दिवस – ८८. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

यदक्षरं वेदविदो वदन्ति, विशन्ति यद्यतयो वीतरागाः ।
यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति, तत्ते पदं सङ्ग्रहेण प्रवक्ष्ये ॥११॥
सकळां
१. (यदक्षरं)
जाणणेयां जे लाणी
२. शेवट, अन्तिम गंतव्य
। तिये जाणिवेची जे खाणी । तयां ज्ञानियांचिये आयणी
३. निर्णयानें, बुद्धीनें
। जयातें अक्षरु
४. अविनाशी
म्हणिपे ॥१००॥
चंडवातेही
१. मोठ्या वाऱ्यानें
न मोडे । तें गगनचि कीं फुडें
२. खरें, स्पष्ट
! । वांचूनि, जरी होईल मेहुडें
३. मेघ
। तरी उरेल कैंचें ? ॥१०१॥
तेविं, जाणणेया जें आकळिलें । तें जाणिवलेपणेंचि उमाणलें
१. समजलें, मोजलें, अटकळीत आलें
। मग, नेणवेचि तया म्हणितलें । ‘अक्षर’ सहजें ॥१०२॥
म्हणौनि
१. (वेदविदो वदन्ति)
वेदविद
२. वेदार्थपारंगत
नर । म्हणती जयातें अक्षर । जें प्रकृतीसी पर
३. मायातीत
। परमात्मरूप ॥१०३॥
आणि
१. (विशन्ति यद्यतयो वीतरागाः)
विषयांचें विष उलंडूनि
२. लवंडून, पालथे करून
। जे सर्वेन्द्रियां प्रायश्चित्त देऊनि । आहाति
३. आहेत (उदासीनवृत्तीने)
देहाचिया बैसोनि । झाडातळीं ॥१०४॥
ते यापरी विरक्त । जयाची निरंतर वाट पाहात । निष्कामासि अभिप्रेत
१. इष्ट
। सर्वदा जें ॥१०५॥
जयाचिया
१. (यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति)
आवडी । न गणिती ब्रह्मचर्याचीं सांकडीं
२. संकटें
। निष्ठुर होऊनि, बापुडीं
३. दीन
। इंद्रियें करिती ॥१०६॥
ऐसें
१. (तत्ते पदं सङ्ग्रहेण प्रवक्ष्ये)
जें पद । दुर्लभ आणि अगाध । जयाचिये थडिये
२. तीरीं
वेद । चुबुकळिले
३. भिजून चिंब झालें, बुचकळले
ठेले ॥१०७॥
तें, ते पुरुष होती । जे यापरी लया जाती । तरी पार्था, हेचि स्थिती । एक वेळ सांगों ॥१०८॥
तेथ
१. (चूर्णिका)
अर्जुनें म्हणितलें ‘स्वामी । हेंचि म्हणावया होतों पां मी । तंव सहजें कृपा केली तुम्ही । तरी बोलिजो कां ॥१०९॥
परि बोलावें तें अति सोहपें
१. सोपें
‘ । तेथें म्हणितलें त्रिभुवनदीपें
२. श्रीकृष्णानें
। ‘तुज, काय नेणों ? संक्षेपें । सांगेन; ऐक’ ॥११०॥
तरी, मना या बाहेरिलीकडे । यावयाची साविया
१. सहज
सवे
२. संवय
मोडे । हें हृदयाचिया डोहीं बुडे । तैसें कीजे ॥१११॥
सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च ।
मूर्ध्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम् ॥१२॥
परी
१. (सर्वद्वाराणि संयम्य)
हे तरीच घडे । जरी संयमाचीं
२. इंद्रियनिग्रहाची
अखंडें । सर्वद्वारीं कवाडें । कळासती
३. खिळतात, बंद होतात
॥११२॥
तरी
१. (मनो हृदि निरुध्य च)
सहजें मन कोंडलें । हृदयींचि असेल उगलें
२. स्थिर, गप्प
। जैसें ‘करचरणीं मोडलें । परिवरु
३. घर
न संडीं’ ॥११३॥
तैसें
१. (मूर्ध्याधायात्मनः प्राण)
चित्त राहिलिया, पांडवा । प्राणांचा प्रणवुचि करावा । मग अनुवृत्तिपंथें
२. क्रमाक्रमानें
आणावा । मूर्ध्नवरी
३. ब्रह्मरंध्रापर्यंत
॥११४॥
तेथ
१. (आस्थितो योगधारणां)
आकाशीं मिळे न मिळे । तैसा धरावा धारणाबळें
२. धारणाशक्तीनें
। जंव मात्रात्रय
३. अकार, उकार, मकार
मावळे । अर्धबिंबीं
४. अर्धमात्रेत
॥११५॥
तंववरी तो समीरु
१. प्राणवायु
निराळीं
२. मूर्ध्याकाशात
कीजे स्थिरु । मग लग्नीं जेविं ॐकारु । बिंबींच विलसे
३. ऐक्यावस्थेंत शोभतो (लयास पावतो)
॥११६॥
ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन् ।
यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् ॥१३॥
तैसें
१. (ओमिति)
ॐ हैं स्मरो सरे
२. स्मरण्याचें राहतें
। आणि तेथेचि प्राणु पुरे
३. संपतो
। मग प्रणवातीत
४. ओंकाराहून पर
उरे । पूर्णघन
५. ब्रह्मानंदस्वरूप
जें ॥११७॥
म्हणौनि प्रणवैकनाम
१. प्रणव हेंच एक नांव ज्याचें
। हें एकाक्षर ब्रह्म । जो माझें स्वरूप परम । स्मरतसांता
२. स्मरत असतां
॥११८॥
यापरी
१. (यः प्रयातीति)
त्यजी देहातें । तो त्रिशुद्धीं
२. निश्चयानें
पावे मातें । जया पावणया परौतें । आणिक पावणें नाहीं ॥११९॥
तेथ अर्जुना, जरी विपायें
१. कदाचित्
। तुझ्या जीवीं हन ऐसें जाये । ना, हें स्मरण मग होये । कायसयावरी अंतीं ? ॥१२०॥
इंद्रिया अनुघडु
१. अवघड, संकट
पडलिया । जीविताचे
२. जीवंतपणाचें
सुख बुडालिया । आंतुबाहेरी उघडलिया
३. उघड दिसूं लागलीं असतां
। मृत्युचिन्हें ॥१२१॥
ते वेळीं बैसावेंचि कवणें ? । मग कवण निरोधी करणें
१. इंद्रियें
?। तेथ काह्याचेनि
२. कोणाच्या (कोणत्या)
अंतःकरणें । प्रणव स्मरावा? ॥१२२॥
तरि गा ऐशिया ध्वनी
१. संशयाला
झणें थारा देशी हो
२. थारा देऊं नको
मनीं । पै नित्य सेविला मी; निदानीं
३. शेवटीं
। सेवकु होय ॥१२३॥

आशेचे दुःख (३०७ ते ३१३)
आशा हि परमं दुःखं, नैराश्यं परमं सुखम् ।
यथा सञ्छिद्य कान्ताशां, सुखं सुष्वाप पिङ्गला ॥४४॥
श्लोकार्थ – विषयांची आशा हेच परम दुःख आहे आणि कोणत्याही प्रकारची आशा नसणे हेच परम सुख आहे. ग्राम्य रमणाबरोबर सुखोपभोगाची आशा सोडल्याबरोबर पिंगलेला आनंदाने झोप आली. ॥४४॥
आशा तेथ लोलुप्यता
१. लंपटपणा, आसक्ती

आशेपाशी असे दीनता । आशा तेथ ममता । असे सर्वथा नाचती ॥३०७॥
आशेपाशी महाशोक ।
आशा करवी महादोख । आशेपाशी पाप अशेख
१. संपूर्ण
असे
२. उभे राहते
देख तिष्ठत ॥३०८॥
आशेपाशी अधर्म सकळ ।
आशा मानीना विटाळ
१. दोष
। आशा नेणे काळवेळ । कर्म सकळ उच्छेदी
२. नष्ट करते
॥३०९॥
आशा अंत्यजातें उपासी ।
नीचसेवन
१. नीचाची सेवा
आशेपाशीं । आशा न सांडी मेल्यासी
२. मेलेल्या माणसाविषयी
। प्रेतापाशी नेतसे ॥३१०॥
आशा उपजली अनंतासी
१. विष्णुला

नीच वामनत्व आले त्यासी । आशें
२. निराशेने
दीन केलें देवांसी । कथा कायसी इतरांची?॥३११॥
जगाचा जो नित्य दाता ।
तो आशेनें केला भिकेसवता
१. भिकारी
वैऱ्याचे
२. शत्रू (बळी)
द्वारी झाला मागता
३. याचक
। द्वारपाळता तेणें त्यासी ॥३१२॥
आशा तेथ नाहीं सुख ।
आशेपाशी परम दुःख । आशा सर्वांसी बाधक । मुख्य दोष ते आशा ॥३१३॥
निराशेचे सुख (३१४ ते ३३१)
ज्याची आशा निःशेष
१. मूळासकट
जाये ।
तोचि परम सुख लाहे
२. प्राप्त होतो
। ब्रह्मादिक वंदिती पाये । अष्टमा सिद्धि राहे दासीत्वें ॥३१४॥
निराशांचा शुद्ध भावो ।
निराशांपाशी तिष्ठे
१. उभा राहतो
देवो । निराशांचे वचन पाहा हो । रावो
२. राजा
देवो नुल्लंघी ॥३१५॥
निराश तोचि सद्बुद्धि ।
निराश तोचि विवेकनिधी । चारी मुक्ती पदोपदीं
१. पावलापावलाला
। नैराश्य आधी वंदिती ॥३१६॥
निराशा तीर्थांचे तीर्थ ।
निराशा मुमुक्षूचा अर्थ । निराशेपाशी परमार्थ । असे तिष्ठत निरंतर ॥३१७॥
जाण नैराश्यतेपाशीं ।
वैराग्य होऊन असे दासी । निराश पहावया अहर्निशीं
१. दिवस-रात्र
। हृषीकेशी चिंतितु ॥३१८॥
निराशा देखोनि पळे दुःख ।
निराशेमाजी नित्यसुख । निराशेपाशीं संतोख । यथासुखें क्रीडतु ॥३१९॥
नैराश्याचे भेटीसी पाहाहो ।
धांवे वैकुंठींचा रावो । नैराश्याचा सहज स्वभावो । महादेवो
१. भगवान शंकर
उपासी ॥३२०॥
निराशेपाशीं न ये आधी
१. चिंता

निराशेपाशीं सकळ विधी
२. धर्म
। सच्चिदानंदपदीं । मिरवे
३. शोभातो
त्रिशुद्धी
४. सर्वकाळ
निराशु ॥३२१॥
ऐकोनि निराशेच्या नांवा ।
थोरला देवो घेतसे धांवा । त्या देवोनियां खेवा
१. आलिंगन
। रूपनांवा विवरला ॥३२२॥
ते निराशेचा जिव्हाळा
१. महत्त्व

पावोनि वेश्या पिंगला । जारपुरुषाशेच्या मूळा । स्वयें समूळा छेदिती झाली ॥३२३॥
जें आशापाशांचें छेदन ।
तेंचि समाधीचें निजस्थान
१. स्वस्थान
। ते निजसमाधी
२. स्वरूपसमाधी
पावोन । पिंगला जाण पहुडली ॥३२४॥
सर्व वर्णांमाजीं वोखटी
१. वाईट

कर्म पाहतां निंद्य दृष्टीं । ते वेश्या पावन झाली सृष्टी । माझे वाक्पुटीं कथा तिची ॥३२५॥
यालागीं वैराग्यापरतें
१. वैराग्यापेक्षा

आन
२. निराळे
साधन नाहीं येथें । कृष्ण थापटी उद्धवातें । आल्हादचित्तें प्रबोधी ॥३२६॥
अवधूत सांगे यदूसी ।
प्रत्यक्ष वेदबाह्यता वेश्येसी । निराश होतां मानसीं । निजसुखासी पावली ॥३२७॥
यालागी कायावाचाचित्तें ।
उपासावें निराशेतें । यापरतें
१. यापेक्षा
परमार्थातें । साधन येथे दिसेना ॥३२८॥
इतर जितुकी साधनें ।
तितुकी आशा-निराशेकारणे
१. (पा.भे. निराशेकारणे)
। ते निराशा साधिली जेणें । परमार्थ तेणें लुटिला ॥३२९॥
कृपा जाकळिलें
१. व्यापले
अवधूतासी ।
यदूसी धरोनियां पोटासी । निराशता हे जे ऐशी । अवश्यतेसी साधावी ॥३३०॥
एका जनार्दना शरण ।
त्याची कृपा परिपूर्ण । तोचि आशापाश छेदून । समाधान पाववी ॥३३१॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे परमहंससंहितायां एकाकारटीकायां अष्टमोऽध्यायः॥८॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु॥
आठवा अध्याय समाप्त (श्लोक ४४; ओव्या ३३१)

१३९२. घ्यावी तरी घ्यावी उदंडचि
१. पुष्कळ
सेवा । द्यावें तरी देवा उदंडचि ॥१॥ ऐसी कैंची आम्ही पुरती
२. पुरेसे, पूर्ण
भांडवलें । आल्या वसवावें
३. वास्तव्य करावे
॥ध्रु॥ व्हावें तरी व्हावें बहुतचि दुरी । आलिया अंतरी वसवावें ॥३॥ तुका म्हणे तुझें सख्यत्व आपणीं । अससील ऋणी आवडीचा
४. प्रेमाचा
॥४॥
१३९३. काय करूं जीव होतो कासावीस
१. व्याकुळ
। कोंडिले दिस गमेचिना
२. करमत नाही
॥१॥ पडिले हे दिसे ब्रह्मांडचि
३. विश्व
वोस
४. ओसाड, शून्य
। दाटोनि उछ्वास
५. दम कोंडून
राहातसे ॥ध्रु॥ तुका म्हणे अगा
६. अहो!
सर्व जाणतिया । विश्वंभरें काया
७. शरीर
निववावी
८. शांत करावे, शीतल करावे
॥३॥
१३९४. सुकलिया कोंभा अत्यंत जळधरें
१. मेघवृष्टीची
। तेणेंचि प्रकारे न्याय
२. रीत, नियम
असे ॥१॥ न चले पाउलीं सांडीं गरुडासन । मनाचे हो मन त्वरेलागी ॥ध्रु॥ तुका म्हणे भूक न साहावे बाळा । जीवनाची कळा
३. प्राण
ओढलीसे ॥३॥
१३९५. शृंगारिक
१. आलंकारिक
माझी नव्हतीं उत्तरें । आळवितों खरे अवस्थेच्या ॥१॥ न घालावा मधी कामाचा विलंब । तुम्ही तो स्वयंभ
२. मूळचेच, स्वभावतः, स्वतःसिद्ध
करुणामूर्ति ॥ध्रु॥ तुका म्हणे केले सन्मुख वदन
३. मुख
। देखतां चरण पोटाळीन
४. मिठी मारीन, कवटाळून पोटाशी धरीन
॥३॥
१३९६. तूं माझी माउली तूं माझी साउली । पाहातों वाटुली
१. वाट
पांडुरंगे! ॥१॥ तूं मज एकुला वडील धाकुला । तूं मज आपुला सोयरा जीव ॥ध्रु॥ तुका म्हणे जीव तुजपाशीं असे । तुझियानें
२. तुझ्यावाचून
ओस
३. ओसाड, शून्य
सर्व दिशा ॥३॥
१३९७. कराल ते करा । हातें आपुल्या दातारा! ॥१॥ बळि-याची आम्ही बाळें । असो निर्भर
१. आनंदाने परिपूर्ण
या सळें ॥ध्रु॥ आतां कोठें काळ । मध्ये रिघेल
२. प्रवेश करणे
ओंगळ
३. वाईट, दुष्ट
॥३॥ तुका म्हणे पंढरीराया! । थापटितों
४. थापटीत आहे
ठोक बाह्या ॥४॥
१३९८. डोळां भरिलें रूप । चित्तीं पायांचा संकल्प ॥१॥ अवघीं घातली वांटणी
१. विभागणी
। प्रेम राहिले कीर्तनीं ॥ध्रु॥ जिव्हा केली माप
२. परिमाण
। राशी हरिनाम अमुप
३. असंख्य, अमीत
॥३॥ भरूनियां भाग
४. वाटा, हिस्सा
। तुका बैसला पांडुरंग ॥४॥
१३९९. आतां आहे नाहीं । न कळे आळीकरा
१. हट्ट करणाऱ्यास
कांहीं ॥१॥ देसी पुरवुनी इच्छा । आतां पंढरीनिवासा! ॥ध्रु॥ नेणें भाग शीण
२. दुःख, कष्ट
। दुजें कोणी तुम्हांविण ॥३॥ आतां नव्हे दुरी । तुका पायीं मिठी मारी ॥४॥
१४००. संकल्पासी अधिष्ठान । नारायण गोमटें
१. चांगले, कल्याण
॥१॥ अव-घियांचे पुरे कोड
२. इच्छा पूर्ण होते
फिटे
३. नाहीसे होते
जड देहत्व ॥ध्रु॥ उभयलोकीं उत्तम कीर्ती । देव चित्तीं राहिलिया ॥३॥ तुका म्हणे जीव धाय
४. तृप्त होतो
। नये हाय
५. तळमळ, इच्छा, दुःख
जवळी ॥४॥
१४०१. भाग्यवंतां हेचि जोडी
१. लाभ
परवडी
२. सुकाळ, समृद्धी, पंगत
संतांची ॥१॥ धन घरी पांडुरंग । अभंग
३. अविनाश
जें सरेना ॥ध्रु॥ जनाविरहित हा लाभ । टांचे
४. कमी पडते
नभ
५. आकाश
सांठवणे ॥३॥ तुका म्हणे विष्णुदासां । नाहीं आशा दुसरी ॥४॥
१४०२. जरि आले राज्य मोळविक्या
१. लाकडांची मोळी विकून उदरनिर्वाह करणारा
हातां । तरि तो मागुता व्यवसायी ॥१॥ तृष्णेची मजुरे
२. दास
नेणती विसांवा । वाढे हांव हांवां
३. आशेने
काम कामीं ॥ध्रु॥ वैभवाची सुखें, नातळतां
४. स्पर्श न करणे
अंगा । चिंता करी, भोगा विघ्न जाळी ॥३॥ तुका म्हणे वाहे
५. बाळगतात
मरणाचे भय । रक्षण उपाय करूनि असे ॥४॥
१४०३. कोण होईल आतां संसार पांगिलें
१. अधीन, अंकित
। आहे उगवले
२. सुटलेले
सहजचि ॥१॥ केला तो चालवी आपुला प्रपंच । काय कोणां वेंच आदा
३. मिळकत
घे दे
४. देवाण-घेवाण
? ॥ध्रु॥ सहजचि घडे आतां मोळ्याविण
५. रिती-रिवाज सोडून, काळजी न करताही
। येथे काय शीण आणि लाभ? ॥३॥ तुका म्हणे झालों सहज देखणा । ज्याच्या त्याने खुणा
६. संकेत, चिन्ह
दाखविल्या ॥४॥
१४०४. आम्हां शरणागतां । एवढी काय करणे चिंता?॥१॥ परि हे कौतुकाचे
१. गमतीने, विनोदाने, आश्चर्याने
खेळ । अवघे पाहातों सकळ ॥ध्रु॥ अभय-दान
२. भिऊ नकोस असे
वदें । आम्हां कैंची भयद्वंद्वे? ॥३॥ तुका म्हणे आम्ही । हरिजन, साधनाचे स्वामी ॥४॥
१४०५. देवाचिया चाडे
१. इच्छा, गरज
प्रमाण
२. आधार (संत आणि वेद)
उचित । नये वांटूं
३. विभागणे
चित्त निषेधासी ॥१॥ नये राहों उभे कसमळापाशीं
४. दुष्ट, दुर्जन, दुराचाऱ्याजवळ
। भुंकतील तैसी सांडावीं तीं ॥ध्रु॥ तुका म्हणे क्षमा सुखाची हे राशी । सांडूनि कां ऐसी दु:खी व्हावें? ॥३॥
१४०६. खळा
१. दुष्ट मनुष्य
सदा क्षुद्र दृष्टी । करी कष्टी
२. दुःखी, संत्रस्त
सज्जना ॥१॥ करिती आपुलाले परी । धणीवरी व्यापार ॥ध्रु॥ दया संतां भांडवल । वेंची बोल उपकार ॥३॥ तुका म्हणे आपुलालें । सज्जने बहुतें । नाना कर्म डाय
३. सद्गुरू, संत
करिती उपाय । बुडावया
४. संकट, दुःख
घातपातें । तुका म्हणे हरी राखे
५. इच्छा
भलत्यापरी । आम्ही तुझीं शरणागतें
६. मुळासह, कार्यरूप प्रपंच व त्याचे कारण अज्ञान
॥४॥
१४०७. ‘जग’ ऐसें बहुनांवें । बहुभावें
१. अनेक बुद्धीचे, मताचे
भावना ॥१॥ पाहों बोलों बहु नये । सत्य काय सांभाळा ॥ध्रु॥ कारियासी जे कारण
२. प्रयोजन, फल (भगवत्प्राप्ती) (पा.भे. कार्यासी)
। तें जतन
३. रक्षण
करावें ॥३॥ तुका म्हणे संतजनीं । हेंचि मनीं धरावें ॥४॥
१४०८. निघालें तें आगीहुनी । आतां झणी
१. चटकन
आतळे ॥१॥ पळवा परपरतें
२. अतिशय पलीकडे
दूरी । आतां हरी येथूनि ॥ध्रु॥ धरिलें
३. धारण केलेले (पतितपावन नाम)
तैसें श्रुत
४. जाहीर
करा हो । येथे आहो प्रपंची ॥३॥ अबोल्याने
५. मौन
ठेला
६. राहिलो
तुका । भेऊनि लोकां निराळा ॥४॥
१४०९. आतां दुसरें नाहीं मनीं । निरंजनी
१. निर्जन वनात
पडिलों ॥१॥ तुमचीच पाहें वास । अवघी आस निरसली
२. नाहीसी झाली
॥ध्रु॥ मागिलांचा मोडला माग
३. वाट, पत्ता, संबंध
। घडला त्याग अरुची ॥३॥ तुका म्हणे करुणाकरा । तूं सोयरा दीनांचा ॥४॥
१४१०. धरूनियां सोई
१. मार्ग, आधार
परतले मन । अनुलक्षीं
२. उद्देशून, लक्ष ठेवून
चरण करूनियां ॥१॥ येईं पांडुरंगे नेईं सांभाळूनी । करुणावचनी आळवितों
३. प्रार्थना करतो
॥ध्रु॥ बुद्धि झाली साह्य परि नाहीं बळ । अवलोकितों जळ वाहे नेत्रीं ॥३॥ न चलती पाय गळित
४. क्षीण
झाली काया
५. शरीर
। म्हणऊनि दया येऊ द्यावी ॥४॥ दिशेच्या करितों वारियासी मात । जोडूनियां हात वाट पाहे ॥५॥ तुका म्हणे वेग करावा सत्वर
६. त्वरा, तातडी
। पावावया तीर भवनदीचें ॥६॥
१४११. कवलें भरियेले पोट । निग्रहाचे
१. योगाभ्यासाने मनाचे नियमन करणे
खोटें
२. व्यर्थ
तंट
३. आग्रह, बोभाटा
॥१॥ ऐसें माता जाणे वर्म । बाळा वाढवितां धर्म ॥ध्रु॥ कामवितां
४. संपादणे, कमविणे, शुद्धिकरण केले असता
लोहो कसे
५. लोखंड (पा.भे. लाहे-प्राप्त होते)
। तांतडीने काम नासे ॥३॥ तुका म्हणे खडे
६. खडे मांडून दिले असता (शिकविले तर)
देतां अक्षर तें जोडे ॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

1 thought on “दिवस – ८८. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top