दिवस – ७५. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय ।
अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा ॥६॥
तें सूक्ष्म प्रकृति कोडें
१. आवडीनें
। जैं स्थूळाचिया
२. महाभूतांच्या
आंगा घडे । तैं भूतसृष्टीची
३. प्राण्यांच्या उत्पत्तीची
पडे । टांकसाळ ॥२२॥
चतुर्विध
१. जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज या चोहोंचा
ठसा । उमटों लागे आपैसा । मोला
२. किंमतीला, योग्यतेला
तरी सरिसा
३. सारखा
। परी थरचि
४. जाति
आनान
५. वेगळाल्या
॥२३॥
होती चौऱ्याऐंशी लक्ष थरा । येरा मिती
१. गणती
नेणिजे भांडारा । भरे आदिशून्याचा
२. अव्यक्त मायेचा
गाभारा । नाणेयांसी
३. नाण्यांनीं
॥२४॥
ऐसें एकतुके
१. एकसारखें
पांचभौतिक
२. पंचमहाभूतांची
। पडती बहुवस टांक
३. नाणें, ठसे
। मग, तिये समृद्धीचे लेख
४. जमाखर्च
प्रकृतीचि
५. मायाच
धरी ॥२५॥
जे आखूनि
१. रेखाटून, आकारून
नाणें विस्तारी । पाठीं तयाची आटणी
२. गाळणी, लीन, लय
करी । माजीं, कर्माकर्माचिया व्यवहारीं । प्रवर्तु
३. प्रवृत्ति
दावी ॥२६॥
हें ‘रूपक
१. सादृश्याचे उदाहरण
परी’ असो । सांगों उघड जैसें ये परियेसों
२. श्रवण करूं, समजण्याजोगें
। तरी नामरूपाचा अतिसो
३. अतिशय
। प्रकृतीचि कीजे ॥२७॥
आणि प्रकृति तंव माझ्या ठायीं । बिंबे
१. भासते
; येथ आन नाहीं । म्हणौनि आदि मध्य अवसान पाहीं । जगासि मी ॥२८॥
मत्तः परतरं नान्यत्किञ्चिदस्ति धनञ्जय ।
मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ॥७॥
हैं
१. दृश्य विश्व
रोहिणीचें
२. मृगजळ
जळ । तयाचें पाहतां येइजे मूळ । तैं रश्मि
३. किरण
नव्हती; केवळ । होय तें भानु
४. सूर्य
॥२९॥
तयाचि परी, किरीटी । इया प्रकृति जालिये सृष्टी । जैं उपसंहरूनि
१. नाहींसें करून
कीजेल ठी
२. पर्यवसान, शेवट
। तैं ‘मीचि आहें’ ॥३०॥
ऐसें, होय दिसे न दिसे
१. उत्पन्न होते, दिसतें व नाहीसें होतें
। हें मजचि माजीं
२. माझ्यामध्यें
असे । मियां विश्व धरिजे; जैसें । सूत्रे
३. दोऱ्यानें
मणि ॥३१॥
सुवर्णाचे मणी केले । ते सोनियाचे सुतीं वोविले । तैसें, म्यां जग धरिलें । सबाह्याभ्यंतरीं
१. आंतबाहेर
॥३२॥
रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभाऽस्मि शशिसूर्ययोः ।
प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु ॥८॥
पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ ।
जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु ॥९॥
म्हणौनि, उदकीं रसु
१. (रसोऽहमिति) स्वाद
। कां पवनीं
२. वायूंत
जो स्पर्श । शशि-सूर्यां जो प्रकाशु । तो मीचि, जाण ॥३३॥
तैसाचि नैसर्गिकु
१. स्वाभाविक
शुद्ध । मी पृथ्वीच्या ठायीं गंधु
२. (पुण्यो गन्धः पृथिव्यां च) सुवास
गगनीं
३. आकाशांत
मी शब्दु
४. (शब्द: खे)
। वेदीं प्रणवु
५. (प्रणवः सर्ववेदेषु) ॐकार
॥३४॥
नराच्या ठायीं नरत्व
१. मनुष्यपणा
। जें अहंभाविये सत्त्व
२. बळ
। तें पौरुष
३. (पौरुषं नृषु) पराक्रम
मी; हें तत्त्व
४. खरें स्वरूप
। बोलिजत असे ॥३५॥
अग्नि ऐसें आहाच
१. वरवरच
तेज
२. (तेजश्चास्मि विभावसौ) प्रकाशांत
नामाचें आहे कवच
३. आवरण
। तें परतें केलिया
४. दूर केले असतां
, साच- । निजतेज
५. खरें तेज
, तें मी ॥३६॥
आणि
१. (जीवनं सर्वभूतेषु)
नानाविध योनी । जन्मोनि, भूतें
२. प्राणिमात्र
त्रिभुवनीं । वर्तत आहाति जीवनीं
३. उपजीविकेंत, अन्नानें
। आपुलाल्या ॥३७॥
एकें पवनेंचि पिती
१. वाराच पितात
। एकें तृणास्तव जिती
२. गवतावर उपजीविका करतात
। एकें अन्नाधारें राहती । जळें एकें ॥३८॥
ऐसें भूतांप्रति आनान
१. प्रत्येक प्राण्याला
। जें प्रकृतिवशें दिसे जीवन
२. अन्न, आहार
। तें आघवाठायीं
३. सर्व ठिकाणी
अभिन्न । मीचि एक ॥३९॥

अत्राप्युदाहरन्तीममितिहासं पुरातनम् । अवधूतस्य संवादं, यदोरमिततेजसः ॥२४॥
महातेजस्वी अवधूत व यदुराजा यांचा या विषयासंबंधीचा झालेला हा संवाद, पूर्वकालीन इतिहास म्हणून, उदाहरणादाखल सांगितला जातो. ॥२४॥
हरिखें म्हणतसे गोविंदु । उद्धवा आमुचा पूर्वज यदु । तेणें ब्रह्मज्ञानासी संवादु । केला विशदु अवधूतासीं ॥२५५॥
राजा यदु म्हणसी कैसा । क्षात्रसृष्टीचा सूर्यों जैसा । राजा चंद्राच्या प्रकाशा । निजतेजवशा लोपितु ॥२५६॥
तेणें गुरूची लक्षणे ऐकतां । सायुज्यमुक्ति आली हाता । ते हे पुरातन कथा । तुज मी आतां सांगेन ॥२५७॥
अवधूतं द्विजं कञ्चिच्चरन्तमकुतोभयम् । कविं निरीक्ष्य तरुणं यदुः पप्रच्छ धर्मवित् ॥२५॥
निर्भयपणे संचार करणाऱ्या, महाज्ञानी, दिगंबर अशा कोणीएका तरुण द्विजाला पाहून धर्माचा अर्थ जाणणाऱ्या यदुराजाने प्रश्न केला. ॥२५॥
कोणी एक अवधूतु । निजतेजें प्रकाशवंतु । ब्रह्मानंदें डुल्लतु । यदूने येतु देखिला ॥२५८॥
त्या अवधूताचे लक्षण । यदु निरीक्षी आपण । देखिलें ब्रह्मसूत्रधारण । होय ब्राह्मण ब्रह्मवेत्ता ॥२५९॥
ऐसा तो अवधूतु । निर्भय निःशंक वर्ततु । यदु व्याहाळिये होता जातु । देखिला वनांतु सन्मुख ॥२६०॥
आंतुला प्राण तत्त्वतां । बाहेर रिघों नेदी सर्वथा । स्वभावें प्राणापानसमता । झाली न धरितां धारणा ॥२६१॥
नवल तयाचे पाहणें । दृश्य दृश्यत्वें देखों नेणे । झाला सर्वांगें देखणें । देखणेपणे पाहातसे ॥२६२॥
मी एकु वनीं वसता । हेही नाठवे त्याचिया चित्ता । झाली सर्वत्र सर्वगतता । समसाम्यता समत्वें ॥२६३॥
कर्म कार्य कर्ता जाण । अवघा जाहला तो आपण । क्रियेनें वाहूनियां आण । निंबलोण जीवें केलें ॥२६४॥
देहाचिया माथां । ठेविली होती अहंता । तें देहमिथ्यात्व पावतां । समूळ अहंता पळाली ॥२६५॥
नित्यानित्य होमद्वारें । ब्रह्माग्नि प्रज्वळला एकसरें । जाळूनि आश्रमांची चारी घरें । केलें खरें निराश्रमी ॥२६६॥
त्या आश्रमामाजीं होती । शास्त्रश्रवणविधिवादपोथी । ते जळाली जी निश्चितीं । भस्म हातीं न लगेचि ॥२६७॥
विधिनिषेध पैजा । जळाली पंचायतनदेवपूजा । होता संचितक्रियमाणपुंजा । तोही वोजा जळाला ॥२६८॥
यापरी तो अवधूतु । ब्रह्मानंदें जी डुल्लतु । निजसुखें वेल्हावतु । देखिला येतु यदुरायें ॥२६९॥
संकल्प-विकल्परहित । शुद्ध सर्वांगीं विभूत । यालागी बोलिजे ‘अवधूत’ । येऱ्हवीं विख्यात ब्राह्मणु ॥२७०॥
सभोंवता समस्तु । प्रपंच निजबोधे असे धूतु । यालागीं बोलिजे ‘अवधूतु’ । येऱ्हवीं विख्यातु ब्राह्मणु ॥२७१॥
अहं धुई तो ‘अवधूतु’ । तोचि योगी तोचि पुनीतु । जो का अहंकारग्रस्तु । तोचि पतितु जन्मकर्मी ॥२७२॥
वार्धक्य यावें देहासी । तंव देहपण नाहीं देहापासीं । रिगमु नव्हेच जरेसी । तारुण्यासी तें मूळ ॥२७३॥
आणिकही त्याची लक्षणे । निच नवा बोधु मैळों नेणें । भोगिजे नित्य नूतनपणें । परम तारुण्ये टवटवला ॥२७४॥
निजबोधाचिया सत्ता । द्वैत जिंतिले तत्त्वतां । ऐसा निःशंकु विचरतां । भय सर्वथा त्या नाहीं ॥२७५॥
ऐशी लक्षणे निर्धारितां । अवधूत निजबोधे पुरता । यदूसी उपजली विनीतता । श्रद्धा सर्वथा अनिवार ॥२७६॥
करूनि साष्टांग दंडवत । अतिनम्र श्रद्धायुक्त । हात जोडूनि पुसत । प्रसन्न चित्त रायाचें ॥२७७॥
यदुरुवाच – कुतो बुद्धिरियं ब्रह्मन्नकर्तुः सुविशारदा । यामासाद्य भवाँल्लोकं, विद्वांश्चरति बालवत् ॥२६॥
यदुराजा म्हणाला – हे तेजस्वी मुने, तू काहीही करताना दिसत नाहीस आणि तुला ही कुशाग्र व लोकोत्तर बुद्धी कोठून प्राप्त झाली ? या बुद्धीच्या जोरावर तू विद्वान असून लहान मुलाप्रमाणे या पृथ्वीतलावर संचार करीत आहेस ! ॥२६॥
अपूर्व बुद्धि हे स्वामी । तुमचे ठायीं देखों आम्ही । जे न लभे यमनियमीं । कर्मधर्मी आचरतां ॥२७८॥
दिसतोसी सर्वार्थी कुशळ । परी कांहीं न करूनि निश्चळ । अकर्तात्मबोधे तूं केवळ । जैसें बाळ अहेतुक ॥२७९॥
तूं बालाऐसा वर्तसी । परी बालबुद्धि नाहीं तुजपासी । सर्वज्ञ सर्वथा होसी । ऐसें आम्हांसी दिसतसे ॥२८०॥
येवोनियां या लोकासी । पावोनियां नरदेहासी । सार्थकता तुझ्याऐसी । आणिकापाशी न देखों ॥२८१॥
प्रायो धर्मार्थकामेषु, विवित्सायां च मानवाः । हेतुनैव समीहन्ते, आयुषो यशसः श्रियः ॥२७॥
सामान्यपणे धर्म, अर्थ व काम या तीन पुरुषार्थांचे आणि आत्म्याचे ज्ञान करून घेऊ इच्छिणारे पुरुष आयुष्य, यश किंवा संपत्ती मिळण्यासाठीच इच्छा करीत असतात असे दिसते. ॥२७॥
प्रायशा ये लोकी लोक । धर्मअर्थकामकामुक । येचिविखीं ज्ञान देख । आवश्यक करिताति ॥२८२॥
आम्ही स्वधर्म करितों म्हणती । स्नानसंध्येची कीर्ति मिरविती । शेवटीं गायत्रीचे फळ देती । अर्थप्राप्तीलागोनी ॥२८३॥
वेदोक्त आम्ही करितों याग । संस्थापितों वेदमार्ग । शेखीं तो करिती जीविकायोग । स्वर्गभोग वांछिती ॥२८४॥
एक म्हणती आम्ही स्वकर्मक । कुश मृत्तिका नाशिती उदक । समयीं आलिया याचक । इवलीसी भीक न घालिती ॥२८५॥
दांभिक वाढवावया स्फीती । वैष्णवदीक्षा अवलंबिती । देवपूजा झळफळीत दाविती । शंख लाविती दों हातीं ॥२८६॥
आयुष्यदानी पुण्यपुरुष । आम्ही चिकित्सक अहिंस । स्थावर जंगम जीव अशेष । मारूनियां यश मिरविती ॥२८७॥
यश वाढवावयाकारण । तुळापुरुष करिती दान । देहो मूत्रविष्ठे परिपूर्ण । धन त्यासमान जोखिती ॥२८८॥
परी परमार्थाचिया चाडा । कोणी वेंचीना कवडा । भूल कैशी पडली मूढां । स्वार्थ रोकडा विसरले ॥२८९॥
पूर्वी अदृष्टी नाहीं प्राप्ती । ते श्रीकामा उपास्ती करिती । श्रियेचा स्वामी श्रीपती । त्यातें न भजती अभाग्य ॥२९०॥
लक्ष्मी विश्वगुरु हरीची पत्नी । तीतें जो तो राखे अभिलाषूनी । नेदिती हरीची हरिलागोनी । त्यातें पतनी हरि पचवी ॥२९१॥
रोगत्यागें आयुष्य मागती । यालागी सविता उपासिती । देहो नश्वर हे नाठवे चित्तीं । पडली भ्रांती निजपदा ॥२९२॥
एवं आयुष्य-यश-श्रीकामीं । समस्त भजतां देखों आम्ही । परी नवल केलें तुवां स्वामी । परब्रह्मीं निजबोधु ॥२९३॥
विषयबळ अलोलिक । मिथ्या भ्रमें भ्रमले लोक । ज्ञानसाधनें साधोनि देख । विषयसुख वांछिती ॥२९४॥
वेदांतवार्तिकवाक्स्फूर्ती । अद्वैत ब्रह्म प्रतिपादिती । शेखी पोटासाठी विकिती । नवल किती सांगावें ॥२९५॥
एक म्हणविती योगज्ञानी । वायुधारणा दाविती जनीं । टाळी लावूनि बैसती ध्यानीं । जीविका मनीं विषयांची ॥२९६॥
ऐसे विविदिषा लोक । साधनें साधूनि झाले मूर्ख । तुवां केलें जी अलोलिक । आत्मसुख साधिलें ॥२९७॥
ऐसें स्वामी अवधूता । तुवां तृणप्राय केलें जीविता । तुच्छ करोनि लोकां समस्तां । निजात्महिता मीनलासी ॥२९८॥
निजानंदें निवालासी । अंतरीं शीतळ झालासी । ऐसें दिसताहे आम्हांसी । उपलक्षणेसी परियेसीं ॥२९९॥

११८८. लागोनियां पायां विनवितों तुम्हांला । करें
१. हाताने
टाळी बोला मुखें नाम ॥१॥ ‘विठ्ठल विठ्ठल’ म्हणा वेळोवेळां । हा सुखसोहळा स्वर्गी नाहीं ॥ध्रु॥ ‘कृष्ण विष्णु हरि गोविंद गोपाळ’ । मार्ग हा प्रांजळ
२. सरळ, सोेपा, सुगम
वैकुंठींचा ॥३॥ सकळांसी येथे आहे अधिकार । कलियुगी उद्धार हरिनामें ॥४॥ तुका म्हणे नामापाशीं चारी मुक्ति । ऐसें बहुतां ग्रंथीं बोलियेलें ॥५॥
११८९. लटिके
१. खोटे
हांसें लटिके रडें । लटिकें उडे
२. उड्या मारतो, नाचतो
लटिक्यापें
३. खोट्याजवळ
॥१॥ लटिके माझें
४. माझेपणा
लटिकें तुझें
५. तुझेपणा
। लटिके ओझें लटिक्यांचें ॥२॥ लटिकें गाय लटिकें ध्याय । लटिकें जाय लटिक्यापें ॥३॥ लटिका भोगी
६. भोक्ता-भोगणारा
लटिका त्यागी । लटिका जोगी
७. योगी
जगमाया
८. मायाकार्य जगत्
॥४॥ लटिका तुका
९. मी स्वतः
लटिक्या भावें१०
१०. भावनेने (जगत्कल्याणाच्या)
। लटिकें बोले लटिक्यासवें११
११. खोट्याबरोबर
॥५॥
११९०. झालों
१. (कृतार्थ) झालो
’ म्हणती त्याचे मज वाटे आश्चर्य । ऐका नव्हे धीर
२. दम धरवत नाही (यासंबंधी तुम्हाला काही गोष्टी सांगण्याविषयी)
वचन माझें ॥ध्रु॥ शिजलिया अन्ना ग्वाही
३. साक्ष
दांत हात । जिव्हेंसी चाखतां न कळे कैसें? ॥२॥ तापलिया तेला बावन
४. मलयागीरी पर्वतावरील अतिशय उत्तम चंदन
चंदन । बुंदें
५. थेंबाने
एक क्षण शीतळ
६. थंड
करी ॥३॥ पारखी
७. परीक्षक
तो जाणे अंतरींचा भेद
८. प्रकार
मूढजना
९. मूर्ख लोकांना
छंद१०
१०. नाद
लावण्याचा११
११. (वरवरच्या) सौंदर्याचा, रूपाचा
॥४॥ तुका म्हणे कसी१२
१२. (सोने, रूपे इ.धातुंची परीक्षा) कसोटीला
निवडे आपण । शुद्ध१३
१३. उत्तम
मंद१४
१४. मध्यम
हीन१५
१५. कनिष्ठ
जैसे तैसें ॥५॥
११९१. हेचि थोर भक्ति आवडती देवा । संकल्पावी
१. समर्पण करावी
माया
२. प्रेम, मोह
संसाराची ॥१॥ ठेविले अनंते तैसेंचि रहावें । चित्तीं असों द्यावे समाधान ॥ध्रु॥ वाहिल्या
३. बाळगली असता
उद्वेग
४. काळजी, चिंता
दु:खचि केवळ । भोगणे
५. सुख किंवा दुःख
ते फळ संचिताचें
६. अनंत पूर्वजन्मार्जित साचलेले कर्म
॥३॥ तुका म्हणे घालूं तयावरी भार
७. (योगक्षेमाचे) ओझे
वाहूं
८. अर्पण करू
हा संसार देवापायीं ॥४॥
११९२. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ
१. पापरूपी कारण
। संचिताचें फळ आपुलिया ॥१॥ मग वायांविण
२. व्यर्थ
दु:ख वाहों नये
३. मनात बाळगू नये
। रुसोनियां काय देवावरी? ॥ध्रु॥ ठाउकाचि
४. माहीतच
आहे संसार दु:खाचा । चित्तीं शीण
५. दुःख
त्याचा वाहों नये
६. धारण करू नये
॥३॥ तुका म्हणे नाम त्याचे आठवावें । तेणें विसरावें जन्मदु:ख ॥४॥
११९३. आतां माझे नका वाणूं
१. वर्णन करू नका
गुणदोष । करितों उपदेश याचा कांहीं ॥१॥ मानदंभासाठी छळीतसे
२. त्रास देत असेन तर
कोणा । आण
३. शपथ
या चरणां विठोबाची ॥२॥ तुका म्हणे हे तो ठावें पांडुरंगा । काय कळे जगा अंतरींचें
४. अंतःकरणातील
॥३॥
११९४. वांझा गाई दुभती
१. दूध देतात
देवा
२. अहो चिंतामणि देवा!
ऐसी तुझी ख्याती
३. प्रसिद्धी
॥१॥ ऐसें मागत नाहीं तुज । चरण
४. गणपतीचे
दाखवावें मज ॥ध्रु॥ चातक पाखरूं । त्यासी वर्षे
५. वृष्टी करतो
मेघधारू
६. मेघ आपल्या धारांनी
॥३॥ पक्षी राजहंस । अमोलिक मोती त्यास ॥४॥ तुका म्हणे देवा! । कां गा खोंचलासी जीवा
७. (वा.) मनाला लागणे, टोचणे, रुपणे, भग्नोत्साह होणे
? ॥५॥
११९५. परतें
१. दूर, वेगळा (अधिकार, जाती यांपासून)
मी आहे सहजचि दुरी । वेगळे भिकारी नामरूपा
२. नांवलौकिकापासून
॥१॥ नलगे रुसावें धरावा संकोच
३. लज्जा
। सहज तें नीच आले भागा
४. वाट्याला
॥ध्रु॥ पडिलिये ठायीं उच्छिष्ट सेवावें । आर्त
५. इच्छा
तेंचि देवें केलें ऐसें ॥३॥ तुका म्हणे तुम्ही आम्हां जी वेगळे । केले ते निराळे द्विज
६. ब्राह्मण
देवा! ॥४॥
११९६. चिंतामणिदेवा गणपतीसी आणा । करवावें भोजना दुजे पात्रीं
१. दुसऱ्या पात्रावर
॥१॥ देव म्हणती ‘तुकया एवढी कैंची थोरी
२. मोठेपण
? । अभिमानाभीतरी
३. अंतःकरणातील अहंकाराने
नागवलों
४. फसवणूक झाली, लुटला गेलो
’ ॥२॥ वाड
५. पुष्कळ
वेळ झाला शिळे झाले अन्न । तटस्थ
६. स्तब्ध
ब्राह्मण बैसलेती ॥३॥ तुका म्हणे देवा तुमच्या सुकृतें
७. पुण्याईने
। आणीन त्वरित
८. लवकर
मोरयासी
९. गणरायाला
॥४॥
११९७. ‘भोक्ता नारायण लक्षुमीचा पति’ । म्हणोनि प्राणा-हुति
१. भोजनाच्या आरंभी पाच प्राणांना देतात ते पाच घास
घेतलिया ॥१॥ भर्ता
२. भरण-पोषण करणारा
आणि भोक्ता कर्ता आणि करविता । आपण सहजता पूर्णकाम
३. अवाप्तकाम, ज्याच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत असा-तृप्त
॥२॥ विश्वंभर कृपादृष्टी सांभाळीत । प्रार्थना
४. ‘सावकाश होऊ द्या’ अशी
करीत ब्राह्मणांची ॥३॥ कवळोकवळी
५. प्रत्येक घासाला
नाम घ्यावें गोविंदाचें । भोजन भक्तांचें तुका म्हणे ॥४॥
११९८. माझा स्वामी
१. श्रीपांडुरंगराय
तुझी वागवितो
२. धारण करतो
लात
३. चरण (श्रीवत्सलांछन)
। तेथें मी पतित काय आलों? ॥१॥ तीर्थे तुमच्या चरणी जाहली निर्मळ । तेथे मी दुर्बळ काय वाणूं? ॥२॥ तुका म्हणे तुम्ही देवा
४. देवांनाही
द्विज
५. ब्राह्मण
वंद्य
६. वंदनीय
। मी तो काय निंद्य
७. निंदनीय
हीन
८. क्षुद्र
याती
९. जातीचा
? ॥३॥
११९९. वंदिलें वंदावें जीवाचिये साठीं
१. जीव अर्पण करून
। किंवा बरी तुटी
२. संबंध न ठेवलेले
आरंभीच ॥१॥ स्वहिताची
३. स्वतःच्या कल्याणाची
चाड
४. इच्छा
ते ऐका हे बोल
५. शब्द
। अवघेचि मोल
६. किंमत
धीरा अंगीं ॥ध्रु॥ सिंपिलें
७. सिंचन करणे
तें रोप वरीवरी
८. पुन्हा-पुन्हा, वरचेवर
बरें । वाळलिया पुरें
९. पुराने (सुद्धा)
कोंभ१०
१०. अंकुर
न ये ॥३॥ तुका म्हणे म्हणे टाकी घायें११
११. दगड घडविण्याचे लोखंडाचे टोकदार हत्यार
देवपण । फुटलिया जन कुला१२
१२. ढुंगण
पुसी ॥४॥
१२००. आम्हां विष्णुदासां हेंचि भांडवल । अवघा
१. सगळा, सर्व
विठ्ठल धन वित्त
२. मालमत्ता, ऐवज
॥१॥ वाणी
३. उणीव, तूट
नाहीं, घ्यावे आपुलिया हातें । करोनियां चित्तें समाधान ॥ध्रु॥ तुका म्हणे द्रव्य
४. (लौकिक) धन
मेळविले मागें । हें तो कोणासंगें आलें नाहीं ॥३॥
१२०१. सुखाचे
१. सुखकारक साधनाने
व्यवहारी सुख लाभ झाला । आनंद कोंदला
२. दाटला, भरला
मागे पुढे
३. सर्वत्र
॥१॥ संगती
४. ऐक्य, सहवास
पंगती
५. (सख्यत्व)
देवासवें घडे । नित्य नित्य
६. नेहमी, निरंतर
जोडे
७. प्राप्त होते
तेंचि साच ॥ध्रु॥ समर्थाचे घरीं सकळ संपदा । नाहीं तुटी
८. कमतरता
कदा
९. केव्हाही
कासयाची ॥३॥ तुका म्हणे येथे लाभाचिया कोटी१०
१०. कोट्यवधी
। बहु वाव११
११. जागा, अवकाश
पोटीं१२
१२. अंतःकरणात
समर्थाचे ॥४॥
१२०२. काय देवें खातां घेतले हातींचें? । आलें हे तयाचे थोर भय? ॥१॥ म्हणतां गजरें
१. मोठ्या घोषाने
‘राम’ एकसरें
२. एकसारखा, एकदम
। जळती पापें थोरें भय धाकें ॥ध्रु॥ काय खोळंबले
३. स्तब्ध-बंद पडतात काय?
हात पाय अंग । नाशिले हे सांग रूप
४. सौंदर्य
काय? ॥३॥ कोण लोकीं
५. लोकांनी
सांग घातला बाहेरी
६. बहिष्कृत केले, हद्दपार केले?
? । म्हणतां ‘हरि हरि’ तुका म्हणे ॥४॥
१२०३. उत्तम त्या याति । देवा शरण अनन्यगति ॥१॥ नाही दुजा
१. भेदाला
ठाव
२. आश्रय, अवकाश, मागमूस
। कांही उत्तम मध्यम भाव
३. भाग, भेद (नाही)
॥ध्रु॥ उमटती
४. आढळतात, स्पष्ट होतात, उद्भूत होतात
ठसे
५. चिन्हे, लक्षणे
। ब्रह्मप्राप्ति अंगीं दिसे ॥३॥ भाविक
६. प्रेमळ
विश्वासी । तुका म्हणे नमन त्यांसी ॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

1 thought on “दिवस – ७५. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top