
अनुक्रमणिका
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ५. ओवी क्र. २६ ते ५०
सहजें ते अज्ञान । म्हणौनि म्हणती “ते भिन्न’ । एऱ्हवीं, दीपाप्रति काई आनान । प्रकाशु आहाती? ॥२७॥
पें सम्यक् येणें अनुभवें । जिहीं देखिलें तत्त्व आघवें । तें दोहींतेंही ऐक्यभावें । मानिती गा ॥२८॥
देखें, आकाशा आणि अवकाशा । भेदु नाहीं जैसा । तैसें ऐक्य योग-संन्यासा । वोळखे जो ॥३०॥
तयासिचि जगीं पाहलें । आपणपें तेणेंचि देखिलें । जया सांख्य, योग जाणवलें । भेदेंविणु ॥३१॥
येरा योगस्थिति जया सांडे । तो वायांचि गा हव्यासें पडे । परि प्राप्ति कहीं न घडे । संन्यासाची ॥३३॥
जैसें समुद्रीं लवण न पडे । तंव वेगळें, अल्प, आवडे । मग होय सिंधूचि एवढें । मिळे तेव्हां ॥३५॥
तैसें संकल्पाौनि काढिलें । जयाचें मनचि चैतन्य जाहलें । तेणें एकदेशियें; परी व्यापिलें । लोकत्रय ॥३६॥
आतां कर्ता-कर्म-करावें । हें खुंटलें तया स्वभावें । आणि करी, जऱ्ही आघवें । तऱ्ही, अकर्ता तो! ॥३७॥
प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि । इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ॥९॥
ऐसें तनुत्यागेंविणु । अमूर्ताचे गुण । दिसती संपूर्ण । योगयुक्तां ॥३९॥
एऱ्हवीं, आणिकांचिये परी । तोही एक शरीरी । अशेषाही व्यापारीं । वर्ततु दिसे ॥४०॥
तोही नेत्रीं पाहे । श्रवणीं ऐकतु आहे । परि, तेथींचा सर्वथा नोहे । नवल देखें! ॥४१॥
स्पर्शासि तरी जाणे । परिमळु सेवी घ्राणें । अवसरोचित बोलणें । तयाहि आथी ॥४२॥
आहारातें स्वीकारी । त्यजावें, तें परिहरी । निद्रेचिया अवसरीं । निदैजे सुखें ॥४३॥
आपुलेनि इच्छावशें । तोही गा चालतु दिसे । पैं सकळ कर्म ऐसें । राहाटे कीर ॥४४॥
हें सांगों काई एकैक! । देखें, श्वासोच्छ्वासादिक । आणि निमिषोन्निमिष । आदिकरूनि ॥४५॥
पार्था, तयाच्या ठायीं । हें आघवेंचि आथी; पाहीं । परी तो कर्ता नव्हे कांहीं । प्रतीतिबळें ॥४६॥
जें भ्रांति सेजे सुतला । तें स्वप्नसुखें भुतला । मग ज्ञानोदयीं चेइला । म्हणौनिया ॥४७॥
दीपाचेनि प्रकाशें । गृहींचे व्यापार जैसें । देहीं कर्मजात तैसें । योगयुक्ता ॥४९॥
तो कर्में करी सकळें । परी कर्मबंधा नाकळे । जैसें न सिंपे जळीं जळें । पद्मपत्र ॥५०॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ४, ओवी क्र. १९४ ते २५४
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
इन्द्रायानम्य सदसि श्रृण्वतां त्रिदिवौकसाम् । ऊचुर्नारायणबलं शक्रस्तत्रास विस्मितः ॥१६॥
(अर्थ – नारायणाच्या आज्ञेला मस्तकी धारण करून देवसेवकांनी ॐ म्हणून (ॐ शब्दाने नारायणाचे महत्त्व लक्षात घेऊन) नमस्कार केला आणि अप्सरांमध्ये श्रेष्ठ अशा उर्वशीला घेऊन ते स्वर्गाला निघून गेले. ॥१५॥ त्यांनी इंद्राला नमस्कार करून, इंद्रसभेत सर्व देव श्रवण करीत असतानाच, नारायणाचा प्रभाव वर्णन केला. ते ऐकून इंद्राला तेथे अत्यंत आश्चर्य वाटले. ॥१६ ॥)
नारायणाचे ऊरुस्पर्शी । उभी होती नारायणापाशीं । तेंचि नांव झालें तिसी । म्हणती ‘उर्वशी’ स्वर्गांगना ॥९५॥
ते देवांचे देवदूत । स्वर्गा पावले समस्त । मग शक्राचे सभेआंत । सांगती अद्भुत नारायणशक्ति ॥९६॥
तिहीं नारायणाचें चरित्र । सांगितलें अतिपवित्र । तेणे अवघेचि सुरवर । झाले थोर विस्मित पैं ॥९७॥
इंद्रे देखोनि उर्वशी । तिसी भुलला अहर्निशीं । बाहेर यावें सभेसी । हे वर्षानुवर्षी नाठवे ॥९८॥
हे प्रथमावतारवार्ता । जे कां नारायणाची कथा । पुढील अवतार आतां । नृपनाथा अवधारीं ॥९९॥
विघ्ने आणि भक्ती (२०० ते २०७)
आशंका ।। भावें करितां भगवद्भजन । यापरी इंद्र करी विघ्न । नारायण चैतन्यघन । तेणें विघ्ने संपूर्ण पराभविलीं ॥१॥
मा बाळ्याभोळ्यां करितां भक्ति । ऐशी विघ्ने जैं छळू येती । तैं कदा नव्हे भगवत्प्राप्ति । ऐसा विकल्प चित्तीं झणीं धरिशी ॥२॥
ब्रह्मादिकां सर्व भूतां । भृकुटिमात्रे जो नियंता । त्या भगवंतातें भजतां । विघ्ने सर्वथा बाधूं न शकती ॥३॥
ज्याचेनि इंद्रा इंद्रपण । तो भावें भजतां श्रीनारायण । भक्तांसी विघ्न करी कोण । हरि रक्षण निजभक्तां ॥४॥
इंद्रमुख कामादिक । विघ्ने छळिती सकळ लोक । त्यांचाही नारायण चाळक । तो भक्तांसी देख स्पर्शों नेदी ॥५॥
विघ्नांसी भुलविलें जेणें संपूर्ण । तो नित्य स्मरतां नारायण । आपधाकें विघ्ने पळती जाण । भक्तसंरक्षण हरिनामें ॥६॥
करावया निजभक्तकैवार । देवो धरी नानावतार । त्याच्या अवतारांचे चरित्र । अतिविचित्र अवधारीं ॥७॥
अवतारवर्णन-प्रारंभ
(अर्थ – (द्रुमिल ऋषी राजाला आणखी अवतार सांगतात.) त्रिभुवनाच्या कल्याणाकरिता, आपल्या स्वरूपाहून कधीही च्युत न होणाऱ्या विष्णूने आपल्या अंशाने हंस, दत्त, सनत्कुमार, आमचा पिता ऋषभदेव असे अवतार धरून आत्मज्ञानाचा बोध केला. मधुदैत्याने चोरलेले वेद, हयग्रीव अवतार घेऊन, त्याने पुन: उपलब्ध करून दिले.॥१७॥)
सनकादिक ब्रह्मनंदन । तिहीं पित्यासी केला प्रश्न । प्रश्नखंडणमिसें जाण । केलें ब्रह्मज्ञान ‘हंसावतारें’ ॥८॥
दत्तावतार (२०९, २१०)
नित्य स्मरतां हरीचें नाम । महाविघ्नें होती भस्म । त्याचे अवतारसंभ्रम । उत्तमोत्तम अवधारी ॥९॥
ज्याचेनि नामें पळे कृतांतु । ज्याचेनि नामें जन्ममरणां घातु । तो अवतारु ‘श्रीदत्तु’ । मूर्तिमंतु परब्रह्म ॥२१० ॥
सनत्कुमारावतार (२११)
नैष्ठिक ब्रह्मचारी निश्चितीं । ज्यासी स्वप्नीं नाहीं वीर्यच्युति । यालागीं ‘कुमार’ म्हणती । अवतारमूर्ति सनकादिक ॥११॥
ऋषभावतार (२१२, २१३)
आणि आमुचा जो कां पिता । ‘ऋषभ’ नारायण ज्ञाता । तोही अवतार नृपनाथा । जाण तत्त्वतां भगवन्मूर्ति ॥१२॥
इहीं नामी-रूपी संपूर्ण । अवतारी अवतरे नारायण । जो जगाचा प्रतिपाळण । स्वांशें श्रीकृष्ण अवतरे ॥१३॥
हयग्रीवावतार (२१४, २१५)
तोचि स्वयें गा श्रीकृष्ण । मधुकैटभ निर्दाळून । नामें जो कां ‘मधुसूदन’ । तोचि अवतरून ‘हयग्रीव’ झाला ॥१४॥
तेणें शंख मर्दून पुढती । उद्धरिल्या बुडाल्या श्रुती । आणोनि दिधल्या ब्रह्मयाहातीं । जाण निश्चितीं वेदरक्षणा ॥१५॥
(अर्थ – प्रलयाचे वेळी स्वायंभुव मनू , पृथ्वी व औषधी यांचे, मत्स्य अवतार घेऊन रक्षण केले. वराह अवतारात, बुडणारी पृथ्वी वर काढली व (हिरण्याक्ष) दैत्याला मारले. कूर्मावतारी समुद्रमंथनप्रसंगी मंदरपर्वताला पाठीचा आधार दिला. त्याचप्रमाणे शरण आलेल्या गजेंद्राला ‘हरी’ नावाचा अवतार घेऊन मगरमिठीतून सोडविले. ॥१८॥)
तेणेंचि ‘मत्स्यावतारें’। प्रलयकालांबुमहाभारें । मनूसगट रक्षिलें धरे । निजनिर्धारें औषधींसीं ॥१६॥
कमठावतार (२१७)
तेणेंचि ‘कमठावतारा’। स्वपृष्ठीं धरूनि गिरिवरा । मंथोनियां क्षीरसागरा । अमृत सुरवरां अर्पिलें ॥१७॥
श्वेतवाराहावतार (२१८)
श्वेतवराह महामूर्ति । धरेनें केली पूर्ण भक्ति । तिसी उद्धरोनि कृपामूर्ति । अभिनव शांति अर्पिली ॥१८॥
गजेंद्रमोक्षावतार (२१९)
तेणें आर्तत्राणा तांतडी । वैकुंठींहून घालोनि उडी । ‘गजाचे ग्राहबंधन तोडी’। उद्धरिलें आवडी गजेंद्रातें ॥१९॥
((अंगठ्याएवढे छोटे) वालखिल्य ऋषी पाण्यात बुडत असता त्यांनी केलेली स्तुती ऐकून विष्णूने त्यांचा उद्धार केला. वृत्राच्या वधामुळे लागलेल्या ब्रह्महत्येच्या पापापासून इंद्राची मुक्तता केली. दैत्याने कोंडल्यामुळे अनाथ झालेल्या देवस्त्रिया मुक्त केल्या. नृसिंहावतारात सज्जनांना निर्भय करण्यासाठी दैत्येंद्राचा (हिरण्यकश्यपूचा) वध केला. ॥१९॥)
मार्कंडेयो एके वेळीं । बुडतां अकाळप्रळयजळीं । तेणें स्मरतां वनमाळी । तारी तत्काळी ‘वटपत्रशायी’ ॥२२०॥
आर्तिहरण-अवतार (२२१ ते २२४)
शाळिग्राम पूजितां ऋषीश्वरीं । नळ वानरु ते अवसरी । देवपूजा टाकी सागरीं । चेष्टा वानरी स्वभावें ॥२१॥
तें देखोनि ऋषीश्वरीं । ‘शिळा न बुडोत तुझ्या करीं’ । ऐसा शाप ते अवसरीं । क्षोभेकरी दिधला ॥२२॥
तैं शाळिग्राम सागरोदरीं । तरतां देखिले ऋषीश्वरीं । काढावया रिघतां भीतरीं । लहरीकरी निर्बुजले ॥२३॥
ते काळी ऋषीश्वरीं । ‘आर्तिहरण’ स्तविला हरि । तेथ अवतरोनि श्रीहरि । ऋषीतें तारी पूजेसहित ॥२४॥
इंद्रब्रह्महत्यामोचन-अवतार (२२५, २२६)
वृत्र वधिला वज्रघातें । ते ब्रह्महत्या इंद्रातें । तेणें दोषें तो अंधतमातें । जाण पां निश्चितें बुडत होता ॥२५॥
तेथ अवतरोनि श्रीअनंतें । चतुर्धा वांटूनि ते हत्येतें । शुद्ध केलें इंद्रातें । कृपावंतें कृपाळुवें ॥२६॥
मुरारि-अवतार (२२७, २२८)
जिणोनियां अमरपुरें । हिरोनि देवांची अंतौरें । ती कोंडोनियां समग्रें । मुरे महा असुरें एकंदर केलें ॥२७॥
तो मुरमर्दन श्रीहरि । यालागी नांवें ‘मुरारि’ । देवस्त्रिया काढोनि बाहेरी । देवांच्या करीं अर्पिता झाला ॥२८॥
नरकेसरी-अवतार (२२९ ते २३१)
जो असुरांमाजीं चूडामणी । जो द्वेषियांमाजी अग्रगणी । तो हरिनाम ऐकतां कानीं । अतिक्षोभे मनी प्रज्वळों लागे ॥२९॥
जो पूर्ण क्रोधाचा उदधि । जो अविवेकाचा महानिधि । जो हरि स्मरे त्या पुत्रातें बाधी । गर्वमदीं उन्मत्त ॥२३०॥
तो हिरण्यकशिपु नखधारी । स्वयें निवटी ‘नरकेसरी’ । जो निजभक्तांचा कैवारी । अभयकारी साधूंचा ॥३१॥
(अर्थ – प्रत्येक मन्वंतरामध्ये देवदैत्यांच्या युद्धात देवकार्यार्थ भगवंतांनी आपल्या अंशाने अवतार घेऊन दैत्यपतींना ठार मारले आणि त्रिभुवनाचे रक्षण केले. वामनावतार घेऊन बलीपाशी त्रिपाद भूमीची याचना करून युक्तीने पृथ्वीचे हरण करून ती अदितीच्या मुलांना (देवांना) दिली. ॥२० ॥)
समुद्रमंथनाच्या शेवटीं । क्षीरसागराचे तटीं । सुरां असुरां कळी मोठी । अमृतासाठी मांडली ॥३२॥
तेव्हां अमृत विटे जें देखोनी । तो अवतारू घेतला मोहिनी । तेणें असुरां सुरापानी । अमृतदानी देवांसी ॥३३॥
तेथ चोरूनि घेतां अमृतग्रासा । निवटिला राहूचा घसा । त्याच्या कबंधावरी म्हाळसा । वास नेवासा स्वयें केला ॥३४
कुमारावतार (२३५, २३६)
सुरसाह्य नारायणु । द्वारके कुश निर्दाळूनु । का लवणासुर मर्दूनु । अवतरे आपणु ‘कुमार’रूपें ॥३५॥
ऐसा मन्वंतरामन्वंतरीं । निजभक्तकाजकैवारी । सुरकार्यार्थ श्रीहरि । नाना अवतारी अवतरे स्वयें ॥३६॥
वामनावतार (२३७ ते २४०)
तो सुरसाह्य जगजीवन । स्वयें कुब्ज झाला ‘वामन’ । अंगें याचक होऊन । देवांचा अपमान उतरला जेणें ॥३७॥
दानें दाटुगा बळी । त्यासी देवांचेनि नव्हे कळी । मग त्रिविक्रमरूपें आकळी । याञ्चाछळे बळी छळिला जेणें ॥३८॥
तरी भावबळे बळी प्रबळु । तेणें देवो केला द्वारपाळु । विष्णु सत्त्व पाहे छळछळू । शेखी दासांचा दयाळु दास्य करी स्वयें ॥३९॥
यापरी बळीचा छळ । करूनि घेतलें दिङ्मंडळ । तेणें अमरगण सकळ । अर्पूनि तत्काळ सुखी केले ॥२४० ॥
(हैहय कुलाचा नाश करण्यासाठी साक्षात अग्नी अशा परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली. प्रभू रामचंद्राने समुद्रावर सेतू बांधला, रावणाला मारले व लंकेचाही नाश केला. स्मरण-कीर्तनाने प्राणिमात्रांचे पाप नाहीसे करणारा सीतापती प्रभू रामचंद्र अद्यापीही आपल्या तेजाने प्रकाशत आहे. ॥२१॥)
तो देवाधिदेवोत्तमु । स्वयें झाला ‘परशुरामु’ । तेणें क्षत्रियांचा पराक्रमु । केला निर्धर्मु निजप्रतापें ॥४१॥
तो गोब्राह्मणकैवारी । सहस्रार्जुनातें संहारी । सहस्र भुजांची कांडोरीं करी । केली बोहरी दानवकुळा ॥४२॥
जमदग्नीचा कोपाग्नि । परशुरामतेजें प्रज्वळूनि । हैहयकुळ जाळूनि । आहाळिली अवनी क्षत्रियांची ॥४३॥
तेणें तीन सप्तकें वीररसु । देऊनि क्षत्रियमद बहुवसु । त्या रोगाचा केला नाशु । धरेचे ईशु धरामर केले ॥४४॥
रामावतार (२४५ ते २५४)
जो अवतारांचे मूळ पीठ । जो वीरवृत्ति अतिउद्भट । तो अवतारांमाजी श्रेष्ठ । अतिवरिष्ठ ‘श्रीराम’ ॥४५॥
पापें पळती रामनामें । नामांकित वंदिजे यमें । गणिकेची कर्माकर्मे । श्रीरामनामें निर्दळिलीं ॥४६॥
नामें कळिकाळासी धाक । यमदूतां न मिळे भीक । रामनामगजरें देख । पळे निःशेख जन्ममरण ॥४७॥
जो देवांचे बंद सोडी । नवग्रहांची बेडी तोडी । जेणें रामराज्याची रोकडी । उभविली गुढी तिन्ही लोकीं ॥४८॥
ज्याचेनि शिळा तरती सागरीं । असुर मारिले वानरीं । जेणे सुवर्णाची नगरी । वोपिली पुरी शरणागतासी ॥४९॥
जो प्रतापाचा मरिगळा । जेणें सेतु बांधिला अवलीळा । चरणी उद्धरिली शिळा । जो निजजिव्हाळा निजभक्तां ॥२५०॥
तो अवतार मूर्तिमंत । राया अद्यापि असे वर्तत । हा संवाद त्रेतायुगांत । द्रुमिल सांगत विदेहासी ॥५१॥
यालागीं श्रीराम राम । नित्य जपे जो हे नाम । तो पुरुषांमाजीं पुरुषोत्तम । कर्माकर्म-अतीत तो ॥५२॥
तें रामनाम अवचटें । भीतरी रिघे कर्णपुटें । तैं कळिमळांची मळकटें । नामोद्धाटें नासती ॥५३॥
ऐशी रामनामाची ख्याती । जगदुद्धारे केली कीर्ती । धन्य धन्य जे परिसती । धन्य जे गाती रामचरित ॥५४॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. ७५३ ते ७६६
सांगितले काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नको ॥ध्रु॥
माप टाकी सळे धरिली विठ्ठलें । थापटोनी केलें सावधान ॥३॥
प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरले ते शेवटी लावी तुका ॥४॥
आवडीचा ठाव आलोंसें टाकून । आतां उदा-सीन न धरावें ॥ध्रु॥
शेवटील स्थळ नीच माझी वृत्ति । आधारें विश्रांती पावईन ॥३॥
नामदेवापायीं तुकया स्वप्नी भेटी । प्रसाद हा पोटीं राहिलासे ॥४॥
वैष्णव चांभार धन्य त्याची माता । शुद्ध उभयतां कुळ याती ॥ध्रु॥
ऐसा हा निवाडा झालासे पुराणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥३॥
तुका म्हणे आगी लागो थोरपणा । दृष्टी त्या दुर्जना न पडो माझी ॥४॥
मागे पुढे अवघा काळ । पळों नये न चले बळ । करितां कोल्हाळ। कृपें खांदा हरि वाहे ॥ध्रु॥
पापपुण्यात्म्याच्या शक्ती । असती योजिल्या श्रीपती । यावें काकुलती । तेथें सत्तानायका ॥३॥
तुका उभा पैलथडी । तरि हे प्रकार निवडी । घातल्या सांगडी। ताफे पेटे हाकारी ॥४॥
जैसा भाव तैसें फळ । स्वाती तोय एक जळ ॥ध्रु॥
पाहेसांगे आणि जेवी। अंतर महदंतर तेवीं ॥३॥
तुका म्हणे हिरा । पारखियां मूढां गारा ॥४॥
पिटूनियां मुसे आला अळंकार । दग्ध ते असार होऊनियां ॥ध्रु॥
एकचि उरले कायावाचामना । आनंद भुवनामाजीं त्रयीं ॥३॥
तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार । होऊनि किंकर विठोबाचे ॥४॥
काम तो कामना भोगीतसे देवा । आलिंगने हेवा चरण चुंबीं ॥ध्रु॥
शांतीच्या संयोगें निरसला ताप । दुसरें तें पाप भेदबुद्धि ॥३॥
तुका म्हणे पाहे तिकडे सारिखें । आपुलें पारिखें निरसलें ॥४॥
मंगळावांचूनि उमटेना वाणी । अखंडचि खाणी एकी रासी ॥ध्रु॥
मोडले हे स्वामी ठायाठाव सेवा । वाढवावा हेवा कोणा अंगें? ॥३॥
तुका म्हणे अवघे दुमदुमिलें देवें । उरलें तें गावें हेचि आतां ॥४॥
जयाचा विभाग तयासीच फळे। देखणे निराळे कौतुकासी ॥ध्रु॥
शूर तो ओळखे घायडाय हात । येरां होईल मात सांगायासी ॥३॥
तुका म्हणे माझी केळवली वाणी । केला निजस्थानी जानवसा॥४॥
आतां निश्चिंतीने पावलों विसांवा । खुंट-लिया धांवा तृष्णेचिया ॥ध्रु॥
कवतुक वाटे झालिया वेंचाचें। नांव मंगळाचे तेणें गुणें ॥३॥
तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥४॥
माउलीचे मागे बाळकांची हारी । एका सूत्रें दोरी ओढतसे ॥२॥
जेथील जे मागें तें रायासमोर । ‘नाहींसें’ उत्तर येत नाहीं ॥३॥
सेवेचिये सत्ते धनीच सेवक । आपुलें तें एक न वंची कांहीं ॥४॥
आदि अंत ठाव असे मध्यभाग । भोवतें भासे जग उच्चासनीं ॥५॥
भावारूढ तुका झाला एकाएकीं । देवचि लौकिकी अवघा केला ॥६॥
भजनाचे सोई जगा परिहार । नेणत्या सादर चित्त कथे ॥ध्रु॥
नाइकवे कानीं साधन उपाय । ऐके तो गाय हरुषे गीत ॥३॥
नव्हे आराणूक जावयासी वना । वेध कामि मना हरिकथेचा ॥४॥
काळाच्या साधना कोणा अंगीं बळ? । चिंतना मंगळ अष्टप्रहर ॥५॥
तुका म्हणे आम्ही खेळो भातुकुलें । विभागासी मुले भोळी येथे ॥६॥
देखणियापुढे रुचे कवतुक। उभयतां सुख वाढतसे ॥ध्रु॥
आशंकेची बाधा नाहीं लडिवाळां । चित्त वरि खेळा समबुद्धि ॥३॥
तुका म्हणे दिशा मोकळ्या सकळा । अवकाशी खेळा ठाव झाला ॥४॥
जातां घरा, मागे उरों नेणे खंती। मिळाल्या बहुती फांकलिया ॥ध्रु॥
उदयींच अस्त उदये संपादिला । कल्पनेचा केला जागेपणें ॥३॥
जाणवूनि गेला हांडोरियां पोरां । सावध इतरां करूनि तुका ॥४॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.







