
अनुक्रमणिका
- श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – २. ओवी क्र. ३१५ ते ३३७
- श्रीएकनाथी भागवत क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ३, ओवी क्र. १ ते ३१
- सद्गुरुजनार्दन नमन (१ ते १५)
- दुसऱ्या अध्यायाचे सिंहावलोकन (१६, १७)
- तिसऱ्या अध्यायाचा प्रस्ताव (१८ ते २२)
- मायानिरूपणाची विदेहाची विनंती (२३ ते ३०)
- मायानिरूपण (३१ ते ७२)
- श्रीतुकाराम महाराजांची गाथाअभंग क्र. ३५४ ते ३७४
- ग्रंथ
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – २. ओवी क्र. ३१५ ते ३३७
तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः । वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥६१॥
म्हणौनि, आइकें, पार्था । यांतें निर्दळी जो सर्वथा । सर्व विषयीं आस्था । सांडूनियां ॥१५॥ तोचि तूं जाण । योग-निष्ठेसी कारण । जयाचे विषयसुखें अंतःकरण । झकवेना ॥१६॥ जो आत्मबोधयुक्तु । होऊनि असे, सततु । जो मातें हृदयाआंतु । विसंबेना ॥१७॥ येर्हवीं, बाह्य विषय तरी नाहीं । परी मानसीं होईल जरी कांहीं । तरी साद्यंतुचि पाहीं । संसारू असे ॥१८॥ जैसा कां विषाचा लेशु- । घेतलियां, होय बहुवसु । मग निभ्रांत करी नाशु । जीवितासी ॥१९॥ तैसी विषयांची शंका । मनीं वसती देखा । घातु करी अशेष । विवेकजाता ॥३२०॥
ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते । सङ्गात्सञ्जायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ॥६२॥
क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः । स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥६३॥
जरी हृदयीं विषय स्मरती । तरी निःसंगाही आपजे संगती । संगें प्रगटे मूर्ति । अभिलाषाची ॥२१॥ जेथ कामु उपजला । तेथ क्रोधु आधींचि आला । क्रोधीं असे ठेविला । संमोह; जाणें ॥२२॥ संमोहा जालिया व्यक्ती । तरी नाशु पावे स्मृति । चंडवातें ज्योति । आहत जैसी ॥२३॥ कां, अस्तमानीं निशी । जैसी सूर्यतेजातें ग्रासी । तैसी दशा, स्मृतिभ्रंशीं । प्राणियांसी ॥२४॥ मग, अज्ञानांध केवळ । तेणें आप्लविजे सकळ । तेथ बुद्धि होय व्याकुळ । हृदयामाजी ॥२५॥ जैसें, जात्यंधा पळणी पावे । मग ते काकुळती सैरा धांवे । तैसें बुद्धीसि होती भंवे । धनुर्धरा ॥२६॥ ऐसा स्मृतिभ्रंशु घडे । मग सर्वथा बुद्धि अवघडे । तेथ समूळ हें उपडे । ज्ञानजात ॥२७॥ चैतन्याच्या भ्रंशीं । शरीरा दशा जैसी । तैसें, पुरुषा बुद्धिनाशी- । होय! देखें ॥२८॥ म्हणौनि आइकें अर्जुना । जैसा विस्फुलिंग लागे इंधना । मग तो, प्रौढ जालिया; त्रिभुवना । पुरो शके ॥२९॥ तैसें, विषयांचें ध्यान । जरी विपायें वाहे मन । तरी येसणें हें पतन । गिंवसित पावे ॥३३०॥
रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् । आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥६४॥
म्हणौनि विषय हे आघवे । सर्वथा मनौनि सांडावे । मग रागद्वेष स्वभावें । नाशतील ॥३१॥ पार्था, आणीकही एक । जरी नाशले रागद्वेष । तरी इंद्रियां, विषयीं, बाधक । रमतां; नाहीं!॥३२॥ जैसा सूर्य आकाशगतु । रश्मिकरें जगातें स्पर्शतु । तरी संगदोषें काय लिंपतु । तेथियेनि?॥३३॥ तैसा इंद्रियार्थु उदासीन । आत्मरसेंचि निर्भिन्न । जो कामक्रोधविहीन । होऊनि असे ॥३४॥ तरी विषयांतुही कांहीं । आपणपेंवांचूनि नाहीं । मग, विषय कवण; कायी? । बाधतील कवणा? ॥३५॥ जरी उदकीं उदक बुडिजे । कां अग्नि आगी पोळिजे । तरी विषयसंगें आप्लविजे । परिपूर्ण तो ॥३६॥ ऐसा आपणचि केवळु । होऊनि असे निखिळु । तयाचि प्रज्ञा अचळु । निभ्रांत मानी!॥३७॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ३, ओवी क्र. १ ते ३१
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
॥ ॐ तत्सत्-श्रीकृष्ण प्रसन्न ॥
श्रीएकनाथी भागवत
अध्याय तिसरा
श्रीगणेशाय नम: । श्रीकृष्णाय नम: ॥
सद्गुरुजनार्दन नमन (१ ते १५)
ॐ नमो जी श्रीगुरुराया । म्हणोनि सद्भावें लागें पायां । तंव मीपण गेलें वायां । घेऊनियां तूंपणा ॥१॥ नवल पायांचे कठिणपण । वज्रे न तुटे लिंगदेह जाण । त्याचेही केलें चूर्ण । अवलीळा चरण लागतां ॥२॥ पायी लागतांचि बळी । तो त्वां घातला पाताळीं । पायीं लवणासुरा रवंदळी । अतुर्बळी निर्दाळितां ॥३॥ पाय अतिशयेंसी तिख । काळियासी लागतां देख । त्याचे शोषोनियां विख । केला निर्विख निःशेष ॥४॥ पाय अतिशय दारुण । शकटासी लागतां जाण । त्याचे तुटलें गुणबंधन । गमनागमन खुंटलें ॥५॥ पायांचा धाक सबळां । पायें उद्धरिली अहल्या शिळा । पाय नृगें देखतां डोळां । थित्या मुकला संसारा ॥६॥ आवडी पाय चिंतिती दास । त्यांच्या मनुष्यधर्मा होय नाश । पायें यमलोक पाडिला वोस । पायें जीवास जीवघात ॥७॥ पायवणी शिरीं धरिलें शिवें । तो जगातें घेतु उठिला जीवें । त्यासी राख लाविली जीवेंभावें । शेखीं नागवा भवें श्मशानीं ॥८॥ ऐसें पायांचे करणे । शिवासी उरों नेदी शिवपणें । मा जीवांसी कैंचें जीवें जिणें । हे मानिते मानणे उरों नेदी ॥९॥ ऐसा जाणोनियां भावो । एका एकपणीं ठेला ठावो । तेथेही पायांचा नवलावो । केला एकपणा वावो वंदनमात्रे ॥१०॥ तेथें कवणे कवणासी वानणें । कवणे कवणासी विनविणें । कवणे कवणासी देणे घेणें । मी तूंचे जिणे जीवें गेलें ॥११॥ तेव्हां देव आणि भक्तु । जाहलासी मा तूंचि तूं । तेथे मीपणाची मातु । कोणे कोणांतु मिरवावी ॥१२॥ ऐशिया पदी वाऊनि तत्त्वतां । करवितोसी ग्रंथकथा । तेव्हां माझेनि नांवें कविकर्ता । तूंचि वस्तुतां सद्गुरुराया ॥१३॥ माझें नामरूप आघवें एक । तेंही जनार्दनु झाला देख । ऐसें एकपणाचे कौतुक । आत्यंतिक श्रीजनार्दना ॥१४॥ तेणें कौतुकेंचि आतां । माझेनि नांवें कविकर्ता । होऊनि स्वयें रची ग्रंथा । यथार्थता निजबोधे ॥१५॥
दुसऱ्या अध्यायाचे सिंहावलोकन (१६, १७)
तेथें द्वितीयाध्यायाचे अंतीं । दुस्तर माया उत्तम-भक्तीं । निरसोनियां भजनस्थिती । भगवत्प्राप्ती पावले ॥१६॥ कैशी दुस्तर हरीची माया । पुसावया सादरता झाली राया । अत्यादरेंकरोनियां । म्हणे मुनिवर्या अवधारीं ॥१७॥
तिसऱ्या अध्यायाचा प्रस्ताव (१८ ते २२)
राजोवाच- परस्य विष्णोरीशस्य मायिनामपि मोहिनीम् । मायां वेदितुमिच्छामो भगवन्तो ब्रुवन्तु नः॥१॥
राजा म्हणाला – मोठमोठ्या ज्ञानी लोकांनाही मोह घालणारी, पूर्णब्रह्म परमेश विष्णूची माया जाणण्याची आम्हांस इच्छा आहे. हे महाभाग, कृपा करून तिचे स्वरूप सांगा. ॥१॥
तृतीयाध्यायीं निरूपण । राजा करील चारी प्रश्न । ‘माया’ आणि तिचे ‘तरण’ । ‘ब्रह्म’ ते कोण, कर्म’ तें कैसें ॥१८॥ तेथें प्रथम मायेचा प्रश्न । रायें पुशिला आपण । तेचि अर्थीचे निरूपण । मायेचें लक्षण राजा बोले ॥१९॥ सुरांमाजी श्रेष्ठ हृषीकेशी । ब्रह्मादि शिवु वंदिती ज्यासी । त्या श्रीविष्णूची माया कैसी । जे मायिकांसी व्यामोही ॥२०॥ कैशी मायिकां माया मोही येथें । ब्रह्मा शिवु मानिती चित्तें । आम्ही पूर्ण मायेचे नियंते । शेखीं माया तयांतें निजमोहें मोही ॥२१॥ ब्रह्मा मोहिला शिवाचे लग्नीं । वीर्य द्रवे पार्वती देखोनी । महादेवो महाज्ञानी । देखतांचि मोहिनी निजवीर्य द्रवलें ॥२२॥
मायानिरूपणाची विदेहाची विनंती (२३ ते ३०)
जे सज्ञाना छळी लवलाह्या । जीतें श्रुति म्हणती ‘अजया’ । ते हरीची दुर्धर माया । विवंचूनियां मज सांगा ॥२३ ॥ म्हणाल दुर्धर मायेची बाधकता । ते बाधू न शके अनन्य भक्तां । तुवांही भजावें भगवंता । मिथ्या मायेची कथा कां पुसशी ॥२४॥ तेचि अर्थीचें निरूपण । राजा साक्षेपेंसी आपण । मुनींचे ऐकावया गुह्य ज्ञान । विदग्ध प्रश्न आदरें पुसतु ॥२५॥
नानुतृप्ये जुषन्युष्मद्वचो हरिकथामृतम् । संसारतापनिस्तप्तो मर्त्यस्तत्तापभेषजम् ॥२॥
भगवंताच्या गुणानुवादाने भरलेले आपले अमृततुल्य भाषण सेवन करीत असता मला तृप्ती होत नाही. संमारातील त्रिविध तापाने परिपीडित झालेला मर्त्य प्राणी मी, त्या माझा सर्व ताप हरण करणारे ते एक औषधच आहे. ॥२॥
सेवितां तुमचे वचनामृत । पुरे न म्हणे माझें ‘चित्त’ । आस्वादितां शब्दी शब्दार्थ । ‘श्रवण’ क्षुधार्त अधिक जाहले ॥२६॥ अद्भुत कथा अतिसुरस । श्रवणीं श्रवणा अधिक सोस । ‘रसना’ म्हणे हा अतिगोड रस । ‘डोळ्यां’ उल्हास हे अपूर्व रूप ॥२७॥ ‘घ्राण’ म्हणे हा निजगंधु । सुमनी सुमना अतिसुगंधु । ‘वाचा’ म्हणे हा शब्दु । परमानंदु अनुवादे ॥२८॥ नवल निरूपणाचा यावा । ‘भुजां’ स्फुरण ये द्यावया खेवा । आलिंगन जीवींच्या जीवा । निजसद्भावा होतसे ॥२९॥ तुमच्या कथा सुनिश्चितीं । दिव्यौषधि भवरोग छेदिती । त्रिविध तापांची निवृत्ती । जड मूढ प्राकृतीं ऐकतां भावें ॥३०॥
मायानिरूपण (३१ ते ७२)
राजा परमार्थे साकांक्ष । देखोनि सार्थक कथेचे लक्ष । हरीधाकुटा ‘अंतरिक्ष’ । निरूपणीं दक्ष बोलता झाला ॥३१॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. ३५४ ते ३७४
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.





