दिवस – ८७. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना ।
परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् ॥८॥
येणेंचि
१. (अभ्यासयोगेति)
अभ्यासेसी योगु । चित्तासि करी पां, चांगु । अगा, उपायबळें पंगु
२. लंगडा
पहाड ठाकी
३. पर्वतावर चढतो
॥८१॥
तेविं, सदभ्यासें
१. सत्=चांगला किंवा ब्रह्मविचार, याचा अभ्यास
निरंतर । चित्तासि परमपुरुषाची मोहर-
२. वळण, मार्ग, वेध छंद
लावीं; मग, शरीर । राहो अथवा जावो ॥८२॥
जें
१. (याति पार्थानुचिन्तयन्)
नाना गतीतें पाववितें । तें चित्त वरील
२. अंगीकारील
आत्मयातें । मग, कवण आठवीं
३. कोण आठवील, 'ब्रह्मानंदीं लागली टाळी, कोण देहातें सांभाळी'
देहातें । गेलें; कीं आहे? ॥८३॥
पैं, सरितेचेनि ओधें । सिंधुजळा मीनलें घोधें
१. घों घों करीत
। तें, ‘काय वर्तत आहे मागें ?’ । म्हणौनि, ‘पाहों येती
२. नाहीं तर ते
?’ ॥८४॥
ना; तें समुद्रचि होऊनि ठेलें । तेविं चित्ताचें चैतन्य
१. ज्ञानस्वरूप, ज्ञानकला
जाहलें । जेथ यातायात निमालें । घनानंद जें
२. जेथे यातायात, येरझार नाहीं व जें घनानंद=परमानंदस्वरूप आहे
॥८५॥
कविं पुराणमनुशासितारमणोरणीयांसमनुस्मरेद्यः ।
सर्वस्य धातारमचिन्त्यरूपमादित्यवर्णं तमसः परस्तात् ॥९॥
जयाचें
१. (कविं)
आकारावीण असणें । जया जन्म ना निमणें
२. मरणें
। जें आघवेंचि
३. सर्वच
; आघवेंपणें । देखत असे ॥८६॥
जें
१. (पुराणं)
गगनाहूनि
२. आकाशापेक्षां
जुनें। जें परमाणूहूनि सानें
३. (अणोरणीयांसमनुस्मरेद्यः) सूक्ष्म कणापेक्षा सूक्ष्म
। जयाचेनि सन्निधानें
४. जवळ राहण्यानें
। विश्व चळे ॥८७॥
जें
१. (सर्वस्य धातारमचिन्त्यरूपं)
सर्वांते यया विये
२. प्रसवतो, उत्पन्न करतो
। विश्व सर्व जेणें जिये
३. जगतें
हेतु
४. न्यायशास्त्राचे अनुमान
जया बिहे
५. भितो
। अचिंत्य जें ॥८८॥
देखे, वोळंबा इंगळु न चरे
१. वोळंबा-वाळवी-सर्व खाते; पण इंगळ न चरे= इंगळाला खाऊं शकत नाहीं तसा हेतु (न्यायशास्त्राचे अनुमान) सर्व ठिकाणी चालतो; परंतु वस्तूवर चालत नाही
तेजीं तिमिर न शिरे
२. प्रकाशांत अंधार शिरत नाहीं
। जे दिहाचे
३. दिवसासुद्धां
अंधारें । चर्मचक्षूसीं
४. बाह्यदृष्टीला
॥८९॥
सुसडा
१. (आदित्यवर्ण)
सूर्यकणांच्या राशी । जो नित्य उदो ज्ञानियांसी । अस्तमानाचे जयासी । आडनांव नाहीं ॥९०॥
प्रयाणकाले मनसाचलेन, भक्त्या युक्तो योगबलेन चैव ।
भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् स तं परं पुरुषमुपैति दिव्यम् ॥१०॥
तया
१. (प्रयाणकाले मनसाचलेन)
अव्यंगवाणेया
२. परिपूर्ण, निर्दोष
ब्रह्मातें । प्रयाणकाले प्राप्ते
३. मरणसमय समीप आला असतां
। जो स्थिरावलेनि चित्तें । जाणोनि, स्मरे ॥९१॥
बाहेरी
१. (अनुस्मरेद्यः श्लोक ९)
पद्मासन
२. योगांतील पद्म या नांवाचें आसन
रचुनी । उत्तराभिमुख बैसोनि । जीवीं सुख सूनि
३. घेऊन
। क्रमयोगाचे ॥९२॥
आंतु
१. (भक्त्या युक्तो)
, मीनलेनि
२. एकवटलेल्या
मनोधर्मं । स्वरूपप्राप्तीचेनि प्रेमें । आपेआप संभ्रमें
३. त्वरेनें
। मिळावया ॥९३॥
आकळलेनि
१. (योगबलेन चैव)
योगें । ‘मध्यमा
२. सुषुम्ना
मध्य मार्गे’ । अग्निस्थानौनि निगे । ब्रह्मरंध्रा
३. अग्निचक्रापासून ब्रह्मरंध्राकडे निघते
॥९४॥
तेथ अचेत चित्ताचा सांगातु
१. प्राण व चित्त अथवा देह व चैतन्य यांची संगत
आहाचवाणा
२. उगाच बाहेरून आहे असें दिसतें
दिसे मांडतु । जेथ प्राणु गगनाआंतु । संचरे कां ॥९५॥
परी
१. (सम्यक्)
मनाचेनि स्थैर्ये धरिला । भक्तीचिया भावना भरला । योगबळें आवरला
२. व्यापला
। सज्ज होऊनि ॥९६॥
तो जडाजडातें
१. अचेतनाला व सचेतनाला
विरवितु
२. लीन करितो
भूलतामाजीं
३. भुकुटीमध्यें
संचरतु । जैसा घंटानाद लयस्तु
४. लीन होतो
। घंटेसीच होय ॥९७॥
कां झांकलिये घटींचा दिवा । नेणिजे काय जाहला ? केव्हां ? । या रीतीं जो, पांडवा । देह ठेवी ॥९८॥
तो
१. (स तं परं पुरुषमुपैति दिव्यम्)
, केवळ परब्रह्म । जया ‘परमपुरुष’ ऐसें नाम । तें माझें निजधाम । होऊनि, ठाके ॥९९॥

सांडूनि हृदयस्था अच्युतातें ।
वरावें वरां
१. पती
निर्दैवांतें
२. दुर्भागी
। तंव तो द्वैतभयें भयचकिते
३. भयाने दचकलेला
। काळग्रस्ते सर्वदा ॥२५१॥
जे निजभयें
१. स्वतःच्या मरणाचे भय
सर्वदा दुःखी ।
ते भार्येसी
२. पत्नी
काय करिती सुखी?। अवघीं पडली काळमुखीं । न दिसे ये लोकीं सुखदाता ॥२५२॥
असो नराची ऐशी गती ।
वरूं
१. (पा.भे. करूं)
अमरांमाजी
२. देवांमध्ये
अमरपती
३. इन्द्र
। विळांत ते चौदा निमती । पदच्युति
४. पदभ्रष्ट
अमरेंद्रा ॥२५३॥
एवं सुर नर लोक लोकीं ।
आत्ममरणें
१. स्वतःचे मरण
सदा दुःखी । ते केवीं भार्येसी करिती सुखी । भजावें
२. सेवा करावी
मूर्खी ते ठायीं ॥२५४॥
धन्य माझी भाग्यप्राप्ती ।
येचि क्षणीं येचि रातीं । झाली विवेकवैराग्यप्राप्ती । रमापति
१. भगवान विष्णु
तुष्टला ॥२५५॥
नूंन मे भगवान्प्रीतो, विष्णुः केनापि कर्मणा ।
निर्वेदोऽयं दुराशाया, यन्मे जातः सुखावहः ॥३७॥
श्लोकार्थ – खरोखर माझ्या कोणत्या तरी चांगल्या कर्माने परमात्मा संतुष्ट झाला आहे कारण दुष्ट बुद्धी असलेल्या मला कल्याणकारक असे वैराग्य उत्पन्न झाले आहे. ॥३७॥
ये जन्मींचें माझें कर्म ।
पाहतां केवळ निंद्य धर्म
१. पाप कर्म
। मज तुष्टला पुरुषोत्तम । पूर्वजन्मसामग्रीं ॥२५६॥
मज कैंचें पूर्वजन्मीं साधन? ।
ज्याचें नाम ‘पतितपावन’ । कृपाळु जो जनार्दन । त्याचे कृपेनें हे घडलें ॥२५७॥
दुष्ट दुराशा व्यभिचारु ।
भगद्वारा
१. योनीच्या व्यवसायावर
चालवी संसारु । तिसी मज वैराग्ययुक्त विचारु । विष्णु साचारु तुष्टला ॥२५८॥
जरी असतें पूर्वसाधन ।
तरी निंद्य नव्हते मी आपण । योनिद्वारा कर्माचरण । पतित पूर्ण मी एकी
१. (पा.भे. एक)
॥२५९॥
यापरी मी पूर्ण पतित ।
पतितपावन जगन्नाथ । तेणें कृपा करून येथ । केलें विवेकयुक्त वैरागी ॥२६०॥
तेणें वैराग्यविचारें देख ।
दुष्ट दुराशेचे फिटले
१. नाहीसे झाले
दुःख । मज झालें परम सुख । निजसंतोख
२. आत्मसुख
पावलें ॥२६१॥
दुःख आदळतां अंगासी ।
वैराग्य नुपजे अभाग्यासी । भगवंतें कृपा केली कैशी । दुःखें
१. (पा.भे. हें दुःख)
निजसुखासी दीधलें ॥२६२॥
मैवं स्युर्मन्दभाग्यायाः क्लेशा निर्वेदहेतवः ।
येनानुबन्धं निर्हृत्य, पुरुषः शममृच्छति ॥३८॥
श्लोकार्थ – वैराग्य उत्पन्न झाले असताना सर्व सांसारिक वासनांचा बंध तोडून पुरुष चिरकालिक कल्याण प्राप्त करून घेतो. मी अभागी असल्याने वास्तविक मला झालेल्या क्लेशाने वैराग्य उत्पन्न व्हावयास नको होते. (परंतु ईशकृपा झाली आणि ते झाले.)॥३८॥
अंगी आदळतां दुःखद्वंद्व
१. पूर्णपणे

अभाग्यासी ये सबळ
२. अधिक, फार
क्रोध । थिता विवेक होय अंध । भाग्यमंद ते जाणा ॥२६३॥
थिता
१. असणारा, स्थित
विवेक होय अंध ।
भाग्यमंद
२. मंदभाग्य, दुर्दैवी
ते जाणा ॥२६३-ब॥
दुःख देखतांचि दृष्टीं ।
ज्यासी वैराग्य विवेकेंसीं उठी
१. उत्पन्न होते
। तेणें छेदूनि स्नेहहृदयगांठी
२. विषयासक्तीची हृदयातील गाठ
। पावे उठाउठी निजसुख ॥२६४॥
पुरुषांसी परमनिधान ।
विवेकयुक्त वैराग्य जाण । तेणे होऊनियां प्रसन्न । समाधान पावती ॥२६५॥
मी पूर्वी परम अभाग्य ।
महापुरुषांचे जें निजभाग्य
१. विशेष भाग्य
। तें भगवंतें दिधलें वैराग्य । झालें श्लाघ्य तिहीं लोकीं ॥२६६॥
तेनोपकृतमादाय, शिरसा ग्राम्यसङ्गताः ।
त्यक्त्वा दुराशाः शरणं, व्रजामि तमधीश्वरम् ॥३९॥
श्लोकार्थ – भगवंताने मला वैराग्य देऊन माझ्यावर मोठा उपकार केला आहे, तो मी मस्तकी धारण करते. आता मी या दुष्ट वासनांचा त्याग करून त्या सर्वेश्वर प्रभूला अनन्य भावाने शरण जाते. ॥३९॥
कृपा करोनि भगवंतें ।
निजवैराग्य
१. स्वतःचे वैराग्य
दिधलें मातें । तेणें सांडविलें दुराशेतें । ग्राम्य विषयातें छेदिलें ॥२६७॥
तो उपकार मानूनियां माथां ।
त्यासी मी शरण जाईन आतां । जो सर्वाधीश नियंता । त्या कृष्णनाथा मी शरण ॥२६८॥
सन्तुष्टा श्रद्दधत्येतद्यथालाभेन जीवती ।
विहराम्यमुनैवाहमात्मना रमणेन वै ॥४०॥
श्लोकार्थ – ह्याच्यावर विश्वास ठेवून, समाधान वृत्तीने, ज्यावेळी जे मिळेल त्यावर निर्वाह करून, साक्षात असणाऱ्या, केवळ आत्मस्वरूपच अशा परमात्म्याशी कायावाचामनाने मी विहार करीन. ॥४०॥
शरण गेलियापाठीं ।
सहज संतुष्ट मी ये सृष्टीं । स्वभावें सत्श्रद्धा
१. पूर्ण भरवसा
पोटीं
२. मनात
। जीविका गांठी अदृष्ट
३. प्रारब्ध कर्म
॥२६९॥
मुनीश्वर भोगिती निजात्मा ।
त्या मी भोगीन आत्मयारामा । जो का पुरवी निष्कामकामा
१. निष्कामांची इच्छा पूर्ण करणारा
। तो परमात्मा वल्लभु ॥२७०॥
ब्रह्मादिक समर्थ असती ।
ते सांडूनियां निश्चितीं । भगवद्भजनाची स्थिती । अतिप्रीती कां म्हणसी?॥२७१॥
मजसारिखिया दुराचारी ।
जड जीवांतें उद्धरी । तारकु तोचि भवसागरीं । स्वामी श्रीहरि कृपाळु ॥२७२॥
संसारकूपे पतितं, विषयैर्मुषितेक्षणम् ।
ग्रस्तं कालाहिनाऽऽत्मानं, कोऽन्यस्त्रातुमधीश्वरः ॥४१॥
श्लोकार्थ – ह्या संसारगर्तेत पडलेल्या, विषयांध झालेल्या आणि काळाच्या जबड्यात सापडलेल्या जीवाला तारण्यास तुझ्याशिवाय दुसरा कोण समर्थ आहे ? ॥४१॥
संसारलक्षण कूप
१. विहीर
अंध ।
तेथ विषयदृष्टी विषयांध । पडोनि गेले अंधांध
२. आंधळ्यात आंधळे
। बुद्धिमंद उपायीं ॥२७३॥
ते कल्पनाजळी
१. भ्रमरूप पाण्यात
बुडाले ।
वासनाकल्लोळी
२. वासनेच्या लहरीने
कवळले । दंभमदादि जळचरी तोडिले । तृष्णेच्या पडले कर्दमीं
३. चिखलात
॥२७४॥
दुःखाच्या खडकी आदळले ।
स्वर्गपायरीसी अडकले । तेथूनिही एक पडले । निर्बुजले
१. गुदमरले
भवदळें
२. संसाराच्या समूहात (पा.भे. भवजळे)
॥२७५॥
नास्तिकें गेली सबुडबुडीं ।
कर्मठी धरिल्या कर्मदरडी । वेदबाह्य ती बापुडीं । पडली देव्हडीतळवटीं
१. वाकडे-तिकडे होऊन तळापर्यंत; (पा.भे. देवडी)
॥२७६॥
निंदेचे शूळ
१. (पा.भे. मूळ)
कांटे ।
फुटोनि निघाले उफराटे । द्वेषाचे पाथर
२. दगड
मोठे
३. (पा.भे. मोटे)
। हृदय फुटे लागतां ॥२७७॥
कामाची उकळी प्रबळ ।
भीतरूनि बाहेरी ये सबळ
१. जोराने
। तेणें डहुळलें तें जळ । होय खळबळ जीवासी ॥२७८॥
सुटले क्रोधाचे चिरे
१. दगड

वरी पडिल्या उरी नुरे । वनितामगरी
२. स्त्रीरूपी मगरींनी
नेलें पुरें । विवरद्वारे
३. कपारीत
आंतौतें ॥२७९॥
तेथ अवघियांसी एकसरें
१. एकदम

गिळिलें काळे काळअजगरें । विखें
२. विषाने
घेरिलें
३. (पा.भे. घारलें)
थोरें घोरें
४. भयंकर
। ज्ञान पाठिमोरें
५. फारकत
सर्वांसी ॥२८०॥
सर्प चढलिया माणुसा ।
गूळ कडू लागे कैसा । निंब खाये घसघसां । गूळसा
१. गुळासारखा
कहणौनि ॥२८१॥
केवळ विषप्राय विषयो कडू ।
तो प्रपंचिया जाला गोडु । अमृतप्राय परमार्थ गोडु । तो जाहला कडू विषयिकां
१. विषयासक्तांना
॥२८२॥
कूपाबाहेर वासु ज्यांसी ।
ते न देखती कूपाआंतुलांसी । कूपांतले बाहेरिलांसी । कदाकाळेंसी न देखती ॥२८३॥
ऐसिया पीडतयां जीवांसी ।
काढावया धिंवसा
१. धैर्य
नव्हे कोण्हासी । तुजवांचोनि हृषीकेशी! । पाव वेगेंसी कृपाळुवा! ॥२८४॥
एवं दुःखकूपपतितां
१. दुःखरूपी विहिरीत पडलेल्यास

हृदयस्थु भगवंतुचि त्राता
२. रक्षणकर्ता
। धांव पाव कृष्णनाथा! । भवव्यथा निवारीं
३. दूर कर
॥२८५॥
ऐसें जाणोनि तत्त्वतां ।
त्याच्या चरणा शरण आतां । शरण गेलिया सर्वथा
१. पूर्णपणे
। सहज भवव्यथा निवारे ॥२८६॥
आत्मैव ह्यात्मनो गोप्ता, निर्विद्येत यदाखिलात् ।
अप्रमत्त इदं पश्येद्ग्रस्तं कालाहिना जगत् ॥४२॥
श्लोकार्थ – सर्व पदार्थांच्या ठिकाणी वैराग्य उत्पन्न झाले म्हणजे आत्माच आत्म्याचे रक्षण करणारा होतो. ज्या वेळी सावध राहून, हे सर्व जग कालरूपी सर्पाने ग्रासले आहे असे तो पाहतो त्या वेळीच वैराग्य दृढ होते. ॥४२॥
ऐसें कळलें जी तत्त्वतां ।
येथ आपणचि आपणिया त्राता । सर्व पदार्थी सर्वथा । निर्वेदता
१. वैराग्य
दृढ जाहल्या ॥२८७॥
दृढ वैराग्यता ते ऐशी ।
विषयो टेंकल्या
१. स्पर्श झाला असता
अंगासी । चेतना
२. उत्सुकता, उतावीळपणा
नव्हे इंद्रियांसी । निद्रितापासीं जेवीं रंभा ॥२८८॥
अथवा वमिलिया
१. ओकलेल्या
अन्ना ।
जेवीं वांछीना रसना
२. जिव्हा
। तेवीं विषय देखोनि मना । न धरी वासना आसक्ती ॥२८९॥
तें वैराग्य कैसेनि जोडे? ।
तरी सावधान पाहतां रोकडे
१. प्रत्यक्ष
। जग काळें गिळिलें चहूंकडे । वेगळे पडे तें नाहीं ॥२९०॥
पिता-पितामह
१. आजोबा
काळें नेले ।
पुत्रपौत्रां
२. मुलगा-नातू
काळे गिळिलें । वैराग्य नुपजे येणे बोलें । तरी नागवले
३. फसले
नरदेहा ॥२९१॥
मृत्युलोक याचें नांव ।
अनित्य स्वर्गाची काइसी हांव
१. प्रबल इच्छा
?। वैराग्येवीण निर्दैव । झाले सर्व सर्वथा ॥२९२॥
ब्राह्मण उवाच- एवं व्यवसितमतिर्दुराशां कान्ततर्षजाम् ।
छित्त्वोपशममास्थाय, शय्यामुपविवेश सा ॥४३॥
श्लोकार्थ – ब्राह्मण म्हणाला- याप्रमाणे विषयी जनांबरोबर भोगाची वासना तिने टाकून दिली व आपली निष्ठा भगवच्चरणी स्थिर करून ती सुखाने झोपी गेली. ॥४३॥
अवधूत म्हणे यदूसी ।
धन्य भाग्य तये वेश्येसी । वैराग्य उपजलें तिसी । विवेकेंसी निजोत्तम
१. *
॥२९३॥
एवं विवंचूनि
१. विचार करून
निजबुद्धीं
२. स्वबुद्धीने

परपुरुषदुराशा छेदी । ज्याचेनि संगें आधिव्याधी
३. चिंता व रोग
। बहु उपाधी बाधक ॥२९४॥
जे उपाधीचेनि कोडें
१. हौस, आवड, इच्छा

जन्ममृत्यूचा पूरु चढे । दुःखभोगाचें सांकडें
२. संकट
। पाडी रोकडे
३. प्रत्यक्ष
जीवासी ॥२९५॥
येणें वैराग्यविवेकबळे ।
छेदूनि दुराशेची मूळे । उपरमु पावली एकेवेळे
१. एकदम
। निजात्मसोहळे ते भोगी ॥२९६॥
नित्यसिद्धसुखदाता
१. (पा.भे. नित्यसिद्धुसुख-दाता)

तो हृदयस्थ कांत
२. पती
आश्रितां । विकल्प
३. भ्रम
सांडूनि चित्ता । वेगीं हृदयस्था मीनली
४. एकरूप झाली (पा.भे. मानली)
॥२९७॥
त्यासी देखतां अनुभवाचे दिठीं ।
ऐक्यभावें घातली मिठी । निजसुख पावली गोरटी
१. सुंदर, गोरी स्त्री
। उठाउठी तत्काळ ॥२९८॥
बोलु
१. शब्द
घेऊनि गेला बोली ।
लाज लाजोनियां गेली । दृश्य-द्रष्टा दशा ठेली । वाट मोडिली विषयांची ॥२९९॥
सुखें सुखावलें मानस ।
तें सुखरूप जालें निःशेष
१. पूर्ण
। संकल्पविकल्प पडिले वोस । दोघां सावकाश निजप्रीती ॥३००॥
नाबद
१. खडीसाखर
पडलिया उदकांत ।
विरोनि तया गोड करित । तेवीं निराशी
२. निरिच्छ झालेली वेश्या
पावोनि भगवंत । समरसत
३. एकरूप
स्वानंदें ॥३०१॥
तेथ हेतूसी नाही ठावो ।
निमाला भावाभावो । वेडावला अनुभवो । दोघां प्रीती पाहा हो अनिवार
१. अमर्याद, अतिशय
॥३०२॥
सांडूनि मीतूंपणासी ।
खेव
१. आलिंगन
दिधलें समरसीं । मग समाधीचिये सेजेशी
२. शय्येवर
। निजकांतेंसी पहुडली
३. शयन केले
॥३०३॥
झणे
१. कदाचित्
मायेची लागे दिठी ।
यालागीं स्फूर्तीचिया कोटी । निंबलोण गोरटी । उठाउठी वोवाळी ॥३०४॥
ऐसी समाधिशेजेशीं ।
पिंगला रिघे निजसुखेंसी । अवधूत म्हणे यदूसी । वैराग्यें वेश्येसी उपरमु ॥३०५॥
वैराग्ये छेदिले आशापाश ।
पिंगला जाहली गा निराश
१. (पा.भे. निराशेंसी)
असमसाहस
२. अपार
। सुखसंतोष सर्वदा ॥३०६॥

१३७९. हीन
१. दुर्बल
, शूर बुद्धिपाशीं । आकृतीसी
२. आकाराच्या ठिकाणी
भेद नाहीं ॥१॥ एक दांडी एक खांदीं। पदोपदीं भोगणें ॥ध्रु॥ एका ऐसें एक नाहीं । भिन्न पाहीं प्रकृती
३. मूळ स्वभाव, अष्टधा प्रकृती
॥३॥ तुका म्हणे भूमी खंडे
४. भेद होतो
। पीक दंडे
५. शोभते, साजेसे असते
जेथें तें ॥४॥
१३८०. काय बोलों सांगा । या उपरी पांडुरंगा! ॥१॥ काही आधारावांचून
१. वेदादिकांच्या प्रामाण्याशिवाय
। पुढे न चले वचन ॥ध्रु॥ वाढे ऐसा रस
२. आनंद
। कांहीं करावा सौरस
३. प्रसाद, यत्न
॥३॥ भक्तिभाग्य सीमा
४. अतिशय समृद्धी, पराकाष्ठा
। द्यावा जोडोनियां प्रेमा ॥४॥ कोरड्या
५. शुष्क शब्दांनी, वचनांनी
उत्तरीं । नका गौरवूं
६. सुशोभित करू नका
वैखरी
७. वाणी, वचन
॥५॥ करी विज्ञापना
८. विनंती
। तुका प्रसादाची दाना ॥६॥
१३८१. आहाच
१. व्यर्थ, वरवर
तो मोड
२. अंकुर
वाळलिया मधीं । अधीराची
३. उतावीळ माणसाची
बुद्धि तेणें न्यायें ॥१॥ म्हणऊनि संग न करीं दुसरें । चित्त मळीन
४. अशुद्ध
द्वारे दोड पडे
५. (वा.) अहित, वाईट होते (पा.भे. द्वाड)
॥ध्रु॥ विषासाठी सर्पा भयाभीत लोक । हे तो सकळीक जाणतसां ॥३॥ तुका म्हणे काचें
६. कच्चे
राहे कुळाकुड
७. वाईट लाकूड
। अवगुण तो नाड
८. प्रतिबंध
ज्याचा तयां ॥४॥
१३८२. क्षणाक्षणां जीवा वाटतसे खंती
१. दुःख
। आठवती चित्तीं पाय देवा! ॥१॥ येईं वो येईं वो येईं लवलाहीं
२. लवकर
। आलिंगूनि बाही
३. बाहु पसरून
क्षेम
४. कल्याण, हित
देईं ॥ध्रु॥ उताविळ मन पंथ अवलोकीं
५. वाट पाहतो, प्रतीक्षा करतो
आठवती
६. (पा.भे. आठवे ते)
चुकी काय झाली? ॥३॥ तुका म्हणे माझ्या जीवींच्या जीवना । घाला नारायणा उडी वेगीं ॥४॥
१३८३. आळी
१. हट्ट
करावी ते कळतें बाळका । बुझवावें
२. समजवावे
हें कां नेणां तुम्ही? ॥१॥ निवाड
३. निकाल
तो येथे असे पायापाशीं । तुम्हां आम्हांविशीं एके ठायीं ॥ध्रु॥ आणीक तें आम्हीं न देखोंसें झालें । जाणावें तें शिणले भागलेसें
४. दमणे, श्रमणे
॥३॥ तुका म्हणे तुम्हां लागते सांगावें? । अंतरीचे
५. अंतःकरणातील
ठावें
६. माहीत
काय नाहीं?॥४॥
१३८४. तांतडीने
१. त्वरा, घाई
आम्हां धीरचि न कळे । पाळावे हे लळे
२. हट्ट, लाड
लवलाहीं ॥१॥ नका कांहीं पाहों सावकाशी देवा! । करा एक हेवा
३. उत्कंठा, लोभ
तुमचा माझा ॥ध्रु॥ वोरसाचा
४. पान्हा (कृपेचा)
यावा, सांभाळावी प्रीत । नाहीं राहों येत अंगी धंदा ॥३॥ तुका म्हणे मज नका गोवूं खेळा । भोजनाची वेळा राखियेली ॥४॥
१३८५. नाहीं लोपों येत गुण । वेधी
१. आकृष्ट करणे
आणिकां चंदन ॥१॥ न सांगतां पडे ताळा
२. ताळमेळ
। रूप दर्पणीं सकळां ॥ध्रु॥ सारविलें
३. लिंपणे
वरी । आहाच तें क्षणभरी ॥३॥ तुका म्हणे वोहळे
४. पाण्याचा लहान प्रवाह, नाला
। सागराच्या ऐसें व्हावें? ॥४॥
१३८६. वचनेंचि
१. बोलणे (भगवंताचे नाम, गुण)
व्हावे आपण उदार । होईल विश्वंभर संतुष्टचि ॥१॥ सत्य संकल्पाची फळें बीजाऐशीं । शुद्ध नाहीं नासी पावों येत ॥ध्रु॥ वंचिलिया
२. कुचराई, चुकवाचुकव केली असता
काय येईल उपेगा? । शरीर हे नरकाचेंचि आळे
३. साठविण्याची जागा
॥३॥ तुका म्हणे जीव जितां थारे
४. आश्रयाने (पा.भे. थोर)
। करितां विचार सांपडलें वर्म । समूळ निश्रम
५. कष्टावाचून
परिहाराचें
६. निराकरण
॥१॥ मज घेऊनियां
७. जीवत्व, अहंपदवाच्य
, आपणांसी
८. आपले पारमार्थिक लक्ष्य स्वरूप
द्यावें ।
१३८७. उखते
१. एकदम
आयुष्य जायाचे
२. व्यतीत होणे
कलेवर
३. शरीर
। अवघे वोडंबर
४. अवडंबर, भासमात्र, पोकळ
विषयांचें ॥१॥ कोणासी हा लागे पुसणे
५. विचारणे
विचार । मनचि सादर
६. तत्पर
करूं आतां ॥ध्रु॥ उत्पत्ति प्रळय पडिलें दळण । पाकाचें
७. मिष्टान्नाचे
भोजन बीज
८. (वासना)
वाढे ॥३॥ तुका म्हणे जाऊं अभयाच्या ठायां । रिघों देवराया शरण वेगीं ॥४॥
१३८८. बोलावें म्हूण बोलतों उपाय । प्रवाहें जाय गंगा-जळ ॥१॥ भाग्य योगें कोणां घडेल सेवन । कैंचे येथें जन अधिकारी? ॥ध्रु॥ मुखीं देतां
१. (पा.भे. घेतां)
घांस पळविती तोंड । अंगीचिया
२. स्वभावतः
भांड
३. नास्तिक, अनधिकारी
असुखानें
४. दुःखाने
॥३॥ तुका म्हणे पूजा करितों देवाची । आपुलिया रुची
५. इच्छा, आवड
मनाचिये ॥४॥
१३८९. लटिक्याची वाणी वचनाचा संवाद । नाहीं कोणा वाद रुचों येत ॥१॥ अन्याय
१. अपराध
तो त्याचा नव्हे वायचाळा
२. व्यर्थ बडबड, बोलण्याचा व्यर्थ चाळा
। मायबापी वेळां न साधिली ॥ध्रु॥ अनावर अंगीं प्रबळ अवगुण । तांतडीने मन लाहो
३. त्वरा, हव्यास, हट्ट
साधी ॥३॥ तुका म्हणे दोष आणि अवकळा
४. फजिती, तेजोहीनता, दुर्दशा
। न पडतां ताळा
५. ताळमेळ
घडतसे ॥४॥
१३९०. नये स्तवूं काचें
१. कच्चे, अनधिकारी, खोटे
होतें क्रियानष्ट
२. कृतघ्न, स्वतःचे वचन न पाळणारा, खोटा
फुंदाचे
३. गर्वाने ताठलेला, अभिमानी
ते कष्ट भंगा
४. नाशास
मूळ
५. कारण
॥१॥ नाही परमार्थ साधत लौकिकें
६. प्रतिष्ठा, कीर्ती
। धरून होतों फिके अंगा आले ॥ध्रु॥ पारखिया
७. परीक्षक, मर्मज्ञ
पुढे नये घालूं तोंड
८. (वा.) मध्ये-मध्ये बोलू नये, विनाकारण हस्तक्षेप करू नये
तुटी
९. अंत
लाभा, खंड होतो माना ॥३॥ तुका म्हणे तरी मिरवते१०
१०. शोभते
परवडी११
११. समृद्धी, सुकाळ
कामावल्या१२
१२. मिळविली असता
गोडी अविनाश ॥४॥
१३९१. कोण्या काळे येईल मना । नारायणा तुमचिया ॥१॥ माझा करणे अंगीकार । सर्व भार फेडूनि ॥ध्रु॥ लागली ये
१. (पा.भे. हे)
तळमळ चित्ता । तरी दुश्चिता
२. उदास, खिन्न (पा.भे. दुश्चित्ता)
संसारीं ॥३॥ मुखाचीच पाहे वास
३. वाट
। मागे दास सांभाळी ॥४॥ इच्छा पूर्ण झाल्याविण । कैसा शीण वारेल
४. दूर होईल
? ॥५॥ लाहो
५. छंद
काया मने वाचा । दिवसाच्या भेटीचा ॥६॥ कंटाळा तो न धरावा । तुम्ही देवा दासाचा ॥७॥ तुका म्हणे माझे वेळे । न कळे कां हें उफराटें
६. उलटे
॥८॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

1 thought on “दिवस – ८७. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top