
अनुक्रमणिका
- श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – २. ओवी क्र. १७२ ते २००
- श्रीएकनाथी भागवत क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – २, ओवी क्र. ५०८ ते ५५३
- संसारमिथ्यात्व (५०८ ते ५१३)
- मननिरोधन (५१४ ते ५२३)
- भक्ती-श्रवण-मनन-भक्ती (५२४ ते ५३६)
- कीर्तनभक्ती (५३७ ते ५४६)
- नामस्मरणभक्ती (५४७ ते ५५३)
- श्रीतुकाराम महाराजांची गाथाअभंग क्र. २६२-२७७
- ग्रंथ
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – २. ओवी क्र. १७२ ते २००
आश्चर्यवत्पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद्वदति तथैव चान्यः । आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति, श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् ॥२९॥
एक अंतरीं निश्चळ । जे निहाळितां केवळ । विसरले सकळ । संसारजात ॥७२॥ एकां गुणानुवादु करितां । उपरति होउन चित्ता । निरवधि तल्लीनता । निरंतर ॥७३॥ एक ऐकतांचि निवाले । ते देहभावी सांडिलें । एक अनुभवें पातले । तद्रूपता ॥७४॥ जैसे सरिता ओघ समस्त । समुद्रामाजी मिळत । परी, माघौते, न समात । परतले नाहीं ॥७५॥ तैसिया योगीश्वरांचिया मती । मिळणीसवें एकवटती । परी जे विचारूनि पुनरावृत्ति । भजतीचिना ॥७६॥
देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत । तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥३०॥
जें सर्वत्र सर्वही देहीं । जया, करितांही घातु नाहीं । तें विश्वात्मक तूं पाहीं । चैतन्य एक ॥७७॥ इयाचेनि स्वभावें । हें होत जात आघवें । तरी सांग, काय शोचावें । एथ तुवां?॥७८॥ एर्हवीं तरी पार्था । तुज कां नेणों; न मनें चित्ता । परी किडाळ हें, शोचितां । बहुती परी ॥७९॥
स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि । धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥३१॥
तूं अझुनी कां न विचारिसी? । काय हें चिंतितु आहासी? । स्वधर्मु तो विसरलासी । तरावें जेणें ॥१८०॥ या कौरवां भलते जाहलें । अथवा तुजचि कांहीं पातले । कीं युगचि हें बुडालें । जर्ही एथ ॥८१॥ तरी, स्वधर्मु एकु आहे । तो सर्वथा त्याज्य नोहे । मग, तरिजेल काय? पाहें । कृपाळूपणें?॥८२॥ अर्जुना, तुझें चित्त । जर्ही जाहलें द्रवीभूत । तर्ही हें अनुचित । संग्राम-समयीं ॥८३॥ अगा गोक्षीर जरी जाहलें । तरी पथ्यासि नाहीं म्हणितलें । ऐसेनिहि, विष होय; सुदलें । नव-ज्वरीं देतां ॥८४॥ तैसें आनी आन करितां । नाशु होईल हिता । म्हणौनि तूं आतां । सावध होई ॥८५॥ वायांिंच व्याकुळ कायी? । आपुला निजधर्मु पाहीं । जो आचरितां बाधु नाहीं । कवणें काळीं ॥८६॥ जैसें, मार्गेचि चालतां । अपावो न पवे सर्वथा । कां, दीपाधारें वर्ततां । नाडळिजे ॥८७॥ तयापरी, पार्था । स्वधर्मी राहाटतां । सकळ-कामपूर्णता । सहजें होय ॥८८॥ म्हणौनि, यालागी पाहीं । तुम्हां क्षत्रियां आणीक कांहीं । संग्रामावांचूनि नाहीं । उचित, जाणें ॥८९॥ निष्कपटा होआवें । उसिणा घाईं झुंझावें । हें असो; काय सांगावें । प्रत्यक्षावरि?॥१९०॥
यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम् । सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् ॥३२॥
अर्जुना, झुंज देखें आतांचें । हें हो कां जें दैव तुमचें । कीं, निधान सकळ धर्माचें । प्रगटलें असे ॥९१॥ हा संग्रामु काय म्हणिये । कीं, स्वर्गूचि येणें रूपें । मूर्त कां प्रतापें । उदो केला?॥९२॥ नातरी, गुणाचेनि पतिकरें । आर्तिचेनि पडिभरें । हें कीर्तिचि स्वयंवरें । आली तुज ॥९३॥ क्षत्रियें बहुत पुण्य कीजे । तें झुंज ऐसें लाहिजे । जैसें, मार्गी जातां, आडळिजे । चिंतामणीसी ॥९४॥ नातरी, जांभया पसरे मुख । तेथ अवचटें पडे पीयूख । तैसा संग्रामु हा देख । पातला असे ॥९५॥
अथ चेत्त्वमिमं धर्म्यं सङ्ग्रामं न करिष्यसि । ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ॥३३॥
आतां हा ऐसा अव्हेरिजे । मग नाथिलें शोचूं बैसिजे । तरी आपण आहाणा होईजे । आपणोयां ॥९६॥ पूर्वजांचें जोडलें । आपणचि होय धाडिलें । जरी आजि शस्त्र सांडिलें । रणीं इये ॥९७॥ असती कीर्ति जाईल । जगचि अभिशापु देईल । आणि गिंवसित पावतील । महादोष ॥९८॥ जैसी, भतारेंहीन वनिता । उपहति पावे सर्वथा । तैशी दशा जीविता । स्वधर्मेंवीण ॥९९॥ नातरी, रणीं शव सांडिजे । तें चौमेरीं गिधीं विदारिजे । तैसें स्वधर्महीना अभिभविजे । महादोषीं ॥२००॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – २, ओवी क्र. ५०८ ते ५५३
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
संसारमिथ्यात्व (५०८ ते ५१३)
अविद्यमानोऽप्यवभाति हि द्वयो ध्यातुर्धिया स्वप्नमनोरथौ यथा । तत्कर्मसंकल्पविकल्पकं मनो बुधो निरुन्ध्यादभयं ततः स्यात् ॥३८॥
पुरुषासी जो प्रपंचु दिसे । तो नसतांचि मिथ्या आभासे । जेवीं कां एकला निद्रावशें । स्वप्नी निजमानसें जग कल्पी ॥८॥ असोनि निद्रावश दिसे स्वप्न । जो जागा होवोनि आपण । करूं बैसे मनोरथध्यान । तो नसतेंचि जन वन एकत्वीं देखे ॥९॥ हो कां घालोनि आसन । जो करी मूर्तिचिंतन । त्यासी ध्येय-ध्याता-उपचार-ध्यान । नसतेच जाण कल्पित भासे ॥५१०॥ जेवीं धनलोभ्याचे हारपे धन । परी वासना न सांडी धनधान्य । धनातें आठवितां मन । धनलोभे पूर्ण पिसें होये ॥११॥ मन स्वयें जरी नव्हे धन । तरी धनकोश आठवी मन । तंव स्मृती वळघे वन । व्यामोहें पूर्ण पिसें होय ॥१२॥ तेवीं व्यामोहाचे पूर्ण भरित । मिथ्या भासे देहादि द्वैत । तें अहंभावें मानितां आप्त । भवभय निश्चित आदळे अंगीं ॥१३॥
मननिरोधन (५१४ ते ५२३)
भवभयाचे कारण । मनःकल्पना मुख्य जाण । त्या मनाचे करावया निरोधन । सद्गुरुवचननिजनिष्ठा ॥१४॥ हे जाणोनि सच्छिष्य ज्ञाते । गुरुवाक्ये विश्वासयुक्ते । विवेकवैराग्याचेनि हातें । निजमनातें आकळिती ॥१५॥ तेचि आकळती हातवटी । संक्षेपें राया सांगेन गोष्टी । सद्गुरूवाक्य परिपाटी । जे मनातें थापटी निजबोधे ॥१६॥ चंचळत्वें विषयध्यान । करितां देखे जें जें मन । तें तें होय ब्रह्मार्पण । सद्गुरवचननिजनिष्ठा ॥१७॥ धरूनियां विषयस्वार्थु । मनें जो जो घेइजे अर्थ । तो तो होय परमार्थु । हा अनुग्रहो समर्थु गुरुकृपेचा ॥१८॥ जो भुईभेणे पळों जाये । तो जेथे पळे तेथें भू ये । मग येणेजाणें स्वयें राहे । ठायी ठाये पांगुळला ॥१९॥ तैसें मनासी लाविजे वर्म । जें जें देखे तेंचि ब्रह्म । जें जें करूं बैसे कर्म । तेथ पुरुषोत्तम स्वयें प्रगटे ॥५२०॥ एवं इंद्रियवृत्तिउल्लाळे । मोडिले गुरुवाक्यप्रतीतिबळें । निजाधिष्ठानमेळे । कळासलें येके वेळे अखंड कुलुप ॥२१॥ ऐसें नेमितां बाह्य कर्म । मनाचा मोडे द्वैतभ्रम । तंव बाह्य परब्रह्म । पूर्ण चिद्व्योम कोंदाटे ॥२२॥ ऐमें भजनें मन नेमितां स्वयें । न रिघे कल्पांतकाळभये । भक्ते होऊनियां निर्भये । विचरती स्वयें निःशंक ॥२३॥
भक्ती-श्रवण-मनन-भक्ती (५२४ ते ५३६)
हे अगाध निष्ठा तें परिपूर्ण । भोळ्याभाळ्या न टके जाण । यालागी सुगम साधन । सांगेन आन तें ऐक ॥२४॥
शृण्वन् सुभद्राणि रथाङ्गपाणेर्जन्मानि कर्माणि च यानि लोके । गीतानि नामानि तदर्थकानि गायन्विलज्जो विचरेदसङ्गः ॥३९॥
तरावया भाळेभोळे जन । मुख्य चित्तशुद्धीच कारण । जन्मकर्म हरीचे गुण । करावे श्रवण अत्यादरें ॥२५॥ चुकल्या पुत्राची शुद्धिवार्ता । जेणे सादरें ऐके माता । तेणें सारें हरिकथा । सार्थकता परिसावी ॥२६॥ हरीची जन्मकर्मे अनंत गुण । म्हणाल त्यांचे नव्हेल श्रवण । लोकप्रसिद्ध जें जें पुराण । तें श्रद्धा संपूर्ण ऐकावें ॥२७॥ बहु देव बोलिले पुराणीं । तेही लागती ज्याचे चरणीं । तो समर्थ चक्रपाणी । जो वेदपुराणी वंदिजे ॥२८॥ त्याची जी जी जन्में अतिअद्भुत । जी जी कर्मे परमार्थयुक्त । स्वमुखें बोलिला भगवंत । ती ती ज्ञानार्थ परिसावीं ॥२९॥ जें जें केलें पुराणश्रवण । तें तें व्यर्थ होय मननेंविण । यालागीं श्रवण-मनन । सावधान करावें ॥५३०॥ मोलें घेतली जे गाये । दुभतें खातां विषय होये । तेचि दान देतां लवलाहें । दुभती होये परमामृतें ॥३१॥ तेवीं केलें जें श्रवण । तें मनने परम पावन । तेंचि उपेक्षितां जाण । परिपाकी पूर्ण वांझ होय ॥३२॥ हरिनाम पडतां श्रवणीं । एकां गळोनि जाये वदनीं । एकां ये कानींचे ते कानीं । जाय निघोनि हरिनाम ॥३३॥ हरिनाम पडतां श्रवणीं । ज्याचे रिघे अंतःकरणीं । सकळ पापा होवोनि धुणी । हरिचरणीं तो विनटे ॥३४॥ यापरी श्रवणीं श्रद्धा । मननयुक्त करितां सदा । ते विकल्प बाधीना कदा । वृत्ति शुद्धा स्वयें होये ॥३५॥ ऐसें मननयुक्त श्रवण । करितां वोसंडे हर्ष पूर्ण । तेणें हर्षे हरिकीर्तन । करी आपण स्वानंदें ॥३६॥
कीर्तनभक्ती (५३७ ते ५४६)
हरिचरित्रे अगाध । ज्ञानमुद्रा-पदबंध । कीर्तनीं गातां विशद । परमानंद वोसंडे ॥३७॥ वानिती अजन्मयाची जन्में । वानिती अकर्मियाची कर्मे । स्मरती अनामियाची नामें । अतिसप्रेमें डुल्लत ॥३८॥ साधावया निजकाज । सांडूनि लौकिकाची लाज । कीर्तनी नाचती भोज । अतिनिर्लज निःशंक ॥३९॥ कीर्तनें निर्दळिले दोष । जप तप ठेले निरास । यमलोक पाडिला वोस । तीर्थाची आस निरास जाहली ॥५४०॥ यमनियमां पडती उपवास । मरों टेंकले योगाभ्यास । कीर्तनगजरें हृषीकेश । निर्दाळी दोष नाममात्रे ॥४१॥ कीर्तनाचा घडघडाट । आनंदु कोंदला उद्भट । हरुषे डोले वैकुंठपीठ । तेणें सुखें नीलकंठ तांडवनाचें नाचतु ॥४२॥ यापरी हरिकीर्तन । देत परम समाधान । हा भक्ति-राजमार्ग पूर्ण । ये मार्गी स्वयें रक्षण चक्रपाणी कर्ता ॥४३॥ चक्र घेऊनि भक्तांचे ठायीं । म्हणे तुझें कार्य कायी । मज जगी वैरीचि नाहीं । भक्तद्वेषी पाहीं निजशस्त्रे नाशी ॥४४॥ चक्रे अभिमानाचा करी चेंदा । मोहममता छेदी गदा । शंखें उद्बोधी निजबोधा । निजकमळें सदा निजभक्त पूजी ॥४५॥ जेथें चक्रपाणी रक्षिता । तेथें न रिघे भवभयाची कथा वार्ता । यापरी कीर्तिवंता । हरि सर्वथा स्वयें रक्षी ॥४६॥
नामस्मरणभक्ती (५४७ ते ५५३)
ज्यांसी न करवे कथाश्रवण । अथवा न टके हरिकीर्तन । तिहीं करावें नामस्मरण । ‘राम-कृष्ण-गोविंद ॥४७॥ ‘अच्युत’ नामाची निजख्याती । चेवल्या कल्पांती हों नेदी च्युती । त्या नामातें जे नित्य स्मरती । ते जाण निश्चितीं अच्युतावतार ॥४८॥ रामकृष्णादि नामश्रेणी । अखंड गर्जे ज्यांची वाणी । त्यांसी तीर्थे येती लोटांगणीं । सुरवर चरणी लागती स्वयें ॥४९॥ बाप नामाचें निजतेज । यम वंदी चरणरज । नामापाशी अधोक्षज । चतुर्भुज स्वयें तिष्ठे ॥५५०॥ नामाचेनि पडिपाडें । कायिसें भवभय बापुडें । कळिकाळाचे तोंड कोणीकडे । नामापुढे रिघावया ॥५१॥ जेवढी नामाची शक्ती । तेवढें पाप नाही त्रिजगतीं । नामापाशी चारी मुक्ती । जाण निश्चितीं विदेहा ॥५२॥ ऐक राया सावधान । नामापरतें सुगम साधन । सर्वथा नाहीं नाहीं आन । निश्चित जाण नेमस्त ॥५३॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. २६२-२७७
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.





