
अनुक्रमणिका
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ६. ओवी क्र. १८६ ते २१०
जेथ स्मरतेनि आदरें । सबाह्य सात्त्विकें भरे । जंव काठिण्य विरे । अहंभावाचें ॥१८७॥
विषयांचा विसरु पडे । इंद्रियांची कसमस मोडे । मनाची घडी घडे । हृदयामाजी ॥१८८॥
ऐसें ऐक्य हें सहजें । फांवे, तंव राहिजे । मग तेणेंचि बोधें बैसिजे । आसनावरी ॥१८९॥
आतां आंगातें आंग धरी । पवनातें पवनु धरी । ऐसी अनुभवाची उजरी । होंचि लागे ॥१९०॥
प्रवृत्ति माघौती मोहरे । समाधि ऐलाडी उतरे । आघवा अभ्यासु सरे । बैसतखेवो ॥१९१॥
मुद्रेची प्रौढी ऐसी । तेचि सांगिजेल आतां, परियेसीं । तरी ऊरू या जघनासी । जडोनि घालीं ॥१९२॥
चरणतळें देव्हडीं । आधारद्रुमाच्या बुडीं । सुघटितें गाढीं । संचरीं पां ॥१९३॥
सव्य तो तळीं ठेविजे । तेणें सिवणीमध्यें पीडिजे । वरी बैसे तो सहजें । वाम चरणु ॥१९४॥
गुद मेंढ्राआंतौतीं । चारी अंगुळें निगुतीं । तेथ सार्ध सार्ध प्रांतीं । सांडूनियां ॥१९५॥
माजीं अंगुळ एक निगे । तेथ टांचेचेनि उत्तरभागें । नेहटिजे; वरि आंगें । पेललेनि ॥१९६॥
उचलिलें कां, नेणिजे । तैसें पृष्ठांत उचलिजे । गुल्फद्वय धरिजे । तेणेंचि मानें ॥१९७॥
मग शरीर संचु पार्था । अशेषही सर्वथा । पाष्णीचा माथा । स्वयंभु होय ॥१९८॥
अर्जुना, हें जाण । मूळबंधाचें लक्षण । “वज्रासन” गौण । नाम यासी ॥१९९॥
ऐसी आधारीं मुद्रा पडे । आणि अधोमार्गु मोडे । तेथ, अपानु आंतुलेकडे । वोहटों लागे ॥२००॥
माजीं उभारलेनि दंडें । शिरकमळ होय गाढें । नेत्रद्वारींचीं कवाडें । लागूं पाहती ॥२०२॥
वरचिलीं पातीं ढळतीं । तळींचीं तळीं पुंजाळतीं । तेथ अर्धोन्मीलित स्थिती । उपजे तया ॥२०३॥
दिठी राहोनि आंतुलिकडे । बाहेर पाउल घाली कोडें । ते ठायीं ठावो पडे । नासाग्रपीठीं ॥२०४॥
ऐसें आंतुचिया आंतुचि रचे । बाहेरी मागुतें न वचे । म्हणौनि राहणें आधिये दिठीचें । तेथेंचि होय ॥२०५॥
आतां दिशांची भेटी घ्यावी । कां, रूपाची वास पाहावी । हे चाड सरे आघवी । आपैसया ॥२०६॥
मग कंठनाळ आटे । हनुवटी हाडौती दाटे । ते गाढी होऊनि नेहटे । वक्षःस्थळीं ॥२०७॥
माजीं घंटिका लोपे । वरी बंधु जो आरोपे । तो जालंधरु म्हणिपे । पंडुकुमरा ॥२०८॥
नाभीवरी पोखे । उदर हें थोके । अंतरीं फांके । हृदयकोशु ॥२०९॥
स्वाधिष्ठानावरिचिले कांठीं । नाभिस्यानातळवटीं । बंधु पडे, किरीटी । वोढियाणा तो ॥२१०॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ५, ओवी क्र. ५४४ ते ५७६
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
(शुकाचार्य म्हणाले हे सर्व ऐकल्यानंतर महाभाग्यशाली वसुदेव आणि भाग्यवान देवकी अत्यंत आश्चर्यचकित झाली आणि त्या दोघांनी आपल्या अंतःकरणातील मोह सोडून दिला. ॥५१॥)
शुक म्हणे परीक्षिती । ऐकोनि नारदावचनोक्ती । देवकीवसुदेवो चित्तीं । अतिविस्मिती तटस्थ ॥४५॥
तया नारदाचेनि वचनें । कृष्ण परमात्मा बोलें येणें । देवकी वसुदेव निजमनें । दोघे जणे विस्मित ॥४६॥
ती परम भाग्यवंत दोन्ही । जो पुत्रस्नेहो होता श्रीकृष्णीं । तो सांडोनियां तत्क्षणीं । कृष्णपरब्रह्मपणीं निश्चयो केला ॥४७॥
श्रीकृष्णीं ब्रह्मभावो । धरितां निःशेष मोहस्नेहो । हृदयींचा निघोनि गेला पहा हो । बाप नवलावो भाग्याचा ॥४८॥
पंचाध्यायमहिमा (५४९ ते ५६५)
इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कन्धे पंचमोऽध्यायः ॥
(याप्रमाणे (भागवतधर्माच्या निरूपणाने भरलेला) हा पुण्यपावन इतिहास जो कोणी स्थिर बुद्धीने श्रवण करून निदिध्यासन करील, त्याचे चित्तातील मल नाहीसा होऊन तो ब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीला अधिकारी होईल.॥५२॥)
सावधानपणे श्रोता । तल्लीन होऊनि तत्त्वतां । हे इतिहासाची कथा । सादरता जो परिसे ॥५५०॥
तेणें सकळ पुण्यांचिया राशी । श्रवणें जोडिल्या अहर्निशीं । तो गा पुरुषु अवश्यतेसी । ब्रह्मप्राप्तीसी सत्पात्र ॥५१॥
सार्थक एक एक पद । परिसतां होय अंतर शुद्ध । यालागी पावे ब्रह्मपद । परमानंद निजबोधे ॥५२॥
हे ‘पंचाध्यायी’ म्हणणे घडे । पंचवक्त्र चंद्रचूडें । एकादशाचें ज्ञान गाढ़ें । वर्णावया फुडें ध्वज उभविला ॥५३॥
हे पंचाध्यायी नव्हे जाण । एकादशाचे पंचप्राण । उपदेशावया शुद्ध ज्ञान । सामोरे आपण स्वभक्तां आले ॥५४॥
हे पंचाध्यायी नव्हे केवळ । पंचम आलापे शुककोकिळ । एकादश वसंतकाळ । भक्त-अलिकुळ आलापवी स्वयें ॥५५॥
हाही नव्हे प्रकार । हे शर्करा पंचधार । चाखों धाडिली सत्वर । ज्ञानगंभीर निजभक्त ॥५६॥
हे पंचाध्यायी नव्हे सिद्ध । एकादशाचे पंच गंध । भक्त आंवतावया शुद्ध । धाडिली प्रसिद्ध गंधाक्षता ॥५७॥
एकादश अतिविवेकी । यावया पंचाध्यायी पालखी । पुढे धाडिली कवतुकीं । निजभक्तविखीं कृपाळुवें ॥५८॥
हे कृष्ण-उद्धवअर्धमात्रा । अर्धोदयो महायात्रा । ते यात्रेलागी हांकारा । पंचाध्यायी खरा साधकां करी ॥५९॥
श्रीकृष्णउद्धवमेळा । देखोनि ब्रह्मसुखाचा सोहळा । तो सांगों आली कळवळा । भक्तांजवळां पंचाध्यायी ॥५६०॥
अहंकाराचें मेट होतें । तें उठवूनि श्रीकृष्णनाथें । केलें आत्मतीर्थे मुक्ते । अभयहस्ते उद्धवासी ॥६१ ॥
ते मुक्ततीर्थनवाई । पुढे सांगों आली पंचाध्यायी । संसारश्रांत जे जे काहीं । ते धांवा लवलाही विश्रांतीसी ॥६२॥
कृष्णउद्धवगोडगोष्टी । हे निर्विकल्प कपिलाषष्ठी । ते पर्वकाळकसवटी । सांगों उठाउठी पंचाध्यायी आली ॥६३॥
उद्धवालागीं भवसागरीं । उतरावया पायउतारी । भागवतमिषे श्रीहरी । सुगम सोपारी पायवाट केली ॥६४॥
पव्हणियाहूनि पायउतारा । भागवतमार्ग अतिसोपारा । तो मार्गु दावावया पुरा । हांकारी स्त्रीशूद्रां पंचाध्यायी ॥६५॥
सहाव्या अध्यायाचा प्रस्ताव (५६६ ते ५७६)
कृष्णउद्धवसंवादीं । होईल परब्रह्म-गवादी । साधकमुमुक्षांची मांदी । धांवे त्रिशुद्धी निजसुखार्थ ॥६७॥
परब्रह्म झालें सावेव । स्वरूपसुंदर ज्ञानगौरव । मनोहर रूपवैभव । स्वर्गीचे देव पाहों येती ॥६८ ॥
तो देवांचा स्तुतिवादु । सवेंचि उद्धवाचा निर्वेदु । कृष्णउद्धवमहाबोधु । जेणें परमानंदु वोसंडे ॥६९ ॥
ते पुढील अध्यायीं कथा । रसाळ सांगेन आतां । अवधान द्यावें श्रोतां । ग्रंथार्था निजबोधे ॥५७० ॥
स्वयें वावडी करूनि पूर्ण । तिसी उडविजे जेवीं आपण । मग उडालेपणे जाण । आपल्या आपण संतोषिजे ॥७१ ॥
तेवीं मजनांवें कविता । करूनि स्वयें सद्गुरु वक्ता । एवं वदवूनियां ग्रंथार्था । श्रोतेरूपें सर्वथा संतोषे स्वयें ॥७२॥
तो एकपणेंवीण एकला एका । दुजेनवीण जनार्दनु सखा । तेणे पुढील ग्रंथआवांका । विशदार्थे देखा विवंचिला ॥७३॥
नातळोनि दुजेपण । एका जनार्दना शरण । धरोनि श्रोत्यांचे चरण । पुढील अनुसंधान पावेल ॥७४॥
एका जनार्दन नांवें देख । दों नांवीं स्वरूप एक । हे जाणे तो आवश्यक । परम सुख स्वयें पावे ॥७५॥
एकाजनार्दना शरण । त्याची कृपा परिपूर्ण । पंचाध्यायी निरूपण । झाली संपूर्ण जनार्दनकृपा ॥५७६॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
पाचवा अध्याय समाप्त (श्लोक ५२; ओव्या ५७६)
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. ९५८ ते ९७२
आदिनाथा कंठी आगळा हा मंत्र । आवडीचे स्तोत्र सदा घोकी ॥२॥
आगळे हे सार उत्तमा उत्तम । ब्रह्मकर्मा नाम एक तुझें ॥३॥
तिहीं त्रिभुवनीं गमन नारदा । हातीं विणा सदा नाम मुखीं ॥४॥
परिक्षिती मृत्यु सातां दिवसांचा । मुक्त झाला वाचा उच्चारितां ॥५॥
कोळियाची कीर्ति वाढली गहन । केलें रामायण रामाआधीं ॥६॥
‘सगुण निर्गुण’ तुज म्हणे वेद । तुका म्हणे भेद नाहीं नामीं ॥७॥
शिकल्या बोलाचा धरिशील ताठा। तरी जासी वाटा यमपंथें ॥ध्रु॥
हिरा परिस मोहरा आणीक पाषाण । नव्हे परि जन संतां तैसी ॥३॥
सरिता वोहोळ गंगा सागरा समान । लेखी, तयाहून अधम नाही ॥४॥
आणीक अमुप होती तारांगणे । रविंसी समान लेखूं नये ॥५॥
तुका म्हणे नाहीं नम्रता अंगीं । नव्हे ते फिरंगी कठिण लोह ॥६॥
त्याचीच कथा आवडे कीर्तन । तें मज श्रवण गोड लागे ॥ध्रु॥
तुका म्हणे संत म्हणोत भलतें । विठ्ठलापरतें न मनीं कांहीं ॥३॥
एका अनुसरल्या काज। अवघे जाणे पंढरीराज ॥ध्रु॥
तर्कवितर्कासी । ठाव न लगे सायासी ॥३॥
तुका म्हणे भावेंविण । अवघा बोलती तो शीण ॥४॥
तोचि ध्यावा एकचित्तें । करूनि रितें कलेवर॥ध्रु॥
षड्ऊर्मी हृदयांत । यांचा अंत पुरवूनि ॥३॥
तुका म्हणे खुंटे आस । तेथें वास करी तो ॥४॥
सुख पावे शांती धरूनि एकांत । ‘दु:खी’ तो लोकांत दंभ करी ॥ध्रु॥
तुका म्हणे लागे थोडाच विचार । परि हे प्रकार नागविती ॥३॥
पावेल गौरव वोढाळाचे परी । दंड पाठीवरी यमदूतांचे ॥ध्रु॥
शब्दज्ञानी एक आपुलाल्या मतें । सांगती वेदांत भिन्नभावें ॥३॥
तुका म्हणे एक भाव न धरिती । पडिली हे माती त्यांचे तोंडी ॥४॥
या या वैष्णवांचे घरीं । प्रेमसुख इच्छा करी । रिद्धिसिद्धि द्वारी । कर जोडूनि तिष्ठती ॥ध्रु॥
नको वैकुंठींचा वास । असे तया सुखा नास । अद्भुत हा रस । कथाकाळी नामाचा ॥३॥
तुझ्या नामाचा महिमा । तुज न कळे मेघश्यामा! । तुका म्हणे आम्हां । जन्म गोड यासाठीं ॥४॥
काय उणें झालें मज तया पायीं । तें मी मागों काई कवणासी ॥ध्रु॥
आणिकांची कीर्ति नाइकें न बोलें । चाड या विठ्ठलेंविण नाहीं ॥३॥
न पाहें लोचनीं श्रीमुखावांचूनि । पंढरी सांडूनि नवजे कोठे ॥४॥
न करीं कांहीं आस मुक्तीचे सायास । न भें संसारास येतां जातां ॥५॥
तुका म्हणे कांहीं व्हावें ऐसें जीवा । नाहीं या केशवाविण दुजें ॥६॥
साक्षत्वेसि मना आणावीं उत्तरें। परिपाकी खरे खोटे कळे ॥ध्रु॥
नव्हे एकदेशी शब्द, हा उखता। ब्रह्मांडा-पुरता घेईल त्यासी ॥३॥
तुका विनवणी करी जाणतियां । बहुमतें वायां श्रमों नये ॥४॥
रवरव कुंभपाक भोगिती यातना । न ये नारायणा करुणा त्यांची ॥ध्रु॥
असिखड्गधारा छेदिती सर्वांग । तप्तभूमी अंग लोळविती ॥३॥
तुका म्हणे तया नरक न चुकती । सांपडले हातीं यमाचिया ॥४॥
वाखाणी अद्वैत भक्तिभावेंविण । दु:ख पावे शीण श्रोता वक्ता ॥ध्रु॥
‘अहं ब्रह्म’ म्हणोनि पाळीतसे पिंडा । न बोलावें भांडा तयासवें ॥३॥
वेदबाह्य लंड बोले जो पाषांड । त्याचे काळें तोंड संतांमध्यें ॥४॥
तुका म्हणे खंडी देवभक्तपण । वरिष्ठ त्याहूनि श्वपच तो ॥५॥
चारी वर्ण झाले एकाचिये अंगीं । पापपुण्य भागीं विभागिले॥ध्रु॥
प्रथम पाउलीं पावविला पंथ। आदि मध्य अंत भेद नाहीं ॥३॥
आंबे बोरी वड बाभुळा चंदन । गुणागुण भिन्न अग्नि एक ॥४॥
तुका म्हणे मन उन्मन जो होय । तोंवरी हे सोय विधि पाळीं ॥५॥
तें आम्ही देखिलें आपुल्या नयनीं । फिटलीं पारणी डोळियांची ॥ध्रु॥
जीवांचे जीवन सुखाचे शेजार। उभे कटीं कर ठेवूनियां ॥३॥
जगाचा जनिता कृपेचा सागर । दीनां लोभपर दुष्टां काळ ॥४॥
सुरवरां चिंतनी मुनिवरां ध्यानीं । आकार निर्गुणीं तोचि असे ॥५॥
तुका म्हणे नाहीं श्रुती आतुडलें । आम्हां सांपडलें गीतीं गातां ॥६॥
समाधान जीव राहिला निश्चळ । गेली हळहळ स्मरणें हें ॥ध्रु॥
त्रिविध तापांचें झालेंसे दहन । सुखावले मन प्रेमसुखें ॥३॥
महालाभ वाचे वसे पांडुरंग । अंगोअंगी संग अखंडित ॥४॥
जीवनाचा झाला ओलावा अंतरीं । विश्व विश्वंभरी मावळलें ॥५॥
तुका म्हणे माप भरूं आलें शिगे । धारबोळ गंगे पूर वाहे ॥६।।
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.







रामकृष्णहरी माऊली 🙏