दिवस – ७४. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

श्रीभगवानुवाच
मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः ।
असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ॥१॥
ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः ।
यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते ॥२॥
पैं
१. (श्रीभगवानुवाच-मय्यासक्तमना इत्यर्ध) निश्चयेंकरून
गा, तूं योगयुक्तु
२. योगी
। जालासि आतां ॥१॥
मज समग्रातें
१. (असंशयं समग्रं मां) सर्वप्रकारें, सर्वत्रव्यापी
जाणसी ऐसें । आपुलिया तळहातींचें रत्न जैसें । तुज ज्ञान सांगेन तैसें । विज्ञानेंसीं
२. (ज्ञानं तेऽहं सविज्ञानं) प्रपंचज्ञान, विपरीतज्ञान, व्यवहारज्ञान यांसहित
॥२॥
एथ विज्ञानें काय करावें ? । ऐसें घेसी
१. असा ग्रह होईल
जरी मनोभावें । #तरी पैं, आधीं जाणावें । तेंचि लागें ॥३॥
मग ज्ञानाचिये वेळे । झांकती जाणिवेचे
१. जाणतेपणाचे
डोळे । जैसी तीरीं नाव
२. नौका
न ढळे । टेकलीसांती
३. जमिनीवर टेंकली असतां
॥४॥
तैसी, जाणीव जेथ न रिघे
१. शिरत नाहीं
। विचार मागुता पाउलीं निघे
२. मागल्या पायीं, आला तसाच मागें
। तर्क आयणी
३. निश्चय, गति
नेघे । आंगीं जयाच्या ॥५॥
अर्जुना, तया नांव ज्ञान । येर प्रपंचु हें विज्ञान । येथ
१. प्रपंचाचे ठिकाणी
सत्यबुद्धि, तें अज्ञान । हेंही जाण ॥६॥
आतां अज्ञान अवधें हरपे । विज्ञान निःशेष करपे
१. करपून जाते (बाधित होते)
। आणि ज्ञान तें स्वरूपें । होऊनि जाइजे ॥७॥
जेणें सांगतयाचें बोलणें खुंटे । ऐकतयाचें व्यसन
१. संकट, घट, दुःख, छंद
तुटे । हें जाणणें ‘सानें मोठें
२. लहान-मोठें
। उरों नेदी’ ॥८॥
ऐसें
१. (इदं वक्ष्याम्यशेषतः)
वर्म जें गूढ
२. सखोल, गुप्त
। तें कीजेल वाक्यारूढ
३. बोलण्यांत आणीन, सांगेन
। जेणें थोडेन पुरे कोड । बहुत, मनींचें
४. आवड, इच्छा
॥९॥
मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये ।
यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः ॥३॥
पैं
१. (मनुष्याणां सहस्रेषु)
गा, मनुष्याचिया सहस्रशां- । माजीं विपाइलेयाचि
२. विरळा, एखाद्याला
धिंवसा
३. धैर्य, इच्छा
। तैसें या धिंवसेकरां बहुवसां
४. बहुतेक धैर्यवंतामध्यें
– । माजीं विरळा
५. क्वचित्
जाणे ॥१०॥
जैसा, भरलिया त्रिभुवना -। आंतु एकएक चांगु
१. चांगला शूर
, अर्जुना । निवडूनि, कीजे सेना । लक्षवरीं
२. लक्षावधि
॥११॥
कीं
१. (कश्चिद्यतति सिद्धये)
तयाही पाठीं
२. त्यानंतर
। जे वेळीं लोह
३. शस्त्र
मांसातें घाटीं
४. कापी
। ते वेळी विजयश्रियेच्या
५. जयलक्ष्मीच्या
पाठीं
६. पदीं
। एकुचि बैसे ॥१२॥
तैसें
१. (यततामपि सिद्धानां)
आस्थेच्या महापुरीं । रिघताती कोटीवरीं
२. कोट्यावधि
। परी प्राप्तीच्या पैलतीरीं । विपाइला
३. विरळा, एखादा
निगे ॥१३॥
म्हणौनि
१. (कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः)
सामान्य गा नोहे । हें सांगता, वडील
२. मोठी
गोठी आहे । परी ते बोलों येइल; पाहें । आतां प्रस्तुत
३. (यथा ज्ञास्यसि तच्छृणु प्रथमः श्लोकः)
ऐकें ॥१४॥
भूमिरापोऽनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च ।
अहङ्कार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ॥४॥
तरी
१. (अहङ्कार इति)
अवधारीं गा धनंजया । हे महदादिक
२. महत्तत्व आदि
माझी माया । जैसी प्रतिबिंबे छाया
३. पडछाया पडते
। निजांगाची ॥१५॥
आणि
१. (भिन्ना प्रकृतिरष्टधा)
इयेतें प्रकृति
२. माया
म्हणिजे । जे अष्टधा
३. आठप्रकारें
भिन्न जाणिजे । लोकत्रय निपजे
४. उत्पन्न होते
इयेस्तव
५. इचेपासून
॥१६॥
हें अष्टधा भिन्न कैसीं ? । ऐसा ध्वनि
१. शंका, संशय
धरिसी जरी मानसीं । तरी तेचि गा आतां परियेसीं । विवंचना
२. विचार
॥१७॥
आप
१. (भूमिरिति)
तेज
२. उजेड, प्रकाश, अग्नि
गगन
३. आकाश
मही
४. पृथ्वी
मारुत
५. वायु
मन । बुद्धि अहंकारु हे भिन्न । आठै भाग ॥१८॥
अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् ।
जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत् ॥५॥
या
१. (अपरेयं)
आठांची जे साम्यावस्था
२. ऐक्यावस्था, मिश्रस्थिति
। ते माझी परम
३. (इतस्त्वन्यमिति) श्रेष्ठ
प्रकृति, पार्था । तिये नाम व्यवस्था । जीवु
४. (जीवभूतां महाबाहो)
ऐसी ॥१९॥
जे जडातें
१. अचेतनाला
जीववी । चेतनेतें चेतवी
२. चेतना उत्पन्न करिते
। मना करवीं मानवी । शोक मोहो ॥२०॥
पैं, बुद्धिच्या अंगीं जाणणें । तें #जिये जवळिकेचें
१. सन्निधपणाचें
करणें । जिया अहंकाराचेनि विंदाणें
२. कौशल्यानें, विधानानें, कळसूत्रानें
जगचि
३. (ययेदं धार्यते जगत्)
धरिजे ॥२१॥

विवेकवैराग्याने आपला आपणच उद्धार केला पाहिजे, असे श्रीकृष्णाचे उत्तर (२०६ ते २५३)
श्रीभगवानुवाच- प्रायेण मनुजा लोके लोकतत्त्वविचक्षणाः । समुद्धरन्ति ह्यात्मानमात्मनैवाशुभाशयात् ॥१९॥
श्रीभगवान म्हणाले – या विश्वात सार व असार यांमध्ये निवड करण्यात कुशल असे लोक बहुधा अमंगल अशा विषयवासनेपासून आपला उद्धार करून घेतात. ॥१९॥
भूत संचरलियापाठीं । सुटती जल्पवादगोठी । त्यातें गुणिया पाहोनि दिठीं । अक्षता त्राहाटी मंत्रोनी ॥२०६॥
पाहतां पांचभौतिक संसारु । सहजें झाला असे थोरु । माजी झोंबलासे कृष्णवियोगखेचरु । उद्धव लेंकरूं झडपिलें ॥२०७॥
मिसें उद्धवाची झडपणी । अहं-म्हैसासुर लागला जनीं । त्यासी करावया झाडणी । कृष्ण गुणी चालिला ॥२०८॥
तेथ झाडणीलागी आतां । यदुअवधूतसंवाद कथा । त्याचि मंत्रूनि मंत्राक्षता । होय झाडिता श्रीकृष्णु ॥२०९॥
श्रीकृष्ण म्हणे उद्धवासी । सावध होई निजमानसीं । येऊनियां मनुष्यलोकासी । आपआपणांसी उद्धरिती ॥२१०॥
पाहतां यया परमार्था । साह्य नव्हे माता पिता । पुत्र भ्राता दुहिता कांता । साह्य सर्वथा हे नव्हती ॥२११॥
साह्य परमार्था नव्हे व्याही । शेखीं साह्य नव्हे जांवयी । आपणिया आपण साह्य पाहीं । जो निजदेहीं विवेकी ॥२१२॥
मुमुक्षुमार्गीचे सज्ञान । लोक तत्त्वविचक्षण । विचारूनि कार्याकारण । स्वबुद्धी जाण उद्धरले ॥२१३॥
नित्यानित्यविवेकें । अनित्य सांडिती त्यागमुखें । नित्य तें यथासुखें । हित संतोखें अंगीकारिती ॥२१४॥
नित्यत्वें जें उरलें जाण । तें स्वरूप माझें चिद्घन । तेंचि साधकांचे साधन जाण । अनन्यपणे चिंतिती ॥२१५॥
भावितां माझी दृढ भावना । मीचि ते होती जाणा । कीटकी-भृंगीचिया खुणा । आपआपणियां उद्धरिती ॥२१६॥
आत्मनो गुरुरात्मैव, पुरुषस्य विशेषतः । यत्प्रत्यक्षानुमानाभ्यां, श्रेयोऽसावनुविन्दते ॥२०॥
विशेषेकरून मनुष्याचा आत्माच आपला स्वतःचा गुरू आहे. हा आत्मा प्रत्यक्ष आणि अनुमान या दोन प्रमाणांनी आपले कल्याण करून घेतो. ॥२०॥
पश्वादि योनींच्या ठायीं । हिताहितज्ञान असे पाहीं । मा पुरुषाच्या पुरुषदेहीं । ज्ञान पाहीं स्फुरद्रूप ॥२१७॥
जे कर्म करितों मी देहीं । तेणें तरेन की नाहीं । हे ज्याचे त्याचे ठायीं । स्फुरद्रूप पाही कळतसे ॥२१८॥
सांडूनि अशुभ वासना । जो न करी विषयकल्पना । तो आपुला गुरु आपण जाणा । नरकयातना चुकविली ॥२१९॥
जो कंटाळला जन्मगर्भासी । मरमरों उबगला मरणासी । आधि लागली मानसीं । जन्ममरणासी नासावया ॥२२०॥
आवडी नुपजे स्त्रीपुत्रांसी । निद्रा न लागे अहर्निशीं । काळे ग्रासिलें आयुष्यासी । निजहितासी न देखिजे ॥२२१॥
तुझीच तुजचि देखतां । काळे गिळिली बाल्यावस्था । तारुण्याचा ग्रासिला माथा । वार्धक्याभंवता लागला असे ॥२२२॥
केवळ वार्धक्याचा जरंगा । त्यासीही काळु लागला पैं गा । आयुष्य व्यर्थ जातसे वेगा । हा निजनाडु जगा कळेना ॥२२३॥
क्षणक्षणा काळु जातसे व्यर्थ । कांहीं न साधे जी परमार्थ । जन्ममरणांचा आवर्त । पुढे अनर्थ रोकडा ॥२२४॥
स्वर्ग नरक कर्म ब्रह्म । चहूं प्राप्तीसी मनुष्यधर्म । यालागीं त्यजूनि पापकर्म । मोक्षधर्म धरावा ॥२२५॥
नरदेह मोक्षाचा वाटा । वृथा जातसे कटकटा । हृदयीं आधी लागला मोठा । विषयचेष्टा विसरला ॥२२६॥
प्रत्यक्ष लक्षणे अनित्य । संसारु दिसे नाशवंत । यालागीं तो नव्हे आसक्त । होय विरक्त इहभोगीं ॥२२७॥
याचिपरी ‘अनुमाना’ । परलोकभोगभावना । आतळों नेदी मना । नश्वर पतना जाणोनि ॥२२८॥
कैं कृपा करील गोविंद । कैं तुटेल भवबंध । कैं देखेन तो निजबोध । परमानंद जेणे होय ॥२२९॥
धांव पाव गा श्रीहरी । कृपा करी दीनावरी । मज उद्धरीं भवसागरी । भक्तकैवारी श्रीकृष्णा ॥२३०॥
जैसी जीवनावेगळी मासोळी । तैसा बोधालागी तळमळी । प्रेमपडिभराच्या मेळीं । देह न सांभाळी सर्वथा ॥२३१॥
एक नेणोनि नरदेहा मुकले । एकी नव्हे म्हणोनि उपेक्षिले । एक ज्ञानगर्वे गिळिले । एक भुलले विषयार्थी ॥२३२॥
एक साधनाभिमानें ठकिले । एक करूं करूं म्हणतां गेले । एक करितां अव्हाटां भरले । करणे ठेलें तैसेंचि ॥२३३॥
जरी विवेक कळला मना । तरी न तुटती विषयवासना । तेणें संतप्त होऊनि जाणा । नारायणा चिंतितु ॥२३४॥
कृष्ण म्हणे उद्धवासी । सविवेक वैराग्य असे ज्यासी । तोचि आपला गुरु आपणासी । विशेषेसी जाणावा ॥२३५॥
त्याचिये निजबुद्धीसी । मीचि विवेकु प्रकाशी । तो स्वयें जाणे निजबोधासी । निजमानसीं विवेकें ॥२३६॥
ज्यासी जैसा भावो । त्यासी मी तैसा देवो । ये अर्थी संदेहो । उद्धवा पहा हो न धरावा ॥२३७॥
उद्धवा येथ केवळ । पाहिजे निजबुद्धि निर्मळ । तरी आत्मबोध तत्काळ । होय सफळ सर्वथा ॥२३८॥
पुरुषत्वे च मां धीराः, सांख्ययोगविशारदाः । आविस्तरां प्रपश्यन्ति, सर्वशक्त्युपबृंहितम् ॥२१॥
सामर्थ्यवान अशा मानवयोनीत जन्म घेऊन सांख्य आणि योग या शास्त्रांत निपुण असलेले ज्ञाननिष्ठ पुरुष सर्व सामर्थ्याने युक्त असलेल्या मला अत्यंत स्पष्टपणे पाहतात. ॥२१॥
एवं वैराग्यें पूर्ण भरित । धीर पुरुष विवेकयुक्त । सांख्ययोग विवंचित । निजी निज प्राप्त तत्काळ ॥२३९॥
नरदेहीं विवेक वसे । निजरूप पावले कैसे । जें सर्वशक्तियुक्त असे । तें सावकाशें देखती ॥२४०॥
जें प्रसवे सर्वशक्तीतें । तें सर्वशक्ति-शक्तिदातें । जें नातळे सर्वशक्तीतें । त्या स्वरूपातें पाहताति ॥२४१॥
उद्धवा काय सांगों गोष्टी । बहुत शरीरें सृजिली सृष्टीं । मज नरदेही आवडी मोठी । उठाउठी मी होती ॥२४२॥
एकद्वित्रिचतुष्पादो, बहुपादस्तथाऽपदः । बह्व्यः सन्ति पुरः सृष्टास्तासां मे पौरुषी प्रिया ॥२२॥
एक, दोन, तीन, चार व त्यांहून जास्त पाय असणारे आणि मुळीच पाय नसणारे असे अनेक जीव मी पूर्वी निर्माण केले परंतु त्यांपैकी हे पौरुष (मानवी) शरीरच मला प्रिय आहे. ॥२२॥
केली एकचरणी शरीरें । दोंपायांची अपारें । तींपायांची मनोहरें । अतिसुंदरें चतुष्पदें ॥२४३॥
सर्पादि योनींच्या ठायीं । म्यां चरणचि केले नाहीं । एकें चालती बहु पायीं । केली पाहीं शरीरें ॥२४४॥
ऐशी शरीरें नेणों किती । म्यां निर्माण केली ये क्षितीं । मज कर्त्यातें नेणती । मूढमति यालागीं ॥२४५॥
मज कर्त्याची प्राप्ति । होआवयालागीं निश्चितीं । स्वांशें प्रकाशोनि ज्ञानशक्ती । पौरुषी प्रकृति म्यां केली ॥२४६॥
जेणे देहें मज पावती । त्या देहाची मज अतिप्रीति । यालागीं श्रुति नरदेह वर्णिती । देव वांछिती नरदेहा ॥२४७॥
ऐशी नरदेहाची प्रीति । कृष्ण सांगे उद्धवाप्रती । येणे शरीरें मज पावती । नाना युक्तिविचारें ॥२४८॥
अत्र मां मार्गयन्त्यद्धा, युक्ता हेतुभिरीश्वरम् । गृह्यमाणैर्गुणैर्लिङ्गैरग्राह्यमनुमानतः ॥२३॥
या शरीरातच योगी लोक, सुलभतेने ग्राह्य नसलेल्या मला, ज्ञानाचा विषय होण्यास योग्य असे जे बुद्धींद्रियादी जीवाचे गुण त्यांच्या द्वारा अनुमानाच्या सहाय्याने प्रत्यक्ष शोधून काढतात. ॥२३॥
येऊनि नरदेहाप्रती । कर्त्याची गवेषणा जे करिती । जो मी ईश्वर त्रिजगतीं । उत्पत्तिस्थितिसंहर्ता ॥२४९॥
बुद्धियुक्ती विवेक करणें । तें जडें प्रकाशपणें । त्याचाही मी प्रकाशकु म्हणे । येणे लक्षणे लक्षिती ॥२५०॥
ऐशा नानापरींच्या अनुमानां । मी तंव वश नव्हे जाणा । जे लक्षिती सांडोनि अभिमाना । साक्षात्पणा ते येती ॥२५१॥
ज्याची आशा होय निराश । तोचि ब्रह्म पावे सावकाश । तेणें कळीकाळावरी कांस । जाण अवश्य घातली ॥२५२॥
मुख तंव स्वतःसिद्ध असे । तें निर्मळ आरिसां दिसे । तेवीं बुद्धीचेनि विवेकवशें । आत्मा भासे नरदेहीं ॥२५३॥
यदु-अवधूत-संवाद-उपोद्घात (२५४-३१८)
येचिविखींचा इतिहास जाण । तुज मी सांगेन पुरातन । यदुअवधूतसंवादलक्षण । ज्ञानसाधन साधकां ॥२५४॥

११७३. आंधळ्याची काठी । हिरोनियां, कडा
१. डोंगराच्या तुटलेल्या बाजूवरून
लोटी ॥१॥ हे कां देखण्या
२. डोळस मनुष्यास
उचित? । लाभ किंवा कांहीं हित? ॥ध्रु॥ चाळवूनि
३. फसवून
हातीं । साकर म्हणोनि द्यावी माती ॥३॥ तुका म्हणे वाटे
४. मर्गावर
। देवा, पसरावे सराटे
५. जमिनीवर पसरणाऱ्या एका लहान वनस्पतीचे काटेरी फळ- गोखरू
? ॥४॥
११७४. प्रीतीचिया बोला नाहीं पेचपाड
१. कपट, त्रासदायक धोरण
भलतैसें
२. कसलेही
गोड करूनि घेई ॥१॥ तैसें विठ्ठलराया तुज मज आहे । आवडीनें गाय नाम तुझें ॥ध्रु॥ वेडे वांकडे ते बाळकाचे बोल । करिती नवल
३. कौतुक
मायबाप ॥३॥ तुका म्हणे तुज येवो माझी दया । जीवींच्या सखया जिवलगा
४. आवडता, आप्त
॥४॥
११७५. माझे मज कळों येती अवगुण
१. दोष, दुर्गुण
। काय करूं मन अनावर
२. स्वैर, बेलगामी
॥१॥ आतां आड
३. मध्ये, आडवे
उभा राहें नारायणा! । दया-सिंधुपणा साच
४. खरे
करी ॥२॥ वाचा वदे
५. बोलते
परि करणें कठिण । इंद्रियां अधीन झालों देवा ॥३॥ तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास । न धरी उदास
६. दुर्लक्ष, कानाडोळा, त्याग करणे
मायबापा! ॥४॥
११७६. वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची । कीर्ति मानवाची सांगों नये ॥ध्रु॥ उदंडचि
१. पु्ष्कळ
झाले जन्मोनियां मेले । होऊनियां गेले राव
२. राजे
रंक
३. गरीब
॥२॥ त्यांचे नाम कोणी नेघे
४. घेत नाही
चराचरीं
५. जगात
साही
६. सहा शास्त्र
वेद चारी वर्णिताती ॥३॥ अक्षय
७. अविनाशी
अढळ
८. स्थिर
चळेना ढळेना । तया नारायणा ध्यात जावें ॥४॥ तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्तीं ध्यातां । जन्म मरण व्यथा दूर होती ॥५॥
११७७. नको देऊं देवा पोटी हें संतान
१. अपत्य
। मायाजाळें जाण नाठवसी ॥१॥ नको देऊं देवा द्रव्य आणि भाग्य । तो एक उद्वेग
२. चिंता (पा.भे. उद्योग)
होय जीवा ॥ध्रु॥ तुका म्हणे करीं फकिराचे परी
३. प्रमाणे (दरिद्री)
। रात्रंदिवस ‘हरि’ येईल वाचे ॥३॥
११७८. जोडोनियां
१. प्राप्त करून, मिळवून
धन उत्तम
२. (धर्म-नीतीला अनुसरून)
वेव्हारें
३. व्यापार, शेती इ.ने
उदास
४. अनासक्त, निष्काम बुद्धीने
विचारें
५. देश, काल, पात्राचा विचार करून
वेंच
६. खर्च
करी ॥१॥ उत्तमचि गति
७. सद्गती
तो एक पावेल । उत्तम भोगील जीवखाणी
८. उत्तम जन्म
॥ध्रु॥ परउपकारी, नेणें परनिंदा । परस्त्रिया सदा बहिणी माया ॥३॥ भूतदया गाई पशूंचें पाळण । तान्हेल्या
९. तहान लागलेल्यांना
जीवन१०
१०. पाणी
वनामाजीं ॥४॥ शांतिरूपें नव्हे कोणाचा वाईट । वाढवी महत्त्व वडिलांचें ॥५॥ तुका म्हणे हेंचि आश्रमाचे११
११. गृहस्थाश्रमाचे
फळ । परमपद१२
१२. ब्रह्मस्वरूप (प्राप्त होते)
बळ वैराग्याचें ॥६॥
११७९. ‘हरि’ म्हणतां गति
१. सद्गती
पातकें नासती । कळिकाळ कांपती ‘हरि’ म्हणतां ॥१॥ ‘हरि’ म्हणतां भुक्ति
२. भोग
‘हरि’ म्हणतां मुक्ति । चुके यातायाती
३. जन्म-मरणाची येरझार, संकट, क्लेश
‘हरि’ म्हणतां ॥ध्रु॥ तपें अनुष्ठानें न लगती साधनें । तुटती बंधने ‘हरि’ म्हणतां ॥३॥ तुका म्हणे भावे
४. प्रेम-श्रद्धापूर्वक
जपा हरीचें नाम । मग काळ यम शरण तुम्हां ॥४॥
११८०. नये
१. विभागू देऊ नये (पंचविषयांकडे)
वांटूं
२. विभागणे
मन । कांहीं न देखावें तें भिन्न ॥१॥ पाय विठोबाचे चित्तीं । असों द्यावे दिवसराती ॥ध्रु॥ नये काकुळती
३. गयावया करू नये (पा.भे. यावे)
। कोणा येवो हरिभक्तिं
४. हरिच्या भक्तांनी
॥३॥ तुका म्हणे साई
५. सावली, छाया
। करील कृपेची विठाई ॥४॥
११८१. सकळ देवांचे दैवत । उभे असे या रंगांत
१. भजन-कीर्तनाच्या रंगात
॥१॥ रंग
२. भजनाचा आनंद
लुटा
३. भरभरून संपूर्ण उपभोग घ्या
माझे बाप! । शुद्ध भावें खरें माप ॥ध्रु॥ रंग लुटिला बहुतीं । शुक नारदादि संतीं ॥३॥ तुका लुटिताहे रंग । साह्य झाला पांडुरंग ॥४॥
११८२. उशीर का केला? । कृपाळुवा जी विठ्ठला! ॥१॥ मज दिलें कोणा हातीं
१. स्वाधीन
? । काय मानिली निश्चिंती
२. स्वस्थता
? ॥ध्रु॥ कोठवरी धरूं धीर? । आतां मन करूं स्थिर? ॥३॥ तुका म्हणे जीव । ऐसी भाकितसे कींव
३. विनवणी करीत आहे
॥४॥
११८३. तुका वेडा अविचार । करी बडबड
१. (हरिनामाची)
फार ॥१॥ नित्य वाचे हाचि छंद । ‘राम कृष्ण हरि गोविंद’ ॥ध्रु॥ धरी पांडुरंगी भाव । आणिक नेणें दुजा देव ॥३॥ गुरुज्ञान
२. गुरुंपासून झालेल्या ज्ञानाने
सर्वाठायीं
३. सर्वत्र (ब्रह्मदृष्टी झाली आहे)
। दुजें न विचारी कांहीं ॥४॥ बोल नाइके कोणाचे । कथे नागवाचि नाचे
४. (वा.) अतिशय आनंदाने देहभान विवर्जित होणे
॥५॥ संग
५. विषयसंबंधाला
उपचारें
६. गौरव, आदर-सत्कार
कांटाळे । सुखें भलते ठायीं लोळे ॥६॥ कांहीं
७. संसाराविषयी
उपदेशिलें नेणें । वाचे ‘विठ्ठल विठ्ठल’ म्हणे ॥७॥ केला बहुतीं फजित । तरी हेंचि करी नित्य ॥८॥ अहो पंडित जन! । तुका टाकावा थुंकोन
८. (वा.) त्याग, उपेक्षा करा
॥९॥
११८४. आली सिंहस्थ पर्वणी
१. सिंह राशीला गुरु येण्याचा पर्वकाळ
। न्हाव्या भटा झाली धणी
२. (वा.) चंगळ होणे, खूप पैसा मिळणे
॥१॥ अंतरीं
३. मनात
पापाच्या कोडी
४. कोट्यवधी
। वरि वरि बोडी
५. मुंडन, हजामत करतो
डोई दाढी ॥२॥ बोडिलें तें निघालें । काय पालटले
६. (मनात) परिवर्तन झाले?
सांग वहिले
७. त्वरित
॥३॥ पाप गेल्याची काय खूण? । नाहीं पालटले अवगुण ॥४॥ भक्तिभावेंविण । तुका म्हणे अवघा शीण ॥५॥
११८५. तुज घालोनियां पूजितों संपुटीं
१. लहानशी पेटी
। परि तुझ्या पोटी चौदा भुवनें ॥१॥ तुज नाचूनि दाखवूं कौतुक । परि रूप रेखा
२. मर्यादा
नाहीं तुज ॥२॥ तुजलागी आम्ही गात असों गीत । परि तूं अतीत
३. पलीकडे
शब्दाहूनि ॥३॥ तुजलागीं आम्ही घातियेल्या माळा । परि तूं वेगळा कर्तृत्वासी ॥४॥ तुका म्हणे आतां होऊनि परमित
४. लहान, सगुण-साकार; (पा.भे. परिमित)
। माझें कांहीं हित विचारावें ॥५॥
११८६. पापाची मी राशी । सेवाचोर
१. सेवेची टाळाटाळ करणारा
पायांपाशीं ॥१॥ करा दंड
२. शिक्षा
नारायणा! । माझ्या मानाची खंडणा
३. भंग, नाश
॥ध्रु॥ जना हाती सेवा । घेतो लंडपणे
४. उद्धटपणाने, उन्मत्तपणाने
देवा! ॥३॥ देव
५. (पा.भे. तुझा)
ना संसार । तुका दोहींकडे चोर ॥४॥
११८७. दुडीवरी दुडी
१. एकावर एक ठेवलेली घागरींची उतरंड
। चाले मोकळी
२. (उतरंडीला) हात न लावता
गुजरी
३. गुजराथी स्त्री
॥१॥ ध्यान लागो ऐसे हरि! । तुझे चरणीं तैशापरी ॥ध्रु॥ आवतण्याची
४. आमंत्रणाची (जेवणाच्या)
आस
५. इच्छा
। जैसी लागे दुर्बळास
६. दरिद्र्यास
॥३॥ लोभ्या कळांतराची
७. व्याजाची
आस । बोटे मोजी दिवस मास
८. महिने
॥४॥ तुका म्हणे पंढरीनाथा! । मजला आणिक नको व्यथा
९. पीडा, दुःख, तळमळ
॥५॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

1 thought on “दिवस – ७४. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top