अनुक्रमणिका
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ८. ओवी क्र. १०० ते १२३
यदक्षरं वेदविदो वदन्ति, विशन्ति यद्यतयो वीतरागाः ।
यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति, तत्ते पदं सङ्ग्रहेण प्रवक्ष्ये ॥११॥
सकळां११. (यदक्षरं)
जाणणेयां जे लाणी२२. शेवट, अन्तिम गंतव्य
। तिये जाणिवेची जे खाणी । तयां ज्ञानियांचिये आयणी३३. निर्णयानें, बुद्धीनें
। जयातें अक्षरु४४. अविनाशी
म्हणिपे ॥१००॥
चंडवातेही११. मोठ्या वाऱ्यानें
न मोडे । तें गगनचि कीं फुडें२२. खरें, स्पष्ट
! । वांचूनि, जरी होईल मेहुडें३३. मेघ
। तरी उरेल कैंचें ? ॥१०१॥
तेविं, जाणणेया जें आकळिलें । तें जाणिवलेपणेंचि उमाणलें११. समजलें, मोजलें, अटकळीत आलें
। मग, नेणवेचि तया म्हणितलें । ‘अक्षर’ सहजें ॥१०२॥
म्हणौनि११. (वेदविदो वदन्ति)
वेदविद२२. वेदार्थपारंगत
नर । म्हणती जयातें अक्षर । जें प्रकृतीसी पर३३. मायातीत
। परमात्मरूप ॥१०३॥
आणि११. (विशन्ति यद्यतयो वीतरागाः)
विषयांचें विष उलंडूनि२२. लवंडून, पालथे करून
। जे सर्वेन्द्रियां प्रायश्चित्त देऊनि । आहाति३३. आहेत (उदासीनवृत्तीने)
देहाचिया बैसोनि । झाडातळीं ॥१०४॥
ते यापरी विरक्त । जयाची निरंतर वाट पाहात । निष्कामासि अभिप्रेत११. इष्ट
। सर्वदा जें ॥१०५॥
जयाचिया११. (यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति)
आवडी । न गणिती ब्रह्मचर्याचीं सांकडीं२२. संकटें
। निष्ठुर होऊनि, बापुडीं३३. दीन
। इंद्रियें करिती ॥१०६॥
ऐसें११. (तत्ते पदं सङ्ग्रहेण प्रवक्ष्ये)
जें पद । दुर्लभ आणि अगाध । जयाचिये थडिये२२. तीरीं
वेद । चुबुकळिले३३. भिजून चिंब झालें, बुचकळले
ठेले ॥१०७॥
तें, ते पुरुष होती । जे यापरी लया जाती । तरी पार्था, हेचि स्थिती । एक वेळ सांगों ॥१०८॥
तेथ११. (चूर्णिका)
अर्जुनें म्हणितलें ‘स्वामी । हेंचि म्हणावया होतों पां मी । तंव सहजें कृपा केली तुम्ही । तरी बोलिजो कां ॥१०९॥
परि बोलावें तें अति सोहपें११. सोपें
‘ । तेथें म्हणितलें त्रिभुवनदीपें२२. श्रीकृष्णानें
। ‘तुज, काय नेणों ? संक्षेपें । सांगेन; ऐक’ ॥११०॥
तरी, मना या बाहेरिलीकडे । यावयाची साविया११. सहज
सवे२२. संवय
मोडे । हें हृदयाचिया डोहीं बुडे । तैसें कीजे ॥१११॥
सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च ।
मूर्ध्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम् ॥१२॥
परी११. (सर्वद्वाराणि संयम्य)
हे तरीच घडे । जरी संयमाचीं२२. इंद्रियनिग्रहाची
अखंडें । सर्वद्वारीं कवाडें । कळासती३३. खिळतात, बंद होतात
॥११२॥
तरी११. (मनो हृदि निरुध्य च)
सहजें मन कोंडलें । हृदयींचि असेल उगलें२२. स्थिर, गप्प
। जैसें ‘करचरणीं मोडलें । परिवरु३३. घर
न संडीं’ ॥११३॥
तैसें११. (मूर्ध्याधायात्मनः प्राण)
चित्त राहिलिया, पांडवा । प्राणांचा प्रणवुचि करावा । मग अनुवृत्तिपंथें२२. क्रमाक्रमानें
आणावा । मूर्ध्नवरी३३. ब्रह्मरंध्रापर्यंत
॥११४॥
तेथ११. (आस्थितो योगधारणां)
आकाशीं मिळे न मिळे । तैसा धरावा धारणाबळें२२. धारणाशक्तीनें
। जंव मात्रात्रय३३. अकार, उकार, मकार
मावळे । अर्धबिंबीं४४. अर्धमात्रेत
॥११५॥
तंववरी तो समीरु११. प्राणवायु
। निराळीं२२. मूर्ध्याकाशात
कीजे स्थिरु । मग लग्नीं जेविं ॐकारु । बिंबींच विलसे३३. ऐक्यावस्थेंत शोभतो (लयास पावतो)
॥११६॥
ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन् ।
यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् ॥१३॥
तैसें११. (ओमिति)
ॐ हैं स्मरो सरे२२. स्मरण्याचें राहतें
। आणि तेथेचि प्राणु पुरे३३. संपतो
। मग प्रणवातीत४४. ओंकाराहून पर
उरे । पूर्णघन५५. ब्रह्मानंदस्वरूप
जें ॥११७॥
म्हणौनि प्रणवैकनाम११. प्रणव हेंच एक नांव ज्याचें
। हें एकाक्षर ब्रह्म । जो माझें स्वरूप परम । स्मरतसांता२२. स्मरत असतां
॥११८॥
यापरी११. (यः प्रयातीति)
त्यजी देहातें । तो त्रिशुद्धीं२२. निश्चयानें
पावे मातें । जया पावणया परौतें । आणिक पावणें नाहीं ॥११९॥
तेथ अर्जुना, जरी विपायें११. कदाचित्
। तुझ्या जीवीं हन ऐसें जाये । ना, हें स्मरण मग होये । कायसयावरी अंतीं ? ॥१२०॥
इंद्रिया अनुघडु११. अवघड, संकट
पडलिया । जीविताचे२२. जीवंतपणाचें
सुख बुडालिया । आंतुबाहेरी उघडलिया३३. उघड दिसूं लागलीं असतां
। मृत्युचिन्हें ॥१२१॥
ते वेळीं बैसावेंचि कवणें ? । मग कवण निरोधी करणें११. इंद्रियें
?। तेथ काह्याचेनि२२. कोणाच्या (कोणत्या)
अंतःकरणें । प्रणव स्मरावा? ॥१२२॥
तरि गा ऐशिया ध्वनी११. संशयाला
। झणें थारा देशी हो२२. थारा देऊं नको
मनीं । पै नित्य सेविला मी; निदानीं३३. शेवटीं
। सेवकु होय ॥१२३॥ ॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ८, ओवी क्र. ३०७ ते ३३१ शेवट
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
आशेचे दुःख (३०७ ते ३१३)
आशा हि परमं दुःखं, नैराश्यं परमं सुखम् ।
यथा सञ्छिद्य कान्ताशां, सुखं सुष्वाप पिङ्गला ॥४४॥
श्लोकार्थ – विषयांची आशा हेच परम दुःख आहे आणि कोणत्याही प्रकारची आशा नसणे हेच परम सुख आहे. ग्राम्य रमणाबरोबर सुखोपभोगाची आशा सोडल्याबरोबर पिंगलेला आनंदाने झोप आली. ॥४४॥
आशा तेथ लोलुप्यता११. लंपटपणा, आसक्ती
।
आशेपाशी असे दीनता । आशा तेथ ममता । असे सर्वथा नाचती ॥३०७॥
आशेपाशी महाशोक ।
आशा करवी महादोख । आशेपाशी पाप अशेख११. संपूर्ण
। असे२२. उभे राहते
देख तिष्ठत ॥३०८॥
आशेपाशी अधर्म सकळ ।
आशा मानीना विटाळ११. दोष
। आशा नेणे काळवेळ । कर्म सकळ उच्छेदी२२. नष्ट करते
॥३०९॥
आशा अंत्यजातें उपासी ।
नीचसेवन११. नीचाची सेवा
आशेपाशीं । आशा न सांडी मेल्यासी२२. मेलेल्या माणसाविषयी
। प्रेतापाशी नेतसे ॥३१०॥
आशा उपजली अनंतासी११. विष्णुला
।
नीच वामनत्व आले त्यासी । आशें२२. निराशेने
दीन केलें देवांसी । कथा कायसी इतरांची?॥३११॥
जगाचा जो नित्य दाता ।
तो आशेनें केला भिकेसवता११. भिकारी
। वैऱ्याचे२२. शत्रू (बळी)
द्वारी झाला मागता३३. याचक
। द्वारपाळता तेणें त्यासी ॥३१२॥
आशा तेथ नाहीं सुख ।
आशेपाशी परम दुःख । आशा सर्वांसी बाधक । मुख्य दोष ते आशा ॥३१३॥
निराशेचे सुख (३१४ ते ३३१)
ज्याची आशा निःशेष११. मूळासकट
जाये ।
तोचि परम सुख लाहे२२. प्राप्त होतो
। ब्रह्मादिक वंदिती पाये । अष्टमा सिद्धि राहे दासीत्वें ॥३१४॥
निराशांचा शुद्ध भावो ।
निराशांपाशी तिष्ठे११. उभा राहतो
देवो । निराशांचे वचन पाहा हो । रावो२२. राजा
देवो नुल्लंघी ॥३१५॥
निराश तोचि सद्बुद्धि ।
निराश तोचि विवेकनिधी । चारी मुक्ती पदोपदीं११. पावलापावलाला
। नैराश्य आधी वंदिती ॥३१६॥
निराशा तीर्थांचे तीर्थ ।
निराशा मुमुक्षूचा अर्थ । निराशेपाशी परमार्थ । असे तिष्ठत निरंतर ॥३१७॥
जाण नैराश्यतेपाशीं ।
वैराग्य होऊन असे दासी । निराश पहावया अहर्निशीं११. दिवस-रात्र
। हृषीकेशी चिंतितु ॥३१८॥
निराशा देखोनि पळे दुःख ।
निराशेमाजी नित्यसुख । निराशेपाशीं संतोख । यथासुखें क्रीडतु ॥३१९॥
नैराश्याचे भेटीसी पाहाहो ।
धांवे वैकुंठींचा रावो । नैराश्याचा सहज स्वभावो । महादेवो११. भगवान शंकर
उपासी ॥३२०॥
निराशेपाशीं न ये आधी११. चिंता
।
निराशेपाशीं सकळ विधी२२. धर्म
। सच्चिदानंदपदीं । मिरवे३३. शोभातो
त्रिशुद्धी४४. सर्वकाळ
निराशु ॥३२१॥
ऐकोनि निराशेच्या नांवा ।
थोरला देवो घेतसे धांवा । त्या देवोनियां खेवा११. आलिंगन
। रूपनांवा विवरला ॥३२२॥
ते निराशेचा जिव्हाळा११. महत्त्व
।
पावोनि वेश्या पिंगला । जारपुरुषाशेच्या मूळा । स्वयें समूळा छेदिती झाली ॥३२३॥
जें आशापाशांचें छेदन ।
तेंचि समाधीचें निजस्थान११. स्वस्थान
। ते निजसमाधी२२. स्वरूपसमाधी
पावोन । पिंगला जाण पहुडली ॥३२४॥
सर्व वर्णांमाजीं वोखटी११. वाईट
।
कर्म पाहतां निंद्य दृष्टीं । ते वेश्या पावन झाली सृष्टी । माझे वाक्पुटीं कथा तिची ॥३२५॥
यालागीं वैराग्यापरतें११. वैराग्यापेक्षा
।
आन२२. निराळे
साधन नाहीं येथें । कृष्ण थापटी उद्धवातें । आल्हादचित्तें प्रबोधी ॥३२६॥
अवधूत सांगे यदूसी ।
प्रत्यक्ष वेदबाह्यता वेश्येसी । निराश होतां मानसीं । निजसुखासी पावली ॥३२७॥
यालागी कायावाचाचित्तें ।
उपासावें निराशेतें । यापरतें११. यापेक्षा
परमार्थातें । साधन येथे दिसेना ॥३२८॥
इतर जितुकी साधनें ।
तितुकी आशा-निराशेकारणे११. (पा.भे. निराशेकारणे)
। ते निराशा साधिली जेणें । परमार्थ तेणें लुटिला ॥३२९॥
कृपा जाकळिलें११. व्यापले
अवधूतासी ।
यदूसी धरोनियां पोटासी । निराशता हे जे ऐशी । अवश्यतेसी साधावी ॥३३०॥
एका जनार्दना शरण ।
त्याची कृपा परिपूर्ण । तोचि आशापाश छेदून । समाधान पाववी ॥३३१॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे परमहंससंहितायां एकाकारटीकायां अष्टमोऽध्यायः॥८॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु॥
आठवा अध्याय समाप्त (श्लोक ४४; ओव्या ३३१)
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. १३९२ ते १४११
१३९२.
घ्यावी तरी घ्यावी उदंडचि११. पुष्कळ
सेवा । द्यावें तरी देवा उदंडचि ॥१॥ ऐसी कैंची आम्ही पुरती२२. पुरेसे, पूर्ण
भांडवलें । आल्या वसवावें३३. वास्तव्य करावे
॥ध्रु॥ व्हावें तरी व्हावें बहुतचि दुरी । आलिया अंतरी वसवावें ॥३॥ तुका म्हणे तुझें सख्यत्व आपणीं । अससील ऋणी आवडीचा४४. प्रेमाचा
॥४॥
१३९३.
काय करूं जीव होतो कासावीस११. व्याकुळ
। कोंडिले दिस गमेचिना२२. करमत नाही
॥१॥ पडिले हे दिसे ब्रह्मांडचि३३. विश्व
वोस४४. ओसाड, शून्य
। दाटोनि उछ्वास५५. दम कोंडून
राहातसे ॥ध्रु॥ तुका म्हणे अगा६६. अहो!
सर्व जाणतिया । विश्वंभरें काया७७. शरीर
निववावी८८. शांत करावे, शीतल करावे
॥३॥
१३९४.
सुकलिया कोंभा अत्यंत जळधरें११. मेघवृष्टीची
। तेणेंचि प्रकारे न्याय२२. रीत, नियम
असे ॥१॥ न चले पाउलीं सांडीं गरुडासन । मनाचे हो मन त्वरेलागी ॥ध्रु॥ तुका म्हणे भूक न साहावे बाळा । जीवनाची कळा३३. प्राण
ओढलीसे ॥३॥
१३९५.
शृंगारिक११. आलंकारिक
माझी नव्हतीं उत्तरें । आळवितों खरे अवस्थेच्या ॥१॥ न घालावा मधी कामाचा विलंब । तुम्ही तो स्वयंभ२२. मूळचेच, स्वभावतः, स्वतःसिद्ध
करुणामूर्ति ॥ध्रु॥ तुका म्हणे केले सन्मुख वदन३३. मुख
। देखतां चरण पोटाळीन४४. मिठी मारीन, कवटाळून पोटाशी धरीन
॥३॥
१३९६.
तूं माझी माउली तूं माझी साउली । पाहातों वाटुली११. वाट
पांडुरंगे! ॥१॥ तूं मज एकुला वडील धाकुला । तूं मज आपुला सोयरा जीव ॥ध्रु॥ तुका म्हणे जीव तुजपाशीं असे । तुझियानें२२. तुझ्यावाचून
ओस३३. ओसाड, शून्य
सर्व दिशा ॥३॥
१३९७.
कराल ते करा । हातें आपुल्या दातारा! ॥१॥ बळि-याची आम्ही बाळें । असो निर्भर११. आनंदाने परिपूर्ण
या सळें ॥ध्रु॥ आतां कोठें काळ । मध्ये रिघेल२२. प्रवेश करणे
ओंगळ३३. वाईट, दुष्ट
॥३॥ तुका म्हणे पंढरीराया! । थापटितों४४. थापटीत आहे
ठोक बाह्या ॥४॥
१३९८.
डोळां भरिलें रूप । चित्तीं पायांचा संकल्प ॥१॥ अवघीं घातली वांटणी११. विभागणी
। प्रेम राहिले कीर्तनीं ॥ध्रु॥ जिव्हा केली माप२२. परिमाण
। राशी हरिनाम अमुप३३. असंख्य, अमीत
॥३॥ भरूनियां भाग४४. वाटा, हिस्सा
। तुका बैसला पांडुरंग ॥४॥
१३९९.
आतां आहे नाहीं । न कळे आळीकरा११. हट्ट करणाऱ्यास
कांहीं ॥१॥ देसी पुरवुनी इच्छा । आतां पंढरीनिवासा! ॥ध्रु॥ नेणें भाग शीण२२. दुःख, कष्ट
। दुजें कोणी तुम्हांविण ॥३॥ आतां नव्हे दुरी । तुका पायीं मिठी मारी ॥४॥
१४००.
संकल्पासी अधिष्ठान । नारायण गोमटें११. चांगले, कल्याण
॥१॥ अव-घियांचे पुरे कोड२२. इच्छा पूर्ण होते
। फिटे३३. नाहीसे होते
जड देहत्व ॥ध्रु॥ उभयलोकीं उत्तम कीर्ती । देव चित्तीं राहिलिया ॥३॥ तुका म्हणे जीव धाय४४. तृप्त होतो
। नये हाय५५. तळमळ, इच्छा, दुःख
जवळी ॥४॥
१४०१.
भाग्यवंतां हेचि जोडी११. लाभ
। परवडी२२. सुकाळ, समृद्धी, पंगत
संतांची ॥१॥ धन घरी पांडुरंग । अभंग३३. अविनाश
जें सरेना ॥ध्रु॥ जनाविरहित हा लाभ । टांचे४४. कमी पडते
नभ५५. आकाश
सांठवणे ॥३॥ तुका म्हणे विष्णुदासां । नाहीं आशा दुसरी ॥४॥
१४०२.
जरि आले राज्य मोळविक्या११. लाकडांची मोळी विकून उदरनिर्वाह करणारा
हातां । तरि तो मागुता व्यवसायी ॥१॥ तृष्णेची मजुरे२२. दास
नेणती विसांवा । वाढे हांव हांवां३३. आशेने
काम कामीं ॥ध्रु॥ वैभवाची सुखें, नातळतां४४. स्पर्श न करणे
अंगा । चिंता करी, भोगा विघ्न जाळी ॥३॥ तुका म्हणे वाहे५५. बाळगतात
मरणाचे भय । रक्षण उपाय करूनि असे ॥४॥
१४०३.
कोण होईल आतां संसार पांगिलें११. अधीन, अंकित
। आहे उगवले२२. सुटलेले
सहजचि ॥१॥ केला तो चालवी आपुला प्रपंच । काय कोणां वेंच आदा३३. मिळकत
घे दे४४. देवाण-घेवाण
? ॥ध्रु॥ सहजचि घडे आतां मोळ्याविण५५. रिती-रिवाज सोडून, काळजी न करताही
। येथे काय शीण आणि लाभ? ॥३॥ तुका म्हणे झालों सहज देखणा । ज्याच्या त्याने खुणा६६. संकेत, चिन्ह
दाखविल्या ॥४॥
१४०४.
आम्हां शरणागतां । एवढी काय करणे चिंता?॥१॥ परि हे कौतुकाचे११. गमतीने, विनोदाने, आश्चर्याने
खेळ । अवघे पाहातों सकळ ॥ध्रु॥ अभय-दान२२. भिऊ नकोस असे
वदें । आम्हां कैंची भयद्वंद्वे? ॥३॥ तुका म्हणे आम्ही । हरिजन, साधनाचे स्वामी ॥४॥
१४०५.
देवाचिया चाडे११. इच्छा, गरज
प्रमाण२२. आधार (संत आणि वेद)
उचित । नये वांटूं३३. विभागणे
चित्त निषेधासी ॥१॥ नये राहों उभे कसमळापाशीं४४. दुष्ट, दुर्जन, दुराचाऱ्याजवळ
। भुंकतील तैसी सांडावीं तीं ॥ध्रु॥ तुका म्हणे क्षमा सुखाची हे राशी । सांडूनि कां ऐसी दु:खी व्हावें? ॥३॥
१४०६.
खळा११. दुष्ट मनुष्य
सदा क्षुद्र दृष्टी । करी कष्टी२२. दुःखी, संत्रस्त
सज्जना ॥१॥ करिती आपुलाले परी । धणीवरी व्यापार ॥ध्रु॥ दया संतां भांडवल । वेंची बोल उपकार ॥३॥ तुका म्हणे आपुलालें । सज्जने बहुतें । नाना कर्म डाय३३. सद्गुरू, संत
करिती उपाय । बुडावया४४. संकट, दुःख
घातपातें । तुका म्हणे हरी राखे५५. इच्छा
भलत्यापरी । आम्ही तुझीं शरणागतें६६. मुळासह, कार्यरूप प्रपंच व त्याचे कारण अज्ञान
॥४॥
१४०७.
‘जग’ ऐसें बहुनांवें । बहुभावें११. अनेक बुद्धीचे, मताचे
भावना ॥१॥ पाहों बोलों बहु नये । सत्य काय सांभाळा ॥ध्रु॥ कारियासी जे कारण२२. प्रयोजन, फल (भगवत्प्राप्ती) (पा.भे. कार्यासी)
। तें जतन३३. रक्षण
करावें ॥३॥ तुका म्हणे संतजनीं । हेंचि मनीं धरावें ॥४॥
१४०८.
निघालें तें आगीहुनी । आतां झणी११. चटकन
आतळे ॥१॥ पळवा परपरतें२२. अतिशय पलीकडे
दूरी । आतां हरी येथूनि ॥ध्रु॥ धरिलें३३. धारण केलेले (पतितपावन नाम)
तैसें श्रुत४४. जाहीर
करा हो । येथे आहो प्रपंची ॥३॥ अबोल्याने५५. मौन
ठेला६६. राहिलो
तुका । भेऊनि लोकां निराळा ॥४॥
१४०९.
आतां दुसरें नाहीं मनीं । निरंजनी११. निर्जन वनात
पडिलों ॥१॥ तुमचीच पाहें वास । अवघी आस निरसली२२. नाहीसी झाली
॥ध्रु॥ मागिलांचा मोडला माग३३. वाट, पत्ता, संबंध
। घडला त्याग अरुची ॥३॥ तुका म्हणे करुणाकरा । तूं सोयरा दीनांचा ॥४॥
१४१०.
धरूनियां सोई११. मार्ग, आधार
परतले मन । अनुलक्षीं२२. उद्देशून, लक्ष ठेवून
चरण करूनियां ॥१॥ येईं पांडुरंगे नेईं सांभाळूनी । करुणावचनी आळवितों३३. प्रार्थना करतो
॥ध्रु॥ बुद्धि झाली साह्य परि नाहीं बळ । अवलोकितों जळ वाहे नेत्रीं ॥३॥ न चलती पाय गळित४४. क्षीण
झाली काया५५. शरीर
। म्हणऊनि दया येऊ द्यावी ॥४॥ दिशेच्या करितों वारियासी मात । जोडूनियां हात वाट पाहे ॥५॥ तुका म्हणे वेग करावा सत्वर६६. त्वरा, तातडी
। पावावया तीर भवनदीचें ॥६॥
१४११.
कवलें भरियेले पोट । निग्रहाचे११. योगाभ्यासाने मनाचे नियमन करणे
खोटें२२. व्यर्थ
तंट३३. आग्रह, बोभाटा
॥१॥ ऐसें माता जाणे वर्म । बाळा वाढवितां धर्म ॥ध्रु॥ कामवितां४४. संपादणे, कमविणे, शुद्धिकरण केले असता
लोहो कसे५५. लोखंड (पा.भे. लाहे-प्राप्त होते)
। तांतडीने काम नासे ॥३॥ तुका म्हणे खडे६६. खडे मांडून दिले असता (शिकविले तर)
देतां अक्षर तें जोडे ॥४॥ ॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.
ग्रंथ
रामकृष्णहरी माऊली 🙏