अनुक्रमणिका
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ८. ओवी क्र. ८१ ते ९९
अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना ।
परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् ॥८॥
येणेंचि११. (अभ्यासयोगेति)
अभ्यासेसी योगु । चित्तासि करी पां, चांगु । अगा, उपायबळें पंगु२२. लंगडा
। पहाड ठाकी३३. पर्वतावर चढतो
॥८१॥
तेविं, सदभ्यासें११. सत्=चांगला किंवा ब्रह्मविचार, याचा अभ्यास
निरंतर । चित्तासि परमपुरुषाची मोहर-२२. वळण, मार्ग, वेध छंद
लावीं; मग, शरीर । राहो अथवा जावो ॥८२॥
जें११. (याति पार्थानुचिन्तयन्)
नाना गतीतें पाववितें । तें चित्त वरील२२. अंगीकारील
आत्मयातें । मग, कवण आठवीं३३. कोण आठवील, 'ब्रह्मानंदीं लागली टाळी, कोण देहातें सांभाळी'
देहातें । गेलें; कीं आहे? ॥८३॥
पैं, सरितेचेनि ओधें । सिंधुजळा मीनलें घोधें११. घों घों करीत
। तें, ‘काय वर्तत आहे मागें ?’ । म्हणौनि, ‘पाहों येती२२. नाहीं तर ते
?’ ॥८४॥
ना; तें समुद्रचि होऊनि ठेलें । तेविं चित्ताचें चैतन्य११. ज्ञानस्वरूप, ज्ञानकला
जाहलें । जेथ यातायात निमालें । घनानंद जें२२. जेथे यातायात, येरझार नाहीं व जें घनानंद=परमानंदस्वरूप आहे
॥८५॥
कविं पुराणमनुशासितारमणोरणीयांसमनुस्मरेद्यः ।
सर्वस्य धातारमचिन्त्यरूपमादित्यवर्णं तमसः परस्तात् ॥९॥
जयाचें११. (कविं)
आकारावीण असणें । जया जन्म ना निमणें२२. मरणें
। जें आघवेंचि३३. सर्वच
; आघवेंपणें । देखत असे ॥८६॥
जें११. (पुराणं)
गगनाहूनि२२. आकाशापेक्षां
जुनें। जें परमाणूहूनि सानें३३. (अणोरणीयांसमनुस्मरेद्यः) सूक्ष्म कणापेक्षा सूक्ष्म
। जयाचेनि सन्निधानें४४. जवळ राहण्यानें
। विश्व चळे ॥८७॥
जें११. (सर्वस्य धातारमचिन्त्यरूपं)
सर्वांते यया विये२२. प्रसवतो, उत्पन्न करतो
। विश्व सर्व जेणें जिये३३. जगतें
। हेतु४४. न्यायशास्त्राचे अनुमान
जया बिहे५५. भितो
। अचिंत्य जें ॥८८॥
देखे, वोळंबा इंगळु न चरे११. वोळंबा-वाळवी-सर्व खाते; पण इंगळ न चरे= इंगळाला खाऊं शकत नाहीं तसा हेतु (न्यायशास्त्राचे अनुमान) सर्व ठिकाणी चालतो; परंतु वस्तूवर चालत नाही
। तेजीं तिमिर न शिरे२२. प्रकाशांत अंधार शिरत नाहीं
। जे दिहाचे३३. दिवसासुद्धां
अंधारें । चर्मचक्षूसीं४४. बाह्यदृष्टीला
॥८९॥
सुसडा११. (आदित्यवर्ण)
सूर्यकणांच्या राशी । जो नित्य उदो ज्ञानियांसी । अस्तमानाचे जयासी । आडनांव नाहीं ॥९०॥
प्रयाणकाले मनसाचलेन, भक्त्या युक्तो योगबलेन चैव ।
भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् स तं परं पुरुषमुपैति दिव्यम् ॥१०॥
तया११. (प्रयाणकाले मनसाचलेन)
अव्यंगवाणेया२२. परिपूर्ण, निर्दोष
ब्रह्मातें । प्रयाणकाले प्राप्ते३३. मरणसमय समीप आला असतां
। जो स्थिरावलेनि चित्तें । जाणोनि, स्मरे ॥९१॥
बाहेरी११. (अनुस्मरेद्यः श्लोक ९)
पद्मासन२२. योगांतील पद्म या नांवाचें आसन
रचुनी । उत्तराभिमुख बैसोनि । जीवीं सुख सूनि३३. घेऊन
। क्रमयोगाचे ॥९२॥
आंतु११. (भक्त्या युक्तो)
, मीनलेनि२२. एकवटलेल्या
मनोधर्मं । स्वरूपप्राप्तीचेनि प्रेमें । आपेआप संभ्रमें३३. त्वरेनें
। मिळावया ॥९३॥
आकळलेनि११. (योगबलेन चैव)
योगें । ‘मध्यमा२२. सुषुम्ना
मध्य मार्गे’ । अग्निस्थानौनि निगे । ब्रह्मरंध्रा३३. अग्निचक्रापासून ब्रह्मरंध्राकडे निघते
॥९४॥
तेथ अचेत चित्ताचा सांगातु११. प्राण व चित्त अथवा देह व चैतन्य यांची संगत
। आहाचवाणा२२. उगाच बाहेरून आहे असें दिसतें
दिसे मांडतु । जेथ प्राणु गगनाआंतु । संचरे कां ॥९५॥
परी११. (सम्यक्)
मनाचेनि स्थैर्ये धरिला । भक्तीचिया भावना भरला । योगबळें आवरला२२. व्यापला
। सज्ज होऊनि ॥९६॥
तो जडाजडातें११. अचेतनाला व सचेतनाला
विरवितु२२. लीन करितो
। भूलतामाजीं३३. भुकुटीमध्यें
संचरतु । जैसा घंटानाद लयस्तु४४. लीन होतो
। घंटेसीच होय ॥९७॥
कां झांकलिये घटींचा दिवा । नेणिजे काय जाहला ? केव्हां ? । या रीतीं जो, पांडवा । देह ठेवी ॥९८॥
तो११. (स तं परं पुरुषमुपैति दिव्यम्)
, केवळ परब्रह्म । जया ‘परमपुरुष’ ऐसें नाम । तें माझें निजधाम । होऊनि, ठाके ॥९९॥ ॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ८, ओवी क्र. २५१ ते ३०६
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
सांडूनि हृदयस्था अच्युतातें ।
वरावें वरां११. पती
निर्दैवांतें२२. दुर्भागी
। तंव तो द्वैतभयें भयचकिते३३. भयाने दचकलेला
। काळग्रस्ते सर्वदा ॥२५१॥
जे निजभयें११. स्वतःच्या मरणाचे भय
सर्वदा दुःखी ।
ते भार्येसी२२. पत्नी
काय करिती सुखी?। अवघीं पडली काळमुखीं । न दिसे ये लोकीं सुखदाता ॥२५२॥
असो नराची ऐशी गती ।
वरूं११. (पा.भे. करूं)
अमरांमाजी२२. देवांमध्ये
अमरपती३३. इन्द्र
। विळांत ते चौदा निमती । पदच्युति४४. पदभ्रष्ट
अमरेंद्रा ॥२५३॥
एवं सुर नर लोक लोकीं ।
आत्ममरणें११. स्वतःचे मरण
सदा दुःखी । ते केवीं भार्येसी करिती सुखी । भजावें२२. सेवा करावी
मूर्खी ते ठायीं ॥२५४॥
धन्य माझी भाग्यप्राप्ती ।
येचि क्षणीं येचि रातीं । झाली विवेकवैराग्यप्राप्ती । रमापति११. भगवान विष्णु
तुष्टला ॥२५५॥
नूंन मे भगवान्प्रीतो, विष्णुः केनापि कर्मणा ।
निर्वेदोऽयं दुराशाया, यन्मे जातः सुखावहः ॥३७॥
श्लोकार्थ – खरोखर माझ्या कोणत्या तरी चांगल्या कर्माने परमात्मा संतुष्ट झाला आहे कारण दुष्ट बुद्धी असलेल्या मला कल्याणकारक असे वैराग्य उत्पन्न झाले आहे. ॥३७॥
ये जन्मींचें माझें कर्म ।
पाहतां केवळ निंद्य धर्म११. पाप कर्म
। मज तुष्टला पुरुषोत्तम । पूर्वजन्मसामग्रीं ॥२५६॥
मज कैंचें पूर्वजन्मीं साधन? ।
ज्याचें नाम ‘पतितपावन’ । कृपाळु जो जनार्दन । त्याचे कृपेनें हे घडलें ॥२५७॥
दुष्ट दुराशा व्यभिचारु ।
भगद्वारा११. योनीच्या व्यवसायावर
चालवी संसारु । तिसी मज वैराग्ययुक्त विचारु । विष्णु साचारु तुष्टला ॥२५८॥
जरी असतें पूर्वसाधन ।
तरी निंद्य नव्हते मी आपण । योनिद्वारा कर्माचरण । पतित पूर्ण मी एकी११. (पा.भे. एक)
॥२५९॥
यापरी मी पूर्ण पतित ।
पतितपावन जगन्नाथ । तेणें कृपा करून येथ । केलें विवेकयुक्त वैरागी ॥२६०॥
तेणें वैराग्यविचारें देख ।
दुष्ट दुराशेचे फिटले११. नाहीसे झाले
दुःख । मज झालें परम सुख । निजसंतोख२२. आत्मसुख
पावलें ॥२६१॥
दुःख आदळतां अंगासी ।
वैराग्य नुपजे अभाग्यासी । भगवंतें कृपा केली कैशी । दुःखें११. (पा.भे. हें दुःख)
निजसुखासी दीधलें ॥२६२॥
मैवं स्युर्मन्दभाग्यायाः क्लेशा निर्वेदहेतवः ।
येनानुबन्धं निर्हृत्य, पुरुषः शममृच्छति ॥३८॥
श्लोकार्थ – वैराग्य उत्पन्न झाले असताना सर्व सांसारिक वासनांचा बंध तोडून पुरुष चिरकालिक कल्याण प्राप्त करून घेतो. मी अभागी असल्याने वास्तविक मला झालेल्या क्लेशाने वैराग्य उत्पन्न व्हावयास नको होते. (परंतु ईशकृपा झाली आणि ते झाले.)॥३८॥
अंगी आदळतां दुःखद्वंद्व११. पूर्णपणे
।
अभाग्यासी ये सबळ२२. अधिक, फार
क्रोध । थिता विवेक होय अंध । भाग्यमंद ते जाणा ॥२६३॥
थिता११. असणारा, स्थित
विवेक होय अंध ।
भाग्यमंद२२. मंदभाग्य, दुर्दैवी
ते जाणा ॥२६३-ब॥
दुःख देखतांचि दृष्टीं ।
ज्यासी वैराग्य विवेकेंसीं उठी११. उत्पन्न होते
। तेणें छेदूनि स्नेहहृदयगांठी२२. विषयासक्तीची हृदयातील गाठ
। पावे उठाउठी निजसुख ॥२६४॥
पुरुषांसी परमनिधान ।
विवेकयुक्त वैराग्य जाण । तेणे होऊनियां प्रसन्न । समाधान पावती ॥२६५॥
मी पूर्वी परम अभाग्य ।
महापुरुषांचे जें निजभाग्य११. विशेष भाग्य
। तें भगवंतें दिधलें वैराग्य । झालें श्लाघ्य तिहीं लोकीं ॥२६६॥
तेनोपकृतमादाय, शिरसा ग्राम्यसङ्गताः ।
त्यक्त्वा दुराशाः शरणं, व्रजामि तमधीश्वरम् ॥३९॥
श्लोकार्थ – भगवंताने मला वैराग्य देऊन माझ्यावर मोठा उपकार केला आहे, तो मी मस्तकी धारण करते. आता मी या दुष्ट वासनांचा त्याग करून त्या सर्वेश्वर प्रभूला अनन्य भावाने शरण जाते. ॥३९॥
कृपा करोनि भगवंतें ।
निजवैराग्य११. स्वतःचे वैराग्य
दिधलें मातें । तेणें सांडविलें दुराशेतें । ग्राम्य विषयातें छेदिलें ॥२६७॥
तो उपकार मानूनियां माथां ।
त्यासी मी शरण जाईन आतां । जो सर्वाधीश नियंता । त्या कृष्णनाथा मी शरण ॥२६८॥
सन्तुष्टा श्रद्दधत्येतद्यथालाभेन जीवती ।
विहराम्यमुनैवाहमात्मना रमणेन वै ॥४०॥
श्लोकार्थ – ह्याच्यावर विश्वास ठेवून, समाधान वृत्तीने, ज्यावेळी जे मिळेल त्यावर निर्वाह करून, साक्षात असणाऱ्या, केवळ आत्मस्वरूपच अशा परमात्म्याशी कायावाचामनाने मी विहार करीन. ॥४०॥
शरण गेलियापाठीं ।
सहज संतुष्ट मी ये सृष्टीं । स्वभावें सत्श्रद्धा११. पूर्ण भरवसा
पोटीं२२. मनात
। जीविका गांठी अदृष्ट३३. प्रारब्ध कर्म
॥२६९॥
मुनीश्वर भोगिती निजात्मा ।
त्या मी भोगीन आत्मयारामा । जो का पुरवी निष्कामकामा११. निष्कामांची इच्छा पूर्ण करणारा
। तो परमात्मा वल्लभु ॥२७०॥
ब्रह्मादिक समर्थ असती ।
ते सांडूनियां निश्चितीं । भगवद्भजनाची स्थिती । अतिप्रीती कां म्हणसी?॥२७१॥
मजसारिखिया दुराचारी ।
जड जीवांतें उद्धरी । तारकु तोचि भवसागरीं । स्वामी श्रीहरि कृपाळु ॥२७२॥
संसारकूपे पतितं, विषयैर्मुषितेक्षणम् ।
ग्रस्तं कालाहिनाऽऽत्मानं, कोऽन्यस्त्रातुमधीश्वरः ॥४१॥
श्लोकार्थ – ह्या संसारगर्तेत पडलेल्या, विषयांध झालेल्या आणि काळाच्या जबड्यात सापडलेल्या जीवाला तारण्यास तुझ्याशिवाय दुसरा कोण समर्थ आहे ? ॥४१॥
संसारलक्षण कूप११. विहीर
अंध ।
तेथ विषयदृष्टी विषयांध । पडोनि गेले अंधांध२२. आंधळ्यात आंधळे
। बुद्धिमंद उपायीं ॥२७३॥
ते कल्पनाजळी११. भ्रमरूप पाण्यात
बुडाले ।
वासनाकल्लोळी२२. वासनेच्या लहरीने
कवळले । दंभमदादि जळचरी तोडिले । तृष्णेच्या पडले कर्दमीं३३. चिखलात
॥२७४॥
दुःखाच्या खडकी आदळले ।
स्वर्गपायरीसी अडकले । तेथूनिही एक पडले । निर्बुजले११. गुदमरले
भवदळें२२. संसाराच्या समूहात (पा.भे. भवजळे)
॥२७५॥
नास्तिकें गेली सबुडबुडीं ।
कर्मठी धरिल्या कर्मदरडी । वेदबाह्य ती बापुडीं । पडली देव्हडीतळवटीं११. वाकडे-तिकडे होऊन तळापर्यंत; (पा.भे. देवडी)
॥२७६॥
निंदेचे शूळ११. (पा.भे. मूळ)
कांटे ।
फुटोनि निघाले उफराटे । द्वेषाचे पाथर२२. दगड
मोठे३३. (पा.भे. मोटे)
। हृदय फुटे लागतां ॥२७७॥
कामाची उकळी प्रबळ ।
भीतरूनि बाहेरी ये सबळ११. जोराने
। तेणें डहुळलें तें जळ । होय खळबळ जीवासी ॥२७८॥
सुटले क्रोधाचे चिरे११. दगड
।
वरी पडिल्या उरी नुरे । वनितामगरी२२. स्त्रीरूपी मगरींनी
नेलें पुरें । विवरद्वारे३३. कपारीत
आंतौतें ॥२७९॥
तेथ अवघियांसी एकसरें११. एकदम
।
गिळिलें काळे काळअजगरें । विखें२२. विषाने
घेरिलें३३. (पा.भे. घारलें)
थोरें घोरें४४. भयंकर
। ज्ञान पाठिमोरें५५. फारकत
सर्वांसी ॥२८०॥
सर्प चढलिया माणुसा ।
गूळ कडू लागे कैसा । निंब खाये घसघसां । गूळसा११. गुळासारखा
कहणौनि ॥२८१॥
केवळ विषप्राय विषयो कडू ।
तो प्रपंचिया जाला गोडु । अमृतप्राय परमार्थ गोडु । तो जाहला कडू विषयिकां११. विषयासक्तांना
॥२८२॥
कूपाबाहेर वासु ज्यांसी ।
ते न देखती कूपाआंतुलांसी । कूपांतले बाहेरिलांसी । कदाकाळेंसी न देखती ॥२८३॥
ऐसिया पीडतयां जीवांसी ।
काढावया धिंवसा११. धैर्य
नव्हे कोण्हासी । तुजवांचोनि हृषीकेशी! । पाव वेगेंसी कृपाळुवा! ॥२८४॥
एवं दुःखकूपपतितां११. दुःखरूपी विहिरीत पडलेल्यास
।
हृदयस्थु भगवंतुचि त्राता२२. रक्षणकर्ता
। धांव पाव कृष्णनाथा! । भवव्यथा निवारीं३३. दूर कर
॥२८५॥
ऐसें जाणोनि तत्त्वतां ।
त्याच्या चरणा शरण आतां । शरण गेलिया सर्वथा११. पूर्णपणे
। सहज भवव्यथा निवारे ॥२८६॥
आत्मैव ह्यात्मनो गोप्ता, निर्विद्येत यदाखिलात् ।
अप्रमत्त इदं पश्येद्ग्रस्तं कालाहिना जगत् ॥४२॥
श्लोकार्थ – सर्व पदार्थांच्या ठिकाणी वैराग्य उत्पन्न झाले म्हणजे आत्माच आत्म्याचे रक्षण करणारा होतो. ज्या वेळी सावध राहून, हे सर्व जग कालरूपी सर्पाने ग्रासले आहे असे तो पाहतो त्या वेळीच वैराग्य दृढ होते. ॥४२॥
ऐसें कळलें जी तत्त्वतां ।
येथ आपणचि आपणिया त्राता । सर्व पदार्थी सर्वथा । निर्वेदता११. वैराग्य
दृढ जाहल्या ॥२८७॥
दृढ वैराग्यता ते ऐशी ।
विषयो टेंकल्या११. स्पर्श झाला असता
अंगासी । चेतना२२. उत्सुकता, उतावीळपणा
नव्हे इंद्रियांसी । निद्रितापासीं जेवीं रंभा ॥२८८॥
अथवा वमिलिया११. ओकलेल्या
अन्ना ।
जेवीं वांछीना रसना२२. जिव्हा
। तेवीं विषय देखोनि मना । न धरी वासना आसक्ती ॥२८९॥
तें वैराग्य कैसेनि जोडे? ।
तरी सावधान पाहतां रोकडे११. प्रत्यक्ष
। जग काळें गिळिलें चहूंकडे । वेगळे पडे तें नाहीं ॥२९०॥
पिता-पितामह११. आजोबा
काळें नेले ।
पुत्रपौत्रां२२. मुलगा-नातू
काळे गिळिलें । वैराग्य नुपजे येणे बोलें । तरी नागवले३३. फसले
नरदेहा ॥२९१॥
मृत्युलोक याचें नांव ।
अनित्य स्वर्गाची काइसी हांव११. प्रबल इच्छा
?। वैराग्येवीण निर्दैव । झाले सर्व सर्वथा ॥२९२॥
ब्राह्मण उवाच- एवं व्यवसितमतिर्दुराशां कान्ततर्षजाम् ।
छित्त्वोपशममास्थाय, शय्यामुपविवेश सा ॥४३॥
श्लोकार्थ – ब्राह्मण म्हणाला- याप्रमाणे विषयी जनांबरोबर भोगाची वासना तिने टाकून दिली व आपली निष्ठा भगवच्चरणी स्थिर करून ती सुखाने झोपी गेली. ॥४३॥
अवधूत म्हणे यदूसी ।
धन्य भाग्य तये वेश्येसी । वैराग्य उपजलें तिसी । विवेकेंसी निजोत्तम११. *
॥२९३॥
एवं विवंचूनि११. विचार करून
निजबुद्धीं२२. स्वबुद्धीने
।
परपुरुषदुराशा छेदी । ज्याचेनि संगें आधिव्याधी३३. चिंता व रोग
। बहु उपाधी बाधक ॥२९४॥
जे उपाधीचेनि कोडें११. हौस, आवड, इच्छा
।
जन्ममृत्यूचा पूरु चढे । दुःखभोगाचें सांकडें२२. संकट
। पाडी रोकडे३३. प्रत्यक्ष
जीवासी ॥२९५॥
येणें वैराग्यविवेकबळे ।
छेदूनि दुराशेची मूळे । उपरमु पावली एकेवेळे११. एकदम
। निजात्मसोहळे ते भोगी ॥२९६॥
नित्यसिद्धसुखदाता११. (पा.भे. नित्यसिद्धुसुख-दाता)
।
तो हृदयस्थ कांत२२. पती
आश्रितां । विकल्प३३. भ्रम
सांडूनि चित्ता । वेगीं हृदयस्था मीनली४४. एकरूप झाली (पा.भे. मानली)
॥२९७॥
त्यासी देखतां अनुभवाचे दिठीं ।
ऐक्यभावें घातली मिठी । निजसुख पावली गोरटी११. सुंदर, गोरी स्त्री
। उठाउठी तत्काळ ॥२९८॥
बोलु११. शब्द
घेऊनि गेला बोली ।
लाज लाजोनियां गेली । दृश्य-द्रष्टा दशा ठेली । वाट मोडिली विषयांची ॥२९९॥
सुखें सुखावलें मानस ।
तें सुखरूप जालें निःशेष११. पूर्ण
। संकल्पविकल्प पडिले वोस । दोघां सावकाश निजप्रीती ॥३००॥
नाबद११. खडीसाखर
पडलिया उदकांत ।
विरोनि तया गोड करित । तेवीं निराशी२२. निरिच्छ झालेली वेश्या
पावोनि भगवंत । समरसत३३. एकरूप
स्वानंदें ॥३०१॥
तेथ हेतूसी नाही ठावो ।
निमाला भावाभावो । वेडावला अनुभवो । दोघां प्रीती पाहा हो अनिवार११. अमर्याद, अतिशय
॥३०२॥
सांडूनि मीतूंपणासी ।
खेव११. आलिंगन
दिधलें समरसीं । मग समाधीचिये सेजेशी२२. शय्येवर
। निजकांतेंसी पहुडली३३. शयन केले
॥३०३॥
झणे११. कदाचित्
मायेची लागे दिठी ।
यालागीं स्फूर्तीचिया कोटी । निंबलोण गोरटी । उठाउठी वोवाळी ॥३०४॥
ऐसी समाधिशेजेशीं ।
पिंगला रिघे निजसुखेंसी । अवधूत म्हणे यदूसी । वैराग्यें वेश्येसी उपरमु ॥३०५॥
वैराग्ये छेदिले आशापाश ।
पिंगला जाहली गा निराश११. (पा.भे. निराशेंसी)
। असमसाहस२२. अपार
। सुखसंतोष सर्वदा ॥३०६॥ ॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. १३७९ ते १३९१
१३७९.
हीन११. दुर्बल
, शूर बुद्धिपाशीं । आकृतीसी२२. आकाराच्या ठिकाणी
भेद नाहीं ॥१॥ एक दांडी एक खांदीं। पदोपदीं भोगणें ॥ध्रु॥ एका ऐसें एक नाहीं । भिन्न पाहीं प्रकृती३३. मूळ स्वभाव, अष्टधा प्रकृती
॥३॥ तुका म्हणे भूमी खंडे४४. भेद होतो
। पीक दंडे५५. शोभते, साजेसे असते
जेथें तें ॥४॥
१३८०.
काय बोलों सांगा । या उपरी पांडुरंगा! ॥१॥ काही आधारावांचून११. वेदादिकांच्या प्रामाण्याशिवाय
। पुढे न चले वचन ॥ध्रु॥ वाढे ऐसा रस२२. आनंद
। कांहीं करावा सौरस३३. प्रसाद, यत्न
॥३॥ भक्तिभाग्य सीमा४४. अतिशय समृद्धी, पराकाष्ठा
। द्यावा जोडोनियां प्रेमा ॥४॥ कोरड्या५५. शुष्क शब्दांनी, वचनांनी
उत्तरीं । नका गौरवूं६६. सुशोभित करू नका
वैखरी७७. वाणी, वचन
॥५॥ करी विज्ञापना८८. विनंती
। तुका प्रसादाची दाना ॥६॥
१३८१.
आहाच११. व्यर्थ, वरवर
तो मोड२२. अंकुर
वाळलिया मधीं । अधीराची३३. उतावीळ माणसाची
बुद्धि तेणें न्यायें ॥१॥ म्हणऊनि संग न करीं दुसरें । चित्त मळीन४४. अशुद्ध
द्वारे दोड पडे५५. (वा.) अहित, वाईट होते (पा.भे. द्वाड)
॥ध्रु॥ विषासाठी सर्पा भयाभीत लोक । हे तो सकळीक जाणतसां ॥३॥ तुका म्हणे काचें६६. कच्चे
राहे कुळाकुड७७. वाईट लाकूड
। अवगुण तो नाड८८. प्रतिबंध
ज्याचा तयां ॥४॥
१३८२.
क्षणाक्षणां जीवा वाटतसे खंती११. दुःख
। आठवती चित्तीं पाय देवा! ॥१॥ येईं वो येईं वो येईं लवलाहीं२२. लवकर
। आलिंगूनि बाही३३. बाहु पसरून
क्षेम४४. कल्याण, हित
देईं ॥ध्रु॥ उताविळ मन पंथ अवलोकीं५५. वाट पाहतो, प्रतीक्षा करतो
। आठवती६६. (पा.भे. आठवे ते)
चुकी काय झाली? ॥३॥ तुका म्हणे माझ्या जीवींच्या जीवना । घाला नारायणा उडी वेगीं ॥४॥
१३८३.
आळी११. हट्ट
करावी ते कळतें बाळका । बुझवावें२२. समजवावे
हें कां नेणां तुम्ही? ॥१॥ निवाड३३. निकाल
तो येथे असे पायापाशीं । तुम्हां आम्हांविशीं एके ठायीं ॥ध्रु॥ आणीक तें आम्हीं न देखोंसें झालें । जाणावें तें शिणले भागलेसें४४. दमणे, श्रमणे
॥३॥ तुका म्हणे तुम्हां लागते सांगावें? । अंतरीचे५५. अंतःकरणातील
ठावें६६. माहीत
काय नाहीं?॥४॥
१३८४.
तांतडीने११. त्वरा, घाई
आम्हां धीरचि न कळे । पाळावे हे लळे२२. हट्ट, लाड
लवलाहीं ॥१॥ नका कांहीं पाहों सावकाशी देवा! । करा एक हेवा३३. उत्कंठा, लोभ
तुमचा माझा ॥ध्रु॥ वोरसाचा४४. पान्हा (कृपेचा)
यावा, सांभाळावी प्रीत । नाहीं राहों येत अंगी धंदा ॥३॥ तुका म्हणे मज नका गोवूं खेळा । भोजनाची वेळा राखियेली ॥४॥
१३८५.
नाहीं लोपों येत गुण । वेधी११. आकृष्ट करणे
आणिकां चंदन ॥१॥ न सांगतां पडे ताळा२२. ताळमेळ
। रूप दर्पणीं सकळां ॥ध्रु॥ सारविलें३३. लिंपणे
वरी । आहाच तें क्षणभरी ॥३॥ तुका म्हणे वोहळे४४. पाण्याचा लहान प्रवाह, नाला
। सागराच्या ऐसें व्हावें? ॥४॥
१३८६.
वचनेंचि११. बोलणे (भगवंताचे नाम, गुण)
व्हावे आपण उदार । होईल विश्वंभर संतुष्टचि ॥१॥ सत्य संकल्पाची फळें बीजाऐशीं । शुद्ध नाहीं नासी पावों येत ॥ध्रु॥ वंचिलिया२२. कुचराई, चुकवाचुकव केली असता
काय येईल उपेगा? । शरीर हे नरकाचेंचि आळे३३. साठविण्याची जागा
॥३॥ तुका म्हणे जीव जितां थारे४४. आश्रयाने (पा.भे. थोर)
। करितां विचार सांपडलें वर्म । समूळ निश्रम५५. कष्टावाचून
परिहाराचें६६. निराकरण
॥१॥ मज घेऊनियां७७. जीवत्व, अहंपदवाच्य
, आपणांसी८८. आपले पारमार्थिक लक्ष्य स्वरूप
द्यावें ।
१३८७.
उखते११. एकदम
आयुष्य जायाचे२२. व्यतीत होणे
कलेवर३३. शरीर
। अवघे वोडंबर४४. अवडंबर, भासमात्र, पोकळ
विषयांचें ॥१॥ कोणासी हा लागे पुसणे५५. विचारणे
विचार । मनचि सादर६६. तत्पर
करूं आतां ॥ध्रु॥ उत्पत्ति प्रळय पडिलें दळण । पाकाचें७७. मिष्टान्नाचे
भोजन बीज८८. (वासना)
वाढे ॥३॥ तुका म्हणे जाऊं अभयाच्या ठायां । रिघों देवराया शरण वेगीं ॥४॥
१३८८.
बोलावें म्हूण बोलतों उपाय । प्रवाहें जाय गंगा-जळ ॥१॥ भाग्य योगें कोणां घडेल सेवन । कैंचे येथें जन अधिकारी? ॥ध्रु॥ मुखीं देतां११. (पा.भे. घेतां)
घांस पळविती तोंड । अंगीचिया२२. स्वभावतः
भांड३३. नास्तिक, अनधिकारी
असुखानें४४. दुःखाने
॥३॥ तुका म्हणे पूजा करितों देवाची । आपुलिया रुची५५. इच्छा, आवड
मनाचिये ॥४॥
१३८९.
लटिक्याची वाणी वचनाचा संवाद । नाहीं कोणा वाद रुचों येत ॥१॥ अन्याय११. अपराध
तो त्याचा नव्हे वायचाळा२२. व्यर्थ बडबड, बोलण्याचा व्यर्थ चाळा
। मायबापी वेळां न साधिली ॥ध्रु॥ अनावर अंगीं प्रबळ अवगुण । तांतडीने मन लाहो३३. त्वरा, हव्यास, हट्ट
साधी ॥३॥ तुका म्हणे दोष आणि अवकळा४४. फजिती, तेजोहीनता, दुर्दशा
। न पडतां ताळा५५. ताळमेळ
घडतसे ॥४॥
१३९०.
नये स्तवूं काचें११. कच्चे, अनधिकारी, खोटे
होतें क्रियानष्ट२२. कृतघ्न, स्वतःचे वचन न पाळणारा, खोटा
। फुंदाचे३३. गर्वाने ताठलेला, अभिमानी
ते कष्ट भंगा४४. नाशास
मूळ५५. कारण
॥१॥ नाही परमार्थ साधत लौकिकें६६. प्रतिष्ठा, कीर्ती
। धरून होतों फिके अंगा आले ॥ध्रु॥ पारखिया७७. परीक्षक, मर्मज्ञ
पुढे नये घालूं तोंड८८. (वा.) मध्ये-मध्ये बोलू नये, विनाकारण हस्तक्षेप करू नये
। तुटी९९. अंत
लाभा, खंड होतो माना ॥३॥ तुका म्हणे तरी मिरवते१०१०. शोभते
परवडी११११. समृद्धी, सुकाळ
। कामावल्या१२१२. मिळविली असता
गोडी अविनाश ॥४॥
१३९१.
कोण्या काळे येईल मना । नारायणा तुमचिया ॥१॥ माझा करणे अंगीकार । सर्व भार फेडूनि ॥ध्रु॥ लागली ये११. (पा.भे. हे)
तळमळ चित्ता । तरी दुश्चिता२२. उदास, खिन्न (पा.भे. दुश्चित्ता)
संसारीं ॥३॥ मुखाचीच पाहे वास३३. वाट
। मागे दास सांभाळी ॥४॥ इच्छा पूर्ण झाल्याविण । कैसा शीण वारेल४४. दूर होईल
? ॥५॥ लाहो५५. छंद
काया मने वाचा । दिवसाच्या भेटीचा ॥६॥ कंटाळा तो न धरावा । तुम्ही देवा दासाचा ॥७॥ तुका म्हणे माझे वेळे । न कळे कां हें उफराटें६६. उलटे
॥८॥ ॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.
ग्रंथ
रामकृष्णहरी माऊली 🙏