दिवस – ८०. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते ।
वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ॥१९॥
जे
१. (बहूनां जन्मनामन्ते)
, तो विषयांची दाट झाडी- । माजीं कामक्रोधांचीं सांकडीं
२. संकटें, अडचणी
। चुकावूनि आला पाडीं
३. पहाडावर, डोंगरावरील सपाटभाग
। सद्वासनेचिया ॥१२७॥
मग, साधुसंगें, सुभटा
१. वीरश्रेष्ठा अर्जुना
उजू
२. नीट
सत्कर्माचिया वाटा । अप्रवृत्तीचा अव्हांटा
३. निषिद्ध कर्माच्या आडमार्ग
डावलूनि
४. त्याग करून, डावीकडे टाकून
॥१२८॥
आणि जन्मशतांचा वाहतवणा
१. जंगलातून जाणारा वाटसरू, प्रवासी
। तेविंची आशेचिया न लेचि
२. न घालता
वाहणा
३. वहाणा, पादुका
। तेथ फलहेतूचा उगाणा
४. हिशेब, गणना
। कवणु चाळीं? ॥१२९॥
ऐसा शरीरसंयोगाचिये राती
१. रात्रीमध्यें
– । माजीं धांवतां सडिया
२. अपरिग्रही, सडा, संगरहित, एकटा
आयती
३. सहज
। तंव कर्मक्षयाची पाहती । पाहांट
४. मल विक्षेप ह्या दोषद्वयांची निवृत्तीरूपी उजाडती पहाट
जाली ॥१३०॥
तैसीच
१. (ज्ञानवान्)
गुरुकृपा उखा
२. उषःकाल
उजळली । ज्ञानाची वोतपली
३. कोवळे ऊन, तिरीप
पडली । तेथ साम्याची ऋद्धि
४. ऐश्वर्य
उघडली । तयाचिये दिठी ॥१३१॥
ते
१. (मां प्रपद्यते)
वेळीं जयाकडे वास
२. वाट, मार्ग
पाहे । तेउता
३. तेथें
मीचि तया एकु आहे । अथवा निवांत जरी राहे । तही मीचि तया ॥१३२॥
हें असो, आणिक कांहीं । तया सर्वत्र मी वांचूनि नाहीं । जैसें सबाह्य
१. आंतबाहेर, सर्वत्र
जळ-डोहीं । बुडालिया घटा ॥१३३॥
तैसा तो मजभीतरीं । मी तया आंतुबाहेरी । हें सांगिजेल बोलवरी
१. वाचेनें, शब्दांनीं
। तैसें नव्हे ॥१३४॥
म्हणौनि असो हैं, इयापरी । तो देखे ज्ञानाची वाखारी
१. वखार, दुकान
। तेणें #संसरलेनि
२. ते (ज्ञान) वाढले असतां सर्व विश्व आत्मरूप पाहतो (आपलेसें केलें)
करी । आपु विश्व ॥१३५॥
हें
१. (वासुदेवः सर्वमिति)
समस्तही श्रीवासुदेवो । ऐसा प्रतीतिरसाचा
२. स्वानुभवाचा
वोतला भावो
३. ओतीव मूर्ती
। म्हणौनि भक्तांमाजीं रावो
४. श्रेष्ठ, राजा
। आणि ज्ञानिया तोचि ॥१३६॥
जयाचिये
१. (स महात्मा सुदुर्लभः)
प्रतीतिचा वाखारां
२. वखारींत, दुकानात, भांडारांत
पवाडु
३. समावेश, ठाव, ठिकाण
होय चराचरा । तो महात्मा, धनुर्धरा । दुर्लभु आथी
४. आहे
॥१३७॥
येर
१. (चूर्णिका)
बहुत जोडती, किरीटी । जयांचीं भजनें भोगासाठी । जे आशातिमिरें
२. इच्छारूप अंधकारानें, आशारूप नेत्राच्या तिमिर नावाच्या व्याधीने
, दृष्टी- । * मंद जाले ॥१३८॥
कामैस्तैस्तैर्हतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः ।
तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया ॥२०॥
आणि
१. (कामैरिति)
फळाचिया हावां
२. इच्छेनें
। हृदयीं कामा जाला रिगावा । कीं तयाचिये घसणीं
३. संघट्टनानें, झपाट्यानें
दिवा । ज्ञानाचा गेला! ॥१३९॥
ऐसे उभयतां
१. आंत व बाहेर, बाहेर आशारूपी अंधार व आंतील ज्ञानदिवा गेला म्हणून दोन्हीं ठिकाणी अंधार झाला
●अंधारीं पडलें । म्हणौनि, पासींचि मातें चुकले । मग सर्वभावें अनुसरले
२. जवळ असून आराधूं लागलें
। देवतांतरां ॥१४०॥
आधींच
१. (प्रकृत्या नियताः स्वया)
प्रकृतीचे पाइक
२. दास
। वरी भोगालागीं तंव रंक
३. दीन
। मग तेणें लोलुपत्वें
४. लंपटपणानें
कौतुक । कैसे भजती ! ॥१४१॥
कवणीं
१. (तं तं नियममास्थाय)
तिया नियमबुद्धि । कैसिया हन उपचारसमृद्धि
२. पूजासामग्री, पूजाद्रव्यांची विपुलता
। कां अर्पण यथाविधि । विहित करणें ॥१४२॥
यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति ।
तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ॥२१॥
पैं
१. (यो य इति)
जो जिये
२. ज्या ज्या
देवतांतरीं । भजावयाची चाड
३. इच्छा
करी । तयाची ते चाड पुरी । पुरविता मी ॥१४३॥
देवो-देवीं मीचि; पाहीं । हाही निश्चयो त्यासि नाहीं । भावो ते ते ठायीं । वेगळाला धरी ॥१४४॥
स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते ।
लभते च ततः कामान्मयैव विहितान्हि तान् ॥२२॥
मग
१. (स तयेति)
#तिया
२. त्या त्या
श्रद्धायुक्त । तेथिंचें आराधन
३. पूजन
जें उचित । तें सिद्धीवरी
४. कार्यसिद्धि होईपर्यंत
समस्त । वर्तो
५. करूं लागतो
लागे ॥१४५॥
ऐसें
१. (लभते इति)
जेणें जें भाविजे
२. इच्छावें
। तें फळ तेणें पाविजे । परी तेही सकळ निपजे । मजचिस्तव
३. मजपासूनच
॥१४६॥

कपोतः कश्चनारण्ये, कृतनीडो वनस्पतौ । कपोत्या भार्यया सार्धमुवास कतिचित्समाः ॥५३॥
अरण्यातील एका वृक्षावर घरटे बांधून कोणीएक कपोतपक्षी त्याची भार्या जी कपोती तिच्यासह कित्येक वर्षे राहिला होता. ॥५३॥
कपोतीचे स्नेह गोड । धरोनी स्त्रीसुखाची चाड । वनीं वृक्ष पाहोनियां गूढ । करी नीड कपोता ॥५५२॥
तेणें वनचरें वनस्थळीं । नीडामाजीं स्त्रीमेळीं । वासु केला बहुकाळीं । भार्येजवळी भूलला ॥५५३॥
कपोतौ स्नेहगुणितहृदयौ गृहधर्मिणौ । दृष्टिं दृष्ट्याऽङ्गमङ्गेन, बुद्धिं बुद्ध्या बबन्धतुः ॥५४॥
एकमेकांच्या प्रेमाने एकहृदय झालेले ते गृहस्थाश्रमी कपोत जोडपे दृष्टीने, अंगाने आणि बुद्धीने परस्परांशी बांधले जाऊन एकरूप झाले होते. ॥५४॥
कपोता आणि कपोती । परस्परें दोघां अतिप्रीती । स्नेहो वाढलासे चित्तीं । हृदयीं आसक्ती नीच नवी ॥५५४॥
हावभाव विलासस्थिती । येरेयेरांकडे पाहती । परस्परें कुरवाळिती । वोठंगिती येरयेरां ॥५५५॥
येरयेरां वेगळे होणें । नाहीं जीवें अथवा मनें । दोघे वर्तती एकें प्राणें । खाणे जेवणे एकत्र ॥५५६॥
शय्यासनाटनस्थानवार्ताक्रीडाशनादिकम् । मिथुनीभूय विस्रब्धौ, चेरतुर्वनराजिषु ॥५५॥
निजणे, बसणे, फिरणे, राहणे, संभाषण करणे, खेळणे, खाणे-पिणे वगैरे सर्व व्यवहार दोघे एकत्र राहून करीत आणि त्या वनराजीमध्ये निःशंक संचार करीत. ॥५५॥
सेवितां ज्याची अतिगोडी । तें घालिती येरयेरांच्या तोंडीं । जीवेंप्राणे शिणोनी जोडी । तें दे आवडी स्त्रियेसी ॥५५७॥
स्त्रियेसी सांडूनि दुरी । पाऊल न घाली बाहेरी । हात धरोनि परस्परीं । आंतबाहेरी हिंडती ॥५५८॥
सदा एकांती बसती । एके स्थानी दोघे असती । दोघे क्रीडाविहार करिती । खेळ खेळती विनोदें ॥५५९॥
एकांती गोड बोली । सासुसासऱ्यांचा विकल्पु घाली । दिराभावांच्या मोडी चाली । बोलाच्या भुलीं भुलवित ॥५६०॥
एके आसनी बैसती । येरयेरांतें टेंकती । एके शय्ये निद्रा करिती । अहोराती एकत्र ॥५६१॥
मैथुनसुखाचेनि वैभवें । विश्वासोनि जीवेंभावें । हिताहित कांहीं नाठवे । गृहिणीगौरवें नाचतु ॥५६२॥
खेंडकुलिया आराम । त्यामाजीं दोघां समागम । नाममात्र गृहाश्रम । विषयसंभ्रम वनराजी ॥५६३॥
यं यं वाञ्छति सा राजंस्तर्पयन्त्यनुकम्पिता । तं तं समनयत्कामं कृच्छ्रेणाप्यजितेन्द्रियः ॥५६॥
हे यदुराजा, त्याच्या इच्छेप्रमाणे वागणारी आणि प्रेमाला पूर्ण प्राप्त झालेली ती कपोती ज्या ज्या पदार्थाची इच्छा करी तो तो पदार्थ तो इंद्रियाधीन झालेला कपोत कितीही श्रम पडले तरी तिला आणून देई. ॥५६॥
जीवितापरीस समर्थ । जे जे मागे ते ते अर्थ । जीवेंप्राणे शिणोनि देत । काममोहित होऊनि ॥५६४॥
जाणोनि जीवींचे खुणे । न मागतां अर्थ देणें । त्याहीवरी जरी त्या मागणें । तरी विकूनि देणे आपणियातें ॥५६५॥
धर्माची वेळ नाठवणें । दीनावरी दया नेणे । कृपा स्त्रियेवरी करणें । जीवेंप्राणे सर्वस्वे ॥५६६॥
बैसली साकरेवरी माशी । मारिताही नुडे जैशी । तैसा भोगितां विषयांसी । जरामरणासी नाठवी ॥५६७॥
जैशी पूर्वजांची भाक । पाळिती सत्यवादी लोक । तैसा स्त्रियेचेंचि सुख । पाळी देख सर्वस्वें ॥५६८॥
जैसी आत्मउपासकासी । एकात्मता होये त्यासी । तैसें स्त्रीवांचोनि दृष्टीसी । जगी आणिकासी न देखे ॥५६९॥
कपोती प्रथमं गर्भं, गृह्णती काल आगते । अण्डानि सुषुवे नीडे, स्वपत्युः सन्निधौ सती ॥५७॥
आपल्या पतीजवळ असणारी ती कपोती प्रथमगर्भ धारण करती झाली आणि योग्य समयी तिने घरट्यात अंडी घातली. ॥५७॥
आधींचि प्रिया पढियंती । तेही झाली गर्भवती । जैशी लोभियाचे हातीं । सांपडे अवचितीं धनलोहे ॥५७०॥
तैसें तिच्या गर्भाचे कोड । अधिकाधिक वाढवी गोड । जैसें मदिरा पिऊनि माकड । नाचे तडतड डुल्लतु ॥५७१॥
तैसे गर्भाचे सोहळे । सर्वस्वें पुरवी डोहळे । तिचे लीळेमाजी खेळे । प्राप्तकाळें प्रसूती ॥५७२॥
स्वनीडा-आंतौती । जाहली अंडांतें प्रसवती । प्रसूतिवाधावा सांगति । ऐकोनि पति उल्हासे ॥५७३॥
तेषु काले व्यजायन्त, रचितावयवा हरेः । शक्तिभिर्दुर्विभाव्याभिः कोमलाङ्गतनूरुहाः ॥५८॥
भगवंताच्या अतर्क्य सामर्थ्याने त्या अंड्यांतून कोमल अवयव आणि पंख यांनी युक्त असे सर्वांगपरिपूर्ण पक्षी योग्य वेळी जन्मास आले. ॥५८॥
अघटित घटी हरीची माया । अलक्ष लक्षेना ब्रह्मया । अवेव अंडामाजी तया । देवमाया रचियेले ॥५७४॥
रसें भरली होती अंडें । त्यांमाजी नख पक्ष चांचुवडें । उघडिली डोळ्यांची कवाडें । करी कोडें हरिमाया ॥५७५॥
अंडे उलोनि आपण । कोवळी पिली निघाली जाण । पितरे दृष्टीं देखोन । जीवेंप्राणे भुललीं ॥५७६॥
प्रजाः पुपुषतुः प्रीतौ, दम्पती पुत्रवत्सलौ । श्रृण्वन्तौ कूजितं तासां, निर्वृतौ कलभाषितैः ॥५९॥
बालकांचे मधुर कूजित ऐकून परम संतोष पावलेले ते जोडपे आपल्या प्रजेचे प्रेमाने लालनपालन करीत होते. ॥५९॥
अत्यंत कोंवळी बाळें । दोघे जणे पुत्रवत्सलें । शांतविती मंजुळें । अतिस्नेहाळे प्रजांसी ॥५७७॥
जे समयीं जैसे लक्षण । तैसें प्रजांचे पोषण । अंगें करिताति आपण । दोघे जण मिळोनि ॥५७८॥
गोड गोजिरे बोल । ऐकोनि दोघां येती डोल । धांवोनियां वेळोवेळ । निंबलोण उतरिती ॥५७९॥
तासां पतत्त्रैः सुस्पर्शै:, कूजितैर्मुग्धचेष्टितैः । प्रत्युद्गमैरदीनानां, पितरौ मुदमापतुः ॥६०॥
त्या भाग्यवान बालकांचे मऊ पंख, लाडकेपणाच्या लीला, किलकिल आवाज, मंदमंद येणे-जाणे इत्यादी बालचेष्टांनी आईबापांना फारच आनंद वाटला. ॥६०॥
त्यांचेनि आलिंगनचुंबनें । मृदु मंजुळ कलभाषणें । दों पक्षांचेनि स्पर्शनें । दोघे जणें निवताति ॥५८०॥
माता पिता दोघे बैसति । सन्मुख अपत्ये धांवती । लोल वक्र विलोकिती । वेगें दाविती येरयेरां ॥५८१॥
मग देवोनियां खेवे । दूरी जाती मुग्धभावें । तेथूनि घेऊनियां धांवे । वेगें यावें तयांपासीं ॥५८२॥
मायबापांच्या पाखोव्यापासीं । हीनदीनता नाहीं बाळांसी । जे जन्मोनि त्यांचे कुशीं । त्या दोघांसी सभाग्यता ॥५८३॥
लाडिकी लळेवाडे बाळें । लाडेंकोडें पुरविती लळे । देखोनि निवती दिठी डोळे । स्नेह आगळे येरयेरां ॥५८४॥
ऐसी खेळतां देखोनि बाळें । दोघे धांवती एक वेळे । उचलूनियां स्नेहबळें । मुख कोवळे चुंबिती ॥५८५॥
स्नेहानुबद्धहृदयावन्योऽन्यं विष्णुमायया । विमोहितौ दीनधियौ, शिशून्पुपुषतुः प्रजाः ॥६१॥
याप्रमाणे भगवंताच्या मायेने मोहित झालेले ते मंदबुद्धीचे जोडपे एकमेकांच्या प्रेमाने घट्ट बांधले जाऊन मुलांचे पालनपोषण करीत होते. ॥६१॥
अजाची जे अजा माया । त्या कैसी भुलवी गा राया । अन्योन्यस्नेह बांधोनि हृदया । पिली पोसावया उद्यत ॥५८६॥
स्त्रीपुत्रांचा मोह गहन । त्यांचे करावया पोषण । चिंतातुर अतिदीन । करी भ्रमण अन्नार्थ ॥५८७॥
एकदा जग्मतुस्तासामन्नार्थं तौ कुटुम्बिनौ । परितः कानने तस्मिन्नर्थिनौ चेरतुश्चिरम् ॥६२॥
एकदा ते जोडपे पिलांना खाद्य आणण्यासाठी बाहेर गेले आणि अरण्यात खाद्य मिळावे म्हणून बराच वेळ इकडे तिकडे भटकत राहिले. ॥६२॥
एवं टणकी जाली बाळें । कुटुंब थोर थोरावलें । अन्न बहुसाल पाहिजे झालें । दोघे विव्हळे गृहधर्मे ॥५८८॥
यापरी कुटुंबवत्सलें । पुत्रस्नेहें स्नेहाळें । दोघे जणे एके वेळे । अन्न बहुकाळें अर्थिती ॥५८९॥
सहसा मिळेना अन्न । यालागीं हिंडती वनोपवन । बहुसाल श्रमतांही जाण । पूर्ण पोषण मिळेना ॥५९०॥
बहुसाल मेळवूनि चारा । दोघे जणे जाऊं घरा । मग आपुल्या लेंकुरां । नाना उपचारां प्रतिपाळू ॥५९१॥
ऐसऐशिया वासना । मेळवावया अन्ना । दोघेजणें नाना स्थानां । वना उपवना हिंडती ॥५९२॥
दृष्ट्वा तान् लुब्धकः कश्चिद्यदृच्छातो वनेचरः । जगृहे जालमातत्य, चरतः स्वालयान्तिके ॥६३॥
आपल्या घरट्याजवळ बागडणाऱ्या त्या पिलांना कोणीएका वनचर पारध्याने यदृच्छेने पाहिले व जाळे टाकून त्यांना पकडले. ॥६३॥
माता पिता गेली दुरी । उडती पिलें नीडाभीतरीं । क्षुधेनें पीडिलीं भारी । निघालीं बाहेरी अदृष्टें ॥५९३॥
ते वनीं कोणी एक लुब्धक । पक्षिबंधनी अतिसाधक । तेणें ते कपोतबाळक । अदृष्टें देख देखिले ॥५९४॥
तेणें पसरोनियां काळजाळें । पाशी बांधिली ती बाळें । कपोतकपोतींचे वेळे । राखत केवळे राहिला ॥५९५॥
कपोतश्च कपोती च, प्रजापोषे सदोत्सुकौ । गतौ पोषणमादाय, स्वनीडमुपजग्मतुः ॥६४॥
आपल्या पिलांचे पोषण करण्याचे बाबतीत सदैव तत्पर असणारे ते कपोत-कपोतीचे जोडपे बाहेरून पिलांचे भक्ष्य घेऊन आपल्या घरट्याकडे आले. ॥६४॥
बाळकांच्या अतिप्रीतीं । कपोता आणि कपोती । चारा घेऊनि येती । नीडाप्रति लवलाहें ॥५९६॥
स्त्रीसुखाची आसक्ती । तेचि वाढत्या दुःखाची सूती । स्त्रीसंगें दुःखप्राप्ती । सांगों किती अनिवार ॥५९७॥
पुरुषासी द्यावया दुःख । स्त्रीसंगूचि आवश्यक । पुत्रपौत्रद्वारा देख । नानादुःख भोगवी ॥५९८॥

१२६८. ‘देव अवघे’ प्रतिपादी
१. सांगतो
। वंदी सकळां, एका निंदी ॥१॥ तेथे अवघे गेलें वायां । विष घांस एके ठायां ॥ध्रु॥ सर्वांग कुरवाळी
२. गोंजारतो
। उपटी एक रोमावळी
३. केस
॥३॥ तुका म्हणे चित्त । नाहीं जयाचें अंकित
४. स्वाधीन
॥४॥
१२६९. मज माझा उपदेश । आणिकां नये याची रीस
१. त्रास, राग, असंतोष, तिटकारा मानू नये
॥१॥ तुम्ही अवघे पांडुरंग । मीच दुष्ट सकळ चांग
२. चांगले
॥ध्रु॥ तुमचा मी शरणागत । कांहीं करा माझें हित ॥३॥ तुका पाय धरी । ‘मी’ हे ‘माझें’ दूर करीं ॥४॥
१२७०. जाणे त्याचे वर्म नेणे त्याचें कर्म । केल्याविण धर्म नेणवती ॥१॥ मैथुनाचें सुख सांगितल्या खूण । अनु-भवाविण कळों नये ॥२॥ तुका म्हणे जळो
१. रागाने, तिरस्काराने काढलेला उद्गार
शाब्दिक
२. अनुभवशून्य केवळ शब्दापुरते,
हे ज्ञान । विठोबाची खूण
३. लक्षण, स्वरूप
विरळा
४. एखादा, क्वचित्
जाणे ॥३॥
१२७१. अभिमानी
१. आपल्या भक्तासंबंधी ‘हा माझा’ असा ग्रह
पांडुरंग । गोवा
२. अडचण
काशाचा हो मग? ॥१॥ अनुसरा
३. शरणागती करा
लवलाहीं
४. लवकर
। नका विचार करूं कांहीं ॥ध्रु॥ कोठे राहतील पापें? । झालिया हो अनुतापें
५. अयोग्य कृत्याबद्दलचा खेद
॥३॥ तुका म्हणे येचि घडी
६. क्षणाला
उभ्या
७. उभाउभी, तत्काल
पावईल थडी
८. पैलतीराला
॥४॥
१२७२. तुझें वर्म
१. मर्म, रहस्य
हातीं । दिलें, सांगोनियां संतीं ॥१॥ मुखीं नाम धरीन कंठीं । अवघा
२. संपूर्ण, सर्वव्यापक
सांठवीन पोटीं
३. हृदयात
॥ध्रु॥ नवविधा
४. नऊ प्रकारच्या भक्तीने
वेढिन
५. घेरीन, लपेटीन
आधीं । सांपडलासी भावा संधीं
६. पेचात, तावडीत
॥३॥ तुका म्हणे बळिये
७. सामर्थ्यवान्, बलवान्
गाढे
८. मोठे
। कळिकाळ पायां पडे ॥४॥
१२७३. माझ्या मना लागो चाळा
१. (वा.) नाद किंवा छंद लागो
। पहावया विठ्ठल डोळां ॥१॥ आणीक नाहीं चाड
२. इच्छा
। न लगे संसार हा गोड ॥ध्रु॥ तरीच फळ जन्मा आलों । सरता
३. मान्य, ग्राह्य
पांडुरंगीं झालों ॥३॥ तुका म्हणे देवा! । देईं चरणाची सेवा ॥४॥
१२७४. अवघे जेणें पाप नासे
१. नष्ट होते
तें
२. सावळे परब्रह्म
हे असे पंढरीसी ॥१॥ गात
३. विठ्ठलाचे नाम घेत
जागा गात जागा! । प्रेम मागा विठ्ठला ॥ध्रु॥ अवघी
४. संपूर्ण
सुखाचीच राशी । पुंडलिकाशीं वोळली
५. प्राप्त झाली, प्रसन्न झाली आहे
॥३॥ तुका म्हणे जवळी आलें । उभे ठेलें
६. राहिले
समचरणीं ॥४॥
१२७५. देह तुझ्या पायीं । ठेवूनि झालों उतराई ॥१॥ आतां माझ्या जीवा । करणें तें करी देवा! ॥ध्रु॥ बहुत अपराधी । मतिमंद
१. जडबुद्धीचा
हीन
२. दुष्ट
बुद्धि ॥३॥ तुका म्हणे नेणें । भावभक्तीची लक्षणें
३. स्वरूप
॥४॥
१२७६. जन हे सुखाचें
१. सुखाचे सोबती असतात
दिल्या घेतल्याचें
२. देवाण-घेवाण केले तर चांगले म्हणतात
अंत
३. मरणप्रसंगी
हे काळींचें नाहीं कोणी ॥ध्रु॥ झाल्या हीन
४. क्षीण
शक्ति नाक डोळे गळती । सांडोनियां पळती रांडापोरें
५. बायका-मुले
॥२॥ बाईल
६. बायको
म्हणे खर
७. गाढव
मरता तरी बरें । नासिले
८. घाण केले
हे घर थुंकोनियां ॥३॥ तुका म्हणे माझी नव्हतील कोणी । तुज चक्रपाणि
९. हातात चक्र धारण केले आहे अशा हे भगवंता!
वांचूनियां ॥४॥
१२७७. जाणोनि
१. आत्मत्वाने जाणून
नेणतें
२. ‘मी ब्रह्म आहे’ या वृत्तीने रहित
करीं माझें मन । तुझी प्रेम-खूण
३. भक्तिप्रेमाचे वर्म
देऊनियां ॥१॥ मग मी व्यवहारी
४. लौकिकात.
असेन वर्तत । जेवीं जळा आंत पद्मपत्र ॥ध्रु॥ ऐकोनि
५. (व्यवहारतः)
नाइकें
६. (परमार्थतः)
निंदास्तुति कानीं । जैसा कां उन्मनीं
७. समाधीस्थ
योगिराज ॥३॥ देखोनि न देखें प्रपंच हा दृष्टीं । स्वप्नींचिया सृष्टि चेइल्या जेवीं ॥४॥ तुका म्हणे ऐसें झालियावांचून । करणे तो शीण
८. श्रम, कष्ट
वाटतसे ॥५॥
१२७८. ‘विठ्ठला विठ्ठला’ । कंठ आळवितां
१. हाक मारून
फुटला ॥१॥ कां रे कृपाळू न होसी । काय झाले मजविशीं
२. माझ्याविषयी
? ॥ध्रु॥ झाल्या वेरझारा
३. हेलपाटे, येणे-जाणे
। जन्मा बहुतांचा फेरा
४. वळसा
॥३॥ तुका म्हणे नष्टा
५. अरे निष्ठुर-निर्दयी!
अबोलण्या
६. सांगता न येण्यासारख्या
तुझ्या चेष्टा
७. क्रिया, खोडी
॥४॥
१२७९. प्रपंच वोसरो
१. कमी-कमी होवो, निरास होवो
। चित्त तुझे पायीं मुरो
२. तल्लीन होवो
॥१॥ ऐसें करीं गा पांडुरंगा! । शुद्ध
३. निर्दोष, पवित्र
रंगवावें
४. तन्मय करावे
रंगा ॥ध्रु॥ पुरे
५. बस्स-बस्स
पुरे आतां । नको दुजियाची सत्ता ॥३॥ लटिकें
६. खोटे
तें फेडा
७. दूर करा, निवारण करा
। तुका म्हणे जाय पीडा
८. दुःख, त्रास
॥४॥
१२८०. बोलाचे गौरव
१. आत्मसुखाच्या शय्येवर
। नव्हे माझा हा अनुभव ॥१॥ माझी हरिकथा माउली । नव्हे आणिकांसी पांगिली
२. भरली
॥ध्रु॥ व्याली
३. स्नेहभराने फुटणारा पान्हा
वाढविलें । निजपदी निजविलें ॥३॥ दाटली वोरसें
४. ब्रह्मानंदाने
। त्रिभुवन ब्रह्मरसें ॥४॥ विष्णु जोडी कर
५. हात
। माथां रज
६. धूलीकण
वंदी हर
७. भगवान शंकर
॥५॥ तुका म्हणे बळ । तोडरी
८. (ल) जिंकणे; पाडाव करणे, (पायातील अलंकार)
हा कळिकाळ ॥६॥
१२८१. शेवट तो भला
१. चांगला
। माझा बहु गोड
२. सुखकारक, सुखावह
झाला ॥१॥ आलों निजाच्या
३. माझ्या
माहेरा
४. विश्रांतिस्थान, सुखाच्या आश्रयाची जागा
। भेटी रखुमाईच्या वरा
५. पतीशी
॥ध्रु॥ परिहार
६. निरसन, नाश
झाला । अवघ्या दु:खाचा मागिला ॥३॥ तुका म्हणे वाणी
७. उणीव/ वाचा
। गेली, आतां घेऊं धणी
८. तृप्ती
॥४॥
१२८२. तुझें नाम गाऊं आतां । तुझ्या रंगी नाचों था था ॥१॥ तुझ्या नामाचा विश्वास । आम्हां कैंचा गर्भवास? ॥ध्रु॥ तुझे नामी विसर पडे । तरी कोटी हत्या घडे ॥३॥ नाम घ्यारे कोणी फुका
१. फुकटचे
। भावें सांगतसे तुका ॥४॥
१२८३. बाईल
१. बायको
तरी ऐसी व्हावी । नरकी गोवी
२. गुंतविणे, बांधणे, अडकविणे
अनिवार
३. अपरिहार्यपणे / विपुल
॥१॥ घडों नेदी तीर्थयात्रा । केला कुतरा हातसोंका
४. हाताच्या सवयीचा, ताबेदार, नोकर
॥ध्रु॥ आपुलीच करवी सेवा । पुजवी
५. (वस्त्रालंकाराने) पूजा करवून घेते
देवासारिखें ॥३॥ तुका म्हणे गाढव पशु । केला नाशु आयुष्या ॥४॥
१२८४. बाइले
१. बायकोच्या
अधीन होय ज्याचें जिणें
२. जगणे
। तयाच्या अवलोकनें
३. (तोंड) पाहिले तर
पडिजे द्वाड
४. विघ्न, अपशकुन, अमंगल
॥१॥ कासया ते जंत
५. शूद्र जीव-प्राणी
जिताती संसारीं । माकडाच्या परी
६. प्रमाणे
गारोड्यांच्या ॥ध्रु॥ बाइलेच्या मना येईल तें खरें। अभागी
७. दुर्दैवी, करंटे
तें पुरें
८. पूर्ण, पुरेपूर
बाइलेचें ॥३॥ तुका म्हणे मेंग्या
९. निर्बुद्ध, नेभळट, दुबळा, मूर्ख
गाढवाचे जिणें। कुतऱ्याचे खाणे लगबगा१०
१०. घाई-घाईने, वचवच
॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

1 thought on “दिवस – ८०. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top