अनुक्रमणिका
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ७. ओवी क्र. ४० ते ५९
बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् ।
बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ॥१०॥
पैं११. (बीजं मां सर्वभूतानां)
आदिचेनि अवसरें२२. उत्पत्तिसमयीं
। विरूढे गगनाचेनि अंकुरें । जे अंतीं गिळी अक्षरें३३. अ,उ,म. ॐकाराची अक्षरें
। प्रणवपीठींचीं ॥४०॥
जंव हा विश्वाकारु असे । तंव जें विश्वाचिसारिखें दिसे । मग महाप्रळयदशे । कैसेंही नव्हे११. कांहीं सुद्धा नसतें
॥४१॥
ऐसें अनादि११. उत्पत्तिनाशरहित
जें सहज । तें, मी गा, विश्वबीज२२. जगाचें आदिकारण
। हैं हातातळीं३३. मुठींत, हातांत
तुज । देइजत असे ॥४२॥
मग उघड करूनि, पांडवा । जैं हे आणिसील सांख्याचिया गांवा११. आत्मानात्मविचाराच्या ठिकाणीं
। तैं ययाचा उपेगु२२. उपयोग
बरवा । देखशील ॥४३॥
परी हे अप्रासंगिक११. प्रसंगास अयोग्य
आलाप२२. बोल
। आतां असतु३३. असू दे
, बोलों संक्षेप । जाण तपियांच्या ठायीं तप । तें रूप माझें ॥४४॥
बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम् ।
धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ॥११॥
बळियांमाजीं११. (बलं बलवतां चाहमिति)
बळ । तें मी, जाणें, अढळ । बुद्धिमंतीं२२. (बुद्धिर्बुद्धिमतामस्मि)
केवळ । बुद्धि, तें मी ॥४५॥
भूतांच्या११. (धर्माविरुद्धो भूतेषु)
ठायीं कामु२२. हेतु, वासना
। तो मी, म्हणे, आत्मारामु३३. स्वरूपांत रममाण होणारा
। जेणें४४. ज्या हेतूस्तव
अर्थास्तव धर्मु । थोरु होय ॥४६॥
एहवीं, विकाराचेनि पैसे११. विस्तार, फैलाव
। करी कीर #इंद्रियाचेयाचि ऐसें । परी धर्मासि वेखासें२२. विरुद्ध
। जावों नेदी ॥४७॥
जे अप्रवृत्तीचा११. निषेधाचा
अव्हांटा२२. आडमार्ग
। सांडूनि, विधीचिया३३. शास्त्रविहित कर्माच्या
निघे वाटा । तेवींचि नियमाचा दिवटा४४. मशाल
। सवें चाले ॥४८॥
कामु ऐसिया वोजा११. रीतीनें
प्रवर्ते । म्हणौनि धर्मासि होय पुरतें२२. पूर्ण
। मोक्षतीर्थांचें मुक्ते । संसार भोगी३३. संसार भोगणारे मुक्त होतात, तो काम संसार भोगतो म्हणजे जणू काय मोक्षतीर्थातील मोतीच भोगतो
॥४९॥
जो श्रुतिगौरवाच्या११. वेदमहत्वाच्या
मांडवीं । काम२२. विध्युक्त विवाह करून वंशविस्तार करतो
सृष्टीचा वेलु वाढवी । जंव कर्मफळेंसि पालवी । अपवर्गी३३. मोक्षापर्यंत
टेंके ॥५०॥
ऐसा नियतु कां कंदर्पु११. काम
। जो भूतां या बीजरूपु२२. कारणभूत
। तो, मी, म्हणे बापु । योगियांचा ॥५१॥
ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये ।
मत्त एवेति तान्विद्धि न त्वहं तेषु ते मयि ॥१२॥
हैं११. (तेजस्तेजस्विनामहं)
एकेक किती सांगावें । आतां, वस्तुजातचि२२. सर्व दृश्य पदार्थ
आघवें । मजपासूनि जाणावें । विकारलें३३. विस्तार पावलें, आकाराला आले
असे ॥५२॥
जे११. (ये चैव सात्विका भावा इति)
सात्विक हन भाव२२. विकार
। कां, रजतमादि सर्व । तें ‘ममरूपसंभव३३. (मत्त एवेति तान्विद्धि) माझ्या स्वरूपापासून उत्पन्न झालेलें
‘ । वोळखें तूं ॥५३॥
हे११. (ते मयि)
जाले तरी माझ्या ठायीं । परी२२. (न त्वहं तेषु)
तयामाजीं मी नाहीं । जैसी स्वप्नीच्या डोहीं । जागृति न बुडे ॥५४॥
जैसी११. (अयं भाव:)
रसाचीच२२. केवळ रसाचीच
सुघट३३. चांगली बनलेली
। बीजकणिका४४. बीं, दाणा
घनवट५५. घट्ट
। परी तियेस्तव६६. तिजपासून
होय काष्ठ । अंकुरद्वारें ॥५५॥
मग तया काष्ठाच्या ठायीं । सांग पां, बीजपण असे काई ?। तैसा मी विकारीं नाहीं । जरी विकारला #दिसे ॥५६॥
पैं गगनीं उपजे आभाळ । परी तेथ गगन नाहीं; केवळ ! । अथवा आभाळीं होय सलिल११. पाणी
। तेथ अभ्र नाहीं ॥५७॥
मग तया उदकाचेनि आवेशें११. घर्षणानें
। प्रगटलें तेज जें लखलखीत दिसे । तिये विजूमाजीं२२. विजेंत
असे । सलिल कायी ? ॥५८॥
त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् ।
मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् ॥१३॥
सांगें, अग्नीस्तव धूम११. धूर
होये । तिये धूमीं काय अग्नि आहे ?। तैसा, विकारु हा, ‘मी नोहें’ । जरी विकारला असे ॥५९॥ ॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ७, ओवी क्र. ३०० ते ३५१
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
त्वं तु कल्पः कविर्दक्षः, सुभगोऽमृतभाषणः । न कर्ता नेहसे किञ्चिज्जडोन्मत्तपिशाचवत् ॥२८॥
परंतु तू मात्र समर्थ, विद्वान, साक्षेपी, भाग्यवान, अमृताप्रमाणे भाषण करणारा असून जड किंवा उन्मत्त पिशाचाप्रमाणे वागतोस. कशाचीही इच्छा करीत नाहीस व काही करीतही नाहीस. ॥२८॥
सर्वज्ञज्ञाता तूं होसी । तें ज्ञातेपण दिसों न देसी । कांहीं करिसी ना वांछिसी । जडत्वें दाविसी निजशांती ॥३००॥
सर्वथा उगा अससी । परी तूं अंगें विकळ नव्हसी । अंगी अव्यंगु दिसतोसी । स्वरूपरूपेंसी शोभितु ॥३०१॥
ज्ञान एकलेपणे ठेलें । दुजेनिवीण परदेशी झालें । तें तुजमाजी सामावलें । यालागी आले ‘कवि’ पद ॥३०२॥
करूनि झालासी अकर्ता । हेचि तुझी थोर ‘दक्षता’ । ब्रह्मरसें ‘रसाळ’ बोलतां । चवी अमृता ते कैंची ॥३०३॥
ब्रह्मरस तूं प्यालासी । ब्रह्मानंदें मातलासी । जगीं ‘उन्मत्त’ झालासी । दृष्टी नाणिसी कोणातें ॥३०४॥
सदा सावध निजरूपेंसी । यालागी ‘माझें-तुझें’ न म्हणसी । तेंचि ‘पिसेंपण’ तुजपाशीं । दिसे जगासी सर्वथा ॥३०५॥
निजबोधे तृप्त झालासी । परमानंदें निवालासी । ती ही लक्षणे तुजपासीं । निर्धारेंसी दिसताती ॥३०६॥
जनेषु दह्यमानेषु, कामलोभदवाग्निना । न तप्यसेऽग्निना मुक्तो, गङ्गाम्भस्थ इव द्विपः ॥२९॥
काम आणि लोभ यांच्या वणव्याने सर्व जन पोळून गेले आहेत परंतु तू मात्र कामलोभादिकांच्या ज्वाळांनी भाजला जात नाहीस. गंगेत यथेच्छ डुंबणाऱ्या (आणि त्यामुळे दोन्ही तीरांवरील वणव्याच्या उष्णतेचा ज्याला त्रास होत नाही अशा) हत्तीप्रमाणे तू त्या तापापासून मुक्त आहेस. ॥२९॥
कामलोभदावाग्नी- । माजी जळतां लोक तीन्ही । देखत असों जी नयनीं । वेगळा कोणी दिसेना ॥३०७॥
ते दावाग्नीमाजी असतां । तूं न पोळसी गा अवधूता । नवल तुझी अक्षोभ्यता । नकळे सर्वथा आम्हांसी ॥३०८॥
वणवा जळे दोंही थडीं । गजें गंगाजळी दिधली बुडी । त्यासी न लागती तापाच्या वोढी । तैसें निरवडी तुज देखों ॥३०९॥
ऐशी द्वंद्वे तुज नातळती । दृढ राहिलासी ब्रह्मस्थितीं । कांहीं एक करीन विनंती । कृपामूर्ति दयाळुवा ॥३१०॥
त्वं हि नः पृच्छतां ब्रह्मन्नात्मन्यानन्दकारणम् । ब्रूहि स्पर्शविहीनस्य, भवतः केवलात्मनः ॥३०॥
हे ब्रह्मवेत्त्या, तुला विषयांचा स्पर्श नाही, केवळ आत्मस्वरूपामध्ये तू रमलेला दिसतोस; तरी त्या आत्मस्वरूपामध्ये तू कसा रमतोस त्याचे कारण कृपा करून आम्हांला सांग. ॥३०॥
तूं ब्रह्मवेत्ता ब्राह्मण । निजानंदें परिपूर्ण । त्या आनंदाचे कारण । विशद करून सांगावें ॥३११॥
तूं देही वर्तसी विदेहस्थिती । तुज विषय आतळू न शकती । हे अलिप्तपणाची प्राप्ती । कवण्या रीतीं तुज झाली ॥३१२॥
तुज नाहीं रायाची भीड । न करिसी धनवंताची चाड । दीनवचन मानिसी गोड । पुरविसी कोड निजबोधे ॥३१३॥
ऐसा केवळ तूं कृपाळू । आर्तबंधु दीनदयाळु । निजात्मभावें तूं केवळु । भक्तवत्सलु भावार्थे ॥३१४॥
ऐसा यदूचा संवादु । आवडी सांगे गोविंदु । उद्धवासी म्हणे सावधु । हृदयीं बोधु धरावा ॥३१५॥
श्रीभगवानुवाच- यदुनैवं महाभागो, ब्रह्मण्येन सुमेधसा । पृष्टः सभाजितः प्राह, प्रश्रयावनतं द्विजः ॥३१॥
श्रीभगवान म्हणाले– महाबुद्धिवान आणि ब्राह्मणांविषयी पूज्यभाव असणाऱ्या यदुराजाने याप्रमाणे विचारले असता उत्तम प्रकारे सत्कारित झालेला तो महातेजस्वी अवधूत विनयाने नम्र झालेल्या राजाला सांगता झाला. ॥३१॥
श्रीमुखें श्रीकांत । यदूचे भाग्य वर्णित । ब्राह्मणभक्त सत्त्वयुक्त । बुद्धिमंत श्रद्धाळु ॥३१६॥
भगवद्भाग्ये भाग्यवंतु । यदूसी भेटला तो अवधूतु । त्यासी होऊनि अतिविनीतु । असे विनवितु निजहिता ॥३१७॥
मृदु मंजुळ वचनीं प्रार्थिला । मधुपर्कविधानें पूजिला । अवधूत अतिसंतोषला । बोलता झाला निजमुखें ॥३१८॥
अवधूताचे गुरू त्याचे निजानंदकारण (३१९ ते ३५१)
ब्राह्मण उवाच- सन्ति मे गुरवो राजन् बहवो बुद्ध्युपाश्रिताः । यतो बुद्धिमुपादाय मुक्तोऽटामीह ताञ्छृणु ॥३२॥
ब्राह्मण म्हणाला – हे राजा, माझ्या बुद्धीने मी अनेक गुरू स्वीकारलेले आहेत. त्यांच्यापासून शिक्षण घेऊन निःसंग वृत्तीने मी भूतलावर संचार करीत असतो. त्या गुरूंची नावे ऐक. ॥३२॥
क्षीरसागर उचंबळला । की कृपेचा मेघ गर्जिन्नला । निजसुखाचा वाधावा आला । तैसें बोलिला ब्राह्मणु ॥३१९॥
ऐकें राजया चूडामणी । यदुकुळदीप दिनमणी । धन्य धन्य तुझी वाणी । निजगुणी निवविलें ॥३२०॥
राजा आणि सात्त्विकु । सिद्धलक्षणे लक्षकु । पृथ्वीमाजीं तूंचि एकु । न दिसे आणिकु सर्वथा ॥३२१॥
सुंदर आणि सगुण । उत्तमोत्तम केला प्रश्न । पुसिलें निजानंदकारण । तें यथार्थ जाण सांगेन ॥३२२॥
गुरुविण आत्मप्राप्ती । सर्वथा न घडे गा नृपती । ते गुरूही मी तुजप्रती । यथानिगुती सांगेन ॥३२३॥
निजबुद्धीच्या विवेकस्थितीं । बहुत गुरु म्यां केले असती । जें जें सद्गुण म्यां देखिले भूतीं । ते ते स्थितीं तो गुरु ॥३२४॥
बुद्धीने अंगिकारिलें गुणा । निजधैर्यें धरिली धारणा । तेणें मी मुक्त झालों जाणा । स्वेच्छा अटणा करीतसें ॥३२५॥
संसारु तरावया । मुख्य ‘सद्बुद्धि’ गा राया । रिगमू नाही आणिका उपाया । व्यर्थ कासया शिणावें ॥३२६॥
सद्बुद्धि नाहीं ज्यापासीं । तो संसाराची आंदणी दासी । उसंत नाही अहर्निशीं । दुःखभोगासी अनंत ॥३२७॥
सद्बुद्धि नाही हृदयभुवनीं । तेथ वैराग्य नुपजे मनीं । मा तो तरेल कैसेनीं । विवेक स्वप्नीं न देखे ॥३२८॥
वैराग्याचेनि पडिपाडें । ज्यासी सद्बुद्धि सांपडे । तेथ संसार कोण बापुडें । घायें रोकडे विभांडी ॥३२९॥
आधी संसारु एकु असावा । मग तो खटाटोपें नासावा । जो रिघाला विवेकगांवा । त्यासी तेव्हां तो नाहीं ॥३३०॥
संसारनाशासी मूळ । शिष्य-प्रज्ञाचि केवळ । तिचे झाल्या अढळ बळ । होये मृगजळ संसारु ॥३३१॥
जे मी गुरु सांगेन म्हणे । तें निजप्रज्ञेचेनि लक्षणें । हेयादेयउपायपणें । घेणे त्यजणे सविवेके ॥३३२॥
हेचि मऱ्हाठिया भाखा । सांगेन तें सावध ऐका । जेणे शिष्याचा आवांका । पडे ठाउका प्रत्यक्ष ॥३३३॥
ऐक प्रज्ञेची लक्षणे । सांगेन दृष्टांतपणे । सूप चाळणी रांधणें । घेणे त्यजणे विवेकें ॥३३४॥
चाळणीमाजीं जें जें पडे । सूक्ष्म निजतत्त्व तळी सांडे । उरती गुणदोषांचे खडे । करिती बडबडे खडबडित ॥३३५॥
ऐसी जे अवस्था । ते त्यागावी सर्वथा । भ्रंशु होईल स्वार्था । हे राखतां त्रिशुद्धी ॥३३६॥
सुपाची दशा ते ऐशी । त्यजी रजःकण भुसासी । निडारल्या निजबीजासी । निजहृदयेंसी राखत ॥३३७॥
स्वयें वैराग्ये तापणें । ते दशा ‘रांधणे’ म्हणे । अपक्कासी परिपक्क करणें । निजगुणें निजांगें ॥३३८॥
एवं या दोनी दशा । दृढ धराव्या वीरेशा । तेणें परमार्थु होये आपैसा । जेवीं आरिसा हातींचा ॥३३९॥
यदूसी म्हणे ब्राह्मण । जें म्यां सांगितले लक्षण । तेथे ठेवूनियां मन । सावधान परियेसीं ॥३४०॥
जो जो जयाचा घेतला गुण । तो तो गुरु म्यां केला जाण । गुरूसी आले अपारपण । जग संपूर्ण गुरु दिसे ॥३४१॥
ज्याचा गुण घेतला । तो सहजें गुरुत्वा आला । ज्याचा गुण त्यागरूपे घेतला । तोही गुरु झाला अहितत्यागें ॥३४२॥
एवं त्यागात्यागसमतुकें । दोहींसी गुरुत्व आलें निकें । राया तूं पाहें पां विवेकें । जगचि असकें गुरु दिसे ॥३४३॥
ऐसें पाहतां सावकाशीं । गुरुत्व आले जगासी । हेंचि साधन जयापासीं । तोचि परमार्थासी साधकु ॥३४४॥
ऐसें सांगतां अचाट । तुज वाटेल हे कचाट । तरी गुरु सांगों श्रेष्ठ श्रेष्ठ । मानिले वरिष्ठ निजबुद्धी ॥३४५॥
पृथिवी वायुराकाशमापोऽग्निश्चन्द्रमा रविः । कपोतोऽजगरः सिन्धुः, पतङ्गो मधुकृद्गजः ॥३३॥
मधुहा हरिणो मीनः, पिङ्गला कुररोऽर्भकः । कुमारी शरकृत्सर्प, ऊर्णनाभिः सुपेशकृत् ॥३४॥
पृथ्वी, वायू, आकाश, पाणी, अग्नी, चंद्र, सूर्य, कबुतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती,- ॥३३॥
भुंगा, हरिण, मासा, पिंगला (या नावाची वेश्या), टिटवी, बाळक, कुमारी, बाण करणारा, साप, कातीण आणि भिंगुरटी (कुंभारीण माशी). ॥३४॥
गुरु सांगेन अशेष । संख्याप्रमाण ‘चोवीस’ । त्यांची नांवें तूं परिस । सावकाश सांगेन ॥३४६॥
पृथ्वी वायु आकाश । अग्नि आप सीतांश । सातवा तो चंडांश । कपोता परिस आठवा ॥३४७॥
अजगर सिंधु पतंग । मधुमक्षिका गज भृंग । हरिण मीन वेश्या साङ्ग । नांवें सुभग ‘पिंगला’ ॥३४८॥
टिटवी आणि लेंकरूं । कुमारी आणि शरकारु । सर्प कातणी पेशस्करु । इतुकेन गुरु चोवीस ॥३४९॥
पावावया तत्त्व पंचविसावें । चोविसां गुरूंसी उपासावें । विवेकयुक्तिस्वभावें । गुरू भजावे निजबुद्धी ॥३५०॥
ठाकावया निजबोधासी । निजविवेकें अहर्निशीं । गुरुत्व देऊनि अनेकांसी । निजहितासी गुरु केले ॥३५१॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. १२०४ ते १२२०
१२०४.
भय हरिजनीं । कांहीं न धरावें मनीं ॥१॥ नारा-यणा ऐसा सखा । काय जगाचा हा लेखा११. गणती, पाड, किंमत
॥ध्रु॥ चित्त वित्त हेवा२२. इच्छा
। समर्पून राहा देवा ॥३॥ तुका म्हणे मन । असों द्यावें समाधान३३. शांत
॥४॥
१२०५.
आयुष्य मोजावया बैसला मापारी११. मोजणारा (काळ)
। तूं कां रे वेव्हारी संसाराच्या? ॥१॥ नेईल ओढोनि ठाउकें२२. माहीत
नसतां । न राहे दुश्चिता३३. उदास, निष्काळजी; (पा.भे. दुश्चित्त)
हरिविण ॥ध्रु॥ कठिण हे दु:ख यम जाचतील४४. छळतील, दुःख देतील
। कोण सोडवील तया ठायीं? ॥३॥ राहतील दुरी सज्जन५५. मित्र
सोयरीं६६. आप्त, नातेवाईक
। आठवीं श्रीहरी लवलाही७७. त्वरेने, लवकर
॥४॥ तुका म्हणे किती करिसी लंडायी८८. उन्मत्तपणा, लबाडी, स्वच्छंदीपणा
। होईल भंडाई९९. फजिती, अपकीर्ती
पुढे थोर ॥५॥
१२०६.
होऊं नको कांहीं या मना आधीन । नाइकें वचन याचे काही ॥१॥ हटियाची११. हट्टाची
गोष्टी मोडून टाकावी । सोई२२. मार्ग, संबंध, आधार
ही धरावी विठोबाची ॥ध्रु॥ आपुले आधीन करूनियां ठेवा । नाहीं तरी जीवा घातक हे३३. (मन)
॥३॥ तुका म्हणे झाले जे मना आधीन । तयांसी बंधन यम करी ॥४॥
१२०७.
नामाविण काय वाउगी११. व्यर्थ, मिथ्या
चावट२२. बाष्कळ बडबड, वात्रटपणा
। वायां वटवट३३. निरर्थक बडबड
हरिविण ॥१॥ फुकटची सांगे लोकाचिया गोष्टी । ‘राम’ जगजेठी४४. जगत्श्रेष्ठ परमेश्वर
वाचे नये ॥ध्रु॥ मेळवूनि चाट५५. लबाड, उनाड, दुष्ट लोक
करी सुरापान६६. मद्यपान
। विषयांच्या गुणें७७. योगाने, आधाराने
मातलासे८८. उन्मत्त होतोस
॥३॥ बैसोनि टवाळी९९. कुचेष्टा, निंदा
करी दुजयाची । नाहीं गोविंदाची आठवण ॥४॥ बळें यम दांत खाय तयावरी । जंव भरे दोरी आयुष्याची१०१०. आयुर्मर्यादा
॥५॥ तुका म्हणे तुला सोडवील कोण? । नाहीं नारायण आठविला ॥६॥
१२०८.
संत गाती हरिकीर्तनीं । त्यांचे घेईन पायवणी११. चरणतीर्थ
॥१॥ हेचि तप तीर्थ माझें । आणीक मी नेणें दुजें२२. दुसरे (साधन)
॥ध्रु॥ काया कुरवंडी करीन३३. (वा.) ओवाळून टाकणे, समर्पण करणे
। संत महंत ओवाळीन ॥३॥ संत महंत माझी पूजा । आन४४. अन्य, भिन्न
भाव नाहीं दुजा ॥४॥ तुका म्हणे नेणें कांहीं । अवघे आहे संतांपायीं ॥५॥
१२०९.
झाले भांडवल । अवघा पिकला ‘विठ्ठल’ ॥१॥ आतां वाणी११. उणीव, तूट
काशासाठीं । धीर२२. धैर्य
धरावाच पोटीं३३. अंतःकरणात
॥ध्रु॥ आपुल्या संकोचें४४. भीती, लाज, भिडेने
। म्हणऊनि तेथें टांचें५५. उणे, थोडे, टंचाई
॥३॥ घेतों खऱ्या मापें६६. (प्रेमाच्या) परिमाणाने
। तुका देखोनियां सोपें ॥४॥
१२१०.
शुद्ध ऐसें ब्रह्मज्ञान । करा मन सादर११. सावधान, तत्पर
॥१॥ रवि२२. सूर्य
रसां सकळां शोषी । गुणदोषीं न लिंपे ॥ध्रु॥ कोणासवें नाहीं चोरी३३. चोरी
। सकळांवरी समत्व४४. समत्व
॥३॥ सत्य तरी ऐसे आहे । तुका पाहें उपदेशीं ॥४॥
१२११.
अग्नि हा पाचारी११. अग्नि हा पाचारी
कोणासी साक्षेपें२२. साक्षेपें
? । हिवें३३. हिवें
तोचि तापे४४. तापे
जाऊनियां ॥१॥ उदक५५. उदक
म्हणे काय ‘या हो मज प्यावें’ । तृषित६६. तृषित
तो धांवे सेवावया ॥२॥ काय वस्त्र म्हणे ‘या हो मज नेसा७७. नेसा
’ । आपुलें स्वइच्छा जग वेढी८८. वेढी
॥३॥ तुकया स्वामी९९. स्वामी
म्हणे काय ‘मज स्मरा’ । आपुल्या उद्धारा लागूनियां ॥४॥
१२१२.
भक्त देवाघरिचा सुना११. कुत्रा
। देव भक्ताचा पोसणा२२. पोसला जाणारा (पोष्य)
॥१॥ येर येरां जडलें३३. संबद्ध, एकरूप झाले
कैसें? । जीवा अंग जैसे४४. अंग जैसे
तैसें ॥ध्रु॥ देव भक्ताची कृपाळू माता५५. माता
। भक्त देवाचा जनिता६६. जनक, पिता
॥३॥ तुका म्हणे अंगें । एक एकाचिया संगे ॥४॥
१२१३.
बरवयां बरवंट११. बरवंट
। विटे चरण सम२२. सम
नीट ॥१॥ तें म्यां हृदयीं धरिलें । तापशमन३३. त्रिविधतापाला शांत करणारी
पाउलें ॥ध्रु॥ सकळ तीर्थां अधिष्ठान४४. वास्तव्य, उगमस्थान
। करी लक्ष्मी संवाहन५५. (पायाची) सेवा करते
॥३॥ तुका म्हणे अंतीं । ठाव६६. आश्रय
मागितला संतीं ॥४॥
१२१४.
मांस चर्म११. कातडे
हाड । देवा अवघींच गोड ॥१॥ जे जे हरिरंगी रंगले । कांहीं न वचे वायां गेले ॥ध्रु॥ वेद खाय शंखासुर । त्याचे वागवी२२. धारण करतो
कलेवर३३. मृत शरीर (शंखरूपाने)
॥३॥ तुका म्हणे ऐसा । बराडी४४. हावरा, आधाशी
या भक्तिरसा ॥४॥
१२१५.
कोणा चिंता आड । कोणा लोकलाज नाड११. विघ्न, प्रतिबंध (येतो)
॥१॥ कैंचा राम अभागिया? । करी वटवट२२. बडबड
वायां ॥ध्रु॥ स्मरणाचा राग । क्रोधे विटाळले अंग ॥३॥ तुका म्हणे जडा । काय चाले या दगडा? ॥४॥
१२१६.
आपुलिया काजा११. कामासाठी, कर्तव्यसाठी (जगत्कल्याणाच्या)
। आम्ही सांडियेलें लाजा ॥१॥ तुम्हां असों जागवीत । आपुलिया हाती२२. हाती
हित ॥ध्रु॥ तुम्ही देहशून्य३३. देहशून्य
। आम्हां कळे पापपुण्य ॥३॥ सांगायासी लोकां । उरउरीत उरला४४. शिल्लक राहिलो; (पा.भे. उर्वरित)
तुका ॥४॥
१२१७.
सत्य आम्हां मनीं । नव्हों गाबाळाचे धनी११. धनी
॥१॥ ऐसें जाणा रे सकळ । भरा शुद्ध, टाका मळ२२. मळ
॥ध्रु॥ देतों तीक्ष्ण३३. तीक्ष्ण
उत्तरें४४. उत्तरें
। पुढे व्हावयासी बरें ॥३॥ तुका म्हणे बरें घडे । देशोदेशीं चाले कोडें ॥४॥
१२१८.
शिकवूनि हित । सोयी११. सोयी
लावावे हे नीत२२. नीत
॥१॥ त्याग करूं नये खरे । ऐसे विचारावें बरें ॥ध्रु॥ तुमचिया तोंडें । धर्माधर्माचीच खंडें३३. खंडें
॥३॥ मजसाठी देवा! । कां हो लपविला हेवा४४. हेवा
॥४॥ झाला सावधान । त्यासी घालावें भोजन ॥५॥ तुका म्हणे पिता । वरी बाळाच्या तो हिता ॥६॥
१२१९.
सुख११. सुख
सुखा भेटे । मग तोडिल्या न तुटे ॥१॥ रवि रश्मिकळा । न ये घालितां पैं डोळां ॥ध्रु॥ दुरि ते जवळी । स्नेहें आकाशा कवळी ॥३॥ तुका म्हणे चित्त । माझें, पायीं अखंडित ॥४॥
१२२०.
तुम्हां न पडे वेंच११. वेंच
। माझा सरेल संकोच२२. संकोच
॥१॥ फुकासाठी जोडे यश । येथें कां करा आळस? ॥ध्रु॥ कृपेचे भुकेलें । होय जीवदान३३. जीवदान
केलें ॥३॥ तुका म्हणे शिकविले । माझें ऐकावें विठ्ठलें! ॥४॥ ॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.
ग्रंथ