
अनुक्रमणिका
- श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ६. ओवी क्र. २५१ ते २७०
- श्रीएकनाथी भागवत क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ६, ओवी क्र. ९१ ते १४९
- चरणस्तवन (११० ते ११६)
- चतुर्व्यूह पूजा (११७ ते १२१)
- यज्ञसाधन (१२२ ते १२५)
- योगाभ्याससाधन (१२६ ते १३०)
- चरणभक्ती (१३१, १३२)
- अध्यात्मविचारसाधन (१३३ ते १३७)
- वनमालार्पण (१३८ ते १४२)
- वनमालेचा सवतीमत्सर (१४३ ते १४९)
- श्रीतुकाराम महाराजांची गाथाअभंग क्र. १००४ ते १०२१
- ग्रंथ
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ६. ओवी क्र. २५१ ते २७०
तैसा आहाचवरि कोरडा । त्वचेचा असे पातोडा । तो झडोनि जाय, कोंडा । जैसा, होय ॥२५२॥
मग काश्मीरीचे स्वयंभ । कां, रत्नबीजा निघाले कोंभ । अवयव कांतीची भांब । तैसी दिसे ॥२५३॥
नातरी, संध्यारागींचे रंग । काढूनि, वळिलें ते आंग । कीं, अंतज्योर्तीचें लिंग । निर्वाळिलें ॥२५४॥
कुंकुमाचें भरींव । सिद्धरसाचें ओतींव । मज, पाहतां, सावेव । शांतिचि ते ॥२५५॥
तें आनंदचित्रींचें लेप । नातरी, महासुखाचें रूप । कीं, संतोष-तरूचें रोप । थांबलें जैसें ॥२५६॥
तो कनकचंपकाचा कळा । कीं, अमृताचा पुतळा । ना, ना, सासिन्नला मळा । कोंवळीकेंचा ॥२५७॥
हो कां, जे शारदियेचेनि वोलें । चंद्रबिंब पाल्होले । कां, तेजचि मूर्त बैसलें । आसनावरी ॥२५८॥
तैसें शरीर होये । जे वेळीं कुंडलिनी चंद्र पीये । मग देहाकृती बिहे । कृतांतु गा ॥२५९॥
वार्धक्य तरी बहुडे । तारुण्याची गांठी विघडे । लोपली, उघडे । बाळदशा ॥२६०॥
वयसा तरी येतुलेवरी । एऱ्हवीं, बळाचा बळार्थु करी । धैर्याची थोरी । निरुपम ॥२६१॥
कनकद्रुमाच्या पालवी । रत्नकळिका नित्य नवी । नखें तैसीं बरवीं । नवीं निघती ॥२६२॥
दांतही आन होती । परि अपाडें सानेजती । जैसी दुबाहीं बैसे पांती । हिरेयांची ॥२६३॥
माणिकुलियांचिया कणिया । सावियाचि अणमानिया । तैसिया सर्वांगीं उधवती अणियां । रोमांचियां ॥२६४॥
करचरणतळें । जैसीं कां रातोत्पलें । पाखाळींव होती डोळे । काय सांगों! ॥२६५॥
निडाराचेनि कोंदाटें । मोतियें नावरती संपुटें । मग, सिवणी जैसी उतुटे । शुक्तिपल्लवांची ॥२६६॥
तैसी, पातियांचिये कवळिये न समाये । दिठी, जाकळोनि निघों पाहे । आधिलीचि, परि होये । गगना कवळिती ॥२६७॥
आइके, देह होय सोनियाचें । परि लाघव ये वायूचें । जें, आप आणि पृथ्वीचे । अंश नाहीं ॥२६८॥
मग समुद्रापैलकडिल देखे । स्वर्गीचा आलोचु आइके । मनोगत वोळखे । मुंगियेचें ॥२६९॥
पवनाचा वारिकां वळघे । चाले, तरी उदकीं पाउल न लागे । येणें येणें प्रसंगें । येती बहुता सिद्धी ॥२७०॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ६, ओवी क्र. ९१ ते १४९
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
‘मंत्रविद्याग्रहण’ । विकळ उच्चारितां वर्ण । शुद्धी नव्हे परी दारुण । पातक पूर्ण अंगी वाजे ॥९२ ॥
करितां ‘ शास्त्रश्रवण’ । चौगुणां गर्व चढे पूर्ण । तो ज्ञातेपणाचा अभिमान । न निघे जाण चतुर्मुखा ॥९३ ॥
करितां ‘वेदाध्ययन’ । विस्वर गेलिया उच्चारण । शुद्धी नव्हेचि परी मरण । अवश्य जाण वृत्रासुराऐसें ॥९४ ॥
‘दान’ देतां नृग बहुवस । कूपी जाला कृकलास । प्राप्ती दूरी परी नाश । असमसाहस रोकडा ॥९५॥
‘तप’ करितां ऋष्यशृंगासी । तो वश जाहला वेश्यांसी । श्रद्धा श्रवणाचिया ऐशी । शुद्धी आणिकांसी पैं नाहीं ॥९६॥
‘कर्म’ करावें यथानिगुती । तंव त्या कर्माची गहन गती । प्राचीनबर्ह्याची कर्मस्थिती । नारदोक्ती सांडविली ॥९७॥
कर्मी आचमन करावें । तेथ माषमात्र जळ घ्यावें । न्यूनाधिकत्वासवें । दोष पावे सुरापानसम ॥९८॥
एवं दुष्टहृदय ज्यासी । तपादिक साधनें त्यासी । शुद्धि नव्हे हृषीकेशी । श्रवणें कीर्तीसी नायकतां ॥९९ ॥
श्रवणें परीक्षिती तरला । श्रवणें क्रौंच उद्धरिला । मकरोदरीं श्रवण पावला । सिद्ध जाहला मत्स्येंद्र ॥१००॥
तुझें श्रवण दोपरी । एक तें चित्तशुद्धी करी । दुसरे जीवब्रह्मऐक्य करी । दोंहीपरी उद्धारु ॥१०१॥
प्रत्यक्ष पाहतां वाराणसी । श्रवणीं तारक ब्रह्म उपदेशी । मुक्तिक्षेत्र जाहली काशी । श्रवणे जीवासी उद्धारु ॥१०२॥
तूं अवाप्तसकळकाम । निष्कामाचें निजधाम । ऐशिया तुज करणे कर्म । भक्तभ्रम छेदावया ॥१०३॥
नाना चरित्रांची करणी । करिता झालासी चक्रपाणी । मोक्षमार्गाची निजश्रेणी । दिधली रचूनि जनासी ॥१०४॥
चित्तशुद्धीसी कारण । प्रेमयुक्त कीर्तिश्रवण । येथ सच्छ्रद्धाचि प्रमाण । अकारण साधनें ॥१०५॥
अपेक्षा जें जें साधन साधिलें । तें तें अपेक्षेनेंचि फोल केलें । निरपेक्षाचे हृदय भलें । वेगीं गेलें परमार्थी ॥१०६॥
हृदयाचे सखोल आळा । स्वधर्मबीजें अंकुरला । श्रद्धेचा वेल उगवला । कोंभ निघाला तरितरितु ॥१०७॥
सच्छ्रवणप्रबळजळें । रुतलीं वैराग्यदृढमूळे । वेगीं गेली निजबळें । श्रद्धामेळे चिदाकाशीं ॥१०८॥
तें चिदाकाशींचा चंद्रमा । स्वप्रकाश तूं पुरुषोत्तमा । साधक शिणती मेघश्यामा । तुझी प्रतिमा पहावया ॥१०९॥
चरणस्तवन (११० ते ११६)
यः सात्वतैः समविभूतय आत्मवद्भिव्यूहेऽर्चितः सवनशः स्वरतिक्रमाय ॥१०॥
((भगवंताच्या पदकमलाचे महत्त्व सांगतात.) आत्मचिंतन करणाऱ्या मुनींनी स्वत:च्या कल्याणासाठी, प्रेमातिशयाने ओथंबलेल्या चित्ताने, हे पदकमल हृदयात धारण केले आहे ; काही भक्तलोक वासुदेवादी चतुर्मूर्तीचे सारूप्य मिळण्यासाठी ह्याचे त्रिकाळ (सकाळ, दुपार, संध्याकाळ) अर्चन करतात आणि आत्मसुखाची महती जाणणारे असल्याने स्वर्गसुखाची अपेक्षा करीत नाहीत; असे हे पवित्र पदकमल, आमच्या हृदयांत असलेल्या अमंगल वासनांचा संहार करो. ॥१०॥)
पापइंधनाचा मेळु । तेथ तुझा चरणवडवानळु । लागतां, तो अतितेजाळु । तिळेंतिळु जाळितु ॥११२॥
ऐसा पापियांतें कांपविता । प्रेमळांतें अभयदाता । तुझा चरण जी अनंता । हृदयीं सर्वथा वाहताति ॥११३॥
तेंचि हृदय जी कैसें । वोळलें भक्तिप्रेमरसें । तेथ तुझे चरण सावकाशें । अतिउल्हासें वाहताति ॥११४॥
करितां चरणाचें ध्यान । जे विसरले भूकतहान । त्यांसी द्यावया अभयदान । चरणध्वजु जाण पैं तुझा ॥११५ ॥
तोचि चरण सात्वतीं । पावावया समविभूती । पूजिला जी श्रीपती । चतुर्मूर्ती व्यूहरूपें ॥११६॥
चतुर्व्यूह पूजा (११७ ते १२१)
भिन्न भिन्न चारी व्यक्ती । चहूं रूपी एक मूर्ती । ऐसें जाणोनि पूजिजे भक्तीं । ‘व्यूहस्थिति’ त्या नांव ॥११८॥
‘सात्वत’ म्हणिपती ते भक्त । भगवत्पदऐश्वर्यातें वांछित । चतुर्व्यूहहरूपें पूजित । ऐश्वर्यीं चित्त ठेवूनी ॥११९ ॥
जन्ममरणप्रवाहस्थिती । नासावया, एक भक्तीं । पूजा कीजे चतुर्मूर्ती । आत्मवंती सज्ञानीं ॥१२० ॥
त्रिषवण त्रिकाळ पूजा करितां अविकळ । भजोनि जिंतिला कळिकाळ । जन्ममूळ छेदावया ॥१२१॥
यज्ञसाधन (१२२ ते १२५)
अध्यात्मयोग उत योगिभिरात्ममायां जिज्ञासुभिः परमभागवतैः परीष्टः ॥११॥
(हे स्वामी, याज्ञिक लोक हविर्द्रव्य घेऊन वेदामध्ये सांगितलेल्या विधीने पवित्र हातांनी अग्नीमध्ये ज्याचे चिंतन करून हवन करतात, त्याचप्रमाणे संयमनशील मुनी ईश्वरी, माया जाणण्याकरिता अध्यात्मज्ञानाचा अभ्यास ज्याच्याकरिता करितात, मोठे मोठे भागवतश्रेष्ठ सर्वकाल विशेष आवडीने ज्याची पूजा करतात (तो सर्वपूज्य अंघ्री आम्हांला पावन करो). ॥ ११॥)
तेथ वेदत्रयीची विधानकळा । बाहेर त्रिगुणांची त्रिमेखळा । आंत यज्ञपुरुष आव्हानिला । चैतन्यतेजाळा सर्वात्मा ॥१२४॥
तेथ ओंकार वषट्कार । लक्षणोक्त मंत्रउच्चार । द्रव्ये अर्पिती अपार । अतिपवित्र अवदानीं ॥१२५॥
योगाभ्याससाधन (१२६ ते १३०)
वज्रासनी दृढ बंध । भेदोनि षट्चक्रांचे भेद । कुंडलिनीचा स्कंध । अतिसुबद्ध थापटिला ॥१२७॥
ते खवळली महाशक्ती । वेगें चालिली ऊर्ध्वगती । पवन प्राशूनि ग्रासिती । योगस्थिती गगनातें ॥१२८ ॥
शोषूनि सहस्रदळाचे पाट । औटपीठ आणि गोल्हाट । क्रिमोनियां श्रीहाट । आली अतिउद्भट ब्रह्मस्थाना ॥१२९॥
तेथ परमानंदाचा भोग । शिवशक्तींचा संयोग । यापरी अभ्यासोनि योग । हा भजनमार्ग योग्यांचा ॥१३०॥
चरणभक्ती (१३१, १३२)
माया न लक्षेचि लक्षितां । तोचि मायामोह जाहला चित्ता । मग ते सिद्धीलागी तत्त्वतां । चरण भगवंता पूजिती॥१३२॥
अध्यात्मविचारसाधन (१३३ ते १३७)
आत्ममायेचा नाशु । करावया जिज्ञासु । निजात्मबोधे सावकाशु । अतिउल्हासु पूजेचा ॥१३४॥
विवेकाचिया भावना । नित्यानित्याची विवंचना । करूनि आणितां अनुसंधाना । सर्वत्र जाणा तूंचि तूं ॥१३५॥
जें अनित्यपणे वाळिलें । मायिकत्वें मिथ्या जाहलें । मग चिन्मात्रैक उरलें । निर्वाळिलें निजरूप ॥१३६ ॥
एवं पाहतां चहूंकडे । तुझेंचि स्वरूप जिकडे तिकडे । मग पूजिती वाडेंकोडें । निजसुरवाडें सर्वत्र ॥१३७॥
वनमालार्पण (१३८ ते १४२)
यः सुप्रणीतममुयाऽर्हणमाददन्नो भूयात्सदाङ्घ्रिरशुभाशयधूमकेतुः ॥१२॥
(हे प्रभो, भक्तांनी अर्पण केल्यामुळे तुळशीच्या माळेचा आपल्या पदकमलावर आपण स्वीकार केला आहे व ती शिळी झालेली वनमाला आपणांस प्रिय झालेली आहे; ती इतकी की साक्षात भगवती देवी लक्ष्मीनेसुद्धा सवतीमत्सराने तिच्याशी स्पर्धा करावी. असा हा आपला दिव्य चरण आमचे सर्व अशुभ संकल्प समूळ नाश करणारा होवो. ॥१२॥)
रानींची रानवट वनमाळा । भक्ती आणूनि घातली गळां । रमा सांडोनि उताविळा । स्वयें भाळला माळेसी ॥१४०॥
भक्ती अर्पिली आवडीं । म्हणौनि तियेची अधिक गोडी । शिळी जाहली तरी न काढी । अर्धघडी गळांची ॥१४१॥
भक्ती भावार्थे अर्पिली । देवें सर्वांगी धरिली । यालागीं सुकों विसरली । टवटवीत सर्वदा ॥१४२ ॥
वनमालेचा सवतीमत्सर (१४३ ते १४९)
मज न येतां आधीं । भक्तीं अर्पिली नेणों कधीं । मी तरुण सांडोनि त्रिशुद्धी । ते वृद्ध खांदी वाहातसे ॥१४४॥
देव नेणे भोगाची खूण । ती वृद्ध मी तरुण । परी तिशीच भुलला निर्गुण । गुणागुण हा नेणे ॥१४५॥
मज चरण सेवा एकादे वेळां । हे सर्वकाळ पडली गळां । मजहूनि स्नेह आगळा । नेला वनमाळा सर्वथा ॥१४६॥
मातें डावलूनि वेगीं । हे बैसली दोहीं अंगीं । इसीं बोलतो श्रीशार्ङ्गी । मजचिलागी त्यागील ॥१४७॥
मज दीधली चरणांची सेवा । इचा मत्सरु किती सहावा । आपाद आवरिलें यादवा । माझी सेवा हरितली ॥१४८॥
मी कुळात्मजा क्षीराब्धीची । हे रानट रानींची । खांदी बैसली देवाची । भीड भक्तांची म्हणवूनि ॥१४९॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. १००४ ते १०२१
गोविंद आसनीं गोविंद शयनीं । गोविंद त्यां मनी बैसलासे ॥ध्रु॥
ऊर्ध्वपुंड्र भाळ कंठीं शोभे माळ । कांपिजे कळिकाळ तया भेणें ॥३॥
तुका म्हणे शंखचक्रांचे शृंगार । नामामृतसार मुखामाजीं ॥४॥
संचितासी जाय मिळोनियां खोडी । पतनांचे जोडीवरी हांव ॥ध्रु॥
बांधलें गांठीं तें लागतें भोगावें । ऐसियासी देवें काय कीजे? ॥३॥
तुका म्हणे जया गांवा जाणें जया । पुसोनियां तया वाट चाले ॥४॥
म्हणोनि जया जे वासना । ते पुरवितो पंढरीराणा । झाला भक्तांचा आंदणा । ते उपकार फेडावया ॥ध्रु॥
अंबऋषीकारणें । जन्म घेतले नारायणे । एवढे भक्तीचें लाहाणें। दास्य करी दासांचें ॥३॥
म्हणिये करितां शंका न धरी । रक्षपाळ बळिच्या द्वारीं । भक्तीचा आभारी । रीघ न पुरे जावया ॥४॥
अर्जुनाचे रथवारु । ते वागवी सर्वेश्वरु । एवढे भक्तीचे उपकारु । मागे मागे हिंडतसे ॥५॥
पुंडलिकांचे द्वारीं । सम पाउलें विटेवरी । न वजे कट करीं । धरूनि तेथे राहिला ॥६॥
भाव भक्तीचा अंकित। नाम साजे दीनानाथ । म्हणोनि राहिला निवांत । तुका चरण धरोनि ॥७॥
त्यांचा आम्हांसी कांटाळा । पाहों नावडती डोळां ॥ध्रु॥
रिद्धिसिद्धिचे साधक । वाचासिद्ध होती एक ॥३॥
तुका म्हणे जाती । पुण्यक्षयें अधोगती ॥४॥
मज भीक कांहीं देवा! । प्रेम भातुकें पाठवा ॥ध्रु॥
याच-काचा भार । घेऊं नये येरझार ॥३॥
तुका म्हणे दान । सेवा घेतल्या वांचून ॥४॥
कैसे तुम्हां देवा वाटतसे बरें? । संतांची उत्तरें लाजविलीं ॥ध्रु॥
भाविकां कंटक करिताती पीडा । हा तंव रोकडा अनुभव ॥३॥
तुका म्हणे नाम निर्वाणीचा बाण । याचा अभिमान नाहीं तुम्हां ॥४॥
नाइकवे तुझी अपकीर्ति देवा । अव्हे-रिली सेवा न देखवे ॥ध्रु॥
आपुले पोटीं तो राखियेला वाव । आम्हांसी का भाव अल्प दिला ॥३॥
तुका म्हणे दु:खी असे हे कळों द्या । आपुलिया धंद्या मन नेघे ॥४॥
विश्वास तो खरा मग । पांडुरंग कृपेचा ॥ध्रु॥
माझी कोणी न धरूं शंका । ऐसें हो का निर्द्वंद्व ॥३॥
तुका म्हणे जें जें भेटें । तें तें वाटें मी ऐसें ॥४॥
सारा अवघे गाबाळ। डोळ्याआडील पडळ ॥ध्रु॥
शुद्ध भावावीण । जो जो केला तो तो शीण ॥३॥
तुका म्हणे कळे । परि होताती अंधळे ॥४॥
येथे अळंकार शोभती सकळ । भावबळे फळ इच्छेचें तें ॥ध्रु॥
अंतरींचे बीज जाणे कळवळा। व्यापक सकळां ब्रह्मांडाचा ॥३॥
तुका म्हणे नाहीं चालत तांतडी । प्राप्तकाळ घडी आल्याविण ॥४॥
थोरीव सांडिली आपुली परिसें। नेणे शिवों कैसे लोखंडासी ॥२॥
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती परउपकारें ॥३॥
भूतांची दया हे भांडवल संतां । आपुली ममता नाहीं देहीं ॥४॥
तुका म्हणे सुख पराविया सुखें । अमृत हे मुखें स्रवतसे ॥५॥
तुम्ही सांभाळिलें संतीं । भय निरसली खंती ॥ध्रु॥
कृतकृत्य झालों । इच्छा केली तें पावलों ॥३॥
तुका म्हणे काळ । आतां करूं न शके बळ ॥४॥
तुम्ही झालेति कृपाळ । माझा केला जी सांभाळ ॥ध्रु॥
काय वोळलें संचित । ऐसे नेणों अगणित ॥३॥
तुका म्हणे नेणें । काय केले नारायणें ॥४॥
भांडवल एवढें गांठी । नाम कंठीं धरियेलें ॥ध्रु॥
आणिक तें दुजें कांहीं । मज नाहीं यावरी ॥३॥
तुका म्हणे केला कोणें । एवढा नेणें लौकिक ॥४॥
काय जाणों तरले किती । नाव आइती या बैसा ॥ध्रु॥
सायासाचें नाहीं काम । घेतां नाम विठोबाचें ॥३॥
तुका म्हणे निर्वाणींचें । शस्त्र साचें हें एक ॥४॥
बैसलें तें रूप डोळां । वेळोवेळां आठवे ॥ध्रु॥
वेव्हाराची सरली मात । अखंडित अनुसंधान ॥३॥
तुका म्हणे वेध झाला । अंगा आला श्रीरंग ॥४॥
दु:ख पावायाचे मूळ । राहाणी ठाव नाहीं ताळ ॥ध्रु॥
माळामुद्रांवरी । कैंचा सोंगे जोडें हरि? ॥३॥
तुका म्हणे देखें । ऐसे परीची बहुतेकें ॥४॥
येथे नसतां वियोग । लाभा उणें काय मग? ॥ध्रु॥
छंद हरीच्या नामाचा । शुचिर्भूत सदा वाचा ॥३॥
तुका म्हणे हरीच्या दासां । शुभ काळ अवघ्या दिशा ॥४॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.






रामकृष्णहरी माऊली 🙏