दिवस – ८१. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् ।
देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि ॥२३॥
परी
१. (अन्तवत्तु फलं तेषां)
ते भक्त मातें नेणती । जे कल्पनेबाहेरी न निघती । म्हणौनि कल्पित
२. इच्छिलेल्या
फळ पावती । अंतवंत
३. नाश पावणारे
॥१४७॥
किंबहुना
१. (तद्भवत्यल्पमेधसाम्)
‘ऐसें जें भजन । तें संसाराचेचि साधन’ । येर फळभोग तो स्वप्न ! । नावभरी
२. क्षणभर
दिसे ! ॥१४८॥
हें
१. (देवान्देवयजो यान्ति)
असो परौतें
२. एकीकडे
। मग हो कां आवडे तें । परी यजी
३. पूजनादि करतो
जो ‘देवतांतें’ । तो देवत्वासीचि ये ॥१४९॥
येर
१. (मद्भक्ता यान्ति मामपि)
तनुमनुप्राणीं । जे अनुसरले माझेयाचि वाहणीं
२. मार्गाला
। ते देहाच्या निर्वाणीं
३. शेवटीं, देहांतीं
। मीचि होती ॥१५०॥
अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः ।
परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ॥२४॥
परी
१. (अबुद्धयः)
तैसें न करिती प्राणीये । वायां आपुलिया हितीं
२. कल्याणाविषयीं
वाणिये
३. तोटा, नुकसान करून घेतात
। जे पोहताती पाणिये । तळहातींचेनि ! ॥१५१॥
ना, ना
१. (ममाव्ययं)
, अमृताच्या सागरीं बुडिजे । मग तोंडा कां वज्रमिठी
२. घट्ट मिटून धरणे
पाडिजे ?। आणि मनीं तरी आठविजे । थिल्लरोदकातें
३. डबक्यातील पाण्यास
! ॥१५२॥
हैं ऐसें कायिसेया
१. कशाकरितां
करावें । जें – ‘अमृतींही रिगोनि मरावें?’ । तें सुखें अमृत होऊनि कां नसावें
२. न राहावें
। अमृतामाजीं ? ॥१५३॥
तैसा, फळहेतूचा पांजरा
१. पिंजरा
– । सांडूनियां; धनुर्धरा । कां प्रतीतिपाखीं
२. अनुभवरूप पंखानें
चिदंबरा
३. चिदाकाशाचा
गोसाविया नोहावें
४. धनी कां होऊं नये
? ॥१५४॥
जेथ उंचावलेनि पवाडें
१. मानानें
। सुखाचा पैसारू
२. विस्तार, फैलाव
जोडे । आपुलेनि सुरवाडें
३. सुखानें, इच्छेनुरूप
। उडों ये ऐसा ॥१५५॥
तया
१. (अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मां)
उमपा माप कां सुवावें
२. घालावें
?। मज अव्यक्ता
३. निराकाराला
व्यक्त कां मानावें ?। सिद्ध असतां; कां निमावें । साधनवरी
४. साधन करीत कां मरावें
? ॥१५६॥
परी
१. (परं भावमजानन्तो)
हा बोल आघवा । जरी विचारीजतसे
२. विचार करितां
, पांडवा । तरी विशेषें या जीवा । न चोजवे
३. रुचत नाहीं
गा ॥१५७॥
नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृतः ।
मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् ॥२५॥
कां
१. (योगमायासमावृतः)
, जे, योगमायापडलें
२. आदिमायेच्या पडद्यानें
। हे जाले आहाति आंधळे । म्हणौनि प्रकाशाचेनि
३. (नाहं प्रकाशः सर्वस्य)
दिहबळें
४. दिवसाच्या बळानें
। न देखती मातें ॥१५८॥
एहवीं
१. (नाभिजानाति)
, ‘मी नसें ऐसें । काय वस्तुजात
२. (अजं)
असे?’। पाहें पां, कवण जळ रसें
३. द्रवपणावाचून
– । रहित आहे ? ॥१५९॥
पवनु
१. (अव्ययं)
कवणातें न शिवेचि ? । आकाश कें
२. कोठें
समायेचि
३. सामावत नाही
?। हें असो; एकु मीचि । विश्वीं आहें ॥१६०॥
वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन ।
भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ॥२६॥
‘येथें
१. (वेदाहं समतीतानि)
भूतें जियें अतीतलीं
२. होऊन गेलेलीं
। तियें मीचि होऊनि ठेलीं
३. राहिलीं
आणि
४. (वर्तमानानि चार्जुन)
वर्तत आहाति जेतुलीं । तींही मीचि ॥१६१॥
कां भविष्यमाणें
१. पुढें होणारी
जियें हीं । तीहीं मजवेगळीं नाहीं’ । हा बोलचि
२. हें फक्त बोलावयाचेंच
; एहवीं कांहीं । होय ना जाय ॥१६२॥
दोराचिया सापासी । डोंबा
१. काळा
बडिया
२. कवडा
ना गव्हाळा ऐसी । संख्या
३. निर्वचन, निरूपण
न करवे कोण्हासी । तेवीं भूतांसि मिथ्यात्वें
४. खोटेपणानें, अलीक, तुच्छत्व
॥१६३॥
मी ऐसा, पंडुसुता । अनुस्यूतु
१. अखंड
सदा असतां । या संसार
२. या भूतांला जो संसार म्हणून आहे तो आनें बोलें म्हणजे निराळ्याच शब्दानें
जो भूतां । तो आनें बोलें ॥१६४॥
तरी तेचि आतां थोडीसी । गोठी
१. गोष्ट
सांगिजेल; परियेसीं । जैं अहंकार तनूसीं
२. अभिमान व शरीर यांस
वालभ
३. प्रीति, सख्य
पडिलें ॥१६५॥

कपोती स्वात्मजान्वीक्ष्य, बालकाञ्जालसंवृतान् । तानभ्यधावत्क्रोशन्ती, क्रोशतो भृशदुःखिता ॥६५॥
आपली पोटची मुले जाळ्यात अडकली असून ओरडत आहेत असे पाहून कपोतीला फार दुःख होऊन ती ओरडत पिलांकडे धावत गेली. ॥६५॥
तंव काळजाळी एके वेळे । कपोती बांधली देखे बाळें । तोंडु घेऊनि पिटी कपाळें । आक्रोशें लोळे दुःखित ॥५९९॥
बाळें चरफडितां देखे जाळीं । आक्रंदोनि दे आरोळी । बाळांसन्मुख धांवे वेळोवेळीं । दुःखें तळमळी दुःखित ॥६००॥
साऽसकृत्स्नेहगुणिता, दीनचित्ताऽजमायया । स्वयं चाबध्यत शिचा, बद्धान्पश्यन्त्यपस्मृतिः ॥६६॥
प्रेमातिशयाने भारल्यामुळे ती कपोती, मुले जाळ्यात अडकलेली आहेत हे पाहताच, हरीच्या मायेने देहभान विसरून जाऊन स्वतःच त्या जाळ्यात सापडली. ॥६६॥
दुःख द्यावयां भ्रतारासी । आक्रंदे कपोती चालिली कैसी । शतगुणे स्नेहो वाढला तिसी । मृतपुत्रांसी देखोनि ॥६०१॥
पुत्रस्नेहें केलें वेडे । गुण आठआठवूनि रडे । हिताहित न देखे पुढे । बळेंचि पडे जाळांतु ॥६०२॥
मायामोहें भुलली कैशी । जेथ बांधलें देखे पुत्रांसी । ते जाळी घाली आपणासी । मोहें पिशी ते केली ॥६०३॥
कपोतश्चात्मजान् बद्धानात्मनोऽप्यधिकान्प्रियान् । भार्यां चात्मसमां दीनां, विललापातिदुःखितः ॥६७॥
आपल्या प्राणापेक्षाही प्रिय असलेली बालके आणि आपली सहधर्मचारिणी भार्या ही बद्ध झालेली पाहून कपोत अत्यंत दु:खी होऊन शोक करू लागला. ॥६७॥
अंतरला स्त्रीबाळकीं । कपोता तो एकाएकीं । रुदन करी अधोमुखीं । अतिदुःखी विलपतु ॥६०४॥
जीवाहोनि प्रिय अधिक । ते निर्जीव देखिले बाळक । अनुकूल अनुरूपक । भार्या देख अंतरली ॥६०५॥
अहो मे पश्यतापायमल्पपुण्यस्य दुर्मतेः । अतृप्तस्याकृतार्थस्य गृहस्त्रैवर्गिको हतः ॥६८॥
अरे मी किती पापी ! किती दुष्ट माझी बुद्धी ! केवढे संकट माझ्यावर माझ्या दुर्दैवाने ओढवले आहे पाहा! माझ्या सगळ्या वासना अपुऱ्या राहिल्या ; धर्म, अर्थ व काम साधून देणारा माझा सर्व संसार धुळीला मिळाला. ॥६८॥
धर्म अर्थ आणि काम । या तिहींचा आश्रयो गृहाश्रम । तो भंगला मी अनाश्रम । अतृप्त काम सांडूनि ॥६०६॥
पूर्वपापाचा आवर्तु । मज सांडूनि अकृतार्थु । माझा कामु नव्हता तृप्तु । धर्मकामार्थु भंगला ॥६०७॥
गृहीं त्रैवर्गुचि भंगला । चौथा पुरुषार्थ असे उरला । तो साधूनि घेऊं वहिला । आश्रमु भंगल्या क्षिती काय ॥६०८॥
ऐसें म्हणसी जरी निगुतीं । ये अर्थी मी दुर्मती । विषयवासना नोसंडिती । कैसेनि मुक्ति साधेल? ॥६०९॥
म्यां पूर्वी अल्प पुण्य होतें केलें । यालागीं अंतरायी घर घेतलें । माझें परलोकसाधन ठेलें । विधुर केलें मजलागीं ॥६१०॥
हो कां गृहीं असतां गृहस्थां । काय परलोक साधे समस्तां । इतरांची असो कथा । मज साधनता तंव होती ॥६११॥
अनुरूपानुकूला च, यस्य मे पतिदेवता । शून्ये गृहे मां सन्त्यज्य, पुत्रैः स्वर्याति साधुभिः ॥६९॥
मला अनुकूल असणारी, मला शोभणारी, मला दैवत मानणारी अशी माझी स्त्री मला ह्या मोकळ्या घरात टाकून आपल्या सुगुण पुत्रांसह स्वर्गाला जात आहे. ॥६९॥
स्त्रीपुरुषांची चित्तवृत्ती । अनुकूल वर्ते धर्मप्रवृत्तीं । तरीच परलोक साधिती । इतरां प्राप्ती ते नाहीं ॥६१२॥
एकांच्या भार्या त्या तोंडाळा । एकांच्या त्या बहु वोढाळा । एकांच्या त्या अतिचांडाळा । एकी दुःशीला दुर्भगा ॥६१३॥
एकीचा तो क्रोध गाढा । एकी अत्यंत खादाडा । एकी सोलिती दांत दाढा । आरिसा पुढां मांडूनि ॥६१४॥
एकी वोंगळा आळसिणी । एकी त्या महाडाकिनी । एकी सुकुमार विलासिनी । बरवेपणी गर्वित ॥६१५॥
तैशी नव्हे माझी पत्नी । सदा अनुकूळ मजलागुनी । मजसी वर्ते अनुरूपपणीं । धर्मपत्नी धार्मिक ॥६१६॥
मी जेव्हां धर्मी तत्पर । तेव्हां धर्मासी ते अतिसादर । मज कामी जेव्हां आदर । तेव्हां कामचतुर कामिनी ॥६१७॥
मजवांचोनि तत्त्वतां । न भजे आणिकां देवां देवतां । मज सांडूनि न वचे तीर्था । माझें वचन सर्वथा नुल्लंघी ॥६१८॥
एवं रूपगुणकुलशील । मजसी सदा अनुकूल । पतिव्रता जे केवळ । पत्नी निर्मळ पैं माझी ॥६१९॥
मज सांडूनि शून्यगृहीं । पुत्रेसहित साध्वी पाहीं । जातसे स्वर्गाच्या ठायीं । मज अपायीं घालूनि ॥६२०॥
सोऽहं शून्ये गृहे दीनो, मृतदारो मृतप्रजाः । जिजीविषे किमर्थं वा, विधुरो दुःखजीवितः ॥७०॥
आता मी या शून्य घरामध्ये स्त्री आणि मुले गेल्याकारणाने दीन झालो आहे. आता राहिलेले सर्व आयुष्य विधुरावस्थेमध्ये काढून दुःख भोगण्यासाठी कशाला जिवंत राहू ? ॥७०॥
नाशिली स्त्री नाशिल्या प्रजा । येथ म्यां रहावें कवण्या काजा । दुःखें प्राण जाईल माझा । लोकलाजा निंदित ॥६२१॥
एवढे अंगी वाजलें दुःख । काय लौकिकी दाखवू मुख । भंगले संसाराचे सुख । जितां मूर्ख म्हणतील ॥६२२॥
जळो विधुराचे जिणें । सदा निंद्य लाजिरवाणे । न ये श्राद्धींचे आवतणें । सदा वसणे एकाकी ॥६२३॥
ऐसेनी वसतां ये लोकीं । शून्य गृहीं एकाकी । धडगोड न मिळे मुखीं । परम दुःखी मी होईन ॥६२४॥
तांस्तथैवावृताञ्छिग्भिर्मृत्युग्रस्तान्विचेष्टतः । स्वयं च कृपणः शिक्षु, पश्यन्नप्यबुधोऽपतत् ॥७१॥
जाळ्यात अडकल्यामुळे मरणाच्या दारात असलेली आणि तरीही धडपडणारी ती मुले व पत्नी यांना पाहात असूनही मतिभ्रष्ट झालेल्या कपोताने त्या जाळ्यामध्ये स्वतःच उडी घेतली. ॥७१॥
ऐसें बोलोनि केलें काये । मृतस्त्रीपुत्रांकडे पाहे । काळपाशी बांधिली आहे । चेष्टा राहे निःशेष ॥६२५॥
ऐसें देखतांही अबुद्धी । विवेके न धरीचि बुद्धी । आपण जाऊनि त्रिशुद्धी । जाळामधीं पडियेला ॥६२६॥
मेल्या मागे मरणें । देखों हेंचि सर्वांसी करणें । परी जन्ममृत्यु निवारणे । हा स्वार्थु कवणें न धरिजे ॥६२७॥
पहा पां स्त्रीपुत्रकारणे । आपुलाही जीवु देणें । परी भगवत्पदवी साधणें । हे न मने मनें सर्वथा ॥६२८॥
तं लब्ध्वा लुब्धकः क्रूरः कपोतं गृहमेधिनम् । कपोतकान्कपोतीं च सिद्धार्थः प्रययौ गृहम् ॥७२॥
याप्रमाणे तो गृहस्थाश्रमी कपोत, ती कपोती व त्यांची मुले यांना पकडून कार्यसिद्धी झाल्यामुळे आनंदाने व्याध आपल्या घरी गेला. ॥७२॥
जाळी पडला कपोता दुर्बुद्धी । झाली लुब्धकाची कार्यसिद्धी । सहकुटुंब घेऊनि खांदीं । निघे पारधी निजस्थाना ॥६२९॥
ऐसा जो कोणी गृहमेधी । त्यासी सर्वथा काळु साधी । जैशी कपोत्याची बुद्धी । तैसी बुद्धी गृहमेध्या ॥६३०॥
बाळकांच्या काकुळतीं । मरण पावली कपोती । ऐसें देखत देखतां दुर्मती । तेथ निश्चिती उडी घाली ॥६३१॥
यापरी तो कपोता । कुटुंबाची मेधा वाहतां । मरण पावला सर्वथा । विवेकु चित्ता न धरीचि ॥६३२॥
एवं कुटुम्ब्यशान्तात्मा, द्वन्द्वारामः पतत्त्रिवत् । पुष्णन्कुटुम्बं कृपणः, सानुबन्धोऽवसीदति ॥७३॥
याप्रमाणे सुखदुःखादी द्वंद्वांत रमल्यामुळे समाधान नसणारा कृपण गृहस्थ त्या कपोताप्रमाणे कुटुंब पोसत असतानाच सर्व कुटुंबासह नाश पावतो. ॥७३॥
ऐसा कुटुंबी गृहस्थु । कुटुंबपोषणीं आसक्तु । विषयवासना अशांतु । पावे घातु सकुटुंब ॥६३३॥
गृहासक्ती गृहाश्रमु । तो केवळ द्वंद्वाचा आरामु । कपोत्या ऐसा पडे भ्रमु । वृथा जन्मु दवडावा ॥६३४॥
यः प्राप्य मानुषं लोकं, मुक्तिद्वारमपावृतम् । गृहेषु खगवत्सक्तस्तमारूढच्युतं विदुः ॥७४॥
साक्षात उघडे असलेले मोक्षद्वारच असा मनुष्यजन्म प्राप्त झाला असता जो या कपोताप्रमाणे गृहकृत्यांतच रमून राहतो त्याला आरूढच्युत म्हणजे पढतमूर्ख म्हणतात. ॥७४॥
येवोनियां कर्मभूमीसी । जो पावला उत्तम देहासी । त्याहीमाजी उत्तमता कैशी । अग्रवर्णासी पैं जन्म ॥६३५॥
आलिया मनुष्यदेहासी । मुक्तीचा दारवंटा मुक्त त्यासी । लव निमिष येकु दिशीं । यावजन्मेंसी मोकळा ॥६३६॥
इतरां वर्णांची हे गती । मा ब्राह्मण तरी पुण्यमूर्ती । ते सदा मुक्तचि असती । वृथा आसक्ती गुंतले ॥६३७॥
विद्वांस आणि वैराग्य । तें ब्रह्मादिकां न लभे भाग्य । वृथा आसक्ती केले अभाग्य । शिश्नोदरा साङ्ग वेचले ॥६३8॥
मनुष्यदेहीं गृहासक्तु । तो बोलिजे ‘आरूढच्युतु’ । कपोत्याचे परी दुःखितु । सिद्ध स्वार्थु नाशिला ॥६३९॥
विषय, नरदेह, भक्ती (६४० ते ६५०)
विषयी सर्वथा नाहीं तृप्ति । ऐसें श्रुतिपुराणें बोलती । करितां विषयाची आसक्ती । थित्या मुक्ती नरदेहा ॥६४०॥
नवल नरदेहाची ख्याती । रामनामाच्या आवृत्तीं । चारी मुक्ती दासी होती । तो देहो वेंचिती विषयासी ॥६४१॥
विषयसुखाचिये आसक्ती । कोणा नाही झाली तृप्ती । मृगजळाचिये प्राप्ती । केवीं निवती तृषार्त ॥६४२॥
यालागी जाणतेनि मनुष्ये । नरदेहींचेनि आयुष्ये । विषयांचेनि सायासें । व्यर्थ कां पिसे कष्टती ॥६४३॥
नरदेहाऐसें निधान । अनायासें लाधले जाण । सांडी सांडी अभिमान । तेणें समाधान पावसी ॥६४४॥
पुढती नरदेहाची प्राप्ती । होईल येथ नाहीं युक्ति । यालागीं सांडूनि विषयासक्ती । भावें श्रीपति भजावा ॥६४५॥
कलियुगी सुगम साधन । न लगे योग याग त्याग दान । करितां निर्लज हरिकीर्तन । चारी मुक्ति चरण वंदिती ॥६४६॥
इटेसाठी परीस पालटे । येतां कां मानिती वोखटें । तैसा कीर्तनाचेनि नेटेपाटें । देवो भेटे प्रत्यक्ष ॥६४७॥
एका जनार्दनु म्हणे । नश्वर देहाचेनि साधनें । जनी जनार्दनु होणें । हे मुद्रा तेणें लाविली ॥६४८॥
एका जनार्दना शरण । तंव जनार्दनु झाला एक एकपण । जैसें सुवर्ण आणि कंकण । दों नांवी जाण एक तें ॥६४९॥
तोचि एका एकादशी । श्रीकृष्ण सांगे उद्धवासी । अवधूत सांगे यदूसी । गुरुउपदेशी उपदेशु ॥६५०॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कन्धे सप्तमोऽध्यायः॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे परमहंससंहितायां
एकाकारटीकायां सप्तमोऽध्यायः ॥७॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
सातवा अध्याय समाप्त (श्लोक ७४; ओव्या ६५०)

१२८५. जगीं मान्य केलें हा तुझा देकार
१. देणगी, दान
। कीं, काहीं विचार आहे पुढें ॥१॥ करितों कवित्व जोडितों अक्षरें । येणे काय पुरे
२. पूर्णता (कल्याण)
झाले माझें ॥ध्रु॥ तोवरि हे माझी न सरे
३. संपणार नाही
कर-कर
४. कटकट, तक्रार
। जो नव्हे विचार
५. निर्णय, निकाल
तुझ्या मुखें ॥३॥ तुका म्हणे तुज पुंडलिकाची आण
६. शपथ
। जरि कांहीं वंचन
७. फसवणूक, वंचना, कपट
करिसी मज॥४॥
१२८६. झड
१. (वा.) तुटून पडणे, झडप मारणे
मारोनियां बैसलों पंगती । उठवितां
२. (मला) उठविले तर
फजिती दातयाची
३. अन्नदात्याची
॥१॥ काय ते उचित तुम्हां कां न कळे? । कां हो झांका
४. (वा.) दुर्लक्ष, हयगय करणे
डोळे पांडुरंगा! ॥ध्रु॥ घेईन इच्छेचे मागोनि सकळ । ‘नाहीं’ नव्हे काळ बोलायाचा ॥३॥ तुका म्हणे झालों माना
५. सन्मानाचा
अधिकारी । नाहीं लोक
६. लोकलज्जा
परि लाज देवा! ॥४॥
१२८७. माझ्या वडिलांची मिरासी
१. परंपरागत हक्क, वतनदारी
गा देवा! । तुझी चरणसेवा पांडुरंगा! ॥१॥ उपवास पारणी
२. व्रतानंतरचे भोजन
राखिला
३. दाराचे रक्षण केले, (वा.) सेवा केली
दारवंटा
४. ताबा, वतनदारीची तरतूद
। केला भोगवटा
५. कुळात पिढ्यानुपिढ्या चालत आलेले
आम्हांलागी ॥ध्रु॥ वंशपरंपरा
६. आज्ञांकित
दास मी अंकिता
७. त्याग केला तर
। तुका मोकलितां
८. चलनवलन, हालचाल
लाज कोणां? ॥३॥
१२८८. नाम न वदे ज्याची वाचा । तो लेंक
१. मुलगा
दो बापांचा ॥१॥ हेचि ओळखी तयाची । खूण
२. चिन्ह, लक्षण
जाणा अभक्ताची ॥ध्रु॥ ठावा
३. माहीत
नाहीं पांडुरंग । जाणा जातीचा तो मांग ॥३॥ ज्यासी विठ्ठल नाहीं ठावा । त्याचा संग न करावा ॥४॥ नाम न म्हणे ज्याचे तोंड । तेंचि चर्मकाचे
४. चांभाराचे
कुंड
५. कातडी ज्यात भिजविली जातात
॥५॥ तुका म्हणे त्याचे दिवशी । रांड गेली महारापाशीं ॥६॥
१२८९. पतित मिरासी
१. वतनदार
शरण आलों तुज । राखें माझी लाज पांडुरंगा! ॥ध्रु॥ तारियेले भक्त न कळे तुझा अंत
२. शेवट, सीमा
। थोर मी पतित पांडुरंगा! ॥२॥ द्रौपदी बहिणी वैरी
३. दुर्योधनादी शत्रूंनी
गांजियेली
४. छळ केला, त्रास दिला
अापणा ऐसी
५. राजसूय यज्ञात तुझी धर्मभगिनी द्रौपदी पंक्तीत वाढत असताना तिच्या चोळीची गाठ सुटली. ते बघून दुर्योधनादी शत्रूंनी तिची विटंबना केली; परंतु चोळीची गाठ मारण्याकरिता तू तिला अापल्या सारखे चतुर्भज केलेस.
केली पांडुरंगा! ॥३॥ प्रल्हादाकारणे स्तंभी अवतार । माझा का विसर पांडुरंगा! ॥४॥ सुदामा ब्राह्मण दरिद्रे पीडिला । आपणा ऐसा
६. आपल्यासारखे (सोन्याची नगरी देऊन श्रीमंत केले)
केला पांडुरंगा! ॥५॥ तुका म्हणे तुज शरण निजभावें
७. कायावाचामनाने
। पाप निर्दाळावें
८. नाश करावा
पांडुरंगा! ॥६॥
१२९०. कस्तुरीचे रूप अति हीनवर
१. अति निकृष्ट, हलके
। माजी असे सार
२. श्रेष्ठ, उत्कृष्ट (सुगंध)
मोल
३. मूल्य, किंमत
तया ॥१॥ आणीकही तैसीं चंदनाची झाडें । परिमळें
४. सुगंधामुळे
वाढे मोल तयां ॥२॥ काय रूपें असे परीस चांगला । धातु
५. लोखंड
केली मोला वाढ तेणें ॥३॥ फिरंगी
६. तलवार
आटितां न ये बारा रुके
७. एक आणा (रुका=एक पै)
। गुणे मोलें
८. किंमतीने
विके सहस्रवरी
९. हजार रुपयांपेक्षा अधिक
॥४॥ तुका म्हणे नाहीं जातीसवें१०
१०. जातीशी
काम । ज्याचे मुखीं नाम तोचि धन्य ॥५॥
१२९१. नव्हे मी स्वतंत्र अंगाचा
१. स्वाभाविक, स्वतःचे, जन्मजात
पाईक
२. सेवक, शिपाई
। जे हे सकळिक
३. सर्व- (कामक्रोधादिक, संसार दुःख)
सत्ता
४. सामर्थ्याने
वारूं
५. निवारण करेन
॥१॥ तुम्हां आळवावें
६. विनंती करावी
पाउलापाउलीं
७. नेहमी
। कृपेची साउली करीं मज ॥ध्रु॥ शक्तिहीन तरी झालों शरणा-गत । आपुला वृत्तांत जाणोनियां ॥३॥ तुका म्हणे भवाभेणें
८. जन्म-मरणाच्या भयाने
धरिले पाय । आणीक उपाय नेणें कांहीं ॥४॥
१२९२. पाहों ग्रंथ तरी आयुष्य नाहीं हाती
१. (वा.) शरण आलो
। नाहीं ऐसी मति
२. ताब्यात
अर्थ कळे ॥१॥ होईल तें हो या विठोबाच्या नावें । अर्जिले तें भावे जीवीं धरूं ॥ध्रु॥ एखादा अंगासी येईल प्रकार । विचारितां
३. विचार केला असता
फार युक्ति
४. तार्किकपणा-कुतर्क
वाढे ॥३॥ तुका म्हणे आळी
५. हट्ट, छंद
करितां गोमटी
६. चांगली
। मायबापा पोटी
७. हृदयात
येते दया ॥४॥
१२९३. पाहातां रूप डोळां भरे। अंतर
१. अंतर, द्वैत
नुरे वेगळें
२. अज्ञानपटल
। इच्छावशे खेळ मांडी
३. चांगला
। अवघे सांडी बाहेरी ॥१॥ तो हा नंद-नंदन बाइये! । यासी काय परिचार
४. संवाद
वो? ॥ध्रु॥ दिसतो हा नोहे तैसा । असे दिशा व्यापक । लाघव हा खेळासाठीं । होतां भेटी परतेना
५. मागे येत नाही
॥३॥ म्हणोनि उभी ठाकलीये
६. येऊन राहिले
। परतलीये या वाटा । आड
७. पुढे
करोनियां तुका । जो या लोकां दाखवितो ॥४॥
१२९४. इंद्रियांचीं दीनें
१. गरीब, दुर्बल, केविलवाणा
। आम्ही केलों नारायणें ॥१॥ म्हणऊनि ऐसे सोसी
२. सहन करतो
। काय सांगों कोणापाशीं ॥ध्रु॥ नाहीं अंगी बळ । त्याग करिजेसा
३. करण्याइतके
सकळ ॥३॥ तुका म्हणे मोठे । प्रारब्ध हे होते खोटें ॥४॥
१२९५. हातीं धरूं जावें । तेणें परतेंचि
१. (वा.) दूर जावे, माघारी फिरावे
व्हावें ॥१॥ ऐसा कां हो आला वांटा
२. हिस्सा
हीन
३. रहित
भाग्याचा करंटा
४. दुर्दैवी, अनिष्ट सूचक गुण
॥ध्रु॥ ‘देव’ ना ‘संसार’ । दोही ठायीं नाहीं थार
५. आश्रय
॥३॥ तुका म्हणे पीक । भूमि नेदी, न मिळे भीक ॥४॥
१२९६. मोलें
१. मजुरी देऊन
घातलें रडाया । नाहीं असूं
२. अश्रू
आणि माया
३. प्रेम
॥१॥ तैसा भक्तिवाद
४. भक्तीचे व्याख्यान, विचार
काय । रंगबेगडीचा न्याय
५. बेगडाच्या (वर्ख) रंगा प्रमाणे (वरवर सुंदर दिसते)
॥ध्रु॥ वेठी धरिल्या
६. (वा.) जबरदस्तीने कामास लावले असता
दावी भाव
७. मनोगत
। ‘मागे
८. डुकरे
पळायाचा पाव
९. बिचारी
’ ॥३॥ काजव्याच्या१०
१०. काजवा (त्याचा प्रकाश)
ज्योती । तुका म्हणे नलगे वाती ॥४॥
१२९७. तरीच जन्मा यावें । दास विठोबाचें व्हावें ॥१॥ नाहीं तरि काय थोडी । श्वान सूकरें
१. जन्मल्याचे
बापुडी
२. मालिन्य (अविद्या-पाप इ.)
॥ध्रु॥ ज्याल्याचे ते फळ । अंगीं लागों नेदी मळ
३. (संत सज्जनांच्या)
॥३॥ तुका म्हणे भले । ज्याच्या
४. आदर निर्माण होतो, तृप्त (सुखी) होतो
नांवें मानवलें
५. विचार करून
॥४॥
१२९८. द्या जी माझा विचारोनियां
१. वाटा
विभाग
२. संपणार नाही
। न खंडे हा लाग
३. संबंध, पाठलाग
आहाचपणें
४. वरवर
॥१॥ किती नेणों तुम्हां साहाते
५. सहन होते
कटकट । आम्हीच वाईट निवडलों ते ॥ध्रु॥ करवितां कलह
६. भांडण
जिवाचियेसाठीं । हे तुम्हा वोखटी
७. जीव जाईपर्यंत
ढाळ
८. वाईट
देवा! ॥३॥ तुका म्हणे धीर
९. सवय, खोड, रीत
कारणा आपुला । तुम्हीं तो विठ्ठला मायातीत१०
१०. कार्य, कर्तव्य आहे
॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top