
अनुक्रमणिका
- श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ६. ओवी क्र. २९३ ते ३१५
- श्रीएकनाथी भागवत क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ६, ओवी क्र. १९८ ते २५०
- निजबोधाने अभोक्तृत्व (१९८ ते २३१)
- कीर्तिश्रवण आणि चरणतीर्थसेवन (२३२ ते २३९)
- देवांची कृष्णास स्तुतिपूर्वक (निजधामास यावे अशी) विनंती (२४० ते २६२)
- श्रीतुकाराम महाराजांची गाथाअभंग क्र. १०३९ ते १०५३
- ग्रंथ
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ६. ओवी क्र. २९३ ते ३१५
एऱ्हवीं, आधिलाचि ऐसा । सावयव तरी दिसे । परि, वायूचें कां जैसें । वळिलें होय ॥२९४॥
नातरी, कदळीचा गाभा । बुंथी सांडोनि उभा । कां, अवयवचि नभा । उदैला तो ॥२९५॥
तैसें होय शरीर । तैं, तें म्हणिजे ‘खे-चर’ । हें पद होतां, चमत्कार । पिंडजनीं ॥२९६॥
देखें, साधकु निघोनि जाये । मागां पाउलांची वळ राहे । तेथ ठायीं ठायीं होये । अणिमादिक ॥२९७॥
परि तेणें काय काज आपणपयां? । अवधारीं, ऐसा, धनंजया । लोप आथी भूतत्रया । देहींचा देहीं ॥२९८॥
पृथ्वीतें आप विरवी । आपातें तेज जिरवी । तेजातें पवनु हरवी । हृदयामाजी ॥२९९॥
पाठीं आपण एकला उरे । परि शरीराचेनि अनुकारें । मग, तोहि निगे अंतरें । गगना मिळे ॥३००॥
ते वेळीं कुंडलिनी हे भाष जाये । मग ‘मारुत’ ऐसें नाम होये । परि शक्तिपण तें आहे । जंव न मिळे ‘शिवीं’ ॥३०१॥
मग जालंधर सांडी । ककारांत फोडी । गगनाचिये पहाडीं । पैठी होय ॥३०२॥
ते ॐकाराचिये पाठीं । पाय देत उठाउठी । पश्यंतीचिये पाउटी । मागां घाली ॥३०३॥
पुढां तन्मात्रा अर्धवेरी । आकाशाच्या अंतरीं । भरती, गमे, सागरीं । सरिता जेवीं ॥३०४॥
मग ब्रह्मरंध्रीं स्थिरावोनी । सोऽहंभावाचिया बाह्या पसरूनी । परमात्मलिंगा धांवोनी । आंगा घडे ॥३०५॥
तंव महाभूतांची जवनिका फिटे । मग दोहींसि होय झटें । तेथ गगनासकट आटे । समरसीं तिये ॥३०६॥
पैं, मेघाचेनि मुखें निवडिला । समुद्र कां वोघीं पडिला । तो मागुता जैसा आला । आपणपयां ॥३०७॥
तेवीं, पिंडाचेनि मिषें । पदीं पद प्रवेशे । तें एकत्व होय तैसें । पंडुकुमरा ॥३०८॥
आतां, ‘दुजें हन होतें? । कीं, एकचि हें आइतें?’ । ऐशिये विवंचनेपुरतें । उरेचिना ॥३०९॥
गगनीं गगन लया जाये । ऐसें जें कांहीं आहे । तें अनुभवें जो होये । तो होऊनि ठाके ॥३१०॥
म्हणौनि, तेथिंची मातु । न चढेचि बोलाचा हातु । जेणें संवादाचिया गांवाआंतु । पैठी कीजे ॥३११॥
अर्जुना, एऱ्हवीं तरी । इया अभिप्रायाचा जो गर्व धरी । ते, पाहें पां, वैखरी । दुरी ठेली ॥३१२॥
भ्रूलता मागिलीकडे । तेथ मकाराचेंचि आंग न मांडे । सडेया प्राणा सांकडें । गगना येतां ॥३१३॥
पाठीं तेथेचि तो भेसिबला । तैं शब्दाचा दिवो मावळला । मग, तयाहि वरी आटु भविन्नला । आकाशाचा ॥३१४॥
आतां महाशून्याचिया डोहीं । जेथ गगनासिचि ठावो नाहीं । तेथ तागा लागेल काई । बोलाचा इया?॥३१५॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ६, ओवी क्र. १९८ ते २५०
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
निजबोधाने अभोक्तृत्व (१९८ ते २३१)
अर्थाञ्जुषन्नपि हृषीकपते न लिप्तो, येऽन्ये स्वतः परिहृतादपि बिभ्यति स्म ॥१७॥
(हे इंद्रियस्वामी भगवंता, सर्व स्थावरजंगम जगाचा तू मालक आहेस. मायेच्या योगाने स्थूल रूपाला येऊन विकृत झालेली इंद्रिये विषयभोगाला प्रवृत्त होतात. विषयसेवन करीत असतानाही तुला मात्र त्यांच्यापासून कोणतीही बाधा होत नाही; परंतु इतर जीव आपल्यापासून दूर गेलेल्या विषयाससुद्धा भितात. (विषयांचे बाधकत्व इतके आहे की नुसत्या चिंतनानेही मनुष्य मोहित होतो.)॥१७॥)
तेंचि स्वामित्व कैसें घडे । हे जरी पुससी धडफुडें । तरी तेहीविखीं रोकडें । वचन गाढे अवधारीं ॥१९९॥
निजमायेचेनि योगें । नाना विषय भोगिसी अंगें । तें भोगिलेपण अंगी न लगे । अकर्तात्मसंगें अलिप्त ॥२००॥
तोचि अकर्तात्मबोधु कैसा । जरी म्हणशी हृषीकेशा । ते आगमनिगमां अतर्क्य दशा । परम पुरुषा परियेसीं ॥२०१॥
भोग्य-भोग-भोक्ता । या तिहींते तूं प्रकाशिता । जेवीं घटीं बिंबोनि सविता । अलिप्तता स्वभावें ॥२०२॥
घट-जळ-प्रतिबिंबासी । स्वयें सविता प्रकाशी । प्रकाशूनि अलिप्त त्यांसी । तेवीं तूं भोगासी श्रीकृष्णा ॥२०३॥
अथवा कर्म-कार्य-कर्ता । या तिहींमाजी निजात्मता । देखे तो अभोक्ता । भोगोनि तत्त्वतां निजभोग ॥२०४॥
दर्पणींच्या प्रतिबिंबासीं । जो प्रवर्तला भोगासी । व्यभिचाराचा आळ त्यासी । केवीं अंगासी लागेल ॥२०५॥
जगचि हे अवघें । जो होऊनि ठाके अंगे । त्यासी बाधावे कोणे भोगें । निजात्मयोगें योगिया ॥२०६॥
ऐशिया बोधाचेनि बळें । तो विषयावरी जरी लोळे । तरी विषयाचेनि विटाळें । बोधु न मैळे तयांचा ॥२०७॥
तो घेणे देणे करी । पाहतां दिसे व्यवहारी । नांदतांही घरदारी । त्यामाझारी तो नाहीं ॥२०८॥
नेणोनि बोधाची मागी । भोगत्याग केला योगीं । तरी कांपताति सर्वांगी । वासना अंगी उरलीसे ॥२०९॥
स्वप्नीं विषय देखती । जागे जाहल्या प्रायश्चित्त घेती । नाहीं मावळली अहंकृती । यालागी भीती सर्वदा ॥२१०॥
ऐशिया जी विषयभेडा । नाहीं निजबोधु धडफुडा । तैसा नव्हेसी तूं निधडा । दिसे रोकडा निजबोधु ॥२११॥
पत्न्यस्तु षोडशसहस्रमनङ्गबाणैर्यस्येन्द्रियं विमथितुं करणैर्न विभ्यः ॥१८॥
(कामोद्दीपक मधुर व मंद हास्याने युक्त असणाऱ्या नेत्रकटाक्षांनी भाव प्रकट करून आपल्या भ्रूकटाक्षाने मोहून टाकण्यात समर्थ अशा सोळा हजार स्त्रिया आपल्या मदनबाणांच्या साधनांनी भगवान कृष्णाचे मन यत्किंचितही विकृत करू शकल्या नाहीत. ॥१८॥)
सोळा सहस्र पत्न्या घरीं । आणि गोकुळींच्या परनारी । कुब्जादि मथुरेमाझारी । कर्णकुमारी भोगिल्या ॥२१३॥
मुंजी नव्हतां आधीं । भोगिली त्वां गोंवळी पेंधी । धरोनियां सांदीबिदीं । नदोनदी असंख्य ॥२१४॥
अविधी भोगितां नारी । बोध न मैळेचि श्रीहरी । अंगें रिघालासी क्षीरसागरी । अर्जुना करी धरोनी ॥२१5॥
शेषशायी नारायणा । उत्कंठा तुझिया दर्शना । तेणें उपावो केला जाणा । हरूनि ब्राह्मणाची बाळें ॥२१६॥
जेवीं आपुलें स्वरूप आपण । पहावया कीजे दर्पण । तेवीं पहावया कृष्णार्जुन । स्वयें नारायण अपत्ये आणी ॥२१७॥
‘तूं अवतार नर-नारायण । तुझें घ्यावया दरुषण । ब्राह्मणअपत्ये जाण । म्यां आपण आणिली’ ॥२१८॥
ऐसे नारायणाचे बोल । सप्रेम अतिसखोल । आम्ही ऐकिले गा सकळ । तुझा बोध अकळ श्रीकृष्णा ॥२१९॥
ती ब्राह्मणाची अपत्यें । जी बहु काळ जाहली होती मृतें । तुवां आणोनि दिधलीं श्रीअनंतें । ती देखिलीं समस्तें चरितें आम्हीं ॥२२०॥
तुझी नारायणासी आस्था । तेथ आमुची कवण कथा । पार न कळे जी अच्युता । गुणातीता श्रीकृष्णा ॥२२१॥
मागां अवतार जाहले । परी ऐसे चरित्र नाहीं केलें । विधिवेदां लाजविलें । व्यभिचारियां दिधलें निजपद ॥२२२॥
जें म्यां भोगिलें स्त्रियांसी । तें तूं उदासीनत्वें म्हणसी । तेणें बाध न पवे बोधासी । हृषीकेशी तें न घडे ॥२२३॥
हावभावविलासेंसी । अंगें दाविती चपळतेसी । तुज लक्षोनि पुरुषोत्तमासी । कामबाणासी योजिती ॥२२४॥
वाऊनि भृमंडलाचे वेढे । व्यंकट कटाक्षे बाण गाढे । सुरतमंत्री रोकडे । केले धडफुडे सतेज ॥२२५ ॥
ज्या बाणांचे घायीं । इंद्र खोंचला सहस्रां ठायीं । शिव लोळविला पाहीं । मोहिनीव्यामोहीं महाबाणें ॥२२६॥
ज्या बाणाचा पिसारा । लागतांचि पैं भेदरा । तापसी घेतला पुरा । सोडोनि घरदारा पळाले ॥२२७॥
ऐसे सोळा सहस्र बाण । अखंड तुजचिवरी संधान । करितां न मैळे बोधु जाण । अतिविंदान हे तुझें ॥२२८॥
घरींच्या स्त्रिया सहस्र सोळा । गोकुळादि मथुरेच्या अबळा । तुज विषयी करावया गोपाळा । नव्हती सकळा समर्था ॥२२९॥
त्यांचेनि तुज न करवे विषयी । परी त्या त्वां केल्या निर्विषयी । ऐसा तूं त्रैलोक्याचे ठायीं । स्वामी पाहीं श्रीकृष्णा ॥२३०॥
ऐशी तुझी कीर्ति ऐकतां । अथवा चरणतीर्थ घेतां । याचि दोंही तीर्थांची समर्थता । पवित्रता जगासी ॥२३१॥
कीर्तिश्रवण आणि चरणतीर्थसेवन (२३२ ते २३९)
आनुश्रवं श्रुतिभिरङ्घ्रिजमङ्गसङ्गैस्तीर्थद्वयं शुचिषदस्त उपस्पृशन्ति ॥१९ ॥
(तुझ्या अमृतासारख्या मधुर असणाऱ्या कथा ह्याच कोणी नद्या आणि तुझ्या पायांच्या तीर्थापासून उत्पन्न झालेल्या गंगाप्रभृती नद्या या दोन्ही त्रिभुवनात असणारी सर्व पातके नाहीशी करण्यास समर्थ आहेत. म्हणून तुझे भक्त श्रुतीचा आश्रय करून तुझ्या निर्मल यशाचे गान करतात आणि तुझी अंघ्रिज जी गंगा तिच्यामध्ये अवगाहन करून शुद्ध होतात. ही दोन्ही पावन करणारी आहेत म्हणून निर्मळ अंत:करणाचे भक्त या दोन्ही तीर्थांचे सेवन करतात. ॥१९॥)
तुझिया चरणींची गंगा । सकळ पातकें ने भंगा । ते पायवणी श्रीरंगा । पवित्र जगातें करी ॥२३३॥
या दोंही तीर्थांचे सेवन । अखंड करिती साधुजन । तेणें होऊनि परम पावन । समाधान निजवृत्ती ॥२३४॥
अवतारांचे अंतीं । ये दोनी तीर्थी अतिविख्याती । प्रगट केली तुवां क्षिती । तारावया श्रीपती निजदासां ॥२३५॥
एक श्रवणें एक स्नानें । दोनी तीर्थे परम पावनें । प्रगट केली जगज्जीवनें । मलिन जनें तरावया ॥२३६॥
अभ्यभाषत गोविन्दं प्रणम्याम्बरमाश्रितः ॥२०॥
(शुकाचार्य म्हणाले– याप्रमाणे देवांसह व शंकरासह कृष्णाची स्तुती करून आकाशस्थ ब्रह्मदेव गोविंदाला नमस्कार करून बोलता झाला. ॥२०॥)
ऐसा करूनि स्तुतिवादु । संतोषविला गोविंदु । देवांसी होत असे आल्हादु । परम विनोदु सर्वांसी ॥२३८॥
स्तुति करावया अग्रणी । ब्रह्मा शिव पुढे येऊनी । तिहीं जयजयकार करूनी । लोटांगणे घातलीं ॥२३९॥
देवांची कृष्णास स्तुतिपूर्वक (निजधामास यावे अशी) विनंती (२४० ते २६२)
त्वमस्माभिरशेषात्मंस्तत्तथैवोपपादितम् ॥२१॥
(ब्रह्मदेव म्हणाला-हे सर्वांतर्यामी जगदीशा, भूमीचा भार नाहीसा करण्यासाठी पूर्वी आम्ही तुला विनंती केली होती त्याप्रमाणे ते सर्व भूभारहरणाचे कार्य व्यवस्थित रीतीने तू पार पाडले आहेस. ॥२१॥)
आम्हीं विनविलें जैसें । तुवां कार्य केलें म्हणों तैसें । त्याहूनियां विशेषें । केली निजविन्यासें धर्मवृद्धी ॥२४२॥
तूं सर्वेश्वर सर्वात्मा । जें कार्य न कळेचि आम्हां । तेंही तुवां पुरुषोत्तमा । घनश्यामा संपादिलें ॥२४३॥
(सत्याने वागणाऱ्या साधू लोकांत तू धर्माची स्थापना केलीस व सर्व लोकांची पापे धुवून टाकणाऱ्या आपल्या कीर्तीचा विस्तार दाही दिशांमध्ये केलास. ॥२२॥)
आणिक दश दिशांप्रती । विस्तारिली उदार कीर्ती । तेणें पावन त्रिजगती । होय निश्चिती श्रवणद्वारें ॥२४५॥
(तू अत्यंत सुंदर असे रूप धारण करून यदुकुलात अवतार घेतलास आणि जगाच्या कल्याणासाठी अलौकिक स्वरूपाची कर्मे केलीस. ॥ २३ ॥)
तूं सर्वामाजी सर्वोत्तम । देखतां वृत्तींसी उपरम । लीलाविग्रही पुरुषोत्तम । मनोरम सकळिकां ॥२४७॥
कर्मे केली परमाद्भुतें । गोवर्धन धरिला वाम हस्तें । मुखें प्राशूनि वणव्यातें । गोपाळातें वांचविलें ॥२४८॥
मृता आणिलें गुरुपुत्रासी । गत गर्भ भेटविले देवकीसी । गोपालवत्से तूं जाहलासी । विधात्यासी भुलविलें ॥२४९॥
जगाचिया परम हिता-। लागी नाना चरित्रकथा । करिता जालासी श्रीअनंता । कृष्णनाथा निजजनका ॥२५० ॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. १०३९ ते १०५३
न लगे हालावें चालावे बाहेरी । अवघेचि घरी बैसलिया ॥ध्रु॥
देवाचींच नामें देवाचिये शिरीं । सर्व अळंकारी समर्पावीं ॥३॥
तुका म्हणे होय भावेंचि संतोषी । वसे नामापाशी आपुलिया ॥४॥
म्हणोनि अवघे सांडिले उपाय । धरियेले पाय दृढ तुझे ॥ध्रु॥
वेदपरायण पंडित वाचक । न मिळती एक एकामधीं ॥३॥
पाहों गेलों, भाव कैसी आत्मनिष्ठा? । तेथें देखें चेष्टा विपरीत ॥४॥
आपुलीया नाहीं निवाले जे अंगें । योगी करती रागें गुरगुरु ॥५॥
तुका म्हणे मज कोणाचा पांगिला । नको बा विठ्ठला करूं आतां ॥६॥
जातियां निरोप पाठवीं माहेरा। ‘कां मज सासुरा सांडियेलें’? ॥ध्रु॥
पैल कोण दिसे गरुडाचे वारिकें। विठ्ठलासारिखें चतुर्भुज ॥३॥
तुका म्हणे धीर नाहीं माझ्या जीवा । भेटसी केधवां पांडुरंगा! ॥४॥
नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन । बीज ज्याचा शीण तेचि फळ ॥ध्रु॥
नाव धड करा सहस्र नामांची । जे भवसिंधूची थडी पावे ॥३॥
तुका म्हणे काळा हाणा तोंडावरी । भाता भरा हरिरामबाणीं ॥४॥
करावेसे वाटे जीवा स्तनपान । नव्हे हे वचन शृंगारिक॥ध्रु॥
सत्यासाठी माझी शब्दविवंचना । जोडिल्या वचनाचें तें नव्हे ॥३॥
तुका म्हणे माझी कळवळ्याची कीव । भागलासे जीव कर्तव्याने ॥४॥
आझूनि कां नये तुज माझी दया । काय देवराया पाहातोसि? ॥ध्रु॥
आळवितों जैसे पाडस कुरंगिणी । पीडिलिया वनीं तहानभूकें ॥३॥
प्रेमरसपान्हा पाजी माझे आई! । धांवें वो विठाई वोरसोनि ॥४॥
तुका म्हणे माझें कोण हरिल दु:ख? । तुजविण एक पांडुरंगा! ॥५॥
जेथे पाहें तेथें देखीचा पर्वत । पायाविण भिंत तांतडीची ॥ध्रु॥
कामावलें तरि पाका ओज घडे । रुचि आणि जोडे श्लाघ्यता हे ॥३॥
तुका म्हणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दिस जागृतीचा ॥४॥
ऐशा विचाराचे घालूनि कोंडणी। काय चक्रपाणि निजलेती? ॥ध्रु॥
एक वेळ जेणें पुत्राच्या उद्देशें। घेतल्याचें कैसें नेले दु:ख? ॥३॥
तुका म्हणे अहो वैकुंठनायका! । चिंता कां सेवका तुमचिया? ॥४॥
ख्याती केली अजामेळें । होतें निघालें दिवाळें ॥ध्रु॥
मोकलिला प्रायश्चित्तीं। कोणी न धरिती हातीं ॥३॥
तुका म्हणे मुक्त वाट । वैकुंठीची घडघडाट ॥४॥
पुण्य पर्वकाळ तीर्थेही सकळ । कथा सिंधु-जळ न्हाऊ येती ॥ध्रु॥
अवघेचि लाभ बैसलिया घरा । येती, भाव धरा एके ठायीं ॥३॥
शेळ्या मेंढ्या गाई सेवा घेती म्हैसी । कामधेनु तैसी नव्हे एक ॥४॥
तुका म्हणे सुखें पाविजे अनंता । हे वर्म जाणतां सुलभचि ॥५॥
तयाच्या चिंतने तरतील दोषी। जळतील राशी पातकांच्या ॥ध्रु॥
देव इच्छी रज चरणींची माती । धांवत चालती मागे मागे ॥३॥
काय त्यां उरलें वेगळे आणीक? । वैकुंठनायक जयां कंठीं ॥४॥
तुका म्हणे देव-भक्तांचा संगम । तेथें ओघ नाम त्रिवेणीचा ॥५॥
ऐसें बळ नाहीं आणिकांचे अंगीं । तप तीर्थ जगीं दान व्रत ॥ध्रु॥
चरणींचें रज वंदी शूळपाणि । नाचती कीर्तनीं त्यांचें माथां ॥३॥
भव तरावया उत्तम हें नाव । भिजों नेदी पाव हात कांहीं ॥४॥
तुका म्हणे मना झालें समाधान । देखिल्या चरण वैष्णवांचे ॥५॥
आम्ही भूमीवरी एक पै दैवाचें । निधान हें वाचे सांपडलें ॥ध्रु॥
तरतील कुळें दोन्ही उभयतां । गातां आइकतां सुखरूप ॥३॥
न चळे हा मंत्र न म्हणे यातीकुळ । न लगे काळ वेळ विचारावी ॥४॥
तुका म्हणे माझा विठ्ठल विसांवा । सांठविला हांवा हृदयांत ॥५॥
म्हणवी ‘म्हणियारा’ तयाचा । दास आपुल्या दासांचा । अनुसरले वाचा-। काया मनें विठ्ठलीं ॥ध्रु॥
असे भूतदया मानसीं । अवघा देखें हृषीकेशी । जीवें न विसंबे त्यासी । मागे मागे हिंडतसे ॥३॥
तुका म्हणे निर्विकार। शरणागतां वज्रपंजर। जे जे अनुसरले नर । तयां जन्म चुकलें ॥४॥
लुटा लुटा संतजन! । अमुप हे राशी धन ॥ध्रु॥
झाला हरि-नामाचा तारा। शीड लागले फरारा ॥३॥
तुका जवळी हमाल । भार चालवी विठ्ठल ॥४॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.






रामकृष्णहरी माऊली 🌷