दिवस – ७३. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः ।
कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन ॥४६॥
जया
१. (कर्मिभ्यश्चाधिको योगी)
लाभाचिया आशा । करूनि धैर्यबाहूंचा भरंवसा । घालीत षट्कर्माचा
२. यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान व प्रतिग्रह हीं षट्कर्में.
धारसां
३. प्रवाहांत.
। कर्मनिष्ठ ॥४७४॥
कां
१. (ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः)
, जिये एक वस्तूलागीं । बाणोनि
२. घालून.
ज्ञानाची वज्रांगी
३. दृढ कवच.
। झुंजत प्रपंचेशीं समरंगीं
४. युद्धभूमींत.
। ज्ञानिये गा ॥४७५॥
अथवा
१. (तपस्विभ्योऽधिको योगी)
निलागें
२. निराधार.
निसरडा । तपोदुर्गाचा
३. तपोरूप किल्ल्याचा.
आडकडा
४. अर्धा तुटलेला कडा.
। झोंबती तपिये, चाडा
५. इच्छेनें.
। जयाचिया ॥४७६॥
जें भजतियां भज्य
१. भजन करण्यास योग्य.
। याज्ञिकांचें याज्य
२. यजन करण्यास योग्य.
। एवं जें पूज्य । सकळां सदा ॥४७७॥
तेंचि तो आपण । स्वयें जाहला निर्वाण
१. शेवट, परब्रह्म.
। जें साधकांचें कारण । सिद्ध तत्त्व ॥४७८॥
म्हणौनि, कर्मनिष्ठा वंद्यु । तो ज्ञानियांसि वेद्यु
१. जाणण्यास योग्य.
। तापसांचा आद्यु
२. मूळ.
। तपोनाथु ॥४७९॥
पैं, जीव-परमात्म-संगमा । जयाचें येणें जाहलें मनोधर्मा । तो शरीरीचि; परी महिमा । ऐशी पावे ॥४८०॥
म्हणौनि
१. (तस्माद्योगी भवाऽर्जुन)
याकारणें । तूतें मी सदा म्हणे । योगी होईं अंतःकरणें । पंडुकुमरा ॥४८१॥
योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना ।
श्रद्धावान्भजते यो मां स मे युक्ततमो मतः ॥४७॥
अगा
१. (योगिनामपीति)
योगी जो म्हणिजे । तो देवांचा देवो जाणिजे । आणि सुख सर्वस्व माझें । चैतन्य
२. जीव, आत्मा.
तो ॥४८२॥
तेथ
१. (श्रद्धावान्भजते यो मां)
भजता भजन भजावें
२. भजन करणारा, भजन करणें व भजन करण्याचा देव, ही त्रिपुटी.
। हें भक्तिसाधन जें आघवें । ते मीचि जाहलो अनुभवें । अखंडित ॥४८३॥
मग
१. (स मे युक्ततमो मतः)
तयां आम्हां प्रीतीचें । स्वरूप बोलीं निर्वचे
२. सांगतां येते असें नाहीं.
– । ऐसें नव्हे गा, तो साचें । सुभद्रापती ॥४८४॥
तया एकवटलिया प्रेमा । जरी पाडें
१. बरोबरानें.
पाहिजे उपमा । तरी, मी देह; तो आत्मा । हेंचि होय ॥४८५॥
ऐसें भक्तचकोरचंद्रे । त्रिभुवनैकनरेंद्रं । बोलिलें गुणसमुद्रं । संजयो म्हणे ॥४८६॥
तेथ #आदिलापासूनि
१. समजून चुकलें.
पार्था । ऐकिजे, ऐसीची आस्था । दुणावली
२. सहज, सर्वथा.
हैं, यदुनाथा । *भावों सरलें
३. सहज, सर्वथा.
॥४८७॥
कीं, सावियाचि मनीं संतोषला । जे, बोला आरिसा जोडला । तेणें हरिखें
१. हर्षानें.
आतां उपलवला
२. आनंदाचे भरांत विस्तारानें सांगेल.
निरूपील
३. मोकळा करील.
॥४८८॥
तो प्रसंगु आहे पुढां । जेथ शांतु
१. शांतिरस.
दिसेल उघडा । तो पालविजेल मुडा
२. तांदूळ इत्यादीक भरून केलेला पेंढ्याचा गठ्ठा.
प्रमेयबीजाचा
३. सारभूत, सिद्धांताचा, ज्ञानरूपी बीजाचा.
॥४८९॥
जें, सात्त्विकाचेनि वडपें
१. वृष्टीनें.
। गेलें आध्यात्मिक
२. मानसिक ताप (रूपी)
खरपें
३. मातीचें ढेंकूळ, रुक्षपण, निरसपण.
। सहजें निडारलें
४. तयार झाले, भरून आले, परिपक्व झाले.
वाफे । चतुरचित्ताचे ॥४९०॥
वरी अवधानाचा वाफसा
१. पेरण्याजोगी उब, पेरण्यास योग्य काल.
। लाधला सोनयाऐसा । म्हणौनि, पेरावया धिंवसां
२. धैर्य.
। श्रीनिवृत्तीसी ॥४९१॥
ज्ञानदेव म्हणे ‘मी चाडें
१. पेरणीच्या कुरीवरचे भोकांचें लाकूड.
। सद्गुरूंनीं केलें कोडें
२. कौतुकानें.
। माथां हात ठेविला, तें फुडें । बीजचि
३. पेरण्याकरितां निराळे ठेवलेले धान्य, बी.
वाइलें
४. घातलें.
॥४९२॥
म्हणौनि, येणें मुखें जें जें निगे । तें संतांच्या हृदयीं साचचि लागे’ । “हें असो सांगों श्रीरंगें । बोलिलें जें” ॥४९३॥
परी ते मनाच्या कानीं ऐकावें । बोल बुद्धिच्या डोळां देखांवें
१. ऐकलेले बोल बुद्धीच्या डोळ्यांनी पाहावें. 'बुद्धिग्राह्यमतींद्रियम्'
। हे सांटोवाटी
२. अदलाबदलीनें-चित्त देऊन त्याच्या मोबदल्यात बोल घ्यावे.
घ्यावें । चित्ताचिया ॥४९४॥
अवधानाचेनि
१. चित्ताच्या, लक्षपूर्वक श्रवणाच्या.
हातें । #नेयावें
२. न्यावें.
हृदयाआंतौतें
३. आंत.
। हें रिझवितील
४. रमवील.
आयणीतें
५. चौकस बुद्धीला, इच्छेला, आवडीला.
। सज्जनांचिये ॥४९५॥
हे स्वहिताते निवविती
१. निववितील.
परिणामातें
२. मोक्ष फलाला.
जीवविती । सुखाची वाहविती लाखोली
३. लाखोली वाहवितील (पूर्ण सुखरूप करतील).
जीवां ॥४९६॥
आतां अर्जुनेसीं श्रीमुकुंदें । नागर
१. सर्वोत्कृष्ट, सप्रेम, सुंदर.
बोलिजेल विनोदें । तें वोंवियेचेनि प्रबंधें । सांगेन मी ॥४९७॥

विषयत्यागाची दुष्करता (१५९ ते १७२)
श्रीशुक उवाच- इत्यादिष्टो भगवता महाभागवतो नृप । उद्धवः प्रणिपत्याह तत्त्वजिज्ञासुरच्युतम् ॥१३॥
श्रीशुकाचार्य म्हणाले- हे राजा, याप्रमाणे भगवंताने उपदेश केल्यानंतर वैष्णवाग्रणी उद्धवाने साष्टांग नमस्कार घातला. पुढे मूळ स्वरूपच जाणण्याच्या इच्छेने तो श्रीकृष्णाला म्हणाला ॥१३॥
शुक म्हणे कौरवनाथा । कृपा उपजली भगवंता । उपदेशिलें महाभागवता । ज्ञानकथा निजबोधु ॥१५९॥
तें ऐकोनि उद्धव । श्रवणीं थोर उठी हांव । कैसें बोलिला ज्ञानगौरव । अतिअपूर्व श्रीकृष्ण ॥१६०॥
श्रीकृष्ण श्रीमुखें सांगे कोड । तें निरूपण अतिगोड । जीवीं उठली श्रवणचाड । नुल्लंघी भीड देवाची ॥१६१॥
आवडी कळवळे चित्त । घाली साष्टांग दंडवत । हात जोडोनि पुसत । प्रेमळ भक्त उद्धव ॥१६२॥
उद्धव उवाच- योगेश योगविन्यास, योगात्मन्योगसम्भव । निःश्रेयसाय मे प्रोक्तस्त्यागः संन्यासलक्षणः ॥१४॥
उद्धव म्हणाला- हे योगेश्वरा, तू योगाच्या रहस्याचा निधी आहेस, तू योगरूप असून योगाची उत्पत्ती तुझ्यापासून झालेली आहे, तू माझ्या कल्याणाकरिता संन्यास हे ज्याचे लक्षण आहे असा त्याग सांगितलास. ॥१४॥
ऐकें योगियांच्या योगपती । योग्यांचा ठेवा तूं श्रीपती । योगी प्रगट तूं योगमूर्ती । योग उत्पत्ती तुजपासीं ॥१६३॥
मज मोक्षासी कारण । त्यागु संन्यासलक्षण । बोलिलासी तो अतिकठिण । परम दारुण हा त्यागु ॥१६४॥
त्यागोऽयं दुष्करो भूमन्, कामानां विषयात्मभिः । सुतरां त्वयि सर्वात्मन्नभक्तैरिति मे मतिः ॥१५॥
परंतु हे विश्वव्यापका, विषयवासनांनी ज्यांची अंत:करणे घेरली आहेत अशांना, कामनांचा त्याग मोठा कठीण आहे. सर्वांतर्यामी नियामकत्वाने असणाऱ्या हे प्रभो, तुझ्या ठिकाणी ज्यांची भक्ती नाही अशा माणसांना तर तो अधिकच कठीण आहे असे मला वाटते. ॥१५॥
पाहतां या त्यागाची रीती । मज तंव दुर्धरु गा श्रीपती । मग इतरांची येथ गती । कवण्या स्थिती होईल ॥१६५॥
कामु जयाच्या चित्तीं । विषयीं आसक्त मती । त्यासी या त्यागाची गती । नव्हे श्रीपति सर्वथा ॥१६६॥
तुझी कृपा जंव नव्हे । तंव तो अभक्तां केवीं करवे । त्यागु बोलिला जो देवें । तो सर्वांसी नव्हे सर्वथा ॥१६७॥
तूं सर्वात्मा असतां हृदयीं । चित्त प्रवेशेना तुझे ठायीं । तें आवरिलें असे विषयीं । नवल कायी सांगावें ॥१६८॥
ऐसे प्रपंची आसक्त । यालागी विमुख झाले अभक्त । त्यांसी त्यागु नव्हे हा निश्चित । चित्त दुश्चित सर्वदा ॥१६९॥
त्यागु कां नव्हे म्हणसी । तें परिस गा हृषीकेशी । कठिणत्व जें त्यागासी । तें तुजपाशीं सांगेन ॥१७०॥
सोऽहं ममाहमिति मूढमतिर्विगाढस्त्वन्मायया विरचितात्मनि सानुबन्धे । तत्त्वञ्जसा निगदितं भवता यथाऽहं, संसाधयामि भगवन्ननुशाधि भृत्यम् ॥१६॥
तो मी तुझ्या मायेने निर्मित असलेल्या माझ्या शरीराचे ठिकाणी ‘मी’, ‘माझे’ अशा मूर्खपणाच्या बुद्धीने मोहात बुडून गेलो आहे ; म्हणून हे भगवंता, तू जे आता तत्त्वरहस्य उपदेशिलेस ते मी सहज प्राप्त करून घेईन, असा मला सेवकाला बोध कर. ॥१६॥
तुझी माया विचित्र उपाधी । शरीरी केली आत्मबुद्धी । आत्मीयें शरीरसंबंधीं । विपरीत सिद्धी वाढली ॥१७१॥
‘मी माझें’ वाढलें गाढ । तेणें मति झाली मूढ । गृहासक्ति लागली दृढ । त्यागु अवघड यालागीं ॥१७२॥
विषयत्यागाचा परमार्थाचा उपाय सांगण्यास उद्धवाची श्रीकृष्णास विनंती (१७३ ते २०५)
ऐशी ही बुद्धि विवळे । अप्रयासें तत्त्व आकळे । तैशी कृपा कीजे राउळें । दास गोपाळें तारावया ॥१७३॥
ऐकें गा पुरुषोत्तमा । निजदासां आपुल्या आम्हां । सोडवीं गा संसारश्रमा । आत्मयारामा श्रीकृष्णा ॥१७४॥
तुज सांडोनि हृषीकेशी । पुसों जावे आणिकांपासीं । तें नये माझिया मनासी । विषयी सर्वांसी व्यापिलें ॥१७५॥
सत्यस्य ते स्वदृश आत्मन आत्मनोऽन्यं, वक्तारमीश विबुधेष्वपि नानुचक्षे । सर्वे विमोहितधियस्तव माययेमे, ब्रह्मादयस्तनुभृतो बहिरर्थभावाः ॥१७॥
सर्व ज्ञानादिगुणांनी युक्त, स्वयंप्रकाशी, असा तुझ्यासारखा, आत्मस्वरूपाचे व्याख्यान करणारा, देवादिकांमध्येही मला दिसत नाही; कारण ब्रह्मादिक सर्व देवसुद्धा देह धारण केल्यामुळे देहाभिमानी असून तुझ्या मायेने त्यांच्या बुद्धीला मोह पडलेला आहे व त्यामुळे ते बहिर्मुख आहेत. ॥१७॥
पुसों जावें ब्रह्मयासी । तो गुंतला सृष्टिकर्मासी । प्रजाउत्पत्ति मानसीं । अहर्निशीं चिंतितु ॥१७६॥
जो आपुल्या निजस्वभावीं । सदा संसारु वाढवी । तो केवीं संसारु तोडवी । केलें न बुडवी सर्वथा ॥१७७॥
वाढों नेदी संसारासी । कोपु आला प्रजापतीसी । शापु दिधला नारदासी । ब्रह्म उपदेशी म्हणौनी ॥१७८॥
ऐसे संसारी आसक्त । नित्य संसारयुक्त । त्यांसी पुसों न मनी चित्त । जाण निश्चित श्रीकृष्णा ॥१७९॥
पुसों जावें ऋषींप्रती । तंव ते सदा आपमती । आपुलें मत प्रतिष्ठिती । अन्यथा देती शापातें ॥१८०॥
जीवीं धरोनि अर्थासक्ती । शिष्यांतें उपदेशिती । विषयो धरोनियां चित्तीं । जीविकावृत्ती उपदेशु ॥१८१॥
गुरूसीच विषयासक्ती । तेथ शिष्यासी कैंची विरक्ती । ऐशियासी जे पुसती । ते भ्रंशती स्वार्थातें ॥१८२॥
सत्यस्वरूप स्वप्रकाश । आत्मा तूं अविनाश । युक्तिप्रयुक्ती उपदेश । विकल्पनिरास जाणसी ॥१८३॥
ब्रह्मज्ञानाचा वक्ता । तुजवेगळा श्रीकृष्णनाथा । न दिसे गा सर्वथा । मज पाहतां त्रिलोकीं ॥ १८४॥
एवं आत्मा तूं तत्त्वतां । तूंचि आत्मज्ञानदाता । आत्मबोधी संस्थापिता । कृष्णनाथ तूं एकु ॥१८५॥
तस्माद्भवन्तमनवद्यमनन्तपारं, सर्वज्ञमीश्वरमकुण्ठविकुण्ठधिष्ण्यम् । निर्विण्णधीरहमु ह वृजिनाभितप्तो, नारायणं नरसखं शरणं प्रपद्ये ॥१८॥
म्हणून हे देवा, तू सर्वपूज्य, परमपवित्र, अंत व पार नसलेला, सर्व जाणणारा, सर्वप्रभू, अखंड व अपरिच्छिन्न अशा वैकुंठस्थानात सर्वदा वास करणारा आहेस व मी त्रिविधतापरूपी संकटांनी होरपळून निघाल्याने उदास झालेला असून हे नारायणा, नरश्रेष्ठा, तुला शरण आलेला आहे. (मला उपदेश कर हा हेतू.) ॥१८॥
यालागी जी यादवपती । नित्य शुद्ध पवित्र मूर्ती । तुज मायामोहो नातळती । पवित्र ख्याती यालागीं ॥१८६॥
गोंवळांचे उच्छिष्टकवळें । ज्याची पवित्रता न मैळे । तेणेंचि उच्छिष्टबळें । गोंवळे सकळें तारिलीं ॥१८७॥
प्राणे शोषिलें पूतनेसी । तरी पवित्रता अधिक कैशी । तेणेंचि उद्धरिलें तिसी । दोषें दोषांसी तारकु ॥१८८॥
करूनि कालीयमर्दन । मर्दिला त्याचा अभिमान । तरी मैळेना पवित्रपण । निर्विषे जाण तारिला ॥१८९॥
रजक अपवित्र अत्यंत । आतळे तया अधःपात । त्यासी मारूनियां निश्चित । केला पुनीत सायुज्या ॥१९०॥
करूनि गोपिकांसी निंद्य काम । तेणें त्या केल्या नित्य निष्काम । तेचि पवित्रता अनुत्तम । सायुज्यधाम पावल्या ॥१९१॥
करितां सुकर्म कुकर्म । ज्याची पवित्रता अनुत्तम । यालागी नामें ‘पुरुषोत्तम’ । अकर्तात्मनिजबोधे ॥१९२॥
जो आकळे गुणांआंतु । त्यासी ते गुण करिती प्रांतु । त्या गुणांसी तुजमाजी अंतु । यालागीं तूं ‘अनंतु’ सर्वथा ॥१९३॥
देशतः कालतः पार । तुज न करवेचि साचार । यालागीं अनंत तूं अपार । श्रुतींसी पार न कळेचि ॥१९४॥
तुज म्यां करावी विनंती । किती यावें काकुळती । तूं हृदयस्थ ज्ञानमूर्ती । जाणता त्रिजगतीं तूं एकु ॥१९५॥
ज्ञान अज्ञान मायाशक्ती । ईश्वराआधीन गा असती । त्या ईश्वराची तूं ईश्वरमूर्ती । सत्यकीर्ति तूं श्रीकृष्णा ॥१९६॥
तूं सर्वांचा नियंता । सर्व करूनि अकर्ता । ऐसा ‘ईश्वर’ तूं कृष्णनाथा । भोगूनि अभोक्ता तूं एकु ॥१९७॥
देशतः कालतः स्वभावेंसीं । नाशु न पावे ज्या स्थानासी । तेथींचा तूं निवासवासी । पूर्ण पूर्णांशी अवतारु ॥१९८॥
नराचे अविनाशस्थान । यालागी तूं ‘नारायण’ । तुझेनि जीवासी चळणवळण । चाळकपण तुजपाशीं ॥१९९॥
ऐसा ईश्वर तूं आपण । ‘नरसखा-नारायण’ । युद्धसमयीं अर्जुनासी जाण । ब्रह्मज्ञान त्वां दिधलें ॥२००॥
दारुण होतां संग्रामासी । पावडा पावो युद्धासी । तेव्हां ब्रह्मज्ञान सांगसी । निज सख्यासी अर्जुना ॥२०१॥
ऐसा कृपाळू तूं नारायण । यालागीं तुज आलो शरण । त्रिविधतापें तापलों जाण । दुःख दारुण संसारु ॥२०२॥
संसार म्हणजे अंधकूप । माजी कामक्रोधादि दुष्ट सर्प । निंदा स्पर्धा कांटे अमूप । दुःखरूप मी पडिलों ॥२०३॥
तेथ पडलियापाठीं । ब्रह्मद्वेषाचा शूळ पोटीं । भरला जी उठाउठी । तेणें हिंपुटी होतुसें ॥२०४॥
तेथून निघावया त्रिशुद्धी । उपावो न दिसे गा निजबुद्धी । कृपाळुवा कृपानिधी । आत्मबोधी मज काढीं ॥२०५॥

११५६. प्रेम देवाचे देणें । देहभाव
१. देहबुद्धी, देहतादात्म्य
जाय जेणें । न धरावी मनें । शुद्धि
२. आठवण; भान; ठावठिकाणा
देशकाळाची ॥१॥ मुक्त लज्जाविरहित । भाग्यवंत हरिभक्त । झाले वोसंडत
३. भरून वाहणे (आनंद)
। नामकीर्ति पवाडे
४. स्तुती, वर्णन
॥ध्रु॥ जोडी
५. लाभ
झाली अविनाश । जन्मोनि झाले हरीचे दास । त्यांस नव्हे गर्भवास । परब्रह्मीं सौरस
६. गोडी, प्रेम
॥३॥ हेचि वाहाती संकल्प
७. मनात निश्चय करतात, बाळगतात
। पुण्यप्रसंगाचे जप । तुका म्हणे पाप । गांवीं नाहीं
८. खिजगणतीत नसणे, ठाऊक नसणे, पत्ताच नसणे
हरिजना ॥४॥
११५७. तोचि लटिक्यामाजी भला
१. लबाडांमध्ये उत्तम-शिरोमणी अर्थात् अत्यंत लबाड
। म्हणे ‘देव म्यां देखीला’ ॥१॥ ऐशियाच्या उपदेशें । भवबंधन कैसें नासे? । बुडवी आपणासरिसे । अभिमाने आणिकांस ॥ध्रु॥ आणीक नाहीं जोडा
२. उपमा; बरोबरी
। ‘देव’ म्हणवी तया मूढा
३. मूर्खाला
॥३॥ आणिकाचें न मनी
४. मानीत नाहीत
साचें । तुका म्हणे या श्रेष्ठांचें
५. संतांचे
॥४॥
११५८. होईल झाला अंगें
१. स्वतः
देव जो आपण । तयासी ‘हे जन अवघे देव’ ॥१॥ येरांनी सांगावी रेमट
२. व्यर्थ, लांबलचक कंटाळवाणे
काहाणी । चित्ता रंजवणी
३. करमणूक
करावया ॥ध्रु॥ धाला
४. तृप्त झाला
आणिकांची नेणे तहानभूक । सुखें पाहे सुख आपुलिया
५. आत्मसुखाने
॥३॥ तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव । शब्दांचे गौरव
६. मोठेपणा, अवडंबर, बडेजाव
कामा नये
७. उपयोगी येत नाही
॥४॥
११५۹. कां नवजावें
१. (उठून) का जाऊ नये?
बैसोनि कथे । ऐसें ऐका हो श्रोते । पांडुरंग तेथें । उभा असे तिष्ठत ॥१॥ म्हणऊनि करी धीर । लक्ष लावूनि सादर
२. श्रद्धापूर्वक
। भवसिंधुपार । असेल ज्या तरणें ॥ध्रु॥ कथे कांहीं अणुमात्र
३. अगदी थोडे देखील
। न बोलावा हा वृत्तांत
४. इतर गोष्टी
। देवभक्तां चित्त । समरसी
५. तल्लीनतेत, ऐक्यात
खंडणा ॥३॥ कां वैष्णव पुजावे? । ऐका घेईल जो भावें । चरणरजा
६. पायधुळीकरिता
शिवें
७. भगवान शंकराने
वोढविला
८. पुढे केले; (पा.भे. वोढविलें)
मस्तक ॥४॥ ऐसें जाणा हो निभ्रांत
९. निश्चयाने, निःसंशय
। देव वैष्णवांचा अंकित१०
१०. आज्ञाधारक, अधीन
अलिप्त११
११. असंग, तटस्थ
अतीत१२
१२. (देशकालादीने) अतिक्रांत असलेला
परमित१३
१३. मर्यादित, परिमित, परिच्छिन्न असा सगुण साकार होतो.
त्यासाठीं ॥५॥ घालोनि लोळणी । तुका आला लोटांगणीं । वंदी पायवणी१४
१४. चरणतीर्थ
। संत-चरणींचे माथां१५
१५. मस्तकाने
॥६॥
११६०. अनुभवें आलें अंगा
१. स्वत:ला
। तें या जगा देतसे ॥१॥ नव्हती हाततुके
२. तळहातावर घेऊन अंदाजाने वजन करण्यासारखे (पोकळ, व्यर्थ)
बोल
३. शब्द
। मूळ ओल
४. जिव्हाळा, प्रेमभाव
अंतरिंची ॥ध्रु॥ उतरूनि दिले कसी
५. (वा.) कसोटीला उतरून
। शुद्धरसीं सरतें
६. मान्य, श्रेष्ठ, पूर्ण
॥३॥ तुका म्हणे दुसरें
७. (माझ्या बोलण्यात सिद्धांतावाचून) अन्य
नाहीं । ऐसी ग्वाही
८. साक्ष
गुजरली
९. सांगितले, जाहीर केले
॥४॥
११६१. साधकाची दशा
१. स्थिती, अवस्था
उदास
२. अनासक्त
असावी । उपाधि नसावी अंतर्बाही ॥१॥ लोलुप्यता काय
३. हाव, आसक्ती, लोभ हे काय पदार्थ आहे (हे माहीतही नसावे)
निद्रेते जिणावें
४. जिंकावे
। भोजन करावें परिमित
५. मर्यादित, सीमित
॥ध्रु॥ एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण । प्राण गेल्या जाण बोलों नये ॥३॥ तुका म्हणे ऐशा साधनी जो राहे । तोचि ज्ञान लाहे
६. प्राप्त होणे
गुरुकृपा ॥४॥
११६२. अंतरींची
१. अंतःकरणातील
ज्योती
२. सामान्य आत्मप्रकाश
प्रकाशली दीप्ती
३. विशेष प्रकाश (अहं ब्रह्मास्मि इत्याकारक वृत्त्यारुढ चैतन्य)
। मुळींची जे होती आच्छादिली
४. (अविद्येने) आवृत्त होती
॥१॥ तेथींचा आनंद ब्रह्मांडी न समाये । उपमेशी काय देऊ सुखा ॥ध्रु॥ भावाचें
५. भक्तिरूपी रवीने
मथिले
६. घुसळण केले
निर्गुण संचलें
७. व्यापून (भरून) राहिलेले
। तें हें उभे केलें विटेवरी ॥३॥ तुका म्हणे आम्हां ब्रह्मांड पंढरी । प्रेमाची जे थोरी सांठवण ॥४॥
११६३. कासया गा मज घातलें संसारीं । चित्त पायांवरी नाहीं तुझ्या ॥१॥ कासया गा मज घातलें या जन्मा । नाहीं तुझा प्रेमा नित्य नवा ॥ध्रु॥ नामाविण माझी वाचा अमंगळ । ऐसा कां चांडाळ निर्मियेलों? ॥३॥ तुका म्हणे माझी जळो जळो
१. तिरस्काराने काढलेले उद्गार
काया
२. शरीर
। विठ्ठल सखया वांचूनियां ॥४॥
११६४. प्रारब्धेचि जोडें
१. प्राप्त होणे
धन । प्रारब्धेचि वाढे मान ॥१॥ सोस
२. हव्यास
करिसी वायां
३. व्यर्थ
भजे
४. सेवा कर, भक्ती कर
मना पंढरीराया ॥ध्रु॥ प्रारब्धेचि होय सुख । प्रारब्धेचि पावे दु:ख ॥३॥ प्रारब्धेचि भरे पोट । तुका करीना बोभाट
५. आरडाओरड, आक्रोश करीत नाही
॥४॥
११६५. हीन
१. कनिष्ठ
माझी याति । वरि
२. आणखी, त्यावर
स्तुति केली संतीं ॥१॥ अंगीं वसूं पाहे गर्व
३. अहंकार
। माझें हरावया सर्व ॥ध्रु॥ ‘मी एक जाणता’ । ऐसें वाटतसे चित्ता ॥३॥ राख
४. रक्षण कर
राख गेलों वायां । तुका म्हणे पंढरीराया! ॥४॥
११६६. माता कापी गळा । तेथे कोण राखी बाळा? ॥१॥ हे कां नेणां नारायणा! । मज चाळवितां
१. फसविता, नादी लावता, आशेला लावता
दीना ॥ध्रु॥ नागवी
२. लुटले, लुबाडले, फसविले
धांवणें
३. रक्षणासाठी धावून येणाऱ्याने
। तेथें साह्य व्हावें कोणें? ॥३॥ राजा सर्व हरी
४. हरण केले
। तेथें दुजा कोण वारी
५. निवारण करील? (पा.भे. तारी)
? ॥४॥ तुझ्या केल्याविण । स्थिर वश
६. स्वाधीन
नव्हे मन ॥५॥ तुका म्हणे हरी! । सूत्र तुझ्या हाती दोरी ॥६॥
११६७. गाऊं नेणें परि मी काही गाईन । शरण जाईन पांडुरंगा ॥१॥ ब्रह्मांडनायक मी त्याचा अंकित । काय यमदूत करिती काळ? ॥ध्रु॥ वेश्या ज्याच्या नामें तारिली गणिका । अजामेळासारिखा पापराशी ॥३॥ चरणींच्या रजे अहिल्या तारिली । रूपवंत केली कुब्जा दासी ॥४॥ पृथिवी तारिली पाताळासी जातां । तुका म्हणे आतां आम्ही किती ॥५॥
११६८. गाजराची पुंगी । तैसे नवे झाले जोगी
१. गाजराची पुंगी तयार करण्यास काही कष्ट पडत नाहीत, आणि ती वाजते तोवर वाजवितात, नाही वाजली तर खाऊनही टाकतात. त्याप्रमाणे स्वधर्माचरण, हरिभक्ती, गुरुसेवा इत्यादी काही एक कष्ट न करता, सांप्रत नवे नवे महाराज झाले आहेत.
॥१॥ काय करोनि पठन? । केली अहंता जतन
२. रक्षण
॥ध्रु॥ अल्प असे ज्ञान । अंगीं ताठा
३. काठिण्य, न वाकणारा
अभिमान ॥३॥ तुका म्हणे लंड
४. अधम, ठक
। त्याचे हाणोनि फोडा तोंड ॥४॥
११६९. परद्रव्य परनारी । अभिळासूनि
१. इच्छा करतो
नाक धरी
२. (वा.) बाह्यतः तिरस्कार करतो/ बाह्यतः प्राणायाम करतो
॥१॥ जळो तयाचा आचार । व्यर्थ भार वाहे खर ॥ध्रु॥ सोंव-ळ्याचि स्फिती
३. मोठेपणा, मान्यता, प्रतिष्ठा मिरवतो
। क्रोधे विटाळला
४. अशुद्ध असतो
चित्तीं ॥३॥ तुका म्हणे सोंग । दावी बाहेरील रंग
५. थाटमाट, ढोंग; (पा.भे. अंग)
॥४॥
११७०. टिळा टोपी उंच दावी । जगीं मी एक गोसावी
१. साधू
॥१॥ अवघा वरपंग
२. बाह्यात्कारी, वरवरचे
सारा
३. सर्व कृत्य
पोटी
४. मनात
विषयांचा थारा
५. स्थान, आश्रय
॥ध्रु॥ मुद्रा
६. गोपीचंदनाचे ठसे
लाविती कोरोनि । मान
७. प्रतिष्ठा
व्हावयासी जनीं ॥३॥ तुका म्हणे ऐसे किती । नरका गेले पुढे जाती ॥४॥
११७१. ऐसे संत झाले कळी । तोंडी तमाखूची नळी
१. बिडी, गुडगुडी
॥१॥ स्नान संध्या बुडविली । पुढें भांग
२. मादक वनस्पती (भांगेचा घोट)
वोढविली ॥ध्रु॥ भांगभुर्का
३. गांजा इ. मादक पदार्थांचा झुरका ओढणे
हे साधन । पची पडें
४. (वा.) पचनी पडणे, अंगवळणी पडणे
मद्यपान ॥३॥ तुका म्हणे अवघे सोंग । तेथें कैंचा पांडुरंग? ॥४॥
११७२. जातीची
१. स्वभावतःच, मूळ स्वभाव
शिंदळी
२. व्यभिचारीणी स्त्री
। तिला कोण कैसा वळी
३. परतविणे
? ॥१॥ आपघर
४. पतीचे घर
ना बापघर । चिंती मनीं व्यभिचार ॥ध्रु॥ सेजे
५. शय्येवर, जवळ
असोनियां धनी
६. पती
परद्वार
७. परपुरुष-गमन करण्याचे
मना आणी ॥३॥ तुका म्हणे अस्सल
८. खरोखर, मूळची, स्वाभाविक
जाती । जातीसाठी खाती माती
९. (वा.) अत्यंत चुकीचे कृत्य करणे; असह्य (नरकाचे) दुःख सहन करणे
॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

1 thought on “दिवस – ७३. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top