
अनुक्रमणिका
- श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ५. ओवी क्र. १२९ ते १५०
- श्रीएकनाथी भागवत क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ५, ओवी क्र. १११ ते १४८
- ज्ञानाभिमान्यांची स्त्रीकामवृत्ती (१११ ते १३७)
- ज्ञानाभिमान्यांचा यज्ञाचा खटाटोप (१३८ ते १४८)
- श्रीतुकाराम महाराजांची गाथाअभंग क्र. ८१४ ते ८२४
- ग्रंथ
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ५. ओवी क्र. १२९ ते १५०
जयांतें बाह्याची भाष । नेणिजेचि निःशेष । अंतरीं सुख । एक आथि ॥१३०॥
परि तें वेगळेपणें भोगिजे । जैसें पक्षिणें फळ चुंबिजे । तैसे नव्हे; तेथ विसरिजे । भोगितेपणही ॥१३१॥
भोगीं अवस्था एकी उठी । ते अहंकाराचा अंचळु लोटी । मग सुखेंसि घे आंठी । गाढेपणें ॥१३२॥
तिये आलिंगनमेळीं । होय आपेंआप कवळी । तेथ जळ जैसें जळीं । वेगळें न दिसे ॥१३३॥
कां, आकाशीं वायु हारपे । तेथ “दोन्ही’ हे भाष लोपे । तैसें, सुखचि उरे स्वरूपें । सुरतीं तिये ॥१३४॥
ऐसी द्वैताची भाष जाय । मग म्हणों जरी “एकचि होय’ । तरी तेथ साक्षी कवणु आहे । जाणते जें? ॥१३५॥
लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः । छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः ॥२५॥
जे ऐसेनि सुखें मातले । आपणपांचि आपण गुंतले । ते, मी जाणें, निखिळ वोतले । सामरस्याचे ॥१३७॥
ते, आनंदाचे अनुकार । सुखाचे अंकुर । कीं, महाबोधें विहार । केले जैसे ॥१३८॥
ते विवेकाचे गांव । कीं परब्रह्मींचे स्वभाव । नातरी, अळंकारले अवयव । ब्रह्मविद्येचे ॥१३९॥
ते सत्त्वाचे सात्त्विक । कीं चैतन्याचे आंगिक । हें बहु असो, एकैक । वानिसी काई? ॥१४०॥
तूं संतस्तवनीं रतसी । तरी कथेची से न करिसी । कीं निराळी बोल देखसी । सनागर ॥१४१॥
परि तो रसातिशयो मुकुळीं । मग ग्रंथार्थ-दीपु उजळीं । करी साधुहृदय-राउळीं । मंगळउखा ॥१४२॥
ऐसा श्रीगुरूचा उवाइला । निवृत्तिदासासी पातला । मग तो म्हणे “श्रीकृष्ण बोलिला । तेंचि आइका’ ॥१४३॥
अर्जुना, अनंत सुखाच्या डोहीं । एकसरां तळुचि घेतला जिहीं । मग, स्थिरावूनि तेही । तेंचि जाहले ॥१४४॥
अथवा आत्मप्रकाशें चोखें । जो आपणपेंचि विश्व देखे । तो देहेंचि परब्रह्म, सुखें- । मानूं येईं ॥१४५॥
जें साचोकारें परम । ना तें अक्षर निःसीम । जिये गांवींनचे निष्काम । अधिकारीये ॥१४६॥
जे महर्षीं वाढले । विरक्तां भागा फिटले । जे निःसंशया पिकलें । निरंतर ॥१४७॥
तें परब्रह्म निर्वाण । जें आत्मविदांचें कारण । तेंचि ते पुरुष जाण । पंडुकुमरा ॥१४९॥
ते ऐसे कैसेनि जाहाले? । जे देहींचि ब्रह्मत्वा आले । हें पुससी, तरी भलें! । संक्षेपें सांगों ॥१५०॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ५, ओवी क्र. १११ ते १४८
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
ज्ञानाभिमान्यांची स्त्रीकामवृत्ती (१११ ते १३७)
यजन्त्यसृष्टान्नविधानदक्षिणं, वृत्त्यै परं घ्नन्ति पशूनतद्विदः ॥८॥
(अर्थ – वेदार्थाचे खरे रहस्य न कळल्याकारणाने केवळ विषयासक्त होऊन ते रतिसुखाच्या लालसेने घरामध्ये स्त्रियांचेच सेवन करतात आणि परस्परांमध्ये अभिमानाने तेच सांगत राहतात. ते यज्ञाचा खरा (श्रुतिसंमत) विधी म्हणजे ब्राह्मणांस अन्नदान व योग्य द्रव्यदान करण्याचे बुद्धिपुरःसर टाळून यज्ञ करतात. त्यांची यज्ञीय पशुहिंसा केवळ स्वतःच्या उपजीविकेसाठी असते.॥८॥)
यापरी मंदबुद्धी । कैसे संवादती शब्दीं । मनुष्यजन्में हेचि सिद्धी । नाना भोगविधी भोगाव्या स्त्रिया ॥१२॥
जें स्त्रीभोगीं सद्यसुख । तें त्यागविती ते अतिमूर्ख । वैराग्यमिसें लोक । ठकिले देख महामूढीं ॥१३॥
सांडूनि गृहभोग अंगना । जयां वैराग्यें उद्भट भावना । ते निजकर्मे दंडिले जाणा । नागवूनि वना दवडिले दैवें ॥१४॥
काय गृहाश्रमी देव नसे । मग वना धांवताति पिसे । साचचि देव वनीं वसे । तरी कां मृग ससे न तरती व्याघ्र ॥१५॥
घालोनियां आसनें । देवो भेटता जरी ध्यानें । तरी बकाची पाळिंगणें । कां पां तत्क्षणे नुद्धरती ॥१६॥
एकान्त रहिवास विवरीं । तेथचि भेटता श्रीहरी । तरी न तरोनियां उंदिरीं । कां पां घरोघरी चिंवताती ॥१७॥
देवो सर्वज्ञ चोखडा । तेणें पशुपक्षियां केला जोडा । तोही लोकीं मानूनियां वेडा । त्यागाचा गाढा पाडिला मोळा ॥१८॥
‘आनंदा उपस्थ एकायतन’ । हे देवाचें वेदवचन । तेंही न मानूनि अज्ञान । त्यागाचे संपूर्ण मांडिती बंड ॥१९॥
मैथुनी परम सुख । देवेंचि रचिलें देख । तेंही त्यागोनियां मूर्ख । वीतरागें लोक संन्यासी होती ॥१२०॥
जे जगामाजी केवळ पिशी । ते स्वयें होती संन्यासी । देवें दंड देऊनि त्यांसी । लाविलें भिकेसी दारोदारीं ॥२१॥
त्यागोनियां निजस्त्रियेसी । कर्मत्यागें होती संन्यासी । तो स्त्रीशाप बाधी त्यांसी । मागतां भिकेसी पोट न भरे ॥२२॥
हातावरी पावले दंड । खांडमिशा केलें मुंड । हिंडती भगवीं गुंडगुंड । हा स्त्रीशापें वितंड विटंबु केला ॥२३॥
घेऊनियां दोहीं हातीं । उदंड गांडीसी लाविती माती । त्रिकाळ जळीं बुडविजती । ऐसी स्त्रीशापे ख्याती लाविली त्यांसी ॥२४॥
लंगोटी लाविली गांडीसी । झोळी लाविली हातासी । त्याहीवरी दंड देऊनि त्यासी । स्त्रीशापें संन्यासी लाविले भिके ॥२५॥
स्त्रीसुखापरतें नाहीं सुख । स्त्रीत्यागापरता नाहीं दोख । हेंचि नेणोनियां मूर्ख । दंडिले अनेक वैराग्यत्यागें ॥२६॥
स्त्रीसंगेंवीण विविध भोग । ते जाणावे अतिउद्वेग । निजभाग्ये जे सभाग्य साङ्ग । ते स्त्रीयोगें भोग भोगिती नाना ॥२७॥
हेचि देवाचें प्रसन्न होणें । जे सदा इष्ट भोग भोगणें । ते भोग जेणें त्यागणें । तेंचि क्षोभणे देवाचें ॥२८॥
स्त्रियादि भोग त्यागिले रोकडे । पुढे निजमोक्ष हे वचन कुडें । यापरी भोळे लोक बापुडे । वैराग्यवादें फुडें नाडिले येथ ॥२९॥
ऐसऐसिया अनुवादा । करिती परस्परे संवादा । म्हणती त्यागाची बुद्धि कदा । आम्हांसी गोविंदा देऊ नको ॥१३०॥
त्याग करोनि भीक मागणें । यापरीस भलें मरणें । मुक्ति देखिली नाहीं कोणें । आपदा भोगणे जग देखे ॥३१॥
कोणासी तरी मुक्ती । कोठे तरी देखिजेती । तरी ते साच मानूं येती । मिथ्या वदंती वैराग्यत्यागा ॥३२॥
ऐशी सदा त्यागाची करूनि निंदा । भोग भोगावे म्हणती सदा । ऐसऐशिया आशीर्वादा । देती सदा स्वाध्यायासी ॥३३॥
स्त्रीसुख परम मानून । स्वयें सदा होती स्त्रैण । मग जागृती सुषुप्ति स्वप्न । स्त्रियेचें ध्यान अहर्निशीं ॥३४॥
नाहीं सद्गुरूचे भजन । नाहीं वृद्धासी पूजन । नाहीं अतिथींसी अन्न । स्त्रीआधीन सर्वस्वें ॥३५॥
स्त्रियेचें दुखवू नेदी मन । कदा नुल्लंघी स्त्रियेचें वचन । नित्य स्त्रियेचें अनुसंधान । सद्भावें उपासन स्त्रियेचें सदा ॥३६॥
नाहीं कुळदेवता कुळवृत्ती । नाहीं पिता-माता-सद्गुरुभक्ती । संपत्ति वोपी स्त्रियेहातीं । आपण सर्वार्थी तीअधीन वर्ते ॥३७॥
ज्ञानाभिमान्यांचा यज्ञाचा खटाटोप (१३८ ते १४८)
यज्ञदीक्षेची प्रतिष्ठा । तेणें पूज्य होईन वरिष्ठां । अग्रपूजा माझा वांटा । ऐशिया उत्कंठा आदरी यागु ॥१४०॥
ऐशिया नाना विवंचना । आधी संकल्पूनि मना । मग प्रवर्ते यागयजना । जोडावया धना कृतनिश्चयो ॥४१॥
न पाहे विधिविधाना । नाहीं आदरु मंत्रोच्चारणा । न करी अन्नसंपादना । कोरडे कणां हवन मांडी ॥४२॥
मी यज्ञ करितों अंगें । ऐसें जगापासीं सांगे । आणि तेणें यागयोगें । चालवी प्रसंगें जीविकायोगु ॥४३॥
स्वयें नेणती विधिविधाना । आणि न पुसती सज्ञाना । परी पशूंचिया हनना । प्रवर्तती जाणा शठ नष्ट दंभे ॥४४॥
मग तेथींचा पुरोडाश । सेविती यथासावकाश । आम्ही पवित्र झालों निर्दोष । ऐसाही उल्हास लागती करूं ॥४५॥
गौणता आवाहनविसर्जना । तेथ कैंची पूजा दक्षिणा । सत्पात्राची अवगणना । करिती हेळणा ज्ञानगर्वे ॥४६॥
केवळ जीविकेच्या आशा । करूं लागती पशुहिंसा । आम्ही याज्ञिक या आवेशा । पिटिती ठसा तिहीं लोकीं ॥४७॥
केवळ जीविकेचिया दुराशा । अविधी करिती पशुहिंसा । मज दोष होईल ऐसा । कंटाळा मानसा कदा नुपजे ॥४८॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. ८१४ ते ८२४
तैसा खाऊ नको दगा । निदसुरा राहूनी जागा ॥ध्रु॥
चोरासवें वाट । चालोनि केलें तळपट ॥३॥
डोळे झांकूनि राती । कूपी पडे दिवसा ज्योती ॥४॥
पोसी वांझ गाय । तेथें कैंची दूध साय ॥५॥
फुटकी सांगडी । तुका म्हणे न पवे थडी ॥६॥
सोंकरी सोंकरी सोहंकरी । विसांवा तोंवरी नको उभे आहे तो ॥ध्रु॥
गोफणीसी गुंडा घालीं पागोऱ्याच्या नेटें । पळती आहाकारे अवघी पाखरांची थाटें ॥३॥
पेटवूनी आगटी राहें जागा पालटूनि । पडिलिया मानी बळ बुद्धि व्हावी दोनी ॥४॥
खळे दानें विश्व सुखी करीं होता रासी । सारा सारूनियां ज्याचे भाग देईं त्यासी ॥५॥
तुका म्हणे मग नाहीं आपुलें कारण । निज आलें हातां भूस सांडिले निकण ॥६॥
नेदा तरि हे हो नका देऊं अन्न । फुकाचें जीवन तरी पाजा ॥२॥
तुका म्हणे मज सगुणाची चाड । पुरवा कोणी कोड दुर्बळाचें ॥३॥
लाहो घेईं हरिनामाचा । जन्म जाऊं नेदी साचा । गळा पडेल यमफांसा । मग कैंचा ‘हरि’ म्हणसी? ॥ध्रु॥
‘पुरलासाठी देहाडा’ । ऐसें न म्हणे न म्हणे मूढा! ॥३॥
नरदेह दुबळा । ऐसे न म्हणे रे चांडाळा ॥४॥
तुका म्हणे सांगों किती । सेखीं तोंडी पडेल माती ॥५॥
बहु दुधड जरि झाली म्हैस गाय । तरि होईल काय कामधेनु? ॥ध्रु॥
तुका म्हणे अंगे व्हावें तें आपण । तरीच महिमान येईल कळों ॥३॥
नये मोल देतां धनाचिया राशी । नाहीं तें आकाशीं पाताळी तें ॥ध्रु॥
तुका म्हणे मिळे जिवाचिये साटीं । नाहीं तरि गोष्टी सांगों नये ॥३॥
ऐसें मी हे नाही बोलत नेणतां । आणोनि संमता संतांचिया ॥ध्रु॥
‘नाम’ म्हणे तया आणीक साधन । ऐसें हे वचन बोलों नये ॥३॥
तुका म्हणे सुख पावे या वचनीं । ज्याची शुद्ध दोन्ही मायबापें ॥४॥
काय करूं बहु गुंतलों आतां । नयेचि सरतां मागे पुढे ॥ध्रु॥
होतें गांठी तें सरले आतां । आणीक माथां ऋण झालें ॥३॥
सोंकरिलियाविण गमाविली पिकें । रांडापोरें भिके लावियेलीं ॥४॥
बहुतांची बहु घेतली घरें । न पडे पुरे कांहीं केल्या ॥५॥
तुका म्हणे कांहीं न धरावी आस । जावे हे सर्वस्व टाकोनियां ॥६॥
करी देव तरि काय नव्हे एक । कां तुम्ही पृथक शिणा वायां ॥ध्रु॥
उल्लंघुनीयां भ्रताराची आज्ञा । अन्न ऋषिपत्न्या घेऊनि गेल्या । अवघेचि त्यांचे देवें केलें काज । धर्म आणि लाज राखियेली ॥३॥
पितयासी पुत्रें केला वैराकार । प्रल्हादें असुर मारवीला । बहुत विघ्ने केली तया आड । परि नाहीं कैवाड सांडियेला ॥४॥
गौळणी करिती देवाशीं व्यभिचार । सांडूनि आचार भ्रष्ट होती । तयां दिलें तें कवणासी नाहीं । अवघा अंतर्बाही तोचि झाला ॥५॥
देव जोडे तरी करावा अधर्म । अंतरे तें कर्म नाचरावें । तुका म्हणे हा तो जाणतो कळवळा । म्हणोनि अजामेळा उद्धरिलें ॥६॥
येथे न घली न घली आड । ‘संचितसा’ शब्द नाड । उठाउठी गोड । बीजें बीज वाढवीं ॥ध्रु॥
केलें तें ‘क्रियमाण’ । झालें तें ‘संचित’ म्हण । ‘प्रारब्ध’ जाण । उरउरित उरलें तें ॥३॥
चित्त खोटें चालीवरी । रोग भोगाचे अंतरीं । रसना अनावरी । तुका म्हणे ढुंग वाहे ॥४॥
‘नारायण’ नाम ‘नारायण’ नाम । नित्य करी काम जिव्हा मुखें । जन्म जराव्याधि पाप-पुण्य तेथें । नासती सकळही दु:खें रे ॥ध्रु॥
शीत उष्ण वन सेवितां कपाट। आसन समाधी साधी । तप तीर्थ दान व्रत आचरण । यज्ञ नाना मन बुद्धि । भोगाभोग तेथे, न चुकती प्रकार । जन्मजरादु:खव्याधी, । साहोनि काम क्रोध अहंकार । आश्रमी अविनाश साधी रे ॥३॥
घोकितां अक्षरें अभिमान विधि-। निषेध लागला पाठी । वाद करितां निंदा घडती दोष । होय वज्रलेपो भविष्यति। दूषणांचे मूळ भूषण तुका म्हणे । सांडी मिथ्या खंती । रिघोनि संतां शरण सर्वभावें । राहें भलतिया स्थिती रे ॥४॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.








रामकृष्णहरी माऊली 🙏