अनुक्रमणिका
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ८. ओवी क्र. ३० ते ५८
अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् ।
अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर ॥४॥
आतां, अधिभूत जें म्हणिपे । तेही सांगो संक्षेपें । तरी, होय आणि हारपे११. (क्षरो भावः) लटकें
। अभ्र जैसें ॥३०॥
तैसें, असतेपण आहाच११. पंचमहाभूतें परस्परांत आपापला अष्टमांश मिळाल्यानें (पंचीकरण होऊन) पंचात्मक झालेलीं
। ‘नाहीं होइजे हैं साच’ । जयातें रूपा आणिती पांच-पांच । मिळोनियां ॥३१॥
भूतांतें११. (अधिभूतं)
अधिकरणूनि२२. आश्रय करून
असे । आणि भूतसंयोगें तरी दिसे । जें वियोगवेळे भ्रंशें३३. नाश पावतें
। नामरूपादिक ॥३२॥
तयांतें ‘अधिभूत’ म्हणिजे । मग ‘अधिदैव पुरुष११. (पुरुषश्चाधिदैवतं)
‘ जाणिजे । जेणें प्रकृतीचें भोगिजे । उपार्जिलें२२. उत्पन्न केलेलें, मिळविलेले
॥३३॥
जो चेतनेचा चक्षु११. बुद्धीचा द्रष्टा
। जो इंद्रियदेशींचा अध्यक्षु२२. मुख्य अधिपति
। जो देहास्तमानीं३३. शरीराच्या अंतीं
वृक्षु । संकल्प विहंगमाचा४४. मनोरथरूप पक्षाचा
॥३४॥
जो परमात्माचि परी११. परंतु
दुसरा । जे अहंकारनिद्रा२२. कारण
निदसुरा३३. निजलेला
। म्हणौनि स्वप्नीचिया वोरबारा४४. खटपटींत
। संतोषें ! शिणे! ॥३५॥
जीव येणें नांवें । जयातें आळविजे११. हाक मारावी, म्हणावें
स्वभावें । तें ‘अधिदैवत’ जाणावें । पंचायतनींचें२२. ब्रह्म, अध्यात्म, कर्म अधिभूत व अधिदैव
॥३६॥
आतां, इयेचि शरीरग्रामीं। जो शरीरभावातें उपशमीं११. (अत्र देहे) लयातें पाववी
। तो ‘अधियजु२२. (अधियज्ञोऽहं)
‘ एथ गा, मी । पंडुकुमरा ॥३७॥
येर अधिदैवाधिभूत । तेहि मीचि, कीर, समस्त । परि पंधरें११. पंधरा दराचें सोनें
किडाळा२२. हिणकटाला
मिळत । तें काय सांके३३. कमी प्रतीचें
नोहे ? ॥३८॥
तरि तें पंधरेपण न मैळे । आणि किडाळाचियाही अंशा न मिळे । परि, जंव असे तयाचेनि मेळें । तंव सांकेचि११. हिणकस, निकृष्ट
म्हणिजे ॥३९॥
तैसें, अधिभूतादि आघवें । हें अविद्येचेनि पालवें११. पदरानें
। झांकलें, तंव मानावें । वेगळें ऐसें ॥४०॥
तेचि अविद्येची जवनिका११. पडदा
फिटे । आणि भेदभावाची अवधी२२. अंतर, मर्यादा
तुटे । मग म्हणों एक होऊनि जरी आटे । तरी काय दोनी होती ? ॥४१॥
पै केशांचा गुंडाळा । वरि ठेविली स्फटिक-शिळा । ते वरि पाहिजे डोळां । तंव भेदली गमती११. फुटलीशी दिसते
॥४२॥
पाठीं केश परौते११. एके बाजूस
नेले । आणि भेदलेपण, काय, नेणों, जाहलें ! । तरी डांक देऊनि सांदिलें । शिळेतें काई ? ॥४३॥
ना११. नाहीं तर
ते अखंडचि आयती२२. स्वाभाविक, मुळची
। परि संगे भिन्न गमली होती । ते सारिलिया, मागौती । जैसी कां तैसी ॥४४॥
तेवींचि अहंभावो जाये । तरी ऐक्य११. ऐक्य
तें आधींचि आहे । हेंचि साचें जेथ होये । तो अधियजु मी ॥४५॥
पैं गा आम्हीं तुज । सकळ यज्ञ कर्मज । सांगितलें, कां जें काज११. 'कर्मजान्विद्धि तान्सर्वान्' इत्यादि चतुर्थाध्यायांत जो हेतु मनांत धरून कर्मज यज्ञ सांगितले तो हेतु हा
। मनीं धरूनि ॥४६॥
तो हां सकळ जीवांचा विसांवा । नैष्कर्म्य सुखाचा ठेवा । परि उघड करूनि, पांडवा । दाविजत असे ॥४७॥
पहिलिया वैराग्यइंधन परिपूर्ती११. वैराग्य हेच कोणी जळण त्याची भर घालून
। इंद्रियानळीं प्रदीप्तीं२२. पेटलेल्या इंद्रियरूपी अग्नींत
। विषयद्रव्यांचिया३३. शब्दस्पर्शादिकांच्या
आहुती । देऊनियां ॥४८॥
मग वज्रासन११. आधारबंध
तेचि उर्वी२२. भूमी, पृथ्वीं
– । शोधूनि आधारमुद्रा३३. मूळबंधमुद्रा
बरवी । वेदिका४४. यज्ञकुंडातील ओटा
रचे मांडवीं । शरीराच्या ॥४९॥
तेथ संयमाग्नीचीं११. इंद्रियनिग्रहरूप अग्नींची
कुंडें । इंद्रियद्रव्याचेनि पवाडें२२. विस्तारानें, महत्वानें
। यजिजती उदंडें । युक्तिघोषे३३. योगमंत्रानें
॥५०॥
मग मनप्राणसंयमु११. मन व प्राण यांचा निग्रह
। हाचि हवनसंपदेचा संभ्रमु२२. समारंभ, तयारी
। येणें संतोषविजे निर्धमु३३. दोषविरहित
। ज्ञानानळु४४. ज्ञानाग्नि
॥५१॥
ऐसेनि हैं सकळ ज्ञानीं सर्पे११. अर्पण होतें
। मग ज्ञान तें ज्ञेयीं२२. जाणावयाचें जे ब्रह्म त्यामध्यें
हारपे । पाठीं ज्ञेयचि, ‘स्व-रूपें’ । निखिल उरे ॥५२॥
तया नांव गा अधियजु । ऐसें बोलिला जंव सर्वजु । तंव अर्जुन अतिप्राजु११. महाबुद्धीमान्
। तया पातलें२२. समजलें, पटलें
तें ॥५३॥
हें जाणोनि म्हणितलें देवें । “पार्था, परिसतु आहासि बरवें!” । या कृष्णाचिया बोलासवें । येरु११. तो अर्जुन
सुखाचा जाहला ॥५४॥
देखा, बालकाचिया धणीं धाईजे११. तृप्तीनें तृप्त व्हावें
। कां, शिष्याचेनि जाहलेपणें२२. कृतार्थपणानें
होइजे । हें सद्गुरूचि एकलेनि जाणिजे । कां प्रसवतिया३३. मातेनें
॥५५॥
म्हणौनि, सात्विक भावांची मांदी११. समुदाय
। कृष्णाआंगीं अर्जुनाआधीं । न समातसे२२. मावत नाहीं
, परी बुद्धी । सांवरूनि देवें ॥५६॥
मग पिकलिया सुखाचा परिमळु११. सुगंध
। कीं, निवालिया अमृताचा कल्लोळु२२. लाट
। तैसा कोंवळा आणि रसाळु । बोलु बोलिला ॥५७॥
म्हणे११. (देहभृतां वर)
“परिसणेयांचिया राया२२. श्रोत्यांमध्ये श्रेष्ठ
। आइकें बापा, धनंजया । ऐसी जळो सरलिया माया । तेथ जाळितें३३. जाळणारें (वृत्तिज्ञान)
तेंही जळे” ॥५८॥ ॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ८, ओवी क्र. १५३ ते २००
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
दुःखें११. मोठ्या कष्टाने
उपार्जूनि२२. मिळवून
वित्त ।
गृहसामग्री नाना पदार्थ । त्याचे पाक करवी गृहस्थ । निजभोगार्थ आवडीं ॥१५३॥
तेथ समयीं आला अतिथ ।
संन्यासी ब्रह्मचारी अन्नार्थ । गृहस्थाआधी तो सेवित । तोंड पाहत गृहमेधी११. गृहस्थाश्रमी
॥१५४॥
जैसें दवडून मोहळमाशियांसी ।
मधुहर्ता मधु प्राशी । तैसें होय गृहस्थासी । नेती संन्यासी सिद्धपाकु११. आयते अन्न
॥१५५॥
समयीं पराङ्मुख झालिया यती११. संन्यासी
।
सकळ पुण्ये क्षया जाती । यथाकाळी आलिया अतिथी । स्वधर्मु रक्षिती सर्वथा ॥१५६॥
अर्थसंग्रहाची बाधकता ।
तुज म्यां सांगितली तत्त्वतां । ‘मृग’११. हरीण
गुरु केला सर्वथा । तेही कथा परियेसीं ॥१५७॥
मृगाची गुरुलक्षणे (१५८ ते १६९)
ग्राम्यगीतं न श्रुणुयाद्यतिर्वनचरः क्वचित् ।
शिक्षेत हरिणाद्बद्धान्मृगयोर्गीतमोहितात् ॥१७॥
श्लोकार्थ – वनामध्ये राहणाऱ्या यतीने शृंगारविषयक गाणे कधीही ऐकू नये. पारध्याच्या गाण्याने मोहित होऊन बद्ध झालेल्या हरणापासून हे शिकावे. ॥१७॥
ग्राम्यजनवार्ता११. दुर्व्यसनी
।
कां ग्राम्य स्त्रियांच्या गीता । ऐके जो कां तत्त्वतां । बंधन सर्वथा तो पावे ॥१५८॥
अखंड पाहतां दीपाकडे ।
घंटानादें झालें वेडें । मृग पाहों विसरला पुढे । फांसीं पडे सर्वथा ॥१५९॥
ग्राम्य योषितांचे गीत ।
ऐकतां कोणाचे भुलेना चित्त?। मृगाच्या ऐसा मोहित । होय निश्चित निजस्वार्था ॥१६०॥
जो बोलिजे तापसांचा मुकुटी११. श्रेष्ठ
।
ज्यासी स्त्रियांसी नाहीं भेट गोष्टी । तो ऋष्यशृंग उठाउठी२२. तत्काळ
। स्त्रीगीतासाठी भुलला ॥१६१॥
नृत्यवादित्रगीतानि, जुषन् ग्राम्याणि योषिताम् ।
आसां क्रीडनको वश्य, ऋष्यश्रृङ्गो मृगीसुतः ॥१८॥
श्लोकार्थ – स्त्रियांचे कामोद्दीपक नाचणे, वाद्यवादन व गाणे लक्ष लावून ऐकल्यामुळेच हरिणीपुत्र ऋष्यशृंग ऋषी हा त्यांच्या पूर्णपणे आहारी जाऊन त्यांचे खेळणे बनला. ॥१८॥
मधुर वीणागुणक्वणित११. विण्याच्या ध्वनीने झणत्कारलेले
।
ग्राम्य स्त्रियांचे गीत नृत्य । देखतां पुरुष वश्य होत । जैसें गळबंधस्थ२२. गळ्याला बांधलेले
वानर ॥१६२॥
जो तापसांमाजी जगजेठी११. श्रेष्ठ
।
जो जन्मला मृगीच्या पोटीं । जो नेणे स्त्रियांची भेटीगोठी । न पाहे दृष्टी योषिता ॥१६३॥
तो ऋष्यश्रृंग स्त्रीदृष्टीं ।
वश्य जाहला उठाउठी । धांवे योषितांचे पाठोवाठीं११. पाठीमागे
। त्यांचे गोष्टीमाजी वर्ते ॥१६४॥
गारुड्याचें वानर जैसें ।
स्त्रियांसंगें नाचे तैसें । प्रमदादृष्टी११. स्त्रीच्या नेत्रकटाक्षाने
जाहला पिसें२२. वेडे
। विवेकु मानसें विसरला ॥१६५॥
विसरला तपाचा खटाटोपु११. प्रयत्न
।
विसरला विभांडक बापु । विसरला ब्रह्मचर्यकृत२२. ब्रह्मचारी राहण्याविषयी केलेला
संकल्पु । स्त्रियानुरूपु नाचतु ॥१६६॥
स्त्रीबाधेएवढा बाधु ।
संसारी आणिक नाहीं गा सुबुद्धु११. (पा.भे. सुबद्धु)
। नको नको स्त्रियांचा विनोदु२२. चेष्टा-मस्करी
। दुःखसंबंधु सर्वांसी ॥१६७॥
वारिलें११. त्याज्य, निषिद्ध
नाइकावें ग्राम्य गीता ।
हे सत्य सत्य गा सर्वथा । तेथ हरिकीर्तन कथा । जाहल्या परमार्थतां ऐकावें ॥१६८॥
रामनामें विवर्जित ।
ग्रामणी११. असंस्कृत लोकांनी
बोलिजे तें ‘ग्राम्यगीत’ । तें नाइकावे निश्चित । कवतुकें तेथ न वचावें ॥१६९॥
मीनाची गुरुलक्षणे (१७० ते १८७)
‘मीन’ गुरु करणें ।
तेंही अवधारा लक्षणे । रसनेचेनि लोलुप्यपणें । जीवेंप्राणे जातसे ॥१७०॥
जिह्वयाऽतिप्रमाथिन्या, जनो रसविमोहितः ।
मृत्युमृच्छत्यसद्बुद्धिर्मीनस्तु बडिशैर्यथा ॥१९॥
श्लोकार्थ – गळाच्या आमिषाला भुलून मासा मृत्यूच्याच दारात जातो, त्याप्रमाणे विषयी जीव जिव्हेच्या फाजील चोचल्यामुळे पदार्थाच्या रसाला चटावतो आणि शेवटी नाश पावतो. ॥१९॥
अर्थ-संग्रहें जीवघातु ।
स्त्रिया-आसक्ती अधःपातु । रसनालोलुप्ये पावे मृत्यु । विविध११. नाना प्रकारचा
घातु जीवासी ॥१७१॥
ज्यासी रसनालोलुप्यता११. जिव्हेला खादाडपणा आवडतो
गाढी२२. अत्यंत
।
त्यासी अनर्थुचि जोडे३३. मिळते, प्राप्त होते
जोडी४४. संपत्ती
। दुःखाच्या भोगवी कोडी५५. कोट्यवधी
। रसनागोडी बाधक ॥१७२॥
रसना आमिषाची११. मांस
गोडी ।
लोलुप्ये मीनु गिळी उंडी२२. गोळी
। सवेंचि३३. त्याबरोबरच
गळु४४. मासे धरण्याचा लोखंडी आकडा
टाळू फोडी । मग चरफडी५५. धडपडतो
अडकलिया ॥१७३॥
पाहतां रस उत्तम दिसत ।
भीतरी रोगांचे गळ गुप्त । रस आसक्ती जे सेवित । ते चडफडित भवरोगें ॥१७४॥
गळी अडकला जो मासा ।
तो जिता ना मरे चरफडी जैसा । तेवीं रोगु लागल्या माणसा । दुःखदुर्दशा भोगित ॥१७५॥
जो रसनालोलुप्ये११. (पा.भे. रसनालोलुप्य)
प्रमादी२२. चूक करतो
।
त्यासी कैंची सुबुद्धी?। जन्ममरणें निरवधी३३. अनंतकाळ, असंख्य
। भोगी त्रिशुद्धी४४. त्रिकाळ सत्य
रसदोषे ॥१७६॥
रस सेविलियासाठीं ।
भोगवी जन्मांचिया कोटी । ‘हें न घडे’ म्हणसी पोटीं११. मनात
। राया ते गोठी परियेसीं ॥१७७॥
इंद्रियांची सजीवता ।
ते रसनेआधीन सर्वथा । रसनाद्वारे रस घेतां । उन्मत्तता इंद्रियां ॥१७८॥
मातली जे इंद्रियसत्ता ।
ते नेऊन घाली अधःपाता । रसना न जिणतां सर्वथा । भवव्यथा चुकेना ॥१७९॥
आहारेंवीण देह न चले ।
सेविल्या इंद्रियवर्गु११. इन्द्रिय समुदाय
खवळे२२. क्षुब्धता, चवताळणे
। रसनाजयाचें मूळ कळे । तैं दुःखें सकळे मावळतीं३३. (पा.भे. मावळली)
॥१८०॥
इंद्रियाणि जयन्त्याशु, निराहारा मनीषिणः ।
वर्जयित्वा तु रसनं, तन्निरन्नस्य वर्धते ॥२०॥
श्लोकार्थ – आहार सोडणारे व मनावर ताबा मिळविणारे मुनी रसनेंद्रिय वगळून इतर इंद्रिये स्वाधीन करून घेतात. आग्रहाने आहार बंद केला असता जिभेची त्या पदार्थाबद्दलची इच्छा वाढतच जाते. ॥२०॥
आहार वर्जूनि साधक ।
इतर इंद्रियें जिंतिलीं देख । तंव तंव रसना वाढे अधिक । ते अजिंक्य११. (पा.भे. अजिंक)
न जिंकवे ॥१८१॥
इंद्रियांसी आहाराचे बळ ।
ती निराहारें झाली विकळ११. अशक्त
। तंव तंव रसना वाढे प्रबळ । रसनेचे बळ निरन्ने२२. अन्न न खाल्याने
॥१८२॥
तावज्जितेन्द्रियो न स्याद्विजितान्येन्द्रियः पुमान् ।
न जयेद्रसनं यावज्जितं सर्वं जिते रसे ॥२१॥
श्लोकार्थ – डोळे, कान ही इतर इंद्रिये जिंकली तरी जोपर्यंत जीभ जिंकली नाही तोपर्यंत संपूर्ण इंद्रियनिग्रह झाला असे होत नाही. जीभ जिंकली म्हणजे सर्व जिंकले असे समजावे. ॥२१॥
निरन्ने इंद्रियें जिंतिलीं ।
ती जिंतिली हे मिथ्या बोली । अन्न घेतांचि सरसावलीं११. उद्युक्त होणे, पुढे होणे
। सावध जाहलीं निजकर्मी२२. आपापली कर्मे करण्याकरिता
॥१८३॥
जंव रसना नाही जिंकिली ।
तंव ‘जितेंद्रिय’ मिथ्या बोली । जैं साचार११. खरोखर
रसना जिंकिली । तैं वाट मोडिली विषयांची ॥१८४॥
विषयाआंतील गोडपण ।
रसनेआंतील जाणपण । दोंहीसी ऐक्य केल्या जाण । रसना संपूर्ण जिंतिली ॥१८५॥
सर्वां गोडियांचे गोड आहे ।
ते गोडीस जो लागला राहे११. (पा.भे. आहे)
। त्यासीचि रसना वश्य होये । रस-अपाये न बाधिती ॥१८६॥
रसनाजिताचें वाधावणें११. वाद्य वाजविणे, पुढे जाऊन सूचना देणे, जयघोष करणे
।
तेणें ब्रह्मसायुज्यीं पडे ठाणे । सोहळा परमानंदें भोगणें । रसना जेणें जिंतिली ॥१८७॥
वेश्येची गुरुलक्षणे (१८८ ते ३०६)
अवधूत म्हणे नृपनंदना ।
‘वेश्या’ गुरु म्यां केली जाणा । तिच्या शिकलों ज्या लक्षणां । विचक्षणा११. बुद्धिमान
अवधारीं ॥१८८॥
पिङ्गला नाम वेश्याऽऽसीद्विदेहनगरे पुरा ।
तस्या मे शिक्षितं किञ्चिन्निबोध नृपनन्दन ॥२२॥
श्लोकार्थ – मिथिलानगरीत पूर्वी पिंगला नावाची एक वेश्या होती, तिच्यापासून मी थोडेसे शिकलो. हे राजा, ते मी तुला सांगतो, ऐक. ॥२२॥
पूर्वी विदेहाचे११. जनकाच्या
नगरीं ।
‘पिंगला’ नामें वेश्या वासु करी । तिसी आसनिरासेंवरी२२. आशा निवृत्त होईपर्यंत
। भारी३३. अतिशय
उपजलें ॥१८९॥
सा स्वैरिण्येकदा कान्तं, सङ्केत उपनेष्यती ।
अभूतकाले बहिर्द्वारी, बिभ्रती रूपमुत्तमम् ॥२३॥
श्लोकार्थ – ती स्वैरिणी वेश्या, कोणातरी सुंदर तरुणाला घरात नेण्याच्या इच्छेने अंगावर सुंदर अलंकार घालून दाराबाहेर नेहमीप्रमाणे योग्य वेळी उभी राहिली. ॥२३॥
ते स्वैरिणी स्वेच्छाचारी ।
सायंकाळी उभी द्वारीं । नाना अळंकार-अंबरी११. वस्त्रांनी
। शृंगारकुसरी शोभत ॥१९०॥
आधींच रूप उत्तम ।
वरी११. शिवाय
शृंगारिली मनोरम२२. मनाला सुख देणारा
। करावया ग्राम्यधर्म । पुरुष उत्तम पहातसे ॥१९१॥
मार्ग आगच्छतो वीक्ष्य, पुरुषान्पुरुषर्षभ ।
ताञ्छुल्कदान्वित्तवतः, कान्तान्मेनेऽर्थकामुका ॥२४॥
श्लोकार्थ – हे राजा, मार्गावरून अनेक पुरुष जाताना ती पाहात होती व प्रत्येक जण मोठा श्रीमंत, खूप पैसा देणारा आणि सुंदर आहे असे मनात मानीत होती, कारण तिला पैसाच पाहिजे होता. ॥२४॥
सगुण११. गुणवान
सुरूप२२. रूपवान
धनवंत ।
कामकौशल्ये पुरवी आर्त३३. इच्छा
। अर्थ देऊनि करी समर्थ४४. श्रीमंत
। ऐसा कांत५५. पुरूष
पहातसे ॥१९२॥
ऐक गा पुरुषश्रेष्ठा! ।
पुरुष येतां येतां देखे वाटा । त्यासी खुणावी नेत्रव्यंकटा । कामचेष्टा दावूनि ॥१९३॥
आगतेष्वपयातेषु, सा सङ्केतोपजीविनी ।
अप्यन्यो वित्तवान्कोऽपि, मामुपैष्यति भूरिदः ॥२५॥
श्लोकार्थ – पैशाकरिता देहविक्रय करणाऱ्या त्या वेश्येने वाटेने येणारे जाणारे अनेक पुरुष पाहिले. माझ्याकडे ह्यांच्यापेक्षाही अधिक पैसा देणारा कोणीतरी निश्चित् येईल अशी आशा ती करीत राहिली. ॥२५॥
येत्या पुरुषास हाणी खडा ।
एकासी म्हणे घ्या जी विडा । डोळा घाली जात्याकडा११. जाणाऱ्याकडे
। एकापुढां भंवरी दे ॥१९४॥
ठेवूनि संकेतीं जीवित ।
ऐसे नाना संकेत११. खुणा
दावित । पुरुष तिकडे न पाहात । येत जात कार्यार्थी ॥१९५॥
गेल्या पुरुषातें निंदित ।
द्रव्यहीन हे अशक्त । रूपें विरूप अत्यंत । उपेक्षित धिक्कारें ॥१९६॥
आतां येईल वित्तवंत ।
अर्थदानी अतिसमर्थ । माझा धरोनियां हात । कामआर्त पुरवील ॥१९७॥
एवं दुराशया ध्वस्तनिद्रा द्वार्यवलम्बती ।
निर्गच्छन्ती प्रविशती निशीथं समपद्यत ॥२६॥
श्लोकार्थ – अशा प्रकारे, आत जा, बाहेर ये, पुन्हा दाराजवळ उभी राहा असे करता करता निराशेने तिची झोप उडून गेली; (तोपर्यंत) मध्यरात्र उलटून गेली. ॥२६॥
ऐसें दुराशा भरलें चित्त ।
निद्रा न लगे उद्वेगित११. खिन्न झालेली
। द्वार धरोनि तिष्ठत२२. उभी होती
। काम वांछित पुरुषांसीं ॥१९८॥
रिघों जाय घराभीतरीं ।
सांचल११. चाहूल
ऐकोनि रिघे बाहेरी । रिघतां निघतां येरझारी । मध्यरात्री पैं झाली ॥१९९॥
सरली११. संपली
पुरुषाची वेळ ।
रात्र झाली जी प्रबळ२२. गडद
। निद्रा व्यापिले लोक सकळ । पिंगला विव्हळ३३. व्याकुळ
ते काळीं ॥२००॥ ॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. १३४८ ते १३६१
१३४८.
तुम्हां आम्हां जंव झालीया समान११. ऐक्य
। तेथें कोणां कोण सनमानी? ॥१॥ उरी२२. शिल्लक
तों राहिलें गोमटें गौरव३३. मोठेपणा, कीर्ती
। ओढे माझा जीव पायांपाशी ॥ध्रु॥ नेणपणे आम्ही आळवूं वोरसें४४. प्रेमाने
। बोलावितों रसें५५. रसभरीत, रसाळ, मधुर
शब्दरत्नें ॥३॥ तुका म्हणे लळे पाळीं६६. (वा.) हट्ट पूर्ण कर (सेव्य-सेवकपणाचा)
वो विठ्ठले! । कां हे उरविले भेदाभेद? ॥४॥
१३४९.
नको माझे मानूं आहाच११. वरवरचे, पोकळ
ते शब्द । कळवळ्याचा२२. दु:खाने कासाविस होऊन
वाद३३. संभाषण
करीतसें ॥१॥ कासयानें बळ करूं४४. (वा.) जोरावर येणे, सर्व शक्ती लावणे, जुलूम-जबरीचे उपाय योजणे
पायांपासीं? । भाकावी५५. (वा.) प्रार्थना, विनवणी करावी
ते दासीं करुणा आम्ही ॥ध्रु॥ काय मज चाड६६. इच्छा, गरज
असे या लौकिकें? । परि असे निकें७७. चांगले, खरे
अनुभवाचें ॥३॥ लांचावल्यासाठी८८. संवकणे, चटक लागणे
वचनाची आळी९९. हट्ट
। टकळ्याने१०१०. वेध, ध्यास, उत्कट इच्छा
घोळी११११. घिरट्या घालीत आहे
जवळी मन ॥४॥ वाटतसे आस पुरविसी ऐसें । तरि अंगीं पिसें१२१२. वेड
लावियेलें ॥५॥ तुका म्हणे माझी येथेंचि आवडी । श्रीमुखाची जोडी१३१३. लाभ, प्राप्ती
इच्छीतसे ॥६॥
१३५०.
जन्मा आलियाचा लाभ । पद्मनाभ दरुषणें ॥१॥ म्हणऊनि लवलाहें११. तातडीने
। पाय आहे चिंतित ॥ध्रु॥ पाठीलागा येतो काळ । तूं कृपाळू माउली ॥३॥ बहु उसंतीत२२. मार्ग आक्रमण करणे; (प्रतिबंध) उल्लंघन करणे
आलों । तया भ्यालों स्थळासी ॥४॥ कोण्या उपायें हे घडे । भव आंगडे३३. संसाररूपी अंगरख्यातून
सुटकेचें ॥५॥ तुका म्हणे तूं जननी । ये निर्वाणीं४४. अंतकाळी
विठ्ठले! ॥६॥
१३५१.
जेणे वाढे अपकीर्ति । सर्वार्थी११. सर्वस्वी, सर्वातोपरी
तें वर्जावे२२. त्याग करावा
॥१॥ सत्य रुचे३३. आवडणे
भलेपण । वचन तें जगासी ॥ध्रु॥ होईजे ते शूर त्यागें । वाउगें४४. व्यर्थ
तें सारावें ॥३॥ तुका म्हणे खोटें वर्म । निंद्य-कर्म काळिमा५५. कलंक, दूषण, बट्टा
॥४॥
१३५२.
याची सवे११. सवय
लागली जीवा । गोडी हेवा२२. हाव
संगाचा ॥१॥ परतें न सरवे दुरी । क्षण हरिपासूनि ॥ध्रु॥ झाले तरी काय तंट । आतां चट न संडे ॥३॥ तुका म्हणे चक्रचाळे३३. गतिमान चक्रासारखे फिरण्याचे/ चक्रचालक कृष्णा!
। वेड बळें४४. जबरदस्तीने, सक्तीने
लाविलें ॥४॥
१३५३.
याचा तंव हाचि मोळा११. रीत, स्वभाव, सवय, चाल
। देखिला डोळा उदंड२२. पुष्कळ
॥१॥ नेदी मग फिरों मागें । अंगा अंग संचरे३३. प्रवेश करतो, व्यापतो
॥ध्रु॥ कां गा याची नेणां खोडी४४. वाईट सवय
? । जीभा५५. जिव्हेला
जोडी६६. लाभ
करितसे ॥३॥ पांघरे ते बहु काळें । घोंगडेही ठायींचें७७. मूळचे
॥४॥ अंगी वसेचि ना लाज । न म्हणे भाज८८. पत्नी
कोणाची ॥५॥ सर्वसाक्षी अबोल्याने९९. निःशब्द, शब्दातीत
। दुश्चित१०१०. उदास
कोणें नसावें ॥६॥ तुका म्हणे धरिला हातीं । मग निश्चिंती हरीनें ॥७॥
१३५४.
प्रसिद्ध हा असे जगा । अवघ्या रंगारंगाचा११. रंग (नाम रूपाचा)
॥१॥ तरी वाटा२२. मार्ग
न वजे३३. जात नाही
कोणी । नारायणीं घरबुडी४४. संसाराचा नाश, देहत्रयाचे घर बुडते
॥ध्रु॥ बहुतां ऐसें केलें मागें । लाग५५. थांगपत्ता, मागमूस
लागें लागेना ॥३॥ हो कां नर अथवा नारी । लहान थोरी आदी॥४॥ झाले वेगळे लोकी पुरे६६. पूर्ण
। मग नुरे समूळ७७. मूळ अविद्येसह
॥५॥ कळेना तो आहे कैसा । कोणी दिशा बहु थोडा ॥६॥ तुका म्हणे दुसऱ्या भावें८८. द्वैतभावाने
। छाया नांवें९९. नाममात्र
न देखवे ॥७॥
१३५५.
न संडावा आतां ऐसा वाटे ठाव११. ठिकाण (हरिचरणरूपी)
। भयासी उपाव रक्षणाचा ॥१॥ म्हणऊनि मनें वळियेलें मन । कारियाकारण२२. (पा.भे. कार्याकारण)
चाड३३. इच्छा
नाहीं ॥ध्रु॥ नाणावी उपाधि करूनियां मूळ४४. आमंत्रण, बोलावणे (मुद्दाम)
। राखतां विटाळ तेचिं व्हावें ॥३॥ तुका म्हणे येथे न वेंचे वचन । निजीं निजखूण सांपडली ॥४॥
१३५६.
सत्तेचे भोजन समयीं आतुडे११. प्राप्त होते
। सेवनही घडे रुचिनेसी२२. आवडीने
॥१॥ वर्मे भ्रम नेला झालें एकमय३३. एक - परमात्मस्वरूप
। हृदयस्थीं सोय४४. ऐक्य, लाभ, प्राप्ती
संग५५. अनुभव
झाला ॥ध्रु॥ कोथळीस६६. स्वरूपरूपी पोटात
जमा पडिलें संचित । मापल्याचा७७. (वा.) अंतर्भाव झाला, नाहीसे झाले
वित्त८८. मोजून ठेवलेले प्रारब्धरूपी धन
नेम झाला ॥३॥ तुका म्हणे धनी९९. मालक
ऐसा झालों आतां । करीन ते सत्ता१०१०. अधिकार
माझी आहे ॥४॥
१३५७.
देईल तें उणें नाहीं । याचे काही पदरीं११. जवळ असणे
॥१॥ पाहिजे तें संचित आतां । येथे सत्ता२२. पुण्याचा साठा
करावया ॥ध्रु॥ गुणां ऐसा भरणा३३. हक्क
भरी । जों जें चारी४४. दूध काढण्याचे भांडे, संचय/ परतफेड, मोबदला
तें लाभे ॥३॥ तुका म्हणे देवीं५५. (चारा) खाऊ घालतो
देव । फळे६६. देवाच्या ठिकाणी
भाव आपुला ॥४॥
१३५८.
तेव्हा होतों भोगाधीन११. सफल होणे
। तुम्हां भिन्न पासूनि ॥१॥ आतां बोलों नये ऐसें । अनारिसे२२. प्रारब्धाच्या अधीन
वेगळे ॥ध्रु॥ सन्मुख झालों स्वामीकडे । भवआंगडें३३. विपरीत
निराळे ॥३॥ चिंतिलें तें चिंतामणी । फिटे धणी तों द्यावें ॥४॥ सहज स्थिती आहे अंगीं । प्रसंगी तें वंचेना४४. संसाराचे उपाधीरूपी अंगरखे
॥५॥ तुमची देवा धरिली कास । केला नास प्रपंचा ॥६॥ तुका म्हणे जाणोनि वर्मे५५. लपविला जात नाही
। कर्माकर्मे६६. (वा.) आश्रय घेतला
ठेविलीं ॥७॥
१३५९.
केला कईवाड११. रहस्य
संतांच्या आधारें । अनुभवें खरें कळों आलें ॥१॥ काय जीवित्वाची धरुनियां आशा । व्हावें गर्भवासा पात्र भेणे२२. धर्माधर्म
॥ध्रु॥ अबाळीनें३३. निर्णय, निश्चय
जावें निश्चिंतीच्या४४. भीतीने
ठायां । रांडा रोटा वायां करूं नये ॥३॥ तुका म्हणे बळी देतां तें निधान५५. फजिती, क्लेश
। भिकेसाठी कोण राज्य देतो? ॥४॥
१३६०.
संगतीने होतो पंगतीचा लाभ । अशोभी११. चिंतारहित, निर्भय
, अनुभव२२. विधवा स्त्रीने मजुरी करून मिळविलेल्या पैशाप्रमाणे
असिजे तें ॥१॥ जैसी तैसीं असों पुढिलांचे३३. (वा.) जीव अर्पण केला असता
सोयी । धरिती हातीं, पायीं आचारिये४४. ठेवा (देव)
॥ध्रु॥ उपकारी नाहीं देखत आपदा५५. अनुचित
। पुढिलाची सदा दया चित्तीं ॥३॥ तुका म्हणे तरी सज्जनाची कीर्ति । पुरवावी आर्ति६६. ब्रह्मानुभव
निर्बळाची ॥४॥
१३६१.
करितां विचार सांपडलें वर्म । समूळ११. पुढे गेलेल्या संतांच्या
निश्रम२२. मार्गाने, आधाराने
परिहाराचें ॥१॥ मज घेऊनियां, आपणांसी द्यावें । सज्जने३३. (वा.) आश्रय देतात, अंगीकार करतात
बहुतें । नाना कर्म डाय४४. सद्गुरू, संत
करिती उपाय । बुडावया५५. संकट, दुःख
घातपातें । तुका म्हणे हरी राखे६६. इच्छा
भलत्यापरी । आम्ही तुझीं शरणागतें७७. मुळासह, कार्यरूप प्रपंच व त्याचे कारण अज्ञान
॥४॥ ॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.
ग्रंथ
रामकृष्णहरी माऊली 🙏