दिवस – ७७. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् ।
मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् ॥१३॥
परी
१. (त्रिभिर्गुणमयैर्भावैरिति)
उदकीं जाली बाबुळी
२. शेवाळ
। ते उदकातें जैसी झांकोळी
३. आच्छादी
। कां वायांचि आभाळीं । आकाश लोपे ॥६०॥
हां गा स्वप्न लटिकें म्हणो ये । परि निद्रावशें बाणलें
१. अनुभवास येते, सत्य भासतें
होये । तंव आठवु काय देत आहे । आपणपेयां ? ॥६१॥
हे असो; डोळ्यांचें । डोळाचि पडळ
१. पडदा
रचे । तेणें, देखणेंपण
२. दृष्टी
डोळ्यांचें । न गिळिजे कायी ? ॥६२॥
तैसी
१. (मोहितं)
हे माझीच बिंबली । त्रिगुणात्मक साउली । कीं, मजचि आड वोडवली
२. प्राप्त झाली
जवनिका
३. पडदा
जैसी ॥६३॥
म्हणौनि
१. (नाभिजानाति)
भूतें मातें नेणती । माझींच; परी मी नव्हती । जैसी
२. (मामेभ्यः परमव्ययम्)
जळींची जळीं न विरती
३. विरघळत नाहीत
मुक्ताफळें
४. मोत्ये
॥६४॥
पैं पृथ्वीयेचा
१. मातीचा
घटु किजे । सवेंचि पृथ्वीसि मिळे तरी मेळविजे । एहवीं तोचि अग्निसंगे सिजे
२. भाजला असतां
। तरी वेगळा होय ॥६५॥
तैसें भूतजात सर्व । हे माझेचि कीर अवयव । परि मायायोगे जीव-
१. जीवपणाला
दशे आले ॥६६॥
म्हणौनि, माझेचि मी नव्हती । माझेचि मज नोळखती । अहंममता-भ्रांतीं
१. मी व माझें या भ्रांतीनें
। विषयांध जाले ॥६७॥
दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया ।
मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥१४॥
आतां
१. (दैवी ह्येषा)
महदादि
२. महत्तत्व आदि
हे माझी माया
३. (मम माया)
उतरोनियां
४. पार पडून, अतिक्रमून
; धनंजया । ‘मी होइजे’ हें आया
५. समजुतीस, अनुभवास
। कैसेनि ये ? ॥६८॥
जिये ब्रह्माचळाचा
१. ब्रह्म हाच कोणी एक पर्वत-त्याच्या
आधाडा
२. अर्धकड्यांत
। पहिलिया संकल्पजळाचा #उभडा
३. झरा
। सवेंचि महाभूतांचा बुडबुडा । साना
४. लहानसा
आला ॥६९॥
जे सृष्टिविस्ताराचेनि वोधें । चढत काळकलनेचेनि
१. कालगतीच्या
वेगें । प्रवृत्ति-निवृत्तीचीं
२. कर्ममार्ग व मोक्षमार्ग यांची
तुंगें
३. उंच
तटें
४. तीरें, डगरी
सांडी ॥७०॥
जे
१. (गुणमयी)
गुणघनाचेनि
२. सत्वादि गुण हेच कोणी मेघ-त्यांच्या
वृष्टिभरें । भरली मोहाचेनि
३. भ्रांतीच्या
महापुरें । घेऊनि जात नगरें । यम
४. मनोनिग्रह
नियमांचीं
५. इंद्रियनिग्रह
॥७१॥
जे द्वेषाच्या आवर्ती
१. भोंवऱ्यांत
दाटत । मत्सराचे वळसे
२. वळणें
पडत । माजीं प्रमादादि
३. उन्मत्तपणा वगैरे
तळपत
४. चमकतात
महामीन
५. मोठे मासे
॥७२॥
जेथ प्रपंचाचीं वळणें
१. वळसे, वांकणें
। कर्माकर्मांची वोभाणें
२. पूर, बोभाट
। वरी तरताती
३. तरंगतात
वोसाणें
४. पुरांतील लांकडें, पुराड, केरकचरा इत्यादि
। सुखदुःखांचीं ॥७३॥
रतीचिया
१. विषयसुखाच्या
बेटा । आदळती कामाचिया लाटा । जेथ जीव-फेन संघाटा
२. जीव हेंच कोणी फेंस त्यांचा समुदाय
सैंघ
३. पुष्कळ
दिसे ॥७४॥
अहंकाराचिया चळिया
१. लाटा
। वरि मदत्रयाचिया
२. विद्या, धन व सामर्थ्य हे तीन मद
उकळिया । जेथ विषयोर्मीच्या
३. विषयतरंगांच्या
आकळिया
४. लाटा
उल्लाळ
५. उसळतात
घेती ॥७५॥
उदयास्ताचे लोंढे
१. पूर
। पाडीत जन्ममरणाचे चोंढे
२. खळगे, धरण, धोंडे
। जेथ पांचभौतिक बुडबुडे
३. पंचमहाभूतांपासून झालेले शरीररूप बुडबुडे
। होती जाती ॥७६॥
सम्मोह
१. अत्यंत मोह
विभ्रम मासे । गिळिताती धैर्याचीं आविसें
२. आमिष
। तेथ देव्हडे
३. वांकडे, मोठे
भोवत वळसे
४. भोंवरे
। अज्ञानाचे ॥७७॥
भ्रांतीचेनि खडुळें
१. गढूळ पाणी
रेवले
२. रुतलें
आस्थेचे अवगाळें
३. दलदलीत, गाळांत
। रजोगुणाचेनि खळाळें
४. खळखळ वाजणारे ओढे, प्रवाह
। स्वर्ग गाजे ॥७८॥
तमाचे धारसे
१. प्रवाह
वाड
२. मोठे
। सत्त्वाचें स्थिरपण जाड । किंबहुना ? हे दुवाड
३. कठिण
। मायानदी ॥७९॥
पैं पुनरावृत्तीचेनि उभडें
१. पुरानें लाटांची उसळी
झळंबती
२. आदळतात, विरघळतांत
सत्यलोकींचे हुडे
३. बुरूज
घायें
४. आघातानें
गडबडती
५. कोसळून जातात
धोंडे । ब्रह्मगोळकांचे
६. ब्रह्मांडाचे
॥८०॥
तया पाणियाचेनि वहिलेपणें
१. वाहनीनें, प्रवाहानें
। अझुनि न धरिती वोभाणें
२. उभे राहण्याची स्थिति
। ऐसा मायापूर हा ! कवणें । तरिजेल गा? ॥८१॥

गुरुलक्षणनिरूपणाचा प्रस्ताव (३५२ ते ३५९)
कोण युक्ति कोण विचारु । कोणे लक्षणे कोण गुरु । केला तोही निजनिर्धारु । सविस्तारु परियेसीं ॥३५२॥
एते मे गुरवो राजंश्चतुर्विंशतिराश्रिताः । शिक्षावृत्तिभिरेतेषामन्वशिक्षमिहात्मनः ॥३५॥
राजा, याप्रमाणे हे चोवीस गुरू मी प्रमाणभूत मानलेले आहेत. यातील प्रत्येकाचा आचार पाहून त्यापासून मला उपयोगी पडेल असे शिक्षण मी घेतलेले आहे. ॥३५॥
ऐकें राजवर्य नृपती । विवेकधवलचक्रवर्ती । गुरुसंख्या तुजप्रती । यथानिगुती सांगितली ॥३५३॥
यांचिया शिक्षिता वृत्ती । शिकलों आपुलिया युक्तीं । मग पावलों आत्मस्थिती । विकल्पभ्रांती सांडूनी ॥३५४॥
यतो यदनुशिक्षामि, यथा वा नाहुषात्मज । तत्तथा पुरुषव्याघ्र, निबोध कथयामि ते ॥३६॥
हे ययातिपुत्रा, ज्यापासून जे अथवा जसे शिक्षण मी घेतले ते ते तसे तसे, हे नरव्याघ्रा, मी तुला सांगतो, ऐक. ॥३६॥
नहुषाचा पुत्र ययाती । ययातीचा यदु निश्चितीं । ‘नाहुषनंदन’ यदूसी म्हणती । मूळ व्युत्पत्ती तेणें योगें ॥३५५॥
यालागी म्हणे ‘नाहुषनंदना’ । पुरुषांमाजी पंचानना । सांगेन गुरूंच्या लक्षणा । विचक्षणा परियेसीं ॥३५६॥
ज्या गुरूचे जें शिक्षित । मी शिकलों सुनिश्चित । तें तें सांगेन समस्त । सावध चित्त करी राया ॥३५७॥
ऐकावया गुरुलक्षण । यदूने सर्वांग केलें श्रवण । अर्थी बुडवूनियां मन । सावधान परिसतु ॥३५८॥
शब्द सांडोनियां मागें । शब्दार्थामाजीं रिगे । जें जें परिसतु तें तें होय अंगें । विकल्पत्यागें विनीतु ॥३५९॥
पृथ्वीची गुरुलक्षणे (३६० ते ४०६)
भूतैराक्रम्यमाणोऽपि, धीरो दैववशानुगैः । तद्विद्वान्न चलेन्मार्गादन्वशिक्षं क्षितेर्व्रतम् ॥३७॥
दैवाच्या आधीन असलेल्या पंचमहाभूतांनी कितीही त्रास दिला तरी ईशसत्ता ओळखून बुद्धिवंताने आपल्या ठरलेल्या मार्गापासून रेसभरही ढळता उपयोगी नाही, हे व्रत मी पृथ्वीपासून शिकलो. ॥३७॥
परमार्थी मुख्य शांती । साधकांसी पाहिजे निश्चितीं । यालागी प्रथम गुरु क्षिती । निजशांतीलागूनी ॥३६०॥
‘पृथ्वी’ गुरु त्रिविध पाहीं । पर्वत वृक्ष आणि मही । यांची लक्षणे धरितां देहीं । गुरुत्व पाहीं पृथ्वीसी ॥३६१॥
अंतरनिग्रहो ते ‘शांती’ । बाह्येंद्रियनिग्रहो ते ‘दांती’ । उभयसहिष्णुता ते ‘क्षांती’ । क्षांतीसी क्षिति गुरु केली ॥३६२॥
पृथ्वी ते नानाभूतीं । माझी माझी म्हणौनि झोंबती । नाना भेदी भिन्न करिती । निजवृत्तिव्यवहारें ॥३६३॥
त्या भूतांचें भिन्न वर्तन । पृथ्वी संपादी आपण । मोडों नेदी अभिन्नपण । अखंड जाण सर्वदा ॥३६४॥
तैसें योगियांचे लक्षण । करितां कर्म भिन्नभिन्न । वृत्ति अखंडदंडायमान । सर्वदा जाण असावी ॥३६५॥
देहासी अदृष्टयोगें गती । भूतें अदृष्टयोगें आक्रमिती । भूतीं निजात्मता भाविती । द्वंद्वे न बाधिती साधकां ॥३६६॥
येथ भूतीं पृथ्वी पूजिली । नातरी विष्ठामूत्रीं गांजिली । हर्षविषादा नाही आली । निश्चळ ठेली निजक्षांतीं ॥३६७॥
भूतें पार्थिवेंचि तंव झाली । तिहीं पृथ्वी पूजिली ना गांजिली । ऐक्यें द्वंद्वभावा मुकलीं । निश्चळ झाली निजरूपें ॥३६८॥
तैसाचि योगियाही जाणा । भूतवैषम्ये डंडळेना । सर्वभूतीं निजात्मभावना । विषमीं समाना भावितां ॥३६९॥
आतां पृथ्वीची अभिनव शांती । ते सांगेन राया तुजप्रती । जे शांति धरोनि संतीं । भगवद्भक्ती पावले ॥३७०॥
पृथ्वी दाहेंकरूनि जाळिली । नांगर घालूनि फाळिली । लातवरी तुडविली । तोडिली झाडिली पैं भूतीं ॥३७१॥
तो अपराधु न मनूनि क्षिती । सवेंचि भूतांतें प्रसन्न होती । तेथेंचि पिकवूनि नाना संपत्ती । तृप्ति देती भूतांतें ॥३७२॥
ऐसऐशिया निजशांती- । लागी गुरु म्यां केली क्षिती । ऐक सभाग्या भूपती । शांतीची स्थिति अभिनव ॥३७३॥
एके अपराधु केला । दुजेनि उगाचि साहिला । इतुकेनि शांतु केवीं झाला । उपेक्षिला अपराधी ॥३७४॥
ऊंसु मोडी त्या गोड भारी । छेदितें शस्त्र गोड करी । पिळिलिया आळिलियावरी । स्वादाचिया थोरी अपकाऱ्या देतु ॥३७५॥
अपराध साहोनि अंगीं । त्याच्या प्रवर्ते हितालागीं । तेचि ‘शांती’ पैं जगीं । होय दाटुगी निर्द्वंद्व ॥३७६॥
अपराध साहोनि अंगावरी । अपराध्या होइजे उपकारी । हे शिकलों पृथ्वियेवरी । परोपकारी पर्वत ॥३७७॥
शश्वत्परार्थसर्वेहः, परार्थैकान्तसम्भवः । साधुः शिक्षेत भूभृत्तो, नगशिष्यः परात्मताम् ॥३८॥
पर्वतरूपाने व वृक्षरूपाने असणाऱ्या पृथ्वीपासून इतरांकरिता आपला आत्मा आहे हे शिकावे; इतरांच्या कल्याणासाठीच सर्व आकांक्षा बाळगाव्या व केवळ परहितासाठीच आपला जन्म आहे असे समजावे. साधकांनी पर्वत व वृक्ष यांचा शिष्य होऊन हे शिकावे. ॥३८॥
पृथ्वीपासोनि झाले । ते पर्वतही म्यां गुरु केले । त्यांपासोनि जें जें शिकलें । तेंही वहिले परियेसीं ॥३७८॥
रत्न-निकर समस्त । पर्वत परार्थचि वाहत । तृण जळ नाना अर्थ । तेही परार्थ धरितसे ॥३७९॥
कोणासी नेमी ना निवारी । उबगोनि न घाली बाहेरी । याचकाचे इच्छेवरी । परोपकारी देतसे ॥३८०॥
ग्रीष्माअंती सर्व सरे । परी तो देतां मागे न सरे । सवेंचि भगवंतें कीजे पुरें । वर्षोंनि जळधरें समृद्धी ॥३८१॥
जंव जंव उल्हासें दाता देतु । तंव तंव पुरवी जगन्नाथु । विकल्प न धरितां मनाआंतु । देता अच्युतु अनिवार ॥३८२॥
सत्य अच्युत दाता । हे न मनेचि तत्त्वतां । यालागीं दरिद्रता । विकल्पवंता लागली ॥३८३॥
एवं पर्वताची जे उत्पत्ती । ते परोपकारार्थ एकांतीं । उपकारावांचूनि चित्तीं । दुजी वृत्ति जाणेना ॥३८४॥
त्या पर्वताऐशी तत्त्वतां । असावी साधकासी उदारता । काया वाचा आणि चित्ता । सर्वस्व देतां उल्हासु ॥३८५॥
चेष्टामात्रे परोपकारता । सर्वदा करावी समस्तां । कोटिलाभा हाणोनि लाता । उपकारी तत्त्वतां उद्यतु ॥३८६॥
परमार्थाचिया चाडा । स्वार्थ सांडोनि रोकडा । परोपकारार्थ अवघडा । रिघे सांकडा परार्थे ॥३८७॥
उपकारुचि साकारला । की परोपकारु रूपा आला । तैसा जन्मोनि उपकारी झाला । उपकारला सर्वांसी ॥३८८॥
ऊंसु जैसा अवधारीं । सर्वांसी गोडपणे उपकारी । तैसाचि योगिया संसारीं । परोपकारी मधुरत्वें ॥३८९॥
जैसे पर्वती निर्झर । तैसे उपकाराचे पाझर । सुकों नेणती निरंतर । कृतोपकार जग केलें ॥३९०॥
सांडोनि कृपणवृत्तीची संगती । उपकारी पर्वत एकांतीं । राहिलासे उपकारमूर्ती । धैर्यवृत्ति निर्धारें ॥३९१॥
परोपकारालागी निश्चित । गुरु केला म्यां पर्वत । आतां वृक्षापासोनि जें शिक्षित । तेंही समस्त परियेसीं ॥३९२॥
सर्वांगें सर्वभावेंसीं । सर्वकाळ सर्वदेशीं । पराधीन होआवें सर्वांसीं । हे वृक्षापाशी शिकलों ॥३९३॥
वृक्ष जेणे प्रतिपाळिला । तो त्या आधीन जाहला । कां जो छेदावया रिघाला । त्याही झाला स्वाधीनु ॥३९४॥
योगिया पालखीसी घातला । तेव्हां त्याचिया आधीन झाला । एकी शूळी द्यावया चालविला । तेव्हां त्याच्याही बोला आधीनु ॥३९५॥
सांडूनि देहींची अहंता । योगियासी झाली पराधीनता । विश्व माझा आत्मा सर्वथा । सर्वांच्या वर्तता बोलाआंतु ॥३९६॥
सर्व तें मीचि आहे । यालागीं साधक बाधक न पाहे । त्याच्या बोलामाजी राहे । वर्तता होये संतोषें ॥३९७॥
प्राप्त जें जें सुखदुःख । तें तें अदृष्टाआधीन देख । आत्मा मानुनी सकळ लोक । पराधीन देख वर्तत ॥३९८॥
सकळ लोकी निजात्मता । देखता जाहली पराधीनता । हे वृक्षापासोनि तत्त्वतां । ‘परात्मता’ शिकलों ॥३९९॥
आणीक एक लक्षण । वृक्षापासोनि शिकलों जाण । अतिथीचें पूजाविधान । तें सावधान परियेसीं ॥४००॥
अतिथी आल्या वृक्षापासीं । वंचनार्थंु न करी त्यासी । पत्रपुष्पफलमूळच्छायेसीं । त्वचाकाष्ठांसी देतसे ॥४०१॥
जो वृक्षासी प्रतिपाळी । कां जो घावो घालूं ये मूळीं । दोंहीसीही सममेळीं । पुष्पी फळी संतुष्टी ॥४०२॥
जैसा वृक्ष समूळ सगळा । अर्थियांलागीं सार्थक जाहला । तैसा चित्तें वित्तें देहें बोला । साधु संतुष्टला अर्थ्यांसी ॥४०३॥
अतिथीसी नव्हे पराङ्मुख । हा साधूसी गुण अलोलिक । अन्न धन उदक । यथासुखें देतुसे ॥४०४॥
अर्थी आल्या अर्थावयासी । विमुख न व्हावें सर्वस्वेंसीं । हे शिकलों वृक्षापासीं । विवेकेंसी निजबुद्धी ॥४०५॥
एवं पृथ्वी गुरु झाली ऐसी । दुजें गुरुत्व तें वायूसी । आलें जें जें युक्तीसी । तें तें परियेसीं नरदेवा ॥४०६॥

१२२१. लोक म्हणती मज ‘देव’ । हा तो अधर्म
१. अधर्म
उपाव ॥१॥ आतां कळेल तें करीं । सीस
२. मस्तक (पा.भे. शिर)
तुझे हातीं सुरी
३. शस्त्र
॥ध्रु॥ अधिकार नाहीं । पूजा करिती तैसा कांहीं ॥३॥ मन जाणे पापा । तुका म्हणे माय बापा ॥४॥
१२२२. एका म्हणता भलें
१. चांगले
। आणिका सहजचि निंदिले ॥१॥ कांहीं न करितां सायास
२. कष्ट
। सहज घडले ते दोष ॥ध्रु॥ बरे वाईटाचें । नाहीं मज कांहीं साचें ॥३॥ तुका म्हणे वाणी । खंडोनि
३. नियमन (नियंत्रित) करून
राहावे चिंतनीं ॥४॥
१२२३. आणिले शेवटा । आतां कामा
१. कार्यात
नये फांटा
२. अडथळा येणार नाही
॥१॥ मज ‘आपुलेंसें’ म्हणा । उपरी
३. इतक्यावर
या नारायणा! ॥ध्रु॥ वेंचियेली
४. विनियोगिली
वाणी । युक्ती
५. बुद्धी
अवघी चरणीं ॥३॥ तुका धरीं पाय । क्षमा करवूनि अन्याय
६. (झालेल्या) अपराधाची
॥४॥
१२२४. न करा टांचणी
१. संकोच, कमतरता (हरिनाम घेण्यात)
। येथें कांहीं आडचणी ॥१॥ जिव्हा अमुप
२. पुष्कळ
करी माप । विठ्ठल पिकला
३. सर्वत्र भरला, पसरला, प्रसृत झाला
माझा बाप ॥ध्रु॥ आठही प्रहर । बारा मास निरंतर ॥३॥ तुका म्हणे वाणी । वर्जेना
४. कमी-कमी होवो, निरास होवो
हे घेतां धणी
५. तल्लीन होवो
॥४॥
१२२५. तुझ्या नामाची आवडी । आम्ही विठो तुझी वेडी
१. वेड
॥१॥ आतां न वजों आणिकां ठायां । गाऊं गीत लागों पायां ॥ध्रु॥ काय वैकुंठ बापुडें
२. बिचारे
। तुझ्या प्रेमसुखापुढें ॥३॥ संतसमागममेळे । प्रेमसुखाचा सुकाळ
३. विपुलता, सुबत्ता
॥४॥ तुका म्हणे तुझ्या पायीं । जन्ममरणा ठाव
४. अवकाश, ठावठिकाणा
नाहीं ॥५॥
१२२६. साकरेच्या योगें वर्ख
१. मुलाम्याच्या कागदाला
। राजा कागदातें देखे ॥१॥ तैसें आम्हां माणुसपण । ‘राम’नाम केण्यागुणें
२. मालामुळे (पा.भे. केल्या गुणे)
॥ध्रु॥ फिरंगीच्या
३. तलवारीच्या
योगें करी । राजा काष्ठ
४. लाकूड (तलवारीची मूठ)
हातीं धरी ॥३॥ रत्न-कनका योगें लाख । कंठीं धरिती श्रीमंत लोक ॥४॥ देवा देवपाट । देव्हाऱ्यावरी बैसे स्पष्ट ॥५॥ ब्रह्मानंदयोगें तुका । पढीयंता
५. लाडका, प्रिय
जनलोकां ॥६॥
१२२७. धनवंतालागीं
१. ज्याच्यापाशी पुष्कळ पैसा आहे असा
। सर्व मान्यता हे जगीं ॥१॥ माता पिता बंधु जन । सर्व मानिती वचन ॥ध्रु॥ जंव चाले मोठा धंदा । तंव बहिण म्हणे ‘दादा’ ॥३॥ सदा शृंगारभूषणें
२. उत्तम प्रकारचे सोन्या-चांदीचे दागदागिने घातले म्हणजे
कांता
३. पत्नी
लवे
४. नम्र होते
बहुमानें
५. मोठ्या आदराने
॥४॥ तुका म्हणे धन । भाग्य
६. (धनामुळे प्राप्त झालेले) ऐश्वर्य
अशाश्वत
७. विनाशी
जाण ॥५॥
१२२८. न विचारतां ठायाठाव
१. योग्य-अयोग्य ठीकाणाचा अथवा वेळेचा
। काय भुंके
२. अद्वातद्वा काहीतरी कर्कश बोलतो
तो गाढव ॥१॥ केला तैसा लाहे
३. मिळतो
दंड
४. शिक्षा
। खळ अविचारी लंड
५. ठक, धूर्त, उन्मत्त
॥ध्रु॥ करावें लाताळें
६. पाय झाडण्याचे
। ऐसें नेणें कोण्या काळें ॥३॥ न कळे उचित । तुका म्हणे नीत
७. धर्म-नीती
हित ॥४॥
१२२९. कंठी नामशिक्का
१. नामाची मुद्रा, चिन्ह, ठसा
। आतां कळिकाळासी धक्का
२. आघात
॥१॥ रोखा
३. (वेदरूपी) दस्त, ऐवज, कागद
माना कीं शिक्का माना । रोखा शिक्का तत्समाना
४. (वेद व नाम) दोन्ही सारखेच
॥ध्रु॥ रोखा न मना का शिक्का न मना । जतन
५. रक्षण (यमपुरीत नाक कान राहणार नाही म्हणून)
करा नाक काना ॥३॥ शिक्का न मनी रावण । त्याचें केलें निसंतान
६. निर्वंश
॥४॥ शिक्का मानी हळाहळ
७. (भगवान शंकराने प्राशन केलेले) भयंकर विष
। झाले सर्वांग शीतळ ॥५॥ तुका म्हणे नाम शिक्का । पटीं
८. सिंहासनावर
बैसविलों निजसुखा
९. आत्मसुखाच्या
॥६॥
१२३०. भूतीं
१. प्राणीमात्रात
देव’ म्हणोनि भेटतों या जना । नाहीं हे भावना ‘नर नारी’ ॥१॥ जाणे भाव पांडुरंग अंतरींचा
२. अंतःकरणातील
। नलगे द्यावा साचा परिहार
३. स्पष्टीकरण
॥ध्रु॥ दयेसाठी केला उपाधि
४. प्रचार-प्रसार उपदेशरूपी उपाधी
पसारा । जड जीवा तारा
५. तारणारी
नाव कथा ॥३॥ तुका म्हणे नाहीं पडत उपवास । फिरतसे आस
६. (जगाचे कल्याण व्हावे ही) इच्छा
धरोनिया ॥४॥
१२३१. हारपल्याची
१. एखादी वस्तू हरविल्याचे
नका चित्तीं । धरूं खंती
२. खेद, दु:ख
वायांच ॥१॥ पावले ते म्हणा देवा
३. देवाला मिळाले, कृष्णार्पण
। ‘सहज सेवा’ या नांवें ॥ध्रु॥ होणार तें भोगें
४. प्रारब्धाने
घडे । लाभ जोडे संकल्पें
५. (देवाला समर्पण करण्याच्या)
॥३॥ तुका म्हणे मोकळे
६. राग-द्वेषरहित
मन । अवघे पुण्य या नांवें ॥४॥
१२३२. नेसणे
१. नेसण्याचे धोतर
आले होतें गळ्या । लोक रळ्या
२. कुचेष्टा, मस्करी, थट्टा
करिती ॥१॥ आपणियां सावरिलें । जग भले आपण ॥ध्रु॥ संबंध तो तुटला येणें । जागेपणे
३. सावधगिरी बाळगल्याने
चेष्टांच्या
४. खोडी, टवाळकी, थट्टा
॥३॥ भलती सवा
५. सवय
होती अंगें । बासर
६. स्वैर, स्वच्छंदीपणाचा (आरोप होतो)
वेगें पडिलें ॥४॥ सावरिलें
७. सांभाळून धरले
नीट
८. बरोबर, व्यवस्थित
वोजा
९. चांगल्या रीतीने
। दृष्टिलाजा पुढिलांच्या ॥५॥ बरे उघडिले डोळे । हळहळे-पासूनि१०
१०. दुःखापासून
॥६॥ तुका म्हणे विटंबना११
११. फजिती
। नारायणा, चुकली ॥७॥
१२३३. जिव्हा जाणे फिकें मधुर की क्षार
१. खारट
येर
२. इतर अवयवांतही (जिव्हेमध्ये जसे मांस आहे तसे)
मांस पर
३. परंतु
हाता न कळे ॥१॥ देखावें नेत्रीं बोलावें मुखें । चित्ता सुखदु:खें कळों येती ॥२॥ परिमळासी
४. सुगंध
घ्राण
५. नाक
ऐकती श्रवण
६. कान
। एकाचे कारण
७. कार्य
एका नव्हे ॥३॥ एके देहीं भिन्न ठेवियेल्या कळा
८. ज्ञान, यु्क्ती
। नाचवी पुतळा
९. (देहरूपी) पुतळ्यास
सूत्रधारी१०
१०. नियामक परमात्मा
॥४॥ तुका म्हणे ऐशी जयाची सत्ता । कां तया अनंता विसरलेती? ॥५॥
१२३४. न लगे द्यावा जीव सहजचि जाणार । आहे तो विचार
१. (स्वहिताचा)
जाणा कांहीं ॥१॥ मरण जो मागे गाढवाचा बाळ । बोलिजे चांडाळ शुद्ध त्यासी ॥ध्रु॥ तुका म्हणे कांहीं होईल स्वहित । निधान
२. (देहरूपी) ठेवा
जो थीत
३. असलेला
टाकूं पाहे ॥३॥
१२३५. मोल
१. किंमत, पैसे
वेंचूनियां
२. खर्च करून
धुंडिती
३. शोधतात
सेवका । आम्ही तरी फुका
४. फुकट (चाकरी) मागत आहोत
मागों बळे ॥१॥ नसतां जवळी
५. (देव)
, हित फार करूं । जीवभाव धरूं तुझ्या पायीं ॥ध्रु॥ नेदूं भोग
६. सुखोपचार, विषयोपभोग
आम्ही आपुल्या शरीरा । तुम्हांसी दातारा व्हावे म्हूण
७. म्हणून
॥३॥ कीर्ति तुझी करूं आमुचे सायास
८. प्रयत्न
। तूं कां रे उदास
९. तटस्थ
पांडुरंगा! ॥४॥ तुका म्हणे तुज काय मागों आम्ही । फुकाचे का ‘ना भी१०
१०. भिऊ नकोस
’ म्हणसी ना ॥५॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

1 thought on “दिवस – ७७. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top