
ऐसें दुराशा भरलें चित्त ।
निद्रा न लगे उद्वेगित
१. खिन्न झालेली
। द्वार धरोनि तिष्ठत
२. उभी होती
। काम वांछित पुरुषांसीं ॥१९८॥
रिघों जाय घराभीतरीं ।
सांचल
१. चाहूल
ऐकोनि रिघे बाहेरी । रिघतां निघतां येरझारी । मध्यरात्री पैं झाली ॥१९९॥
सरली
१. संपली
पुरुषाची वेळ ।
रात्र झाली जी प्रबळ
२. गडद
। निद्रा व्यापिले लोक सकळ । पिंगला विव्हळ
३. व्याकुळ
ते काळीं ॥२००॥

१३४८. तुम्हां आम्हां जंव झालीया समान
१. ऐक्य
। तेथें कोणां कोण सनमानी? ॥१॥ उरी
२. शिल्लक
तों राहिलें गोमटें गौरव
३. मोठेपणा, कीर्ती
। ओढे माझा जीव पायांपाशी ॥ध्रु॥ नेणपणे आम्ही आळवूं वोरसें
४. प्रेमाने
। बोलावितों रसें
५. रसभरीत, रसाळ, मधुर
शब्दरत्नें ॥३॥ तुका म्हणे लळे पाळीं
६. (वा.) हट्ट पूर्ण कर (सेव्य-सेवकपणाचा)
वो विठ्ठले! । कां हे उरविले भेदाभेद? ॥४॥
१३४९. नको माझे मानूं आहाच
१. वरवरचे, पोकळ
ते शब्द । कळवळ्याचा
२. दु:खाने कासाविस होऊन
वाद
३. संभाषण
करीतसें ॥१॥ कासयानें बळ करूं
४. (वा.) जोरावर येणे, सर्व शक्ती लावणे, जुलूम-जबरीचे उपाय योजणे
पायांपासीं? । भाकावी
५. (वा.) प्रार्थना, विनवणी करावी
ते दासीं करुणा आम्ही ॥ध्रु॥ काय मज चाड
६. इच्छा, गरज
असे या लौकिकें? । परि असे निकें
७. चांगले, खरे
अनुभवाचें ॥३॥ लांचावल्यासाठी
८. संवकणे, चटक लागणे
वचनाची आळी
९. हट्ट
टकळ्याने१०
१०. वेध, ध्यास, उत्कट इच्छा
घोळी११
११. घिरट्या घालीत आहे
जवळी मन ॥४॥ वाटतसे आस पुरविसी ऐसें । तरि अंगीं पिसें१२
१२. वेड
लावियेलें ॥५॥ तुका म्हणे माझी येथेंचि आवडी । श्रीमुखाची जोडी१३
१३. लाभ, प्राप्ती
इच्छीतसे ॥६॥
१३५०. जन्मा आलियाचा लाभ । पद्मनाभ दरुषणें ॥१॥ म्हणऊनि लवलाहें
१. तातडीने
। पाय आहे चिंतित ॥ध्रु॥ पाठीलागा येतो काळ । तूं कृपाळू माउली ॥३॥ बहु उसंतीत
२. मार्ग आक्रमण करणे; (प्रतिबंध) उल्लंघन करणे
आलों । तया भ्यालों स्थळासी ॥४॥ कोण्या उपायें हे घडे । भव आंगडे
३. संसाररूपी अंगरख्यातून
सुटकेचें ॥५॥ तुका म्हणे तूं जननी । ये निर्वाणीं
४. अंतकाळी
विठ्ठले! ॥६॥
१३५१. जेणे वाढे अपकीर्ति । सर्वार्थी
१. सर्वस्वी, सर्वातोपरी
तें वर्जावे
२. त्याग करावा
॥१॥ सत्य रुचे
३. आवडणे
भलेपण । वचन तें जगासी ॥ध्रु॥ होईजे ते शूर त्यागें । वाउगें
४. व्यर्थ
तें सारावें ॥३॥ तुका म्हणे खोटें वर्म । निंद्य-कर्म काळिमा
५. कलंक, दूषण, बट्टा
॥४॥
१३५२. याची सवे
१. सवय
लागली जीवा । गोडी हेवा
२. हाव
संगाचा ॥१॥ परतें न सरवे दुरी । क्षण हरिपासूनि ॥ध्रु॥ झाले तरी काय तंट । आतां चट न संडे ॥३॥ तुका म्हणे चक्रचाळे
३. गतिमान चक्रासारखे फिरण्याचे/ चक्रचालक कृष्णा!
। वेड बळें
४. जबरदस्तीने, सक्तीने
लाविलें ॥४॥
१३५३. याचा तंव हाचि मोळा
१. रीत, स्वभाव, सवय, चाल
। देखिला डोळा उदंड
२. पुष्कळ
॥१॥ नेदी मग फिरों मागें । अंगा अंग संचरे
३. प्रवेश करतो, व्यापतो
॥ध्रु॥ कां गा याची नेणां खोडी
४. वाईट सवय
? । जीभा
५. जिव्हेला
जोडी
६. लाभ
करितसे ॥३॥ पांघरे ते बहु काळें । घोंगडेही ठायींचें
७. मूळचे
॥४॥ अंगी वसेचि ना लाज । न म्हणे भाज
८. पत्नी
कोणाची ॥५॥ सर्वसाक्षी अबोल्याने
९. निःशब्द, शब्दातीत
दुश्चित१०
१०. उदास
कोणें नसावें ॥६॥ तुका म्हणे धरिला हातीं । मग निश्चिंती हरीनें ॥७॥
१३५४. प्रसिद्ध हा असे जगा । अवघ्या रंगारंगाचा
१. रंग (नाम रूपाचा)
॥१॥ तरी वाटा
२. मार्ग
वजे
३. जात नाही
कोणी । नारायणीं घरबुडी
४. संसाराचा नाश, देहत्रयाचे घर बुडते
॥ध्रु॥ बहुतां ऐसें केलें मागें । लाग
५. थांगपत्ता, मागमूस
लागें लागेना ॥३॥ हो कां नर अथवा नारी । लहान थोरी आदी॥४॥ झाले वेगळे लोकी पुरे
६. पूर्ण
। मग नुरे समूळ
७. मूळ अविद्येसह
॥५॥ कळेना तो आहे कैसा । कोणी दिशा बहु थोडा ॥६॥ तुका म्हणे दुसऱ्या भावें
८. द्वैतभावाने
छाया नांवें
९. नाममात्र
न देखवे ॥७॥
१३५५. न संडावा आतां ऐसा वाटे ठाव
१. ठिकाण (हरिचरणरूपी)
। भयासी उपाव रक्षणाचा ॥१॥ म्हणऊनि मनें वळियेलें मन । कारियाकारण
२. (पा.भे. कार्याकारण)
चाड
३. इच्छा
नाहीं ॥ध्रु॥ नाणावी उपाधि करूनियां मूळ
४. आमंत्रण, बोलावणे (मुद्दाम)
। राखतां विटाळ तेचिं व्हावें ॥३॥ तुका म्हणे येथे न वेंचे वचन । निजीं निजखूण सांपडली ॥४॥
१३५६. सत्तेचे भोजन समयीं आतुडे
१. प्राप्त होते
। सेवनही घडे रुचिनेसी
२. आवडीने
॥१॥ वर्मे भ्रम नेला झालें एकमय
३. एक - परमात्मस्वरूप
। हृदयस्थीं सोय
४. ऐक्य, लाभ, प्राप्ती
संग
५. अनुभव
झाला ॥ध्रु॥ कोथळीस
६. स्वरूपरूपी पोटात
जमा पडिलें संचित । मापल्याचा
७. (वा.) अंतर्भाव झाला, नाहीसे झाले
वित्त
८. मोजून ठेवलेले प्रारब्धरूपी धन
नेम झाला ॥३॥ तुका म्हणे धनी
९. मालक
ऐसा झालों आतां । करीन ते सत्ता१०
१०. अधिकार
माझी आहे ॥४॥
१३५७. देईल तें उणें नाहीं । याचे काही पदरीं
१. जवळ असणे
॥१॥ पाहिजे तें संचित आतां । येथे सत्ता
२. पुण्याचा साठा
करावया ॥ध्रु॥ गुणां ऐसा भरणा
३. हक्क
भरी । जों जें चारी
४. दूध काढण्याचे भांडे, संचय/ परतफेड, मोबदला
तें लाभे ॥३॥ तुका म्हणे देवीं
५. (चारा) खाऊ घालतो
देव । फळे
६. देवाच्या ठिकाणी
भाव आपुला ॥४॥
१३५८. तेव्हा होतों भोगाधीन
१. सफल होणे
। तुम्हां भिन्न पासूनि ॥१॥ आतां बोलों नये ऐसें । अनारिसे
२. प्रारब्धाच्या अधीन
वेगळे ॥ध्रु॥ सन्मुख झालों स्वामीकडे । भवआंगडें
३. विपरीत
निराळे ॥३॥ चिंतिलें तें चिंतामणी । फिटे धणी तों द्यावें ॥४॥ सहज स्थिती आहे अंगीं । प्रसंगी तें वंचेना
४. संसाराचे उपाधीरूपी अंगरखे
॥५॥ तुमची देवा धरिली कास । केला नास प्रपंचा ॥६॥ तुका म्हणे जाणोनि वर्मे
५. लपविला जात नाही
कर्माकर्मे
६. (वा.) आश्रय घेतला
ठेविलीं ॥७॥
१३५९. केला कईवाड
१. रहस्य
संतांच्या आधारें । अनुभवें खरें कळों आलें ॥१॥ काय जीवित्वाची धरुनियां आशा । व्हावें गर्भवासा पात्र भेणे
२. धर्माधर्म
॥ध्रु॥ अबाळीनें
३. निर्णय, निश्चय
जावें निश्चिंतीच्या
४. भीतीने
ठायां । रांडा रोटा वायां करूं नये ॥३॥ तुका म्हणे बळी देतां तें निधान
५. फजिती, क्लेश
। भिकेसाठी कोण राज्य देतो? ॥४॥
१३६०. संगतीने होतो पंगतीचा लाभ । अशोभी
१. चिंतारहित, निर्भय
, अनुभव
२. विधवा स्त्रीने मजुरी करून मिळविलेल्या पैशाप्रमाणे
असिजे तें ॥१॥ जैसी तैसीं असों पुढिलांचे
३. (वा.) जीव अर्पण केला असता
सोयी । धरिती हातीं, पायीं आचारिये
४. ठेवा (देव)
॥ध्रु॥ उपकारी नाहीं देखत आपदा
५. अनुचित
। पुढिलाची सदा दया चित्तीं ॥३॥ तुका म्हणे तरी सज्जनाची कीर्ति । पुरवावी आर्ति
६. ब्रह्मानुभव
निर्बळाची ॥४॥
१३६१. करितां विचार सांपडलें वर्म । समूळ
१. पुढे गेलेल्या संतांच्या
निश्रम
२. मार्गाने, आधाराने
परिहाराचें ॥१॥ मज घेऊनियां, आपणांसी द्यावें । सज्जने
३. (वा.) आश्रय देतात, अंगीकार करतात
बहुतें । नाना कर्म डाय
४. सद्गुरू, संत
करिती उपाय । बुडावया
५. संकट, दुःख
घातपातें । तुका म्हणे हरी राखे
६. इच्छा
भलत्यापरी । आम्ही तुझीं शरणागतें
७. मुळासह, कार्यरूप प्रपंच व त्याचे कारण अज्ञान
॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

1 thought on “दिवस – ८५. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top