
अनुक्रमणिका
- श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ५. ओवी क्र. ७३ ते ९५
- श्रीएकनाथी भागवत क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ५, ओवी क्र. १ ते ५१
- ईश्वरनमन (१ ते १७)
- संतमहिमा (१८ ते २२)
- भक्ती (२३ ते २८)
- अहंता (२९ ते ३२)
- पाचव्या अध्यायाचा प्रस्ताव (३३ ते ३५)
- अभक्तगतिविन्यासनिरूपणाची विदेहाची विनंती (३६ ते ४३)
- अभक्तगती (४४)
- वर्ण आणि आश्रम (४५ ते ५१)
- श्रीतुकाराम महाराजांची गाथाअभंग क्र. ७८१ ते ७९८
- ग्रंथ
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ५. ओवी क्र. ७३ ते ९५
तो जयाकडे वासु पाहे । तेउती सुखाची सृष्टि होये । तो म्हणे तेथ राहे । महाबोधु ॥७४॥
नवद्वारें देहीं । तो असतुचि, परि नाहीं । करितुचि न करी कांहीं । फलत्यागी ॥७५॥
आणि कर्ता ऐसें म्हणिपे । तरी कवणें कर्मीं न शिंपे । जे, हातु-पावो न लिंपे, । उदासवृत्तीचा ॥७७॥
योगनिद्रा तरी न मोडे । अकर्तेपणा सळु न पडे । परि महाभूतांचें दळवाडें । उभारी भले ॥७८॥
जगाच्या जीवीं आहे । परि कवणाचा कहीं नोहे । जगचि हें होय जाये । तो शुद्धीहि नेणे ॥७९॥
पें मूर्तीचेनि मेळें । तो मूर्तचि होऊनि खेळे । परि अमूर्तपण न मैळे । दादुलयाचें ॥८१॥
तो सृजी, पाळी, संहारी । ऐसें बोलती जे चराचरीं । तें अज्ञान गा; अवधारीं । पांडुकुमरा ॥८२॥
एथ ईश्वरू एकु अकर्ता । ऐसें मानलें जरी चित्ता । तरी “तोचि मी” हें स्वभावता । आदींचि आहे ॥८४॥
ऐसेनि विवेकें उदो चित्तीं । तयासी भेदु कैंचा त्रिजगतीं? । देखें, आपुलिया प्रतीति । जगचि मुक्त! ॥८५॥
जैसी पूर्वदिशेच्या राउळीं । उदया येतांचि सूर्य दिवाळी । कीं येरीही दिशां तियेचि काळीं । काळीमा नाहीं ॥८६॥
ऐसें व्यापक ज्ञान भलें । जयांचिया हृदया गिवसित आलें । तयांची समता दृष्टि बोलें । विशेषु काई? ॥८८॥
एक आपणपांचि जैसें । ते देखती विश्व तैसें । हें बोलणें, कायसें । नवलु एथ? ॥८९॥
परि, दैव जैसें, कवतुकें । कहींचि दैन्य न देखे । कां, विवेकु हा नोळखे । भ्रांतीतें जीवीं ॥९०॥
नातरी अंधकाराची वानी । जैसा सूर्यो न देखे स्वप्नीं । अमृत नायके कानीं । मृत्यु-कथा ॥९१॥
हें असो; संतापु कैसा । चंद्रु न स्मरे जैसा । भूतीं भेदु नेणती तैसा । ज्ञानिये ते ॥९२॥
नातरी, हे धेनु हें श्वान । एक गुरु एक हीन । हें असो; कैंचें स्वप्न । जागतया? ॥९४॥
एथ भेदु तरी कीं देखावा । जरी अहभाव उरला होआवा । तो आधींचि नाहीं आघवा । आतां विषमु काई? ॥९५॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ५, ओवी क्र. १ ते ५१
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः॥
ईश्वरनमन (१ ते १७)
अवचटें मागतयासी । जैं भेटी होय तुजसी । तैं घोट भरूं धांवसी । देखतांचि घेसी जीवें त्यातें ॥२॥
जें जें मागों येती तुजपासीं । ते बांधोन ऐक्यतेमाजीं सूदसी । शेखी त्यांचे सोडवणेसी । भेटी दुसऱ्यासी स्वप्नीही नव्हे ॥३॥
अणुमात्र तुझी प्राप्ती । अवचटें चढे ज्याचे हातीं । त्याचिये संसारसंपत्ती । सर्वस्वे निश्चिती नाडिसी तूं ॥४॥
मैंदाचा विडा घेतां । तो प्रवर्ते आपुले घाता । तेवीं तुझी प्रसन्नता । झालिया जीविता स्वयें नाशी ॥५॥
जें जें तुजपें मागों आले । ते ते सर्वस्वे नागवले । शेखीं नागवे तुवां केले । निर्लज्ज झाले तिहीं लोकीं ॥६॥
ऐशी तुझी निर्वाणगती । त्या तुझी उदार कीर्ती । घडे म्हणशी कैशा रीतीं । ते अगाध स्थिति अवधारीं ॥७॥
मागें उदार वाखाणिले । तेही आपणियांऐसे केले । मग सर्वस्व आपुलें । दान दिधलें दातृत्वें ॥८॥
षड्गुणैश्वर्यवैभवेंसीं । आपणियातें दाना देसी । दिधलें तें घेवों नेणसी । कदाकाळेंसी कल्पांतीं ॥९॥
आपणियां दिधलें दान । यालागीं तूं दासां अधीन । मग त्यांचेनि छंदें जाण । सर्वस्वें आपण नाचसी ॥१०॥
बळीने सर्वस्व केलें दान । शेखीं तूं झालासि त्याअधीन । त्याचे द्वारपाळपण । अद्यापि आपण चालविसी ॥११॥
धर्मे अर्पिलें अग्रपूजेसी । शेखीं तूं त्याची सेवा करिसी । नाना संकटें स्वयें सोशिसी । अंगें काढिसी उच्छिष्टें ॥१२॥
तुझा निजभक्तु अंबऋषी । त्याचे गर्भवास तूं सोशिसी । तुज गौळिये राखिती हृषीकेशी । शेखीं त्या गोपाळांसी रक्षिलें ॥१३॥
एवं स्वस्वरूप द्यावयासी । उदारत्व तुजपासीं । हे न ये गा आणिकांसी । हृषीकेशी कृपाळुवा ॥१४॥
तो तूं परम उदार ऐसा । राया रंका समभावें सरिसा । भावो तेथ भरंवसा । तूं आपैसा आतुडसी ॥१५॥
त्या तुझिया प्राप्तीलागीं । कपाटें सदा सेविती योगी । एक ते झाले भोगविरागी । एक ते त्यागी सर्वस्वें ॥१६॥
एक हिंडती दशदिशे । एक तुजलागी झाले पिसे । परी तुझी भेटी स्वप्नीही दिसे । ऐसा न दिसे क्षण एक ॥१७॥
संतमहिमा (१८ ते २२)
संतचरणीं जो विनटला । तो निजप्राप्तीसी पावला । संतस्वरूपें अवतरला । स्वयें संचला परमात्मा ॥१९॥
यालागी जी जी संतांची रूपें । ती ती श्रीहरीची स्वरूपें । म्हणौनि संतांचिये कृपे । अतिसाक्षेपें अर्जावें ॥२०॥
ते ज्ञानार्थाचे परम पिसे । यालागीं ग्रंथाचेनि मिसें । त्यांचे चरण अनायासें । सावकाशे वंदीन ॥२१ ॥
संतकरुणावलोकन । तें मज नेत्रींचें अंजन । चरणकृपा पाहतां जाण । श्रीजनार्दन प्रकाशे ॥२२॥
भक्ती (२३ ते २८)
भज्य-भजक-भजना । एके अंगीं त्रिविध भावना । दावूनियां जगज्जीवना । जनी जनार्दना निजभक्ती ॥२४॥
हे अभेदभक्ती चोखडी । परम ऐक्ये भजनगोडी । अधिकाधिक चढोवढी । वाढे आवडी निजभक्तां ॥२५॥
देवो आपली सर्वस्व जोडी । वेंची भक्तांचिये वोढी । ऐशी अभेदभक्तीची गोडी । पढिये गाढी गोविंदा ॥२६॥
यालागी भक्तांचा शरीरभार । स्वयें वागवी श्रीधर । आपुलेनि अंगें परपार । पाववी साचार निजभक्तां ॥२७॥
‘निजभक्तांचा देहभावो । निजांगें वागवी देवाधिदेवो । तरी अभक्तांचा देहो । वागवावया पहा हो काय आन आहे’ ॥२८॥
अहंता (२९ ते ३२)
यालागी जो निरभिमान । तोचि भगवद्भक्त संपूर्ण । ज्याच्या अंगी देहाभिमान । त्यासी भक्तपण कदा न घडे ॥३०॥
निजभक्त तारितां कौतुकें । त्याची रोमावळी केवीं दुखे । निर्भय करोनि पूर्ण हरिखें । देवो निजमुखें निजभक्तां तारी ॥३१॥
यालागी निरभिमानता । जे विनटले भक्तिपंथा । ते पावो देवोनि विघ्नांचे माथां । पावती तत्त्वतां भगवत्पद ॥३२॥
पाचव्या अध्यायाचा प्रस्ताव (३३ ते ३५)
पंचमामाजीं निरूपण । अभक्तांची गति लक्षण । युगीं युगी पूजाविधान । सांगेल पावन हरीचें ॥३४॥
अवतारचरितपुरुषार्थु । सांगोन संपला चतुर्थु । आतां अभक्तांचा वृत्तांतु । राजा पुसतु मुनीसी ॥३५॥
अभक्तगतिविन्यासनिरूपणाची विदेहाची विनंती (३६ ते ४३)
(अर्थ – राजा म्हणाला-ब्रह्मस्वरूप जाणणारे श्रेष्ठ मुनीश्वरहो! सामान्यतः जे पुष्कळसे लोक पाप हरण करणाऱ्या भगवंताची उपासना करीत नाहीत त्या मनबुद्ध्यादी इंद्रियांच्या आधीन असलेल्या आणि अतृप्त वासना असणाऱ्या लोकांना काय गती प्राप्त होते? ॥१॥)
जे कामालागी अतिउद्भट । जे सक्रोध क्रोधे तेजिष्ठ । जे अतिलोभे लोभिष्ठ । जे परम श्रेष्ठ प्रपंचीं ॥३७॥
जे गर्वाचे अग्रगणी । जे अहंकाराचे चूडामणी । जे विकारांची प्रवाहश्रेणी । जे उघडली खाणी विकल्पांची ॥३८॥
ज्यांचे सद्बुद्धीआड आभाळ । महामोहाचें सदा सबळ । जे छळणार्थी अतिकुशल । जे अतिप्रबळ प्रलोभे ॥३९॥
दिवसा न देखती निश्चितें । ते अंधारी देखणी दिवाभीतें । तेवीं नेणोनि परमार्थातें । जे अतिज्ञाते प्रपंचीं ॥४०॥
जे नेणती आत्महित । ज्ञान विकूनि काम पोसित । ऐसे जे कां अभक्त । त्यांची गति निश्चित सांग मज ॥४१॥
तुम्हांऐसे सद्बुद्धी । चालते बोधाचे उदधी । भाग्ये लाधलों ज्ञाननिधी । हा प्रश्न त्रिशुद्धी सांगावा ॥४२॥
राजा साक्षेपें बहुवस । पुसे अभक्तगतिविन्यास । तो सांगावया ‘चमस’ । सावकाश सरसावला ॥४३॥
अभक्तगती (४४)
(अर्थ – चमस मुनी म्हणाले – या विराट पुरुषाच्या मुख, बाहू, मांड्या व पाय यांपासून ब्राह्मणादी चार वर्ण व सत्त्वादिगुणांनुसार ब्रह्मचर्यादी निरनिराळे चार आश्रमही निर्माण झाले. ॥२॥)
वर्ण आणि आश्रम (४५ ते ५१)
मुखीं वेदविद ब्राह्मण । बाहूं जन्मले राजन्य । उरूं जन्मले वैश्यवर्ण । चरणी जन्मस्थान शूद्रवर्णा ॥४६॥
मूळी अवघे तीन गुण । गुणयोगें वर्ण जाण । त्रिगुणी चारी वर्ण । जन्मलक्षण घडे कैसें ॥४७॥
सत्त्वगुणें शुद्ध ब्राह्मण । सत्त्वरजमिश्रें राजे जाण । रजतमें वैश्यवर्ण । केवळ तमोगुण शूद्रवर्ण ॥४८॥
क्षत्रिय वैश्य आणि ब्राह्मण । द्विजन्मे हे तिन्ही वर्ण । त्यांसी गायत्री वेदाध्ययन । शूद्र ते जाण संस्काररहित ॥४९॥
ब्रह्मचर्य आणि गार्हस्थ्य । तिहीं वर्णी अवश्य प्राप्त । चहूं आश्रमां आश्रयभूत । जाण निश्चित ब्राह्मण ॥५० ॥
गार्हस्थ्य पुरुषाच्या चरणीं । ब्रह्मचर्य हृदयस्थानीं । वक्षःस्थळी वसती वनी । शिरोमणी संन्यास ॥५१॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. ७८१ ते ७९८
अवघा पायांपाशीं दिला जीवभाव । जन्ममरणा ठाव पुसियेला ॥ध्रु॥
ज्याचे देणे त्यासी घातला संकल्प । बंधनाचे पाप चुकविलें ॥३॥
तुका म्हणे येथे उरला विठ्ठल । खाय बोलें बोल गायें नाचें ॥४॥
पायीं गोविली वासना । तुच्छ केलें ब्रह्मज्ञाना ॥ध्रु॥
येतां पाहें मुळा । वास पंढरीच्या डोळां ॥३॥
तुका म्हणे स्थळ । मग मी पाहेन सकळ ॥४॥
आतां सोडोनि भोजन । भिके जावें वेडेपण ॥ध्रु॥
उसंतिली वाट । मागे परतावे फुकट ॥३॥
तुका म्हणे वाणी । वेंचों बैसोन ठाकणीं ॥४॥
ऐकिलें तेंचि कानीं । होय परिपाक मनीं ॥ध्रु॥
कळवळा पोटीं । सावधान हितासाठी ॥३॥
तुका म्हणे भाव । ज्याचा, तोचि जाणा ‘देव’ ॥४॥
संत सुमनें उत्तरें । मृदु रसाळ मधुरें ॥ध्रु॥
विसांवतां कानीं । परिपाक घडे मनीं ॥३॥
तुका म्हणे जोडी । होय जतन रोकडी ॥४॥
कळोनिही न कळे वर्म । तरि श्रम पावती ॥ध्रु॥
सर्व सत्ता धरितां धीर । वीर्यां वीर आगळा ॥३॥
तुका म्हणे तिखट तिखें । मृदु सखे आवडी ॥४॥
जैसी कारंज्याची कळा । तो जिव्हाळा स्वहिताचा ॥ध्रु॥
कल्पना ते देवाविण । न करी भिन्न इतरीं ॥३॥
तुका म्हणे पावे भूतीं । ते निश्चिती मापली ॥४॥
तेथे प्रेमाचा सुकाळ । टाळ मृदंग कल्लोळ । नासे दुष्टबुद्धि सकळ । समाधि हरिकीर्तनीं ॥ध्रु॥
ऐकतां हरिकथा । भक्ति लागे त्या अभक्तां ॥३॥
देखोनि कीर्तनाचा रंग । कैसा उभा पांडुरंग! ॥४॥
हे सुख ब्रह्मादिकां । नाहीं नाहीं म्हणे तुका ॥५॥
जतन करा जतन करा । धांवतें सैरा ओढाळ तें ॥ध्रु॥
मान अपमान मनाचे लक्षण । लाविलिया ध्यान तेंचि करी ॥३॥
तुका म्हणे मन उतरी भवसिंधु । मन करी बंधु चौऱ्यांशीचा ॥४॥
पुंडलिके हाट भरियेली पेंठ । अवघे वैकुंठ आणियेलें ॥ध्रु॥
उदिमासी तुटि नाहीं कोणा हाणी । घेऊनियां धणी लाभ घेती ॥३॥
पुरले देशासी, भरलें शिगेसी । अवघी पंचक्रोशी दुमदुमीत ॥४॥
तुका म्हणे संतां लागलीसे, धणी । बैसले, राहोनि पंढरीस ॥५॥
गोविलें विसारें, माप केलें खरें । न पाहे माघारें अद्यापवरी ॥ध्रु॥
वैष्णव मापारी, नाही झाली सळें । पुढेही न कळे पार त्याचा ॥३॥
लाभ झाला त्यांनी धरिला तो विचार । अाहिक्य परत्र सांठविलें ॥४॥
तुका म्हणे मज मिळाली मजुरी। विश्वास या घरीं संतांचिया ॥५॥
साक्षभूत, नव्हे सांगितली मात । महिमा अत्यद्भुत वर्णवेना ॥ध्रु॥
पंचक्रोशीमाजी रीघ नाही दोषा । जळती आपैसा अघोर ते ॥३॥
निर्विषय नर चतुर्भुज नारी । अवघा घरोघरी ब्रह्मानंदु ॥४॥
तुका म्हणे ज्यापें नाहीं पुण्यलेश । जा रे पंढरीस, घेईं कोटि ॥५॥
वादावाद करणे त्यासी तोचि वरी। गुखाडीची चाड सरे तोंचि बाहेरी ॥ध्रु॥
सौभाग्यसंपन्न हो कां वृद्ध प्रतिष्ठा। चिकरूनि सांडी पायां लागली ते विष्ठा ॥३॥
नाहीं याति कुळ फांसे ओढी तयासी । तुका म्हणे काय मुद्रा सोंग जाळिसी! ॥४॥
दुष्ट होसी तरि आणिकांतें करिसी । संदेह येविशीं करणें न लगे ॥ध्रु॥
तुका म्हणे जें दर्पणीं बिंबलें । तें तया बाणले निश्चयेसीं ॥३॥
तेंचि कळों आतां येतसे प्रचिती। अधर्मा टेंकती धर्म नव्हे ॥ध्रु॥
तप व्रत करितां लागती सायास। पाळितां पिंडास गोड वाटे ॥३॥
देव म्हणऊनि न येती देऊळा । संसार वेगळा तरि कां नव्हे? ॥४॥
तुका म्हणे मज धरितां गुमान । ऐसे कोणी जन नरका जाती ।।५।।
विनवितों रंक दास मी सेवक । वचन तें एक आइकावें ॥ध्रु॥
तुझी स्तुति वेद करितां भागला । निवांतचि ठेला ‘नेति नेति’ ॥३॥
ऋषि मुनि बहु सिद्ध कविजन । वर्णितां तुझे गुण न सरती ॥४॥
तुका म्हणे तेथे काय माझी वाणी । जे तुझी वाखाणी कीर्ति देवा! ॥५॥
घातले वचन न पडेचि खालीं । तूं आम्हां माउली अनाथांची ॥ध्रु॥
मज याचकाची पुरविली आशा । पंढरीनिवासा मायबापा! ॥३॥
नाशिली आशंका माझिया जीवाची । उरली भेदाची होती काही ॥४॥
तुका म्हणे आता केलों मी निर्भर । गाईन अपार गुण तुझे ॥५॥
सर्व भार माथां चालविसी त्यांचा । अनुसरले वाचा काया मनें ॥ध्रु॥
पाचारितां उभा राहासी जवळी । पाहिजे ते काळी पुरवावें ॥३॥
चालताही पंथ सांभाळीसी, वाटे । वारिसील कांटे खडे हातें ॥४॥
तुका म्हणे चिंता नाहीं तुझ्या दासां । तूं त्यांचा कोंवसा सर्वभावें ॥५॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.








रामकृष्णहरी माऊली 🙏