अनुक्रमणिका
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ७. ओवी क्र. १६६ ते १९०
इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत ।
सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप ॥२७॥
तेथ११. (इच्छाद्वेषसमुत्थेन)
इच्छा हे कुमारी२२. मुलगी
जाली । मग ते कामाचिया तारुण्या आली । तेथ द्वेषेंसीं मांडिली । वऱ्हाडिक३३. वऱ्हाड, लग्नसोहळा
॥१६६॥
तया११. (द्वन्द्वमोहेन भारत)
दोघांस्तव२२. दोघांपासून
जन्मला । ऐसा द्वंद्वमोहो जाला । मग तो आजेयानें३३. आजानें
वाढविला । अहंकारें ॥१६७॥
जो धृतीसी११. धैर्यास
सदा प्रतिकुळु२२. विरुद्ध
। नियमाही नागवे३३. बांधला जात नाही. सांपडत नाहीं
#सळू४४. छळणारा
। आशारसें दोंदिलु । जाला सांता५५. आशारूपी दुधानें पुष्ट होऊन
॥१६८॥
असंतुष्टीचिया मदिरा११. मद्यानें
। मत्त होऊनि, धनुर्धरा । विषयांचे वोवरां२२. खोलीमध्यें
। विकृतीसीं३३. विकाररूपी स्त्रीसहित
असें ॥१६९॥
तेणें भावशुद्धीचिये११. शुद्ध भावनेच्या
वाटे । विखुरले२२. पसरले
विकल्पाचे कांटे । मग चिरिले३३. काढले, फोडले
आव्हांटे४४. आडमार्ग
। अप्रवृत्तीचे५५. कुमार्गाचे
॥१७०॥
तेणें११. (सर्वभूतानि सम्मोहं)
भूतें भांबावलीं२२. भ्रमलीं
। म्हणौनि३३. (सर्गे यान्ति परन्तप)
संसाराचिया आडवामाजीं पडिलीं। मग महादुःखाच्या घेतलीं४४. सापडली, स्वाधीन झाली
। दांडेवरी५५. मोठमोठ्या दुःखाच्या दांडक्याने बडविली गेली
॥१७१॥
येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम् ।
ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः ॥२८॥
ऐसें११. (येषां त्वन्तगतं पापं)
विकल्पाचे वांयाणे२२. निष्फळ, व्यर्थ, पोकळ
। कांटे देखोनि सणाणे३३. तीक्ष्ण
। जे मतिभ्रमाचे पासवणें । घेतीचिना४४. माघार घेतच नाही, भ्रमाच्या पाशाला जवळच येऊ देत नाहीत
॥१७२॥
उजू११. नीट, सरळ
एकनिष्ठेच्या पाउलीं । रगडूनि विकल्पाचिया भालीं२२. टोंकें
। महापातकाची सांडिली । अटवीं३३. अरण्य
जिहीं ॥१७३॥
मग११. (भजन्ते मां दृढव्रताः)
पुण्याचे धावां२२. पळत सुटले
घेतले । आणि माझी जवळीक३३. सानिध्य
पातले । किंबहुना चुकले । वाटवधेयां४४. वाटमाऱ्यांना
॥१७४॥
जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये।
ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम् ॥२९॥
एहवीं११. (जरामरणमोक्षाय)
तरी पार्था । जन्ममरणाची निमे२२. संपे
कथा । ऐसिया प्रयत्नातें आस्था३३. इच्छा
। विये४४. उत्पन्न करी
जयांची ॥१७५॥
तयां११. (ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नं)
तो प्रयत्लुचि एके वेळे२२. एकवार
। मग समग्र परब्रह्म फळे । जया पिकलेया रसु गळे । पूर्णतेचा ॥१७६॥
ते वेळीं कृतकृत्यता११. सफलतेनें
जग भरे । तेथ अध्यात्माचें२२. आत्मज्ञानाचें
नवलपण पुरे । कर्माचें काम सरे । विरमे३३. शांत होतें
मन ॥१७७॥
ऐसा११. (मामाश्रित्य)
अध्यात्मलाभु तया । होय गा; धनंजया । भांडवल२२. व्यापारांत
जया । उद्यमीं३३. उद्यमीं
मी ॥१७८॥
साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः ।
प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः ॥३०॥
तयातें११. (चूर्णिका)
साम्याचिये वाढी२२. व्याज
। ऐक्याची सांदे३३. हस्तगत होते, भरभराट होते, वाढते, भरते
कुळवाडी४४. व्यवहार
। तेथ भेदाचिया दुबळवाडी५५. दैन्य
। नेणिजे तया ॥१७९॥
जिहीं११. (साधिभूताधिदैवं मां)
साधिभूता मातें । प्रतीतीचेनि हातें२२. अनुभवरूपी हातांनीं
। △धरूनि; अधिदैवातें । शिवतले३३. जीवाला
गा ॥१८०॥
जया११. (साधियज्ञं च ये विदुः)
जाणिवेचेनि वेगें । मी अधियजुही दृष्टी रिगें२२. अनुभवास येतो
। ते तनूचेनि वियोगें । विये३३. दुःखी
नव्हती ॥१८१॥
एहवीं, आयुष्याचें सूत्र विघडतां । भूतांची उमटे खडाडता११. खळबळ
। काय न मरतयाचियाहि चित्ता । युगांतु२२. प्रलय
नोहे ? ॥१८२॥
परी११. (प्रयाणकालेऽपि च मां)
नेणों कैसे पैं गा । जे जडोनि गेले माझिया आंगा । ते प्रयाणींचिया लगबगा । न सांडितीच मातें ॥१८३॥
एहवीं११. (ते विदुर्युक्तचेतसः)
तरी जाण । ऐसें जे निपुण । तेचि, अंतःकरण -। युक्त योगी ॥१८४॥
तंव११. (उत्तराध्यायबीजं)
इये शब्दकुपिकेतळीं२२. शब्दरूप शिशीच्या खाली
। नोडवेचि३३. पुढे करवत नाही
अवधानाची४४. लक्ष्याची
अंजुळी । जे, नावेक अर्जुन तये वेळीं । मागांचि होता ॥१८५॥
जेथ तद्ब्रह्मवाक्यफळे११. ब्रह्मप्रतिपादक वाक्यरूपी फळें
। जिये नानार्थ-रसें रसाळें । बहकताती२२. पसरलेलीं
परिमळें । भावाचेनि ॥१८६॥
सहज कृपा-मंदानिळें११. कृपारूपी मंद वाऱ्यानें
। कृष्णद्रुमाची वचनफळें । अर्जुन श्रवणाचिये खोळे२२. ओटींत, कानांत, पदरात
। अवचित पडिलीं ॥१८७॥
तियें प्रमेयाची११. सिद्धांतांची
हो, कां, वळलीं । कीं ब्रह्मरसाच्या सागरीं चुबुकळिलीं । मग तैसीचि कां घोळीलीं । परमानंदें ॥१८८॥
तेणें बरवेपणें निर्मळें । अर्जुना उन्मेषाचे११. ज्ञानाचे
डोहळे२२. घोट
। घेताति गळाळे३३. घोट
। विस्मयामृताचे ॥१८९॥
तिया सुखसंपत्ती जोडलिया । मग स्वर्गा #वाये वांकुलियां११. वेडावणें, वाकुल्या दाखविणे
। हृदयाच्या जीवीं गुतकुलिया२२. गुदगुल्या
। होत आहाती ॥१९०॥ ॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ८, ओवी क्र. १ ते ४०
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
॥ श्री: ॥
॥ ॐ तत्सत्-श्रीकृष्ण प्रसन्न ॥
श्रीएकनाथी भागवत
अध्याय आठवा
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
सद्गुरुजनार्दन नमन (१ ते १२)
ॐ नमो सद्गुरु तूं ज्योतिषी । एकात्मतेचें घटित११. योग, (वधुवरांच्या ग्रहयोगांची) जुळणी
पाहसी ।
चिद्ब्रह्मेसी लग्न२२. ऐक्य
लाविशी । ॐपुण्येसी३३. मी प्रणवरूप पुण्य आहे या साधनाने (पुण्याहवाचन करून)
तत्त्वतां ॥१॥
वधूवरां लग्न लाविती । हे देखिलें असे बहुतीं ।
आपुली आपणा लग्नप्राप्ती । हे अलक्ष्य११. अगम्य
गती गुरुराया ॥२॥
लग्न लाविती हातवटी११. कौशल्य
। पांचां पंचकांची आटाटी२२. श्रम
।
चुकवूनि काळाची काळदृष्टी । घटिका प्रतिष्ठी निजबोधे ॥३॥
चहूं पुरुषार्थांचें तेलवण । लाडू वळिले संपूर्ण ।
अहंभावाचे निंबलोण । केलें जाण सर्वस्वे ॥४॥
साधनचतुष्टयाचा सम्यक । यथोक्त देऊन मधुपर्क ।
जीवभावाची मूद देख । एकाएक सांडविली ॥५॥
विषयसुख मागें सांडे । तेंचि पायातळी पायमांडे११. पायघड्या
।
सावधान म्हणसी दोंहीकडे । वचन धडफुडें२२. अगदी खरे
तें तुझें ॥६॥
व्यवधानाचे विधान तुटे । सहजभावें अंत्रपटु फिटे ।
शब्द उपरमोनि खुंटे । मुहूर्त गोमटे पैं तुझें ॥७॥
अर्धमात्रा११. प्रणवातील अर्धमात्रा
समदृष्टी । निजबिंबीं२२. अर्धमात्रेवरील बिंदू
पडे गांठी ।
ऐक्यभावाच्या मीनल्या मुष्टी । लग्नकसवटी अनुपम ॥८॥
तेथ काळा ना धवळा । गोरा नव्हे ना सांवळा ।
नोवरा लक्षेना डोळां । लग्नसोहळा ते ठायीं ॥९॥
परी नवल कैसें कवतिक । दुजेनवीण एकाएक ।
एकपणी लग्न देख । लाविता तूं निःशेख गुरुराया ॥१०॥
तुज गुरुत्वें नमूं जातां । तंव आत्मा तूंचि आंतौता ।
आंतु की बाहेर पाहों जातां । सर्वी सर्वथा तूंचि तूं ॥११॥
तुझें तूंपण पाहतां । माझें मीपण गेलें तत्त्वतां ।
ऐसें करूनियां गुरुनाथा । ग्रंथकथा करविसी ॥१२॥
सातव्या अध्यायाचे सिंहावलोकन व आठव्या अध्यायाचा उपोद्घात (१३ ते १६)
मागील कथासंगती । सप्तमाध्यायाचे अंतीं ।
अवधूतें यदूप्रती । कथा कपोती सांगीतली ॥१३॥
पृथ्वी-आदिअंती चोखट । कपोतापर्यंत गुरु आठ ।
सांगितले अतिश्रेष्ठ । गुरु वरिष्ठ निजबोधे ॥१४॥
उरल्या गुरूंची स्थिती । अवधूत सांगेल यदूप्रती ।
तेथें सावधान ठेवा चित्तवृत्ती । श्रवणें स्थिति तद्बोधे ॥१५॥
ब्राह्मण उवाच- सुखमैन्द्रियकं राजन्, स्वर्गे नरक एव च ।
देहिनां यद्यथा दुःखं, तस्मानेच्छेत तद्बुधः॥१॥
श्लोकार्थ – ब्राह्मण (अवधूत) म्हणाला – राजा, ज्याप्रमाणे स्वर्गात त्याचप्रमाणे नरकातही, प्राणिमात्राला इंद्रियजन्य सुख इंद्रियजन्य दु:खाप्रमाणेच आपोआप प्राप्त होते. म्हणून शहाण्या माणसाने सुखाची इच्छा करूं नये (व त्याकरिता प्रयत्नशीलही राहू नये). ॥१॥
श्रवणीं सादरता यदूसी । देखोनि सुख जालें ब्राह्मणासी ।
तेणें सुखें निरूपणासी । उल्हासेंसी करीतसे ॥१६॥
विषयाची आस्था (१७ ते २३)
तो म्हणे राया सावधान । विषयसुखाचें जें सेवन ।
तें स्वर्गनरकी गा समान । नाहीं अनुमान११. संशय
ये अर्थी ॥१७॥
भोगितां उर्वशीसी । जें सुख स्वर्गी इंद्रासी ।
तेंचि विष्ठेमाजी सूकरासी । सूकरीपासी निश्चित ॥१८॥
हे जाणोनि साधुजन । उभय भोगी न घालिती मन ।
नेदवे प्रेतासी आलिंगन । तेवीं साधुजन विषयांसी ॥१९॥
जीत सापु धरावा हातीं । हे प्राणियांसी नुपजे चित्तीं ।
तेवीं विषयांची आसक्ती । साधु न धरिती सर्वथा ॥२०॥
जैसें न प्रार्थिता दुःख । प्राणी पावताति देख ।
तैसें न इच्छितां इंद्रियसुख । भोगवी आवश्यक अदृष्ट ॥२१॥
मज दुःखभोगु व्हावा । हे नावडे कोणाच्या जीवा ।
तें दुःख आणी अदृष्ट तेव्हां । तेवीं सुखाचा यावा११. लाभ
अदृष्टें ॥२२॥
ऐसें असोनि उद्योगु करितां । तेणें आयुष्य नाशिलें सर्वथा ।
यालागी सांडूनि विषयास्था । परमार्था भजावें ॥२३॥
अजगराचे गुरुलक्षण (२४ ते ४०)
केवळ झालिया परमार्थपर । म्हणसी आहारेंवीण न राहे शरीर ।
येच निर्धारीं साचार । गुरु ‘अजगर’ म्यां केला ॥२४॥
ग्रासं सुमृष्टं विरसं, महान्तं स्तोकमेव वा ।
यदृच्छयैवापतितं, ग्रसेदाजगरोऽक्रियः॥२॥
श्लोकार्थ – अन्न मधुर असो किंवा नीरस असो, थोडे असो किंवा जास्त असो, सहजगत्या जे पुढे आलेले असेल, ते अजगराप्रमाणे काहीही प्रयत्न न करिता ग्रहण करावे. ॥२॥
उद्योगेंवीण आहारु । अयाचित सेवी अजगरु ।
डंडळोनि११. भिऊन
न सांडी धीरु । निधडा निर्धार पैं त्याचा ॥२५॥
स्वभावें तो मुख पसरी । सहजें पडे जें भीतरीं ।
सरस नीरस विचारु न करी । आहार अंगीकारी संतोषें ॥२६॥
तैशीचि योगियांची गती । सदा भाविती आत्मस्थिती ।
यदृच्छा आलें तें सेविती । रसआसक्ती सांडूनि ॥२७॥
योगियांचा आहारू घेणे । काय सेविलें हे रसना नेणे ।
रसना-पंगिस्त११. जिभेच्या अधीन
नाही होणें । आहारु सेवणे निजबोधे ॥२८॥
आंबट तिखट तरी जाणे । परी एके स्वादें अवघें खाणे ।
सरस नीरस कांहीं न म्हणे । गोड करणे निजगोडियें ॥२९॥
मुख पसरिलिया निर्धारा । स्वभावें रिघालिया वारा ।
तोचि आहारु पैं अजगरा । तेणेंचि शरीरा पोषण ॥३०॥
तैशीचि योगियांची स्थिति । वाताशनें सुखें वर्तती ।
आहारालागुनी पुढिलांप्रती । न ये काकुलती सर्वथा ॥३१॥
थोडें बहु सरसनिरसासी । हे काही म्हणणें नाहीं त्यासी ।
स्वभावें जें आलें मुखासी । तें सावकाशी सेवितु ॥३२॥
शयीताहानि भूरीणि, निराहारोऽनुपक्रमः ।
यदि नोपनमेद्ग्रासो, महाहिरिव दिष्टभुक् ॥३॥
श्लोकार्थ – एखादे वेळी जर अन्न पुढे आले नाही तर मोठ्या सर्पाप्रमाणे (अजगराप्रमाणे) यदृच्छेने येईल ते खाणाऱ्या (अयाचितवृत्ती) मुनीने काहीही प्रयत्न न करिता निराहारी राहून पुष्कळ दिवस खुशाल स्वस्थ पडून राहावे.॥३॥
अजगरासी बहु काळें । यदृच्छा आहारु न मिळे ।
तरी धारणेसी११. स्वभाव
न टळे । पडिला लोळे निजस्थानीं ॥३३॥
तैसें योगियासी अन्न । बहुकाळें न मिळे जाण ।
तरी करूनियां लंबासन । निद्रेविण निजतु ॥३४॥
निद्रा नाहीं तयासी । परी निजे निजी अहर्निशीं ।
बाह्य न करी उपायासी । भक्ष्य देहासी अदृष्टें ॥३५॥
अदृष्टी असेल जे जे वेळे । तें तें मिळेल तेणें काळें ।
यालागी त्याचे ज्ञान न मैळें । धारणा न ढळे निजबोधे ॥३६॥
ओजःसहोबलयुतं, बिभ्रद्देहमकर्मकम् ।
शयानो वीतनिद्रश्च, नेहेतेन्द्रियवानपि ॥४॥
श्लोकार्थ – इंद्रिये सतेज आणि मनःशक्ती व शारीरिक शक्ती खंबीर असूनही इंद्रियभोगासाठी काहीही करू नये. स्वस्थ पडून राहावे, पण झोप नसावी. कशाचीही इच्छा न करिता (आत्मानंदात) स्वस्थ राहावे. ॥४॥
अजगरासी बळ उदंड । देहो पराक्रमें प्रचंड ।
परी न करी उद्योगाचे बंड । पसरूनि तोंड पडिलासे ॥३७॥
तैसाचि योगिया केवळ । शरीरीं असे शारीर बळ ।
बुद्धिही असे अतिकुशळ । इंद्रियबळ पटुतर ॥३८॥
आहारालागीं सर्वथा । हेतु स्फुरों नेदी चित्ता ।
कायावाचा तत्त्वतां । नेदी स्वभावतां डंडळू ॥३९॥
स्वप्न जागृती मुकला । सुषुप्ती सांडोनि निजेला ।
शून्याचा पासोडा झाडिला । निजीं पहुडला निजत्वें ॥४०॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. १२९९ ते १३१६
१२९९.
आमुचे ठाऊके तुम्हां गर्भवास । बळिवंत दोष११. (कामक्रोधादी)
केले भोग२२. दुःखाचा भोग
॥१॥ काय हा सांगावा नसता नवलाव३३. आश्चर्य
। मैंदपणे४४. लबाडीने
भाव भुलवणेचा५५. फसविण्याचा
॥ध्रु॥ एका पळवूनि, एका पाठी लावा । कवतुक देवा पहावया ॥३॥ तुका म्हणे जेणें असें चेतविलें६६. भडकविले, चिडविले
। त्याच्याने उगलें७७. स्तब्ध
कैसे नव्हे? ॥४॥
१३००.
निर्दयासी११. निष्ठुर, दयाशून्याला
तुम्ही करितां दंडण२२. शिक्षा
। तुमचें गाऱ्हाणें३३. तक्रार
कोठे द्यावें? ॥१॥ भाकितों४४. (वा.) प्रार्थना, विनंती करतो
करुणा ऐकती कान । उगलेंचि५५. उगाच, निमुटपणे
मौन्य धरिलें ऐसे ॥ध्रु॥ दीनपणे पाहे, पाय भिडावोनि६६. पायाला मिठी मारून- बिलगून
। मंजुळा७७. गोड, मधुर
वचनीं विनवीतसे ॥३॥ तुका म्हणे गांठी मनाची उकला८८. उघडा, उलगडा करा
। काय जी विठ्ठला पाहातसां? ॥४॥
१३०१.
नसतों किविलवाणें११. दीनवाणे, दुःखी
। कांहीं तुमच्या कृपादानें ॥१॥ हेचि तयाची ओळखी । धालें२२. समाधानी, तृप्त असल्याची
, टवटवित३३. उत्साही, प्रफुल्लीत असणे
मुखी ॥ध्रु॥ वायां जात नाहीं । वचन प्रीतीचें तें कांहीं ॥३॥ तुका म्हणे देवा! । सत्य येते अनुभवा ॥४॥
१३०२.
झालों तंव साचें११. खरा
। ‘दास’, राहवणे२२. राहावे लागत आहे
काचें३३. कच्चे (अज्ञानातच)
॥१॥ हे कां मिळतें उचित४४. योग्य वाटते का?
? । तुम्ही नेणां कृपावंत! ॥ध्रु॥ सिंहाचे ते पिलें । जाय घेऊनियां कोल्हें ॥३॥ तुका म्हणे नास५५. (पुरुषार्थाचा)
? । आम्हां, म्हणविल्या दास ॥४॥
१३०३.
देवाच्या उद्देशें जेथें जेथें भाव । तो तो वसे११. राहतो
ठाव२२. ठिकाण
विश्वंभर ॥१॥ लोभाचे संकल्प पळालियावरी । कैंची तेथें उरी३३. अवकाश
पापपुण्यां? ॥ध्रु॥ शुद्ध भक्ती मन झालीया निर्मळ । कुश्चळी४४. वाईट, अपवित्र, मलिन अभक्त
विटाळ५५. दोष
वज्रलेप६६. वज्राप्रमाणे पक्का-दृढ-कायमचा लेप
॥३॥ तुका म्हणे ज्याचें तयासीच कळे । प्रांत७७. निर्णय, भाग (पाप-पुण्याचा)
येतो फळे८८. सुखदुःखात्मक भोगावरून
कळों मग ॥४॥
१३०४.
कडसणी११. विचार (संसाराचा)
धरितां अडचणीचा२२. शोक, भयप्रद संकटाची स्थिती
ठाव । म्हणऊनि जीव त्रासलासे ॥१॥ लौकिका बाहेरि राहिलों निराळा । तुज-विण वेगळा नाहीं दुजा ॥ध्रु॥ संकोचानें३३. भीड, लज्जा
नाहीं होत धणीवरी४४. तृप्ती
। उरवूनी५५. शिल्लक ठेवून
उरी काय काज६६. कारण
? ॥३॥ तुका म्हणे केले इच्छेचि सारिखें । नाहींसें पारिखें७७. परके
येथें कोणी ॥४॥
१३०५.
हेंचि जतन११. रक्षण
करा दान । धरूनि चरण राहिलों तें ॥१॥ घ्यावी माझ्या हातें सेवा । हेचि देवा विनवणी ॥ध्रु॥ आणीक कांहीं न घालीं भार । बहुत फार सांकडें२२. संकट
॥३॥ तुका तुमचा म्हणवी दास । त्याची आस३३. इच्छा
पुरवावी ॥४॥
१३०६.
आपुल्याच फुंदें११. अभिमानाने (पा.भे. स्फुंदे)
। जेथे तेथे घेती छंदें२२. हट्ट, दुराग्रह
॥१॥ पडिला सत्याचा दुष्काळ३३. अतिशय दुर्मिळता, दुर्लभता जाणवण्यासारखी उणीव, अभाव, कमतरता होणे
। बहु फार झाला घोळ४४. घोटाळा
॥ध्रु॥ विश्वाचे५५. (पा.भे.विश्वासाचे)
माठ६६. मठ्ठ, जड
। त्याचे कपाळी७७. नशिबात
ते नाट८८. प्रतिकूलता, बाधा, अमंगल
॥३॥ तुका म्हणे घाणा९९. तेल काढण्याचे लाकडी यंत्र (त्या भोवती फिरणाऱ्या बैलाप्रमाणे)
। मूढा तीर्थी प्रदक्षिणा ॥४॥
१३०७.
उद्योगाची धांव बैसली आसनीं । पडिले नारायणी मोटळे११. गाठोडे (शरीराचे)
हे ॥१॥ सकळ निश्चिंती झाली हा भरंवसा२२. खात्री
। नाहीं गर्भवासा येणें ऐसा ॥ध्रु॥ आपुलिया सत्तें३३. सामर्थ्याने
नाही आम्हां जिणें । अभिमान तेणें नेला देवें ॥३॥ तुका म्हणे चळे४४. चलनवलन होते
एकाचिया सत्तें । आपुलें५५. ममत्व (देहाविषयी)
मी रितेपणें६६. शून्य
असें ॥४॥
१३०८.
बहुतां पुरे ऐसा वाण११. माल
। आलें धन घरासी ॥१॥ घ्या रे फुका मोलेंविण२२. किंमतीवाचून
। नारायण न भुला ॥ध्रु॥ ऐका निवळल्या३३. विसरू नका
मनें । बरव्या कानें सादर४४. स्वच्छ, शुद्ध
॥३॥ तुका म्हणे करूनि अंतीं५५. तत्परतेने, विचारपूर्वक, सावधानपूर्वक
। निश्चिंती६६. मृत्युसमयी
हे ठेवावी ॥४॥
१३०९.
माझी मज जाती आवरली देवा । न व्हावा या गोवा११. प्रतिबंध
इंद्रियांचा ॥१॥ कासया मी तुझा म्हणवितों दास? । असतों उदास२२. अनासक्त (संसाराविषयी)
सर्वभावें ॥ध्रु॥ भयाचिये भेणें३३. (जन्ममरणाच्या) भीतीने
धरियेली कास४४. (वा.) आधार घेतला
। न पुरतां आस काय थोरी? ॥३॥ तुका म्हणे आप-आपलीं जतन५५. रक्षण (इंद्रियांचे)
। कैंचें थोरपण मग तुम्हां? ॥४॥
१३१०.
विनवितो तरी आणितोसि परी११. प्रकार
। याचकानें थोरी दातयाची ॥१॥ आमुचेही काही असों द्या उपकार । एकल्याने थोर कैंचे तुम्ही? ॥ध्रु॥ न घ्यावी जी काही बहुसाल२२. पुष्कळ वर्षेपर्यंत
सेवा । गौरव३३. सन्मान
तो देवा यत्न कीजे ॥३॥ तुका म्हणे नाहीं आमुची मिरासी४४. परंपरागत हक्क, वतनदारी
। असावेंसी ऐसी दुर्बळेंचि५५. गरीब (पा.भे. दुबळेंचि)
॥४॥
१३११.
एका ऐसें एक होतें कोणा काळें । समर्थाच्या बळें११. सामर्थ्याने
काय नव्हे? ॥१॥ घालूनि बैसलों मिरासीस२२. आधार
पाया । जिंकों देवराया संदेह नाहीं ॥ध्रु॥ केला तो न संडी आतां कइवाड३३. निश्चय, निर्धार
। वारीन४४. निवृत्त करणे
हे आड कामक्रोध ॥३॥ तुका म्हणे झाली आळसाची धाडी५५. हल्ला
। नव्हती आली जोडी६६. लाभ
कळों साच ॥४॥
१३१२.
झालें समाधान । तुमचे धरिले चरण ॥१॥ आतां उठावेंसें मना । येत नाहीं नारायणा! ॥ध्रु॥ सुरवाडिकपणें११. अनायासाने, आनंदाने
। येथें सांपडले केणें२२. माल
॥३॥ तुका म्हणे भोग । गेला निवारला लाग३३. संबंध (देहाभिमानाचा)
॥४॥
१३१३.
मुखाकडे वास११. वाट, प्रतीक्षा
। पाहे, करूनियां आस ॥१॥ आतां होईल तें शिरीं । मनोगत२२. आज्ञा शिरसा, आदरपूर्वक मान्य करील
आज्ञाधारी ॥ध्रु॥ तुम्ही अंगीकार । केला पाहिजे, हे सार३३. मनात असलेले, ठरलेले
॥३॥ तुका म्हणे दारी । उभा याचक मी हरी! ॥४॥
१३१४.
नाहीं माथा११. मुख्य अभिप्राय
भार । तुम्ही घेत, हा विचार-॥१॥ जाणोनियां ऐसें केलें । दुरिल अंगेसीं लाविलें ॥ध्रु॥ आतां बोलावें आवडी । नाम घ्यावें घडीघडी२२. वेळोवेळी
॥३॥ तुका म्हणे दुरी । देवा, खोटी३३. वाईट
ऐसी उरी४४. शिल्लक राहणे (जीवदशेने)
॥४॥
१३१५.
माझें जड भारी११. सर्व संकट
। आतां अवघे तुम्हांवरी ॥१॥ झालों अंकित२२. दासाचा दास/ अधीन असणारा आज्ञाधारक
अंकिला । तुमचा, मुकलों मागिला ॥ध्रु॥ करितों जें काम । माझी सेवा तुझें नाम ॥३॥ तुका पायां लागे । कांहीं नेदीं ना३३. अथवा
न मागें ॥४॥
१३१६.
तुम्ही आम्ही भले११. चांगले
आतां । झालों, चिंता काशाची? ॥१॥ आपुलाले आलों स्थळीं२२. (सेव्य सेवकाच्या)
। मौन कळी३३. तंटा, कलह
वाढेना ॥ध्रु॥ सहज जें मनीं होतें । तें उचित४४. योग्य
उघडलें ॥३॥ तुका म्हणे नसते अंगा५५. प्राप्त होणे
। येत संगा६६. संगतीे
सारिखें ॥४॥ ॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.
ग्रंथ
रामकृष्णहरी