दिवस – ७२. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

तिये
१. (यतते च तत इति)
सिद्धप्रज्ञेचेनि लार्भे
२. बुद्धिच्या अधिष्ठात्री देवतेच्या कृपेने-प्राप्तीनें, ऋतंभरा प्रज्ञा, पूर्व जन्मात प्राप्त असलेली प्रज्ञा.
। मनचि सारस्वतें दुभे
३. सर्व विद्या दुभतात, येतात.
। मग सकळ शास्त्रें स्वयंभें । निघती मुखें ॥४५४॥
ऐसें
१. (एतद्धि दुर्लभतरमिति)
जे जन्म । जयालागीं देव सकाम
२. हेतु धरणारे, इच्छा करणारे.
। स्वर्गी ठेले
३. राहणारे.
; जप-होम । करिती सदा ॥४५५॥
अमरीं भाट
१. स्तुतिपाठक.
होईजे । मग मृत्युलोकातें वानिजे
२. वर्णन करावें.
। ऐसें जन्म, पार्था गा, जे । तें तो पावे ॥४५६॥
पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः ।
जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते ॥४४॥
आणि
१. (पूर्वाभ्यासेन तेनैव)
मागील जे सद्बुद्धि । जेथ जीवित्वा
२. आयुष्याला.
जाहली होती अवधि
३. शेवट.
। मग तेचि पुढती
४. पुनः
, निरवधि
५. लगेच, तत्काल.
। नवी लाहे ॥४५७॥
तेथ सदैवा
१. दैववानाला.
आणि पायाळा
२. पायाळू मनुष्याला.
। वरि दिव्यांजन
३. एकप्रकारचे लोकोत्तर काजळ, तें डोळ्यांत घातलें असतां भूमिगत द्रव्य दिसतें.
होय डोळां । मग, देखें जैसी अवलीळा
४. सहज, लीलेनें.
। पाताळधनें ॥४५८॥
तैसें
१. (शब्दब्रह्मातिवर्तते)
दुर्भेद
२. बुद्धिने उलगडा होण्यास कठीण.
जे अभिप्राय । कां गुरुगम्य
३. गुरूपासूनच प्राप्त होणारे.
हन ठाय । तेथ सौरसेंवीण
४. अभ्यासावांचून, अचूक.
जाय । बुद्धि तयाची ॥४५९॥
बळियें
१. (ह्रियते ह्यवशोऽपि सः)
इंद्रियें येती
२. वश होती.
मना । मन एकवटे
३. ऐक्य पावतें.
पवना
४. वायूशीं.
। पवन सहजें गगना । मिळोंचि लागे ॥४६०॥
ऐसें नेणों काय आपेसें
१. आपोआप.
। तयातेंचि कीजे अभ्यासें । समाधि घर पुसे
२. विचारिते.
। मानसाचें ॥४६१॥
जाणिजे
१. (जिज्ञासुरपि योगस्य)
योगपीठीचा
२. योगस्थानावरची.
भैरवु
३. अधिदेवता.
। काय हा आरंभरंभेचा
४. जगाचा आरंभ करणारी जी रंभा म्हणजे पार्वती, तिचा गौरव करणारा योगपीठाचा जणू काय शंकरच. किंवा योगारम्भरुपी केळीची शोभा.
गौरवु । कीं, वैराग्यसिद्धिचा अनुभवु । रूपा आला ॥४६२॥
हा संसारु उमाणितें
१. मोजणारे.
माप । कां, अष्टांगसामग्रीचें
२. अष्टांग योगसाहित्याचें.
द्वीप
३. बेट.
। जैसें परिमळेंचि धरिजे रूप
४. सुगंधानेंच रूप धारण केले आहे.
। चंदनाचें ॥४६३॥
तैसा संतोषाचा काय घडिला । कीं सिद्धभांडारींहूनि
१. सिद्धांच्या खजिन्यांतून.
काढिला । दिसे
२. साधक असून सिद्धासारखा दिसतो.
तेणें माने रूढला
३. वाढला, उत्पन्न झाला.
साधकदशे
४. साधक असून सिद्धासारखा दिसतो.
॥४६४॥
प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः ।
अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम् ॥४५॥
जे वर्ष शतांचिया कोडी
१. कोटि.
। जन्म सहस्रांचिया आडी
२. प्रतिबंध.
। लंधितां, पातला थडी
३. किनारा.
। आत्मसिद्धीची ॥४६५॥
म्हणौनि साधनजात आघवें
१. सर्व साधनें.
। अनुसरे तया, स्वभावें । मग आयतिये
२. तयार असलेल्या.
बैसे राणिवे
३. राज्यावर.
। विवेकाचिये ॥४६६॥
पाठीं विचारितया वेगां
१. विचार करण्याचा जो वेग त्यानें.
। तो विवेकुही ठाके
२. राहतो.
मागां । मग अविचारणीय
३. विचार जेथें पोचत नाहीं असें ब्रह्म.
तें आंगा । घडोनि जाय ॥४६७॥
तेथ मनाचें मेहुडें
१. मेघ.
विरे
२. लय पावतें.
। पवनाचें पवनपण सरे । आपणपां आपण मुरे
३. आपल्या ठिकाणीं आपण लीन होतें.
। आकाशही ॥४६८॥
प्रणवाचा
१. ॐकाराचा.
माथा बुडे । येतुलेनि अनिर्वाच्य
२. बोलण्यास अशक्य.
सुख जोडे । म्हणौनि आधींचि बोलु बहुडे
३. परावर्ते, मागे फिरे.
। तयालागीं ॥४६९॥
ऐसी ब्रह्मींची स्थिती । जे सकळां गतींसी गती । तया अमूर्ताची
१. निराकाराची.
मूर्ति । होऊनि ठाके ॥४७०॥
तेणें
१. (अनेकजन्मसंसिद्धः)
बहुतीं जन्मीं मागिलीं । विक्षेपांचीं पाणिवळें
२. पाण्यांतील मळ-केरकचरा.
झाडिलीं । म्हणौनि उपजतखेंवो
३. उत्पन्न होतांच.
बुडाली । लग्नघटिका ॥४७१॥
आणि
१. (ततो याति परां गतिं)
तद्रूपतेसीं लग्न । लागोनि ठेलें, अभिन्न । जैसें, लोपलें अभ्र गगन । होऊनि, ठाके ॥४७२॥
तैसें, विश्व जेथ होये । मागौतें
१. पुनः, माघारीं.
जेथ लया जाये । तें, विद्यमानेंचि देहें । जाहला तो; गा ॥४७३॥

भक्तांना विघ्ने बाधत नाहीत (१०२ ते १०८)
ज्ञानविज्ञानसंयुक्त, आत्मभूतः शरीरिणाम् । आत्मानुभवतुष्टात्मा, नान्तरायैर्विहन्यसे ॥१०॥
याप्रमाणे शास्त्रज्ञान आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव यांनी युक्त होऊन सर्व चराचराचा आत्माच तू होशील. याप्रमाणे आत्मसाक्षात्काराने पूर्ण तृप्ती झाल्याने कोणत्याही मायिक विघ्नाने तुझे चित्त आत्मस्वरूपापासून विचलित होणार नाही. ॥१०॥
शास्त्रश्रवणें दृढ ‘ज्ञान’ । मननाभ्यासें होय ‘विज्ञान’ । या दोंहींची जाणोनि खूण । ब्रह्मसंपन्न तूं होसी ॥१०२॥
ऐसिया स्वार्थाचेनि लवलाहें । अविश्रम भजावे तुझे पाये । म्हणसी ‘वोढवतील अंतराये । त्यासी काये करावें’ ॥१०३॥
सांडोनि दांभिक लौकिक । त्यजोनियां फळाभिलाख । जो मज भजे भाविक । विघ्न देख त्या कैंचें ॥१०४॥
त्याच्या विघ्ननाशासी देख । करी चक्राची लखलख । घेऊनि पाठीसी अचुक । उभा सन्मुख मी असें ॥१०५॥
यापरी गा उद्धवा । जो मज भजे निजभावा । त्यासी विघ्न करावया देवां । नव्हे उठावा मज असतां ॥१०६॥
एवं ब्रह्मसंपन्न जाहलियावरी । आत्मा तूंचि चराचरीं । जंगमी आणि स्थावरीं । सुरासुरीं तूंचि तूं ॥१०७॥
तुजहूनि कांहीं । अणुभरी वेगळे नाहीं । तेथ विघ्न कैंचें कायी । तुझ्या ठायीं बाधील ॥१०८॥
ब्रह्मानुभवाचे ठिकाणी कर्मबाधा नाही (१०९ ते ११४)
ब्रह्मादिकांसी जो ग्रासी । त्या काळाचा तूं आत्मा होसी । पाठी थापटून हृषीकेशी । उद्धवासी सांगतु ॥१०९॥
ऐशी बाध्यबाधकता फिटली । संकल्पकल्पना तुटली । ब्रह्मानंदें पाहांट फुटली । वाट मोडली कर्माची ॥११०॥
ऐसा ब्रह्मानुभवी जो देख । कर्म तेथ होय रंक । वेद तयाचे सेवक । विधिविवेक कामारी ॥१११॥
हेचि किती सांगों कायी । मी त्याचा आज्ञाधारक पाहीं । प्रतिष्ठिती जे जे ठायीं । तेथ पाहीं प्रगटतु ॥११२॥
वचनमात्रासाठीं । प्रगटलों कोरडे काष्ठीं । दुर्वासा वाइला पाठीं । त्वांही दिठी देखिलें ॥११३॥
म्हणसी ‘देव ज्याचा आज्ञाधारु । कर्म त्याचे होय किंकरु । तरी ज्ञाते यथेष्टाचारु । विषयीं साचारु विचरती’ ॥११४॥
ज्ञात्याकडून विषयाचरण घडत नाही (११५ ते ११९)
ज्ञात्यासी स्वेच्छा विषयाचरण । सर्वथा न घडे गा जाण । तेही विषयींचे लक्षण । सावधान परियेसीं ॥११५॥
ज्यासी दग्धपटअभिमान । मिथ्या प्रपंचाचे भान । मृषा विषयांचे दर्शन । विषयाचरण त्या नाहीं ॥११६॥
जयासी प्रपंचाची आवडी । विषयाची अतिगोडी । यथेष्टाचरणाची वोढी । पडे सांकडी तयासी ॥११७॥
ज्ञातयाच्या ठायीं । सत्यत्वें विषयो नाहीं । मा भोगावया कायी । अभिलाषी पाहीं तो होईल ॥११८॥
आतां ज्ञातयाचें कर्म । ऐक सांगों त्याचे वर्म । नातळतां मनोधर्म । क्रियाकर्म आचरती ॥११९॥
ज्ञात्याची कर्मे पूर्वप्रारब्धानुसार (१२० ते १३१)
दोषबुद्ध्योभयातीतो, निषेधान्न निवर्तते । गुणबुद्ध्या च विहितं, न करोति यथाऽर्भकः ॥११॥
ऐहिक व आमुष्मिक विषयांपासून तो संपूर्ण विरक्त असल्यामुळे, लहान मुलाप्रमाणेच, दोषयुक्त कर्मापासून बुद्धीने परावृत्त होत नाही, त्याचप्रमाणे कर्म गुणफलदायी असले तरी प्रवृत्त होत नाही. तो गुण आणि दोष या दोहींच्याही पलीकडे गेलेला असतो. ॥११॥
गुणदोषातीत ज्ञाता । तो निषेधीं न वर्ते सर्वथा । परी भ्यालेपण चित्ता । नाहीं तत्त्वतां तयासी ॥१२०॥
तो विहितही कर्म करी । तेथ गुणत्वें बुद्धि न धरीं । कुलालचक्राचियेपरी । पूर्वसंस्कारी वर्तत ॥१२१॥
संकल्पु नाही वृत्तीं । हेतु स्फुरेना चित्तीं । ऐसी कर्मे ज्ञाते करिती । शरीरस्थिती केवळ ॥१२२॥
तेथ सत्कर्म सिद्धी गेलें । तेणें फुगेना म्यां हें केलें । अथवा माझारी विकळ पडिलें । तेणें तगमगिलेपण नाहीं ॥१२३॥
निद्रितामागें बैसला वाघु । अथवा पुढे आला स्वर्गभोगु । त्यासी नाही रागविरागु । तैसा लागु ज्ञात्याचा ॥१२४॥
गुणदोषीं चित्तवृत्ती । सांडोनियां सहजस्थिती । बाळके जेवीं क्रीडती । तैशी स्थिति ज्ञात्याची ॥१२५॥
‘अभिमाने कर्मप्राप्ती । त्या अभिमानाते त्यागिती । मग निरभिमानें केवीं वर्तती । कर्मस्थिति त्यां न घडे’ ॥१२६॥
ऐसा विकल्पु जरी करिसी । ते स्थिति न कळे इतरांसी । निरभिमानता स्वानुभवेंसीं । केवीं येरासी कळेल ॥१२७॥
देह प्रारब्धाचेनि मेळें । स्वभावे सर्व कर्मी चळे । तेथ अज्ञानाचेनि बळें । अभिमानु खवळे ‘मी कर्ता’ ॥१२८॥
तेथ गुरूवाक्य-अनुवृत्ती । अभ्यासूनि यथा निगुतीं । अज्ञानेसहित निरसिती । अभिमानस्थिति निजबोधे ॥१२९॥
शेष-प्रारब्धाचेनि मेळें । निरभिमानें देह चळे । ज्ञाते कर्मे करिती सकळे । जाण केवळे शरीरें ॥१३०॥
केवळ शरीरें कर्मे होतीं । तीच ‘अहेतुक’ बोलिजेती । अर्भकदृष्टांतें उपपत्ती । हेचि स्थिति सांगितली ॥१३१॥
निरभिमानाची लक्षणे (१३२ ते १५८)
निरभिमानाची लक्षणें । कृष्ण उद्धवातें ऐक म्हणे । येरु आनंदला अंतःकरणे । सादरपणे परिसतु ॥१३२॥
सर्वभूतसुहृच्छांतो, ज्ञानविज्ञाननिश्चयः । पश्यन्मदात्मकं विश्वं, न विपद्येत वै पुनः ॥१२॥
याप्रमाणे सर्व प्राणिमात्रांचा आंतरिक जिवलग, इंद्रियांचे पूर्णपणे नियमन केलेला, शास्त्रानुभवाचा पूर्ण निश्चयी असा हा योगी, सर्व विश्व मद्रूपतेने पाहतो व स्वस्वरूपाहून कधीही च्युत होत नाही. ॥१२॥
पहिले शास्त्रश्रवणें ‘ज्ञान’ । तदनुभवें होय ‘विज्ञान’ । ऐसा ज्ञानविज्ञानसंपन्न । निरभिमान तो होय ॥१३३॥
साचचि निरभिमानता । जरी आली होय हाता । तरी ‘शांति’ तेथ सर्वथा । उल्हासता पैं पावे ॥१३४॥
दाटूनि निश्चळ होणें । कां दांत चावूनि साहणे । ते ‘शांति’ ऐसें कोण म्हणे । आक्रोशपणे साहातु ॥१३५॥
‘शांति’ म्हणिजे ते ऐशी । सागरी अक्षोभ्यता जैसी । चढ वोहट नाही तिसी । सर्वदेशी सर्वदा ॥१३६॥
नाना सरितांचे खळाळ । आणूनि घालिती समळ जळ । तो तिळभरी नव्हे डहुळ । अति निर्मळ निजांगें ॥१३७॥
तैशी नानाभूतविषमता । स्वार्थविरोधे अंगी आदळतां । पालटू नव्हे ज्याच्या चित्ता । ते जाण सर्वथा ‘निजशांति’ ॥१३८॥
ऐसी शांति ज्यासी देखा । तोचि सर्वभूतांचा सखा । आवडता सर्व लोकां । ‘सुहृद’ तो कां सर्वांचा ॥१३९॥
नवल सख्यत्वाची परी । सर्वस्व दे निजमैत्रीं । स्वार्थी वंचनार्थ न करी । कृपापात्री उपदेशु ॥१४०॥
अतर्क्य त्याची पाहती दिठी । मद्रूपें देखे सकळ सृष्टी । जगासी मज अभिन्न गांठी । निजदृष्टी बांधली ॥१४१॥
मग तो जेउतें पाहे । तेउता मीचि तया आहे । तो जरी मातें न पाहे । तें न पाहणेही होये मीचि त्याचें ॥१४२॥
त्याची पाहती जे दिठी । ते मीचि होये जगजेठी । ऐशी तया मज एक गांठी । सकळ सृष्टीसमवेत ॥१४३॥
अवघे जगचि मी होये । तेव्हां ‘तो मी’ हे भाष जाये । ऐसा तो मजमाजीं समाये । समसाम्येसमत्वें ॥१४४॥
सांडोनियां मनोधर्म । ऐसा ज्यासी मी झालों सुगम । त्यासी पुढती कैंचें जन्म । दुःख दुर्गम ज्याचेनीं ॥१४५॥
मातेच्या उदरकुहरी । रजस्वलेच्या रुधिरामाझारी । पित्याचेनि रेतद्वारीं । गर्भसंचारी संसरण ॥१४६॥
जे मातेच्या उदरीं । जंतु नाकी तोंडी उरी शिरीं । विष्ठामूत्राचे दाथरी । नवमासवरी उकडिजे ॥१४७॥
जठराग्नीच्या तोंडीं । घालूनि गर्भाची उंडी । उकडउकडूनि पिंडीं । गर्भकांडी घडिजेति ॥१४८॥
ते गर्भीची वेदना । नानापरींची यातना । नको नको रघुनंदना । चिळसी मना येतसे ॥१४९॥
अवघ्यांच्या शेवटीं । प्रसूतिवातु जो आटी । सर्वांगी वेदना उठी । योनिसंकटी देहजन्म ॥१५०॥
ऐसें अपवित्र में जन्म । तें न पवतीच ते नरोत्तम । जीही ठाकिलें निजधाम । ते पुरुषोत्तम समसाम्ये ॥१५१॥
मी असतां पाठीपोटीं । त्यांसी काइशा जन्मगोठी । कळिकाळातें नाणिती दिठी । आले उठाउठी मद्रूपा ॥१५२॥
जेथ जन्म नाहीं जाहलें । तेथ मरण न लगतांचि गेलें । ऐसे भजोनि मातें पावले । भजनबळें मद्भक्त ॥१५३॥
कृष्ण उद्धवातें थापटी । म्हणे वेगें उठीं उठीं । हेचि हातवशी हातवटी । जन्मतुटी तेणें होय ॥१५४॥
जैसें मेघमुखींचें उदक । वरिच्यावरी झेलिती चातक । तैसें कृष्णवचनांसी देख । उद्धवें मुख पसरिलें ॥१५५॥
कां चंद्रकिरणी चकोर । जेवीं अत्यंत सादर । तेवीं उद्धवाचा आदर । दिसे थोर हरिवचनीं ॥१५६॥
हो कां पक्षिणी देखोनि पिलें । जाणोनि चाऱ्याचे वेळे । सांडोनियां आविसाळें । मुख कोवळे जेवीं पसरी ॥१५७॥
तेवीं देखोनि कृष्णमुख । उद्धवासी अत्यंत हरिख । श्रवणाचे मुखें देख । कृष्णपीयूख सेवित ॥१५८॥

११४३. शिळा
१. दगडाची मूर्ती
जया देव’ । तैसा फळे त्याचा भाव ॥१॥ होय जतन
२. (सात्त्विक श्रद्धेचे) रक्षण
तें गोड
३. चांगले, कल्याण
अंतराय
४. विघ्न
येती नाड
५. प्रतिबंध
॥ध्रु॥ देव जोडे भावें । इच्छेचे ते प्रेम घ्यावें ॥३॥ तुका म्हणे मोड
६. अंकुर
दावी । तैशी फळे आली व्हावीं ॥४॥
११४४. अंतरींचे गोड
१. जो मनापासून गोड-प्रसन्न राहतो / अंत:करणातील गोड-श्रीहरीचे रूप धारण करून राहतो. (त्याच्या...)
। राहे, आवडीचे कोड
२. इच्छा (पूर्ण होतील)
॥१॥ संघटणे
३. सहवासाने
येती अंगा । गुणदोष, मनभंगा
४. मन बिघडते
॥ध्रु॥ उचिताच्या कळा
५. कौशल्य
। नाहीं कळत सकळा ॥३॥ तुका म्हणे अभावना
६. अश्रद्धा, भावरहितता
भावी
७. श्रद्धा ठेवण्यास योग्य (देव, संत व वेद) यांचे ठिकाणी
, मूळ
८. कारण
तें पतना ॥४॥
११४५. कासया जी ऐसा माझे माथां ठेवा । भार
१. ओझे
तुम्ही देवा संतजन! ॥१॥ विचित्र विंदानी
२. कपटाने, छद्म
नानाकळा
३. वेगवेगळ्या चातुर्याने
खेळे । नाचवी पुतळे नारायण ॥ध्रु॥ काय वानरांचे अंगींची ते शक्ति । उदका तरती वरी शिळा ॥३॥ तुका म्हणे करी
४. निमित्तापुरते
निमित्यचि आड
५. पुढे करतो (कोणाला तरी)
चेष्टवूनि
६. क्रिया
जड दावी पुढें
७. नंतर/ वारंवार
॥४॥
११४६. पायां पडावें हें माझें भांडवल । सरती
१. मान्य
हे बोल
२. शब्द
कोठें पायीं? ॥१॥ तरि हे सलगी
३. लडिवाळपणा
कवतुक केलें । लडिवाळ
४. लाडके
धाकुलें
५. धाकटे, तान्हे
असें बाळ ॥ध्रु॥ काय उणें तुम्हां संतांचिये घरी? । विदित
६. ज्ञात, माहीत
या परी सकळही ॥३॥ तुका म्हणे माझी उचित हे सेवा । नये करूं ठेवांठेवी
७. वाटाघाटी, प्रयत्न, खटाटोप
कांहीं ॥४॥
११४७. वदवावी वाणी माझी कृपावंता! । वागपुष्पें
१. स्तुती सुमने
संतां समर्पीशीं
२. अर्पण होतील अशी
॥१॥ सर्व संकटांचा तुम्हा परिहार
३. नाहीसे करावा, निराकरण करावे
। घालावा म्यां भार
४. ओझे
पांडुरंगा! ॥ध्रु॥ एकसरें
५. एकदम
चित्त ठेवूनियां पायीं । झालों उतराई
६. उत्तीर्ण
होतो तेणें ॥३॥ तुका म्हणे येथे झालें अवसान
७. समाप्ती (कर्तव्याची)
। काया वाचा मन वेंचोनियां
८. विनियोग करून
॥४॥
११४८. नमावे पाय हें माझें उचित
१. योग्य (कर्तव्य)
। आशीर्वादें हित
२. कल्याण
तुमचिया ॥१॥ कृपेचा वोरस
३. प्रेमभरित, आनंद, प्रेम
न समाये पोटीं
४. मनात
। म्हणोनि उफराटी वचनें ही
५. माझे हे प्रस्तुत बोलणे कसे आहे म्हणाल तर, पोटात आनंद न मावल्यामुळे तो आनंदच जणू बोलण्याच्या रूपाने उलटल्यासारखा झाला आहे, किंवा माझे कृतार्थ झाल्याबद्दलचे बोलणे तुमची स्तुती दर्शवीत नसून उलटी माझी स्तुती दर्शवीत आहे, अथवा मी तुमची स्तुती करण्याऐवजी तुम्हीच उलटी माझी स्तुती करीत आहात.
॥ध्रु॥ तुमची उष्टावळी ते माझें भोजन । झाडावें अंगण केरपुंजे
६. केरांचे ढीग
॥३॥ परि ऐसें पुण्य नाहीं माझे गांठीं । जेणें पडे मिठी पायांसवें ॥४॥ तुका म्हणे राहे आठवण चित्तीं । ऐसी कृपा संतीं केली तुम्हीं ॥५॥
११४९. काय नाहीं माता गौरवीत बाळा? । काय नाहीं लळा
१. लाड, हट्ट
पाळीत ते? ॥१॥ काय नाहीं त्याची करीत ते सेवा? । काय नाहीं जीवा गोमटें
२. चांगले
तें? ॥२॥ अमंगळपणे
३. घाणेरडे, कुरूप
कंटाळा न धरी । उचलोनि करी
४. हाताने
कंठी लावी
५. (वा.) गळ्याला लावते, पोटाळते
॥३॥ लेववीं आपुले अंगें
६. स्वतः
अळंकार । संतोषावें फार देखोनियां ॥४॥ तुका म्हणे स्तुति योग्य नाहीं परी । तुम्हां लाज थोरी अंकिताची
७. सेवकाची
॥५॥
११५०. माझिया मीपणावरी पडो
१. (वा.) नष्ट होवो, त्याग होवो
पाषाण। जळो
२. आग लागो, नाश-बाध होवो
हे भूषण नाम माझें । पापा नाहीं पार
३. अंत, सीमा, पारावार
दु:खाचे डोंगर । झालों ये भूमिसी ओझें ॥१॥ काय विटंबना
४. फजिती
सांगों किती । पाषाण फुटती ऐसें दु:ख । नर नारी सकळ उत्तम चांडाळ । न पाहाती डोळां माझें मुख ॥ध्रु॥ काया वाचा मनें अघटित
५. असंभाव्य, करू नये ते
करणे । चर्म चक्षु हात पाय । निंदा द्वेष घात विश्वासीं
६. (विश्वासयोग्य गुरू-मित्रांचा) विश्वासघात केला
, व्यभिचार
७. परस्त्रीगमन
। आणीक सांगों किती काय? ॥३॥ लक्ष्मीमदें
८. संपत्तीच्या मदाने
मातें
९. माझ्याकडून
घडले महादोष । पत्नी दोनी भेदाभेद१०
१०. (आवडती- नावडती असा) भेद
। पितृवचनीं घडली अवज्ञा अविचार । कुटिळ११
११. कपटी, दुष्ट
कुचरवादी१२
१२. कामचुकार व भांडखोर
निंद्य१३
१३. निंदेस पात्र
॥४॥ आणीक किती सांगों तें अवगुण । न वळे जिव्हा कांपे मन१४
१४. (वा.) दुःख होते, भीती वाटते
। भूतदया उपकार नाहीं शब्दा धीर । विषयीं लंपट१५
१५. विषयासक्त, आतुर
शब्दहीन१६
१६. शब्द न पाळणे, वचन भंग करणे
॥५॥ संत महानुभाव ऐका हे उत्तर । अवगुण अविचार वृद्धि पापा । तुका म्हणे सरतें१७
१७. मान्य
करा पांडुरंगीं । शरण आलों मायबापा! ॥६॥
११५१. फिरविली
१. अदलाबदल
दोनी । कन्या
२. योगमायारूप
आणि चक्रपाणि
३. भगवान श्रीकृष्ण
॥१॥ झाला आनंदी आनंद
४. जिकडे तिकडे सर्वत्र आनंद होणे
। अवतरले गोविंद ॥ध्रु॥ तुटली बंधनें
५. बेड्या
। वसुदेवदेवकीची दर्शनें
६. (श्रीहरिचे) दर्शन होताच
॥३॥ गोकुळासी आलें । ब्रह्म अव्यक्त चांगलें ॥४॥ नंद दसवंती
७. यशोदा
। धन्य देखिले श्रीपती ॥५॥ निशी जन्मकाळ । आले अष्टमी गोपाळ ॥६॥ आनंदली मही
८. पृथ्वी
भार
९. दैत्यांचा समुदाय
गेला सकळही ॥७॥ तुका म्हणे कंसा । आठ१०
१०. नेमका आठवा पुत्र कोण/उपद्रव, पीडा
भोंविला११
११. गरगर फिरू लागला
वळसा१२
१२. भोवऱ्यात
॥८॥
११५२. सोडियेल्या गांठी
१. ग्रंथिभेद; आत्मा व अनात्मा यांच्या अन्योन्याध्यासाची निवृत्ती
। दरुषणे कृष्णभेटी ॥१॥ करिती नारी अक्षयवाणे
२. औक्षण, ओवाळणी
जीवभाव
३. जीवत्व
देती दानें ॥ध्रु॥ उपजल्या काळे । रूपें मोहिल्या सकळे ॥३॥ तुका तेथें वारी । एकी आडोनी दुसरी
४. तु. म. म्ह. श्रीकृष्णाचा जन्मोत्सव झाला, तेव्हा श्रीकृष्णाच्या दर्शनाकरिता नंदाच्या घरी गोपस्त्रियांची इतकी गर्दी झाली की, एकीला मागे सारून दुसरी पुढे जात होती; म्हणून मी त्या वेळी दारावर उभा राहून, एकीचे दर्शन होईपर्यंत दुसरीला आत जाऊ द्यावयाचे नाही, तिला तेथेच अडवून ठेवावयाचे, अशी व्यवस्था करीत होतो.
॥४॥
११५३. मुख डोळां पाहे । तैशीच ते उभी राहे ॥१॥ केल्याविण नव्हे
१. पलीकडे होत नसत
हातीं-। धरोनि आरती
२. अलीकडे
परती
३. पलीकडे होत नसत
॥ध्रु॥ न धरिती मनीं । कांहीं संकोच
४. लाज
दाटणी
५. गर्दीतही
॥३॥ तुका म्हणे देवें । ओस केल्या देहभावें ॥४॥
११५४. गोकुळींच्या सुखा । अंतपार
१. सीमा, शेवट
नाहीं लेखा
२. गणती, गणना
॥१॥ बाळकृष्ण नंदाघरीं । आनंदल्या नरनारी ॥ध्रु॥ गुढिया
३. आनंद प्रदर्शनार्थ उभारलेले निशान-ध्वजा
तोरणें
४. प्रवेश दारावर बांधण्याची माला इ. मंगल चिह्ने
। करिती कथा गाती गाणें ॥३॥ तुका म्हणे छंदें
५. आवड, नाद
। येणें वेधिली
६. आकृष्ट केले
गोविंदें ॥४॥
११५५. विटंबिला
१. फजिती केली
भट
२. महाबळभट नावाचा ब्राह्मण
। दिला पाठीवरी पाट
३. बसावयाचा लाकडी पाट
॥१॥ खोटें
४. कपटी
जाणोनि अंतर
५. मन
। न साहेचि विश्वंभर ॥ध्रु॥ तेंचि करी दान । जैसें आइके वचन ॥३॥ तुका म्हणे देवें । पूतना शोषियेली जीवें
६. प्राणासकट पिऊन टाकली
॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

1 thought on “दिवस – ७२. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top