
अनुक्रमणिका
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ७. ओवी क्र. १०३ ते १२६
माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः ॥१५॥
चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन ।
आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ॥१६॥
प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रियः ॥१७॥
आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् ॥१८॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ७, ओवी क्र. ४९८ ते ५५१
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
अग्नी कधी कधी प्रकट व कधी कधी गुप्त असतो तसा योगी दुर्जनाजवळ अप्रकट व भाविकाला प्रकट असतो. यज्ञयागादिकामध्ये हवन करणाऱ्याचे कोणतेही द्रव्य सेवन करून अग्नी त्यांचे भूतभविष्यकालीन पाप नाहीसे करितो त्याप्रमाणे मुनी आपल्या कल्याणासाठी सेवा करणाऱ्या मुमुक्षूचे सर्व पाप नाहीसे करतो. ॥४६॥
जो जो उपासका भावो जीवीं । त्या त्या श्रेयातें उपजवी । पूर्वोत्तर अशुचित्वें आघवीं । जाळूनि हवी सेवितु ॥४९९॥
तैशीचि योगियाची लीळा । भाविकां प्रकट दिसे डोळां । एकां गुप्तचि होऊनि ठेला । न दिसे पाहिला सर्वथा ॥५००॥
ऐशियाच्याही ठायीं । भावबळ भाविक पाहीं । अर्पिती जें जें कांहीं । तेणें मोक्ष पाहीं मुमुक्षां ॥५०१॥
तें पडतांचि योगियांच्या मुखीं । संचित क्रियमाणे असकीं । जाळोनियां एकाएकी । करी सुखी निजपदीं ॥५०२॥
आणीकही अग्नीचें लक्षण । राया तुज मी सांगेन जाण । जेणे सगुण आणि निर्गुण । दिसे समान समसाम्ये ॥५०३॥
लाकडामध्ये प्रविष्ट झालेला अग्नी तो तो आकार घेतो (वस्तुतः त्या आकाराचा नसतो) तसे परमात्मा आपल्या मायेने सात्त्विक, राजस, तामस असे निरनिराळे पदार्थ निर्माण करतो, त्या त्या पदार्थांमध्ये प्रवेश करून त्या त्या आकाराचा झाल्यासारखा भासतो, परंतु तो असंग असल्याने त्याला कोणताही आकार येत नाही. ॥४७॥
तैसीचि भगवंताची भगवद्गती । स्वमायाकल्पित कल्पनाकृती । तेथ प्रवेशला सहजस्थितीं । बहुधा व्यक्ती तो भासे ॥५०५॥
जैसे गंगेचें एक जळ । भासे भंवरे लहरी कल्लोळ । तैसा जगदाकारें अखिल । भासे सकळ जगदात्मा ॥५०६॥
कां छायामंडपींच्या चित्रासी । दीप प्रभा भासे जैसी । राम रावण या नांवेंसीं । दावी जगासी नटनाट्य ॥५०७॥
तैशा नानाविधा व्यक्ती । नाना मतें नानाकृती । तेथ प्रवेशोनि श्रीपती । सहजस्थिती नाचवी ॥५०८॥
तैशी योगियाची स्थिती । पाहतां नानाकार व्यक्ती । आपणियातें देखे समवृत्ती । भेदभ्रांति त्या नाहीं ॥५०९॥
तेथ जें जें कांहीं पाहे । तें तें आपणचि आहे । या उपपत्ती उभवूनि बाहे । सांगताहे अवधूतु ॥५१०॥
ज्याची गती कोणालाही कळत नाही अशा कालानेच घडणाऱ्या, जन्मापासून स्मशानात जाईपर्यंतच्या सर्व अवस्था देहाच्याच आहेत, आत्म्याच्या नाहीत (कारण तो गुणशून्य आहे). चंद्रकला वाढतात, कमी होतात ही अवस्था कलांची आहे, चंद्राची नाही (हे चंद्रापासून शिकलो). ॥४८॥
जन्मनाशादि षड्विकार । हे देहासीच साचार । आत्मा अविनाशी निर्विकार । अनंत अपार स्वरूपत्वें ॥५१३॥
घटु स्वभावें नाशवंतु असे । त्यामाजीं चंद्रमा बिंबलासे । नश्वरीं अनश्वर दिसे । विकारदोषे लिंपेना ॥५१४॥
घटासवें चंद्रासी उत्पत्ती । नाहीं नाशासवें नाशप्राप्ती । चंद्रमा आपुले सहजस्थितीं । नाशउत्पत्तिरहितु ॥५१५॥
तैसा योगिया निजरूपपणें । देहासवें नाहीं होणें । देह निमाल्या नाहीं निमणे । अखंडपणे परिपूर्ण ॥५१६॥
एवं काळाचे बळ गाढें । म्हणती ते देहाचिपुढे । पाहतां आत्मस्थितीकडे । काळ बापुडे तेथ नाहीं ॥५१८॥
सूक्ष्म काळगती सांगतां । वेगें आठवलें अवधूता । सिंहावलोकने मागुता । अग्निदृष्टांता सांगतु ॥५१९॥
अग्नीच्या ज्वाळांचे क्षणोक्षणी उत्पत्ती व विनाश होतात; परंतु दिसत नाहीत. त्याप्रमाणे कालाच्या अविरत चाललेल्या प्रचंड ओघाने जीवांची उत्पत्ती व विनाश हे सतत चालले असूनही आपल्या दृष्टीला गोचर होत नाहीत. ॥४९॥
जराजर्जरित जाण । वाहतां नदीमाजीं वोसण । षड्विकार तेचि परिपूर्ण । भंवरे दारुण भंवताति ॥५२१॥
बाल्य-तारुण्यांचे खळाळ । वार्धक्याचे मंद जळ । जन्ममरणांचे उसाळ । अतिकल्लोळ उठती ॥५२२॥
वोघवेगाच्या कडाडी । पडत आयुष्याची दरडी । स्वर्गादि देउळे मोडी । शिखरींचे पाडी सुरेंद्र ॥५२३॥
तळी रिचवितां घोगें । पाताळादि विवरे वेगें । नाशूनियां पन्नगें । अंगभंगें अडिमोडी करी ॥५२४॥
ऐशिया जी काळवोघासीं । घडामोडी भूततरंगांसी । होतसे अहर्निशीं । तें कोणासी लक्षेना ॥५२५॥
जैं महाप्रळयीं मेघु गडाडी । तैं पूर चढे कडाडी । ब्रह्मादिक तरुवर उपडी । समूळ सशेंडी वाहविले ॥५२६॥
जैं आत्यंतिक पूरु चढे । तैं वैकुंठ कैलासही बुडे । तेथ काळा रिगू न घडे । हे अवचट घडे एकदां ॥५२७॥
अनिवार काळनदीची गती । सूक्ष्म लक्षेना निश्चितीं । ते सूक्ष्मगतीची स्थिती । अतिनिगुती परियेसीं ॥५२८॥
दीपू तोचि तो हा म्हणती । परी शिखा क्षणक्षणा जाती । ते लक्षेना सूक्ष्मगती । अंती म्हणती विझाला ॥५२९॥
प्रत्यक्ष प्रवाहे गंगाजळ । ते काळींचें म्हणती बरळ । तैशी काळगती अकळ । लोक सकळ नेणती ॥५३०॥
प्रत्यक्ष पाहतां देहासी । काळ वयसेतें ग्रासी । बाल्य-कौमारतारुण्यांसी । निकट काळासी न देखती ॥५३१॥
किरणांचा अधिपती सूर्य ज्याप्रमाणे आपल्या किरणांनी जल आकर्षण करून ते यथाकाली सोडून देतो, जलाने संपृक्त होत नाही, त्याचप्रमाणे योगी पुरुष गुणद्वारा विषयांचा उपभोग घेतो व योग्य वेळी त्यांचा त्यागही करतो. त्या भोग्य विषयांच्या ठिकाणी त्याची आसक्ती असत नाही. ॥५०॥
सर्व शोषूनि घे किरणीं । तें शोषितें लक्षण नेणे कोणी । देतां मेघमुखें वरुषोनी । निववी अवनी जनेंसीं ॥५३४॥
तैसीचि योगियाची परी । अल्प ज्याचें अंगीकारी । त्याचे मनोरथ पूर्ण करी । सहस्र प्रकारी हितत्वें ॥५३५॥
ज्यांचे सेविती योगी आत्माराम । त्यांचे पुरती सकळ काम । अंती करोनियां निष्काम । विश्रामधाम आणिती ॥५३६॥
एवं योगी आपुले योगबळें । विषयो सेविती इंद्रियमेळे । जे देती त्यांसी यथाकाळें । कृपाबळें निवविती ॥५३७॥
त्यांसी विषयो देतां कां घेतां । आसक्ति नाहीं सर्वथा । रसु चोखूनि घेतां देतां । अलिप्त सविता तैसे ते ॥५३८॥
जलप्रवाहात सूर्य प्रतिबिंबरूपांनी निरनिराळा दिसतो त्याचप्रमाणे देहाच्या अनेक उपाधींनी व्यक्तींमध्ये शिरलेला आत्मा वेगवेगळा आहे असे वाटते; परंतु योगी कोणत्याही प्रकारच्या भेदबुद्धीने पाहात नाही, मंदमती जीवांना मात्र तो वेगळा भासतो. (त्याचा बोध देहातीत झालेला असतो, देहकर्माशी त्याचा संबंध असत नाही.) ॥५१॥
त्या थिल्लरातें नातळतां । गगनीं अलिप्त जेवीं सविता । तैसीच योगियांची योग्यता । देहातीतता देहकर्मी ॥५४०॥
त्यासी देहबुद्धीचेनि छंदें । म्हणती योगिया देहीं नांदे । त्या देहाचेनि नाना बाधे । स्वबुद्धिभेदें बांधिला म्हणती ॥५४१॥
त्यासी देहाचें बाधितभान । हे न कळे त्याचे गुह्यज्ञान । दोराचेनि सापें जाण । डसोनि कोण मारिला ॥५४२॥
एवं आत्मा तो चिदाकाशी । मिथ्या देहीं मिथ्यात्वेंसी । बिंबोनि दावी देहकर्मासी । नव्हे ते त्यासी बाधक ॥५४३॥
देखे आपणातें जळीं बिंबला । परी न म्हणे मी जळीं बुडाला । तैसा देहातीतु बोधु झाला । नाहीं भ्याला देहकर्मा ॥५४४॥
यालागीं दारागृहपुत्रप्राप्ती । तेथ न करावी अतिप्रीती । येचिविषयी रायाप्रती । कथा कपोती सांगतु ॥५४६॥
कोठेही कोणाशी अतिशय प्रेम किंवा संबंध करू नये. याप्रमाणे प्रेम केले असता कपोतपक्ष्याप्रमाणे मंदमती माणसाला संताप प्राप्त होईल. ॥५२॥
स्त्रीपासाव झाले पुत्र । त्याचे ठायीं स्नेह विचित्र । करितां दुःखासी पात्र । संसारी नर होताति ॥५४८॥
आसक्ति आणि स्नेहसूत्र । या दोन्हीपासाव दुःख विचित्र । पदोपदी भोगिती नर । अस्वतंत्र होऊनि ॥५४९॥
यालागी भलतेनि भलते ठायीं । आसक्ति स्नेहो न करावा पाहीं । अतिस्नेहो मांडिजे जिंहीं । दुःख तिहीं भोगिजे ॥५५०॥
स्नेहदुःखाची वार्ता । कपोता-कपोतीची कथा । तुज सांगेन नृपनाथा । स्वस्थचित्ता परियेसीं ॥५५१॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. १२५४ ते १२६७
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.






रामकृष्णहरी माऊली 🙏