
अनुक्रमणिका
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ६. ओवी क्र. ४११- ४२९
योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन । एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात्स्थितिं स्थिराम् ॥३३॥
चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम् । तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ॥३४॥
हें मन कैसें? केव्हडें? । ऐसें पाहों म्हणों, तरी न सांपडे । एऱ्हवीं, राहाटावया थोडें । त्रैलोक्य यया! ॥१२॥
म्हणौनि, ऐसें कैसें घडेल? । जें-मर्कट समाधी येईल । कां, ‘राहें’ म्हणितलिया, राहेल । महावातु? ॥१३॥
जें बुद्धीतें गिळी । निश्चयातें टाळी । धैर्यासी हांतफळी । मिळऊनि जाय ॥१४॥
जें विवेकातें भुलवी । संतोषासी चाड लावी । बैसिजे, तरी हिंडवी । दाही दिशा ॥१५॥
जें निरोधिलें, घे उमावो । जया संयमुचि होय सावावो । तें मन, आपुला स्वभावो । सांडील काई? ॥१६॥
म्हणौनि, मन एक निश्चळ राहेल । मग आम्हांसि साम्य होईल । हें विशेषेंही न घडेल । याचि लागीं” ॥१७॥
असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् । अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ॥३५॥
परी वैराग्याचेनि आधारें । जरी लाविलें अभ्यासाचिये मोहरें । तरि, केतुलेनि एके अवसरें । स्थिरावेल ॥१९॥
कां, जें यया मनाचें एक निकें । जें-देखिलें गोडीचिया ठाया सोके । म्हणौनि अनुभवसुखचि, कौतुकें । दावीत जाइजे ॥२०॥
परि यम-नियमांचिया वाटा न वचिजे । कहीं वैराग्याची से न करिजे । केवळ विषयजळीं ठाकिजे । बुडी देइजोनी ॥२२॥
या जालिया मानसा कहीं । युक्तीची कांबी लागली नाहीं । तरी निश्चळ होईल काई? । कैसेनि? सांगे ॥२३॥
म्हणौनि, मनाचा निग्रहो होये । ऐसा उपाय जो आहे । तो आरंभीं; मग नोहे-। कैसा? पाहों! ॥२४॥
तरी योगसाधन जितुकें । तें अवघेंचि काय लटिकें? । परि ‘आपणपें अभ्यासूं न ठाके’ । हेंचि म्हणों ॥२५॥
आंगीं योगाचें होय बळ । तरी मन केतुलें चपळ? । काय महदादि हें सकळ । आपुं न होये? ॥२६॥
तेथ अर्जुन म्हणे निकें । देवो बोलती, तें न चुके । साचचि, योगबळेंसीं न तुके । मनोबळ ॥२७॥
तरी, तोचि योगु कैसा, केव्हां जाणों? । आम्ही येतुलें दिवस याची मातही नेणों । म्हणौनि मनात, जी, म्हणों । ‘अनावर’ ॥२८॥
हा आतां आघवेया जन्मा । तुझेनि प्रसादें, पुरुषोत्तमा । योग-परिचयो आम्हां । जाहला आजी ॥२९॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ७, ओवी क्र. १ ते ४८
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
॥ ॐ तत्सत्-श्रीकृष्ण प्रसन्न ॥
श्रीएकनाथी भागवत
अध्याय सातवा
॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
तुझी करितांचि गोठी । प्रगटसी पाठींपोटीं । सन्मुख ठसावसी दृष्टी । हृदयगांठी छेदूनी ॥२॥
छेदूनि विषयवासना । स्वयें प्रगटसी जनार्दना । भवअभवभावना । नेदिसी मना आतळों ॥३॥
आतळतां तुझे चरण । आकळलें राहे मन । सहज देशी समाधान । आनंदघन अच्युता ॥४॥
ऐशिया जी गुरुनाथा । समसाम्ये चरणीं माथा । पुढील परिसावी जी कथा । जेथ वक्ता श्रीकृष्णु ॥५॥
होतें कृष्णाचे मानसीं । ‘मज गेलिया निजधामासी । माझें निजज्ञान कोणापासीं । अतियत्नेसी ठेवावें’ ॥७॥
तंव देखिली उद्धवाची अवस्था । सुख जाहलें श्रीकृष्णनाथा । वैराग्ययुक्त उपदेशिता । होय सर्वथा निजज्ञान ॥८॥
एवं वांचवावया उद्धवासी । कृष्ण ब्रह्मज्ञान उपदेशी । शाप न बाधी ब्रह्मवेत्त्यांसी । हे हृषीकेशी जाणतु ॥९॥
ब्रह्मउपदेशाची हातवटी । उपदेशू जाणे जगजेठी । वैराग्य उपजवी उठाउठीं । जेणें पडे मिठी निजतत्त्वीं ॥१०॥
नव्हतां वैराग्य दारुण । उपदेशु केला तो वृथा जाण । हे श्रीकृष्णचि जाणे खूण । वैराग्यविंदान बोलतु ॥११॥
पहिले उद्धवाच्या बोलासी । अनुमोदन दे हृषीकेशी । तेणें अन्वयें सावकाशीं । ज्ञानवैराग्य त्यासी बोलतु ॥१२॥
श्रीभगवान म्हणाले- हे महाभाग्यवंता, जे तू म्हणालास तेच मी करण्याचे ठरविले आहे. ब्रह्मदेव, शंकर आणि लोकपाळ यांची इच्छा मी स्वर्गाला (निजधामाला) यावे अशी आहे. ॥१॥
जें तूं बोलिलासी भावयुक्त । तें वचन तुझें सत्य सत्य । तेंचि माझें मनोगत । जाण निश्चित निर्धारें ॥१४॥
माझी अवस्था जाश्वनीळा । ब्रह्मादिदेवां सकळां । येथ आले होते मिळोनि मेळा । लोकपाळांसमवेत ॥१५॥
येऊनि माझी घेतली भेटी । अपेक्षा जे होती पोटीं । पुशिली माझ्या प्रयाणाची गोठी । जेणें तुज मोठी अवस्था ॥१६॥
म्यां वेगीं यावें वैकुंठा । हे समस्तांसी उत्कंठा । आदिकरून नीळकंठा । सुरवरिष्ठां झालीसे ॥१७॥
देवांचे या लोकातील सर्व कार्य मी पार पाडले आहे. ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेनुसार ह्या कार्याकरिताच मी स्वत:च्या अंशाने अवतार घेतलेला होता. ॥२॥
ज्येष्ठकनिष्ठभावना । दोघांमाजी नाही जाणा । कृष्णा आणि संकर्षणा । एकात्मता निजांशें ॥१९॥
आमचे कुल ब्राह्मणशापाने वस्तुत: जळल्यासारखे झालेले आहे, लवकरच परस्परांमध्ये भांडून ते नाहीसे होईल. आजपासून सातवे दिवशी समुद्र ही नगरी बुडवून टाकील. ॥३॥
भूमि मागोनि समुद्रापाशीं । म्यां रचिलें द्वारकेसी । मज गेलिया निजधामासी । तो सातवे दिवसीं बुडवील ॥२१॥
हे शुचिपुरुषा, ज्यावेळी मी हा लोक सोडून जाईन त्यावेळी लवकरच ह्या लोकाचे सर्व शुभ नाहीसे होईल, आणि कलियुगाच्या सर्व दोषांनी युक्त असा तो होईल. (तू आत्मनिष्ठ हो, हा भगवंतांच्या सांगण्याचा हेतू.) ॥४॥
अधर्म वाढेल प्रबळ । लोक होतील नष्ट अमंगळ । ते अमंगळतेचें मूळ । ऐक समूळ सांगेन ॥२३॥
मज नांदतां ये सृष्टीं । कलि उघडू न शके दृष्टी । मज गेलियापाठीं । तो उठाउठीं उठेल ॥२४॥
कलि वाढेल अतिविषम । ब्राह्मण सांडितील स्वधर्म । स्वभावें नावडे दानधर्म । क्रियाकर्म दंभार्थ ॥२५॥
हे महाभागा, मी हा भूलोक सोडून गेल्यानंतर तू येथे राहू नकोस; कारण कलियुगामध्ये सर्व लोक अधर्माची आवड असणारेच होतील. ॥५॥
कळी आतळेल जेव्हां । जनीं अधर्म वाढेल तेव्हां । कुविद्येच्या उठती हांवा । सैंघ धांवा निंदेच्या ॥२७॥
न लभे स्वार्थाची कवडी । तरी करिती निंदेच्या कोडी । ऐसी कलियुगी वस्ती कुडी । तुवां अर्ध घडी न रहावें ॥२८॥
तू आपले स्वजन व बंधू यांचे ठिकाणी असलेले प्रेम सर्व प्रकारे सोडून माझे ठिकाणी एकनिष्ठेने आपले मन व बुद्धी ठेव आणि सर्वत्र माझे स्वरूप पाहून खुशाल पृथ्वीवर निर्भय संचार कर. ॥६॥
धनधान्यसमृद्धीसीं । सांडावें स्वजनगोत्रजांसी । भ्रातादुहितानिजभगिनींसी । स्त्री-पुत्रांसी त्यजावें ॥३०॥
स्नेहो ठेवूनि घरदारी । अंगें तूं जरी निघालासि बाहेरी । तरी तो त्यागूचि कठिण भारी । अनर्थकारी होईल ॥३१॥
आधी समूळ स्नेहो सांडावा । पाठी अभिमानुही दंडावा । वासनाजटाजूट मुंडावा । मग सांडावा आश्रमु ॥३२॥
‘स्नेहो कैसेनि सांडे । अभिमानु कैसेनि दंडे’ । हे तुज वाटेल सांकडें । तरी रोकडे परियेसीं ॥३३॥
माझें स्वरूप जें सर्वगत । तेथ ठेवोनियां चित्त । सावधाने सुनिश्चित । राहावें सतत निजरूपीं ॥३४॥
तये स्वरूपीं चित्ता । निर्धारेसी धारणा धरितां । निजभावें तन्मयता । तद्रूपता पावेल ॥३५॥
माझें स्वरूप ज्ञानघन । ध्याता जीवु स्वयें सज्ञान । या स्थिती करितां ध्यान । सहजें जाण तद्रूप ॥३७॥
तेथ समसाम्य समस्त । समत्व पावेल चित्त । तेणें समभावे निश्चित । तेथींचा तेथ रहावें ॥३८॥
आधीं गृहाश्रमातें त्यागावें । मग म्यां म्हणसी कोठे राहावें । ऐसें मानिसील स्वभावें । तेविखीं बरवें परियेसीं ॥३९॥
स्वरूपसाम्ये समदृष्टी । समभावें विचरें सृष्टीं । निवासस्थानांची आटाटी । सर्वथा पोटीं न धरावी ॥४०॥
जेथ अल्प काळ वसती घडे । त्या ठायाचा अभिमान चढे । वसतिस्थान ऐसें कुडें । वस्तीचें सांकडे सर्वथा न धरीं ॥४१॥
तूं सर्वी सर्वगत होसी । सर्वाधार सर्वदेशी । ऐसा मी होऊन मज पावसी । न हालतां येसी निजधामा ॥४२॥
‘मज निजधामा न्यावें’ । होतें पुशिलें उद्धवें । तें निजबोधस्वभावें । स्वयें केशवें सांगितलें ॥४३॥
न करितां हे उपायस्थिती । सर्वथा न घडे माझी प्राप्ती । मग तूं निजधामाप्रती । कैशा गती येशील ॥४४॥
गरूडी वाऊनि वेगेंसीं । न्यावें निजधामा म्हणसी । गति तेथ नाहीं पाखांसी । गम्य गरुडासी तें नव्हे ॥४५॥
सांडूनि उभय पक्षांसी । साधक पावती मद्रूपासी । पक्षाभिमान असे गरुडासी । गमन त्यासी तेणे नव्हे ॥४६॥
म्हणसी न्यावें घेवोनि खांदीं । मज खांदाचि नाहीं त्रिशुद्धी । तुज न सांडितां अहंबुद्धी । गमनसिद्धी तेथ नाहीं ॥४७॥
न त्यागितां अहंभावस्थिती । केल्या नाना उपाययुक्ती । तेणें निजधामाप्रती । नव्हे गती सर्वथा ॥४८॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. १११६ – ११३२
वेश्या, दासी, मुरळी जगाची वोवळी। ते तुज सोंवळी वाटे कैसी? ॥२॥
तुका म्हणे आतां लाज धरी बुच्या! । टांचराच्या कुच्या मारा वेगीं ॥३॥
न करी स्नान संध्या न म्हणे ‘राम राम’ । गुड-गुडीचे प्रेम अहर्निशीं ॥२॥
देव ब्राह्मणांसी जाईना शरण । दासीचे चरण वंदी भावें ॥३॥
सुगंध चंदन सांडोनियां माशी । बैसे दुर्गंधीशी अत्यादरें ॥४॥
तुका म्हणे अरे ऐक भाग्यहीना! । कां रे रामराणा विसरसी? ॥५॥
आतां मज ऐसे करीं । तुझे पाय चित्तीं धरीं ॥ध्रु॥
उपजला भावो । तुझे कृपें सिद्धी१२ जावो ॥३॥
तुका म्हणे आतां । लाभ नाहीं यापरता ॥४॥
तैसें तुम्हां आम्हां झालें । एकी एक सामावलें॥ध्रु॥
उदकावरील तरंग । तरंग उदकाचे अंग ॥३॥
तुका म्हणे बिंब छाया । ठायीं पावली विलया ॥४॥
मालाचे पैं पेटे वाहाताती उंटें । तयालागीं कांटे भक्षावया ॥२॥
वाउगा हा धंदा आशा वाढविती । बांधोनियां देती यमाहातीं ॥३॥
ज्यासी असे लाभ तोचि जाणे गोडी । येर ती बापुडी शिणली वायां ॥४॥
तुका म्हणे शहाणा होईं रे गव्हारा । चौऱ्यांशीचा फेरा फिरों नको ॥५॥
लटिकेची डोहळे दाखवी प्रकार । दूध स्तनी पोर पोटीं नाहीं ॥२॥
तुका म्हणे अंतीं वांज तेचि खरी । फजिती दुसरी जनामध्ये ॥३॥
विसरेना रूप क्षण एक चित्तीं । जिवलग मूर्ति सांवळी ते ॥ध्रु॥
विसरतां हरि क्षण एक घडी । अंतरेल जोडी लक्षलाभ ॥३॥
तुका म्हणे माझ्या विठोबाचेपाय । संजीवनी आहे हृदयामाजीं ॥४॥
झाडा३ देते वेळे विचकिती दांत। घेती यमदूत दंडवरी ॥ध्रु॥
हात दांत कान हलविती मान । दाखविती जन मानावया ॥३॥
तुका म्हणे किती झाली ही फजित । मागें, नाहीं मित भारवाही ॥४॥
व्यर्थ भरोवरी केले पाठांतर। जोवरी अंतर शुद्ध नाहीं ॥ध्रु॥
घोडे काय थोडे वागवितें ओझें? । भावेंविण तैसें पाठांतर ॥३॥
तुका म्हणे धरा निष्ठावंत भाव । जरी पंढरीराव पाहिजे तों ॥४॥
सांडो-नियां वाळवंट । काय इच्छिसी वैकुंठ? ॥ध्रु॥
खांद्या पताकांचे भार । तुळसीमाळा आणि अबीर ॥३॥
साधुसंतांच्या दाटणी । तुका जाय लोटांगणीं ॥४॥
भेसळीचे१९ वीर्य ऐशा अनुभवें । आपुलें परावें नाहीं खळा॥ध्रु॥
संतांचा जो शोध करीतो चांडाळ । धरावा२२ विटाळ बहु त्याचा ॥३॥
तुका म्हणे केली प्रतिज्ञा याचसाठीं । कांहीं माझे पोटीं शंका नाहीं ॥४॥
बरे नव्हेल शेवटीं । भय असो द्यावें पोटीं ॥ध्रु॥
मुरगाळीतां कान । घुसमाडील सावधान! ॥३॥
अबोलणा तुका । ऐसें कोणी लेखूं नका३० ॥४॥
हेंचि वोसणावोनि उठी । देव सांठविला पोटीं ॥ध्रु॥
नाहीं ओढा३६ वारा । पडिला प्रसंग तो बरा ॥३॥
तुका म्हणे झाली । मज हे अनावर बोली ॥४॥
कैंचें पुण्य तिये गांठीं ? । व्रतें वेची लोभासाठीं ॥२॥
वाढावें संतान । गृहीं व्हावें धनधान्य॥३॥
मागे गारगोटी । परिसाचिये साटोवाटी ॥४॥
तुका म्हणे मोल । देऊनि, घेतला ‘सोमल’ ॥५॥
बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु॥
तट्टावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥३॥
तुका म्हणे द्रव्य घेती । देती तेही नरका जाती ॥४॥
पांच लक्ष घरें पाषाणांची जेथें । सात लक्ष तेथें विटबंदी ॥२॥
कोटि घरे जेथे काशा आणि तांब्याचीं । शुद्ध कांचनाची सप्त कोटी ॥३॥
तुका म्हणे ज्याची संपदा एवढी । सांगातें कवडी गेली नाहीं ॥४॥
ऐसीही पापिणी वाहिली विमानीं । अचळ भुवनीं ठेवियेली ॥२॥
‘पतितपावन’ तिहीं लोकीं ठसा । ‘कृपाळू’ ‘कोंवसा अनाथांचा’ ॥३॥
तुका म्हणे धरा विठोबाची सोय । आणिक उपाय नेणों किती ॥४॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.







