दिवस – ८३. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

ऐसें वरचिलीचि बरवा
१. बाह्य सौंदर्यानें
। सुख जावों लागलें फावा
२. आनंद वाढू लागला
। तंव रसस्वादाचिया हांवा
३. इच्छा
लाहो
४. अति त्वरा
केला ॥१९१॥
झडकरी अनुमानाचेनि करतळें । घेऊनि तियें वाक्य फळें । प्रतीतिमुखीं एके वेळे । घालूं पाहे ॥१९२॥
तंव विचाराचिया रसना न दाटती
१. दडपत नाहींत
। परी हेतूच्या दशनीं
२. दातांनीं
न फुटती । ऐसें जाणौनि, सुभद्रापती । चुंबिचिना
३. ओंठास लावीना
! ॥१९३॥
मग, चमत्कारला, म्हणे । “इयें जळींचीं मां तारांगणें । कैसा झकविलों
१. फसलों
असलगपणें
२. सुगमपणानें
। अक्षरांचेनि ॥१९४॥
इयें पर्दे नव्हती; फुडिया
१. खरोखर, स्पष्ट
। गगनाचिया घडिया ! । येथ आमुची मति बुडालिया
२. बुडाली
थावो
३. अंत, थांग
न निघे ॥१९५॥
वांचूनि, जाणावयाची कें
१. कोठें
गोठी?”। ऐसें जीवीं कल्पूनि किरीटी । तिया पुनरपि केली दृष्टी । यादवेंद्रा ॥१९६॥
मग विनविलें सुभटें । “हां हो जी, ये एकवाटे
१. एकत्र
। सातही पदें अनुच्छिष्टें
२. एकसारखी कधीही न ऐकलेली
। नवलें आहाती ॥१९७॥
एहवीं, अवधानाचेनि वहिलेपणें
१. दूर राहण्याने, अभावाने, लक्ष्य न दिल्याने
। नाना प्रमेयांचें उगाणें
२. अनुभव, हिशेब
। काय श्रवणाचेनि आंगवणें
३. बळानें
। बोलों लाहाती
४. बोलतां येणार नाहींत
? ॥१९८॥
परी तैसें हैं नोहेचि देवा । देखिला अक्षरांचा मेळावा
१. जमाव
। आणि विस्मयाचिया जीवा । विस्मयो जाला ॥१९९॥
कानाचेनि गवाक्षद्वारें
१. झरोक्यांतून
। बोलाचे रश्मी
२. किरण
अभ्यंतरें -। पाहेना, तंव चमत्कारें । अवधान ठकलें
३. कुंठित झाले, चकित झाले
॥२००॥
तेवींचि अर्थाची चाड मज आहे । तें सांगतांही वेळु न साहे । म्हणौनि, निरूपण लवलाहें । कीजो; देवा!” ॥२०१॥
ऐसा मागील पडताळा
१. प्रत्यंतर
घेउनी । पुढां अभिप्राय दृष्टी सूनी
२. शिरवून, घालून
। तेवींचि माजीं शिरऊनी । आर्ती आपुली ॥२०२॥
कैसी पुसती पाहें पां, जाणिव । भिडेचि तरी लंघो नेदीं शिंव
१. सीमा, मर्यादा
। एहवीं श्रीकृष्ण हृदयासि खेंव
२. आलिंगन देण्यास
देवों सरला
३. प्रवृत्त झाला
॥२०३॥
अहो श्रीगुरुतें जैं पुसावें । तैं येणें मानें
१. याप्रमाणें
सावध होआवें । हैं, एकचि जाणें, आघवें । सव्यसाची ॥२०४॥
आतां तयाचें तें प्रश्न करणें । वरी सर्वज्ञ श्रीहरीचें बोलणें । हें संजयो आवडलेपणें
१. प्रेमानें, आवडीनें
। सांगैल कैसें ! ॥२०५॥
तिये अवधान द्यावें गोठी । बोलिजेल नीट महऱ्हाठी । जैसी कानाचे आधीं दिठी । उपेगा जाये ॥२०६॥
बुद्धीचिया जिभा । बोलाचा न चाखतां गाभा
१. सार
। अक्षरांचिया भांबा
२. शोभेनें
। इंद्रियें जिती
३. जगतात, नवजीवन मिळते
॥२०७॥
पाहा पां, मालतीचे
१. मोगरीचे
कळे । घ्राणासि
२. नाकाला
कीर वाटले परिमळें । परि वरचिया
३. बाहेरच्या
बरवा
४. सुरेखपणानें
काइ डोळे । सुखिये नव्हती ? ॥२०८॥
तैसें देशियेचिया
१. मराठी भाषेच्या
हवावा
२. शोभेनें
। इंद्रियें करिती राणिवा
३. राज्य
। मग प्रमेयाचिया गांवा । लेसां
४. अनायासे
जाइजे ॥२०९॥
ऐसेनि नागरपणें
१. चांगुलपणानें, रसालंकारात्मक सुंदर रीतीने
। बोलु निमे तें बोलणें
२. जेथें वाचा पोहोचत नाहीं तें शब्दांत ऐकून घ्या
-। ऐका; ज्ञानदेवो म्हणे । निवृत्तीचा ॥२१०॥
इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां सप्तमोऽध्यायः ॥७॥

समुद्राची गुरुलक्षणे (४१ ते ६८)
मुनिः प्रसन्नगम्भीरो, दुर्विगाह्यो दुरत्ययः ।
अनन्तपारो ह्यक्षोभ्यः स्तिमितोद इवार्णवः ॥५॥
श्लोकार्थ – मुनीने बाहेर शांत असून अंतःकरणात प्रसन्न असावे. त्याचे मनोगत अनाकलनीय असावे. त्याचा अपमान कोणीही करणार नाही अशी तेजस्विता त्याचे ठायी असावी. तरून जाण्यास कठीण अशा समुद्राप्रमाणे अफाट, निर्विकार आणि शांत वृत्ती मुनीने धारण करावी. ॥५॥
‘समुद्र’ जो गुरु करणें । त्याची परिस पां लक्षणें ।
गंभीरत्व पूर्णपणें । निर्मळ असणे इत्यादि ॥४१॥
समुद्र सदा सुप्रसन्न । योगी सदा प्रसन्नवदन ।
केव्हाही धुसमुशिलेपण
१. अस्वस्थता
। नव्हे जाण निजबोधे ॥४२॥
मीनल्या सरितांचे समळ जळ । समुद्र डहुळेना अतिनिर्मळ ।
तैसीं नाना कर्में करितां सकळ । सदा अविकळ योगिया ॥४३॥
जळें गंभीर सागर । योगिया स्वानुभवें गंभीर ।
वेळा
१. भरतीची मर्यादा, किनारा
नुल्लंघी सागर । नुल्लंघी योगीश्वर गुरुआज्ञा ॥४४॥
समुद्रीं न रिघवे भलत्यासी । तो बुडवी जळकल्लोळेंसीं ।
योगिया बुडवी संसारासी । भावें त्यापासीं गेलिया ॥४५॥
जो रिघणे निघणे
१. (पा.भे. रिगती मार्गी)
जाणे जळीं । तो समुद्रीं करी आंघोळी ।
येरांसी लाटांच्या कल्लोळीं । कासाकुळी
२. कासाविस
करीतसे ॥४६॥
तैसीचि योगियासी । सलगी न करवे भलतियासी ।
आपभये भीती आपैसी । तो भाविकांसी सुसेव्य ॥४७॥
जाहल्या धनवंतु वेव्हारा । उपायीं नुल्लंघवे सागरा ।
तैसें नुल्लंघवे योगीश्वरा । नृपां सुरनरां किन्नरां ॥४८॥
मळु न राहे सागरीं । लाटांसरिसा टाकी दुरी ।
तैसाचि मळु योगियाभीतरीं । ध्याने निर्धारी न राहे ॥४९॥
समुद्री मीनली ताम्रपर्णी
१. नदीचे नांव
। तेथ जाहली मुक्ताफळांची खाणी ।
योगिया मिनली श्रद्धा येऊनी । तेथ मुक्तखाणी मुमुक्षां ॥५०॥
जो समुद्रामाजी रिघोनि राहे । तो नानापरीची रत्ने लाहे ।
योगियांमाजीं जो सामाये । त्याचे वंदिती पाये चिद्रत्नें ॥५१॥
जैशी समुद्राची मर्यादा । कोणासी न करवे कदा ।
तैशी योगियांची मर्यादा । शास्त्रां वेदां न करवे ॥५२॥
प्रवाहेंवीण जळ । समुद्री जेवीं निश्चळ ।
मृत्युभयेंवीण अचंचळ । असे केवळ योगिया ॥५३॥
समुद्री प्रवाहो नव्हे काहीं । सदा पूर्ण ठायींच्या ठायीं ।
तैसें योगिया जन्ममरण नाहीं । परिपूर्ण पाहीं सर्वदा ॥५४॥
समुद्रलक्षणें साधितां । अधिक दशा आली हातां ।
ते योगियाची योग्यता । परिस तत्त्वतां सांगेन ॥५५॥
समुद्रामाजीं जळ । लाटांखालीं अतिचंचळ ।
योगिया अंतरीं अतिनिश्चळ । नाहीं तळमळ कल्पना ॥५६॥
समुद्र क्षोभे वेळोवेळे । योगिया क्षोभेना कवणें काळे ।
सर्वथा योगी नुचंबळे । योगबळे सावधु ॥५७॥
समुद्री भरतें पर्वसंबंधे । योगिया परिपूर्ण सदानंदें ।
समुद्रीं चढूवोहटू चांदें । योगिया निजबोधे सदा सम ॥५८॥
समुद्र सर्वांप्रति क्षार । तैसा नव्हे योगीश्वर ।
तो सर्वां जीवांसी मधुर । बोधु साचार पैं त्याचा ॥५९॥
जयासी बोधु नाहीं पुरता । अनुभव नेणे निजात्मता ।
त्यासी कैंची मधुरता । जेवीं अपक्कता सेंदेची
१. सेंदाडाची
॥६०॥
सागरी वरुषल्या घन । वृथा जाये तें जीवन ।
तैसा योगिया नव्हे जाण । सेविल्या व्यर्थपण येवों नेदी ॥६१॥
अल्पही योगिया होये
१. सेवा
घेता । तेणे निवारी भवव्यथा ।
यालागीं मुमुक्षी सर्वथा । भगवद्भक्तां भजावें ॥६२॥
समृद्धकामो हीनो वा, नारायणपरो मुनिः ।
नोत्सर्पेत न शुष्येत, सरिद्भिरिव सागरः ॥६॥
श्लोकार्थ – पावसाळ्यात नद्यांनी विपुल पाणी आणले अगर उन्हाळ्यात अल्प पाणी आणले तरी समुद्रात वाढ अगर घट दिसत नाही. त्याप्रमाणेच नारायणाचा एकनिष्ठ भक्त जो मुनी त्यानेही आपल्या इच्छा पूर्ण झाल्या म्हणून आनंदित होऊ नये अगर त्या शेवटास गेल्या नाहीत म्हणून खिन्न होऊ नये. ॥६॥
वर्षाकाळी सरिता सकळ । घेऊनि आल्या अमूप जळ ।
तेणें हरुषेजेना प्रबळ । न चढे जळ जळाब्धीं ॥६३॥
ग्रीष्मकाळाचिये प्राप्ती । सरितांचे यावे
१. प्रवाह
राहती ।
ते मानूनियां खंती । अपांपती वोहटेना ॥६४॥
तैसेंचि योगियांच्या ठायीं । नाना समृद्धि आलिया पाहीं ।
अहंता न धरी देहीं । गर्व कांहीं चढेना ॥६५॥
समृद्धि वेंचिलिया पाठीं । खंती नाहीं योगिया पोटीं ।
तो नारायणपर-दृष्टीं । सुखसंतुष्टी वर्ततु ॥६६॥
संपत्तीमाजी असतां । मी संपन्नु हे नाठवे चित्ता ।
दरिद्र आलिया दरिद्रता । नेणे सर्वथा योगिया ॥६७॥
दरिद्र आणि संपन्नता । दोन्ही समान त्याचिया चित्ता ।
नाहीं प्रपंचाची आसक्तता । नारायणपर तत्त्वतां निजबोधे ॥६८॥
पतंगाची गुरुलक्षणे (६९ ते ९०)
या प्रपंचाचा कठिण लागु
१. संबंध
। नाशासी मूळ स्त्रीसंगु ।
येचिविषयीं गुरु पतंगु । केला चांगु परियेसीं ॥६९॥
दृष्ट्वा स्त्रियं देवमायां, तद्भावैरजितेन्द्रियः ।
प्रलोभितः पतत्यन्धे, तमस्यग्नौ पतङ्गवत् ॥७॥
श्लोकार्थ – ईश्वराची मूर्तिमंत मायाच असणाऱ्या स्त्रियेला पाहून आणि तिच्या शृंगारिक हावभावाने मोह पावून, इंद्रियाधीन पुरुष अग्नीच्या ज्वालांनी आकर्षिलेल्या पतंगाप्रमाणे फसतो. ॥७॥
दैवी
१. देवाची
गुणमयी
२. त्रिगुणात्मक
जे माया । तिचे सगुणस्वरूप त्या स्त्रिया ।
तेथ प्रलोभ उपजला प्राणियां । भोग भोगावया स्त्रीसुखें ॥७०॥
हावभावविलासगुणीं । व्यंकट
१. वाकड्या
कटाक्षांच्या बाणीं ।
पुरुषधैर्य कवच भेदोनी । हृदयभुवनीं संचरती ॥७१॥
दारुण
१. कठोर
कटाक्षांच्या घायीं । पुरुषधैर्य पाडिलें ठायीं ।
योषिताबंदीं
२. स्त्रीपाशांनी
पाडिले पाहीं । भोग-कारागृहीं घातले ॥७२॥
स्त्रीभोगाचें जें सुख । तें जाण पां केवळ दुःख ।
तोंडी घालितां मधुर विख । परिपाकी
१. परिणामी
देख प्राणांतु ॥७३॥
दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा? ।
बळें आलिंगू जातां पैं गा । मरणमार्गा लागले ॥७४॥
पुढिला पतंग निमाला
१. मेलेला
देखती । तरी मागिल्यां दीपी अतिआसक्ती ।
तेवीं स्त्रीकामें एक ठकती
२. फसतात
। एकां अतिप्रीती पतंगन्यायें
३. पतंग दृष्टांताप्रमाणे
॥७५॥
तेवीं विवेकहीन मूर्खा । लोलुप्य
१. अभिलाषा (पा.भे. लालुप्य)
उपजे स्त्रीसुखा ।
तत्संसर्गे मरण लोकां । न चुके देखा सर्वथा ॥७६॥
दीप-रूपाचेनि कोडें
१. आसक्तीने
। पतंग जळोनि स्नेही बुडे ।
तेवीं स्त्रीसंगें अवश्य घडे । पतन रोकडे अंधतमीं
२. अंधतमनामक नरक
॥७७॥
योषिद्धिरण्याभरणाम्बरादिद्रव्येषु मायारचितेषु मूढः ।
प्रलोभितात्मा ह्युपभोगबुद्ध्या पतङ्गवन्नश्यति नष्टदृष्टिः ॥८॥
श्लोकार्थ – भगवंताच्या इच्छेने निर्माण केलेल्या स्त्री, सोन्याचे दागिने, सुंदर वस्त्रे इत्यादी पदार्थांचे ठिकाणी उपभोगाची लालसा वाढल्यामुळे लोभाने जो वेडा झाला आहे तो विवेकशून्य होऊन पतंगाप्रमाणे नाश पावतो. (म्हणून सुंदरतेला भुलू नये.)॥८॥
पहा पां कांता आणि सोनें । वस्त्रे आभरणे
१. अलंकार
रत्ने ।
मायेनें रचिली पडणें
२. विकार, प्रकार, पदार्थ
। पतनाकारणें जनांच्या ॥७८॥
एकली योषिता नरकी घाली । सुवर्णलोभे नरकु बळी ।
रत्ने भूषणें तत्काळीं । नरकमेळी घालिती ॥७९॥
ते अवघेचि अनर्थकारी । मीनले योषिताशरीरीं ।
ते देखतांचि पुरंध्री
१. सुंदर स्त्री
। जनांसी उरी मग कैंचेनि ?॥८०॥
अंगी वेताळसंचारा
१. भूताचा प्रवेश
। त्यावरी पाजिलिया मदिरा ।
मग डुल्लत नाचतां त्या नरा । वोढावारा
२. आवर, धरबंध
पैं नाहीं ॥८१॥
कां भांडाचे
१. भांडखोर, बडबडून भिकेवर निर्वाह करणारा
तोंडी भंडपुराण
२. बडबड, विसंगत बोलणे
। त्यावरी आला शिमग्याचा सण ।
मग करितां वाग्विटंबन । आवरी कोण तयासी?॥८२॥
हो कां मोहक मदिरा सर्वांसी । त्यांतु घातले उन्मादद्रव्यासी ।
सेवन करितां त्या रसासी । पारु
१. मर्यादा
भ्रमासी पैं नाहीं ॥८३॥
तैसें सोलीव
१. निव्वळ
मोहाचे रूप । तें जाण योषितास्वरूप ।
त्याहीवरी खटाटोप । वस्त्रे पडप
२. प्रावरणे
भूषणें ॥८४॥
काजळ कुंकू अलंकार । लेऊनि विचित्र पाटांबर
१. उंची वस्त्रे, शालू-पैठणी इ.

वनिता शोभत सुंदर । मायेचे विकार विकारले
२. साकारले
॥८५॥
माया अजितेंद्रिया बाधी । दासांसंमुख नव्हे त्रिशुद्धी
१. कालत्रयीही

ज्याची अतिप्रीती गोविंदीं । त्यासी कृपानिधि रक्षिता ॥८६॥
कैसा
१. (पा.भे. कैशा)
रीतीं रक्षी भक्त । मूळी आत्मा आत्मी नाही तेथ ।
स्त्रीरूपें भासे भगवंत । भक्त रक्षित निजबोधे ॥८७॥
वनिता देखोनि गोमटी । विवेकाची होय नष्ट दृष्टी ।
प्रलोभे उपभोगा देती मिठी । ते दुःखकोटी भोगिती ॥८८॥
देखोनि दीपरूपीं झगमगी । उपभोगबुद्धि पतंगीं ।
उडी घालितां वेगीं । जळोनि आगीं नासती ॥८९॥
एवं योषितारूपें माया । उपभोगबुद्धी
१. इच्छेने
भुलवी प्राणियां ।
जे विमुख हरीच्या पायां । त्यांसीच माया भुलवितु ॥९०॥
मधुमक्षिकेची गुरुलक्षणे (९१ ते ११७)
मधुकरीचेनि विंदाणे
१. कौशल्याने, चातुर्याने
। ‘मधुकर’ म्यां गुरु करणे ।
दुःख नेदितां कार्य साधणे । तीहि लक्षणे परिस पां ॥९१॥
स्तोकं स्तोकं ग्रसेद्ग्रासं, देहो वर्तेत यावता ।
गृहानहिंसन्नातिष्ठेद्वृत्तिं माधुकरीं मुनिः ॥९॥
श्लोकार्थ – जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कोणत्याही गृहाला (गृहस्थाला) पीडा न करता, मधुकरी (भ्रमराची) वृत्ती स्वीकारून थोडे थोडे अन्न ग्रहण करून मुनीने उपजीविका चालवावी. ॥९॥
भ्रमरु रिघोनि पुष्पामधीं । फूल तरी कुचुंबों नेदी ।
आपुली करी अर्थसिद्धी
१. पराग सेवनाचे कार्य
चोखट
२. चांगली
बुद्धि भ्रमराची ॥९२॥
तैसीच योगियाची परी । ग्रासमात्र घरोघरीं ।
भिक्षा करूनि उदर भरी । पीडा न करी गृहस्थां ॥९३॥
प्राणधारणेपुरतें
१. जगण्यापुरती
। योगी मागे भिक्षेतें ।
समर्थ
२. श्रीमंत
दुर्बळ
३. गरीब
विभागातें । न मनूनि चित्तें सर्वथा ॥९४॥
रिघोनि कमळिणीपाशीं । भ्रमरु लोभला आमोदासीं
१. सुगंधाला

पद्म संकोचे अस्तासी । तेंचि भ्रमरासी बंधन ॥९५॥
जो कोरडे काष्ठ भेदोनि जाये । तो कमळदळी गुंतला ठाये ।
प्रिया
१. (कमलिनी)
दुखवेल म्हणौनि राहे । निर्गमु
२. बाहेर जाणे
न पाहे आपुला ॥९६॥
तैसाचि जाण संन्यासी । एके ठायीं राहिल्या
१. (पा.भे. राहे)
लोलुप्येसीं ।
तेंचि बंधन होये त्यासी । विषयलोभासी गुंतला ॥९७॥

१३१७. चित्ता ऐसी नको देऊ आठवण । जेणे देवाचे चरण अंतरे
१. दुरावणे
ते ॥१॥ आलिया वचन रामनाम ध्वनि । ऐकावी कानीं ऐसी गोडी ॥ध्रु॥ मत्सराचा
२. असूया, दोष, हेवा
ठाव
३. थांगपत्ता, मागमूस, भाव
शरीरी नसावा । लाभेविण जीवा दु:ख देतो ॥३॥ तुका म्हणे राहे अंतरीं
४. अंतःकरणात
शीतळ । शांतीचें तें बळ क्षमा अंगीं ॥४॥
१३१८. कोण पुण्य कोणा गांठी
१. पदरी
। ज्यासी ऐसियांची भेटी ॥१॥ जिहीं हरी धरिला मनीं । दिले संसारासी पाणी
२. निवृत्ती
॥ध्रु॥ कोण हा भाग्याचा । ऐसियासी बोले वाचा ॥३॥ तुका म्हणे त्याचे भेटी । होय संसारासी तुटी
३. निवृत्ती
॥४॥
१३१९. तरीच हा जीव संसारी उदास
१. अनासक्त
। धरीला विश्वास तुम्हां सोई
२. संबंधाने
॥१॥ एके जातीविण
३. समान जाती, स्वभावावाचून
नाही कळवळा
४. सहानुभूती, माया
। ओढिली गोपाळा सूत्रदोरी
५. प्रेमदोरी
॥ध्रु॥ फुटतसे प्राण
६. (वा.) अतिशय उत्कंठा, व्याकुळता असणे; मरणप्राय वेदना होणे
क्षणाच्या विसरें । हे तों परस्परें सारिखेंचि ॥३॥ तुका म्हणे चित्तीं राखिला अनुभव । तेणे हा संदेह निवारला ॥४॥
१३२०. किती विवंचना
१. काळजी, विचार
करीतसे जीवीं
२. मनात
। मन धावंडवी
३. धावायला लावणे, हिंडविणे
दाही दिशा ॥१॥ कोणा एका भावें
४. निमित्ताने
तुम्ही अंगीकार । करावा, विचार याचसाठी ॥ध्रु॥ इतर ते आतां लाभ तुच्छ झाले । अनुभवा आले गुणागुण
५. गुणदोष, केवळ दोषरूपत्व
॥३॥ तुका म्हणे लागो अखंड समाधि । जावें प्रेमबोधी
६. प्रेमात व ज्ञानात
बुडोनियां ॥४॥
१३२१. दिकचि
१. मर्यादा
या नाहीं संसारसंबंधा । तुटेना या बाधा
२. त्रास, दुःख
भवरोगाची
३. जन्ममरणरूप रोगाची
॥१॥ तांतडी
४. घाई
ते करी म्हणऊनि तांतडी । साधिली
५. संपादन केली
ते घडी
६. घटका
सोनियाची
७. (ल) उत्तम
॥ध्रु॥ संकल्पाच्या बीजें इंद्रियांची चाली
८. प्रवृत्ती
। प्रारब्ध तें घाली गर्भवासी ॥३॥ तुका म्हणे बीजें जाळुनी सकळ । करावें गोपाळें आपुले भाट
९. स्तुतिपाठक
॥४॥
१३२२. आतां होईन धरणेकरी
१. हट्ट धरून बसणारा
। भीतरीच कोंडीन ॥१॥ नाहीं केली जीवेंसाटीं
२. जीव अर्पण करणे
तो
३. तर
कां गोष्टी रुचे
४. आवडणे, गोड लागणे
ते? ॥ध्रु॥ आधी निर्धार
५. निश्चय
तो सार
६. मुख्य
। मग भार सोसेना ॥३॥ तुका म्हणे खाऊं जेऊं । नेदूं होऊं वेगळा ॥४॥
१३२३. होईल तरी पुसापुसी
१. विचारपुस
उत्तर
२. प्रतिउत्तर
त्यासी योजावें
३. व्यवस्था करणे
॥१॥ तोंवरी मी पुढे कांहीं । आपुलें नाहीं घालीत ॥ध्रु॥ जाणोनियां अंतर
४. मन
देव । जेव्हां, भेव
५. भीती
फेडिल ॥३॥ तुका म्हणे धरिल हातीं । करील खंती
६. (वा.) सांभाळ करील
वेगळें ॥४॥
१३२४. हा तो नव्हे काही निराशेचा
१. आशाभंग होणे, हताश
ठाव
२. ठिकाण
। भलें पोटीं
३. मनात
वाव
४. अवकाश, धीर
राखिलिया ॥१॥ विश्वंभरें विश्व सामाविलें
५. अंतर्भूत होणे, एकीभूत होणे
पोटीं । तेथेंचि शेवटी आम्ही असों ॥ध्रु॥ नेणतां चिंतन करितों अंतरीं । तेथें अभ्यंतरी
६. देवाच्या
उमटेल
७. अंतःकरणात
॥३॥ तुका म्हणे माझा स्वामी अबोलणा
८. अबोलका
। पुरवूं खुणे खुणा जाणतसों ॥४॥
१३२५. निष्ठुर
१. कठोर
तो दिसे निराकारपणें । कोवळा
२. कोमल, दयाळू
सगुणें प्रतिपाळी
३. पालन, संगोपन करतो
॥१॥ केलाच करावा केला कइवाड
४. निश्चय, एका पक्षाचे समर्थन (सगुण अथवा निर्गुण)
। होईल तें गोड
५. गोड
, न परतें
६. परतणे
॥ध्रु॥ मथिलिया लागे नवनीत हातां । नासे वितुळतां
७. वितळणे
आहाच
८. वरवरचे
तें ॥३॥ तुका म्हणे आतां मनाशी विचार । करावा तो सार एकचित्तें
९. एकाग्र मनाने
॥४॥
१३२६. बहु देवा बरे झालें । नसतें गेलें सोंवळें
१. सोंवळे
॥१॥ धोवटाशी
२. धोतराची
पडली गांठी । जगजेठी
३. जगाचा राजा
प्रसादें ॥ध्रु॥ गादल्याचा
४. गढूळ पाण्याचा
झाला झाडा
५. निवाडा
। गेली पीडा विकल्प
६. संशय
॥३॥ तुका म्हणे वरावरी
७. तात्काळ
। निर्मळ करी निर्मळा ॥४॥
१३२७. स्वामित्वाचीं
१. मालकपणाचे
वर्में
२. मर्म
असोनि जवळी । वाहों जावें मोळी
३. मोळी
गुणासवें
४. गुणांसह
॥१॥ काबाडापासूनि
५. कष्टापासून
सोडवा दातारा! । कांहीं नका भारा पात्र
६. पात्र
करूं ॥ध्रु॥ धनवंत्र्या-चिये
७. धन्वंतरीच्या
अंगीं सत्ताबळ । व्याधी
८. रोग
ते सकळ तोडावया ॥३॥ तुका म्हणे आले मोड्यासी
९. मोडकळीला
कोंपट१०
१०. झोपडी
सांडोव्याची११
११. त्यागाची
वाट विसरावी ॥४॥
१३२८. ऋणाच्या परिहारा
१. निराकरणासाठी
झालों वोळगणा
२. सेवक
। द्यावी नारायणा वासलाती
३. हिशोब
॥१॥ झालों उतरायी शरीरसंकल्पें
४. शरीराच्या संकल्पाने
चुकों
५. चुकणे
द्यावीं पापें सकळही ॥ध्रु॥ आजिवरी होतों धरूनि जीवासी । व्याजें
६. व्याजाने
कासाविसी
७. व्याकुळ
बहु केलें ॥३॥ तुका म्हणे मना आणिला म्यां भाव
८. भाव
। तुमचा तेथे ठाव
९. ठिकाण
आहे देवा ॥४॥
१३२९. येणें पांगें
१. पांग
पायांपाशीं । निश्चयेंसी राहेन ॥१॥ सांगितली करीन सेवा । सकळ देवा दासत्व ॥ध्रु॥ बंधनाची तुटली बेडी । हेचि जोडी
२. प्राप्ती
मग आम्हां ॥३॥ तुका म्हणे नव्हे क्षण । पायांविण वेगळा ॥४॥
१३३०. आपुल्या आपण उगवा
१. सुटणे
लिगाड
२. गुंता
। काय माझें जड
३. जड
करून घ्याल? ॥१॥ उद्धारासी काय उधाराचे
४. उधाराचे
काम? । वाढवूचि श्रम नये देवा! ॥ध्रु॥ करा आतां मजसाठी वाड
५. मोठे
पोट
६. पोट
ठावें
७. माहित
नाहीं? तंट
८. तंटा
झालें लोकी ॥३॥ तुका म्हणे बाकी झडलियावरी
९. झडल्यावर
। न पडे व्यवहारी संचिताचे ॥४॥
१३३१. सर्वसंगी
१. सर्व संगाचा
वीट
२. कंटाळा
आला । तूं एकला आवडसी ॥१॥ दिली आतां पायीं मिठी । जगजेठी न सोडीं ॥ध्रु॥ बहु झालों खेदक्षीण
३. दुःखाने क्षीण
। येणे शीण तो नासे ॥३॥ तुका म्हणे गंगें वास
४. प्रतीक्षा
। बहु त्या आस
५. इच्छा
स्थळाची ॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

1 thought on “दिवस – ८३. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top