
अनुक्रमणिका
- श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ६. ओवी क्र. १६३ ते १८५
- श्रीएकनाथी भागवत क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ५, ओवी क्र. ४९६ ते ५४३
- नारदनिरूपित वसुदेवदेवकीचे भाग्य (४९६ ते ५२२)
- कृष्णविरोधानेही मोक्ष (५२३ ते ५३०)
- कृष्णमहिमा (५३१ ते ५४८)
- श्रीतुकाराम महाराजांची गाथाअभंग क्र. ९४३ ते ९५७
- ग्रंथ
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ६. ओवी क्र. १६३ ते १८५
जेथ, आराणुकेचेनि कोडें । बैसलिया, उठों नावडे । वैराग्यासि दुणीव चढे । देखिलिया जें ॥१६४॥
जो संतीं वसिविला ठावो । संतोषासि सावावो । मना होय उत्सावो । धैर्याचा ॥१६५॥
अभ्यासुचि आपुलियातें करी । हृदयासि अनुभवु वरी । ऐसी रम्यपणाची थोरी । अखंड जेथ ॥१६६॥
जया आड जातां, पार्था । तपश्चर्या मनोरथा । पाखांडियांहि आस्था । समूळ होय ॥१६७॥
स्वभावें वाटे येतां । जरी वोरपडा जाहला अवचितां । तरी, सकामूही परि माघौता । निघों विसरे ॥१६८॥
ऐसेनि न राहर्यातें राहवी । भ्रमतयातें बैसवी । थापटूनि चेववी । विरक्तीतें ॥१६९॥
हें राज्य वर सांडिजे । मग निवांता एथेंचि असिजे । ऐसें शृंगारियांहि उपजे । देखतखेवो ॥१७०॥
जें येणें मानें बरवंट । आणि तैसेचि अतिचोखट । जेथ अधिष्ठान प्रगट । डोळां दिसे ॥१७१॥
आणिकहि एक पाहावें । जें साधकीं वसते होआवें । आणि जनाचेनि पायरवें । रुळेचिना ॥१७२॥
जेथ अमृताचेनि पाडें । मुळाही सकट गोडें । जोडती दाटें झाडें । सदा फळतीं ॥१७३॥
पाउला पाउला उदकें । वर्षाकाळींहि अतिचोखें । निर्झरें कां विशेषें । सुलभें जेथ ॥१७४॥
हा आतपुही आळुमाळु । जाणिजे तरी शीतळु । पवनु अति निश्चळु । मंदु झुळुकें ॥१७५॥
बहु करूनि निःशब्द । दाट, न रिगे श्वापद । शुक हन षट्पद । तेउतें नाहीं ॥१७६॥
पाणिलगें हंसें । दोनी चारी सारसें । कवणें एके वेळे बैसें । तरी कोकिळहि हो कां ॥१७७॥
निरंतर नाहीं । तरी आलीं गेलीं कांहीं । होतु कां मयुरेंही । आम्हीं, ना न म्हणों ॥१७८॥
परि आवश्यक पांडवा । ऐसा ठावो जोडावा । तेथ निगूढ मठ होआवा । कां शिवालय ॥१७९॥
दोहींमाजीं आवडे तें । जें मानले होय चित्तें । बहुधाकरूनि एकांतें । बैसिजे गा ॥१८०॥
म्हणौनि तैसें तें जाणावें । मन राहतें पाहावें । राहील, तेथ रचावें । आसन ऐसें ॥१८१॥
वरी चोखट मृगसवडी । माजी धूतवस्त्राची घडी । तळवटीं अमोडी । कुशांकुर ॥१८२॥
सुकुमाळ सरिसे । सुबद्ध राहती आपैसे । एकपाडें, तैसे । वोजा घालीं ॥१८३॥
परि सावियाचि उंच होईल । तरी आंग हन डोलेल । नीच, तरी पावेल । भूमिदोषु ॥१८४॥
म्हणौनि, तैसें न करावें । समभावें धरावें । हें बहु असो; होआवें । आसन ऐसें ॥१८५॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ५, ओवी क्र. ४९६ ते ५४३
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
नारदनिरूपित वसुदेवदेवकीचे भाग्य (४९६ ते ५२२)
आस्थितः श्रद्धया युक्तो, निस्सङ्गो यास्यसे परम् ॥४५॥
(हे महाभाग्यशाली वसुदेवा, तू ऐकलेल्या ह्या भागवतधर्माचे विषयांची आसक्ती सोडून मोठ्या श्रद्धेने पालन व आचरण केलेस तर तूही श्रेष्ठ अशा परमात्मस्वरूपाला मिळशील. ॥४५॥)
वसुदेवा तुझेनि नांवें । देवातें ‘वासुदेव’ म्हणावें । तेणें नामाचेनि गौरवें । जनांचे आघवे निरसती दोष ॥४९७॥
येवढ्या भाग्याचा भाग्यनिधि । वसुदेवा तूंचि त्रिशुद्धि । तुवां भागवतधर्माचा विधि । आस्तिक्यबुद्धी अवधारिला ॥४९८॥
श्रद्धेनें केलिया वस्तुश्रवणा । मननयुक्त धरावी धारणा । तैं निःसंग होऊनियां जाणा । पावसी तत्क्षणा निजधामासी ॥४९९॥
जया निजधामाच्या ठायीं । कार्य कारण दोन्ही नाहीं । त्या परम पदाचे ठायीं । निजसुखें पाहीं सुखरूप होसी ॥५००॥
पुत्रतामगमद्यद्वां, भगवानीश्वरो हरिः ॥४६॥
(खरोखरी तुमच्या दांपत्याच्या यशाने सर्व जग भरून गेले आहे ; कारण साक्षात परमात्मा भगवान तुमचा पुत्र म्हणून जन्माला आला. ॥४६॥)
ज्यालागीं कीजे यजन । ज्यालागीं दीजे दान । ज्यालागीं कीजे तपाचरण । योगसाधन ज्यालागीं ॥५०२॥
जो न वर्णवे वेदां शेषा । जो दुर्लभ सनकादिकां । त्या पुत्रत्वें यदुनायका । उत्संगी देखा खेळविसी ॥५०३॥
जो कळिकाळाचा निजशास्ता । जो ब्रह्मादिकांचा नियंता । जो संहारकाचा संहर्ता । जो प्रतिपाळिता त्रिजगती ॥५०४॥
जो सकळ भाग्याचे भूषण । जो सकळ मंडणां मंडण । षड्गुणांचे अधिष्ठान । तो पुत्रत्वें श्रीकृष्ण सर्वांगीं लोळे ॥५०५॥
(त्याचे दर्शन, त्याला आलिंगन, त्याच्याशी कौतुकाने बोलणे, त्याला निजविणे, बसविणे, खाऊ घालणे या सर्व प्रकारांनी त्या श्रीकृष्णाचे ठायी पुत्रप्रेम प्रकट केल्यामुळे तुमचे शरीर, मन व बुद्धी ही सर्व पवित्र झाली आहेत. ॥४७॥)
कृष्णमुखींची उत्तरें । प्रवेशतां कर्णद्वारें । पवित्र झाली कर्णकुहरें । कृष्णकुमरे अनुवादें ॥५०७॥
आळवितां श्रीकृष्ण कृष्ण । अथवा कृष्णेसी संभाषण । तेणें वाचा झाली पावन । जैसें गंगाजीवन संतप्तां ॥५०८॥
नाना यागविधीं यजिती ज्यातें । तेथ न घे जो अवदानातें । तो वारिताही दोंही हातें । बैसे सांगातें भोजनी कृष्ण ॥५०९॥
दुर्लभु योगयागीं । तो वेळ राखे भोजनालागीं । मुखींचें शेष दे तुम्हांलागीं । लागवेगीं बाललीला ॥५१०॥
तेणें संतप्त संतोखी । तोही ग्रास घाली तुम्हां मुखीं । तुम्हां ऐसें भाग्य त्रिलोकीं । नाहीं आणिकी अर्जिलें ॥५११॥
तेणें कृष्णशेषामृतें । रसना विटों ये अमृतातें । मा इतर रसा गोड तेथें । कोण म्हणतें म्हणावया ॥५१२॥
तेणें श्रीकृष्णरसशेषे । अंतरशुद्धि अनायासें । जे नाना तपसायासें । अतिप्रयासें न लभे कदा ॥५१३॥
देतां कृष्णाशी चुंबन । तेणें अवघ्राणे घ्राण पावन । चुंबितांचि निवे मन । स्वानंद पूर्ण उल्हासे ॥५१४॥
तुम्हां बैसले देखे आसनीं । कृष्ण सवेग ये धांवोनी । मग अंकावरी बैसोनी । निजांगमिळणी निववी कृष्णु ॥५१५॥
तेणें श्रीकृष्णाचेनि स्पर्शे । सर्वेंद्रियी कामु नासे । तेणें कर्मचि अनायासें । होय आपैसें निष्कर्म ॥५१६॥
सप्रेमभावें संलग्न । देतां श्रीकृष्णासी आलिंगन । तेणें देहाचें देहपण । मीतूंस्फुरण हारपे ॥५१७॥
शयनाच्या समयरूपीं । जना गाढ मूढ अवस्था व्यापी । ते काळी तुम्हांसमीपी । कृष्ण सद्रूपीं संलग्न ॥५१८॥
योगी भावना भावून । कर्म कल्पिती कृष्णार्पण । तुमची सकळ कर्में जाण । स्वयें श्रीकृष्ण नित्यभोक्ता ॥५१९॥
पुत्रस्नेहाचेनि लालसें । सकळ कर्मे अनायासें । स्वयें श्रीकृष्ण सावकाशें । परम उल्हासें अंगीकारी ॥५२०॥
तुमची पवित्रता सांगों कैसी । पवित्र केलें यदुवंशासी । पुत्रत्वें पाळूनि श्रीकृष्णासी । जगदुद्धारासी कीर्ति केली ॥५२१॥
नाम घेतां ‘वसुदेवसूनु’ । स्मरतां ‘देवकीनंदनु’ । होय भवबंधच्छेदनु । ऐसें पावनु नाम तुमचें ॥५२२॥
कृष्णविरोधानेही मोक्ष (५२३ ते ५३०)
ध्यायन्त आकृतधियः शयनासनादौ, तत्साम्यमापुरनुरक्तधियां पुनः किम् ॥४८॥
(शिशुपाल, पौण्ड, शाल्व इत्यादी राजे आत्यंतिक वैरभावाने भगवंताच्या सर्व हालचालींशी म्हणजे त्याचे चालणे, विलास करणे, पाहणे वगैरेशी तन्मय झाले. विरोधी भक्तीने भगवंताच्या शयनासनादी क्रियांनी त्यांचे अंतःकरण आकृष्ट झाल्यामुळे त्यांना भगवंताची सरूपतामुक्ती मिळाली. मग ज्यांचे अंतःकरण प्रेमाने त्या भगवंताचे ठायी जडले आहे ते भगवन्मय होतील हे सांगावयास पाहिजे काय ? ॥४८॥)
घनश्याम पीतांबर कटे । विचित्रालंकारी कृष्णु नटे । गदादि आयुधीं ऐसा वेठे । अतिबळें तगटे रणभूमीसी ॥५२५॥
ऐसें वैरवशे उद्भट । क्रोधे कृष्णध्यान उत्कट । ते वैरभावें वरिष्ठ । तद्रूपता स्पष्ट पावले द्वेषें ॥५२६ ॥
कंसासी परम भयें जाण । अखंड लागलें श्रीकृष्णध्यान । अन्नपान शयनासन । धाकें संपूर्ण श्रीकृष्ण देखे ॥५२७॥
कंसासुर भयावेशे । शिशुपाळादिक महाद्वेषें । सायुज्य पावले अनायासें । मा श्रद्धाळू कैसे न पावती मोक्ष ॥५२८॥
तुम्ही तरी परम प्रीतीं । चित्तें वित्तें आत्मशक्तीं । जीवें वोवाळां श्रीपति । पायां ब्रह्मप्राप्ति तुमच्या लागे ॥५२९॥
पूर्ण प्राप्ति तुम्हांपासीं । ते तुमची न कळे तुम्हांसी । बालक मानितां श्रीकृष्णासी । निजलाभासी नाडणें ॥५३०॥
कृष्णमहिमा (५३१ ते ५४८)
(श्रीकृष्ण सर्व प्राणिमात्रांचे अंतर्यामी असून नियंता आहे; मायेचा आश्रय केल्यामुळे त्याला मनुष्यभाव प्राप्त झाल्यासारखा दिसतो. परंतु तो अव्यय आणि सर्वश्रेष्ठ आहे. कृष्णाचे ठिकाणी हा माझा मुलगा आहे अशी भावना ठेवू नकोस. ॥४९॥)
यासी झणे म्हणाल लेंकरूं । हा ईश्वराचा ईश्वर । सर्वात्मा सर्वेश्वर । योगियां योगींद्रु श्रीकृष्ण ॥५३२॥
हा अविकारु अविनाशु । परात्परु परमहंसु । इंद्रियनियंता हृषीकेशु । जगन्निवासु जगदात्मा ॥५३३॥
मायामनुष्यवेषाकृती । हा भासताहे सकळांप्रती । गूढऐश्चर्य महामूर्ती । व्यापक त्रिजगतीं गुणातीतु ॥५३४ ॥
(भूमीला भारभूत झालेल्या असुर राजांना मारण्यासाठी, सजनांच्या रक्षणासाठी व त्यांना मोक्ष देण्यासाठी अवतार घेतलेल्या भगवंताचे यश ब्रह्मांडात चोहोकडे पसरलेले आहे. ॥५० ॥)
तो उतरावया धराभार । धर्म वाढवावया निर्विकार । संतसंरक्षणी शार्ङ्गधर । पूर्णावतार श्रीकृष्ण ॥५३६॥
प्रतिपाळावया निजभक्तांसी । सुख द्यावया साधूंसी । अवतरला यदुवंशीं । हृषीकेशी श्रीकृष्ण ॥५३७॥
तो असुरगजपंचाननु । सज्जनवनआनंदघनु । तुमच्या उदरीं श्रीकृष्णु । अवतार पूर्ण पूर्णांशेसीं ॥५३८॥
उद्धरावया त्रिजगती । थोर उदार केली कीर्ती । ज्याच्या अवताराची ख्याती । पवाडे पढती ब्रह्मादिक ॥५३९ ॥
तरावया अतिदुस्तर । ज्याची कीर्ति गाती सुरनर । परमादरें ऋषीश्वर । कृष्णचरित्र सर्वदा गाती ॥५४० ॥
ज्याचें नाम स्मरतां भक्त । कळिकाळ नागवत । तो अवतार श्रीकृष्णनाथ । तुम्हांआंत प्रगटला ॥५४१॥
श्रीकृष्ण परब्रह्मैकनिधी । त्यासी पाहूं नका बाळबुद्धी । इतुकेन तुम्ही भवाब्धी । जाणा त्रिशुद्धी तरलेती ॥५४२॥
ऐशी श्रीकृष्णअवतारकथा । नारद वसुदेवा सांगतां । शुक म्हणे गा नृपनाथा । विस्मयो समस्तां थोर झाला ॥५४३॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. ९४३ ते ९५७
जयाचे राहिले मानसीं । तेचि पावले तयासी । चाचपडतां मेली पिसीं । भलतैसीं वाचाळे ॥ध्रु॥
नवविधाचा निषेध । जेणें मुखें करिती वाद । जन्मा आले निंद्य । शूकर याती संसारा ॥३॥
काय सांगों वेळोवेळां । आठव नाहीं त्या चांडाळा । नामासाठी बाळा । क्षीरसागरी कोंडिलें ॥४॥
आपुलिया नामासाठीं । लागे शंखासुरापाठीं । फोडोनियां पोटीं । वेद चारी काढीले ॥५॥
जगी प्रसिद्ध हे बोली । नामें गणिका तारिली । आणिकेही उद्धरिली । पातकी महादोषी ॥६॥
जे हे पवाडे गर्जती । नाम प्रल्हादाच्या चित्तीं । जळतां, बुडतां, घातीं । राखे हातीं विषाचे ॥७॥
काय सांगो ऐशी कीर्ति । तुका म्हणे नामख्याती । नरकाप्रती जाती । निषेधिती ती एक ॥८॥
अद्वैतीं तो नाहीं बोलाचे कारण । जाणीवेचा शीण करिसी वायां ॥ध्रु॥
तुका म्हणे किती करावी फजिती । लाज नाही चित्तीं निलाजिरा ॥३॥
शत्रु तो म्यां केला न म्हणे आपुला । जो विन्मुख विठ्ठला सर्वभावें ॥ध्रु॥
जयासी नावडे विठोबाचें नाम । तो जाणा अधम तुका म्हणे ॥३॥
घालूनियां कास करितों कैवाड । वागों नेदीं आड कळिकाळासी ॥ध्रु॥
अबद्ध वांकुडे जैशातैशापरी । वाचे हरि हरि उच्चारावें ॥३॥
तुका म्हणे आम्हां सांपडले निज । सकळ हें बीज पुराणांचें ॥४॥
पिंडाच्या पोषकें नागविले जन । लटिकें पुराण केले वेद ॥ध्रु॥
मना आला तैसा करिती विचार । म्हणती संसार नाही पुन्हां ॥३॥
तुका म्हणे पाठी उडती यमदंड । पापपुण्य लंड न विचारिती ॥४॥
जाणोनि नेणते झाले तेणें सुखें । न बोलोनि मुखें बोलताती ॥ध्रु॥
अभेदूनि भेद राखियेला अंगीं । वाढावया जगी प्रेमसुख ॥३॥
टाळघोळ कथा प्रेमाचा सुकाळ । मूढ लोकपाळ तरावया ॥४॥
तुका म्हणे हे तो आहे तयां ठावें । जिहीं एक्याभावे जाणीतला ॥५॥
अधीरासी नाही चालों जातां मान । दुर्लभ दर्शन धीर त्याचे ॥ध्रु॥
तुका म्हणे नाहीं आणिकासी बोल । वायां जाय मोल बुद्धिपाशीं ॥३॥
संवसारसिंधु नाही हरिदासां । गर्भवास कैसा नेणती ते ॥ध्रु॥
जन वन ऐसे कृपेच्या सागरें। दाटला आभारें पांडुरंग ॥३॥
तुका म्हणे देवा भक्तांचे बंधन । दाखविलें भिन्न परि एक ॥४॥
भक्तीचे सोहळे होतील जीवासी । नवल तेविशीं पुरवितां ॥ध्रु॥
ज्याचे त्यासी देणे कोण तें उचित । मानूनियां हित घेतों सुखें ॥३॥
तुका म्हणे सुखें देईं संवसार । आवडीसी थार करी माझे ॥४॥
सदा वाचे नारायण । तें वदन मंगळ ॥ध्रु॥
पढिये सर्वोत्तम भाव । येर वाव पसारा ॥३॥
ऐसें उपदेशी तुका । अवघ्या लोकां सकळां ॥४॥
बैसलिये ठायीं आठवीन पाय । पाहीन तो ठाय तुझा देवा! ॥ध्रु॥
अखंड तें खंडें संकल्पी विकल्प । मनोजन्य पाप रज्जुसर्प ॥३॥
तुका म्हणे ‘विश्वीं विश्वंभर’ वसे । राहों ऐसे दशे सुखरूप ॥४॥
ऐसी सवे गोवळिया । भाव तया पढियंता ॥ध्रु॥
एकाचे ते उष्टें खाय । एका जाय ठकूनि ॥३॥
तुका म्हणे बहु सोपे । बहु रूपे अनंता! ॥४॥
ऐका हे सोपें वर्म । न लगे श्रम चिंतना ॥ध्रु॥
मृत्याचिये अंगीं छाये । उपायचि खुंटतां ॥३॥
तुका म्हणे अवघे जन । येथें मन असों द्या ॥४॥
सगुण निर्गुणाचा ठाव । विटे पाव धरियेले ॥ध्रु॥
अवघे साखरेचे अंग । नये व्यंग निवडितां ॥३॥
तुका म्हणे जें जें करी । तें तें हरि भोगिता ॥४॥
खेळे गोवळियांसवें । करिती ते त्यांचे साहावें ॥ध्रु॥
यज्ञमुखें घांस । मंत्रपूजेसी उदास ॥३॥
तुका म्हणे चोरी । योगियांही सवें करी ॥४॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.








Changli sandi mala milali
Great
रामकृष्णहरी माऊली 🙏